Skip to main content

सरकारने कोणाचे स्मारक उभारावे याबाबतचे निकष कोणते?

लेखक राजेश कुलकर्णी यांनी गुरुवार, 19/11/2015 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
सरकारने कोणाचे स्मारक उभारावे याबाबतचे निकष कोणते? स्मारकातील सरकारच्या सहभागामुळे गुंडगिरीला व असभ्यपणाला जाहीर प्रतिष्ठा . . . दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन नुकताच झाला. त्यानिमित्ताने त्यांच्या स्मारकासाठीच्या ठिकाणाची घोषणा झाली. मुंबईतील महापौरांचा आताचा बंगला असलेली वास्तु स्मारक म्हणून वापरले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या स्मारकामध्ये नक्की काय दाखवले जाईल याची उत्सुकता आहे. कारण त्यांच्या पक्षाची ना काही भूमिका, ना काही तत्वे, ना काही विचारधारा. जी तत्वे म्हणून जी दाखवली ती सतत बदलत राहिले. आधी मुंबईतले कम्युनिस्ट, मग लुंगीवाले मद्रासी, मग भैय्ये, मग मुसलमान, असा सतत कोणाचा ना कोणाचा तरी द्वेष करत राहून आपण मलई खात रहायचे यातच यांचे कौशल्य. यांना कायद्याचे राज्य मान्य नाही – कारण ते करतील तो न्याय ही त्यांची कायमची भूमिका. त्यांची भाषणे म्हणजे अगदी शिवराळ, सतत दुस-याच्या शारीरिक व्यंगावर बोट ठेवणारी. त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय वादग्रस्त आहे हे ध्यानात घेता कोणी त्याला ठाकरी शैली असे गोंडस नाव देणे म्हणजे असमंजसपणाची हद्द झाली. कारण मुळात ती अतिशय असभ्य शैली आहे. मशिदीतील कर्ण्याचा आवाज, नमाजादरम्यान रस्ते अडवले जाणे, वगैरे उपद्रवाच्या बाबतीत मुस्लिमांशी चर्चा करून मार्ग काढण्याचे सोडून महाआरतीसारखे उद्योग करून वातावारण तापवणे, ही यांची कामाची पद्धत. थोडक्यात, काही ना काही विषयावरून लोकांच्या भावना भडकावणे हा यांचा धंदा. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, मारहाण अशी गुंडगिरी करणे हा त्यांचा धंदा. तुमचा दाऊद तर आमचा गवळी अशी थोर विधाने करणे, एकीकडे पाश्चिमात्य संस्कृतीचे आक्रमण म्हणून व्हॅलेंटाइन डे ला विरोध करत त्यावरून आंदोलन करत असताना दुसरीकडे मायकेल जॅक्सनसारख्याचा कार्यक्रम आयोजित करणे, विरोधी मतदान केले म्हणून आपल्याच एका नगरसेवकाचा खून करणे हे यांचे लोकशाही उद्योग. हिंदुत्वाचे नारे देणा-या त्यांच्या पक्षाने एकदाही हिंदुत्व म्हणजे काय हे कधीही स्पष्ट केलेले नाही. त्यांनी स्वत:च स्वत:ला हिंदूहृदयसम्राट म्हणवून घेतले. स्वत:च स्वत:ला वाघ म्हणवून घेणे हा आणखी एक स्वत:चे कौतुक करून घेण्याचा विषय. हिंदुत्वाच्या गप्पा मारणा-यांनी किती दलितद्वेष केला, हे काय लपून राहिले आहे काय? दाउदसारख्याशी संबंध असणा-या मियांदादला थेट घरी बोलावून तो क्रिकेटवर चर्चा करण्यास आल्याचे भासवण्याचे यांचे देशप्रेमी उद्योगही आपण पाहिलेत. संजय दत्तसारख्या गुन्हेगाराला जाहिरपणे संरक्षण देण्याचे त्यांचे उद्योग तर सर्वांनीच पाहिलेत. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तर वृत्तपत्रातील त्यांच्या एका लेखात संजय दत्तवरील आरोप कमी तीव्रतेचे करावेत व तो निर्दोष सुटण्यासाठी थेट यांच्याकडूनच कसा दबाव आला याबद्दलही सविस्तार लिहिले आहे. शिवाजीच्या पवित्र नावाने स्थापन केलेली संघटना ५% समाजसेवा व बाकी सारा आपला मेवा या पद्धतीने चालवणा-या. देशद्रोहासारखी, संघटित गुन्हेगारीसारखी कृत्ये करणा-यांना पाठिंबा दिला. शिवाजीचे नाव वापरून, भगवा झेंडा वापरुन आणि स्वत: भगवे घालून त्याच्याआड खंडणीखोरीचे उद्योग करून त्यांनी लोकांना मूर्ख बनवले इतकेच नाही, तर हिंदुत्वाचाही अपमान केला. मुंबईला दंगलीला थेट जबाबदारी असल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे. निवडणुकीतल्या भ्रष्ट प्रचारामुळे थेट सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला. आजवर अशी शिक्षा झालेले ते एकमेव असावेत. एन्रॉनसारख्या भ्रष्ट कंपनीला आधी शक्य तितका विरोध करून सत्तेवर आल्यावर त्यांच्या अधिका-यांना घरी बोलावून त्या कंपनीला पावन करून घेणे याचा अर्थ कळत का नाही आपल्याला? वर उल्लेख केल्याप्रमाणे ५% समाजसेवेच्या अंतर्गत रक्तदानशिबीरे, रूग्णवाहिकांची सोय करणे वगैरेमुळे लोकांची सहानुभूती मिळवणे व तिच्याआड सदैव वर उल्लेख केलेले उद्योग करत राहणे ही यांची कार्यपद्धती. सगळे करून सवरून त्याची जबाबदारी घ्यायला नको म्हणून कोणतेही अधिकारपद न घेता बाहेरून नियंत्रण ठेवण्याची यांची कार्यपद्धतीही आता परिचित झालेली आहे. यांच्याबद्दल काही बोलून त्यांची नाराजी पत्करायला नको म्हणून तेंडुलकर ते मंगेशकर ते बच्चन यांनी त्यांना भेटायचे, परंतु त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अवाक्षरही काढायचे नाही, असा यांचा भेकडपणा. आपल्या इभ्रतीला धक्का लागू नये म्हणून कोणाला भेटायचे, कोणाला नाही याबाबतीत सावध असणा-या या मोठ्या लोकांनी याबाबतीत मात्र अपवाद करायचा. आता महापौर बंगल्याची जागा त्यांच्या स्मारकासाठी वापरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हे स्मारक पब्लिक ट्रस्टच्या माध्यमातून उभारले जाणार आहे. मुळात अशा वादग्रस्त व्यक्तीच्या स्मारकासाठी सरकारने जमीन देण्याचे, प्रयत्न करण्याचे कारण काय? या निर्णयासाठी कोणते निकष लावण्यात आले आहेत? महापौर बंगल्याची जागा कमी पडते म्हणून की काय, इंदू मिलसारखी मोठी जागा हवी अशी मागणी राज ठाकरे करत आहेत. जणू सरकारी जागा म्हणजे आपल्या xxxची जागा असा यांचा समज दिसतो. यांचे कर्तृत्व काय आणि आपण मागतोय काय, याचा साधा विचारही नाही आणि चालले इंदू मिलएवढी जागा मागायला. शिवसेनेला स्वत: कोठली जागा विकत घेऊन त्यांच्या नेत्याचे स्मारक उभारण्यास कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. मात्र त्यात सरकारचा वा सरकारी मदतीचा अजिबात सहभाग नको. त्यांच्या स्मारकासाठी जाहीर मदत करून कायद्याच्या राज्याला किंमत नाही असेच महाराष्ट्र सरकार अधोरेखीत करत आहे. भाजपला अजुनही शिवसेनेचे लोढणे गळ्यात बांधून घ्यायचे असेल, तर तसे त्यांनी जरूर करावे. पण सा-या राज्याला यांच्या दावणीला बांधून, सरकारी महसूल बुडवून, करदात्याचे पैसे खर्च करून वर बेकायदेशीरपणे वागण्याच्या वृत्तीला प्रोत्साहन देऊ नये एवढी साधी अपेक्षा.

