Skip to main content

स्फुट

भाडेकरू व नैतिकता

लेखक राजेश कुलकर्णी यांनी सोमवार, 23/11/2015 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
भाडेकरू व नैतिकता . . भाडेकरू व घरमालक यांचे संबंध हा या पोस्टचा विषय नाही. तसेच 'घरमालक व नैतिकता' हाही या पोस्टचा विषय नाही. घरमालक व भाडेकरू यांच्या संबंधातला कायदा हा भाडेकरूच्या बाजुने झुकणारा आहे असे आपण ऐकतो. घर भाड्याने देताना लिव्ह&लायसन्सच्या तत्वावरच द्यावे, अन्यथा भाडेकरू घरावर हक्क सांगू शकतो व घराचा ताबा देण्यात अडथळा आणू शकतो ही शंका मनात आसते. दुसरीकडे ‘तू निश्चिंतपणे रहा, फक्त मला गरज पडेल त्यावेळी घर रिकामे करून दे’, अशा तोंडी व्यवहारावर, म्हणजे कोणतीही चिठ्ठी-चपाटी न करता केवळ विश्वासावर आपला बंगला दुस-याच्या हवाली करणारे मित्रही माझ्या पाहण्यात आहेत.

आज कार्तिकी एकादशी

लेखक राजेश कुलकर्णी यांनी रविवार, 22/11/2015 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज कार्तिकी एकादशी . सकाळपासून प्रह्लाद शिंदे यांची विठ्ठलावरची गाणी रेडिओवर ऐकू आली. त्यावरूनच वाटले की आज एकादशी असेल. एके काळी त्यांची विठ्ठलावरची काही गाणी पाठ होती. १) परवा एके ठिकाणी ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ हे वचन पाहण्यात आले. सामान्यपणे ज्ञानेश्वरांचे कार्य तुकारामांच्या काही शतके आधीचे असल्यामुळे तसे म्हटले जात असावे. पण सध्याच्या असहिष्णुतेच्या काळात हे वचन भविष्यात झाकून ठेवावे लागते की काय असे वाटते. कळसापेक्षा पाया मोठा व महत्त्वाचा मानतात, म्हणजे तुम्ही तुकारामांना ज्ञानेश्वरांहून कमी लेखता?

टीव्हीवरील मतिमंद कार्यक्रम - मुख्यत्वे मालिका - आणि त्यांचे बहुतेक सारे स्वत:ला विकलेले निव्वळ पोटार्थी पांढरपेशे लेखक(?)

लेखक राजेश कुलकर्णी यांनी शनिवार, 21/11/2015 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
टीव्हीवरील मतिमंद कार्यक्रम - मुख्यत्वे मालिका - आणि त्यांचे बहुतेक सारे स्वत:ला विकलेले निव्वळ पोटार्थी पांढरपेशे लेखक(?) कोणाच्या व्यवसायाबद्दल एरवी बोलू नये असे वाटते. कारण ब-याचदा तो त्यांच्या पोटापाण्याचा मार्ग असू शकतो. माझ्या मते या रेम्या डोक्याच्या सिरियल्स समाजाला मानसिकदृष्ट्या अधु करण्याचे काम करत आहेत; मराठी-हिंदी- बहुतेक सगळ्याच. समाजाला चांगला मार्ग दाखवणारे किंवा स्फुर्तिदायक असे विषय हाताळणा-या अगदी क्वचितच. महिनोंमहिने वा वर्षानुवर्षे हे दळण दळत राहणे हे यामागचे मुख्य कारण आहे असे वाटते. चांगला विषय घेऊन मोजक्या वेळेत तो पूर्ण करणे असे असायला हवे.

फुसके बार – २१ नोव्हेंबर २०१५

लेखक राजेश कुलकर्णी यांनी शुक्रवार, 20/11/2015 23:06 या दिवशी प्रकाशित केले.
फुसके बार – २१ नोव्हेंबर २०१५ . १) सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्तींचा लहरीपणा चेह-याला लावण्याच्या क्रीममुळे गोरेपणा येत नाही, तेव्हा असे दावे करणा-या कंपन्यांवर कारवाई करावी अशा स्वरूपाच्या याचिकेची सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश दत्तू यांनी नकार दिला. एवढेच नव्हे तर अशा दाव्यासाठी ग्राहक न्यायालयाकडे जावे असा सल्ला त्यांनी दिला. माझ्या मते मुख्य न्यायमुर्तींचे हे विधान अतिशय बेजबाबदारपणाचे आहे. ग्राहक न्यायालय फार तर एखाद्याने विकत घेतलेल्या अशा क्रिमची किंमत परत करण्यास सांगू शकते, फार तर फार असे खोटे दावे केल्याबद्दल काही दंडही करू शकते.

मी हिंदू आहे म्हणजे नक्की काय आणि कोण आहे? आपल्या हिंदू धर्माचे मुख्य प्रतिनिधी नक्की कोण?

लेखक राजेश कुलकर्णी यांनी शुक्रवार, 20/11/2015 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
मी हिंदू आहे म्हणजे नक्की काय आणि कोण आहे? आपल्या हिंदू धर्माचे मुख्य प्रतिनिधी नक्की कोण? इतर धर्मातील (उदा. बौद्ध, जैन, ख्रिस्ती, मुस्लीम, शीख, बहाई, पारशी) लोकांना त्यांच्या धर्माशी संबंधीत वरील प्रश्नाचे उत्तर देण्यात फार अडचण यायला नको. किंबहुना काही धर्मात थोडीफार तशी परिस्थिती असली तरी त्याचा येथे संबंध लावायला नको. हिंदूंना मात्र लहानपणापासून याबाबतीत स्पष्ट मार्गदर्शन केले जात नाही. मी आतापर्यंत अनेकांना याबाबत विचारलेले आहे.

सरकारने कोणाचे स्मारक उभारावे याबाबतचे निकष कोणते?

लेखक राजेश कुलकर्णी यांनी गुरुवार, 19/11/2015 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
सरकारने कोणाचे स्मारक उभारावे याबाबतचे निकष कोणते? स्मारकातील सरकारच्या सहभागामुळे गुंडगिरीला व असभ्यपणाला जाहीर प्रतिष्ठा . . . दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन नुकताच झाला. त्यानिमित्ताने त्यांच्या स्मारकासाठीच्या ठिकाणाची घोषणा झाली. मुंबईतील महापौरांचा आताचा बंगला असलेली वास्तु स्मारक म्हणून वापरले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या स्मारकामध्ये नक्की काय दाखवले जाईल याची उत्सुकता आहे. कारण त्यांच्या पक्षाची ना काही भूमिका, ना काही तत्वे, ना काही विचारधारा. जी तत्वे म्हणून जी दाखवली ती सतत बदलत राहिले.