Skip to main content

सरकारने कोणाचे स्मारक उभारावे याबाबतचे निकष कोणते?

लेखक राजेश कुलकर्णी यांनी गुरुवार, 19/11/2015 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
सरकारने कोणाचे स्मारक उभारावे याबाबतचे निकष कोणते? स्मारकातील सरकारच्या सहभागामुळे गुंडगिरीला व असभ्यपणाला जाहीर प्रतिष्ठा . . . दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन नुकताच झाला. त्यानिमित्ताने त्यांच्या स्मारकासाठीच्या ठिकाणाची घोषणा झाली. मुंबईतील महापौरांचा आताचा बंगला असलेली वास्तु स्मारक म्हणून वापरले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या स्मारकामध्ये नक्की काय दाखवले जाईल याची उत्सुकता आहे. कारण त्यांच्या पक्षाची ना काही भूमिका, ना काही तत्वे, ना काही विचारधारा. जी तत्वे म्हणून जी दाखवली ती सतत बदलत राहिले. आधी मुंबईतले कम्युनिस्ट, मग लुंगीवाले मद्रासी, मग भैय्ये, मग मुसलमान, असा सतत कोणाचा ना कोणाचा तरी द्वेष करत राहून आपण मलई खात रहायचे यातच यांचे कौशल्य. यांना कायद्याचे राज्य मान्य नाही – कारण ते करतील तो न्याय ही त्यांची कायमची भूमिका. त्यांची भाषणे म्हणजे अगदी शिवराळ, सतत दुस-याच्या शारीरिक व्यंगावर बोट ठेवणारी. त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय वादग्रस्त आहे हे ध्यानात घेता कोणी त्याला ठाकरी शैली असे गोंडस नाव देणे म्हणजे असमंजसपणाची हद्द झाली. कारण मुळात ती अतिशय असभ्य शैली आहे. मशिदीतील कर्ण्याचा आवाज, नमाजादरम्यान रस्ते अडवले जाणे, वगैरे उपद्रवाच्या बाबतीत मुस्लिमांशी चर्चा करून मार्ग काढण्याचे सोडून महाआरतीसारखे उद्योग करून वातावारण तापवणे, ही यांची कामाची पद्धत. थोडक्यात, काही ना काही विषयावरून लोकांच्या भावना भडकावणे हा यांचा धंदा. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, मारहाण अशी गुंडगिरी करणे हा त्यांचा धंदा. तुमचा दाऊद तर आमचा गवळी अशी थोर विधाने करणे, एकीकडे पाश्चिमात्य संस्कृतीचे आक्रमण म्हणून व्हॅलेंटाइन डे ला विरोध करत त्यावरून आंदोलन करत असताना दुसरीकडे मायकेल जॅक्सनसारख्याचा कार्यक्रम आयोजित करणे, विरोधी मतदान केले म्हणून आपल्याच एका नगरसेवकाचा खून करणे हे यांचे लोकशाही उद्योग. हिंदुत्वाचे नारे देणा-या त्यांच्या पक्षाने एकदाही हिंदुत्व म्हणजे काय हे कधीही स्पष्ट केलेले नाही. त्यांनी स्वत:च स्वत:ला हिंदूहृदयसम्राट म्हणवून घेतले. स्वत:च स्वत:ला वाघ म्हणवून घेणे हा आणखी एक स्वत:चे कौतुक करून घेण्याचा विषय. हिंदुत्वाच्या गप्पा मारणा-यांनी किती दलितद्वेष केला, हे काय लपून राहिले आहे काय? दाउदसारख्याशी संबंध असणा-या मियांदादला थेट घरी बोलावून तो क्रिकेटवर चर्चा करण्यास आल्याचे भासवण्याचे यांचे देशप्रेमी उद्योगही आपण पाहिलेत. संजय दत्तसारख्या गुन्हेगाराला जाहिरपणे संरक्षण देण्याचे त्यांचे उद्योग तर सर्वांनीच पाहिलेत. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तर वृत्तपत्रातील त्यांच्या एका लेखात संजय दत्तवरील आरोप कमी तीव्रतेचे करावेत व तो निर्दोष सुटण्यासाठी थेट यांच्याकडूनच कसा दबाव आला याबद्दलही सविस्तार लिहिले आहे. शिवाजीच्या पवित्र नावाने स्थापन केलेली संघटना ५% समाजसेवा व बाकी सारा आपला मेवा या पद्धतीने चालवणा-या. देशद्रोहासारखी, संघटित गुन्हेगारीसारखी कृत्ये करणा-यांना पाठिंबा दिला. शिवाजीचे नाव वापरून, भगवा झेंडा वापरुन आणि स्वत: भगवे घालून त्याच्याआड खंडणीखोरीचे उद्योग करून त्यांनी लोकांना मूर्ख बनवले इतकेच नाही, तर हिंदुत्वाचाही अपमान केला. मुंबईला दंगलीला थेट जबाबदारी असल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे. निवडणुकीतल्या भ्रष्ट प्रचारामुळे थेट सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला. आजवर अशी शिक्षा झालेले ते एकमेव असावेत. एन्रॉनसारख्या भ्रष्ट कंपनीला आधी शक्य तितका विरोध करून सत्तेवर आल्यावर त्यांच्या अधिका-यांना घरी बोलावून त्या कंपनीला पावन करून घेणे याचा अर्थ कळत का नाही आपल्याला? वर उल्लेख केल्याप्रमाणे ५% समाजसेवेच्या अंतर्गत रक्तदानशिबीरे, रूग्णवाहिकांची सोय करणे वगैरेमुळे लोकांची सहानुभूती मिळवणे व तिच्याआड सदैव वर उल्लेख केलेले उद्योग करत राहणे ही यांची कार्यपद्धती. सगळे करून सवरून त्याची जबाबदारी घ्यायला नको म्हणून कोणतेही अधिकारपद न घेता बाहेरून नियंत्रण ठेवण्याची यांची कार्यपद्धतीही आता परिचित झालेली आहे. यांच्याबद्दल काही बोलून त्यांची नाराजी पत्करायला नको म्हणून तेंडुलकर ते मंगेशकर ते बच्चन यांनी त्यांना भेटायचे, परंतु त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अवाक्षरही काढायचे नाही, असा यांचा भेकडपणा. आपल्या इभ्रतीला धक्का लागू नये म्हणून कोणाला भेटायचे, कोणाला नाही याबाबतीत सावध असणा-या या मोठ्या लोकांनी याबाबतीत मात्र अपवाद करायचा. आता महापौर बंगल्याची जागा त्यांच्या स्मारकासाठी वापरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हे स्मारक पब्लिक ट्रस्टच्या माध्यमातून उभारले जाणार आहे. मुळात अशा वादग्रस्त व्यक्तीच्या स्मारकासाठी सरकारने जमीन देण्याचे, प्रयत्न करण्याचे कारण काय? या निर्णयासाठी कोणते निकष लावण्यात आले आहेत? महापौर बंगल्याची जागा कमी पडते म्हणून की काय, इंदू मिलसारखी मोठी जागा हवी अशी मागणी राज ठाकरे करत आहेत. जणू सरकारी जागा म्हणजे आपल्या xxxची जागा असा यांचा समज दिसतो. यांचे कर्तृत्व काय आणि आपण मागतोय काय, याचा साधा विचारही नाही आणि चालले इंदू मिलएवढी जागा मागायला. शिवसेनेला स्वत: कोठली जागा विकत घेऊन त्यांच्या नेत्याचे स्मारक उभारण्यास कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. मात्र त्यात सरकारचा वा सरकारी मदतीचा अजिबात सहभाग नको. त्यांच्या स्मारकासाठी जाहीर मदत करून कायद्याच्या राज्याला किंमत नाही असेच महाराष्ट्र सरकार अधोरेखीत करत आहे. भाजपला अजुनही शिवसेनेचे लोढणे गळ्यात बांधून घ्यायचे असेल, तर तसे त्यांनी जरूर करावे. पण सा-या राज्याला यांच्या दावणीला बांधून, सरकारी महसूल बुडवून, करदात्याचे पैसे खर्च करून वर बेकायदेशीरपणे वागण्याच्या वृत्तीला प्रोत्साहन देऊ नये एवढी साधी अपेक्षा.

वाचने 14562
प्रतिक्रिया 108

प्रतिक्रिया

In reply to by बॅटमॅन

ब्यॅट्या आणि मोगा यांचे एकमत??? पुर्वी असेच एकदा श्रीगुर्जी आणि दादूस (का मै) यांचे एकमत झालेले....फटू काढा रे कोणीतरी या प्रतिसादाचा =))

धागा टाकणारे मैदान सोडून पळाले. आत्ता सर्वधर्मसम्भाव वाले उत्तर देत् आहेत. इमाम भीखारी दिल्लीत राहून पाकिस्तानची भाषा बोलतो. त्याची व्यक्तत्त्वे हिन्दुविरोधी गरळ ओकतात् भारतातले असंख्य मुसलमान त्याचा शब्द प्रमाण मानतात. अशा माणसाकडे सोनिया गांधी निर्लजपणे मुस्लिमांची मते मागायला जातात. त्या बदल्यात बेकायदेशीर मशीदिना हात लावला जाणार नाही हे आश्वासन मिळते. भुकारी देखिल सर्व मुस्लिम मते आपल्या बापाची जागीर असल्याप्रमाणे आवाहन करतो. काय कारवाई केली हो या धर्मांधावर? मग बाळासाहेबानि हिंदुचि बाजू मांडली तर काय बिघडले? वर कोणीतरी दंगलीचे वर्णन केले आहे. जरा पोलीसांचे रेकॉर्ड तपासा मग कळेल दंगेखोर कोण आहेत ते. दंगलीचे कशाला गुन्हेगारीची रेकॉर्ड तपासा, टक्केवारी कोणाची जास्त आहे? दादा कोंडकेनि एक आठवण सांगितली आहे. हां किस्सा जुना आहे. तेव्हा मुंबईतील मराठी माणूस लालबाग परळ भागातून बहुसंख्येने होता. दादाचा सिनेमा म्हणजे महाराष्ट्रात १००% सुपरहिट . तेव्हा देखिल प्लाझा चित्रपटगृहाने दादाचा सोंगाड्या हा चित्रपट कबुल करुन देखिल दुसऱ्या चित्रपटासाठी वेळ दिला . दादानी बाळासाहेबाकडे दाद मागितली. साहेबानीच न्याय मिळवून दिला. गोष्ट छोटीशी वाटेल पण जे फ़िल्म इंडस्ट्रीत आत्ता काम करत आहेत त्यांना विचारा की जी जूनियर आर्टिस्ट जी संगठना आहे जी जास्त करून बाहेरच्या राज्यातील आहे ते मराठी निर्मात्याना कसे नडतात ते?

In reply to by भंकस बाबा

बुखारीना सोनिया , कंऑग्रेस याप्रमाणे मोदी अडवानी भाजपी भेटतात. वोट ब्यान्क व गुरुकृपा सार्‍य्नाच हवी असातॅ .... बुखारी पाकची भाषा करत्सत. तर तुम्हीही अखंड हिंदुस्तानची भाशा कraa.. कोण अडवलय का तुम्हाला ? कृण्वन्तु विश्वम आर्यम .. शुभेच्छा ! ..... राजकारणी लोक आपल्या गटातील maaÑasaalaa मदत करतात. जशी साहेबानी दादाना मदत केली तसे इतर पुढारीही karàtaat. ....... मूळात हा विषाय एक खिचडी आहे. १. बाळासाहेब महान होते का ? २. त्यांचे स्मारक होणे योग्य आहे का ? ३. त्यांचे स्मारक महापौर बंगल्यात व्हावे का ? याची हो हो हो , ना ना ना , हो हो ना , हो ना ना अशी अनेक उत्तर निघु शकतात. हो हो हो वाल्यानी एकही उत्तर ना असलेल्याना लगेच पाकिस्तानात ढकलू नये. तसेही इथल्या कौलावर ते स्मारक होणे न होणे अबलंबून नाही.

In reply to by भंकस बाबा

इमाम भीखारी दिल्लीत राहून पाकिस्तानची भाषा बोलतो. त्याची व्यक्तत्त्वे हिन्दुविरोधी गरळ ओकतात् भारतातले असंख्य मुसलमान त्याचा शब्द प्रमाण मानतात. अशा माणसाकडे सोनिया गांधी निर्लजपणे मुस्लिमांची मते मागायला जातात......
पटवून देताना विषय खुपच भरकटला गेला आहे तुमचा. मुळात कुठला पक्ष-धर्म श्रेष्ठ आणि कुठला नाही- असा हा वादच नाही. आणि खरं सागायच तर कोणताही पक्ष उदारवादी वगैरे नसतोच. आपला स्वार्थ जिथे असेल तिथेच आणि तोच मुद्दा तो बरोबर खुबीने घेत असतो. "आणि माझ्या मते तर- कुठलाही राजकिय पक्ष कधीच विश्वासपात्र नसतो!"
बाळासाहेबानि हिंदुचि बाजू मांडली तर काय बिघडले?
काहीच बिघडलं नाही, पण ते करताना- कारण नसताना, हिंदूंना मुसलमानाविरुद्ध भडकवणे आणि बाबरी मस्जिद पाडायला लावणे ही कुठची आणि कुणाच्या हीताची गोष्ट म्हणायची? पहिल्यांदा तर आपली राजकिय पोळी भाजण्यासाठी इतर हिंदूंना भडकवून बाबरी मस्जिद पाडायला लावली- छाती ठोकून "बाबरी मस्जिद पाडायला सर्वात पुढे शिवसेनेची लोकं होती" असं सांगितलं आणि नंतर दंगल होऊन सगळं अंगावर यायला लागल्यावर तेच वाक्य झटक्यावर बदललं!!-"नाही-नाही मी तसं म्हणालोच नव्हतो- मी म्हणालो होतो बाबरी मस्जिद पाडायला गेलेली शिवसेनेची लोकं नव्हती!"???? हसावं कि रडावं असल्या विधानावर? आणि महाशय- दंगलीबद्दल कसल्या कागदपत्रांच्या गोष्टी करताय तुंम्ही? आत्ता सरकारी कागदोपत्री झालेल्या किती गोष्टी सत्यात आलेल्या दिसत आहेत तुंम्हाला? कि अजुनही सरकारी आणि पोलिसी रेकॉर्ड- कागदपत्रांवर तुमचा गाढ विश्वास आहे? म्हणजे ज्यांनी ते जवळून बघितलं अनुभवलं ते खोटं आणि कागदोपत्री जे नमुद झालं ते खरं का? आणि जर फक्त त्या कागदपत्रांचा आधार घेऊन तुंम्ही हे सांगत असाल, तर तुंम्हाला कॄषीमंत्र्यांची उपमा का देण्यात येऊ नये? त्यांनीही मधे- जमवलेल्या 'कागदपत्रांच्या' आधारेच "शेतकरी हा वैयक्तिक प्रेमप्रकरणातून आत्महत्या करतो" असे विधान केले होते!
गुन्हेगारीची रेकॉर्ड तपासा, टक्केवारी कोणाची जास्त आहे?
अहो इथे काय गुणवत्ता तपासायची आहे का टक्केवारी काढून? ते श्रेष्ठ कि आंम्ही श्रेष्ठ? जर समजा, एखादवेळी हिंदूच्या एखाद्या पवित्र मंदीराबरोबर मुसलमानांनी गैरव्यवहार केला तर तुंम्ही गप्प बसाल का? आणि महत्त्वाचा मुद्दा कि- त्यावेळीही तुंम्ही हीच टक्केवारी विचारात घ्याल का? नक्कीच नाही! कारण त्यावेळी तुमचा एकच प्रश्न असेल- "आधी सुरवात कोणी केली?" आता दादाकोंडके मराठी होते म्हणून ठाकरेंनी त्याला मदत केली असं तुमचं मत एकदम निष्ठेने मान्य केलं तर, मग मला फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्या- मागे गोधरा हत्याकांडात ठाकरेंनी मोदींना मदत केली होती- त्यातून भाजपला त्यांनीच तारलं होतं, तर मग मोदी हे कुठल्या आणि कसल्या अ‍ॅ॓गलने मराठी आहेत हो??? -कॄ. ह. घ्या अवांतर- डोळ्यांवरची पट्टी काढा- तुंम्हाला सगळ्याच राजकिय पक्षांची सत्यता दिसेल! :)

In reply to by अन्नू

बाबरी मशीदिवर बोलाल तर पुरातत्व खात्याने तिथे राममंदिर होते असा निर्वाळा दिला आहे. हे आमच्यावर झालेले आक्रमण आहे हे सांगायला बहुसंख्य हिंदुना उणिपुरी ४००वर्षे जाऊ देऊ लागतात. इमाम ओकारी बद्दल त्याचा एक वीडियो मधे वायरल झाला होता. एका मुस्लिम पत्रकाराने भर सभेत त्यांना विचारले की बाबरीनाम्यामधे जर रामजन्मभूमि ही हिंन्दूचि जागा असेल तर ती त्यांना द्यायला काय हरकत आहे? यानंतर भुकारीने गोंधळ घातला तो अभूतपूर्व होता. अगदी प्रवीण तोगड़िया, साक्षी महाराज, योगी आदित्यनाथ, साध्वी प्रग्न्या यांना तुम्ही संत म्हणाल असा. बाळा साहेबानी केलेले वक्तव्य हे होते की बाबरी मशिद तोडणारे जर शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. तुम्ही वडाची साल पिंपळाला लावत आहात. हां प्रश्न मी आधी पण अनेक प्रतिसादावर विचारला आहे. कोणीही समाधानकारक उत्तर देऊ शकलेले नाही. तुम्ही मुस्लिम वस्तीत रहाता काय? मी राहतो . माझ्या आसपासचे मुस्लिम जीवाला जिव देणारे आहेत. मला असे प्रेम मी जेव्हा हिन्दू वस्तीत राहात होतो तेव्हा पण मिळाले नव्हते. पण जेव्हा धर्माचा विचार होतो तेव्हा मात्र हे गरळ ओकतात. तुम्ही जराशि टिंगल करा तुम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली जाते . पण स्वतः मात्र खुशाल हिंदू देवदेवताची खिल्ली उडवतात. हुसैन ची चित्र बघितलि की तुम्हाला कल्पना येईल. किती सेक्युलर म्हणवण्यार्या नेत्यांनी हुस्सैन चा विरोध केला? बाळा साहेबानि नेमके या मार खाण्याऱ्या हिन्दुला एकत्र केले. स्वतः हुन हल्ला करायचा नाही पण अंगावर आल्यावर शिंगावर घेतल्याशिवाय सोडायचे नाही. मराठीची बाजू घेतली म्हणुन बाळासाहेंबावर टिका होते. भारततल्या कोणत्या राज्यांत प्रांतीय भाषेची अस्मिता जपली जाट नाही? दक्षिण भारतात तर विंगर्जित बोलतील पण हिंदी बोलणार नाही. आपले मराठी जिथे जातात तेथील संस्कृति आपली म्हणतात पण आपल्याकडे आलेले परप्रांतीय आपले ते दुसर्यावर लादन्याचे प्रयत्न करतात. उदा. लग्नसभारम्भ, बारसे या प्रसंगी हिजड़े नाचवणे ही परप्रांतीय प्रथा पण आता ती आपल्यावर बेमालूम पणे लादली गेली आहे. पैसे द्यायला नाही म्हणा बघा कसे हैदोस घालतात ते? गोधरा हत्याकांड नव्हे गुजरात दंगल. मोदींना सुप्रीम कोर्टाने क्लीन चीट दिली आहे. तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या वर आहात काय? मुंबई दंगलीचि प्रतिक्षिप्त क्रिया म्हणुन मुंबईत ब्लास्ट घड़वण्यात आले . हे निर्लज्ज उद्दगार मुस्लिम नेते आजवर काढत आले आहेत. याकूब मेमेनच्या फाशीच्या वेळी काय अकांडताण्डव केले हे पण सर्वानी बघितले. तरिही तुम्ही बोलता की हिंदुना भड़कवले जाते म्हणुन? प्रेमाचा,अहिंसेचा सन्देश घेऊन आलेला बौद्ध धर्म एके काळी अफ़ग़ानिस्तान पासून पार खाली कम्बोडिया पर्यन्त पसरला होता. मुस्लिम आक्रमकानि पूर्व आशिया कड़े रोख वळवल्यावर त्या धर्माची दाणादान उडाली. हिन्दुनि प्रतिकार केला ते टिकले. हा आता तुम्हाला बांगाच् ऐकयच्या असतील तर काही हरकत नाही.

In reply to by भंकस बाबा

बाबरी मशीदिवर बोलाल तर पुरातत्व खात्याने तिथे राममंदिर होते असा निर्वाळा दिला आहे.
ह्यावर काही दुवा असल्यास देणे, वाचायला आवडेल ह्या विषयावर अजुन. शिवाय बॅटमॅन अन प्रचेतस ह्यांची मते सुद्धा वाचायला आवड़तील

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

राममंदिर होते की नाही ते माहीत नाही. पण कुठले तरी मंदिर शिव / विष्णू चे नक्कीच असावे. बाबराने तिथली असंख्य मंदिरे पाडून तिथे मशिदी उभारल्या होत्या ह्यात काहीच वाद नाही. तसे रामाचे दैवतीकरण फार उशिरा झाले. रामाची स्वतंत्र अशी मंदिरे १२ व्या शतकानंतरचीच दिसतात. रामायणातील प्रसंग मात्र मंदिर पट्टीकांवर कोरलेले बर्‍याच ठिकाणी दिसतात.

In reply to by प्रचेतस

मुळात विष्णु मंदिर किंवा गरुड़ खांब किंवा गणेश पुजा ही उत्तरगुप्त काळात सुरु झाली होती असे बहुतेक के कृष्णा रेड्डी का व्ही डी महाजन मधे वाचल्याचे स्मरते, ह्यावर काही प्रकाश टाकता येईल का प्रचेतस जी?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

एकूणातच मंदिर उभारण्याची पद्धत इस. १ /२ शतकात सुरु झाली. बेसनगरचा हेलिओडोरसचा गरुडस्तंभ इस.पू २ र्‍या शतकातला आहे जो भागवदधर्माची महती सांगतो. त्यामुळे रूढार्थाने पूजा तेव्हापासूनच सुरु झाली ह्यात काहीच शंका नाही. गणेशपूजन मात्र उत्तरगुप्त काळातच सुरु झाले.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

उत्खननात तिथे १०-११व्या शतकातल्या मंदिराचे अवशेष सापडलेत इतके मात्र खरे आहे. बाकी डीटेल्स विसरलोय अता.

In reply to by बॅटमॅन

त्खननात तिथे १०-११व्या शतकातल्या मंदिराचे अवशेष सापडलेत इतके मात्र खरे आहे.
१६ व्या शतकाच्या, मुघल शासक बाबर च्या कालखंडाच्या दरम्यानच, तुलसीदास यांनी रामायण लिहिले, पण त्यात कुठेही त्यांनी राममंदिराचा उल्लेख केलेला नाही, जर अयोध्येत खरंच राममंदिर असते, की जे बाबराने फोडल्याचा दावा केला जातो, तर तुलसीदासांनी त्या राममंदिराचा उल्लेख नक्कीच केला असता, वाटते.

In reply to by भंकस बाबा

राजेशाहीच्या काळात बाबराने युद्ध करुन जी जमीन जिंकली तिच्यावरील वास्तूम्चे काय करायचे हे तोच ठरवणार ना ? तेंव्हा गप्पगुमान बसलेले लोक आता लोकशाहीच्या काळात हा हिशेब सेटल करु शकतात हे पाहून मौज वाटली. .... ४०० वर्षापुर्वीचे कारण दाखवून मशीद पाडली तर तो कार्यकारणभाव मान्य होतो. पण दोन चार वर्षापुर्वी मशीद पाडली म्हणून बाँब उडला तर तो कार्यकारणभाव मान्य होत नाही. .....

In reply to by मोगा

राजेशाही च्या काळात थोरल्या राजांनी अफज़ल खान फाड़ला अन मुंडके पुरले, तेव्हा त्याचे आज काय करायचे हे राजेंची जनता अन किल्ल्याचे मालक असलेले छत्रपती ठरवनार न? काहिशे वर्ष पूर्वीच्या कार्यकारण भावानुरूप (इस्लाम ला मान्य नसतानाही) मजार अन थड़ग्याची पूजा चालते पण त्या थड़ग्याचे काय करायचे हा प्रश्न राजांच्या वंशजांनी ठरवतो म्हणले की जाळपोळ सुरु!

In reply to by मोगा

मोगाजि किती निर्लज्ज पणाचे उत्तर आहे तुमचे! मशिद पाडली कारसेवकानी , लोकांचे संसार उध्वस्त केले नाही. तुम्ही दाऊदचे समर्थन करत आहात. हे मत माझे नाही तुमचा प्रतिसाद असे सांगतो. शिवाजी महाराजांची अफझलखानाची कबर बांधन्याची कृति ही त्यांच्या गनिमि काव्याला अनुसरुन होती. महाराजांनी अफझलखानाचे मुंडके भाल्यावर टोचुन विजयी मिरवणुक काढली असती तर इस्लाम खतरे में ची आरोळी मारून सर्व मुस्लिम राजवट रांगायला लागलेल्या स्वराज्यावर तुटून पडली असति. शिया असलेल्या आदिलशाही विरुद्ध महाराजानी असे काही दावपेच लढवले की सुन्नी मुघल यापासून दूर राहिले. राहता राहिले अफझलखानाची कबर, तुम्ही प्रतापगड़ावर गेला आहत काय? जाऊन बघा , महाराजानी कब्रिसाठी जागां दिली होती दर्ग्या साठी नाही. मी स्वतः तीथे मुस्लिम लोकांना नमाज पड़ताना बघितले आहे म्हणजे ४०० वर्षांनंतर क्रूरकर्मा असलेला खान बाबा बनला काय? हाच नियम जर लावला तर कसाब व् अफझल गुरु पण ४००वर्षांनंतर पूजले जातील. कारण पाकिस्तानच्या मते ते तर हीरो आहेत ना?

In reply to by भंकस बाबा

कारसेवकानी माणसे मारली नाहीत म्हणून त्यांचे मशीद पाडणे जस्टिफाइड कसे ठरते म्हणे ? अफ्जलखानाची कबर बांधण्यामागे सहिष्णुता वगैरे काही नसून ती एक राजकीय खेळी होती , असे तुम्हाला सुचवायचे आहे का ?

In reply to by मोगा

काश्मीर मधे हिंदुना हो हिंदुना ते फ़क्त हिन्दू आहेत म्हणुन पळवून लावले जाते, विचार करा ते काही उपरे नाही तर वर्षानुवर्षे त्यांच्या अनेक पिढ्या तिथे नांदल्या. नेसत्या वस्त्राणिशि बाहेर पडलेल्या त्या कश्मीरी पण्डिताचा टाहो कोणी नाही ऐकला. हजारो नाही लाखो! आणि इतिहास सांगतो आहे की बाबराने मंदिर पाडून मशीदि बांधल्या ,तरिही त्या पडल्याबद्दल इतका टाहो? ती पण एकच मशिद!हजारो काश्मिरी पण्डिताचे शिरकान , शेकड्यांने केलेले बलात्कार हे सर्व विसरयायचे राव , बाबरी मशिद तेवढी लक्षात ठेवायची. हिन्दू मार खान्यासाठी जन्माला आले आहेत, थोडेसे धर्मान्तरित झाले तर काय बिघड़ल, ठाकरेनी मात्र सयंम बाळगायचा, वा मोगाजी वा बाकी मी मशिद पाडण्याचे समर्थन केले आणि करिन. आता तुम्ही काय कराल? बॉम्ब स्फोटाचे समर्थन?

In reply to by भंकस बाबा

बाबराने मंदीर पाडून मशिद बांधली. त्याचा ती मशिद पाडून तुम्ही जो बदला घेतला गेला त्याचे समर्थन करताय. आता लाखो कशमिरी पंडीत निर्वासित झाले, बलात्कार झाले त्याचा तसाच बदला घेण्याबद्दल समर्थन कराल का?

In reply to by संदीप डांगे

पण मी हिंदू संस्कृति मानतो. बलात्काराला बलात्कार हे समीकरण मी कधीच मानणार नाही. तशी शिकवण नाही दिली मला माझ्या आईवडिलांनी. विचार करा हे जे निर्वासित झाले त्यांनी पुष्कळसे स्वताला सावरले, जर हिंदू नेत्यांनी अतेरेकि शिकवण दिली असती तर ह्यांना मानवी बॉम्ब बनायला वेळ लागला नसता. बाळासाहेबानी देखिल हेच सांगितले . बाकि तुम्ही तुम्हाला दुसर्याला जे बनवायचे आहे ते बनवून मोकळे होता . तो धागावाला कुठे गेला? मला वाटते पुण्यातील सदाशिवपेठेत् राहणारा हा सातवी फ चा विद्यार्थी असावा , शाळा सुरु झाली ना, आता गृहपाठ करायचा असेल?

In reply to by भंकस बाबा

नाही हो. मशीद पाडून मंदीर बनवायचे होते असे आम्ही जीव मुठीत धरून बसलो होतो तेव्हा ऐकले होते. लोक सत्तेचे सोपान चढले मंदीराचे आमिष दाखवून. पुढे मंदीराचे काय झाले ते कळले नाही. काही माहित आहे का तुम्हाला...? असो, विषय मोठा आणि नेहमीचाच आहे. बाबरी पाडण्याचं समर्थन करणारे भेटले की जुन्या आठवणी आणि प्रश्न जागतात. कश्मिरी पंडीतांना परत कश्मिरमधे कधी पाठवताय बाकी...?

In reply to by मोगा

पण दोन चार वर्षापुर्वी मशीद पाडली म्हणून बाँब उडला तर तो कार्यकारणभाव मान्य होत नाही.
बाकी जाऊंदे पण तुम्ही आता दाऊदला/दहशतवादाला डिफेंड करताय.

In reply to by शलभ

मी मशीदही पाडली नाही व बाँबही उडवला नाही. या दोन्ही पार्ट्या कशा डिफेन्स करत आहेत ते मी फक्त लिहिले. त्ञो तुमचा संजय , आधी याने त्याला कसा मारला हे बोलुन मग त्याने याला कसा मारला हे बोलायचा , तसे. ... तटस्थ मोगा उवाच !

(माझ्या लेखाचा प्रतिवाद करायचा प्रयत्न तर तुम्ही केलात. पण दुर्दैवाने एकाही मुद्द्याचे उत्तर तुम्ही देऊ शकत नाही हे दिसले. उलट भलत्याच गोष्टींचे समर्थन करण्याच्या नादात तुम्ही वहावत गेला आहात)सगळे तुम्हीच ठरविणार का? बॉल माझा, ब्याट माझी मग मीच ठरविणार मी आऊट कि नाही सगळे माझेच खरे...... (ते गुलाम अली बिचारे गायक, त्यांना तुम्ही भारतात गाऊही देत नाही ) मग तुमचे काय मत आहे यांचा कार्याक्रम शहीद जवानाच्या माता-भगिनीनच्या मनोरंजना साठी ठेवायचा का ? तुम्ही शिवसेनेला विरोध करता करता तुम्ही पापिस्तानला सपोर्ट करायला लागलात. तुम्ही किती वाहत गेलात ते बघा जरा .... वायफळ बडबड बंद करा आता ....

बिचारा गुलाम अली एक गायक
बिचार्या ग़ुलाम अलीचा एक किस्सा, एकदा हा खाल्ल्या इंडस्ट्री चे वासे मोजणारा कृतघ्न गवई पाकीस्तानहून भारताला येत होता तुमच्या सारख्या रासिकांना रिझवायला, तेव्हा त्याच्या शेजारी एक डिप्लोमेट बसला होता त्याच्यासमोर हा पंजाबी शेर भारतीय कसे बुळे अन बिना कण्याचे आहेत वगैरे वर्णन करू लागला, मुळात तो अधिकारी पाकिस्तानातल्या भारतीय वकिलाती चा अधिकारी होता पण ग़ज़लनवाज त्याला "अपनावाला" समजून तोंड ढीले सोडते झाले अन त्या अधिकाऱ्याने हसून विषय बंद केला, दिल्लीत आल्याबरोबर त्या अधिकाऱ्याने तातडीने ह्या हरामखोराची फ़ाइल मागवुन रेड मार्क शेरा लिहिला अन त्यानंतर बरीच वर्षे हे गवईबोवा भारतातून बॅन होते कारण विसाच मिळत नसे मुद्दा हा की हे पाजी म्हातारडे अजिबात बिचारे गायक वगैरे अजिबात नाही टिप :- गायकाची फ़क्त गायकी पहावी इतर पाहु नये वगैरे कृपया सांगु नये, अन त्यों थेरडा पाजी आहे म्हणुन सेना लै भारी आहे अश्यातला भाग नाही ती सुद्धा दिव्य लोकांचीच जत्रा आहे.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मुळात तो अधिकारी पाकिस्तानातल्या भारतीय वकिलाती चा अधिकारी होता पण ग़ज़लनवाज त्याला "अपनावाला" समजून तोंड ढीले सोडते झाले अन त्या अधिकाऱ्याने हसून विषय बंद केला,
ही कथा अजिबात पटत नाही आहे रे बापू. एक तर असे शेरे मारण्याआधी तो माणूस समोरच्याला नाव-गाव नाही विचारणार? त्या अधिकार्याची टी.व्ही.वर येऊन सरळ बोलायची हिम्मत आहे? आणी त्या अधिकार्याने उलटे सुनावले असेल तर प्रश्नच मिटला. आमचे अधिकारी 'मी साळसूद' हे दाखवायच्या प्रयत्नात असतात असे ह्यांचे मत.

कारण त्यांच्या पक्षाची ना काही भूमिका, ना काही तत्वे, ना काही विचारधारा.
योग्य बोललास रे राजेश.नातवंडांना शारदाश्रम्,बालमोहन ऐवजी बॉम्बे स्कॉटिशमध्ये घातल्याची बातमी वाचल्यावर शिवसेनेला मत देणे कायमचे बंद केले होते.असो.

लेखात मांडलेल्या बहुतांश मुद्यांशी सहमत आहे. शिवसेनेची स्थापना प्रबोधनकार ठाकरेंच्या हयातीत त्यांच्याच सांगण्यावरून मराठी माणसावरील अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी झाली. तेंव्हा 'शिवसेना ही समाजसेवी संघटना आहे' असे जाहिर करण्यात आले होते. 'शिवसेना कधीच राजकारणात पडणार नाही' अशी घोषणा प्रबोधनकारांनी केली होती. तसेच, मराठी माणसाची व्याख्या 'जी व्यक्ती २० किंवा त्याहून अधिक वर्षे महाराष्ट्रात आहे ती मराठी' अशी केली होती. नोकरीच्या मुद्द्यावर शिवसेनेने जे दाक्षिणात्यांवर विरोधाचे हत्यार उपसले होते ते योग्यच होते. त्या काळात शिवसेनेच्या सहाय्याने निरलॉन, क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज, गोदरेज, सिएट टायर्स, स्टेट बँक, अमेरिकन एक्स्प्रेस आदी आस्थापनांमध्ये मराठी माणसांची भरती सुरु झाली. एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज मध्ये ८० टक्के मराठी उमेदवारांना नोकरीचा अधिकार मिळाला. ह्या सर्व विधायक कार्यामागे शिवसेनाच होती. आणि त्यामुळे तत्कालीन बेकार मराठी तरूण शिवसेनेकडे आकृष्ट झाला. फुटपाथ वरती शिवसेना पुरस्कृत वडापावच्या गाड्या मराठी पोरांनी लावायला सुरुवात केली आणि कांही अंशी उद्योजकता मराठी माणसात रुजायला सुरुवात झाली. मराठी माणसाला हक्कांची जाणीव शिवसेनेने करून दिली. ह्या सर्वाचे योग्य ते श्रेय शिवसेनेला दिलेच पाहिजे. इथपर्यंत शिवसेना चांगली होती. लोकमानसात, खास करून मराठी मनांत, शिवसेनेला मानाचे स्थान होते. पुढे महाराष्ट्राच्या शासकिय कर्मचार्‍याच्या संपात शिवसेना तोंडघशी पडली. 'संप अयोग्य आहे मागे घ्या. तुमच्या मागण्या मान्य होणार नाहीत' असे संपकार्‍यांना बाळासाहेबांनी सुनविले होते आणि सरकारने संपकर्‍यांच्या सगळ्या मागण्या मान्य करून शासकिय कर्मचार्‍यांच्या मनांत शिवसेने बाबत दुरावा निर्माण केला आणि शिवसेनेचा एक मोठा मतदार गट तोडला. शिवसेनेच्या कुठल्याही दंगलीत समाजकंटकांनी दंगलीचा फायदा घेऊन (आणि शिवसैनिकांनी समाजकंटकांच्या नांवाचा फायदा घेऊन) दुकाने लुटली. वैयक्तिक हेवेदावे साधून घेतले, तोडफोड केली आणि शिवसेना बदनाम होत गेली. ह्याला वेळीच आवर घालण्याऐवजी बाळासाहेबांनी हिच पक्षाची ताकद बनविली आणि शिवसेनेला गुंडसेना हे नामाभिमान प्राप्त झाले. सभ्य आणि सारासार विचार करू शकणारा मध्यमवर्ग शिवसेनेपासून दूर जाऊ लागला. पुढे खंडणी शिकवण सुरु झाली. आणि त्यालाच महत्व प्राप्त होऊन शिवसेनेचे समाजकारण मागे पडत गेलं. 'शिवसेना कधीच राजकारणात पडणार नाही' ही प्रबोधनकारांची घोषणा केंव्हाच मागे पडून शिवसेना राजकारणात गळ्यापर्यंत बुडाली होती. मुसलमानांना, परप्रांतियांना विरोध करणार्‍या शिवसेनेत मुसलमानांचा आणि पारप्रांतियांचा प्रवेश झाला होता. पाणी बरेच गढूळले होते. पुढे प्रदेशस्तरावरून देशस्तरावर शिवसेना नेण्याच्या उद्देशाने भारतिय जनता पक्षाबरोबर हात मिळवणी केली आणि महाराष्ट्रात मराठी उद्योजकांच्या संधी डावलून उत्तरभारतिय उद्योजकांनी लहान मोठी सरकारी कामे मिळविण्यास सुरुवात केली. भारतिय जनता पक्षाशी केलेल्या राजकिय हातमिळवणीमुळे शिवसेनेला उत्तरभारतियांना विरोध करता येईना आणि शिवसेना 'मराठी माणसाची' उरली नाही. पण तो पर्यंत बरीच ताकद गोळा केली असल्यामुळे आता मराठी माणसाची गरजही उरली नव्हती. मग सुरू झाले राजकिय स्वार्थी डावपेच आणि अर्थकारण. शिवसेनाही एक स्वार्थी राजकिय पक्ष म्हणूनच उरला. मराठी माणसांची सहानुभूती गमावून बसला. शिवसेनेची सुरुवातीची आदर्श प्रतिमा १०-१५ वर्षांपेक्षा जास्त टिकली नाही. पण स्वार्थाने बरबटलेली बाजू जास्त प्रभावीपणे पुढे आली. बाळासाहेबांना मान होता तो त्यांच्या धाडसी वक्तव्यामुळे. तथाकथित 'ठाकरी शैली' समाजाच्या एका वर्गाने उचलून धरली, उदो उदो केला पण भडकाऊ भाषणाने निवडणूका जिंकता आल्या नाहीत. शेवटच्या निवडणूकीतही शिवसेनेला जनतेने नाकारले तेंव्हा आपले काय चुकले आहे ह्यावर विचार न करता 'मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसला' असे उद्वेगजनक उद्गार शिवसेनाप्रमुखांनी काढले. (नंतर सारवासारव केली). कुणाही राजकिय पुढार्‍यांचे स्मारक-पुतळे उभारू नयेत ह्या वैयक्तिक मताचा मी आहे. त्यातून दादर मधील एव्हढी मोठी जागा स्मारकाच्या नांवाखाली शिवसेनेच्या घशात ढकलणे मान्य होत नाही. उद्या बारामतीत पवार साह्बांचे मोठ्ठे स्मारक होईल, दादरमध्ये उद्धवजींचेही होईल आणि राज ठाकरेंचेही होईल. आमचा ह्या सर्वाला कितीही विरोध असला तरी आम्हाला विचारतो कोण? तेंव्हा जे चालले आहे ते पाहात राहणे एव्हढेच हातात आहे.

हुश्श्श……. झाला एकदाचा १०० नंबरी धागा… पदार्पणातच शतक मारल्याबद्दल अभिनंदन ना बाप्पू !!!

In reply to by जेपी

फुल्ल ट्यांक मारुन अनुमोदन... धागावाचनमात्र करावा. परत नेहमीचीच दळणे दळायला येण्याआधी कारण गिरणीमालक पदच्युत झाला आहे.