✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चहावाल्याचे पंख.....

श
शिव कन्या यांनी
गुरुवार, 11/19/2015 - 21:24  ·  लेख
लेख
चहावाल्याचे पंख..... काय करतो? ......... चहा विकतो. किती वर्षे झाली?........ चाळीसेक. वय?...... साठीपार. कर्ज?...... बरेच. कायमचे फेडतोय. कशासाठी काढलेय?........ फिरण्यासाठी आणि shortfilm बनविण्यासाठी. चौकोनी आयुष्य जगणाऱ्या मानसिकतेला अज्जिबात न पेलवणारा हा परिचय आहे श्री. हरि एम. मोहनन आणि त्यांची पत्नी मोहना यांचा! केरळातल्या एर्नाकुलम् येथे गेली चाळीसेक वर्षे चहाचे दुकान चालविणाऱ्या या दाम्पत्याचे भटकंतीचे वेड कुणालाही आश्चर्य चकित करते. हातात पैसे असूनही कधीही आपल्या गावाशहराची वेस न ओलांडणारे लोक आहेतच! पण पैपै जमा करून केवळ, देशातच नव्हे, तर देशोदेशी भटकंती करणाऱ्या या जोडप्याचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे. आजपर्यंत त्यांनी सुमारे सतरा देशांत भटकंती केली. त्यांत ईजिप्त, जोर्डन (Jordan ) सारखें मध्य पूर्वेतील, तर सिंगापूर, मलेशिया सारखे अतिपूर्वेकडील, युरोपातील सदैव हिटलिस्ट वर असणारे इंग्लंड, फ्रान्स, स्वित्झर्लंड, तर पार पलीकडे असणाऱ्या अमेरिकेचीही सफर त्यांनी केली. पैशाची जुळवाजुळव हा महत्वाचा मुद्दा! पण ते सांगतात, ‘पैसा लागतोच! पण त्याहून जास्त महत्वाचे एक भटके, स्वच्छंद मन पाहिजे, मग कुठलेही ठिकाण दूर वाटत नाही!’ दररोज तीनेकशे रुपयांची बचत करूनही पैशांची तजवीज होत नव्हतीच. मग त्यांनी वेळोवेळी कर्ज काढले. फिरून आलं, कि दोनतीन वर्षे चहा विकून ते कर्ज फेडायचं. परत पुढचं destination, पुढचा देश, परत कर्ज, परत कष्ट, परत कर्जफेड हे चक्र! पण त्याचा त्यांना बोजा वाटत नाही. कारण भटकंतीतून मिळणारा आनंद, समाधान त्यापेक्षा कितीतरी जास्त! जगण्याचे बळ फिरतीतून मिळवणाऱ्या या जोडीला, उतारवयात कुटुंबीय, मित्रमंडळींकडून शहाणपणाचे, बचतीचे, कर्ज न काढण्याचे अनेक सल्लेही मिळालेत. पण या सगळ्याला मागे टाकून त्यांचा पुढचा प्रवास चालूच आहे. आपला हा प्रवास अनेकानेक लोकांपर्यंत पोहचावा म्हणून या चिवट माणसाने एक shortfilm काढायचे ठरवले. अनेक नामांकित हस्तीपुढे प्रस्ताव ठेवला, पण प्रत्येकाने दहा मिनिटांची फिल्म तीन-चार मिनिटांची करा, असा सल्ला दिला. आता हातात पैसा नसताना, कुणाही सरळमार्गी माणसाने हा सल्ला ऐकला असता. पण मोहनन यांना ते काही पटले नाही. मग या माणसाने Copybook Films ही अशीच एक छोटीशी फिल्मसंस्था गाठून, स्वतःच दहाएक मिनिटांची Invisible Wings नावाची फिल्म अपार कष्टाने तयार केली. आणि मागील महिन्यात म्हणजेच १५ ऑक्टोबर, अब्दुल कलामांच्या जन्मदिनी रिलीज केली. ...... हा हा म्हणता नेटच्या जगतात ही फिल्म वाऱ्यासारखी पसरली... पसरत आहे.यातून कित्येक लोक प्रेरणा घेताहेत. पण त्यामुळे त्यांचे कर्ज काही फिटत नाही. तरीही त्यांची जिद्द अपरंपार आहे. ही फिल्म जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी, कळावी म्हणून ते ती निरनिराळ्या भाषांमध्ये डब करायच्या तयारीत आहेत. आणि हो, २०२० मध्ये आर्जेन्टिनाची सफर करायचा प्लानही तयार आहेच. जगण्याच्या धकाधकीत आपली स्वप्नं कधी विरून गेली कळतही नाही. असुरक्षिततेची भावना, भविष्याची चिंता आपल्याला सतत करकचून बांधून ठेवते. पण अशी माणसे आपल्या स्वप्नांसाठी सगळ्या परीस्थितीवर मात करत हसतमुखाने समोर येतात, तेव्हा आपली स्वप्ने किमान उचकटून तरी बघण्याची इच्छा निर्माण होते. मोहनन यांचे शब्द ‘It’s possible! It’s possible! It’s possible!’ , पुन्हा जगण्याचे, स्वप्नांचे नकाशे हातात घ्यायला भाग पाडतात. सामान्य माणसातील जिद्द, संघर्ष, आणि भटकंतीच्या या वेडाला सलाम! या विषयीच्या अनेक पोस्ट्स सोशल मिडीया वर आहेतच. फिल्मचा धागा.... https://www.youtube.com/watch?v=GdDl_YFfhwc
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
संस्कृती
समाज
जीवनमान
प्रवास
भूगोल
अर्थव्यवहार
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिसाद
अभिनंदन
प्रतिक्रिया
आस्वाद
माध्यमवेध
माहिती
संदर्भ
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
11465 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

वा! ताई अगदी वेगळाच विषय

मांत्रिक
गुरुवार, 11/19/2015 - 21:28 नवीन
वा! ताई अगदी वेगळाच विषय मांडलात. अगदी अवलिया कुटुंब आहे खरेच. ग्रेट अवलिया!!! नमस्कार त्यांना!!!
  • Log in or register to post comments

सलाम

ट्रेड मार्क
गुरुवार, 11/19/2015 - 21:39 नवीन
पूर्वी कधीतरी एकदा या जोडप्याबद्दल वाचलं होतं, पण आज जरा जास्त माहिती मिळाली. सवडीने तुनळी वरची फिल्म पण बघीन. खरंच आपण सगळे किती साचेबद्ध आयुष्य जगतो. स्वप्नं तर सगळेच बघतात परंतु ती पूर्ण करण्यासाठी केलेल्या कष्टाला सलाम!
  • Log in or register to post comments

+१

खेडूत
Fri, 11/20/2015 - 09:29 नवीन
+१ कुठे वाचलंय आठवत नाही. पण प्रेरणादायी. लेख आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

माहिती आवडली.

रेवती
गुरुवार, 11/19/2015 - 21:45 नवीन
माहिती आवडली.
  • Log in or register to post comments

वाह, मस्तं लेख. या

पद्मावति
गुरुवार, 11/19/2015 - 23:09 नवीन
वाह, मस्तं लेख. या जगावेगळ्या, मस्तं मौला जोडप्याची फारच सुंदर ओळख. लेख खूप आवडला.
  • Log in or register to post comments

माहितीबद्दल धन्यवाद....

मुक्त विहारि
गुरुवार, 11/19/2015 - 23:27 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद....
  • Log in or register to post comments

अस्सं कस्सं वागतात लोकं ? आँ

भाऊंचे भाऊ
गुरुवार, 11/19/2015 - 23:40 नवीन
अस्सं कस्सं वागतात लोकं ? आँ ?
  • Log in or register to post comments

थोडक्यात कांय !

पगला गजोधर
गुरुवार, 11/19/2015 - 23:43 नवीन
भारतातल्या चाहवाल्यांना विदेशदौरे आवडतात, आणि काहीही झालं तरी ते आपली हौस पूर्ण करतात.
  • Log in or register to post comments

+१

sagarpdy
Fri, 11/20/2015 - 10:58 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

मस्त!

रातराणी
Fri, 11/20/2015 - 00:19 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

छान माहिती!

रुपी
Fri, 11/20/2015 - 00:50 नवीन
छान माहिती!
  • Log in or register to post comments

मस्तं

सानिकास्वप्निल
Fri, 11/20/2015 - 05:00 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments

व्वा! त्या अवलिया जोडप्याचं

मितान
Fri, 11/20/2015 - 07:00 नवीन
व्वा! त्या अवलिया जोडप्याचं खूप कौतुक न हेवा वाटतोय !
  • Log in or register to post comments

खरचं कौतुक आहे या दांपत्याचं

इडली डोसा
Fri, 11/20/2015 - 07:57 नवीन
यांच्यावर हिंदुमधे एक लेख वाचल्याचं आठवतये. शिवाय परदेशातही अशी बरीच उदाहरणं दिसतात. हे कुटुंब बघा, बायको जर्नलिस्ट, नवरा फोटोग्राफर आणि दोन लहानग्या मुलींसोबत कसे बिनधास्त फिरतायेत. किती धाडस लागतं अश्या गोष्टी करायला. खरचं स्वप्नवत आहे यांच आयुष्य.
  • Log in or register to post comments

इडो ,वाचला लेख. सुंदर आहे

शिव कन्या
Fri, 11/20/2015 - 10:03 नवीन
इडो ,वाचला लेख. सुंदर आहे लहानग्यांची भटकंती पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इडली डोसा

एकच नंबर!!!

कैलासवासी सोन्याबापु
Fri, 11/20/2015 - 08:12 नवीन
एकच नंबर!!!
  • Log in or register to post comments

दुर्दम्य इछाशक्ती

अमृत
Fri, 11/20/2015 - 08:32 नवीन
हेही जरूर वाचा. आपल्या अमरावतीचे श्री लक्षमण राव जे दिल्लीला एक चहाचे दुकान चालवितात व त्यांनी २०पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. http://www.firstpost.com/living/new-delhis-famous-tea-seller-meet-laxman-rao-chaiwallah-day-author-night-2378024.html http://www.ndtv.com/delhi-news/meet-laxman-rao-tea-seller-novelist-and-student-1209455
  • Log in or register to post comments

अमृत, शेअरींग बद्दल धन्यवाद.

शिव कन्या
Fri, 11/20/2015 - 10:05 नवीन
अमृत, शेअरींग बद्दल धन्यवाद. खरोखर प्रेरणादायी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृत

काय विलक्षण जोडपं आहे

अजया
Fri, 11/20/2015 - 09:50 नवीन
काय विलक्षण जोडपं आहे.हिंडणभूल पडलेलं.आवडला लेख.
  • Log in or register to post comments

अजया, हिंडणभूल भारीय.:):)

शिव कन्या
Fri, 11/20/2015 - 10:06 नवीन
अजया, हिंडणभूल भारीय.:):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

वा!

मार्गी
Fri, 11/20/2015 - 13:07 नवीन
वा! अत्यंत प्रेरणादायी! धन्यवाद!! :)
  • Log in or register to post comments

मस्तच लेख!

बोका-ए-आझम
Fri, 11/20/2015 - 17:39 नवीन
प्रेरणादायी!
  • Log in or register to post comments

+१

मधुरा देशपांडे
Fri, 11/20/2015 - 17:53 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

मस्त लेख ! एखादं वेड

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 11/20/2015 - 19:48 नवीन
मस्त लेख ! एखादं वेड माणसाच्या डोक्यात असायला पाहिजेच... पण आपले वेड प्रत्यक्षात आणण्यासाठी पाहिजे ती खटपट करायची चिकाटी जास्त महत्वाची ! भटक्या जोडगोळीला __/\__ आणि पुढच्या अनेक भटकंतींसाठी शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

मस्त लेख ...

अभिजीत अवलिया
Sat, 11/21/2015 - 21:59 नवीन
मस्त लेख ...
  • Log in or register to post comments

हौसेला नसते मोल

मयुरMK
Sun, 11/22/2015 - 13:43 नवीन
हौसेपोटी कोण काय करेल सांगता येत नाही. लेख आवडला पण मला पण भटकायला आवडते पण . मोकळा तरी मुक्त मी . हा ही ओळ चपखल बसते .
  • Log in or register to post comments

मोकळा तरी ना मुक्त मी आस

मयुरMK
Sun, 11/22/2015 - 13:45 नवीन
मोकळा तरी ना मुक्त मी आस म्हनायच आहे
  • Log in or register to post comments

भारीये

चाणक्य
Sun, 11/22/2015 - 13:58 नवीन
भारीये.
  • Log in or register to post comments

शिवकन्या जी

मारवा
Sun, 11/22/2015 - 14:25 नवीन
धागा फार आवडला पॅशन इज ऑल पुन्हा प्रत्यय आला.
  • Log in or register to post comments

विलक्षण!

पैसा
Sun, 11/22/2015 - 16:06 नवीन
आणि साध्या साध्या अडचणींचा बाऊ करणारे आपण!
  • Log in or register to post comments

त्रिवार मुजरा या दंपतीला...

विशाल कुलकर्णी
Sun, 11/22/2015 - 17:09 नवीन
त्रिवार मुजरा या दंपतीला... माहीतीसाठी धन्यवाद _/\_
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा