चित्रपट
कार्तिकेय २
या सिनेमाविषयी बरीच चर्चा होत नाही. थोड्यफार लोकांचे मत असे आहे - कमी खर्चात बनवलेला चांगला चित्रपट आहे. श्रीकृष्ण या गोष्टीभोवती फिरणारा आहे. मिथकं, वैज्ञानिकता यांचा रोचक पटेल असा संगम आहे. टिपीकल देमारधाड नाही की फुकटचा रोमान्स नाही. उत्तम रिसर्च केलेला आहे.
इथल्या कुणी पाहिला असल्यास कसा वाटला ते कळवावे.
सिनेमे
(मी भरपूर सिनेमे पाहतो. नवे सिनेमे क्वचित पाहतो, मुख्यत्वे बॅकलॉग भरण्यावर भर असतो. इथे त्यांची नोंद ठेवणार.)
गुड टाईम (२०१७)
कथा- दोन भाऊ- कॉनी आणि निक, निक (धाकटा) मेंटली चॅलेंज्ड असतो. निकचे समुपदेशन चालू असताना कॉनी येऊन समुपदेशकांना खवचट कुजकट बोलत निकला घेऊन जातो- आणि त्याला घेऊन तो एक बँक लुटतो. त्याचा लुटीचा प्लॅन बऱ्यापैकी यशस्वी झाला असतो पण काही अडचणी येऊन ओम फस होते.
पंचमदाच्या गाण्यांवरून घेतलेली चित्रपटांची नावे
करोना लॉकडाऊनमुळे मिपाकरांजवळ चिकार मोकळा वेळ असणार असे गृहीत धरून ही किंचितचर्चा सुरू करत आहे. प्रतिसादांतून ती पुढे न्यावी ही विनंती.
*******
पंचम (आर डी बर्मन)चे समकालीन असलेले लक्ष्मीकांत- प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी, राजेश रोशन, बप्पी लाहिरी हे (मोजकी काही गाणी वगळता) बरेचसे विस्मृतीत गेलेले आहेत. इतकेच काय, नंतरच्या जमान्यातील आनंद- मिलिंद, नदीम- श्रवण, आदेश श्रीवास्तव यांच्याशीही नव्या पिढीचे फार नाते जुळताना दिसत नाही (जतिन ललित आणि ए आर रहमान हे काहीसे अपवाद).
पंचमची असंख्य गाणी मात्र आजही आवडीने ऐकली जातात. आजच्या पिढीलाही ती कालबाह्य वाटत नाहीत.
अभी तो पार्टी शुरू हुई हैं ...
रामगढचे ते लहानसे रेल्वे स्टेशन. एकच प्लॅटफॉर्म!
ट्रेन मधून खाकी यूनिफॉर्म मधला एक माणूस उतरतो. त्याची वाट पाहत असलेला रामलाल या माणसाला घेऊन स्टेशनच्या बाहेर पडतो. दोघेही घोड्यावर बसून रामगढच्या दिशेने दौडत निघतात......
आणि बॅकग्राउंडला सुरू होते ते हिंदी चित्रपटांच्या आजवरच्या इतिहासातले एक अतिप्रचंड दिलखेचक, जबरदस्त पार्श्व संगीत.
गाण्यांपेक्षा कधी कधी बॅकग्राउंड स्कोर भाव खाऊन जातो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शोलेचा हा टायटल ट्रॅक. नेहमीप्रमाणे इथेही जूनियर बर्मनदा गाण्यांइतकाच पार्श्व संगीतातही जीव ओततात.
आता शोले हा चित्रपट!
गीत गाता चल (पण नक्की का..?)
भारतीय सिनेमाची पायाभरणी झाली, तेव्हापासून आजतागायत गाणी हा प्रत्येक चित्रपटाचा अविभाज्य भाग होऊन राहिलेला आहे. इतकेच नव्हे तर चित्रपटांची अख्खी बांधणी ही गाण्यांचे बिंदू पकडून अवतीभवती केली जाते. (इथे फक्त हिंदी सिनेमा नव्हे तर सर्वभाषिक भारतीय व्यावसायिक चित्रपट अभिप्रेत आहेत). हे भारतीय उपखंडाबाहेर कोणत्याच सिनेमा उद्योगात आढळत नाही. युरोपीय किंवा हॉलिवूड सिनेमात संगीताचा वापर केलेल्या चित्रपटाला 'म्युझिकल' असा वेगळा शब्द वापरतात. भारतीय सिनेमाला ही संकल्पना लागू होऊ शकत नाही.
असे का, हे कोडे मला अनेक वर्षांपासून छळत आलेले आहे.
बाजीराव मस्तानी: आमचेही सेन्सॉर!
मित्रहो, 'बाजीराव मस्तानी' आम्ही आज थेटरमधे जाऊन पाहिला. काही ब्रह्मवृंद या चित्रपटावर खप्पामर्जी असल्याचे जगजाहीर झाल्यामुळे आम्ही हा सिनेमा मुद्दाम एखाद्या स्वघोषित सेन्सॉरबोर्ड मेंबरच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला. सिनेमाबद्दल काही ठळक मुद्दे मनात नमूद झाले ते लिहीत आहे.
मुद्द्यांचे खास काही वर्गीकरण असे केलेले नाही.
1. सिनेमात बाजीराव, मस्तानी आणि काशी या तिन्ही मुख्य पात्रांना योग्य न्याय दिलेला आहे. किंबहुना काशी जबरदस्त भाव खाऊन जाते. तसेच बाजीरावाची आई, बंधू चिमाजी, छत्रपती शाहू यांचे चरित्रचित्रणही मजबूतपणे केलेले आहे.
स्टार वार्स!
गेल्या महिन्यात चित्रपट कोणता पहावा याविषयी माझ्या मित्रमंडळीमध्ये महायुद्ध झाले!
पक्ष होते बाजीराव मस्तानी व दिलवाले!
या वादाचे निवारण शेवटी तहात होऊन आधी बाजीराव मस्तानी व नंतर दिलवाले बघायचा असे ठरले.
मी मात्र तटस्थ राष्ट्रांप्रमाणे या युद्धात सहभागी झालो नाही!
कारण या दोन चित्रपटांपेक्षा माझ्याकडे वेगळा ऑप्शन होता!
२०० मिलियन डॉलर्सचा स्टार वार्स सेवेन!
१९७७ साली आलेल्या स्टार वार्स एपिसोड चार ने जगात हलकल्लोळ माजवला!
११ मिलियन डॉलर बजेट, आणि कमाई किती?
७०० मिलियन डॉलर!
यानंतर आलेल्या दोन्ही एपिसोडने असाच हलकल्लोळ माजवला.
८३ साली याचा शेवटचा भाग आला.
मात्र चाहते अत्यंत आतुरतेने पुढच्या भाग
पिंगा, बाजीराव मस्तानी, भन्साळी इत्यादी
पिंगा.
येऊ घातलेल्या बाजीराव मस्तानी या हिंदी चित्रपटातील हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रकशित झालं. या गाण्याविरोधातल्या पोस्ट्सनी कायप्पा, चेपूवर पिंगा घातलेला असताना, मिपावर धागारुपी पिंगा कसा झाला नाही या विचाराने डोक्यात पिंगा घालायच्या आत म्हटलं विषयास वाचा फोडू.
मी गाणं बघितलं. पेशवाई, बाजीराव पेशवे, मस्तानी, काशीबाई यांबद्दल मला जे कमीअधिक ज्ञान आहे, त्या आधारे मी म्हणतो, की हे गाणं म्हणजे अचरटपणा आहे.
हॉलीवुड
आपल्याला आवडलेल्या हॉलीवुड चित्रपटाविषयी सांगा.
माझा ओशियन्स ऐलेवन.
मिसळपाव