✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सरकारने कोणाचे स्मारक उभारावे याबाबतचे निकष कोणते?

र
राजेश कुलकर्णी यांनी
गुरुवार, 11/19/2015 - 23:59  ·  लेख
लेख
सरकारने कोणाचे स्मारक उभारावे याबाबतचे निकष कोणते? स्मारकातील सरकारच्या सहभागामुळे गुंडगिरीला व असभ्यपणाला जाहीर प्रतिष्ठा . . . दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन नुकताच झाला. त्यानिमित्ताने त्यांच्या स्मारकासाठीच्या ठिकाणाची घोषणा झाली. मुंबईतील महापौरांचा आताचा बंगला असलेली वास्तु स्मारक म्हणून वापरले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या स्मारकामध्ये नक्की काय दाखवले जाईल याची उत्सुकता आहे. कारण त्यांच्या पक्षाची ना काही भूमिका, ना काही तत्वे, ना काही विचारधारा. जी तत्वे म्हणून जी दाखवली ती सतत बदलत राहिले. आधी मुंबईतले कम्युनिस्ट, मग लुंगीवाले मद्रासी, मग भैय्ये, मग मुसलमान, असा सतत कोणाचा ना कोणाचा तरी द्वेष करत राहून आपण मलई खात रहायचे यातच यांचे कौशल्य. यांना कायद्याचे राज्य मान्य नाही – कारण ते करतील तो न्याय ही त्यांची कायमची भूमिका. त्यांची भाषणे म्हणजे अगदी शिवराळ, सतत दुस-याच्या शारीरिक व्यंगावर बोट ठेवणारी. त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय वादग्रस्त आहे हे ध्यानात घेता कोणी त्याला ठाकरी शैली असे गोंडस नाव देणे म्हणजे असमंजसपणाची हद्द झाली. कारण मुळात ती अतिशय असभ्य शैली आहे. मशिदीतील कर्ण्याचा आवाज, नमाजादरम्यान रस्ते अडवले जाणे, वगैरे उपद्रवाच्या बाबतीत मुस्लिमांशी चर्चा करून मार्ग काढण्याचे सोडून महाआरतीसारखे उद्योग करून वातावारण तापवणे, ही यांची कामाची पद्धत. थोडक्यात, काही ना काही विषयावरून लोकांच्या भावना भडकावणे हा यांचा धंदा. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, मारहाण अशी गुंडगिरी करणे हा त्यांचा धंदा. तुमचा दाऊद तर आमचा गवळी अशी थोर विधाने करणे, एकीकडे पाश्चिमात्य संस्कृतीचे आक्रमण म्हणून व्हॅलेंटाइन डे ला विरोध करत त्यावरून आंदोलन करत असताना दुसरीकडे मायकेल जॅक्सनसारख्याचा कार्यक्रम आयोजित करणे, विरोधी मतदान केले म्हणून आपल्याच एका नगरसेवकाचा खून करणे हे यांचे लोकशाही उद्योग. हिंदुत्वाचे नारे देणा-या त्यांच्या पक्षाने एकदाही हिंदुत्व म्हणजे काय हे कधीही स्पष्ट केलेले नाही. त्यांनी स्वत:च स्वत:ला हिंदूहृदयसम्राट म्हणवून घेतले. स्वत:च स्वत:ला वाघ म्हणवून घेणे हा आणखी एक स्वत:चे कौतुक करून घेण्याचा विषय. हिंदुत्वाच्या गप्पा मारणा-यांनी किती दलितद्वेष केला, हे काय लपून राहिले आहे काय? दाउदसारख्याशी संबंध असणा-या मियांदादला थेट घरी बोलावून तो क्रिकेटवर चर्चा करण्यास आल्याचे भासवण्याचे यांचे देशप्रेमी उद्योगही आपण पाहिलेत. संजय दत्तसारख्या गुन्हेगाराला जाहिरपणे संरक्षण देण्याचे त्यांचे उद्योग तर सर्वांनीच पाहिलेत. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तर वृत्तपत्रातील त्यांच्या एका लेखात संजय दत्तवरील आरोप कमी तीव्रतेचे करावेत व तो निर्दोष सुटण्यासाठी थेट यांच्याकडूनच कसा दबाव आला याबद्दलही सविस्तार लिहिले आहे. शिवाजीच्या पवित्र नावाने स्थापन केलेली संघटना ५% समाजसेवा व बाकी सारा आपला मेवा या पद्धतीने चालवणा-या. देशद्रोहासारखी, संघटित गुन्हेगारीसारखी कृत्ये करणा-यांना पाठिंबा दिला. शिवाजीचे नाव वापरून, भगवा झेंडा वापरुन आणि स्वत: भगवे घालून त्याच्याआड खंडणीखोरीचे उद्योग करून त्यांनी लोकांना मूर्ख बनवले इतकेच नाही, तर हिंदुत्वाचाही अपमान केला. मुंबईला दंगलीला थेट जबाबदारी असल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे. निवडणुकीतल्या भ्रष्ट प्रचारामुळे थेट सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला. आजवर अशी शिक्षा झालेले ते एकमेव असावेत. एन्रॉनसारख्या भ्रष्ट कंपनीला आधी शक्य तितका विरोध करून सत्तेवर आल्यावर त्यांच्या अधिका-यांना घरी बोलावून त्या कंपनीला पावन करून घेणे याचा अर्थ कळत का नाही आपल्याला? वर उल्लेख केल्याप्रमाणे ५% समाजसेवेच्या अंतर्गत रक्तदानशिबीरे, रूग्णवाहिकांची सोय करणे वगैरेमुळे लोकांची सहानुभूती मिळवणे व तिच्याआड सदैव वर उल्लेख केलेले उद्योग करत राहणे ही यांची कार्यपद्धती. सगळे करून सवरून त्याची जबाबदारी घ्यायला नको म्हणून कोणतेही अधिकारपद न घेता बाहेरून नियंत्रण ठेवण्याची यांची कार्यपद्धतीही आता परिचित झालेली आहे. यांच्याबद्दल काही बोलून त्यांची नाराजी पत्करायला नको म्हणून तेंडुलकर ते मंगेशकर ते बच्चन यांनी त्यांना भेटायचे, परंतु त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अवाक्षरही काढायचे नाही, असा यांचा भेकडपणा. आपल्या इभ्रतीला धक्का लागू नये म्हणून कोणाला भेटायचे, कोणाला नाही याबाबतीत सावध असणा-या या मोठ्या लोकांनी याबाबतीत मात्र अपवाद करायचा. आता महापौर बंगल्याची जागा त्यांच्या स्मारकासाठी वापरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हे स्मारक पब्लिक ट्रस्टच्या माध्यमातून उभारले जाणार आहे. मुळात अशा वादग्रस्त व्यक्तीच्या स्मारकासाठी सरकारने जमीन देण्याचे, प्रयत्न करण्याचे कारण काय? या निर्णयासाठी कोणते निकष लावण्यात आले आहेत? महापौर बंगल्याची जागा कमी पडते म्हणून की काय, इंदू मिलसारखी मोठी जागा हवी अशी मागणी राज ठाकरे करत आहेत. जणू सरकारी जागा म्हणजे आपल्या xxxची जागा असा यांचा समज दिसतो. यांचे कर्तृत्व काय आणि आपण मागतोय काय, याचा साधा विचारही नाही आणि चालले इंदू मिलएवढी जागा मागायला. शिवसेनेला स्वत: कोठली जागा विकत घेऊन त्यांच्या नेत्याचे स्मारक उभारण्यास कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. मात्र त्यात सरकारचा वा सरकारी मदतीचा अजिबात सहभाग नको. त्यांच्या स्मारकासाठी जाहीर मदत करून कायद्याच्या राज्याला किंमत नाही असेच महाराष्ट्र सरकार अधोरेखीत करत आहे. भाजपला अजुनही शिवसेनेचे लोढणे गळ्यात बांधून घ्यायचे असेल, तर तसे त्यांनी जरूर करावे. पण सा-या राज्याला यांच्या दावणीला बांधून, सरकारी महसूल बुडवून, करदात्याचे पैसे खर्च करून वर बेकायदेशीरपणे वागण्याच्या वृत्तीला प्रोत्साहन देऊ नये एवढी साधी अपेक्षा.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14522 वाचन

