✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

(इच्छामटण)

प
प्रसाद गोडबोले यांनी
Tue, 09/08/2015 - 16:45  ·  लेख
लेख
इच्छामटण ह्याचा अर्थ मनात इच्छा आली की "चांगले मटण" खायला मिळणे असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात आणि शेवट तांबड्या पांढर्‍या रस्स्याने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते , बायकोच्या हातात असते. ’इच्छामटण हवे’ असे तोंड खवळलेल्या व्यक्तीने सांगितले तरी श्रावणात घरातल्यांना ते पटत नाही. चातुर्मासात घरी गुपचुप मटण बनवुन खाणे अवघड असते. बायको समजुतदार असली तर त्यातल्या त्यात चांगले. परंतु बायको श्रध्दाळु असली आणि नातेवाई़क आसपास रहाणारे असतील तर मात्र अशा चवीने मटण खाणार्‍यांची अवस्था खुप दयनीय होते. अगदी गावाबाहेरच्या हॉटेलात जाऊन मटण खायचे म्हणले तरी कोणी ना कोणी नातेवाईक भेटायची भीती वाटते . शेवटी प्रत्येक गावाबाहेर असे हॉटेल असावे कि जिथे इच्छामटण मिळावे आणि निर्भयपणे खाता यावे असा विचार येतो. हा विषय सर्वांना माहित असला तरी मिपावरील चर्चेतून प्रत्येकाच्या गावाबाहेरील असे मस्त मटण मिळणारे ढाबे हॉटेल्स कळतील.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विडंबन
विनोद
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
66141 वाचन

💬 प्रतिसाद (264)

प्रतिक्रिया

जीव भांड्यात पडला.

प्यारे१
गुरुवार, 10/29/2015 - 21:02 नवीन
जीव भांड्यात पडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

नगर रोडला खराडीपासून जवळच

बॅटमॅन
Wed, 10/28/2015 - 11:31 नवीन
नगर रोडला खराडीपासून जवळच असलेले कावेरी!!!! काय मटन आहे तेच्यायला, लयच मज्या आली राव खाऊन. रस्सापण असला चविष्ट, आहाहाहा....ह्याऽऽ मोठाल्या भाकर्‍या आणि हे चविष्ट मटन....तोंडाला चव आली हे लिहूनसुद्धा.
  • Log in or register to post comments

वाघोलीवाली मेन ब्रांच का बे ?

मालोजीराव
Fri, 10/30/2015 - 14:38 नवीन
वाघोलीवाली मेन ब्रांच का बे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मेन ब्रांच की नै ते ठाऊक नाञ,

बॅटमॅन
Fri, 10/30/2015 - 14:42 नवीन
मेन ब्रांच की नै ते ठाऊक नाञ, परंतु हे आहे त्याच बाजूस खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

तेच असेल… हांडेवाडीच्या

मालोजीराव
Fri, 10/30/2015 - 15:02 नवीन
तेच असेल… हांडेवाडीच्या शिवेंद्र ची मटण भाकरी हाणलीस का नाय ? यात्रेची टेस्ट एकदम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नाय बा. ते कुठंय हांडेवाडीत

बॅटमॅन
Fri, 10/30/2015 - 15:21 नवीन
नाय बा. ते कुठंय हांडेवाडीत नेमकं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

हडपसर ते हांडेवाडी जाताना

मालोजीराव
Fri, 10/30/2015 - 15:47 नवीन
हडपसर ते हांडेवाडी जाताना उजव्या बाजूलाच हांडेवाडी चौकात...बाकी आर्थर्स थिम कस आहे, डक / टर्की मीट साथी भेट द्यायची इछा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आर्थर्स थीम उत्तम आहे, भाव

