Skip to main content

(इच्छामटण)

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 08/09/2015 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
इच्छामटण ह्याचा अर्थ मनात इच्छा आली की "चांगले मटण" खायला मिळणे असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात आणि शेवट तांबड्या पांढर्‍या रस्स्याने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते , बायकोच्या हातात असते. ’इच्छामटण हवे’ असे तोंड खवळलेल्या व्यक्तीने सांगितले तरी श्रावणात घरातल्यांना ते पटत नाही. चातुर्मासात घरी गुपचुप मटण बनवुन खाणे अवघड असते. बायको समजुतदार असली तर त्यातल्या त्यात चांगले. परंतु बायको श्रध्दाळु असली आणि नातेवाई़क आसपास रहाणारे असतील तर मात्र अशा चवीने मटण खाणार्‍यांची अवस्था खुप दयनीय होते. अगदी गावाबाहेरच्या हॉटेलात जाऊन मटण खायचे म्हणले तरी कोणी ना कोणी नातेवाईक भेटायची भीती वाटते . शेवटी प्रत्येक गावाबाहेर असे हॉटेल असावे कि जिथे इच्छामटण मिळावे आणि निर्भयपणे खाता यावे असा विचार येतो. हा विषय सर्वांना माहित असला तरी मिपावरील चर्चेतून प्रत्येकाच्या गावाबाहेरील असे मस्त मटण मिळणारे ढाबे हॉटेल्स कळतील.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 66617
प्रतिक्रिया 264

प्रतिक्रिया

In reply to by मालोजीराव

ले प्लेसिरला गेले पाहिजे, लै ऐकून आहे त्याबद्दल. तदुपरि पेठेतले फिशकरीराईस एक नंबर वाटले. मालवणी नाका ट्राय केला पाहिजे.

In reply to by बॅटमॅन

ऑर्थर्स थीम बाबत मालोजीराजे अन बॅट्याबुवाला धन्यवाद. जाऊन येणारच एकडाव. बाकी एखादे फूड पोर्टल काढायचे ठरले तर बॅटया बुक आहेस रे तू. हा व्यासंग चांगला जोपासलायस तू. थम्सप त्यासाठी.

In reply to by अभ्या..

जमेल तेव्हा कळव, मीही येईन. हा व्यासंग माझा कायच नाय बे. पण्णासराव अन मोदक व मृत्युंजय यांच्यापासून पेर्णा घेट्लो त्यासाठी.

In reply to by प्रचेतस

हज्जार वेळा. आमच्या मूडप्रमाणे आम्ही शाक मांस दोन्ही खात असल्यामुळे दोन्ही धागे आमच्या कामाचेच आहेत. तूर्तास एक प्रश्न विचारतो: केळीच्या पानावरची टिपिकल साऊथ इंडियन थाळी पुण्यात कुठे मिळते? मला एकच ठिकाण माहितीये- द्रविडा'ज़ बिस्त्रो, पुणे स्टेशनजवळ ढोले पाटील रोडवर सिगरी जिथे आहे त्याच बिल्डिंगीत. अन्य कुठेशीक मिळत असल्यास सांगावे.

In reply to by बॅटमॅन

केरला फास्ट फ़ूड म्हणून औंध आणि खडकी येथे दोन जॉइंट्स आहेत. तिथे केळ्याच्या पानावर केरळी थाळी मिळते असे ऐकून आहे. क्वालिटीबद्दल माहीत नै.

In reply to by प्रचेतस

लय वेळा जेवलोय तिकड, रोस्ट चिकन आणि अप्पम अफलातून आहे, कोत्ठू पराठा पण चांगला होता. केरला लंच घेतला तरच ते केळीच पान वगैरे येतं

In reply to by बॅटमॅन

तुमच्यासारख्या लोकानी तिकडे पाठ फिरवल्यामुळे हे हाटिल बंद पडले आहे. एक क्रमांक द्रविडी जेवण द्यायची ती पोरगी. इड्यप्पम लय विषेश.

In reply to by मालोजीराव

दिसला. .... लालभडाक तर्रीवाला. मस्त. एकदम बारक्या परातीत बिरातीत. लैच भारी. कंदुरीची याद आली.

सर्व मिपाकारानी इतक्या हॉटेल ची नावे दिली आहेत कि ह्या सर्व ठिकाणी एक एकदा जायचे म्हंटले तर पाच एक वर्ष तरी सहज निघून जातील आस्वाद घेण्यात.

तळेगाव - चाकण रस्त्यावर तळेगावकडून चाकणला जाताना नदीच्या अलीकडे आपुलकी मधे मटण , चिकन थाळी मिळते.. तिथली आपुलकी स्पेशल चिकन थाळी मस्त असते !

आपल्या हिंजवडी मध्ये कोठे चांगले मटन भाकरी मिळेल ? (लय भारी कोल्हापुरी आहे , पण त्याचा रिव्हुव लय बेकार आहे )

In reply to by प्रसाद गोडबोले

हिंजवडीत फारसे चांगले पर्याय नाहीत. एक सोनाली ढाबा होता आधी चांगला पण हल्ली तोही आवडत नाही. म्हणून आम्ही थोडं लांब पण रावेतला दाजीच्या ढाब्याला जातो. चिंचवडचं "जैत रे जैत" पण निघालं तेव्हा ठीक होतं पण अलीकडे चांगलं नाही वाटलं. मी चिंचवडच्या लईभारी कोल्हापुरला गेलो होतो, अजिबात आवडलं नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

हिंजवडी चौकाच्या पुढे 'रसरंग स्वीट्स' च्या जवळ 'मल्हार' म्हणून आहे, तिथली मटन भाकरी चांगली आहे असे ऐकून आहे. जाऊन बघूया लवकरचं :)

In reply to by गणामास्तर

मी पण आहे ९ - ९.३० पर्यंत हापिसात. पण आधि बोकडाचे आहे की बोल्हाई चे ते कन्फर्म करा. हिंजवडी असल्याने बोल्हाई असण्याची दाट शक्यता आहे आणि मला आता बोल्हाई चे खायची इच्छा नाही. थॅन्क्स अ‍ॅन्ड रीगार्ड्स प्रसाद

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

आज दुपारीचं जाऊन आलो. जबरदस्त चव आहे मटनाची (फक्त बोल्हाईचे मिळते). मटन एकदम निगुतीने शिजवलेले होते, रस्सा तर अफलातून होता. अळणी सुद्धा भारी होते. मार्कस राजेंनी चिकन खाल्ले पण त्यात मजा नव्हती.

In reply to by गणामास्तर

मटण रस्स्सा भारी ! चिकन अगदीच ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ होते ! सर्विस लय स्लो होती तब्बल अर्धा तास लावला ताटे लावायला पण ते बहुतेक सकाळची वेळ असल्याने असावे. ओव्हरॉल रेटिंग ४* चला हिंजवडी कट्ट्याला एक भारी जागा सापडली !

In reply to by प्रसाद गोडबोले

ह्या काय ह्या काय? एकटेच (मंजी दोगंच) जाऊन आलाव? मेसेज टाकायचा ना एक हितं! आम्ही आज जायचा बनवलेला प्लॅन ऐनवेळी ढेपाळला, ऑफिसमधल्या अंडाकरीवर भागवावं लागलं :(.

काही अनवट ठिकाणं . जव्हार नाशिक रोड सगळीकडे उत्तम वेगळीच चव असलेलं मटण. लातूर आणि उस्मानाबाद जबरदस्त मटण. माझा एक मित्र आहे हिंदू खाटीक एकतर त्यांचे बार असतात किंवा सावकारी धंदा . मटणावर मस्त तूप टाकावं आणि भाकरी बस्स हा प्रकार तिथेच खावा . त्यांच्या घरातच . बाकी बरीच ठिकाणं बोलून झाली आहेत तरी आवर्जून उल्लेख करावा लागेल तो राजस्थानात लाल मास चा आणि मंगलोर ला मिळणाऱ्या मटणाचा . मुंबई मधील सामिष खाद्यप्रकार ह्यावर एक स्वतंत्र धागा काढायचा आहे . जाता जाता गुजरातलाही उत्तम मटण मिळत अहमदाबाद वडोदरा येथे . कधी गुजराती थाळी खाऊन बोर झालात तर जरूर ट्राय करा

In reply to by वरुण मोहिते

कधी वऱ्हाडात चक्कर मारा, वऱ्हाडी रस्सा, जिळ्यागणिक टेस्ट मध्ये फरक जाणवेल अन कदाचित आवडेलही तुम्हाला. शिवाय सावजी मटण आहेच :)

चंद्रपूर ला जावं लागायचं खूप वेळा एका पॉवर प्लांट साठी त्यामुळे अकोला अमरावती नागपूर शोधून शोधून खायचो तिथल्या हॉटेलात . ड्राईव्ह करत जायचो त्यामुळे .

बडवे खानावळ इचलकरंजी तारांगण - जगदंबा च्या समोर खेड शिवापूर टोलनाक्याच्या अलीकडे पुणे बाजूस. इकडेपण उत्तम मटणभाकरी मिळते.

ललित रेफ्रेशमेंट मध्ये खा फोर्ट ला गुड फिश गुड नॉनव्हेज . त्याच्या बाजूलाच अपूर्वा आहे नॉनव्हेज छान मिळत मंगलोरी पद्धतीचं.महेश लंच होम ला पण तोड देईल असं.बाजूलाच प्रदीप लंच होम आहे तिथे पण मस्त मटण मिळतं. गिरगावात अनेक ठिकाण आहेत बोरिवलीला पाचकळशी मटण प्रसिद्ध आहे .अशी अनेक ठिकाण आहेत. मुंबईतील खादाडी वर एक स्वतंत्र धागा काढावा कोणीतरी . दादर गिरगाव फोर्ट बांद्रा हि म्हणजे आद्य पंढरी आहे खाणाऱ्या लोकांची . सर्व प्रकारच्या खाण्या बाबतीत .बाहेर जायलाच नको .

In reply to by वरुण मोहिते

दादर गिरगाव फोर्ट बांद्रा हि म्हणजे आद्य पंढरी आहे खाणाऱ्या लोकांची... प्रचंड सहमत

उपयुक्त धागा...वाचनखूण साठवली गेली आहे. :P

पुण्याजवळ भोर मध्ये (शिवापूर जवळ सुद्धा आहे) "पलंगे बिर्याणी" ची चव recently आवडली आहे..पुन्हा एकदा try करुन confirm करायचा विचार आहे..

एका काळ होता जेव्हा हैद्राबादी बिर्याणी सोडून इतर काहीच आवडत नसे, पण तोवर मी अवधी बिर्यानी हाणली नव्हती. वाह वाह अन फक्त वाह, एखादी थंड धुकाळलेली अवधी लखनवी संध्याकाळ, बडा इमामबाडा भागात खाण्याचे सुगंध दरवळत आहेत, एकीकडे जगप्रसिद्ध गलौटी कबाब खुणावत आहेत पण मी स्थितप्रज्ञ योग्यासारखा त्या कबाबचे लटके झटके टाळून पुढे जातोय, इतक्यात दरवळतो एक सुगंध न टाळता येण्यासारखा, जणू तपोभंग करणारी एखादी अमरवतीतली अप्सराच ती, उघडलं बघा झाकण देगचीचं त्या कुलीन घरंदाज नवाबी शिया रसोईयाने, जणू डोकेच फिरावे, शीतं मोकळीमोकळी असलेला सुगंधी बासमती, त्यात इतर अवर्णनीय मिलाफ, बाबौ तोंडात त्सुनामी उठली तिच्यायची (डोळे झाकलेले माकड स्मायली)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

रहेम बाप्पु रहेम! एवढं रसभरीत वर्णन, जवळपास तसलं काही खायला नसताना, अन्याव हाये ह्यो! त्रिवार निषेध!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

सरजी, नुसतं चार ओळीचं वर्णन वाचून असं झालं तर तुम्ही मिपाद्वाडकार्टी संघटना सहसचिव श्री बॅटमॅन विरचित बिर्याणी स्तोत्र वाचायला हवं होतं, लेकाच्याने येत असलेली सगळी (हुच्च) संस्कृत ओतून लिहिलं होतं गुलाम ते स्तोत्र.

In reply to by वरुण मोहिते

सरजी तुंडा इज द टीप ऑफ आईसबर्ग, मोतीपुलाव नामे एक आयटम मिळतो (त्याबद्दल एपिक चॅनलवर लॉस्ट रेसिपी मध्ये एक एपिसोड पण झालाय) खूप दुर्मिळ पाककृती आहे त्यात अंड्याच्या पांढऱ्या भागाला इंजेकशन ने बोकडाच्या वजडीत भरतात अन ती वजडी ठराविक अंतराने दोऱ्याने बांधतात, मग ते पूर्ण जंगम प्रकरण उकळतात, नंतर वजडी कात्रीने फाडून टाकतात तेव्हा आतून अंड्याच्या पांढऱ्या भागाचे सुंदर पांढरे मोती बनून निघतात उकडल्यामुळे, असे हे मोती अव्वल बासमती, बोनलेस कलेजी वगैरे घालून शिजवलेल्या उमद्या पर्शियन स्टाईल पुलावात घालतात, वरतून मजबूत तूप ओतून दम देतात अन चांदीचा वर्ख लावतात, च्यायला मोतीपुलाव खरंच खाण्याची चीज आहे राव !! (दोन डोळ्यात हृदयं असलेली स्मायली)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मीसुद्धा एपिकचा फ्यान आहे आणि हा मोतीपुलाव टू डू लिस्ट वर पाहिल्याक्षणीच घेऊन टाकलेला! :) Sandy

बाकी हैदराबाद वरून आठवलं बऱ्याचदा जाऊन काही वेगळी ठिकाणं.. तिथे सिकंदराबाद क्लब ला जे जेवण मिळत ते अप्रतिम आणि आलवाल ला आर्मी कॉंटेन्मेन्ट आहे माझे २ मेजर मित्र होते तेव्हा मी गेलेलो जे मटण आणि फूड त्याला तोड नाही इन निजाम पॅलेस गुड व्हिस्की आणि बेस्ट बिर्याणी जी अक्ख्या हैद्राबाद ला मिळणार नाही . ते असो पण सिकंदराबाद क्लब जरूर ट्राय करा .

नुकतेच ३ ठिकाणी मटण भाकरी खाण्याचा योग आला १. दक्खन स्पाईस , वाकड अतिषय उत्तम मटण आणि इन्द्रायणी भातही अप्रतिम ! २. जगदंबा हॉटेल , पुणे सातारा महामार्ग इथे आधीही जेवण्याचे बेत झाले आहेत. ह्यावेळेला तब्बल अर्धा पाऊण तास वेटिंग होते , किमान ५०-७० माणसे हॉतेल बाहेर उभी होती ! जेवण अप्रतिम . मटण ओके टाईप्स. मस्त पण स्टिल ऑके . रस्सा जरा जास्तच तिखट . इन्द्रायणी भात मात्र तुफ्फान ! शिवाय अळणी थाळी सोबत अळणी भातही सर्व्ह केलेला . पहिल्यादा तो पाहुन हे काय वरणभातासारखे सर्व्ह केले आहे असे वाटले पण पहिला घास खल्ल्या बरोबर जाणवले ... निव्वळ सुख ! ३. लाड , काळाखडक , भुमकर चौकाच्या जवऴ वाकड बास बास ! ऑफिसातुन घरी जाताना अप्रतिम मटण खायला मिळेल अशी जागा सापडली शेवटी !! कुक / ओनर बहुतेक सातार्‍याच्या माणुस आहे ! एक नंबर टेस्ट ! मटण तांबडा पांढरा आणि इंद्रायणी भात सारेच उत्तम ! आता नेक्स्ट कधी आणी कोठे भेटायचे बोला !

महत्वाचा धागा : मागील पानांवरुन पुढे काढत आहे ! नुकतेच बंगलोर मध्ये सुर्यवंशी रेस्टोरंट मध्ये मटन भाकरी खायला मिळाली ! सीरीयसली , आय वॉज मिसिन्ग तांबडा पांढरा अँड फाऊन्ड द प्लेस ! मटण इतके खास नाही पण ठीक आहे , अगदीच मराठी कोल्हापुरी पध्दतीच्या मटणाची आठवण झाल्यावर जाण्यास उत्तम जागा ! प्रॉन्स मसाला मात्र अफलातुन होता ! बँगलोर मध्ये अजुन कोणी मिपाकर आहेत का? असल्यास अजुन काही मटण ( किम्व्वा मासे, सीफुड वगैरे ही चालतील) हॉटेल्स सुचवणे ही विज्ञापना ! कळावे !