💬 प्रतिसाद (108)

प्रतिक्रिया

ह्यांना एक सेपरेट विभाग काढून

अभ्या..
Fri, 11/20/2015 - 00:00 नवीन
ह्यांना एक सेपरेट विभाग काढून द्या रे प्लीज. भयानक पोटेन्शिअल आहे
  • Log in or register to post comments

+॑१

लॉरी टांगटूंगकर
Fri, 11/20/2015 - 00:01 नवीन
+॑१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

+१००

विशाल कुलकर्णी
Sat, 11/21/2015 - 13:58 नवीन
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ओ कुलकर्णी तुम्ही लिहिताये

मंदार कात्रे
Fri, 11/20/2015 - 00:25 नवीन
ओ कुलकर्णी तुम्ही लिहिताये ते मुद्दे योग्य वाटतात . पण धडाधड धागे अन एकाच धाग्यात सत्राशे साठ विषय मांडण्याची घाई कशाला ? प्रत्येक परिच्छेद एका दिवशी एक धागा म्हणुन घ्या की . जिलबी दुकान फुल्ल फॉर्म मध्य चालु होइल
  • Log in or register to post comments

मी येथे प्रथमच या पोस्ट्स

राजेश कुलकर्णी
Fri, 11/20/2015 - 10:17 नवीन
मी येथे प्रथमच या पोस्ट्स टाकतो आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता ते कसे करायचे ते कल्पना नाही. मात्र येथे अनेक मुद्दे आहेत. आणखीही मुद्दे इतरांच्या सहभागामुळे याव्यात. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार कात्रे

मी येथे प्रथमच या पोस्ट्स

मोदक
Fri, 11/20/2015 - 14:54 नवीन
मी येथे प्रथमच या पोस्ट्स टाकतो आहे. ओके.. ठीक आहे. एक काम करा.. १ महिना चुपचाप वाचनमात्र रहा. तोपर्यंत तुमचे मुद्दे थांबू शकतील का? बहुदा थांबतीलच, नाही थांबले तरी कुणाला काय फरक पडणार आहे? त्यामुळे इथली पिच कशी आहे आणि नक्की कसा खेळ खेळतात याची माहिती करून घ्या. तुम्ही भारी क्रिकेट खेळता म्हणून बॅटींग, बॉलींग आणि फिल्डींग तुम्ही एकाचवेळी करू शकता का? नाही. म्हणजे एका वेळी एकच मुद्दा पकडा आणि त्यावर काय ती चर्चा करा. ..आणि एक, जुने धागे शोधून शोधून वाचा. तुम्ही एखादा नवीन शोध लावला असेल कदाचित, मात्र मिपावर त्याच्या पेटंटच्या कॉप्या गल्लोगल्ली पडल्याही असतील त्यामुळे आधी थोडा अभ्यास करा मग या खेळायला. अभ्यास न करता खेळणार असालच तर लगेच आऊट होण्याची दाट शक्यता आहे, आणि आऊट झालातच तर पिचच बाद आहे, फिल्डर असहिष्णू आहेत, नवख्या बॅट्समनची गळचेपी करतात वगैरे आरोप करू नका. दोन तीन ठिकाणी तुम्ही जागेच्या वापराबाबत लैच जागरूक दिसलात म्हणून इतका प्रपंच करत आहे. समजून घ्याल अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश कुलकर्णी

रीटायर्ड हर्ट

कपिलमुनी
Fri, 11/20/2015 - 14:58 नवीन
खेळाडू बहुधा रीटायर्ड हर्ट होउन बाहेर गेलेला असेल आणि पुन्हा एंट्री मारतोय. बॅटींग, बॉलींग आणि फिल्डींग आणि पिच याचा अभ्यास असेलच हळू हळू बाहेर येइल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

माझ्या मते एवढे सगळे करण्याची काही गरज नाही.

राजेश कुलकर्णी
Fri, 11/20/2015 - 15:16 नवीन
माझ्या मते एवढे सगळे करण्याची काही गरज नाही. मला पटते तसेच मी करेन. त्यांना पसंत आहे ते सहभागी होतील. कोणावर कसली जबदस्ती नाही. नाही का? कोणी काही प्रतिसाद दिला नाही तरी त्याबाबत तक्रार करण्याचे काही कारण नाही. तेव्हा कोणावर काही करण्याचे आतातरी काही प्रयोजन दिसत नाही. कारण खरोखर तसे काही कारण नाही. मी काही शोध लावण्याच्या हेतुने लिहित नाही. मला वाटते ते लिहितो. शिवाय इतरांचे चोरून माझ्या नावावर खपवण्याची माझी व्ृत्ती नसल्यामुळे इतरांच्या पेटंटबद्दल चौकशी करण्याची आवश्यकता नाही. मी येथे प्रथमच पोस्ट टाकतो आहे याचा जो उल्लेख केला तो दुस-या संदर्भात होता. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

धन्यवाद आणि शुभेच्छा..!!

मोदक
Fri, 11/20/2015 - 15:31 नवीन
धन्यवाद आणि शुभेच्छा..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश कुलकर्णी

मोदक,

pacificready
Fri, 11/20/2015 - 15:54 नवीन
मोदक, प्रतिसाद आवडला नाही. -मिका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

तुमच्या आवडीनिवडी जपायला

बॅटमॅन
Fri, 11/20/2015 - 16:00 नवीन
तुमच्या आवडीनिवडी जपायला आम्ही मिपावर येत नाही. -नोलानकथेतील बॅटकुमार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pacificready

आपणास मुद्दा समजलेला नाही.

pacificready
Fri, 11/20/2015 - 16:03 नवीन
आपणास मुद्दा समजलेला नाही. (गणेश लेखमालेवेळी आम्ही असाच सल्ला दिला तेव्हा ज्येष्ठांनी 'प्रतिसाद आवडला नाही' असं कळवळलं होतं. आम्ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आहोत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ

बॅटमॅन
Fri, 11/20/2015 - 16:11 नवीन
ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pacificready

चालू द्या तुमचे

नाखु
Fri, 11/20/2015 - 16:16 नवीन
!@#$%^& तुम्ही *&^%$#@! चे बळी आहात.. -उसंत नाटकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

'होऊ दे खर्च, मिपा आहे घरचं'

संदीप डांगे
Fri, 11/20/2015 - 03:11 नवीन
'होऊ दे खर्च, मिपा आहे घरचं' म्हटल्यावर स्मारकं स्वारी 'चर्चा तर होणारच'.
  • Log in or register to post comments

बाळासाहेब ठाकरे

ट्रेड मार्क
Fri, 11/20/2015 - 03:39 नवीन
तुम्हाला बाळासाहेबांविषयी फारशी माहिती नसावी असं वाटतंय. तुम्ही फक्त शिवसेनेने केलेल्या काही कृतींबद्दल बोललात पण त्यामागची पार्श्वभूमी आणि कार्यकारण भाव समजून घेणे आवश्यक आहे. मुंबईतील दंगल तुम्ही अनुभवली आहे कि नाही माहित नाही पण मुंबईतील हिंदू सुरक्षित राहिले ते केवळ शिवसेनेमुळे. हे मी प्रत्यक्ष अनुभवातून सांगतोय, कुठे वाचून नाही. अजून एक स्पष्ट करणे महत्वाचे आहे, मी शिवसेनेचा कार्यकर्ता, पदाधिकारी नाही आणि नव्हतो. मियांदाद ला बोलावले होते तेव्हा त्याचा आणि दाऊदचा काही (लग्न)संबंध नव्हता. ही भेट मियांदादच्या विनंतीनुसार २००४ मध्ये झाली आणि त्याच्या मुलाचा विवाह २०११ मध्ये झाला. मुख्य मुंबईत एवढे वर्ष राहून मला कधी वाटलं नाही की शिवसैनिक अरेरावी किंवा दादागिरी करतात. खालील लेख वाचवा अशी विनंती: http://jagatapahara.blogspot.com/2012/11/blog-post_26.html कृपया बाळासाहेबांबद्दल अजून माहिती मिळवा. शीर्षक आणि बाकी लेख याच्यात गफलत झाली आहेच. परंतु लेख मूळ गाभा फक्त बाळासाहेबांना नावे ठेवणे एवढाच वाटतोय. ढिस्क्लेमर: शिवसेनेच्या सध्याच्या परिस्थितीवर मला काहीही भाष्य करायचे नाही.
  • Log in or register to post comments

मियांदाद दाउदचा व्याही नंतर

राजेश कुलकर्णी
Fri, 11/20/2015 - 10:14 नवीन
मियांदाद दाउदचा व्याही नंतर झाला हे मला माहित आहे. पण दाउदकडचे लग्न हे मॅट्रिमोनियल पाहून झाले असे आपल्याला वाटते काय? यांचे आधीपासूनचे संबंध असतात. बाळासाहेवांचे नाव हवाला ऑपरेटर्सशी संबंध असणा-यांच्या यादीमध्ये व्होरा कमिशनच्या रिपोर्टमध्ये स्पष्तपणे आहे. त्यात आपले पवारसाहेब, व तेव्हाचे इतर कॉंग्रेसचे नेते यांचाही उल्लेख आहे. तेव्हा हा व्होरा अहवाल संसदेत आजवर का मांडला गेला नाही हे आपल्याला सहज कळू शकते. शरद पवार काय किंवा बाळासाहेब काय यांच्यासारख्यांना मिळालेली लोकप्रियता पाहता ते महाराष्ट्राचे कल्याण करू शकले असते. आम्ही एकमेकांचे मित्र आहोत असे हे दोघे म्हणत असत याचा अर्थ आळीमिळी गुपचिळी असा घ्यायचा हे एव्हाना कळलेले आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

मियांदाद-दाउद संबंध फार जुने

राजेश कुलकर्णी
Fri, 11/20/2015 - 10:47 नवीन
http://timesofindia.indiatimes.com/india/Dawood-sons-wedding-in-Pakistan/articleshow/8286525.cms वरील बातमीप्रमाणे मियांदादची ठाकरे भेट व मियांदादचे दाऊदशी कौटुंबिक संबंध जुळणे यात एकाच वर्षाचे अंतर आहे हे स्पष्ट आहे. आपण जागता पहारा या ब्लॉगच्या लेखकांचा जो संदर्भ दिले आहेत, ते मुद्दे सोडून शब्दच्छल करत व शब्दांचा पिसारा फुलवत वादविवादाला हवे तसे वळण देण्यात तरबेज आहेत. शिवसेनेबाबतची त्यांची दोन उदाहरणे मी मागेच त्याच्या लक्षात आणून दिली होती. एक म्हणजे मुंबईतील कम्युनिस्ट कामगार नेत्याच्या शिवसेनेने केलेल्या हत्येबद्दल लिहिताना त्यांनी तो नेताच गुंड होता वगैरे विधाने केली होती. शिवाय दक्षिणेत हिंदी चित्रपट दाखवण्यास बंदी घातली गेली तेव्हा ठाकरेानी दक्षिणी निर्मात्यांचे हिंदी चित्रपट मुंबईत दाखवण्यास बंदी घातली याचे कौतुकही सदर ब्लॉगलेखक महाशयांनी केले होते. यात प्रश्न हिंदी निर्मात्यांच्या हिताचा. शिवाय बंदी घालणारे तमिळ सरकार, त्यावर मुंबईत उपाययोजना करण्याचा काय संबंध. बरे हा प्रश्न सोडवणारे ठाकरे कोण? तेव्हा यातल्या खंडणीखोरीची सुरूवात तेव्हाच झालेली होती. या गोष्टी लक्षात न घेता ठाकरेंचे कौतुक करणा-या ब्लॉगलेखकाकडे फार लक्ष देऊ नये असे वाटते. ते भाडोत्री लेखक आहे असे मला म्हणायचे नाही, मात्र त्यांचा तर्क त्या दिवशी त्यांचा जसा मुड आहे तसा चालतो हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

राजेशजी

अन्नू
Fri, 11/20/2015 - 03:41 नवीन
१००% सहमत. खरं तर हे राजकरणी दुतोंडी आहेत- एकिकडे आपण शिवाजी राजांचे भक्त आहोत असं दाखवतात तर दुसरीकडे त्यांचीच निंदानालस्ती करणार्‍या पुरंदरे सारख्यांना पाठींबा देतात! अवांतर- सध्या आमच्या वॉट्स-अ‍ॅपवर यांचा 'वाघाचं कातडं पांघरलेला लांडगा' असा उल्लेख केला जातेय! ;)
  • Log in or register to post comments

स्वत:च स्वत:ला वाघ म्हणून

राजेश कुलकर्णी
Fri, 11/20/2015 - 10:20 नवीन
स्वत:च स्वत:ला वाघ म्हणून घेणे, हि्दूह्रदयसम्राट म्हणून घेणे हेच यांचे गंमतीशीर ऊद्योग आहेत. सामान्य लोक या दाव्यांना भुलतात हे दुर्दैव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्नू

एकिकडे आपण शिवाजी राजांचे

मृत्युन्जय
Fri, 11/20/2015 - 10:40 नवीन
एकिकडे आपण शिवाजी राजांचे भक्त आहोत असं दाखवतात तर दुसरीकडे त्यांचीच निंदानालस्ती करणार्‍या पुरंदरे सारख्यांना पाठींबा देतात! बी ग्रेडी ग्रुप्सवर कोण कोणाला काय म्हणतय याच्याशी इथे कोणाला शष्प देणे घेणे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्नू

.

मोगा
Fri, 11/20/2015 - 05:59 नवीन
साहेबांचं स्मारक आद्य साहेबांच्या शेजारी म्हणजे रायगडावर उभारावे. लोकाना एकाच भेटीत दोन साहेब दिसतील. रायगडाचाही जीर्णोद्धार होइइल. महाराज व साहेब एकत्र गप्पा मारत बसतील.
  • Log in or register to post comments

घराणेशाही

रमेश आठवले
Sat, 11/21/2015 - 00:46 नवीन
हिंदुपद पादशाही ला खेटून घराणेशाही ! ये बात कुछ हजम नही हुई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा

गुड गेम देवेंद्रजी ..

पगला गजोधर
Fri, 11/20/2015 - 08:15 नवीन
साहेब महापौर बंगल्यावर राहिलेले काय ? साहेब जिथे राहिले त्या मातोश्रीवर, किंवा जिथून काम केलं त्या भवनामध्ये, बनवा तुम्हाला हवं तेव्हड मोठं स्मारक. च्यायला पब्लिक प्लेस वर डोळा नेमका. पण 3 वर्षापूर्वी सुधधा शिवाजीपार्कच्या जागेसाठी धिंगाणा सुरूच केलेला, पण सी एम पृथ्वीराज नी, आत्ता सी एम देवेंद्रनी , बरोब्बर गंडवलाय यांना. गुड गेम देवेंद्रजी ..
  • Log in or register to post comments

महापौर बंगल्याच्या जागेची

राजेश कुलकर्णी
Fri, 11/20/2015 - 10:23 नवीन
महापौर बंगल्याच्या जागेची मागणी ते अगदी अंत्यसंस्काराच्या वेळेपासून करत आहेत. आता हेरिटेज वास्तु म्हणून ते करता अाले नाही तर त्याच्या शेजारची जिमखान्याची जागा तरी बळकावता येईल असा डाव यामागे आहे असे काल टीव्हीवरच्या चर्चेत सांगत होते.
  • Log in or register to post comments

'मातोश्री'च स्मारक म्हणून

संदीप डांगे
Fri, 11/20/2015 - 10:28 नवीन
'मातोश्री'च स्मारक म्हणून योग्य राहिल.
  • Log in or register to post comments

हाफ नॉलेज इस फुल डेंजर

सतिश पाटील
Fri, 11/20/2015 - 12:09 नवीन
श्रीमान राजेश कुलकर्णी आपण उपरोक्त लेखात जी गरळ ओकली आहे त्याबद्दल आपल्या अफाट बुद्धीची कीव करावीशी वाटते. आपली तुलना मला प.पु. राहुल गांधी याच्याशी करण्याचा मोह आवरत नाही आहे. अर्धवट ज्ञान घेऊन आपण या विषयावर एखादे तज्ञ असल्यासारखे निरीक्षण नोंदवले आहे. कुठ्लारी दुषित ग्रह मनात ठेवून आपण हे लिखाण केले आहे. विषय एक आणि लिखाण भलतेच ? कुठल्यातरी एखाद्या पुचाट पक्षाचे आपण प्रवक्ते असल्याचाहि दाट संशय वाटतोय... किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीचे नाव घेऊन त्यावर टीका करून आपण लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा हा एक फालतू प्रयत्न दिसतोय, असो... परंतु मिपावरील आपला पहिलाच लेख बाळासाहेबांविरोधात लिहून आपण दणदणीत एन्ट्री करण्याचा आपला प्रयत्न कदाचित सफल होईल... आपला हा लेख वाचून आम्ही धन्य झालो आहोत, यापुढे आपला एकही लेख वाचण्याची नामुष्की आमच्यावर याजन्मी तरी येऊ नये , हीच इच्छा...
  • Log in or register to post comments

ओ शिवसेनावाले,

संदीप डांगे
Fri, 11/20/2015 - 14:00 नवीन
ओ शिवसेनावाले, जरा योग्य शब्दात प्रतिवाद करा की राव..! त्यांनी लिहलेल्या प्रत्येक वाक्याला खोडून दाखवा, मग तुमचंही ज्ञान अर्धवट आहे का फुल्ल आहे ते बघता येईल. नुसतं ;हुं; करून जाऊ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश पाटील

-

अन्नू
Fri, 11/20/2015 - 14:27 नवीन
++१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

प्रतिवादाची पद्धत

राजेश कुलकर्णी
Fri, 11/20/2015 - 14:45 नवीन
अनेकदा दुस-याच्या हेतुवरून वैयक्तिक टीका केली जाते. एकतर प्रतिवास कसा करायचा असतो हे माहित नसते किंवा ते माहिते असले आणि अापल्याकडे प्रतिवाद करण्यास योग्य मुद्दे नसले की मग वैयक्तिक टीकेवर उतरले जाते. असो. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

मुद्देसूद प्रतिवाद अधिक आवडला असता

राजेश कुलकर्णी
Fri, 11/20/2015 - 14:28 नवीन
सतिश पाटील, आपली प्रतिक्रिया वाचली. अशी प्रतिक्रिया मला नवी नाही. तुम्ही माझ्या हेतुबद्दल किंवा मी कोण आहे यावर जागा न घालवता काही मुद्दे मांडले असते तर ते अधिक योग्य वाटले असते. प्रतिवाद करणा-यांचे काही सामान्य मुद्देही मी तुमच्या माहितीसाठी सांगतो. बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला किती गर्दी होती, तुम्ही दहा माणसे तरी तुमच्या मागे उभे करून दाखवा, अशा आशयाच्या प्रतिक्रिया असतात. मग मीदेखील त्यांना काही माफियांच्या अंतयात्रेला किती गर्दी झाली होती, वगैरे ऐकवतो. तेव्हा यात वैयक्तिक पातळीवरील प्रतिक्रिया न देता, विषयापासून म भरकटता मुद्द्यांवरून प्रतिक्रिया दिलीत तर बरे वाटेल. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश पाटील

लेखातले मुद्दे योग्य आहेत.

बॅटमॅन
Fri, 11/20/2015 - 14:42 नवीन
लेखातले मुद्दे योग्य आहेत. शिवसेना सपोर्टर्स एक तर गरळ नैतर राडे यापलीकडे दुसरी भाषा जाणत नाहीत हे सर्वांनीच पाहिलेले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करणेच उत्तम.
  • Log in or register to post comments

+१

रमेश आठवले
Sat, 11/21/2015 - 22:06 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

कोणाचेच स्मारक उभारू नये

_मनश्री_
Fri, 11/20/2015 - 15:19 नवीन
कोणाचेच स्मारक उभारू नये सरकारने कशाला हवीत स्मारक आणि पुतळे ? काय होत स्मारक उभारून फक्त जनतेच्या पैशांचा अपव्यय त्यापेक्षा त्या पैशांमधून काहीतरी समाजोपयोगी काम करा तो पैसा देशाची स्वच्छता ,शेतीचा विकास ,जलसंधारण कामांसाठी वापरा इथ प्रत्येकाच स्वतंत्र स्मारक हव त्यांच्या अनुयायांना ह्यांच्या स्मारकांसाठी एकरांवारी जागा अडकून पडणार आणि जिवंत माणसांना डोक झाकण्यापुरता निवारा मिळण मुश्किल झालय पण तरीही फारच हौस असेल तर एकदाच एखादी जागा निश्चित करून तिथच सगळ्यांचे पुतळे उभारून टाका , त्यांच्या कार्याची माहिती देणारा बोर्ड लावून टाकायचा 'स्मारक पार्क ' हवीत कशाला प्रत्येकाची स्वतंत्र स्मारक
  • Log in or register to post comments

कोणाचेच स्मारक उभारू नये

_मनश्री_
Fri, 11/20/2015 - 15:26 नवीन
कोणाचेच स्मारक उभारू नये सरकारने कशाला हवीत स्मारक आणि पुतळे ? काय होत स्मारक उभारून फक्त जनतेच्या पैशांचा अपव्यय त्यापेक्षा त्या पैशांमधून काहीतरी समाजोपयोगी काम करा तो पैसा देशाची स्वच्छता ,शेतीचा विकास ,जलसंधारण कामांसाठी वापरा इथ प्रत्येकाच स्वतंत्र स्मारक हव त्यांच्या अनुयायांना ह्यांच्या स्मारकांसाठी एकरांवारी जागा अडकून पडणार आणि जिवंत माणसांना डोक झाकण्यापुरता निवारा मिळण मुश्किल झालय पण तरीही फारच हौस असेल तर एकदाच एखादी जागा निश्चित करून तिथच सगळ्यांचे पुतळे उभारून टाका , त्यांच्या कार्याची माहिती देणारा बोर्ड लावून टाकायचा 'स्मारक पार्क ' हवीत कशाला प्रत्येकाची स्वतंत्र स्मारक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_

+११११

नाखु
Fri, 11/20/2015 - 15:34 नवीन
एकदाच एखादी जागा निश्चित करून तिथच सगळ्यांचे पुतळे उभारून टाका , त्यांच्या कार्याची माहिती देणारा बोर्ड लावून टाकायचा
स्गळे सगळे एका ठिकाणी मावत नसतील तर अक्षरशः (फक्त आणि फक्त)सोडत पद्धतीने १००,१०० चे गट करून महाराष्ट्रातील सगळ्या गडांवर किमान १०० तरी पार्क उभारून ठेवावेत.
  • रीतसर प्रवेश शुल्क ठेवावे,(शाळेला मोफत्,आश्रमांना मोफत)हे स्थानीक महीला बचत गटालाच चालवायला द्यावे (उपहार्गृग सोयी सकट) त्या बदल्यात अगदी नाम मात्र भाडे आकारावे.
  • त्या त्या महामंडळाने सरकारला पुतळा देखभाल खर्च द्यावा
  • प्रत्येका (पुतळा असलेल्या) व्यक्तीचा पुण्यतीथीला तेथे एक माहीती पट (फक्त १० मिनिटांचा,आणि त्या गडाचे इतीहासाचा १० मिनिटांचा ठेवावा)
  • त्या मुळे गडावर किमान सोयी पाणी-इतर होईल आणि कमी खर्चात पुतळ्यांची आणि गडाचीही सोय होईल.
  • जागा अडवणारे पुतळे आणि त्यांच्या आजू बाजूची बाग ताब्यात घेऊन तिथे बस स्थानक्,मेट्रो ई स्थानके लगेच बांधावीत.
  • वाकडे वाडी जमनालाल बजाज पुतळा (बागेचा परीसर पहा), पिंपरी आंबेडकर पुतळा परिसर
कुठल्याही सरकारी जागेवरील पुतळ्याबाबत हेच मत असलेला. सरधोपट नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_

•रीतसर प्रवेश शुल्क ठेवावे,

प्रसाद१९७१
Fri, 11/20/2015 - 15:45 नवीन
•रीतसर प्रवेश शुल्क ठेवावे,(शाळेला मोफत्,आश्रमांना मोफत)
शांळांना आणि विद्यार्थ्यांना १०० पट जास्त शुल्क ठेवावे. ह्या राजकीय सो कॉल्ड नेत्यांचे पुतळे बघुन बाल आणि संस्कारक्षम मनावर वाईट परिणाम होण्याचीच शक्यता. खरे तर १८ वर्षा खालील कोणाला ही बंदी च असावी ह्या लोकांचे पुतळे आणि माहीती वाचण्या साठी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

स्मारके

कपिलमुनी
Fri, 11/20/2015 - 15:19 नवीन
सध्या राज्यात दुष्काळ असताना रोज शेतकरी आत्महत्या करत असताना १ बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक , २ शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रामधील स्मारक , ३ आंबेडकरांचे इंदू मिलमधील स्मारक ( सध्या लंडनमधील घरावर पैसे घालवलेच आहेत) इतर अजून कोणी थोर पुरुष असतील त्यांची स्मारके बांधण्याचे नियोजन बंद केले पाहिजे व तो पैसा राज्ज्यासाठी वापरला पाहिजे.
  • Log in or register to post comments

ओ संदीप डांगे

सतिश पाटील
Fri, 11/20/2015 - 15:22 नवीन
स्मारक कुठे करायचे हा मुद्दा जरी वादाचा असला तरी ज्या व्यक्तीचे स्मारक करायचे आहे त्या व्यक्तीबद्दल वाद उभा करण्याची गरज नाही. एखादी व्यक्ती आपल्याला आवडत नाही म्हणून ती सर्वांनाच आवडत नाही , अस होत नसते . भाषा भाषणे शिवराळ आहे, असभ्य आहे, गुंडगिरी करतात, - हि झाली नाण्याची एक बाजू ... दुसरी बाजू काय? माहित असूनही आपण ती आपण मान्य करणारच नाही.. "स्वत:च स्वत:ला वाघ म्हणून घेणे, हि्दूह्रदयसम्राट म्हणून घेणे हेच यांचे गंमतीशीर ऊद्योग आहेत. सामान्य लोक या दाव्यांना भुलतात हे दुर्दैव." हि या कुलकर्णी महाशयांनी वर दिलेली एक प्रतिक्रिया. आमच्या सारखे सामान्य लोक अश्या दाव्यांना भुलतात ...मान्य .. आपण दोघेही भुलला नसाल कारण आपण असामान्य आहात....
  • Log in or register to post comments

सरकारने कोणाचे स्मारक उभारावे याबाबतचे निकष कोणते?

गॅरी शोमन
Fri, 11/20/2015 - 15:25 नवीन
अफजलखानाचा शिवाजी महाराजांनी वध केला असा इतिहास आहे. ( पोट फाडले म्हणले तर गोंधळ व्हायचा ) मग त्याचा सरकारी इतमामाने अंत्यसंस्कार केला. चुकले का त्यांचे ? मृत्यु नंतर वैर संपते असे म्हणतात. बर अफजलखानाने प्रतापगडावर येण्यापुर्वी किती मुर्ती फोडल्या/ काय काय लुटले याचाही इतिहास आहे. वास्तवीक शिवाजी महाराजांनी अफजलाखानाच्या प्रेताचे धिडवडे काढले असते तर लोकांनी अजुन तिखट प्रतिसाद देऊन आणखी नविन वाचनात आले असते. असे काय वाईट झाले हो बाळासाहेबांमुळे ? ते स्पष्ट वक्ते होते हा गुन्हा होता ? भुमीपुत्रांच्या अधिकाराला त्यांनी वाचा फोडली हा गुन्हा झाला ? त्यांच्या तिखट टिकेचे सर्वात जास्त शिकार मा शरद पवार साहेब झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराला शरद पवार आणि छगन भुजबळ ( ज्यांना शिवसेना सोडल्यानंतर चॉकलेट मंत्री इ. शेलक्या विषेषणानी बाळासाहेब संबोधत ) हजर होते. स्वतः शरद पवार साहेबांनी स स्मारकाच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला. आपल्या लेखाचा सर्वांगाने पुन्हा विचार करावा.
  • Log in or register to post comments

स्वतः शरद पवार साहेबांनी स

प्रसाद१९७१
Fri, 11/20/2015 - 15:48 नवीन
स्वतः शरद पवार साहेबांनी स स्मारकाच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला.
आमच्या लाडक्या काकां चे काय विचारता? त्यांनी त्यांची पण सोय केली. आता काकांच्या स्मारकाची वेळ आली की उद्धव पण लगेच पाठींबा देणार.
त्यांच्या तिखट टिकेचे सर्वात जास्त शिकार मा शरद पवार साहेब झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराला शरद पवार आणि छगन भुजबळ ( ज्यांना शिवसेना सोडल्यानंतर चॉकलेट मंत्री इ. शेलक्या विषेषणानी बाळासाहेब संबोधत ) हजर होते.
मोदींनी आधी काका पुतण्यानी ( हे पुतणे वेगळे, मी तो नाही ) बारामतीला वेठीस धरले असे म्हणले होते, आता म्हणतात की आमच्या लाडक्या काकांसारखी १०० लोक तरी पाहिजेत. काकांचा करीश्माच वेगळा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी शोमन

द्विरूक्ती करत नाही

राजेश कुलकर्णी
Fri, 11/20/2015 - 16:13 नवीन
काय वाईट केले व काय वाईट झाले हेच तर वर सांगितले आहे. त्यामुळे द्विरूक्ती करत नाही. भुमिपुत्राचा आवाज उठवन्याबद्दल आपल्या अशा माफक अपेक्षा असतील तर माझी काही हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी शोमन

लोकसमर्पणातूनच स्मारक झाले पाहिजे.

कलंत्री
Fri, 11/20/2015 - 15:28 नवीन
कोणत्याही राजकिय नेत्याची शक्ती ही लोकसामर्थ्यातूनच व्यक्त होत असते. बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व पाहिले असता असे स्मारक लोकांनीच उभे केले पाहिजे. अर्थातच अश्या स्मारकातून नेमके काय साध्य होईल हे सांगता येणे नक्कीच अशक्य आहे हे मात्र खरे. उद्धव ठाकरे यांना तहहयात अध्यक्ष ठेवणे हे देखील अनुचित आहे.
  • Log in or register to post comments

लोकांनी कशाला सोसायचा भुर्दंड

_मनश्री_
Fri, 11/20/2015 - 15:46 नवीन
लोकांनी कशाला सोसायचा भुर्दंड या महागाईच्या काळात स्वतःचाच खर्च भागवण मुश्किल शिवाय कररूपात जनता पैसा देतच आहे सरकारला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री

सरकारला योग्य वाटेल अशा

ऋषिकेश
Fri, 11/20/2015 - 17:03 नवीन
सरकारला योग्य वाटेल अशा कोणाचेही स्मारक उभारायला माझी ना नाही. मात्र माझा(टॅक्सरुपाने भरलेला) पैसा त्यात लागणार असल्याने त्याचे स्वरूप कसे असावे याविषयी माझी (जनतेची) मतेही सरकारने मागवावीत व त्यावर विचार करावा असे वाटते. शिवशि, त्यासाठी सार्वजनिक जागा (विशेषतः मैदाने) वापरू नये असेही मत आहे. नवी जमिन विकत घ्यावी किंवा आधीच काही भाग आरक्षित ठेवावा.
  • Log in or register to post comments

पण सरकारकडे असलेला जनतेचा

_मनश्री_
Fri, 11/20/2015 - 17:10 नवीन
पण सरकारकडे असलेला जनतेचा पैसा स्मारक बांधण्यात खर्च करण हेच चुकीच आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

...

मोगा
Fri, 11/20/2015 - 20:39 नवीन
शिवसेना भाजपावाले काँग्रेसला शिव्या घालतात. पण गांधीजी , नेहरू , पटेल इ लोकांची स्मारके ही त्या व्यक्तींचे नातेवाइक / चाहते यानी दान दिलेल्या जागेत आहेत. साबरमती आश्रम , मणीभवन , मोतीलाल नेहरु स्मारक , डॉ. आंबेडकरांचे घर इ इ या खाजगी जागा होत्या. अगदी ब्यारिस्टर जिनानीदेखील आपले मुंबैइचे घर पाकिस्तानी दूतावासास देण्यास सांगितले होते. ( सध्या ती जागा भारत , पाक व जिनांचे वारस यांच्या वादात आहे. ) म फुल्यांनी जी शाळा सूरू केल होती तो वाडाही मालकाकडून ऐतिहासिक महत्व हे कारण दाखवून आपल्या ताब्यात घेऊन मग तिथे स्मारक उभे केले असे ऐकून आहे. आणि ठाकरेना मात्र उलटा न्याय ? ठाकरे ऐतिहासिक व्यक्तित्व होते तर त्यांचे निवासस्थान ताब्यात घेऊन तिथे सरकारने स्मारक उभे करावे. .... भाजपावाले बहुमतात असुनही सेनेची मागणी मुकाट्याने मान्य करत आहेत याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. म्हणजे सत्तेचा वापर करुन उद्या भाजपावालेही काही भूखंड बळकावतील त्याला सेना उपद्रव करणार नाही. दुसर्‍या लबाड लोकांचा विरोधही अशा मांडवलीच्या उद्देशानेच असणार , असे वाटते
  • Log in or register to post comments

असंबंध (वायफळ) धागा

भाते
Fri, 11/20/2015 - 23:08 नवीन
धाग्याचे शिर्षक वाचुन धागा उघडला. पण या माणसाचे (मुद्दाम एकेरी उल्लेख करतो आहे) इतर धागे वाचुन त्याची लायकी कळली. पहिल्या दोन ओळी आणि शेवटचे दोन परिच्छेद सोडले तर या माणसाला ठाकरे आणि शिवसेना या दोन शब्दांपध्दल घृणा/ तिरस्कार आहे हे पदोपदी जाणवते. संपादक मंडळ, माफ करा, पण व्यक्तीस्वातंत्र्य, नविन लेखकांना प्रोत्साहन म्हणुन (एक मिपाकर आणि केवळ वाचक म्हणुन) काय आणि का सहन करायचे हे मी सगळे? अनावश्यक वाटल्यास प्रतिसाद अवश्य उडवा.
  • Log in or register to post comments

भौतेक प्रतिसाद उडेल ;)

टवाळ कार्टा
Fri, 11/20/2015 - 23:12 नवीन
भौतेक प्रतिसाद उडेल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते

-१

अनुप ढेरे
Fri, 11/20/2015 - 23:20 नवीन
ठाकरे आणि शिवसेना या दोन शब्दांपध्दल घृणा/ तिरस्कार आहे हे पदोपदी जाणवते.
या दोघांबद्दल आदर असावा असही काही केलेलं नाही यांनी. लेखातील मुद्दे चुकीचे कसे आहेत ते सांगा. लेख आवडला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा