Skip to main content

आमिर आणि शाहरुख

लेखक चिनार यांनी बुधवार, 25/11/2015 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
मन्नतसारख्या किल्ल्यात राहताना किंवा बुलेट प्रूफ व्ह्यानीटी व्ह्यान मधून फिरताना किंवा सतत आसपास दहा-दहा अंगरक्षक बाळगताना जर तुम्हाला या देशात असुरक्षित वाटत असेल तर मेला' आणि 'रा वन' सारखे अत्याचार भोगताना प्रेक्षकांच्या सुरक्षेचा कधी विचार केला का रे तुम्ही दोघांनी? आमिर...अरे बायको म्हणतेय म्हणून देश सोडून जायचंय तुला!...नाही म्हणजे खरच देशातली असुरक्षितता हे कारण आहे की बायको पासून सुरक्षा हे कारण आहे ? तिची फारच इच्छा असेल तर इराक,सिरीयाला घेऊन जा तिला एकदा.आपल्याकडे जुन्या काळात हत्तीवरून साखर वाटायचे की नै तसे विमानातून बॉम्बगोळे वाटतात तिथं. हवं तर फ्रांसला घेऊन जा. आयफेल टॉवर शेजारची जागा फार स्वस्तात मिळतेय म्हणे आजकाल! फूटबॉलची मैदानं पाडून गावागावात आता लष्करी छावण्या बांधणार आहेत म्हणे... नाहीतर अमेरिकेत जाऊन ये. तिथले कस्टमवाले शाहरुखच्या फार ओळखीचे आहेत ना..दरवेळी आस्थेने चौकशी करतात त्याची. 'माय नेम इज खान अँड आय एम नॉट अ टेररिस्ट' हा डायलॉग ऐकल्याशिवाय सोडतच नाही त्याला. तसं तर पाकिस्तानात जायला सुद्धा काही हरकत नाहीये पण ते मुहाजिर वगैरे लफडं संभाळून घे बाबा. किरणवहिनींना मुंबईत मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते ना...पाकिस्तानात तर झेड सिक्युरिटी दिलीये म्हणे शाळांना आजकाल. मागल्यावर्षी नाही का दीडशे निष्पाप मुलांना ठार मारण्याची किरकोळ घटना घडली तिथे ! बाकी कशाकश्शाची म्हणून चिंता नाहीये पाकिस्तानात..ऑस्ट्रेलीयात अधूनमधून भारतीयांवर गोळीबार होत असतो नाहीतर तिथे जा असं सुचवलं असतं.. नाही तर एक काम करा ना...अंटार्क्टिका खंडातच जाऊन राहा...एकदम सुरक्षित !!! http://chinarsjoshi.blogspot.in/
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 31275
प्रतिक्रिया 216

प्रतिक्रिया

In reply to by रामपुरी

भारत पाकिस्तान २०१५ वर्ल्डकप मॅचसाठीची दर्शकसंख्या : २८.८ कोटी. http://www.aidem.in/downloads/Indian%20Media%20Scenario.pdf Television in India has a total viewership of 650 million as of 2011 भारताची टीवी बघणार्‍यांची संख्या ६५ कोटी, त्यात ५० टक्के स्त्रिया वगळल्या तर उरते ३०-३५ कोटी. भारत-पाकिस्तान मॅचसाठीची दर्शकसंख्या २८.८ कोटी. यात रेडीओ, न्युजपेपर, इन्टरनेटवरून ह्या मॅचचा आनंद घेणारे धरले नाहीत. आता म्हणा लोल...

In reply to by संदीप डांगे

अहो स्नॅपडिल प्रकरण (निगेटिव फिडबॅक) हि रिॲक्शन आहे त्या निषेध करणार्या लोकांची. बर्याचदा ब्रॅंड ॲंबॅसेडर्स जबाबदारीने वागतात, पब्लिकली वादग्रस्त स्टेटमेंट वगैरे देत नाहित. आणि ते तसे वागलेच तर कंपन्याच पुढचा रोष, आर्थिक नुकसान टाळण्यासाठी अशा वाचाळविरांना नारळ देतात. बात खतम. स्नॅपडिलला सरतेशेवटी धंदा करायचाय, आणि ग्राहक हा राजा आहे. या प्रकरणात स्नॅपडिलला आर्थिक नुकसानीचे संकेत दिसत असुनहि त्यांनी योग्य ती कारवाई वेळेवर केली नाहि तर त्याची जबाबदारी त्यांचीच असणार आहे, निषेध नोंदवणार्यांची नाहि... :)

In reply to by राजाभाऊ

भारी लॉजिक आहे, याच लॉजिक ने आपण पाकिस्तानसोबतचा प्रत्येक व्यवहार, क्रिकेटपासून व्यापारापर्यंत, का थांबवत नाही याचे मला अजुनही कुतूहल आहे.

In reply to by संदीप डांगे

लाॅजीक कसलं त्यात डोंबलाचं, ती वस्तुस्थिती आहे. पाॅला डिन गुगल करा, संदर्भ हवा असेल तर... आणि पाकिस्तानचा उल्लेख म्हणजे काय च्या काय! पाकिस्तान तुमच्यावर अवलंबुन आहे का कुठल्याहि बाबतीत कि भारत हा एक मोठ्ठा ग्राहक आहे पाकिस्तानचा?..

In reply to by संदीप डांगे

बाकी सगळ्यापेक्षा आत्ता स्नॅपडील महत्वाची. तुम्ही नेहमीच अशी भूमिका घेता याचं आम्हाला भारी कौतुक वाटतं. ही जनसामान्यांनी घेतलेली उस्फुर्त भूमिका आहे हे तर मान्य कराल? सध्या लगेच करता येणारी गोष्ट लोकांनी केली. यात स्नॅपडीलच्या कर्मचार्यांचं नुकसान करायचं म्हणून नाही. प्रत्येक क्रियेचे परिणाम हे तर असणारच, जसे अमीरच्या वक्तव्याचे झाले. हे करणारे सगळे कोण तर तुमच्या आमच्यासारखेच लोक. का यात पण काही षडयंत्र दिसतंय? आपण एखाद्याला विरोध करताना कोणाचं समर्थन करतोय हे महत्वाचं आहे.

In reply to by ट्रेड मार्क

बरं बरं, क्रियेचे परिणाम काय... ठिक आहे. पण ज्याने केलं त्याला सोडून निरपराधांना का म्हणून शिक्षा? संजय दत्तवर देशद्रोहाचा, ऐकलं का, 'देशद्रोहा'चा खटला न्यायालयात चालवला गेला. त्याचे आरोप सिद्ध झाले तेव्हा हे सगळे सुडो-देश-भक्त कुठे झोपले होते कुणास ठावूक... त्याच्या चित्रपटांवर कुणाला बहिष्कार टाकायला सुचलं नाही. एखाद्याला विरोध म्हणजे कुणाचे तरी समर्थनच असा ग्रह बनवून घेतलेल्यांना आता काय समजवणार... असो.

In reply to by संदीप डांगे

म्हणजे साधारणपणे सारख्या घटनेला १०-१५ वर्षांपूर्वी येणारी प्रतिक्रिया आणि आत्ता येणारी प्रतिक्रिया सारखी असावी? अनुभवावरून समाजाची विचारपद्धती बदलते आणि ती त्या त्या वेळेच्या सुसंगत होते. तुम्ही म्हणताय त्या न्यायाने तुमचे तुमच्या लहानपणी असलेले विचार आत्ता पण आणि या नंतर पण कायम राहतील का? आणि त्या वेळेला संजयवर पण आगपाखड झालीच होती. आरोप सिद्ध झाल्यावर लोकांनी त्याचे सिनेमा बघणार नाही असं म्हणलं होतं आणि नाना पाटेकरने पण त्याच्या बरोबर यापुढे काम करणार नाही असं जाहीर केलं होतं. दुर्दैवाने त्यावेळेला स्नॅपडील अस्तित्वात नव्हती त्यामुळे जनतेला तो पर्याय नव्हता. तुम्हाला असं म्हणायचंय का की केवळ संजय दत्त हिंदू आहे म्हणून त्याला अश्या प्रकाराला सामोरं जायला लागलं नाही आणि आमिर मुस्लिम आहे म्हणून त्याला विरोध होतोय? हे वाचा.

In reply to by संदीप डांगे

त्याच्यावर TADA (Terrorist and Disruptive Activities [Prevention] Act) या कायद्याखाली AK ४७ बाळगणे आणि नंतर बेकायदेशीररीत्या ती नष्ट करायचा प्रयत्न करणे हा आरोप होता. देशद्रोहाचा किंवा देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप त्याच्यावर ठेवला नव्हता. तसं असतं तर तो जामिनावर बाहेर राहून चित्रपटांमध्ये कामं आणि परदेशप्रवास करूच शकला नसता. त्याच्यावर गुन्हा सिद्ध झालाय तो हा - बेकायदा शस्त्र बाळगून ते नष्ट करायचा प्रयत्न केल्याबद्दल. आणि त्याला त्याच्यासाठी असलेली शिक्षा झालेली आहे, जी तो भोगतोय.

In reply to by बोका-ए-आझम

त्याला त्याच्यासाठी असलेली शिक्षा झालेली आहे, जी तो भोगतोय. हॅहॅहॅ... मला वाटलं की त्याच्या पॅरोल मधुन त्याला वेळ मिळालाच की तो आत बाकींच्या दर्शन देण्यासाठी जातो. ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Li-Fi Internet Technology 100 Times Faster Than Wi-Fi

In reply to by मदनबाण

त्याला त्याच्यासाठी असलेली शिक्षा झालेली आहे, जी तो त्याच्या सोयीप्रमाणे (सुट्टी घेत घेत) भोगतोय. :)

In reply to by नाव आडनाव

त्याला देशद्रोहाच्या गुन्ह्यावरुन शिक्षा झालेली नाही हे सिद्ध होतं. देशद्रोह हा मोठा गुन्हा आहे जो संजय दत्तवर कधी दाखल झालाच नाही (आता का ते उज्ज्वलला विचारा.)शिवाय महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यावर त्याच्या सुट्ट्यांवर चाप बसलेला आहेच.

In reply to by मदनबाण

त्याला Furlough असं म्हणतात. पॅरोल हा मला वाटतं १० वर्षांपेक्षा जास्त वर्षांची शिक्षा असेल तर असतो. चूभूद्याघ्या.

In reply to by बोका-ए-आझम

बरोबर आहे तुमचं...Furlough आहे ते.ऑगस्ट मधे मुन्ना भाय पॅरोलवर बाहेर आले होते, तर मला वाटतं आधी डिसेंबर मधे १४ दिवस रजा घेउन सुद्धा भाई आत परतले नव्हते म्हणुन गोंधळ झाला होता. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Li-Fi Internet Technology 100 Times Faster Than Wi-Fi

In reply to by संदीप डांगे

snapdeal या कंपनीचे या प्रकरणात "थोडे" नुकसान झाले हे मान्य आहे. पण भारतीय समाज एवढा mature आहे असा समज करून घ्यायचे करणाच नाही. उदा. हल्लीच झालेले शारापोवा-सचिन प्रकरण, परवाचेच सचिन-ब्रिटीश एअरवेज प्रकरण मैगी वर बंदी आली तेव्हा अमिताभ व अन्य जाहिरात करणाऱ्या अभिनेत्यांवर काहीशी टीका झालीच. किंबहुना अशा अथवा अन्य कोणत्यातरी बाबतीत बहुतकरून सगळेच समाज immature असतात. उदा. गे फोबिया, इस्लामोफोबिया हे प्रकार अमेरिकेसारख्या सुधारित समाजात आहेत. अशा immaturity बाबत थोडी सहिष्णुता दाखवावी अशा मताचा मी आहे. त्यामुळे कंपन्यांनी brand ambassador शी करार करताना सार्वजनिक वक्तव्ये करताना काय काळजी घ्यावी व न घेतल्यास व त्यामुळे कंपनीचे नुकसान झाल्यास काय आर्थिक दंड असतील यासंबंधीचे मुद्दे समाविष्ट करावेत वा अन्य कायदेशीर तरतुदी कराव्या, ज्याने आर्थिक झळ कमी बसेल व अशा बेजबाबदार वक्तव्यांनाही लगाम बसेल. जर भविष्यातील करार अशा प्रकारचे होण्यासाठी जर कंपन्या एखादे पाऊल टाकणार असतील तर "होतं ते भल्यासाठी" म्हणून पुढे सरकायला हरकत नाही.

In reply to by sagarpdy

सेन्सिबल प्रतिसाद, धन्यवाद! याच उत्तराची अपेक्षा होती. पण आपण कुठेच चुकत नाही याचा अहंकार आलेल्यांना समजवणे कठीण असते.

In reply to by संदीप डांगे

एक गोष्ट तुम्हाला समजलेलीच दिसत नाही की समजून घ्यायची तुमची इच्छा दिसत नाही. स्नॅपडीलविषयी कोणालाही राग नाही. राग आहे आमीरखानच्या त्या वक्तव्याविषयी.आणि आमीरखानसारख्या सेलेब्रिटींचा हा माज त्यांना मिळत असलेल्या पैशामुळे आणि प्रसिध्दीमुळे असतो.या माजाचा स्त्रोतच बंद केला तर ते सुतासारखे सरळ येतील अशी अपेक्षा*. त्यामुळे अशा माजोरड्यांच्या चित्रपटावर आणि ते जे जे ब्रॅन्ड एन्डोर्स करतात त्यावर लोकांनी आपण होऊन बहिष्कार टाकला की मग त्यांना नवे चित्रपट मिळणे कमी होईल आणि नव्या जाहिरातीही मिळायच्या नाहीत. उद्या स्नॅपडीलने आमीरला ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसेडर पदावरून हाकलले तर मी स्वतः स्नॅपडीलवरून काही गोष्टी मुद्दामून ऑर्डर करायला तयार आहे. *: माझे हे दिवास्वप्न राहणार आहे हे मला माहित आहे. कारण भारतातील बहुसंख्य लोक तुमच्यासारखे आहेत. त्यामुळे हे असले टिनपाट नट दाऊदच्या पैशावर माज करणार, वाटेल ते बोलणार आणि इथले आपलेच लोक त्यांना डोक्यावर घेणार. काय करणार?

In reply to by गॅरी ट्रुमन

तुम्हाला "ब्रँड वॅल्यू मॅनेजमेंट" ह्या व्यवसायाच्या प्रकाराबद्दल ठावूक असेल अशी अपेक्षा करतो. कारण तसे असते तर आपण वरील प्रतिसाद दिला नसता.

In reply to by संदीप डांगे

वड्याचं तेल वांग्यावर याचं इतकं भारी उदाहरण दिल्याबद्दल धन्यवाद! पाकिस्तानबरोबर खेळायला आपले खेळाडू उत्सुक असतात आणि प्रेक्षकही उत्सुक असतात. पण का त्याचं उत्तर दिलंच नाहीत. कुठल्याही भारतीय प्रेक्षकांना भारताने पाकिस्तान ला हरवलेलं आवडतं. पाकिस्तानी खेळाडूंचे पडलेले खांदे आणि उतरलेले चेहरे बघायला आवडतं. एकच उदाहरण देतो. २००७ मध्ये आपण दक्षिण आफ्रिकेत झालेला २०-२० विश्चचषक जिंकला. तेव्हा आपल्या खेळाडूंची मरीन ड्राईव्हवरुन मिरवणूक निघाली होती. २०११ मध्ये आपण ५० षटकांचा विश्वचषक जिंकलो, तोही मुंबईत. पण असं काही झालं नव्हतं. एकच कारण होतं त्याच्यामागे - पाकिस्तान. २०११ चा विश्वचषक बहुसंख्य भारतीयांसाठी मोहालीतच संपला होता. राहता राहिली स्नॅपडीलची गोष्ट. मोबाईल फोन मागवणा-यांना साबण पॅक करुन देणारी कंपनी म्हणून ती आधीच बदनाम आहे. त्यांनी आमीरला ब्रँड अँबेसॅडर म्हणून घेण्याचं एकमेव कारण म्हणजे २००३ च्या कीटकनाशक प्रकरणानंतर कोकाकोलानेही त्याला ब्रँड अँबेसॅडर नेमलं होतं आपली इमेज सुधरवण्यासाठी आणि तेच आता स्नॅपडील करतंय. बाकी १००% भारतीय कंपनी आहे म्हणून कितीजण स्नॅपडीलवर खरेदी करत असतील त्याबद्दल शंकाच आहे.

In reply to by बोका-ए-आझम

ओके ओके. म्हणजे आता मी 'निरपराध' म्हणत आहे ती स्नॅपडीलच कशी 'बदमाश' आहे हे सिद्ध करायचा घाट घातला जात आहे काय? चांगलंय. चालु द्या...

In reply to by संदीप डांगे

अजिबात रचून सांगत नाहीये. जालावर धुंडाळा. लिंक मिळेल. जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा हर्षा भोगले आणि आलोक नाथ हे स्नॅपडीलचे BA होते. नंतर एकदम आमीरला घेऊन - ये दिवाळी दिल की डीलवाली वगैरे जाहिराती सुरु झाल्या. तुमच्यासारख्या जाहिरातींच्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाने हा परस्परसंबंध लक्षात घेऊ नये याचं मला उलटं आश्चर्य वाटतंय.

In reply to by बोका-ए-आझम

अहो, प्रश्न तुम्ही कहानी रचून सांगण्याचा नाहीच आहे. स्नॅपडील ही साबण देणारी, जास्त लोक कुठे खरेदी करतात, वैगेरे जे मुद्दे तुम्ही मांडत आहात ते खरे असतील किंवा आहेतही पण त्या 'बदमाशपणा'चा आमीरच्या वक्तव्याशी कसा संबंध आहे तेच मला समजत नाही. म्हणजे एखाद्या बॉम्बस्फोटात १० 'निरपराध' माणसे मारली गेली असा शब्दप्रयोग असतो तेव्हा ती त्या बॉम्बस्फोटाच्या बाबतीत 'निरपराध' म्हटलेली असतात. त्या घटनेशी, घडवून आणण्याशी काहीही संबंध नसतांना मारली गेली आहेत म्हणून निष्पाप, निरपराध. त्या मरणार्‍यांमधे कुणी आपल्या सुनेला हुंड्यासाठी जाळून मारलेलं असेल, तर आपण असं म्हणणार का "बरा झाला मेला ते, नाहीतरी कुठे निरपराध होता तो?" या पार्श्वभूमीवर आमीरच्या वक्तव्यांवरून लोक स्नॅपडीलला विरोध करत आहेत, त्या स्नॅपडीलला मी निरपराध म्हटलं तर तीच कशी बदमाश कंपनी आहे हे सिद्ध करण्याचा आटापिटा का व्हावा असा माझा स्पष्ट प्रश्न आहे. बघितलं तर हा एक पॅटर्न दिसून येतो. जो कोणी विरोधात असेल, त्याचा, त्याच्याशी संबंधीत प्रत्येक बाबीचा पंचनामा करून ती व्यक्ती, संस्थाच कशी बिनमहत्त्वाची, बिनकामाची आहे हे ठासून सांगण्याचा ट्रेंड आलेला आहे. एखाद्याचं समर्थन करायचंच म्हटल्यावर समर्थक कुठल्याही थराला जाऊ शकतात हे सगळीकडे दिसून येतंय. तिथे आपल्या खिशाला, अंगाला, डोक्याला त्रास होणार नाही असे बालीश विरोध करून काहीतरी केल्याचं समाधान मिळवुन देशभक्त असल्याचे सिद्ध करण्याचा अतिशय केविलवाणा प्रयत्न चालला आहे.

In reply to by संदीप डांगे

पण त्या 'बदमाशपणा'चा आमीरच्या वक्तव्याशी कसा संबंध आहे तेच मला समजत नाही.
परत एकदा-- विरोध स्नॅपडीलला नाही तर आमीरला आहे. तुम्ही जनमेजयाची इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा ही गोष्ट वाचली असेलच. त्याच पध्दतीने "स्नॅपडीलाय स्वाहा आमीराय स्वाहा" असे म्हणा हवे तर. आक्षेप आहे आमीरसारखी मंडळी त्यांना मिळालेले पैसे आणि प्रसिध्दी याच्या जोरावर माज करून वाटेल ते बोलतात त्याला. त्यांच्या माजाचा हा स्त्रोत बंद करा मग स्नॅपडीलवर राग असायचे काही कारण नाही.

In reply to by संदीप डांगे

अर्थात. १. आमिर च्या वक्तव्याची फळ त्याच्यापर्यंत या ना त्या मार्गाने पोहाचावालीच पाहिजेत. फक्त सोशल मिडीयावर बोंबा मारून काहीच उपयोग नाही. त्यामुळे snapdeal काढून टाकण्याचे मी समर्थन करेन. अन्य मार्ग उदा. चित्रपट व अन्य जाहिराती उत्पादनांवरील बहिष्कार देखील जरूर वापरावे. लोकांना प्रथम snapdeal सुचलं कारण ते काढून टाकण व त्यामागील भूमिका प्ले स्टोर वर व्यक्त करण अतिशय सोपे आहे. २. snapdeal ने जर आमिरच्या चांगल्या प्रतिमेचा फायदा घेतला आहे तर त्याच्या वाईटपणाचा तोटाही सहन केलाच पाहिजे. हा व्यवसायातील रिस्क चा भाग आहे. ३. snapdeal ने त्यांची ब्रांड व्ह्याल्यु कशी टिकावी हे त्यांच्या मार्केटिंग विभागाचे काम आहे. "चिंता करतो विश्वाची" मोड मध्ये जाण्याची गरज नाही. यापलीकडे snapdeal हि भारतीय कंपनी आहे म्हणून त्यांना वाईट परीक्षणे देणे व अनइंस्टाल करणेबाबत : १. स्वदेशी हि फार जुनी कल्पना आहे मान्य, पण सुजाण ग्राहकाने एखादी कंपनी केवळ स्वदेशी आहे म्हणून खरेदी करणं हा मूर्खपणा आहे. २. snapdeal कडून बाहेर पडलेले ग्राहक बव्हांशी flipkart कडेच वळतील, किमान मी तरी तसे केले असते. Amezon हि कंपनी जरी परदेशी असली तरी बहुतेकसे विक्रेते देशातीलच आहेत. त्याचबरोबर कंपनीस जो कमिशन चा भाग मिळतो त्यातील काही भाग नक्कीच भारतीय IT कामगारांच्या खिशात जातो. त्यामुळे "देशभक्तानो स्वदेशी कंपनी आहे म्हणून snapdeal काढू नका" हा वाद घालू नये.

In reply to by sagarpdy

१००% सहमत. स्नॅपडील वर बहिष्कार ही त्यावेळेला सहज जमणारी गोष्ट होती म्हणून लोकांनी केली. बाकी त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार वगैरे नंतर येतील अशी अशा करतो. अशाच फक्त, कारण आपल्या लोकांची स्मरणशक्ती फारच कमी आहे. चित्रपटातल्या हिरोला बाकी कश्यापेक्षाही जास्त महत्व देण्याची पण मानसिकता आपल्याकडे आहे. मी एकट्यानी बघितला वा नाही बघितला तर असा काय फरक पडणार आहे असं वाटणारे पण बरेच लोक आहेत. फारफार तर "दंगल"ला जरा कमी प्रतिसाद मिळेल पण त्यापुढे काही होईल असं वाटत नाही.

In reply to by संदीप डांगे

इस्राईल पलेस्टिनिना मारतो म्हणुन भारतातील मुस्लिम दुकानदारांनी कोकाकोला व् पेप्सी कंपनीची शीतपेय आपल्या दुकानात ठेवायचे बंद केले होते. अगदी मुस्लिम रेस्टारेंट मधेहि ही शीतपेय मिळत नव्हती. कारण काय तर अमेरिका इस्राईलवर नियंत्रण ठेवत नाही. अमेरिका इस्राईलला पाठिंबा देते. कप्पाळ! तर आमच्या आमिरभायना उभे केले पाहिजे होते सांगायला की याचा कोककोलाचा काही संबध नाही. आमिर कोककोलाचा ब्रांड अम्बेसेडर आहे ना? मग जो आमच्या अल्पसंख्यक भौनि गोंधळ घातला असता की यंव रे यंव ! धोबिपछाड़च घातला असता. बाकी ते धोबीघाट पिक्चर कोणाला समजल का हो भाऊ? मला माजे पैशे परत पायजे व्हते.

In reply to by संदीप डांगे

माझ्या प्रतिसादात लिहिलेला नाही. ही लबाडी (फोनऐवजी साबण देण्याची) त्यांच्या लाॅजिस्टिक्स पार्टनरची असेल पण जबाबदारी तर स्नॅपडीलची आहे की नाही? आणि म्हणूनच त्यांना आमीरसारख्या credibility असलेला brand ambassadorची गरज लागली.
जो कोणी विरोधात असेल, त्याचा, त्याच्याशी संबंधीत प्रत्येक बाबीचा पंचनामा करून ती व्यक्ती, संस्थाच कशी बिनमहत्त्वाची, बिनकामाची आहे हे ठासून सांगण्याचा ट्रेंड आलेला आहे. एखाद्याचं समर्थन करायचंच म्हटल्यावर समर्थक कुठल्याही थराला जाऊ शकतात हे सगळीकडे दिसून येतंय. तिथे आपल्या खिशाला, अंगाला, डोक्याला त्रास होणार नाही असे बालीश विरोध करून काहीतरी केल्याचं समाधान मिळवुन देशभक्त असल्याचे सिद्ध करण्याचा अतिशय केविलवाणा प्रयत्न चालला आहे.
हे तर सगळीकडेच होतंय. इथे मिपावरही होतंच की. असहिष्णुता वाढल्याचं सांगून पुरस्कार परत करण्याचं जे ढोंग इतक्या दिवसांपासून चालू आहे ते दुसरं काय आहे? का एका पक्षाची किंवा त्याच्या विचारसरणीला मानणाऱ्यांची त्यावर मक्तेदारी असावी असं तुमचं मत आहे? सगळेजण, माध्यमंसुद्धा हेच तर करताहेत. त्यामुळे कुणीही इतरांवर बोटं रोखू नयेत. उरलेली तीन बोटं स्वतःवर रोखली जातात हे लक्षात ठेवावं.

In reply to by संदीप डांगे

एकेकाळी आमिरच ऐकून स्नॅपडीलवरून घेणारया लोकांनी आमिरचच ऐकून स्नॅपडीलवरून विकत घेण बंद केल. असो.

In reply to by गॅरी ट्रुमन

@गॅरी ट्रुमन, इथे भारतीय खरोखरच सहिष्णु असल्यामुळे आमीरसारख्यांनी असा कितीही आततायीपणा केला तरी अशी प्रतिक्रिया भारतात उमटायची शक्यता कमी. कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा थांबत नाही. "शक्यता कमी, शक्यता कमी" करत आपण आज इथे आलो आहोत, पाच वर्षे संपेपर्यंत कुठे असू याचा अंदाजच लावूयात...
आमिर आजकल लुधियाना में फिल्‍म दंगल की शूटिंग कर रहे हैं। वह एमबीडी रैडिसन ब्‍लू होटल में ठहरे हैं। बुधवार को इस होटल के बाहर शिवसैनिक प्रदर्शन करने पहुंचे। उन्‍होंने आमिर के लिए ‘मुल्‍ला’, ‘मुसल्‍ला’, ‘कुत्‍ता’ जैसे शब्‍द इस्‍तेमाल किए और उनके फोटो भी जलाए। वहीं शिवसेना के पंजाब अध्‍यक्ष राजीव टंडन ने आमिर को थप्‍पड़ मारने वाले शख्‍स को हर एक थप्‍पड़ के बदले एक लाख रुपए देने का एलान भी कर दिया।
- See more at: http://www.jansatta.com/national/shiv-sena-protest-in-ludhiyana-punjab-…

In reply to by संदीप डांगे

ओके. आता तुमचा मुद्दा जास्त स्पष्ट कळला. अहो मग इतका प्रच्छन्न मार्ग का निवडता आहात टिका करायला. सरळ सरळ मोदि सरकार पद्धतशीरपणे सहिष्णुतेची वाट लावत आहेत असं बोला कि.

In reply to by अर्धवटराव

झालं बोलून...? आता खालील मुद्द्यांबद्दल तुमचे मतही द्या: १. मागच्या महिन्यात नारायन मूर्तींनी देशात वातावरण बिघडत असल्याचे म्हटले तेव्हा किती देशभक्त इन्फोसिस कर्मचार्‍यांनी इन्फोसिसचा राजीनामा मूर्तींच्या तोंडावर फेकून मारला? २. आमिरखान काहीही बरळू दे. त्यात स्नॅपडील ही भारतीय कंपनी व त्यांच्या भारतीय कर्मचार्‍यांचा नक्की काय दोष? ३. शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांचे असे बक्षिस जाहीर करणे योग्य आहे काय? ४. भाजपाच्या मंत्र्यांनी गेल्या काही महिन्यांत जी बेजबाबदार वक्तव्ये केली त्यांना आपण किती महत्त्व देता? ५. जे आमिरच्या वागण्या-बोलण्यातली विसंगती दाखवत आहेत त्या दांभिक लोकांच्या वागण्यातली विसंगती दाखवणे म्हणजे 'अमिरखानला समर्थन व भाजपला विरोध असणे' असा समज का आहे? ५. हे 'मोदिसरकार' काय प्रकार आहे? ६. देशात फक्त 'भारतसरकार' नावाची शासनव्यवस्था आहे जीचे धोरणकर्ते पाच वर्षांसाठी नागरिकांनी निवडून देतात. ती ज्या कारणासाठी निवडून दिली आहे त्याबद्दल योग्य काम करत नसेल तरी नागरिकांनी टिका करू नये असे तुमचे मत आहे काय? आणि जमलं तर माझ्या बाकीच्या प्रतिसादावर पण प्रतिसाद द्या. सोयीचा एकच शब्द धरून टेमपास करायचा असेल तर चलु द्या अत्मकुंथन....

In reply to by संदीप डांगे

माझं मत कितीही आणि कुठल्याही प्रश्नावर विचारलत तरी सद्यः सरकारच्या पाच वर्षातील कार्यक्रमासंदर्भातली तुमची मतं कळायची ति कळलीच ना. "मोदी सरकार भारताचं एका आगभट्टीत रुपांतर करतय" एव्हढं सिंपल वाक्य टंकायला तुम्ही या आणि इतर धाग्यावर इतका उदंड प्रतिसाद प्रपंच का केला हेच कळत नाहि.
झालं बोलून...? आता खालील मुद्द्यांबद्दल तुमचे मतही द्या:
आमचं बोलुन न बोलुन काय होणार आहे ? तुमची अ‍ॅक्च्युअल मतं कळायला इतकी पळापळी का करावी लागली हेच कोडं आहे. असहिष्णु वातावरणाचा परिणाम असावा बहुदा.
. मागच्या महिन्यात नारायन मूर्तींनी देशात वातावरण बिघडत असल्याचे म्हटले तेव्हा किती देशभक्त इन्फोसिस कर्मचार्‍यांनी इन्फोसिसचा राजीनामा मूर्तींच्या तोंडावर फेकून मारला?
मला नाहि माहित. तशी माहिती काढायचा मी प्रयत्न पण केला नाहि. आणि तसा राजीनामा वगैरे देण्यात काहि पॉइंट आहे असंही मला वाटत नाहि. तुम्ही तुमची मतं प्रच्छनपणे का मांडलीत याचा या प्रश्नाची काय संबंध आहे हे ही कळलं नाहि.
२. आमिरखान काहीही बरळू दे. त्यात स्नॅपडील ही भारतीय कंपनी व त्यांच्या भारतीय कर्मचार्‍यांचा नक्की काय दोष?
स्नॅपडील वगैरेचा काहिच दोष नाहि. तुम्ही तुमची मतं प्रच्छनपणे का मांडलीत याचा या प्रश्नाची काय संबंध आहे हे ही कळलं नाहि.
३. शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांचे असे बक्षिस जाहीर करणे योग्य आहे काय?
शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची असली मतं मोदी सरकार आल्यानंतर बनली आहेत कि काय? शिवसेनेच्या मतांना योग्यायोग्यतेची लेबलं तशीही क्वचीतच लावली जातात. तुम्ही तुमची मतं प्रच्छनपणे का मांडलीत याचा या प्रश्नाची काय संबंध आहे हे ही कळलं नाहि.
४. भाजपाच्या मंत्र्यांनी गेल्या काही महिन्यांत जी बेजबाबदार वक्तव्ये केली त्यांना आपण किती महत्त्व देता?
शुण्य महत्व. तसंही त्याचा व्हायचा तो परिणाम झाला आहेच. त्यांनी जर सुधारणा दाखवली नाहि तर पुढेही व्हायचे ते परिणाम होतिलच. हि अशी बेजबाबदारीची विधानं मोदी सरकार आल्यामुळे सुरु झाली असं मला नाहि वाटत. ते पहिलेही होत होतं राजकारणात. तुम्ही तुमची मतं प्रच्छनपणे का मांडलीत याचा या प्रश्नाची काय संबंध आहे हे ही कळलं नाहि.
५. जे आमिरच्या वागण्या-बोलण्यातली विसंगती दाखवत आहेत त्या दांभिक लोकांच्या वागण्यातली विसंगती दाखवणे म्हणजे 'अमिरखानला समर्थन व भाजपला विरोध असणे' असा समज का आहे?
तुम्ही जे काहि टंकलय त्यावरुन मी माझं मत बनवलं. बाकि कुणी कुणाचे खरे-खोटे बुरखे फाडावे हे माझ्या हाती नाहि. तुम्ही तुमची मतं प्रच्छनपणे का मांडलीत याचा या प्रश्नाची काय संबंध आहे हे ही कळलं नाहि.
५. हे 'मोदिसरकार' काय प्रकार आहे?
भौ, शब्दांचा कीस पाडुन वकिली थाटाने आर्ग्युमेण्ट करायची फार काहि हौस नाहि मला. आणि म्हणुनच तुम्ही तुमची मतं प्रच्छनपणे का मांडलीत याचा या प्रश्नाची काय संबंध आहे हे कळलं नाहि.
६. देशात फक्त 'भारतसरकार' नावाची शासनव्यवस्था आहे जीचे धोरणकर्ते पाच वर्षांसाठी नागरिकांनी निवडून देतात. ती ज्या कारणासाठी निवडून दिली आहे त्याबद्दल योग्य काम करत नसेल तरी नागरिकांनी टिका करू नये असे तुमचे मत आहे काय?
भारत देशातल्या सरकारबद्दल थोडीफार जुजबी माहिती मला आहे. नव्याने करुन देण्याबद्दल धन्यवाद. नागरीकांनी टीका जरुर करावी, तशी ति करतातच. तुम्हाला जे सुचवायचं आहे ते सरळ सरळ टंकण्याऐवजी आडमार्गाने का गेलात हेच फक्त कळत नाहिए. असो. त्याचंही काहि फार कुतुहाल नाहि.
आणि जमलं तर माझ्या बाकीच्या प्रतिसादावर पण प्रतिसाद द्या. सोयीचा एकच शब्द धरून टेमपास करायचा असेल तर चलु द्या अत्मकुंथन....
आत्मकुंथन काय? बरं. मूळ मुद्दा टाळलात. ते ही स्वाभावीक आहे. हे कुंथन वगैरे अलंकारांनी प्रतिसाद देण्याचा आता कंटाळ येतो. असो.

In reply to by संदीप डांगे

मागच्या महिन्यात नारायन मूर्तींनी देशात वातावरण बिघडत असल्याचे म्हटले तेव्हा किती देशभक्त इन्फोसिस कर्मचार्‍यांनी इन्फोसिसचा राजीनामा मूर्तींच्या तोंडावर फेकून मारला?
साहेब जरा फ्लॅशबॅक करायचे का? या चर्चेत असा मुद्दा आला होता की अमेरिकेला सतत नावे ठेवणारे लोकच परत अमेरिकेत जायला धडपडत असतात ते ढोंग आहे. त्यावरच तुमचा प्रतिसाद होता---अशा भारतीयाला कामानिमित्त अमेरिकेत जावे लागत असेल तर त्यात काय ढोंगीपणा आहे? . वास्तविक अमेरिकेत जावेबिवे कोणालाही लागत नसते. तर असे लोक कधी अमेरिकेत जायला मिळते यावर टपून बसलेले असतात. आणि अमेरिकेत गेले नाही तर यांच्या घराचे ई.एम.आय भरायला पैसे कुठून येणार हा प्रश्न नसतोच मुळी कारण भारतातील नोकरी चालूच असते आणि जो मिळायचा तो पगार मिळतच असतो.आणि तरीही तुम्ही म्हणता की "अशा भारतीयाला कामानिमित्त अमेरिकेत जावे लागले तर त्यात ढोंगीपणा काय"? नारायणमूर्ती जे काही बोलले ते मान्य नाहीच. पण त्याचबरोबर नारायणमूर्तींमुळे देशाची मान जगात उंचावली हे पण बरेचसे लोक मान्य करतीलच (याविषयी चर्चा अन्य धाग्यावर झाली आहे.त्याची पुनरावृत्ती इथे नको). तेव्हा नारायणमूर्ती जे काही बोलले त्यामुळे राजीनामा फेकून मारावा अशी अपेक्षा करण्यासाठी तितका आधार आहे असे वाटत नाही. आणि समजा तशी अपेक्षा करायला काही आधार आहे हे गृहित धरू. तसे असेल तर जगातील जवळपास सर्व वाईट गोष्टींसाठी अमेरिकेला जबाबदार धरून दिवसरात्र अमेरिकेच्या नावाने बोटे मोडणार्‍या लोकांनीच "कामानिमित्त जावे लागले तर त्यात काय बिघडले" हे म्हणणे आणि त्याचवेळी नारायणमूर्तींच्या एका वाक्यामुळे "देशभक्तांनी" राजीनामा द्यावा अशी अपेक्षा करणे ही आणखी मोठी विसंगती आहे हे नक्कीच.

In reply to by गॅरी ट्रुमन

जिथली चर्चा तिथे करावी म्हणता आणि स्वतःच इथली तिथली अर्धवट ठिगळे इथे आणून जोडताय... चांगलंय. माझा अमेरिकेच्या परराष्ट्रधोरणाला असलेला विरोध, नारायणमूर्तींचे आणि अमिरचे एकसारखे वक्तव्य, स्नॅपडील अनइन्स्टाल करणारे 'देशभक्त', यांचा मेळ कसा घातला बॉ तुम्ही...? हे म्हणजे लैच हुच्च झालं. जरा अजून इस्कटून सांगा.

In reply to by संदीप डांगे

हे म्हणजे लैच हुच्च झालं. जरा अजून इस्कटून सांगा.
आज जरा थोडा जास्तच वेळ आहे म्हणून इस्कटून सांगतोच. पायरी १: तुमच्या सारख्यांचा अमेरिकेला अगदी जोरदार विरोध आहे, अमेरिकेने लक्षावधी लोकांना ठार मारले आहे इत्यादी इत्यादी. त्याउलट कुणाही 'देशभक्ताचा' नारायणमूर्तींच्या एका वाक्याला विरोध असला तरी तुमच्यासारखे अमेरिकेला जितका जोरदार विरोध करतात त्याच्या कित्येक पटींनी कमी विरोध नारायणमूर्तींचा 'देशभक्तांनी' केला होता हे मिपावरील मागची चर्चा बघता समजायला हरकत नसावी. विशेषतः अमेरिकेला ह**** वगैरे वेगवेगळ्या चर्चेत अगदी फ्रीली म्हटले गेले होते (तुम्ही तसे म्हणणारे नव्हतात हे पण आताच स्पष्ट करतो). त्याउलट नारायणमूर्तींच्या त्या वाक्याला विरोध करूनही त्यांच्याविषयी आदर व्यक्त केलेले अनेक मिपाकर होते (मीपण त्यातलाच एक) हे पण समजून यायला हरकत नसावी. म्हणजेच तुमच्यासारख्यांचा जितका अमेरिकेला विरोध आहे त्याच्या कित्येक पटींनी कमी विरोध 'देशभक्तांचा' नारायणमूर्तींना आहे असे म्हणायला हरकत नसावी. पायरी २: मागच्या चर्चेत कुणीतरी म्हटले की अमेरिकेला इतका विरोध असूनही हे लोक अमेरिकेत जायला जीवाचा आटापिटा का करतात. त्यावर तुम्हीच म्हटलेत--"कामानिमित्त अमेरिकेत जावे लागले तर त्यात काय बिघडले". वास्तविक अमेरिकेत कोणाला जावेबिवे कोणाला लागत नाही आणि असे लोक अमेरिकेत जायला अगदी एका पायावर तयार असतात ही गोष्ट तूर्तास बाजूला ठेऊ. म्हणजे अमेरिकेला इतका प्रचंड विरोध असूनही परत अमेरिकेत जायला आटापिटा करणे ही तुम्हाला विसंगती वाटत नाही. पण तुम्ही अमेरिकेला करता त्याच्या कित्येक पटींनी कमी विरोध नारायणमूर्तींना 'देशभक्त' करत असूनही आणि नारायणमूर्तींच्या कर्तुत्वाविषयी इन जनरल आदर असूनही किती देशभक्तांनी राजीनामा दिला असेही तुम्ही विचारता. म्हणजे एखाद्याचा एखाद्या गोष्टीला (अमेरिकन सरकारला) १०० एकक विरोध असेल आणि त्याच गोष्टीला सुसंगत कृत्य (त्याच अमेरिकन सरकारकडून व्हिसा मिळावा यासाठी आटापिटा करणे) त्याने केले तर त्यात काय बिघडले आणि दुसर्‍याचा अन्य कोणत्या गोष्टीला (नारायणमूर्तींचे एक वाक्य) १ एकक विरोध असेल आणि त्या गोष्टीला सुसंगत कृत्य (त्याच नारायणमूर्तींनी स्थापन केलेल्या कंपनीत नोकरी करणे) त्याने केले तर मात्र राजीनामा का देत नाही हा प्रश्न??? ही बात काही हजम झाली नाही. असो.

In reply to by गॅरी ट्रुमन

इथवर कळले, पुढे? म्हणजे नारायणमूर्तींच्या सारखेच वक्तव्य आमिरखानने केले तर तो ज्या कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आहे त्या कंपनीला जाणून बुजून त्रास होईल असे कृत्य करणे ह्यामागचे काय लॉजिक? अमेरिका पटत नसुन कामानिमित्त तिथे जाणारे, नारायणमूर्तींची विधान अजिबात पटत नसूनही देशाअभिमानापेक्षा पोटापाण्याची जास्त काळजी असल्यामुळे राजीनामा न देणारे, स्वतःच्या पार्श्वभागाला काहीच त्रास होत नसल्याने स्नॅपडीलचे अ‍ॅप सोडणारे यांच्यात काय समान वा विरोधी धागा दिसतोय ते अजूनही कळत नाही. माफ करा, मी काही तुमच्यासारखा फार उच्चविद्याविभूषित नाही तेव्हा इतकं समजावून सांगितले तर हे ही सांगा.

In reply to by संदीप डांगे

म्हणजे नारायणमूर्तींच्या सारखेच वक्तव्य आमिरखानने केले तर तो ज्या कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आहे त्या कंपनीला जाणून बुजून त्रास होईल असे कृत्य करणे ह्यामागचे काय लॉजिक?
तिसर्‍यांदा-- स्नॅपडीलवर मुळातला राग नाहीच. राग आहे आमीरखानवर. तेव्हा त्रास आमीरला व्हावा ही इच्छा. असले उलटेसुलटे बोलणार्‍या आमीरला स्नॅपडीलने हाकलले तर ठिक नाहीतर "इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा" या न्यायाने स्नॅपडीलही भरडली जाणारच. इलाज नाही.

In reply to by संदीप डांगे

स्नॅपडीलचे अ‍ॅप सोडणारे चुकीचे का बरोबर हे ठरवता येणे सोप्पे नाही. पण काही लोक केवळ डिलीट करण्यार्या लोकांना विरोध म्हणून ५ स्टार रेटिंग देत आहेत! त्यांना तरी काय बोलणार! मुळात ग्राहकाला अ‍ॅप डिलिट करण्याचा अधिकार आहे आणि ते करण्याची कारणे देण्यास तो बांधील नाही. आमिर खाननेही त्या मुलाखतीत सांगितले कि शांततेने होणार्या कुठल्याही विरोधास त्याचा पाठींबा आहे. मग असे करणाऱ्या लोकांना चुकीचे कोणत्या दृष्टीकोनातून ठरवायचे. खरेदी करण्यासाठी इतरही भारतीय कंपनी आहेत त्यामुळे तोही मुद्दा नाही. कोणास ठाऊक, कदाचित या प्रकरणातून कंपन्यांना नवीन धडा मिळेल आणि कराराचे काही नवीन नियम तयार होतील!

In reply to by शब्दबम्बाळ

ऊद्या एखादी ओफर सुरु केली कि लोक पुन्हा खरेदी करतील स्नॅपडील वरुन. या प्रकरणांमुळे त्यांना प्रसिद्धी मात्र जोरदार मिळाली आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

मला एक कळले नाही नारायण मूर्तीं चा राग आला तर राजीनामा का फेकायचा? उलट त्याच्याच कंपनीत राहुन त्यांना त्रास द्यायचा ना. राजीनामा दिला तर फावेलच की असली संधीसाधू बडबड करणार्‍यांची.

In reply to by प्रसाद१९७१

जो न्याय स्नॅपडील ला तोच इन्फोसिस ला. सिम्पल लॉजिक आहे. पण तिथे पोटापाण्याचा प्रश्न असल्याने सामान्य माणसास अंगास फार तोशीस न लागू देणारे उपाय हवे असतात.

In reply to by संदीप डांगे

असंतोष आमिरखानविरुद्ध आहे. आणि स्नॅपडीलने तो आपला प्रतिनिधी म्हणून भक्कम पैसे देऊन नेमला आहे. आणि जो काही असंतोष आहे तो आमिरखानला प्रतिनिधी नेमण्याविरुद्ध आहे. स्नॅपडीलचे नोकरदार रस्त्यावर यावेत म्हणून नाही. जे उद्योग आमिरखानच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन (योग्य ती किंमत चुकवून) आपले उखळ पांढरे करायला बघतात त्यांनी ह्याकरता जागरूक असलेच पाहिजे की ह्या व्यक्तीने समाजात काय उचापती केल्या आहेत. मायकेल फ्लेप्स हा अत्यंत लोकप्रिय क्रीडापटू. त्याच्या विक्रमानंतर अनेक ब्रेकफास्ट सिरियलवाल्यांनी त्याला पैसे देऊन आपल्या उत्पादनाची जाहिरात करायला बोलावले. पण नंतर हा मद्यपान करुन कार चालवत असताना पकडला गेला. एकदा ड्रग वापरताना आढळला. तात्काळ हे जाहिराती करार रद्द करून टाकले गेले. तीच गोष्ट टायगर वूड्स नामक प्रसिद्ध गोल्फ खेळाडूची झाली. इन्फोसिस आणि नारायण मूर्ती हे नाते आणि स्नॅपडील आणि आमिरखान ह्या नात्यात मोठा फरक आहे. मुर्तींनी इन्फोसिस घडवण्यात सिंहाचा वाटा उचललेला आहे. त्यामुळे मूर्तींच्या वादग्रस्त विधानाबरोबर त्यांचे मोठे योगदान हेही विचारात घेतले पाहिजे. उलट स्नॅपडीलचा आमिरखानशी संबंध एका व्यवहारापुरताच आहे. आणि देशाविरुद्ध असे गरळ ओकणार्‍याला त्याची सजा मिळायला हवी आणि त्याकरता स्नॅपडीलने काहीतरी करावे ह्या विचाराने हा बहिष्कार होतो आहे. जर स्नॅपडीलच्या प्रवक्त्याने तत्परतेने आमिरखानच्या वक्तव्याचा निषेध केला असता तर कदाचित इतका असंतोष उसळला नसता.

In reply to by संदीप डांगे

कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा थांबत नाही. "शक्यता कमी, शक्यता कमी" करत आपण आज इथे आलो आहोत, पाच वर्षे संपेपर्यंत कुठे असू याचा अंदाजच लावूयात...
मजाच म्हणायची. तुम्ही त्या चार्ली हेब्डो हत्याकांडासारख्या अश्लाघ्य गोष्टीला कसलीतरी प्रतिक्रिया म्हणून एका अर्थी त्याचे समर्थन करणार आणि भारतात आमीरसारख्याच्या वक्तव्याविरूध्द त्याला थप्पड मारायला लाख रूपये इनाम द्यायची घोषणा केली (ज्याचे मी तरी कधीच समर्थन करू शकणार नाही) तर भारतातील परिस्थिती वाईट झाली असे म्हणणार? एकच मापदंड लावा हो.

In reply to by गॅरी ट्रुमन

खरे तर समाज सेवक आमिर खान ने चौकात उभे रहायला पाहिजे थप्पड मारुन घ्यायला. किती गरजू लोकांना १-१ लाख मिळतीत. अशी समाजसेवे ची संधी कशी कोणी सोडू शकतो?

In reply to by संदीप डांगे

हे कसे काय समजले नाही. आमिर भंजाळला आहे ते नाही दिसतं का? आणि मग सामान्य माणूस म्हणुन निषेध कसा करायचा ते सुचवा स्नॅपडीलला असा काय फरक पडतो यामूळे उद्या त्यांनी ओफर्स सुरु केल्या कि लोक पुन्हा इन्स्टऑल करतील. तुम्ही तुमच बोला लोकंच काय घेउन बसलात.

In reply to by संदीप डांगे

तुम्ही आम्ही सुद्धा येतोच पण आमिर बद्दल असलेला रोष प्रभाविपणे आणि त्याला समजेल असा व्यक्त करण्यासठी काय मार्ग सुचवाल?

In reply to by नया है वह

असलेला रोष प्रभाविपणे आणि त्याला समजेल असा व्यक्त करण्यासठी काय मार्ग == अ‍ॅपवापसी असलेला रोष प्रभाविपणे आणि त्याला समजेल असा व्यक्त करण्यासठी काय मार्ग== अ‍ॅवार्ड वापसी

खरतर आमिर आणि शाहरुखचे मुद्दे मिसळून चालणार नाही... शाहरुखची मुलाखत राजदीप सरदेसाई घेत होते त्यामुळे अर्थातच त्यांना त्या मुद्द्यावर शाहरुखचे मत हवे होते. शाहरुख म्हणाला होता कि "Intolerance वाढतोय पण तो जगात सगळीकडे वाढतोय फक्त भारतात नाही. आणि आपल वय आता इतक झाल आहे(हे त्याने मान्य तरी केलंय! ;) ) कि आपण शांतपणे त्याकडे बघू शकतो. पण तरूणांच रक्त सळसळत असते त्यामुळे मग प्रतिक्रिया येतात" यात फारस चुकीच काही वाटत नाही पण नंतर त्याला वेगवेगळे रंग देण्यात आले. आता आमिर! आमिर ने मुलाखतीच्या सुरुवातीलाच सांगितल कि 'पत्रकारितेसाठी सध्याचा काळ कठीण आहे!' खरतर याच वाक्यावर मला आश्चर्य वाटल(आतंकवाद्याला सहानुभूतीच्या बातम्या पहिल्या पानावर कशा येतात बुवा मग?) आणि पुढे त्याने अगदी भ्रमनिरास केला. काही प्रश्नांना तर गुळमुळीत उत्तरे दिली. त्याने मांडलेले काही मुद्दे: १. आतंकवादाला धर्म नसतो आपण हिंदू, इस्लामिक दहशतवाद असे नाही म्हटले पाहिजे. २. जो हातात कुराण घेऊन कत्तल करतो तो मुसलमान नाही. (खरा मुसलमान कोण, हे कोण ठरवणार? याचे मात्र काही स्पष्टीकरण नाही) 3. त्याच्यामते देशातील वातावरण गेल्या ६ ते ८ महिन्यात असहिष्णू होत असलेले दिसत आहे ४. सेन्सोर बोर्डाचे वर्तन देखील गेल्या ६ ते ८ महिन्यातच बदलले आहे. (जेम्स बोंड चा किसिंग सीन...) ५. कर्नल महाडिक यांच्या घरी बरेच राजकारणी गेले नाहीत कारण प्रत्येकाचे आपापले अजेंडे असतात आणि कोणीच पर्फ़ेक्ट नाही त्यामुळे अशा गोष्टी घडत राहतात. (हे सगळे राजनेता दादरीच्या वेळी गेले पण महाडिक यांच्या घरी संरक्षण मंत्रीच गेले बाकी कोणी नाही असे का? या प्रश्नाचे उत्तर!) ६. किरणला हल्ली वर्तमानपत्र उघडायला देखील भीती वाटते! (हे खूपच अति झाले, हे ऐकून असे वाटले जणू भारतात सगळे लोक एकमेकांची कत्तल करत आहे आणि पानेच्या पाने याच्या बातम्यांनी भरून जात आहेत!) ७. भारतात काही मुस्लिम संघटना इसीस ला विरोध करत आहेत.

मला अस वाटतय की अमिर ने बरच social work केलय. नर्मदा बचाव आंदोलन किंवा सत्यमेव जयते सारखे कार्यक्रम हे सर्व त्याचे देशाबद्दल आस्था असण्याचे उदाहरणे आहेत. लोकशाही असणार्या देशाचा एखादा नागरीक जर त्याला देशातील काही बाबी पटत नसतील आणि तो उघडपणे बोलत असेल तर त्यात प्रोब्लेम काय?? लगेच त्याला पाकिस्तान कडे बोट दाखवायची काय गरज आहे?? कुणालाही "तू पाकिस्तानात जा" हे बोलणारे आपण कोण? आजपर्यंत अनेकान्नी पुरस्कार माघारी करुन नाराजी दाखवली पण लोकान्नी एवढी "नाटक" दाखवली नव्हती. मग आमिर खानलाच वेगळा न्याय का?

In reply to by सभ्य माणुस

दोन लॉजीकल फॉलसी (तार्कीक उणीवा) आहेत. "डॉ.स्मीथ एवढे नावाजलेले हृदयरोग तज्ञ आहेत, म्हणून त्यांना जुगार खेळण्याकडे डोळे झाक करावी' हे जस तार्कीक उणीवेच आहे तसच 'अमीरखानने अमुक एवढी कामे केलीत म्हणून त्याचे तर्कसुसंगत नसलेले विधान स्विकारले जावे' हे ही तार्कीक उणीवेचे आहे. पहिली तार्कीक उणीव अमीर-किरण राव यांच्या अतीरंजीत विधानातच होती, एका प्रचंड मोठ्या रिकाम्या कागदावर एक दोन रंगाचे थेंब पडले आहेत त्या वरून संपूर्ण कागदाचा रंग ठरवता येत नाही, पण नेमकी हीच तार्कीक उणीव अमीर खानच्या विधानात आहे. किंवा जी काही असहीष्णूता आहे ती आधी पासून आहे ती गेल्या काही महिन्यात वाढली हे म्हणणे सांख्यिकीला धरून ठरण्याची शक्यता कमी आहे. बहुधा FTII आणि इतर डाव्या कलाकारांकडून आलेला दबाब (हि राव बाई मुळची बंगालात वाढलेली हे ही लक्षात घ्यावे) आणि एकतर्फी इंग्रजी माध्यमांचे एकांगी प्रसिद्धीच्या परिणामातून घरात बसून त्या राव बाईने काही बाही विचार केला असेल नवर्‍यासमोर बोलून दाखवला असेल, पण १९९२ - ९३ चा काळ आता पेक्षा कठीण होता तेव्हा यांना काहीच वाटले नाही आपापले आयुष्य सुखेनैव कंठले आणि आता सध्या वस्तुतः उत्तरप्रदेश कर्नाटकातल्या काही घटनांपलीकडे काही विशेष समस्या नाहीत तेव्हा केवळ राजकीय भूमिकेतून केलेल्या प्रचारास बळी पडून काही बाही केलेले विधान वाटते. तिसरी गोष्ट एकाच प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी पुरेसे समतोल उत्तर दिलेले नव्हते. सुधीर, तवलीन सिंघ या पत्रकारांनी खोदल्यानंतर गुळमूळीत सारवासारव केल्या सारखी उत्तरे देणे अमिरखानकडून अभिप्रेत होते असे वाटत नाही.

In reply to by सभ्य माणुस

योग्य प्रतिसाद दिला आहेस रे सभ्य माणसा.आमीरने जरा अतिरंजित वर्णन केले पण ह्या फिल्लमबाज मंडळींना फार मनावर घ्यायचे कारण नाही. उद्या आमीर व मोदी ह्यांची भेट झाली व हास्तांदोलन करतानाचे फोटो प्रसिद्ध झाले तर काय करायचे ? मग दंगल चित्रपट बघायचा का? असा ह्यांचा सवाल. आमीर मुरलेला अभिनेता आहे. काश्मीरी पंडितांच्या हक्कासाटी तो जर जंतरमंतरला धरणे धरून बसेल व मग बघा दंगल चित्रपट कसा चालतो ते.

In reply to by सभ्य माणुस

दाऊद इब्राहिम ने देखिल सो कॉल्ड सोशल वर्क़ केले आहे, मग.... आमिर खान सिनेसृष्टित काम करतो. तेथे कोणाकडून पैसा येतो हे गुपित नाही आहे .सत्यमेव जयते मधे आमिरने वैदकीय व्यवसायावर ताशेरे ओढले होते मग एक एपिसोड तो चित्रपट व्यवसायातील अनिष्ट प्रथावर का नाही बनवु शकला? पाकिस्तान पाठवण्याची भाषा बोलली गेली कारण आमिरनेच देश सोडण्याची भाषा केलि आहे. मग त्याला पर्याय नको?

In reply to by सभ्य माणुस

उद्या मी ट्विटर अथवा अन्य साईटवर असहीष्णूतेबद्दल काही संदेश टाकला तर मला कितीसा भाव मिळणारे. माणसाची मुळात प्रसिद्धी जास्त तितकी त्याची विधाने गाजणे व त्यावर प्रतिकिया मिळण्याचे प्रमाण जास्त. बाकी "पाकिस्तानात जा" हा निव्वळ मूर्खपणा आहे. snapdeal वाले पोळले या प्रकारात, पण लोकांची हि गांधीगिरी करण्याची शक्कल आवडली आपल्याला. माझ्या मते - आता या असहिष्णुता प्रकरणाचा कंटाळा आला आहे. काही दिवसापूर्वी लोकं काहीसे गंभीर होते याबद्दल. हल्ली हि अशी प्रतिक्रिया मिळतेय. अजून काही काळात "रोज मरे त्याला कोण रडे" हा प्रकार होऊ शकेल. साहित्यिक, अभिनेते व अन्य वैचारिक मंडळीनी फार लवकर त्यांचा हुकुम संपवलाय. जाता जाता :
आजपर्यंत अनेकान्नी पुरस्कार माघारी करुन नाराजी दाखवली पण लोकान्नी एवढी "नाटक" दाखवली नव्हती. मग आमिर खानलाच वेगळा न्याय का?
आजपर्यंत एवढ्या दंगली, धार्मिक मारामाऱ्या बोंबाबोंब झाली. पण मोदी सरकारच्या काळातच पुरस्कार परत का केले जातात ?

In reply to by कौशिकी०२५

नर्मदा बचाव आंदोलन ठिक आहे
ह्या आंदोलनात ह्या चोरानी नक्की काँट्रीब्युशन दिले हे कोणी सांगू शकेल का? कीती दिवस आयुष्यातले दिले? उगाच काय कौतुक करताय? त्यातही मुळाशी जायचे तर ते आंदोलन बरोबर तरी होते का?

In reply to by प्रसाद१९७१

आमीरने नर्मदा बचाव आंदोलनाला पाठिंबा दिला (२००६ सालची गोष्ट असेल) तेव्हा भाजप कार्यकर्त्यांनी त्याचा फना हा चित्रपट गुजरातमध्ये प्रदर्शित होऊ दिला नाही. तेव्हा नरेंद्र मोदीच गुजरातचे मुख्यमंत्री होते. पण देशात काँग्रेसचं राज्य होतं. त्यामुळे देशात असहिष्णुता वगैरे नव्हती पण आता मोदी पंतप्रधान आहेत आणि भाजपची सत्ता देशात आहे, मग लगेच असहिष्णुता वाढली. अस्सल मुंबईकर भाषेत - पियेला है क्या असं विचारावंसं वाटतं आमीरला.

In reply to by सभ्य माणुस

काय सोशल वर्क केलय आमिर खानने ? सत्यमेव जयते च्या प्रत्येक एपिसोडसाठी ३ कोटी मानधन घेतल होत त्याने ,आणि 'नर्मदा बचाव ' आंदोलनात त्याचे काहीही योगदान नाही , फ़क्त आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता
लोकशाहीत जसा आमिर खानला देशाचा नागरिक म्हणून त्याच मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे तसाच त्याच्या वक्तव्याचा निषेध करण्याचा अधिकार या देशातील इतर जनतेला आहे 'नाटक ' लोकांनी नाही आमिर खानने केलीत

ल्या भो ल्या आते !

किरण राव म्हणते - आमच्या मुलान्च्या सुरक्षित भविष्यासाठी भारत सोडून गेल पाहिजे... . आणि . शहीद कर्नल महाडीक यान्च्या पत्नी म्हणतात - " भारत मातेच्या सुरक्षेसाठी मी माझा मुलगा आणि मुलगी भारती सैन्यात पाठवणार."

बेंगलोरच्या इम्रान नावाच्या एका इमामाचे भारतात मुस्लिम सुरक्षीत असल्याबद्दलचे आणि अमिरखानच्या वाक्यावर टिका करणारे स्टेटमेंट आले आहे.

आपल्या देशांत हे सरकार आल्यापासून अचानकपणे असहिष्णुता खूपच वाढली आहे. त्यावर एकच उपाय आहे. हे आत्ताचे सरकार पाडा आणि राहुलचे सरकार आणा. मग बघा, कशी चुटकीसारखी सहिष्णुता परत प्रथापित होईल. त्यानंतर जगभरातल्या सर्व निर्वासितांच्या रांगा आपल्याच देशाकडे वळतील. इतकं , अगदी कडेवर घेऊन कौतुक, दुसर्‍या कुठल्या देशांत होणार ?