Skip to main content

कॅनडाच्या लोकसभेत पंजाबी तिसर्‍या क्रमांकाची भाषा

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 03/11/2015 23:40 या दिवशी प्रकाशित केले.
१९ ऑक्टोबरच्या सार्वत्रिक कॅनेडियन निवडणुकीत तेथील लोकसभेत (हाउस ऑफ कॉमन्स) एकूण २३ भारतीय वंशाचे आमदार निवडून आले. त्यापैकी २० जणांची पंजाबी मातृभाषा आहे. त्यामुळे, इंग्लिश व फ्रेंच या भाषांच्या नंतर पंजाबी कॅनडाच्या लोकसभेत (हाउस ऑफ कॉमन्स) तिसर्‍या क्रमांकाची भाषा झाली आहे. लवकरच बनवण्यात येणार्‍या केंद्रिय मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या काही आमदारांची वर्णी लागेल अशी अपेक्षा आहे. कॅनडाच्या २०११ च्या जनगणनेप्रमाणे ४५६,०९० लोकांनी पंजाबीला आपली मातृभाषा असल्याचे नोंदवले आहे. हे प्रमाण कॅनडाच्या एकूण लोकसंख्येच्या १.३% आहे. मात्र २० पंजाबी भाषिक आमदार हे प्रमाण लोकसभेच्या सर्व ३३८ आमदारांमध्ये ६% आहे. याअगोदरही कॅनडात भारतीय वंशाचे अनेक जण राज्य व राष्ट्र स्तरावर आमदार, खासदार झालेले आहेत. उज्जल दोसंज (Ujjal Dosanjh) हे ब्रिटिश कोलंबिया या कॅनडातील एका राज्याचे २४ फेब्रुवारी २००० ते ५ जून २००१ या काळाकरिता प्रीमियर (फर्स्ट मिनिस्टर उर्फ आपल्या येथील मुख्यमंत्री) होते. मात्र यावेळेस एकदम इतक्या मोठ्या संख्येने आमदार निवडून आले आहेत आणि त्यामुळे भारतीय भाषेला कॅनेडियन लोकसभेत तिसरे स्थान मिळाले हे विशेष ! अजून एक रोचक सत्य असे की कॅनडात अधिकसंखेचे भाषक असलेल्या स्पॅनिश (७५८,२८०), इटॅलियन ६६०,९४५, जर्मन (६२२,६५०) आणि चिनी (६२२,६५०) या भाषांना हा सन्मान अजून प्राप्त झालेला नाही. ========== *** : उदय यांनी कॅनेडियन पार्लमेंटमध्ये फोनवर केलेल्या चौकशीतून पंजाबीला "अधिकृतरित्या तिसर्‍या भाषेचा दर्जा" मिळालेला नाही. फक्त ती लोकसभेतील पंजाबी भाषिक आमदारांच्या संख्येने लोकसभेतील तिसर्‍या क्रमांकाची भाषा ठरली आहे. त्यामुळे लेखातील व त्याच्या शीर्षकातील "अधिकृत" हा शब्द काढून टाकला आहे व नवीन माहितीला सुसंगत असे बदल केले आहेत. हे बदल केवळ अयोग्य शब्दप्रयोग वाचून वाचकांची दिशाभूल होऊ नये यासाठीच केलेले आहेत.

वाचने 22728
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

In reply to by पगला गजोधर

कॅनडा ड्राय नामक शीतपेय मस्तच लागायचे हो...अलीकडे कुठेच दिसत नाही. मला तर इ.स. २००० नंतर कुठेच पाहिलेले आठवत नाही. (मिरजेत प्लेन दोसा आणि कॅनडा ड्राय रिचवण्यासाठी हट्ट केलेला) बॅटमॅन.

In reply to by बॅटमॅन

ब्याटोबा, काय सांगताय राव! मीही क्याड्राचा फ्यान होतो. ते मिळायचं बंद झाल्यावर नाराज झालेलो. खरंच सुंदर पेय होतं ते. त्यात वायू कमी असायचा (की नसायचाच?). चवीला अंमळ आल्हादक होतं. का बंद झालं कोणास ठाऊक! आ.न., -गा.पैल

या निमित्त खालील गाणे डकवत आहे... शिवाय येथे पहा: Mix - Canada punjabi song गाण्याखालील कॉमेंट्स वाचू नयेत. ;)

एक शीख नेते हरजितसिंग सज्जन कॅनडाचे नवे संरक्षणमंत्री म्हणून शपथ घेताना. अमेरिका, कॅनडा अशा देशांमध्ये देशाबाहेर जन्मलेल्या व्यक्तींनाही अशी महत्वाची मंत्रीपदे दिली जातात. हेनरी किसिंजर, मॅडेलाईन ऑलब्राईट अशी काही नावे पटकन आठवतात.

In reply to by गॅरी ट्रुमन

येथे चित्रफित डकवल्याबद्दल धन्यवाद. मी प्रथमच कॅनेडीयन शपथविधी पाहीला... एक भारतीय वंशाचा शिख ब्रिटनच्या राणीआणि तिच्या कॅनेडावर देखरेख करणार्‍या सहकार्‍यांशी प्रामाणिकपणे वागेन /काम करेन अशा अर्थाची कॅनडाचा मंत्री म्हणून शपथ घेतो! हा प्रकार (यातील अर्थातच राणीशी "लॉयल" रहाणे हा प्रकार) फारच रोचक वाटला. अमेरिका, कॅनडा अशा देशांमध्ये देशाबाहेर जन्मलेल्या व्यक्तींनाही अशी महत्वाची मंत्रीपदे दिली जातात. ओ साहेब! आमचा भारत त्यात अजून पुढे आहे. इथे कुठलेच मंत्रीपद नसले तरी प्रधानमंत्र्यापेक्षा अधिक महत्व दिले जाते. ;)

In reply to by विकास

कॅनडा मधे अजुन ही कागदोपत्री मोनार्कीच आहे. इथे घर घेताना, राणीच्या जमिनीवर लीज करताय अशा अर्थाचं करारपत्र तयार होतं. रोज चेंज ऑफ गार्डस सोहळा होतो. दर १ जुलै ला (कॅनडा डे) , राणीकडुन एक प्राणी पाठवला जातो. २०१३ च्या १ जुलि ला मेंढी होती. इकडची सैनिकांची पलटण तो प्राणी घेऊन चेंज ऑफ गार्ड्स ची परेड करते १ जुलै ला. आणि वर्षभर तो प्राणी शाही इतमामात सांभाळला जातो. वर्षाअखेरीस मला वाटते तो पुन्हा ब्रिटन ला दिला जातो. ब्रिटिश च राज्य आहे हे आणि होतं , सार्वभौमत्व आहे आणी अमेरिका सख्खी शेजारी असल्याने आता संस्कृती इतकी फॉर्मल ( ब्रिटिश फॉर्मल) राहिलेली नाही पण काही परंपरा अजुन पाळल्या जातात च.

In reply to by गॅरी ट्रुमन

अमेरिका, कॅनडा अशा देशांमध्ये देशाबाहेर जन्मलेल्या व्यक्तींनाही अशी महत्वाची मंत्रीपदे दिली जातात.
केस 1: भारतियाशी लग्न केल्यावर 40 वर्षे राहून, इथेच 2 मुलांना जन्म दिल्यावर आणि दहशदवादी हल्ल्यात सासू, नवरा गमावल्यावरही, परदेशी व्यक्ती म्हणून हिणवले जाते व भारतनिष्ठे विषयी टोमणे मारले जातात. केस 2: भारतामध्ये 50 वर्षे कुष्ठ रोग्यांची सेवा केल्यावर भारत रत्न मिल्याल्यावरहि काही संघ टना, कुजबुज करून नाराजी व्यक्त करतात, शक्य तिथे बदनामी करण्याचा प्रयत्न करतात त्या देशातील लोकांनी अश्या घटना पाहाव्या मोठ्या कौतुकाने फक्त !

In reply to by पगला गजोधर

केस १ बद्दल बास च !! काहीच्या काही लॉजिक आहे हे.. हे लोकं सुनेने गमावले म्ह्णता तुम्ही तेंव्हा नकळत वाक्याचा कर्ता सुनेला करता. सुन इथे पॅसिब घटक आहे. आणि ते जे लोकं गेले ना ते आपले पंतप्रधान होते , कुण्या एका व्यक्तीचा नवरा आणि सासू म्हणुन हल्ला नाही झाला त्यांच्यावर. सुन कुणी ही असती आणि नसती देखील तरी या दुर्दैवी घटना घडल्याच असत्या . उगाच याचं श्रेय त्याला द्यायचा आग्रह कशासाठी ब्वॉ ?

In reply to by पगला गजोधर

केस २ : कोण्या एका फ्रिंजने केलेले विधान पकडून सरसकटीकरणाने अख्ख्या देशाला (ज्यात तुम्ही, आम्ही आणि इतर सगळे येतो) दोष देताना पाहून गंमत वाटली :) या न्यायाने क्लू क्लक्स क्लॅन आहे म्हणून आख्खी अमेरिका राईट विंग रेसिस्ट देश आहे असे म्हटल्यासारखे झाले, असे वाटत नाही का ? =)) अतिशयोक्ती वाङ्मयात शोभून दिसते तार्किक वादात नाही. अर्थात हे सगळे भारतिय राजकारणात सहज खपून जाते म्हणा ! बाकी चालू द्या.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कोण्या एका फ्रिंजने केलेले विधान पकडून सरसकटीकरणाने अख्ख्या देशाला (ज्यात तुम्ही, आम्ही आणि इतर सगळे येतो) दोष देताना पाहून गंमत वाटली :)
सर मी अख्ख्या देशाला नावे नाही ठेवली आहे.
भारतामध्ये 50 वर्षे कुष्ठ रोग्यांची सेवा केल्यावर भारत रत्न मिल्याल्यावरहि काही संघ टना, कुजबुज करून नाराजी व्यक्त करतात, शक्य तिथे बदनामी करण्याचा प्रयत्न करतात त्या देशातील लोकांनी अश्या घटना पाहाव्या मोठ्या कौतुकाने फक्त
इतरवेळी 'आम्हीच काय ते राष्ट्रभक्त, असं मिरवायला पुढे असणाऱ्या संघटना, कुष्ठरोग्यांची सेवा करणाऱ्या व्यक्तीचा धर्म केवळ वेगळा आहे म्हणून, त्या व्यक्तीच्या सेवेमागे, धर्मप्रसाराचे आंतर राष्ट्रीय कारस्थान पासून अनेक प्रकारच्या जहरी टीका करण्यात उत्तिष्ठ व अग्रेसर होते, फक्त असे लोकां बद्दल माझे वाक्य होते, बाकीचे लोक (ज्यात तुम्ही आम्ही इतर सर्व ) फक्त कॅनडातील घटनेकडे कौतुकाने पाहून आत्मरंजन करूयात, असे लिहिले.