संतापजनक अनुभव
मलाच नाही तर अनेकांना मी नुकतीच ज्या अनुभवातून गेले त्याला समोरे जावे लागले असेल. रसभंग झाल्यानंतरच हा संताप होता. त्याबरोबरच आपण काहीच करु शकत नाही याची आगतीकताही होती. पांढरपेशा माणसांमधला कचखाऊपणा होता की आणखी काही पण मी त्यावेळी समोरच्यांवर जेव्हढी संतापले होते तेव्हढीच स्वतःवरही संतापले होते हे नक्की.
तुम्ही म्हणाल असे काय झाले. त्याची कथा अशी. पाडव्याच्या दिवशी मुंबईहून आलेल्या भाऊ आणि वहिनीसोबत मुंबई पुणे मुंबई २ हा चित्रपट पहाण्याचा कार्यक्रम ठरवला. उशीराचाच शो असल्याने घराजवळची टॉकीज निवडली. बरोब्बर पावणे दहा वाजता चित्रपटगृहात दाखल झालो. दिवाळीचे दिवस असल्याने रात्रीचा शोही हाऊसपुâल्ल होता. चांगल्या घरातील मंडळी सहकुटुंब चित्रपट पहायला आलेली दिसल्याने चला पब्लीक चांगली आहे असा विचार मनात येऊन गेला. पडद्यावर टायटल झळकू लागली. पहिल्या सीन नंतरच मागच्या रांगेत चुळबुळ सुरु झाली. तरुणांचे टोळके मागच्या रांगेत बसले होते. त्यांचे खुर्चीला मागून पाय लावणे, चित्रपटातील प्रसंगांवर उगाचच हसणे, कॉमेंट करणे असे चाळे सुरु झाले. त्यांच्याच बाजूला एक कुटुंब बसले होते. पतीने जागा बदलून पत्नीला मुलाच्या जागेवर बसवले तसे या टोळक्याने मोठ्याने हसणे सुरु केले. अखेर ते जोडपे पहिल्या पंधरा मिनीटातच चित्रपट अर्धवट टाकून निघून गेले.
चित्रपट जस जसा पुढे जाऊ लागला तस तसा या टोळक्याच्या गोंधळ वाढला. प्रत्येक डायलॉगवर त्यांच्या व्दिअर्थी कॉमेंट येऊ लागल्या तसे मला माझ्या भावासमोर आणखी ओशाळवाणे वाटू लागले. माझा संताप वाढू लागला तसा बाजूलाच बसलेल्या माझ्या मुलाने आई जाऊ दे म्हणत मला शांत करण्याचा प्रयत्न केला. आता या टोळक्याला चित्रपटगृहातील इतरत्र बसलेल्या काही तरुणांनी साथ द्यायला सुरुवात केली. चित्रपटगृहाच्या वेगवेगळया कोपऱ्यायातून स्पर्धा लागल्या तशा घाणेरड्या कॉमेंट सुरु झाल्या. सुशिक्षीत प्रेक्षकांना सर्व असह्य झाले. शेवटपर्यंत हा गोंधळ सुरु होता. चित्रपट नको पण प्रेक्षक आवर अशी आमची अवस्था झाली होती. अखेर चित्रपट संपला. लाईट लागले. मला संताप अनावर झाला होता. मी ताडकन उठले आणि गोंधळ घालणाऱ्या मागच्या रांगेतील तरुणांना धन्यवाद तुमच्यामुळे आम्हाला चित्रपटाचा आनंद घेता आला नाही असे बोलून गांधीगिरी करण्याचा प्रयत्न केला. मला साथ देण्यास काही जण पुढे आले त्यांनीही त्या मुलांना हात जोडून थँक्यू म्हटले. ते टोळके एवढे निगरगट्ट होते की त्यांनीही थँक्यू आंटी म्हटले. सर्वात जास्त धक्का बसला ते त्या मुलांचे चेहरे पाहून. कारण ते सर्व चेहरे उच्चभू्रघरातील, आणि सुशिक्षीत वाटत होते.
माझ्या सारखाच अनुभव अनेकांना आला असेल. त्यामुळेच मी माझा अनुभव शेअर केला आहे. इतरांनीही त्यांचे म्हणणे आवर्जून मांडावे.
वर्गीकरण
वाचने
22082
प्रतिक्रिया
116
मिसळपाव
प्रतिक्रिया
मॉडेल उत्तर येतात. त्यातलं
In reply to वाचकांची परीक्षा बघता का? by असंका
अरेरे...
In reply to मॉडेल उत्तर येतात. त्यातलं by असंका
संतापजनक अनुभव .. नाव पण अगदी
In reply to अरेरे... by वेल्लाभट
हहहाहाहा
In reply to संतापजनक अनुभव .. नाव पण अगदी by असंका
लोल. ती मॉडेल उत्तरं वाचून
In reply to मॉडेल उत्तर येतात. त्यातलं by असंका
=))
In reply to लोल. ती मॉडेल उत्तरं वाचून by आदूबाळ
ही मॉडेल उत्तरं काय भानगड आहे
In reply to =)) by असंका
संतापजनक अनुभव
In reply to त्यांना धडा मिळाला by pradnya deshpande
माकडांचा खेळ लावलाय का इथे ?
In reply to संतापजनक अनुभव by कपिलमुनी
माकडांचा खेळ लावलाय का इथे ?..म्हणून युती सरकार नंतर निवडून आले नाही...!!! =))धाग्याचा माकड होतोय का?
In reply to माकडांचा खेळ लावलाय का इथे ? by मोदक
माझा अनुभव थोडा वेगळा आहे
ह्यॅ , शक्यच नाही .
In reply to माझा अनुभव थोडा वेगळा आहे by याॅर्कर
प्रगो!!!
In reply to ह्यॅ , शक्यच नाही . by प्रसाद गोडबोले
दादा
In reply to प्रगो!!! by दिपक.कुवेत
आजकाल
=)) =)) =))
In reply to आजकाल by सिरुसेरि
=)) =)) =))
In reply to आजकाल by सिरुसेरि
पाने-वल्कलेंबाबत
In reply to =)) =)) =)) by प्रसाद गोडबोले
कपड्या-कपड्या नुसार न बदलणारा (आतला) नाखु
शी..... (आतला) नाखु काय???
In reply to पाने-वल्कलेंबाबत by नाखु
=))
In reply to शी..... (आतला) नाखु काय??? by दिपक.कुवेत
=)) =)) =))
In reply to आजकाल by सिरुसेरि
निषेध!!!
In reply to आजकाल by सिरुसेरि
आमचा अनुभव
साक्षर आणि सुशिक्षित यात फरक
हा लेख आणि टिप्पणी
प्रतिसाद आवडला नाही. -विका
In reply to हा लेख आणि टिप्पणी by आदिजोशी
ओके
In reply to प्रतिसाद आवडला नाही. -विका by pacificready
ऑह आय सी
In reply to ओके by आदिजोशी
:)))
In reply to ओके by आदिजोशी
आम्हि प्रेषितवाक्य लिहीलं
In reply to ओके by आदिजोशी
ओह्ह!
In reply to हा लेख आणि टिप्पणी by आदिजोशी
हात्तिच्या! आम्हाला
अच्छा
प्रतिसाद आवडला नाही. -विका
In reply to अच्छा by परिकथेतील राजकुमार
ओके
In reply to प्रतिसाद आवडला नाही. -विका by pacificready
'-विका' म्हण्जे काय?
In reply to प्रतिसाद आवडला नाही. -विका by pacificready
प्रतिसाद आवडला नाही विकून
In reply to '-विका' म्हण्जे काय? by पुष्करिणी
आम्हांला पण परिक्षा घेणारा
In reply to प्रतिसाद आवडला नाही विकून by आदिजोशी
कुणी विका घ्या कुणी मिका घ्या
In reply to प्रतिसाद आवडला नाही विकून by आदिजोशी
कोणी पिंगा ग पिंगा घ्या
In reply to कुणी विका घ्या कुणी मिका घ्या by pacificready
हि हि हाहा पत्रकार ना
अनुभव वाचुन अतिशय वाइट वाटले.
पडद्यावर बाई दिसली की लोक
धडा.
तुमच्या या अनुभवाचा संदर्भ
बंदी असताना १० नंतर प्रचंड