Skip to main content

संतापजनक अनुभव

लेखक pradnya deshpande यांनी सोमवार, 16/11/2015 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
संतापजनक अनुभव मलाच नाही तर अनेकांना मी नुकतीच ज्या अनुभवातून गेले त्याला समोरे जावे लागले असेल. रसभंग झाल्यानंतरच हा संताप होता. त्याबरोबरच आपण काहीच करु शकत नाही याची आगतीकताही होती. पांढरपेशा माणसांमधला कचखाऊपणा होता की आणखी काही पण मी त्यावेळी समोरच्यांवर जेव्हढी संतापले होते तेव्हढीच स्वतःवरही संतापले होते हे नक्की. तुम्ही म्हणाल असे काय झाले. त्याची कथा अशी. पाडव्याच्या दिवशी मुंबईहून आलेल्या भाऊ आणि वहिनीसोबत मुंबई पुणे मुंबई २ हा चित्रपट पहाण्याचा कार्यक्रम ठरवला. उशीराचाच शो असल्याने घराजवळची टॉकीज निवडली. बरोब्बर पावणे दहा वाजता चित्रपटगृहात दाखल झालो. दिवाळीचे दिवस असल्याने रात्रीचा शोही हाऊसपुâल्ल होता. चांगल्या घरातील मंडळी सहकुटुंब चित्रपट पहायला आलेली दिसल्याने चला पब्लीक चांगली आहे असा विचार मनात येऊन गेला. पडद्यावर टायटल झळकू लागली. पहिल्या सीन नंतरच मागच्या रांगेत चुळबुळ सुरु झाली. तरुणांचे टोळके मागच्या रांगेत बसले होते. त्यांचे खुर्चीला मागून पाय लावणे, चित्रपटातील प्रसंगांवर उगाचच हसणे, कॉमेंट करणे असे चाळे सुरु झाले. त्यांच्याच बाजूला एक कुटुंब बसले होते. पतीने जागा बदलून पत्नीला मुलाच्या जागेवर बसवले तसे या टोळक्याने मोठ्याने हसणे सुरु केले. अखेर ते जोडपे पहिल्या पंधरा मिनीटातच चित्रपट अर्धवट टाकून निघून गेले. चित्रपट जस जसा पुढे जाऊ लागला तस तसा या टोळक्याच्या गोंधळ वाढला. प्रत्येक डायलॉगवर त्यांच्या व्दिअर्थी कॉमेंट येऊ लागल्या तसे मला माझ्या भावासमोर आणखी ओशाळवाणे वाटू लागले. माझा संताप वाढू लागला तसा बाजूलाच बसलेल्या माझ्या मुलाने आई जाऊ दे म्हणत मला शांत करण्याचा प्रयत्न केला. आता या टोळक्याला चित्रपटगृहातील इतरत्र बसलेल्या काही तरुणांनी साथ द्यायला सुरुवात केली. चित्रपटगृहाच्या वेगवेगळया कोपऱ्यायातून स्पर्धा लागल्या तशा घाणेरड्या कॉमेंट सुरु झाल्या. सुशिक्षीत प्रेक्षकांना सर्व असह्य झाले. शेवटपर्यंत हा गोंधळ सुरु होता. चित्रपट नको पण प्रेक्षक आवर अशी आमची अवस्था झाली होती. अखेर चित्रपट संपला. लाईट लागले. मला संताप अनावर झाला होता. मी ताडकन उठले आणि गोंधळ घालणाऱ्या मागच्या रांगेतील तरुणांना धन्यवाद तुमच्यामुळे आम्हाला चित्रपटाचा आनंद घेता आला नाही असे बोलून गांधीगिरी करण्याचा प्रयत्न केला. मला साथ देण्यास काही जण पुढे आले त्यांनीही त्या मुलांना हात जोडून थँक्यू म्हटले. ते टोळके एवढे निगरगट्ट होते की त्यांनीही थँक्यू आंटी म्हटले. सर्वात जास्त धक्का बसला ते त्या मुलांचे चेहरे पाहून. कारण ते सर्व चेहरे उच्चभू्रघरातील, आणि सुशिक्षीत वाटत होते. माझ्या सारखाच अनुभव अनेकांना आला असेल. त्यामुळेच मी माझा अनुभव शेअर केला आहे. इतरांनीही त्यांचे म्हणणे आवर्जून मांडावे.

वाचने 22082
प्रतिक्रिया 116

प्रतिक्रिया

In reply to by असंका

मॉडेल उत्तर येतात. त्यातलं वाचल्यासारखं वाटत होतं...अनेक विद्यार्थ्यांनी अपेक्षित उत्तरे दिली. पण विषयाची सखोल जाण दिसून आली नाही.

In reply to by असंका

लोल. ती मॉडेल उत्तरं वाचून खच्चीकरण नक्की होतं. "विषयाची सखोल जाण दिसून आली नाही", "मूलभूत संकल्पना समजलेल्या दिसत नाहीत", "या पातळीला असे प्रश्न सोडवता येणं ही किमान अपेक्षा आहे" वगैरे वाचून आपली खरोखर काय लायकी आहे असा प्रश्न पडायला लागतो. खरोखर संतापजनक अनुभव!

आम्ही तिघे मित्र सिनेमा बघत असताना मागच्या बाजूस बसलेल्या काॅलेजच्या सात-आठ मुली फारच गोंगाट घालत होत्या.त्यांनी आक्षेपार्ह विधाने केली नाहीत,तरीही त्यांच्या गोंगाटामुळे चित्रपटाची मजा घेता आली नाही.

In reply to by याॅर्कर

ह्यॅ , शक्यच नाही . लहानपणी आम्ही माहेरची साडी चित्रपट पहायला गेलो होतो तेव्हा मुली तर अगदी मुसमुसुन रडत होत्या , अजिब्बात एकीनेही गोंधळ घातला नाही =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

तू लहानपणीही बघून बघून "माहेरची साडी" चित्रपट पाहिलास?? ते सुद्धा थेटरात जाउन?? अरेरे....

In reply to by दिपक.कुवेत

तो नावावरून फसला असावा ती इंग्लीश आव्रुत्ती असावी किंवा इथे सांगण्य्साठी (तरी) सिनेमाचे नाव बदलले असावे. रास्त शंकायन नाखु

आजकाल राक्षसी यंत्रांवर विणलेले तामसी कपडे घातल्यावर लोकांची मानसिकता तामसी बनत चालली आहे .

In reply to by प्रसाद गोडबोले

आपले अमुल्य ज्ञानामृत द्यावे.

म्हणजे थेटरासाठी हा गणवेष अनि वार्य करू ( त्रिमिती सिनेमाचक्षु सारखा) हा का ना का

कपड्या-कपड्या नुसार न बदलणारा (आतला) नाखु

In reply to by सिरुसेरि

राक्षसी यंत्रांवर विणलेले तामसी कपडे
आमचे पोटपाणी चालवणार्या यंत्रांना "राक्षसी" म्हणून संबोधल्याबद्दल निषेध. . . . ---(राक्षसीयंत्रप्रेमी टेक्स्टाईल इंजिनिअर)

आम्ही फ्यँड्री चित्रपट पाहिला थेटरात गेलो होतो तेव्हा काही टवाळ लोकांचे हेच चालु होते काही ना काही कमेन्ट्स करणे , पण जसा जसा चित्रपट उलगडत गेला तसा तसा त्यांचा आवाज थंडावत गेला ... अन शेवटी फेकुन मारलेल्या दगडा नंतर तर सारे सुन्न होवुन थेटराबाहेर पडले. अवांतर : एरव्ही स्वप्नील जोशीच्या चित्रपटावर टिका टिपण्णी करणे ( अर्थातच मर्यादा न सोडता) ह्यात काही जास्त वाईट नाही असे आपले स्पष्ट मत आहे . हां आता नाना पाटेकरच्या प्रकाश आमटे किंव्वा येवु घातलेल्या नटसम्राट किंवा आपल्या सुबोधचा बालगंधर्व वगैरे क्लासिक चित्रपट चालु असताना कोणी असली काही टिकाटिपण्णी करेल तर त्याला तिथल्या तिथे पुणेरी माज दाखवावा :)

साक्षर आणि सुशिक्षित यात फरक असतो. लिहिता वाचता न येणारा व्यक्ती हि सुशिक्षित असू शकते. साक्षर व्यक्ती हि अशिक्षित असू शकते हे संस्कारांवर अवलंबून आहे.

हाच एक मोठा संतापजनक अनुभव आहे. हे असले धेडगुजरी सोशल एक्सपिरीमेंट कोणत्या अधिकारात केलं तुम्ही? लोकांनी तुमच्या अनुभव खरा समजून मनापासून प्रतिक्रीया दिल्या आणि नंतर हे 'नंतर घडलेला प्रसंग मी मुद्दाम सांगितला नाही कारण मला आधी सर्वांच्या प्रतिक्रीया जाणून घेणे अधिक महत्वाचे वाटले' वाचायला लागलं. का वेळ वाया घालवलात लोकांचा? आणि लोकांच्या प्रतिक्रीया जाणून घेणे अधिक महत्वाचे वाटण्यासारखी अशी काय ऐतिहासिक घटना होती ही? की चारचौघात कसं वागावं ह्या उपदेशाचे डोस पाजायचे होते? मूर्खच बनवलेत लोकांना.

In reply to by आदिजोशी

:)))

In reply to by आदिजोशी

माय फ्रेंड आदि इज संतापींग सो मच... जौ दे रे आदु. लोकं मिपावर प्रयोगाला येतात आणि काही काळात स्वतःचा गीनीपीग होतात हे तुला काय ठौक नाय काय? ;)

हात्तिच्या! आम्हाला तावातावाने प्रतिसाद द्यायला लावून ते प्रकरण निकालात निघाल्याचं नंतर सांगताय होय! तुमच्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा? नै, मला फार महत्वाची कामे त्यावेळी नव्हती, पण तुम्ही असं का करावं? असो, जे काही केलत ते आवडलं नाही. पराकडून नवी माहिती मात्र समजली.

नंतर घडलेला प्रसंग मी मुद्दाम सांगितला नाही कारण मला आधी सर्वांच्या प्रतिक्रीया जाणून घेणे अधिक महत्वाचे वाटले.
ओक्के! पुढच्या वेळी असा फालतुपणा करू नका. अशा स्वभावामुळेच मग थेटरमध्ये घडले तसे प्रसंग वारंवार अनुभवाला येतात. बाकी, तुमच्या (मोठ मोठ्या) ओळखीने मला कोणी पार्किंगमध्ये गाठून दमात घेऊन नये म्हणून भितीने येवढीच प्रतिक्रीया दिली आहे.

हे असले प्रयोग करून आपण दुर्दैवाणे पत्रकार लोकांवर वकील लोकांप्रमाणेच विश्वास ठेवू नये असे सिद्ध करताय काय?

अनुभव वाचुन अतिशय वाइट वाटले. मल्टीप्लेक्समधे अनावश्यक गोंधळ करणार्‍यांना तिकीटाचे पैसे परत करुन बाहेरचा रस्ता दाखवतात हा अनुभव घेतलेला आहे (मी आतच होतो). बाकी रात्री टोळके पाठलाग करेल, सोबत पोरं आहेत इतकी परिस्थीती वाइट असेल तर अशा रात्री अशा परिसरात चित्रपट बघायला गेलात कशाला ? तसंही तुमचं शांत बसणं तुमच्या मुलांना भविष्यात असेच निर्लज्ज अथवा त्याउलट भित्रट बनवायला कारणीभुत ठरु शकते हे लक्षात आले नाही काय ? बाकी तो नंतरचा तुमचा गौप्यस्फोट अजिबात मास्टर-स्ट्रोक वगैरे समजु नका. तुम्ही पत्रकार आहात. एका सामान्य माणसाप्रमाणे झालेली फटफजीती तुम्ही स्वतःच्य लेखणीने नक्किच चितारणार नाही याची खात्री असल्याने तुम्ही नंतर काय कारवाइ केली हे प्रकाश झोतात येणार हे गृहीत धरलेच होते. फार कमी लोकांनी तुम्ही पत्रकार असुनही हे कसे सहन केले विचारले नाही ? मिपा आहे हे अस्चं आहे :) असो. सामान्यांना असे अनुभव खरेच त्रासदायक असतात.

पडद्यावर बाई दिसली की लोक चेकाळतात. दंगा घालणारी मुले मराठी की अमराठी यावर का जागा घालवण्यात आली? त्याने काय फरक पडतो? असा उपद्रव होऊ नये हे पाहणे ही थिएटरमालकाची जबाबदारी.ती पार न पडल्यास तक्रार करणे, तिची दखल न घेतली गेल्यास ग्राहक न्यायालयात दाद मागणे हे उपायही योजता येतील. आपण त्याचवेळी या प्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केला तरी इतर लोक षंढासारखे बसून असतात. सर्वांनी मिळून आवाज उठवून थोडावेळ शो बंद पाडायला लावून या मुठभर लोकांना बाहेर काढायला भागे पाडणे ही तशी अवघड गोष्ट नाही. पण या षंढांच्या बहुमतामुळे तसे होताना दिसत नाही.

एखाद्या पत्रकाराच्या संपर्कात येणे, हा किती संतापजनक अनुभव असू शकतो, याचा तुम्ही अनुभव घेतला असेल, तर त्या लोकांच्या जवळपास फिरकणेही नको, हा धडा नक्कीच घेतला असेल. पुन्हा एकदा इथे तो धडा मिळालेला आहे.

तुमच्या या अनुभवाचा संदर्भ देऊन मी आजच्या फुसके बार या स्फुटात त्याच्या अनुषंगाने पुढे लिहिले आहे.

बंदी असताना १० नंतर प्रचंड मोठ्या आवाजात स्पीकर लावलेले असताना, रात्री ११ नंतर लग्नाच्य कार्यालया बाहेर हजाराच्या माळा लावल्या असताना पोलिसांना फोने केले आहेत? आणी केले असतील तर अनुभव काय आहे? मी दोम्बिवली ला होते तेव्हा रात्री १० नन्तर लग्नाची वरात जात होती. स्पीकर वर मोठ्याने वाजणारी गाणी आणी फटाके. १०० नम्बर वर फोन केल्यावर १० मिनिटात पोलिस आले व तो गोन्धल बन्द पाडला. नन्तर आम्हाला आवाज खरच बन्द झाला आहे ना ही खात्री करण्या परत फोन पण आला होता. राम नगर पोली दोम्बीवली