वाचने 14562
प्रतिक्रिया 108

प्रतिक्रिया

ओ कुलकर्णी तुम्ही लिहिताये ते मुद्दे योग्य वाटतात . पण धडाधड धागे अन एकाच धाग्यात सत्राशे साठ विषय मांडण्याची घाई कशाला ? प्रत्येक परिच्छेद एका दिवशी एक धागा म्हणुन घ्या की . जिलबी दुकान फुल्ल फॉर्म मध्य चालु होइल

In reply to by मंदार कात्रे

मी येथे प्रथमच या पोस्ट्स टाकतो आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता ते कसे करायचे ते कल्पना नाही. मात्र येथे अनेक मुद्दे आहेत. आणखीही मुद्दे इतरांच्या सहभागामुळे याव्यात. धन्यवाद.

In reply to by राजेश कुलकर्णी

मी येथे प्रथमच या पोस्ट्स टाकतो आहे. ओके.. ठीक आहे. एक काम करा.. १ महिना चुपचाप वाचनमात्र रहा. तोपर्यंत तुमचे मुद्दे थांबू शकतील का? बहुदा थांबतीलच, नाही थांबले तरी कुणाला काय फरक पडणार आहे? त्यामुळे इथली पिच कशी आहे आणि नक्की कसा खेळ खेळतात याची माहिती करून घ्या. तुम्ही भारी क्रिकेट खेळता म्हणून बॅटींग, बॉलींग आणि फिल्डींग तुम्ही एकाचवेळी करू शकता का? नाही. म्हणजे एका वेळी एकच मुद्दा पकडा आणि त्यावर काय ती चर्चा करा. ..आणि एक, जुने धागे शोधून शोधून वाचा. तुम्ही एखादा नवीन शोध लावला असेल कदाचित, मात्र मिपावर त्याच्या पेटंटच्या कॉप्या गल्लोगल्ली पडल्याही असतील त्यामुळे आधी थोडा अभ्यास करा मग या खेळायला. अभ्यास न करता खेळणार असालच तर लगेच आऊट होण्याची दाट शक्यता आहे, आणि आऊट झालातच तर पिचच बाद आहे, फिल्डर असहिष्णू आहेत, नवख्या बॅट्समनची गळचेपी करतात वगैरे आरोप करू नका. दोन तीन ठिकाणी तुम्ही जागेच्या वापराबाबत लैच जागरूक दिसलात म्हणून इतका प्रपंच करत आहे. समजून घ्याल अशी आशा आहे.

In reply to by मोदक

खेळाडू बहुधा रीटायर्ड हर्ट होउन बाहेर गेलेला असेल आणि पुन्हा एंट्री मारतोय. बॅटींग, बॉलींग आणि फिल्डींग आणि पिच याचा अभ्यास असेलच हळू हळू बाहेर येइल

In reply to by मोदक

माझ्या मते एवढे सगळे करण्याची काही गरज नाही. मला पटते तसेच मी करेन. त्यांना पसंत आहे ते सहभागी होतील. कोणावर कसली जबदस्ती नाही. नाही का? कोणी काही प्रतिसाद दिला नाही तरी त्याबाबत तक्रार करण्याचे काही कारण नाही. तेव्हा कोणावर काही करण्याचे आतातरी काही प्रयोजन दिसत नाही. कारण खरोखर तसे काही कारण नाही. मी काही शोध लावण्याच्या हेतुने लिहित नाही. मला वाटते ते लिहितो. शिवाय इतरांचे चोरून माझ्या नावावर खपवण्याची माझी व्ृत्ती नसल्यामुळे इतरांच्या पेटंटबद्दल चौकशी करण्याची आवश्यकता नाही. मी येथे प्रथमच पोस्ट टाकतो आहे याचा जो उल्लेख केला तो दुस-या संदर्भात होता. धन्यवाद.

In reply to by बॅटमॅन

आपणास मुद्दा समजलेला नाही. (गणेश लेखमालेवेळी आम्ही असाच सल्ला दिला तेव्हा ज्येष्ठांनी 'प्रतिसाद आवडला नाही' असं कळवळलं होतं. आम्ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आहोत)

तुम्हाला बाळासाहेबांविषयी फारशी माहिती नसावी असं वाटतंय. तुम्ही फक्त शिवसेनेने केलेल्या काही कृतींबद्दल बोललात पण त्यामागची पार्श्वभूमी आणि कार्यकारण भाव समजून घेणे आवश्यक आहे. मुंबईतील दंगल तुम्ही अनुभवली आहे कि नाही माहित नाही पण मुंबईतील हिंदू सुरक्षित राहिले ते केवळ शिवसेनेमुळे. हे मी प्रत्यक्ष अनुभवातून सांगतोय, कुठे वाचून नाही. अजून एक स्पष्ट करणे महत्वाचे आहे, मी शिवसेनेचा कार्यकर्ता, पदाधिकारी नाही आणि नव्हतो. मियांदाद ला बोलावले होते तेव्हा त्याचा आणि दाऊदचा काही (लग्न)संबंध नव्हता. ही भेट मियांदादच्या विनंतीनुसार २००४ मध्ये झाली आणि त्याच्या मुलाचा विवाह २०११ मध्ये झाला. मुख्य मुंबईत एवढे वर्ष राहून मला कधी वाटलं नाही की शिवसैनिक अरेरावी किंवा दादागिरी करतात. खालील लेख वाचवा अशी विनंती: http://jagatapahara.blogspot.com/2012/11/blog-post_26.html कृपया बाळासाहेबांबद्दल अजून माहिती मिळवा. शीर्षक आणि बाकी लेख याच्यात गफलत झाली आहेच. परंतु लेख मूळ गाभा फक्त बाळासाहेबांना नावे ठेवणे एवढाच वाटतोय. ढिस्क्लेमर: शिवसेनेच्या सध्याच्या परिस्थितीवर मला काहीही भाष्य करायचे नाही.

In reply to by ट्रेड मार्क

मियांदाद दाउदचा व्याही नंतर झाला हे मला माहित आहे. पण दाउदकडचे लग्न हे मॅट्रिमोनियल पाहून झाले असे आपल्याला वाटते काय? यांचे आधीपासूनचे संबंध असतात. बाळासाहेवांचे नाव हवाला ऑपरेटर्सशी संबंध असणा-यांच्या यादीमध्ये व्होरा कमिशनच्या रिपोर्टमध्ये स्पष्तपणे आहे. त्यात आपले पवारसाहेब, व तेव्हाचे इतर कॉंग्रेसचे नेते यांचाही उल्लेख आहे. तेव्हा हा व्होरा अहवाल संसदेत आजवर का मांडला गेला नाही हे आपल्याला सहज कळू शकते. शरद पवार काय किंवा बाळासाहेब काय यांच्यासारख्यांना मिळालेली लोकप्रियता पाहता ते महाराष्ट्राचे कल्याण करू शकले असते. आम्ही एकमेकांचे मित्र आहोत असे हे दोघे म्हणत असत याचा अर्थ आळीमिळी गुपचिळी असा घ्यायचा हे एव्हाना कळलेले आहे. धन्यवाद.

In reply to by ट्रेड मार्क

http://timesofindia.indiatimes.com/india/Dawood-sons-wedding-in-Pakista… वरील बातमीप्रमाणे मियांदादची ठाकरे भेट व मियांदादचे दाऊदशी कौटुंबिक संबंध जुळणे यात एकाच वर्षाचे अंतर आहे हे स्पष्ट आहे. आपण जागता पहारा या ब्लॉगच्या लेखकांचा जो संदर्भ दिले आहेत, ते मुद्दे सोडून शब्दच्छल करत व शब्दांचा पिसारा फुलवत वादविवादाला हवे तसे वळण देण्यात तरबेज आहेत. शिवसेनेबाबतची त्यांची दोन उदाहरणे मी मागेच त्याच्या लक्षात आणून दिली होती. एक म्हणजे मुंबईतील कम्युनिस्ट कामगार नेत्याच्या शिवसेनेने केलेल्या हत्येबद्दल लिहिताना त्यांनी तो नेताच गुंड होता वगैरे विधाने केली होती. शिवाय दक्षिणेत हिंदी चित्रपट दाखवण्यास बंदी घातली गेली तेव्हा ठाकरेानी दक्षिणी निर्मात्यांचे हिंदी चित्रपट मुंबईत दाखवण्यास बंदी घातली याचे कौतुकही सदर ब्लॉगलेखक महाशयांनी केले होते. यात प्रश्न हिंदी निर्मात्यांच्या हिताचा. शिवाय बंदी घालणारे तमिळ सरकार, त्यावर मुंबईत उपाययोजना करण्याचा काय संबंध. बरे हा प्रश्न सोडवणारे ठाकरे कोण? तेव्हा यातल्या खंडणीखोरीची सुरूवात तेव्हाच झालेली होती. या गोष्टी लक्षात न घेता ठाकरेंचे कौतुक करणा-या ब्लॉगलेखकाकडे फार लक्ष देऊ नये असे वाटते. ते भाडोत्री लेखक आहे असे मला म्हणायचे नाही, मात्र त्यांचा तर्क त्या दिवशी त्यांचा जसा मुड आहे तसा चालतो हे नक्की.

१००% सहमत. खरं तर हे राजकरणी दुतोंडी आहेत- एकिकडे आपण शिवाजी राजांचे भक्त आहोत असं दाखवतात तर दुसरीकडे त्यांचीच निंदानालस्ती करणार्‍या पुरंदरे सारख्यांना पाठींबा देतात! अवांतर- सध्या आमच्या वॉट्स-अ‍ॅपवर यांचा 'वाघाचं कातडं पांघरलेला लांडगा' असा उल्लेख केला जातेय! ;)

In reply to by अन्नू

स्वत:च स्वत:ला वाघ म्हणून घेणे, हि्दूह्रदयसम्राट म्हणून घेणे हेच यांचे गंमतीशीर ऊद्योग आहेत. सामान्य लोक या दाव्यांना भुलतात हे दुर्दैव.

In reply to by अन्नू

एकिकडे आपण शिवाजी राजांचे भक्त आहोत असं दाखवतात तर दुसरीकडे त्यांचीच निंदानालस्ती करणार्‍या पुरंदरे सारख्यांना पाठींबा देतात! बी ग्रेडी ग्रुप्सवर कोण कोणाला काय म्हणतय याच्याशी इथे कोणाला शष्प देणे घेणे नाही.

साहेबांचं स्मारक आद्य साहेबांच्या शेजारी म्हणजे रायगडावर उभारावे. लोकाना एकाच भेटीत दोन साहेब दिसतील. रायगडाचाही जीर्णोद्धार होइइल. महाराज व साहेब एकत्र गप्पा मारत बसतील.

In reply to by मोगा

हिंदुपद पादशाही ला खेटून घराणेशाही ! ये बात कुछ हजम नही हुई.

साहेब महापौर बंगल्यावर राहिलेले काय ? साहेब जिथे राहिले त्या मातोश्रीवर, किंवा जिथून काम केलं त्या भवनामध्ये, बनवा तुम्हाला हवं तेव्हड मोठं स्मारक. च्यायला पब्लिक प्लेस वर डोळा नेमका. पण 3 वर्षापूर्वी सुधधा शिवाजीपार्कच्या जागेसाठी धिंगाणा सुरूच केलेला, पण सी एम पृथ्वीराज नी, आत्ता सी एम देवेंद्रनी , बरोब्बर गंडवलाय यांना. गुड गेम देवेंद्रजी ..

महापौर बंगल्याच्या जागेची मागणी ते अगदी अंत्यसंस्काराच्या वेळेपासून करत आहेत. आता हेरिटेज वास्तु म्हणून ते करता अाले नाही तर त्याच्या शेजारची जिमखान्याची जागा तरी बळकावता येईल असा डाव यामागे आहे असे काल टीव्हीवरच्या चर्चेत सांगत होते.

श्रीमान राजेश कुलकर्णी आपण उपरोक्त लेखात जी गरळ ओकली आहे त्याबद्दल आपल्या अफाट बुद्धीची कीव करावीशी वाटते. आपली तुलना मला प.पु. राहुल गांधी याच्याशी करण्याचा मोह आवरत नाही आहे. अर्धवट ज्ञान घेऊन आपण या विषयावर एखादे तज्ञ असल्यासारखे निरीक्षण नोंदवले आहे. कुठ्लारी दुषित ग्रह मनात ठेवून आपण हे लिखाण केले आहे. विषय एक आणि लिखाण भलतेच ? कुठल्यातरी एखाद्या पुचाट पक्षाचे आपण प्रवक्ते असल्याचाहि दाट संशय वाटतोय... किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीचे नाव घेऊन त्यावर टीका करून आपण लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा हा एक फालतू प्रयत्न दिसतोय, असो... परंतु मिपावरील आपला पहिलाच लेख बाळासाहेबांविरोधात लिहून आपण दणदणीत एन्ट्री करण्याचा आपला प्रयत्न कदाचित सफल होईल... आपला हा लेख वाचून आम्ही धन्य झालो आहोत, यापुढे आपला एकही लेख वाचण्याची नामुष्की आमच्यावर याजन्मी तरी येऊ नये , हीच इच्छा...

In reply to by सतिश पाटील

ओ शिवसेनावाले, जरा योग्य शब्दात प्रतिवाद करा की राव..! त्यांनी लिहलेल्या प्रत्येक वाक्याला खोडून दाखवा, मग तुमचंही ज्ञान अर्धवट आहे का फुल्ल आहे ते बघता येईल. नुसतं ;हुं; करून जाऊ नये.

In reply to by संदीप डांगे

अनेकदा दुस-याच्या हेतुवरून वैयक्तिक टीका केली जाते. एकतर प्रतिवास कसा करायचा असतो हे माहित नसते किंवा ते माहिते असले आणि अापल्याकडे प्रतिवाद करण्यास योग्य मुद्दे नसले की मग वैयक्तिक टीकेवर उतरले जाते. असो. धन्यवाद.

In reply to by सतिश पाटील

सतिश पाटील, आपली प्रतिक्रिया वाचली. अशी प्रतिक्रिया मला नवी नाही. तुम्ही माझ्या हेतुबद्दल किंवा मी कोण आहे यावर जागा न घालवता काही मुद्दे मांडले असते तर ते अधिक योग्य वाटले असते. प्रतिवाद करणा-यांचे काही सामान्य मुद्देही मी तुमच्या माहितीसाठी सांगतो. बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला किती गर्दी होती, तुम्ही दहा माणसे तरी तुमच्या मागे उभे करून दाखवा, अशा आशयाच्या प्रतिक्रिया असतात. मग मीदेखील त्यांना काही माफियांच्या अंतयात्रेला किती गर्दी झाली होती, वगैरे ऐकवतो. तेव्हा यात वैयक्तिक पातळीवरील प्रतिक्रिया न देता, विषयापासून म भरकटता मुद्द्यांवरून प्रतिक्रिया दिलीत तर बरे वाटेल. धन्यवाद.

लेखातले मुद्दे योग्य आहेत. शिवसेना सपोर्टर्स एक तर गरळ नैतर राडे यापलीकडे दुसरी भाषा जाणत नाहीत हे सर्वांनीच पाहिलेले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करणेच उत्तम.

कोणाचेच स्मारक उभारू नये सरकारने कशाला हवीत स्मारक आणि पुतळे ? काय होत स्मारक उभारून फक्त जनतेच्या पैशांचा अपव्यय त्यापेक्षा त्या पैशांमधून काहीतरी समाजोपयोगी काम करा तो पैसा देशाची स्वच्छता ,शेतीचा विकास ,जलसंधारण कामांसाठी वापरा इथ प्रत्येकाच स्वतंत्र स्मारक हव त्यांच्या अनुयायांना ह्यांच्या स्मारकांसाठी एकरांवारी जागा अडकून पडणार आणि जिवंत माणसांना डोक झाकण्यापुरता निवारा मिळण मुश्किल झालय पण तरीही फारच हौस असेल तर एकदाच एखादी जागा निश्चित करून तिथच सगळ्यांचे पुतळे उभारून टाका , त्यांच्या कार्याची माहिती देणारा बोर्ड लावून टाकायचा 'स्मारक पार्क ' हवीत कशाला प्रत्येकाची स्वतंत्र स्मारक

In reply to by _मनश्री_

कोणाचेच स्मारक उभारू नये सरकारने कशाला हवीत स्मारक आणि पुतळे ? काय होत स्मारक उभारून फक्त जनतेच्या पैशांचा अपव्यय त्यापेक्षा त्या पैशांमधून काहीतरी समाजोपयोगी काम करा तो पैसा देशाची स्वच्छता ,शेतीचा विकास ,जलसंधारण कामांसाठी वापरा इथ प्रत्येकाच स्वतंत्र स्मारक हव त्यांच्या अनुयायांना ह्यांच्या स्मारकांसाठी एकरांवारी जागा अडकून पडणार आणि जिवंत माणसांना डोक झाकण्यापुरता निवारा मिळण मुश्किल झालय पण तरीही फारच हौस असेल तर एकदाच एखादी जागा निश्चित करून तिथच सगळ्यांचे पुतळे उभारून टाका , त्यांच्या कार्याची माहिती देणारा बोर्ड लावून टाकायचा 'स्मारक पार्क ' हवीत कशाला प्रत्येकाची स्वतंत्र स्मारक

In reply to by _मनश्री_

एकदाच एखादी जागा निश्चित करून तिथच सगळ्यांचे पुतळे उभारून टाका , त्यांच्या कार्याची माहिती देणारा बोर्ड लावून टाकायचा
स्गळे सगळे एका ठिकाणी मावत नसतील तर अक्षरशः (फक्त आणि फक्त)सोडत पद्धतीने १००,१०० चे गट करून महाराष्ट्रातील सगळ्या गडांवर किमान १०० तरी पार्क उभारून ठेवावेत.
  • रीतसर प्रवेश शुल्क ठेवावे,(शाळेला मोफत्,आश्रमांना मोफत)हे स्थानीक महीला बचत गटालाच चालवायला द्यावे (उपहार्गृग सोयी सकट) त्या बदल्यात अगदी नाम मात्र भाडे आकारावे.
  • त्या त्या महामंडळाने सरकारला पुतळा देखभाल खर्च द्यावा
  • प्रत्येका (पुतळा असलेल्या) व्यक्तीचा पुण्यतीथीला तेथे एक माहीती पट (फक्त १० मिनिटांचा,आणि त्या गडाचे इतीहासाचा १० मिनिटांचा ठेवावा)
  • त्या मुळे गडावर किमान सोयी पाणी-इतर होईल आणि कमी खर्चात पुतळ्यांची आणि गडाचीही सोय होईल.
  • जागा अडवणारे पुतळे आणि त्यांच्या आजू बाजूची बाग ताब्यात घेऊन तिथे बस स्थानक्,मेट्रो ई स्थानके लगेच बांधावीत.
  • वाकडे वाडी जमनालाल बजाज पुतळा (बागेचा परीसर पहा), पिंपरी आंबेडकर पुतळा परिसर
कुठल्याही सरकारी जागेवरील पुतळ्याबाबत हेच मत असलेला. सरधोपट नाखु

In reply to by नाखु

•रीतसर प्रवेश शुल्क ठेवावे,(शाळेला मोफत्,आश्रमांना मोफत)
शांळांना आणि विद्यार्थ्यांना १०० पट जास्त शुल्क ठेवावे. ह्या राजकीय सो कॉल्ड नेत्यांचे पुतळे बघुन बाल आणि संस्कारक्षम मनावर वाईट परिणाम होण्याचीच शक्यता. खरे तर १८ वर्षा खालील कोणाला ही बंदी च असावी ह्या लोकांचे पुतळे आणि माहीती वाचण्या साठी

सध्या राज्यात दुष्काळ असताना रोज शेतकरी आत्महत्या करत असताना १ बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक , २ शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रामधील स्मारक , ३ आंबेडकरांचे इंदू मिलमधील स्मारक ( सध्या लंडनमधील घरावर पैसे घालवलेच आहेत) इतर अजून कोणी थोर पुरुष असतील त्यांची स्मारके बांधण्याचे नियोजन बंद केले पाहिजे व तो पैसा राज्ज्यासाठी वापरला पाहिजे.

स्मारक कुठे करायचे हा मुद्दा जरी वादाचा असला तरी ज्या व्यक्तीचे स्मारक करायचे आहे त्या व्यक्तीबद्दल वाद उभा करण्याची गरज नाही. एखादी व्यक्ती आपल्याला आवडत नाही म्हणून ती सर्वांनाच आवडत नाही , अस होत नसते . भाषा भाषणे शिवराळ आहे, असभ्य आहे, गुंडगिरी करतात, - हि झाली नाण्याची एक बाजू ... दुसरी बाजू काय? माहित असूनही आपण ती आपण मान्य करणारच नाही.. "स्वत:च स्वत:ला वाघ म्हणून घेणे, हि्दूह्रदयसम्राट म्हणून घेणे हेच यांचे गंमतीशीर ऊद्योग आहेत. सामान्य लोक या दाव्यांना भुलतात हे दुर्दैव." हि या कुलकर्णी महाशयांनी वर दिलेली एक प्रतिक्रिया. आमच्या सारखे सामान्य लोक अश्या दाव्यांना भुलतात ...मान्य .. आपण दोघेही भुलला नसाल कारण आपण असामान्य आहात....

अफजलखानाचा शिवाजी महाराजांनी वध केला असा इतिहास आहे. ( पोट फाडले म्हणले तर गोंधळ व्हायचा ) मग त्याचा सरकारी इतमामाने अंत्यसंस्कार केला. चुकले का त्यांचे ? मृत्यु नंतर वैर संपते असे म्हणतात. बर अफजलखानाने प्रतापगडावर येण्यापुर्वी किती मुर्ती फोडल्या/ काय काय लुटले याचाही इतिहास आहे. वास्तवीक शिवाजी महाराजांनी अफजलाखानाच्या प्रेताचे धिडवडे काढले असते तर लोकांनी अजुन तिखट प्रतिसाद देऊन आणखी नविन वाचनात आले असते. असे काय वाईट झाले हो बाळासाहेबांमुळे ? ते स्पष्ट वक्ते होते हा गुन्हा होता ? भुमीपुत्रांच्या अधिकाराला त्यांनी वाचा फोडली हा गुन्हा झाला ? त्यांच्या तिखट टिकेचे सर्वात जास्त शिकार मा शरद पवार साहेब झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराला शरद पवार आणि छगन भुजबळ ( ज्यांना शिवसेना सोडल्यानंतर चॉकलेट मंत्री इ. शेलक्या विषेषणानी बाळासाहेब संबोधत ) हजर होते. स्वतः शरद पवार साहेबांनी स स्मारकाच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला. आपल्या लेखाचा सर्वांगाने पुन्हा विचार करावा.

In reply to by गॅरी शोमन

स्वतः शरद पवार साहेबांनी स स्मारकाच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला.
आमच्या लाडक्या काकां चे काय विचारता? त्यांनी त्यांची पण सोय केली. आता काकांच्या स्मारकाची वेळ आली की उद्धव पण लगेच पाठींबा देणार.
त्यांच्या तिखट टिकेचे सर्वात जास्त शिकार मा शरद पवार साहेब झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराला शरद पवार आणि छगन भुजबळ ( ज्यांना शिवसेना सोडल्यानंतर चॉकलेट मंत्री इ. शेलक्या विषेषणानी बाळासाहेब संबोधत ) हजर होते.
मोदींनी आधी काका पुतण्यानी ( हे पुतणे वेगळे, मी तो नाही ) बारामतीला वेठीस धरले असे म्हणले होते, आता म्हणतात की आमच्या लाडक्या काकांसारखी १०० लोक तरी पाहिजेत. काकांचा करीश्माच वेगळा आहे.

In reply to by गॅरी शोमन

काय वाईट केले व काय वाईट झाले हेच तर वर सांगितले आहे. त्यामुळे द्विरूक्ती करत नाही. भुमिपुत्राचा आवाज उठवन्याबद्दल आपल्या अशा माफक अपेक्षा असतील तर माझी काही हरकत नाही.

कोणत्याही राजकिय नेत्याची शक्ती ही लोकसामर्थ्यातूनच व्यक्त होत असते. बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व पाहिले असता असे स्मारक लोकांनीच उभे केले पाहिजे. अर्थातच अश्या स्मारकातून नेमके काय साध्य होईल हे सांगता येणे नक्कीच अशक्य आहे हे मात्र खरे. उद्धव ठाकरे यांना तहहयात अध्यक्ष ठेवणे हे देखील अनुचित आहे.

In reply to by कलंत्री

लोकांनी कशाला सोसायचा भुर्दंड या महागाईच्या काळात स्वतःचाच खर्च भागवण मुश्किल शिवाय कररूपात जनता पैसा देतच आहे सरकारला

सरकारला योग्य वाटेल अशा कोणाचेही स्मारक उभारायला माझी ना नाही. मात्र माझा(टॅक्सरुपाने भरलेला) पैसा त्यात लागणार असल्याने त्याचे स्वरूप कसे असावे याविषयी माझी (जनतेची) मतेही सरकारने मागवावीत व त्यावर विचार करावा असे वाटते. शिवशि, त्यासाठी सार्वजनिक जागा (विशेषतः मैदाने) वापरू नये असेही मत आहे. नवी जमिन विकत घ्यावी किंवा आधीच काही भाग आरक्षित ठेवावा.

शिवसेना भाजपावाले काँग्रेसला शिव्या घालतात. पण गांधीजी , नेहरू , पटेल इ लोकांची स्मारके ही त्या व्यक्तींचे नातेवाइक / चाहते यानी दान दिलेल्या जागेत आहेत. साबरमती आश्रम , मणीभवन , मोतीलाल नेहरु स्मारक , डॉ. आंबेडकरांचे घर इ इ या खाजगी जागा होत्या. अगदी ब्यारिस्टर जिनानीदेखील आपले मुंबैइचे घर पाकिस्तानी दूतावासास देण्यास सांगितले होते. ( सध्या ती जागा भारत , पाक व जिनांचे वारस यांच्या वादात आहे. ) म फुल्यांनी जी शाळा सूरू केल होती तो वाडाही मालकाकडून ऐतिहासिक महत्व हे कारण दाखवून आपल्या ताब्यात घेऊन मग तिथे स्मारक उभे केले असे ऐकून आहे. आणि ठाकरेना मात्र उलटा न्याय ? ठाकरे ऐतिहासिक व्यक्तित्व होते तर त्यांचे निवासस्थान ताब्यात घेऊन तिथे सरकारने स्मारक उभे करावे. .... भाजपावाले बहुमतात असुनही सेनेची मागणी मुकाट्याने मान्य करत आहेत याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. म्हणजे सत्तेचा वापर करुन उद्या भाजपावालेही काही भूखंड बळकावतील त्याला सेना उपद्रव करणार नाही. दुसर्‍या लबाड लोकांचा विरोधही अशा मांडवलीच्या उद्देशानेच असणार , असे वाटते

धाग्याचे शिर्षक वाचुन धागा उघडला. पण या माणसाचे (मुद्दाम एकेरी उल्लेख करतो आहे) इतर धागे वाचुन त्याची लायकी कळली. पहिल्या दोन ओळी आणि शेवटचे दोन परिच्छेद सोडले तर या माणसाला ठाकरे आणि शिवसेना या दोन शब्दांपध्दल घृणा/ तिरस्कार आहे हे पदोपदी जाणवते. संपादक मंडळ, माफ करा, पण व्यक्तीस्वातंत्र्य, नविन लेखकांना प्रोत्साहन म्हणुन (एक मिपाकर आणि केवळ वाचक म्हणुन) काय आणि का सहन करायचे हे मी सगळे? अनावश्यक वाटल्यास प्रतिसाद अवश्य उडवा.

In reply to by भाते

ठाकरे आणि शिवसेना या दोन शब्दांपध्दल घृणा/ तिरस्कार आहे हे पदोपदी जाणवते.
या दोघांबद्दल आदर असावा असही काही केलेलं नाही यांनी. लेखातील मुद्दे चुकीचे कसे आहेत ते सांगा. लेख आवडला!

In reply to by भाते

तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे सारे ठाकरे हे खरे तर ठकवणारे आहेत असे मी एरवी सांगतो व त्याची कारणेही देतो. मी येथे ठाकरेंच्या स्मारकाबद्दल बोलतो आहे. एवढ्या वादग्रस्त असलेल्या (त्याची कारणे दिली आहेत, आणखी अनेक जोडता येतील -लिहून मीच थकल्यामुळे एवढ्यावरच थांबवले) व्यक्तीच्या स्मारकासाठी सरकारने का मदत करावी? मुंबई महापालिका वर्षानुवर्षे लुटली यांनी, त्यातून स्वत: स्मारक नाही का उभे करता येत? अंत्यसंस्काराच्या वेळेपासून महापौर बंगल्याचा धोशा लावला आहे? यांची वेयक्तिक मालमत्ता अाहे का तीदेखील लुटायला? हे सगळे खरे सांगितले तर तुमच्यासारखे ठाकरे व शिवसेनाप्रेमी दुखावतात, मग एवढे सगळे कर्त्ृत्व असतानाही कोणी काही आक्षेप घेऊ नये वाटते का तुम्हाला? माझ्यावर आरोप न करता पोस्टमधील मुद्द्यांबद्दल बोलला असता तर अधिक बरे झाले नसते का? ते न करता 'काय काय सहन करायचे?' हा कांगावा काय करत आहात?

मोठमोठाली भाषणे करून लोकांची मते मिळवणे व त्याद्वारे स्वताचे घरदार चालवणे हे फक्त उद्योग. लेखास वरवर विरोध करणार्यांनी त्यांची किमान १० ठोस कार्ये लिहून दाखवा व मुंबई आमची मुंबई आमची म्हणताना व महानगरपालिकेत गेली अनेक वर्षे सत्ता उपभोगत असून स्वताचा रिमोट असताना मुंबई चा कसा गतिमान विकास झ्हाला हेही आमच्या ज्ञानात भर म्हणून लिहून दाखवा. सबळ पुरावे म्हणून या पावसाळ्यात सर्व रस्ते कसे अजिबात तुंबले न्हवते , लोकल निट धावत होत्या लोक आनंदाने कामावर जात होते वगैरे चे फोटू टाकल्यास अति उत्तम.

या चर्चेच्या विषयावर मला काही बोलायचे नाही. काही जणांनी स्व. बाळासाहेबांचे योगदान काय हे विचारले आहे त्याचे माझ्या परिने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. इतरांना पटावेच असा आग्रह (नेहमीप्रमाणेच) नाही. १९९८ ते २००४ या काळात प्रथमच दीर्घकालासाठी वाजपेयींच्या रुपाने गैर काँग्रेसचा पंतप्रधान देशाला लाभू शकला. या काळात अनेक लहान पक्ष कधी अण्णाद्रमुक, कधी तेदेप, कधी तृकाँ पाठिंब्याच्या बदल्यात सरकारला ब्लॅकमेल करत असत. या सर्व काळात सेनेच्या पाठिंब्याच्या रुपात स्व. बाळासाहेब भक्कमपणे वाजपेयींच्या पाठिशी उभे होते. त्या काळात देशाची प्रगती उत्तम होऊ शकली. दुसरी गोष्ट स्पष्टपणे जाणवेलच असे नाही. पण संपूर्ण भारतात शिवसेनाच असा (आकारमानाने दखल घेण्याजोगा) पक्ष आहे जो जात पात बघून उमेदवार उभे करत नाही. किती तरी सर्वसामान्य माणसं निवडून येण्यासाठी बहुतेक वेळी लागणारी जातीची अन पैशाची पार्श्वभूमी नसताना सेनेच्या माध्यमातून राजकारणात येऊ शकली अन यशस्वी होऊ शकली.

In reply to by श्रीरंग_जोशी

तुम्हाला सेनेचा दलितद्वेष माहित कसा माहित नाही याची कल्पना नाही. इदिरा हत्येनंतर मुंबईतील शीखांनी रात्रीतून त्यांच्याकडे कॉंग्रेसने महाराष्ट्रात लाख पापे केली असतील, पण कोणा गुंडाला मुख्यमंत्रीपदी बसवले नाही. यांनी राणे नामक गुंडाला तेथे बसवून त्या पदाला काळे फासले. उठसूट लोकांना मूर्ख बनवण्याचा त्यांचा धंदा आता लोकांना कळून चुकलेला आहे, त्यामुळे येत्या काळात सेनेला ओहोटी लागणार अाहे. सेना भाजपसरकारच्या मागे भक्कमपणे उबी राहिली म्हणता म्हणजे त्यांनी काय केले. महाराष्ट्रात त्यांचे व भाजपचे सरकार आले होते त्यावेळी आताच्या भ्रष्टगुंडवादीने जसे महाराष्ट्राला लुटले, अगदी तसेच सेनेच्या मंत्र्यांनी लुटले. त्यामुळे सामान्यांना दिसेल अशा रूग्नवाहिका, रक्तदानशिबिरे, सोडता त्यांच्याकडून सकारात्मक काहीच झालेले नाही. म्हणूनच मी याला ५% समाजसेवा व इतर आमचा मेवा असे म्हणतो.

ज्या घराणेशाहीने लोकांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करुन लाखोंचे संसार उध्वस्त केले, दंगली पेटवून लोकांचे निर्घुण बळी घेतले- लोकांचे अन्नपाण्याविणा हालहाल केले, त्याच घराणेशाहीला आता लोक ग्रेट मानून त्यांच्या कुकर्माला पाठीशी घालत आहेत!!?? वर म्हणतात त्यांनी एवढं काय वाईट केलं? महाशय त्या दंगलीत आपली माणसे गमावलेल्या लोकांना विचारा- त्यांनी काय एवढं पाप केलं होतं? जे त्यांच्यादेखत त्याच्या कुटूंबियांना कापण्यात किंवा जाळण्यात आलं? काय वेदना सहन कराव्या लागल्या असतील त्यांना? मी हे सांगतोय कारण, ही दंगल आणि जाळपोळ आंम्ही स्वतः पाहीली आहे, अनुभवली आहे. मेन दंगलीच्या संवेदनशील ठीकाणीच राहात असल्याने त्याच्या झळाही सोसल्या आहेत, रात्री अपरात्री घरावर पडणार्‍या स्फोटकाच्या बाटल्या आणि हैवानासारखी हातात तलवारी, सुरे, चॉपर, जे भेटेल ते हत्यार घेऊन फिरणार्‍या टोळ्या आंम्ही बघितल्या आहेत. चोवीस तास अन्नपाण्यावाचून स्वतःला घरात कोंडून ठेवणे ही काही साधी गोष्ट नाही, पोलिसांना तर 'शुट अ‍ॅट साईट' ची ऑर्डरच देण्यात आली होती. मग तो कोणीही असो. एवढं सगळं का आणि कशासाठी? एका राममंदिरासाठी? ज्या शिवाजी महाराजांनी मुसलमानांच्या मस्जिदीच्या विटेलाही कधी हात लावला नाही, त्याच शिवाजींच्या नावाने चुकीचा फतवा काढून हे बाबरी मस्जिद पाडायले निघाले होते? एखाद्याचे अंधानुकरण करण्यापेक्षा डोळे उघडून त्याची खरी सत्यता पडताळून पहायला हवी. तरच समाज सुधारु शकेल, नाहीतर पुन्हा बाबरीची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही. :(

In reply to by अन्नू

नक्की कोणाबद्दल बोलताय? कोणाच्या घराणेशाहीमुळे धार्मिक तेढ निर्माण झाली? हातात तलवारी, सुरे, चॉपर, जे भेटेल ते हत्यार घेऊन फिरणार्‍या टोळ्या शिवसेनेच्या होत्या आणि त्या तुमच्या घरावर हल्ले करत होत्या? मी तर दादर मध्ये राहायला होतो जेव्हा दंगल झाली, शिवसेनाभावनापासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावर. मी सुद्धा प्रत्यक्ष अनुभवलंय हे सगळं. पण हातात तलवारी, सुरे, चॉपर, जे भेटेल ते हत्यार घेऊन फिरणार्‍या टोळ्या मुसलमानांच्या होत्या ज्या आमच्यावर हल्ले करायच्या तयारीत होत्या आणि त्यावेळेला फक्त शिवसैनिकांमुळे आमचं रक्षण झालं. पोलिस स्टेशनला फोन केला तर त्यांनी सांगितलं सगळीकडेच दंगल आहे आमच्याकडे तेवढे पोलिस नाहीत, पण शिवसैनिक मात्र धावून आले. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे खरी सत्यता पडताळून पहायला हवी नाहीतर पुन्हा बाबरीची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही, म्हणजेच मंदिरांच्या जागी मशिदी व्हायला वेळ लागणार नाही. बाबरी मशीद पाडली फक्त म्हणूनच मुंबईत दंगली झाल्या हे म्हणणे हा भाबडेपणा आहे. स्मारक कुठे करावं हा वादाचा मुद्दा होऊ शकतो पण त्यासाठी बाळासाहेबांवर चिखलफेक कशाला करायची? नुसता स्मारकाचा मुद्दा मांडला असता तर योग्य होतं.

अन्नू, सुज्ञ यांनी दाखवलेली बाजू अगदी वास्तवाला धरून आहे. विस्तवाला अशी दुरुस्ती करावी ही नम्र विनंती..

आस्तीक-नास्तीक-स्वास्तीक-कास्तीक-जास्तीक-राजकीय धाग्यांने पीडीत अस्सल मिपाकर वाचक महासंघाच्या "मी मिपाचा,मिपा माझा" या दैनिकातून साभार

.

In reply to by नाखु

विस्तवाला अशी दुरुस्ती करावी ही नम्र विनंती..
वास्तव हे विस्तवासारखेच आहे हो, ते समजुन न समजल्यासारखे करणार्‍यांची किव येते.

राजेश कुलकर्णी, सरकारने कोणाचे स्मारक उभारावे याबाबतचे निकष कोणते? मुद्दा काय? आणि तुम्ही लिहिता काय ? बाळासाहेबांविषयी माझ्या मनातील द्वेष असा काही तरी धागा तुम्ही काढायला हवा होता. तुमचा मुद्दा क्रमाक १) (कारण त्यांच्या पक्षाची ना काही भूमिका, ना काही तत्वे, ना काही विचारधारा. जी तत्वे म्हणून जी दाखवली ती सतत बदलत राहिले.) हो शिवसेना नेहमी अन्याया विरोधात लढत राहिली आणि राहील. मराठी माणसाच्या न्याय व हक्क साठी शिवसेना नेहमीच लढत राहिली आहे. मग कधी समोर कम्युनिस्ट, लुंगीवाले मद्रासी,भैय्ये,मुसलमान कोणी हि येवो. मुंबई मध्ये कुठे शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना सर्वाधिक समाजपयोगी कामे झाली. आज मुंबई मधील उड्डाण पूल असो कि मुंबई-पुणे महामार्ग असो या बाळासाहेबांच्या दूरदृष्टी मुळेच झाल्या तुम्ही हे सोयीस्कर रित्या विसरता. (मशिदीतील कर्ण्याचा आवाज, नमाजादरम्यान रस्ते अडवले जाणे, वगैरे उपद्रवाच्या बाबतीत मुस्लिमांशी चर्चा करून मार्ग काढण्याचे सोडून महाआरतीसारखे उद्योग करून वातावारण तापवणे, ही यांची कामाची पद्धत. थोडक्यात, काही ना काही विषयावरून लोकांच्या भावना भडकावणे हा यांचा धंदा.)हे प्रश्न चर्चेने सुटणारे होते मग इतर पक्षांनी किंवा तुम्ही का नाही सोडविलेत हे प्रश्न चर्चा करून ????? हे म्हणजे असे झाले कि सावरकर क्रांतिकारक म्हणून ते वाईट आणि गांधीजी सत्याग्रही म्हणून ते तेव्हडे भले...... (विरोधी मतदान केले म्हणून आपल्याच एका नगरसेवकाचा खून करणे हे यांचे लोकशाही उद्योग)हे तुम्हि सिद्ध करा आणि मग बोला उगाच लिहिता येते म्हणून काही हि लिहू नका. (हिंदुत्वाचे नारे देणा-या त्यांच्या पक्षाने एकदाही हिंदुत्व म्हणजे काय हे कधीही स्पष्ट केलेले नाही. त्यांनी स्वत:च स्वत:ला हिंदूहृदयसम्राट म्हणवून घेतले. स्वत:च स्वत:ला वाघ म्हणवून घेणे हा आणखी एक स्वत:चे कौतुक करून घेण्याचा विषय. हिंदुत्वाच्या गप्पा मारणा-यांनी किती दलितद्वेष केला, हे काय लपून राहिले आहे काय?)तुम्हाला कुणी सांगितले हिंदूहृदयसम्राट म्हणायला. त्यांचे चाहते त्यांना कोणत्या हि नावाने हाक मारतील तुम्हाला त्याचे काय ? तुम्ही हि तुमचे नामकरण हव्या त्या नावाने करून घ्या आमचा काही एक आक्षेप नाही. आणि दलितांचा द्वेष कुलकर्णीच्या पूर्वजांनी केला असेल......बाळासाहेबांनी मुळीच नाही. सर्व प्रथम शिवसेना-भिमसेन एकत्र येण्याची संकल्पना साहेबांनीच मांडली हे विसरू नका. (दाउदसारख्याशी संबंध असणा-या मियांदादला थेट घरी बोलावून तो क्रिकेटवर चर्चा करण्यास आल्याचे भासवण्याचे यांचे देशप्रेमी उद्योगही आपण पाहिलेत.) मियादातला मातोश्रीवर कुणी बोलावणे पाठविले नव्हते. तो पाकिस्तानी क्रिकेट संघाला भारतात खेळू द्या. अशी विनंती करण्यासाठी आला होता. पण बाळासाहेबांनी तेव्ही त्याला स्पष्ट बजावून पाठविले. जोवर सीमेवर शांतता नांदत नाही तो वर तुम्हाला भारतात खेळता येणार नाही. या वरून तरी समजा पाकिस्तान सारखा देश या माणसाची दखल घेतो पण तुम्ही त्याचा द्वेषच करता हा तुमचा करंटे पण नाही का ? आणि जावेद मियादातचे लग्न दाउदच्या मुलीशी या भेटी नंतर झाले आहे.चिखल फेक करायची म्हणून काही हि सबंध कुठेही जोडायचे का? इंदू मिलची १४ एकर जागा जेव्हा बाबासाहेबांच्या स्मारका साठी मागितली तेव्हा का तुमचा कंठ फुटला नाही. तेव्हा का नाही विरोध दर्शवणारा एखादा धागा काढावासा वाटला नाही?

In reply to by जय२७८१

माझ्या लेखाचा प्रतिवाद करायचा प्रयत्न तर तुम्ही केलात. पण दुर्दैवाने एकाही मुद्द्याचे उत्तर तुम्ही देऊ शकत नाही हे दिसले. उलट भलत्याच गोष्टींचे समर्थन करण्याच्या नादात तुम्ही वहावत गेला आहात. तुमच्या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर प्रथम. डॉ. आंबेडकरांबद्दल तुमचे काय आक्षेप आहेत? त्यांच्या स्मारकाला जागा देण्याला का कोणाची हरकत असेल? त्यांचे कार्य व ठाकरेंचे यांची तुलना करायचा विचार करताहात की काय? मियांदादच्या भेटीच्या किती नंतर त्याचे दाऊदशी कौटुंबिक संबंध प्रस्थापित झाले हे मी वर एका कमेंटमध्येच दाखवले अाहे. वाचायची तसदी घेतली असतीत तर पुन्हा लिहावे लागले नसते. शिवाय तुमचे उद्धव आजही गेल्या पंचवीस वर्षांपासून सेना पाकविरूद्ध देशप्रेम ओकत आहे असे म्हणतात. २००३नंतर आतापर्यंत किती वर्षे झाली मोजा बरे. ते गुलाम अली बिचारे गायक, त्यांना तुम्ही भारतात गाऊही देत नाही आणि मियांदादला थेट घरात घेता, त्यातही काही वावगे वाटत नाही? पाकिस्तान ठाकरेंची दखल घेतो असे म्हणता. केवढा विनोद आहे हा. तुम्ही त्या बरळू राऊतांचे लेख गंभीरपणे घेता की काय? ठाकरेंनी दलितद्वेष केला नाही म्हणणे म्हणजे तर हद्दच झाली. सगळा द्वेष करून थकल्यानंतर शिवशक्ती व भीमशक्तीचे सुचले. पण यांची कुठली शिवशक्ती? मी म्हणले ना स्वत:च स्वत:ला हिंदूह्ृदयसम्राट म्हणून घ्यायचे, स्वत:च स्वत:ला वाघ म्हणायचे, तसेच स्वत:च स्वत:ला शिवशक्ती म्हणायचे. कमाल आहे की नाही? सावरकर व गांधींचा येथे कोठे संबंध येतो हो? शिवाय ती उदाहरणे स्वातंत्र्यापूर्वीची. ठाकरे काय मुस्लिमांविरूद्ध क्रांती करत होते की काय? तेव्हा तुमचे आर्ग्युमेंट किती पोकळ अाहे हे तुम्हालाच कळेल. तुम्ही ठाकरेंच्या दूरद्ृष्टीबद्दल बोलता. त्यांची द्ृष्टी तर मातोश्रीच्याबाहेर कधी गेलीच नाही. बाकी मराठी माणसासाठी त्यांनी कायकाय केले याची एकदा यादी करा. म्हणजे तुमचे तुम्हालाच कळेल. ठाकरे लढवणार १६० वगैरे जागा, भाजप लढवनार ११० जागा. तरीही ज्याचे अधिक आमदार त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला किती भन्नाट होता. बरे यांनी सत्तेत आल्यावर किती खा-खा केली माहित आहे की नाही? बरे, कॉंग्रेसने लाख पापे केली पण कोणा गुंडाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवले नव्हते. पण ते पाप ठाकरेंनी केले. एका गुंडाला तेथे बसवून. त्या पदाला काळे फासले. अजून काय सांगू तुम्हाला? असो. सतत सेनेच्या भाटांचेच ऐकून, सामना वाचून तुमचे ब्रेनवॉशिंग झालेले दिसतच आहे. आता राजू परूळेकरांचा ब्लॉग वाचायचा प्रयत्न करा. मी काहीच लिहिले नाही, आणखी लिहायला हवे होते असे तुम्हाला वाटेल. प्रथम जमल्यास डोळ्यावरची पट्टी काढून टाका.

In reply to by राजेश कुलकर्णी

ते गुलाम अली बिचारे गायक, त्यांना तुम्ही भारतात गाऊही देत नाही आणि मियांदादला थेट घरात घेता, त्यातही काही वावगे वाटत नाही?
बिचारे? फारच पाक प्रेम उफाळलेलं दिसतंय! त्या कसूरीचं पुस्तक प्रसिद्ध कशासाठी करू द्यायचा अट्टाहास होता म्हणे? तो कसूरी काय सासरा लागतो काय? भारत पाकिस्तान मॅच कशासाठी हवीय? मॅच पुन्हा मुंबईत ठेवलीच तर पुन्हा खेळपट्टी उखडावी असं आम्हा पाकविरोधकांना वाटतंय. जर भाजपानं त्यांचं पाकिस्तान प्रेम थांबवलं नाही तर माझं पुढचं मत शिवसेनेला जाईल. काय गंमत लावलीय काय?

कुलकरणीजी आपण कुठे रहाता यावर मी पैज् मारू शकतो. तुम्ही मुंबईतल्या दंगली अनुभवल्याच् नसणार, त्याशिवाय असे बेजाबदार आरोप तुम्ही करणार नाही. बाबरी मशिद पडल्यानंतरच्या दंगली घ्या. मुस्लिमानि मुम्बई पेटवण्याची सुरुवात केलि होती तरिही हिन्दू गप्प होते. राधाबाई चाळ जळीत हत्याकांड झाले आणि शिवसेनेने मुम्बई पेटवली. नारायण राणेचे नाव तुम्ही घेत आहात , तर मग धाकले पवार साहेब चांगल्या कुलात जन्माला येऊन काय दिवे लावतात ते पाहिलेच आहे उभ्या महाराष्ट्रांने सॉरी भारताने. धरणात मुतायच्या गोष्टी भर सभेत तेहि समोर बायका असताना , शोभते काय हो त्यांना? आत्ता राणे गुंड असून देखील त्यांनी अशी असभ्य भाषा सार्वजानिक ठिकाणी वापरली नाही ती बाळासाहेबांचा धाक होता म्हणुन. ज्या ठाकरी भाषेला तुम्ही आक्षेप घेत आहात ती भाषा ऐकण्यासाठी महाराष्ट्राच्या कानकोपर्यातून लोक शिवतीर्थावर दसरयाला धाव घ्यायचे. इतकिच हिम्मत होती तर कॉंग्रेसने का नाही खटला दाखल केला त्या वेळी. तुम्ही कुठेतरी शिखाचे उदाहरण दिले आहे. काय माहीत आहे हो तुम्हाला शिखाबद्दल? दिल्लीत जेव्हा शिखांचे शिरकान होत होते तेव्हा महाराष्ट्रात त्याचा मागमुसही नव्हता. का तर बाळासाहेबानि आवाज दिला होता की ख़बरदार कोणी शिखांना हात लावाल तर. शिख लोक हे बिझनेस करणारी लोक आहेत. कोणत्याही व्यावसायिकला स्थिर सरकार असेल तर व्यवसाय वृद्धि करता येते. जेव्हा शिखानी मतदानाचा कल बघितला तेव्हा त्यांनी कॉंग्रेसला उखडून फेकली. बाळासाहेब गेले ते दिवाळीत, त्यानंतर एप्रिल मधे आलेल्या मोहमंद पैगबराच्या वाढदिवसाला मुंबईतल्या चेकाळलेल्या धर्मांध मुस्लिमानि मिरवणुक काढली होती. कोणत्या हदीस वा कुराणात लिहून ठेवले आहे की अशी मिरवणुक काढावि? या मिरवणुकीत ट्रकवर गाई व् बकरया घेऊन मुस्लिम बसले होते. बाळासाहेब असेपर्यंत अशी हिम्मत मुंबईतल्या मुसलमानात नव्हती. इतिहासाने वेळोवेळी सिद्ध केले आहे की तुम्ही थोड़े जरी नरम पडलात तर तुमचा गैरफायदा घेतला जातो. बाळासाहेबानि मवाळ धोरण घेतले असते तर कदाचित् मुंबईत उपरे डोइजड झाले असते. दाऊद व् गवळीच्या उदाहरणाबाबत. दाऊदने मुम्बई पोलिसांना हाताशी धरून आपले साम्राज्य उभे केले होते. मन्या सुर्वे, सुहास भाटकर, वरदाभाई हे दाऊदचे शत्रु एकतर संपवले गेले अथवा नाडले गेले. त्यावेळी जर बाळासाहेबानि असे सूचक विधान केले तर तो राजनीतिचा भाग होता. गंमत अशी आहे की रमा नायक सारखे ढगांत गेले पण अरुण गवली अजुन जिवंत आहे. योगायोग नाही आहे हां.

In reply to by भंकस बाबा

अग्गोबै ! गणपतीची मिरवणुक काढा हे कुठल्या वेदात आहे म्हणे ?

In reply to by मोगा

सार्वजनिक गणेशोत्सव हा अर्वाचीन प्रकार आहे, कशाला वेद आणताय मधे ? तो सुरु करण्यामागे नक्कीच एक विधायक उद्दिष्ट होते (जे आता हरवलेले वाटते).

प्रिय राकु आपल्याला रोग झालाय, रोगाचे नाव - विचारजंत रोगाचे लक्षण- डोळ्यावर , कानावर झापडे आल्यामुळे, आणि मेंदूला बुरशी लागल्यामुळे , मी प्रकांड पंडित , मीच बरोबर बाकी सगळे चुकीचे, असे सांगत बोंबलत लिहिणे. रोग- उप्चारेबल जवळच्या शिवसेना शाखेशी संपर्क साधा. मोफत आणि योग्य उपचार केले जातील.

त्या दंगलीत सेनेने विधायक काम केले हे क्षणभर ग्राह्य मानू. पण म्हणून १९७० ते ९१ आणि ९३ ते २०१५ मधील निश्क्रियतेचा हिशोब विचारला तर त्याला उत्तर म्हणुन नुसते ९२ चे अनुभव दिले की झाले का ?