बॅटमॅन
Fri, 10/30/2015 - 16:41 नवीन
आर्थर्स थीम उत्तम आहे, भाव रीझनेबल आहेत. टेस्ट इंडियन स्टाईल आजिबात नाही. फिशच्या काही डिशेस छान बनवतात, चिकनही उत्तमच असते. पण सोबत नुस्ती रोटी वा नुस्ता राईस नाय मिळत. ब्रेड देतात छोटेसे आणि बटर प्याक्स. कोरेगाव पार्कात किंवा आसपास आवडलेली अजून काही ठिकाणे : फ्रेंच विंडो नामक पॅटिसेरी / बेकरी. अस्सल फ्रेंच पद्धतीच्या पेस्ट्रीज अतिशय उत्तम मिळतात. तिथली "शू पेस्ट्री" अवश्य विचारा अन खा. कमी गोड असते पण जाम चविष्ट लागते. इतर ऑप्शन्सही अवश्य ट्राय करावेत. मलाक्का स्पाईसः इंडोनेशियन पद्धतीचे जेवण. फिश, सूप्स आणि चिकन डिशेस एक नंबर. मात्र महाग. हॉटेल वेस्टिनला लागून एबीसी फार्म्स आहे, तिथे चारपाच हाटेले एकमेकांना लागून आहेत. पैकी शिशा जॅझ कॅफे इथे मिडल ईस्टर्न पद्धतीचे जेवण उत्तम मिळते. विशेषतः डोनर कबाब खावा तर तिथेच. त्याच लायनीत अजून एकदोन हाटेले सोडून जे हाटेल येते (विदिन एबीसी फार्म ओनली) त्यात थिन क्रस्ट चिकन पिझ्झा लय भारी मिळतो. तिथे ओपन एअर शिटाच आहेत मोस्टली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

*

बॅटमॅन
Fri, 10/30/2015 - 16:42 नवीन
मी तिथले डक अथवा टर्की टेस्ट नै केले अजून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मलाक्का स्पाईस, शिशा ला गेलोय

मालोजीराव
Fri, 10/30/2015 - 17:28 नवीन
मलाक्का स्पाईस, शिशा ला गेलोय...मलाक्का चा चोप्स फ्राय जबरी टर्कि,डक इतर कुठे मिळतात याबद्दल कल्पना नाही म्हणून आर्थर्स. प्रभात रोड च ले प्लेसैर पण झकास फ्रेन्च Cafe आहे. कोथरूड शिवाजी पुतळा जवळचे मालवणी नाका चे मासे आवड्ले इतर ठिकाणापेक्शा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ले प्लेसिरला गेले पाहिजे, लै

बॅटमॅन
Sun, 11/01/2015 - 16:22 नवीन
ले प्लेसिरला गेले पाहिजे, लै ऐकून आहे त्याबद्दल. तदुपरि पेठेतले फिशकरीराईस एक नंबर वाटले. मालवणी नाका ट्राय केला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

ऑर्थर्स थीम बाबत मालोजीराजे

अभ्या..
Sun, 11/01/2015 - 17:59 नवीन
ऑर्थर्स थीम बाबत मालोजीराजे अन बॅट्याबुवाला धन्यवाद. जाऊन येणारच एकडाव. बाकी एखादे फूड पोर्टल काढायचे ठरले तर बॅटया बुक आहेस रे तू. हा व्यासंग चांगला जोपासलायस तू. थम्सप त्यासाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

जमेल तेव्हा कळव, मीही येईन.

बॅटमॅन
Mon, 11/02/2015 - 12:43 नवीन
जमेल तेव्हा कळव, मीही येईन. हा व्यासंग माझा कायच नाय बे. पण्णासराव अन मोदक व मृत्युंजय यांच्यापासून पेर्णा घेट्लो त्यासाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

शाकाहाऱ्यांसाठी इच्छावरण असा

प्रचेतस
Mon, 11/02/2015 - 13:02 नवीन
शाकाहाऱ्यांसाठी इच्छावरण असा धागा काढावा काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हज्जार वेळा.

बॅटमॅन
Mon, 11/02/2015 - 13:06 नवीन
हज्जार वेळा. आमच्या मूडप्रमाणे आम्ही शाक मांस दोन्ही खात असल्यामुळे दोन्ही धागे आमच्या कामाचेच आहेत. तूर्तास एक प्रश्न विचारतो: केळीच्या पानावरची टिपिकल साऊथ इंडियन थाळी पुण्यात कुठे मिळते? मला एकच ठिकाण माहितीये- द्रविडा'ज़ बिस्त्रो, पुणे स्टेशनजवळ ढोले पाटील रोडवर सिगरी जिथे आहे त्याच बिल्डिंगीत. अन्य कुठेशीक मिळत असल्यास सांगावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

केरला फास्ट फ़ूड म्हणून औंध

प्रचेतस
Mon, 11/02/2015 - 14:44 नवीन
केरला फास्ट फ़ूड म्हणून औंध आणि खडकी येथे दोन जॉइंट्स आहेत. तिथे केळ्याच्या पानावर केरळी थाळी मिळते असे ऐकून आहे. क्वालिटीबद्दल माहीत नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

धन्स रे.

बॅटमॅन
Mon, 11/02/2015 - 14:48 नवीन
धन्स रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

लय वेळा जेवलोय तिकड, रोस्ट

मालोजीराव
Tue, 11/03/2015 - 13:03 नवीन
लय वेळा जेवलोय तिकड, रोस्ट चिकन आणि अप्पम अफलातून आहे, कोत्ठू पराठा पण चांगला होता. केरला लंच घेतला तरच ते केळीच पान वगैरे येतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तुमच्यासारख्या लोकानी तिकडे

वपाडाव
Mon, 01/07/2019 - 17:13 नवीन
तुमच्यासारख्या लोकानी तिकडे पाठ फिरवल्यामुळे हे हाटिल बंद पडले आहे. एक क्रमांक द्रविडी जेवण द्यायची ती पोरगी. इड्यप्पम लय विषेश.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

लय भारी ..

निओ
Tue, 11/03/2015 - 23:50 नवीन
लय भारी ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

शिवेंद्र - मटण भाकरी

मालोजीराव
Tue, 11/03/2015 - 15:33 नवीन
Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हा फटू राहिला

मालोजीराव
Tue, 11/03/2015 - 18:01 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

राजं.... फटू दिसना. :(

अभ्या..
Tue, 11/03/2015 - 23:52 नवीन
राजं.... फटू दिसना. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

बघा आता

मालोजीराव
Wed, 11/04/2015 - 00:18 नवीन
Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

दिसला. ....

अभ्या..
Wed, 11/04/2015 - 00:21 नवीन
दिसला. .... लालभडाक तर्रीवाला. मस्त. एकदम बारक्या परातीत बिरातीत. लैच भारी. कंदुरीची याद आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

बार्शीत कुठ चांगली सोय ए

मालोजीराव
Wed, 11/04/2015 - 10:28 नवीन
बार्शीत कुठ चांगली सोय ए मटणाची ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हाहाहा

Pain6
गुरुवार, 10/29/2015 - 11:45 नवीन
हाहाहा
  • Log in or register to post comments

सर्व मिपाकारानी इतक्या हॉटेल

अभिजीत अवलिया
गुरुवार, 10/29/2015 - 20:34 नवीन
सर्व मिपाकारानी इतक्या हॉटेल ची नावे दिली आहेत कि ह्या सर्व ठिकाणी एक एकदा जायचे म्हंटले तर पाच एक वर्ष तरी सहज निघून जातील आस्वाद घेण्यात.
  • Log in or register to post comments

तुळजापुरी मटण थाळी.

जेपी
Sat, 10/31/2015 - 09:28 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

फोटो थेडा अस्पश्ट

संजय पाटिल
Sat, 10/31/2015 - 10:43 नवीन
एका वाटीत रस्सा, एका वाटीत मटण आहे हे कळतय. मधल्या वाटीत (की प्लेटीत) काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

वजरी ?

बोका-ए-आझम
Sun, 11/01/2015 - 21:32 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

मधल्या वाटीत सुके मटण आहे.

जेपी
Mon, 11/02/2015 - 17:54 नवीन
मधल्या वाटीत सुके मटण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

ये वेटररररररर

याॅर्कर
Sun, 11/01/2015 - 14:51 नवीन
बिल घेऊन ये
  • Log in or register to post comments

आपुलकी

कपिलमुनी
Tue, 11/03/2015 - 16:29 नवीन
तळेगाव - चाकण रस्त्यावर तळेगावकडून चाकणला जाताना नदीच्या अलीकडे आपुलकी मधे मटण , चिकन थाळी मिळते.. तिथली आपुलकी स्पेशल चिकन थाळी मस्त असते !
  • Log in or register to post comments

आपल्या हिंजवडी मध्ये कोठे

प्रसाद गोडबोले
Fri, 06/03/2016 - 12:12 नवीन
आपल्या हिंजवडी मध्ये कोठे चांगले मटन भाकरी मिळेल ? (लय भारी कोल्हापुरी आहे , पण त्याचा रिव्हुव लय बेकार आहे )
  • Log in or register to post comments

हिंजवडीत फारसे चांगले पर्याय

हतोळकरांचा प्रसाद
Sun, 12/04/2016 - 12:41 नवीन
हिंजवडीत फारसे चांगले पर्याय नाहीत. एक सोनाली ढाबा होता आधी चांगला पण हल्ली तोही आवडत नाही. म्हणून आम्ही थोडं लांब पण रावेतला दाजीच्या ढाब्याला जातो. चिंचवडचं "जैत रे जैत" पण निघालं तेव्हा ठीक होतं पण अलीकडे चांगलं नाही वाटलं. मी चिंचवडच्या लईभारी कोल्हापुरला गेलो होतो, अजिबात आवडलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

हिंजवडी चौकाच्या पुढे 'रसरंग

गणामास्तर
Tue, 12/06/2016 - 15:21 नवीन
हिंजवडी चौकाच्या पुढे 'रसरंग स्वीट्स' च्या जवळ 'मल्हार' म्हणून आहे, तिथली मटन भाकरी चांगली आहे असे ऐकून आहे. जाऊन बघूया लवकरचं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

सांगा कवा जायचं? मी कालच ऐकलं

हतोळकरांचा प्रसाद
Tue, 12/06/2016 - 15:39 नवीन
सांगा कवा जायचं? मी कालच ऐकलं त्या हॉटेलबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

चला आज. मी आहे ९ - ९.३०

गणामास्तर
Tue, 12/06/2016 - 16:20 नवीन
चला आज. मी आहे ९ - ९.३० पर्यंत हापिसात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

मी पण आहे ९ - ९.३० पर्यंत

प्रसाद गोडबोले
Tue, 12/06/2016 - 16:30 नवीन
मी पण आहे ९ - ९.३० पर्यंत हापिसात. पण आधि बोकडाचे आहे की बोल्हाई चे ते कन्फर्म करा. हिंजवडी असल्याने बोल्हाई असण्याची दाट शक्यता आहे आणि मला आता बोल्हाई चे खायची इच्छा नाही. थॅन्क्स अ‍ॅन्ड रीगार्ड्स प्रसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

ओक्के. तिथे जाऊन खाऊन चेक

गणामास्तर
Tue, 12/06/2016 - 16:39 नवीन
ओक्के. तिथे जाऊन खाऊन चेक करतो आणि मग तुला फोन करतो, ओके ? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

हुइंग!! उशिरा बघितला मेसेज

हतोळकरांचा प्रसाद
Tue, 12/06/2016 - 21:47 नवीन
हुइंग!! उशिरा बघितला मेसेज राव! 7 लाच आलाव घरी! गेलताव का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

आज दुपारीचं जाऊन आलो. जबरदस्त

गणामास्तर
Wed, 12/07/2016 - 14:48 नवीन
आज दुपारीचं जाऊन आलो. जबरदस्त चव आहे मटनाची (फक्त बोल्हाईचे मिळते). मटन एकदम निगुतीने शिजवलेले होते, रस्सा तर अफलातून होता. अळणी सुद्धा भारी होते. मार्कस राजेंनी चिकन खाल्ले पण त्यात मजा नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

मटण रस्स्सा भारी

प्रसाद गोडबोले
Wed, 12/07/2016 - 14:55 नवीन
मटण रस्स्सा भारी ! चिकन अगदीच ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ होते ! सर्विस लय स्लो होती तब्बल अर्धा तास लावला ताटे लावायला पण ते बहुतेक सकाळची वेळ असल्याने असावे. ओव्हरॉल रेटिंग ४* चला हिंजवडी कट्ट्याला एक भारी जागा सापडली !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

ह्या काय ह्या काय? एकटेच

हतोळकरांचा प्रसाद
Wed, 12/07/2016 - 15:30 नवीन
ह्या काय ह्या काय? एकटेच (मंजी दोगंच) जाऊन आलाव? मेसेज टाकायचा ना एक हितं! आम्ही आज जायचा बनवलेला प्लॅन ऐनवेळी ढेपाळला, ऑफिसमधल्या अंडाकरीवर भागवावं लागलं :(.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

बरीच ओळखीची ठिकाणं झाली

वरुण मोहिते
Fri, 12/02/2016 - 20:23 नवीन
काही अनवट ठिकाणं . जव्हार नाशिक रोड सगळीकडे उत्तम वेगळीच चव असलेलं मटण. लातूर आणि उस्मानाबाद जबरदस्त मटण. माझा एक मित्र आहे हिंदू खाटीक एकतर त्यांचे बार असतात किंवा सावकारी धंदा . मटणावर मस्त तूप टाकावं आणि भाकरी बस्स हा प्रकार तिथेच खावा . त्यांच्या घरातच . बाकी बरीच ठिकाणं बोलून झाली आहेत तरी आवर्जून उल्लेख करावा लागेल तो राजस्थानात लाल मास चा आणि मंगलोर ला मिळणाऱ्या मटणाचा . मुंबई मधील सामिष खाद्यप्रकार ह्यावर एक स्वतंत्र धागा काढायचा आहे . जाता जाता गुजरातलाही उत्तम मटण मिळत अहमदाबाद वडोदरा येथे . कधी गुजराती थाळी खाऊन बोर झालात तर जरूर ट्राय करा
  • Log in or register to post comments

कधी वऱ्हाडात चक्कर मारा,

कैलासवासी सोन्याबापु
Fri, 12/02/2016 - 20:30 नवीन
कधी वऱ्हाडात चक्कर मारा, वऱ्हाडी रस्सा, जिळ्यागणिक टेस्ट मध्ये फरक जाणवेल अन कदाचित आवडेलही तुम्हाला. शिवाय सावजी मटण आहेच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते

सर तो पण हळवा कॉर्नर आहे हो .

वरुण मोहिते
Fri, 12/02/2016 - 20:38 नवीन
चंद्रपूर ला जावं लागायचं खूप वेळा एका पॉवर प्लांट साठी त्यामुळे अकोला अमरावती नागपूर शोधून शोधून खायचो तिथल्या हॉटेलात . ड्राईव्ह करत जायचो त्यामुळे .
  • Log in or register to post comments

इकडेपण उत्तम मटणभाकरी मिळते

संदीप ताम्हनकर
Sun, 12/04/2016 - 14:36 नवीन
बडवे खानावळ इचलकरंजी तारांगण - जगदंबा च्या समोर खेड शिवापूर टोलनाक्याच्या अलीकडे पुणे बाजूस. इकडेपण उत्तम मटणभाकरी मिळते.
  • Log in or register to post comments

केळीच्या पानावरुन आठवलं

वरुण मोहिते
Mon, 12/05/2016 - 15:37 नवीन
ललित रेफ्रेशमेंट मध्ये खा फोर्ट ला गुड फिश गुड नॉनव्हेज . त्याच्या बाजूलाच अपूर्वा आहे नॉनव्हेज छान मिळत मंगलोरी पद्धतीचं.महेश लंच होम ला पण तोड देईल असं.बाजूलाच प्रदीप लंच होम आहे तिथे पण मस्त मटण मिळतं. गिरगावात अनेक ठिकाण आहेत बोरिवलीला पाचकळशी मटण प्रसिद्ध आहे .अशी अनेक ठिकाण आहेत. मुंबईतील खादाडी वर एक स्वतंत्र धागा काढावा कोणीतरी . दादर गिरगाव फोर्ट बांद्रा हि म्हणजे आद्य पंढरी आहे खाणाऱ्या लोकांची . सर्व प्रकारच्या खाण्या बाबतीत .बाहेर जायलाच नको .
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा