Skip to main content

काही लोक्स नशीबवान असतात..

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 31/10/2015 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
काही लोक्स नशीबवान असतात... माझ्या ओळखीचा एक जोशी आहे(नाव बदलले आहे) ह्या माणसाने आयुष्यभर काहि केले नाही... टिवल्या भावल्या..हा व्यवसाय कर तो कर..नोकरी करायची नाही..कारण कुणाची गुलामी नको.. मात्र पत्नी सुरेख मिळाली..न्याशनलाईज ब्यांकेत नोकरी.. निसर्ग नियमा प्रमाणे २ मुली झाल्या बायकोच्या जिवावर २ वेळची मंम्म नाश्ता चहा चालू होता.. मुली हुशार निघाल्या .. दोघींना अमेरिकेतील नवरे मिळाले व अमेरिकेत स्थायिक झाल्या.. आता हा ६ महिने ह्या तर ६ महिने त्या मुलीकडे राहतं असतो... निम्मे आयुष्य बायकोच्या जिवावर ऐष उरलेले मुली व जावयाच्या जीवावर ... काही लोक्स नशीबवान असतात...

वाचने 14375
प्रतिक्रिया 81

प्रतिक्रिया

खरं आहे तुम्ही म्हणताय ते. माझ्या अगदी जवळच्या नात्यातच आहे असे उदाहरण. लग्न होईपर्यंत आई-वडिलांच्या जीवावर मजा केली आणि आता बायकोच्या जिवावर. फक्त फरक इतकाच की वयाची ४०+ वर्षे झाली तरी त्यांना अजून मूलबाळ नाही, बाकी सगळे सारखेच.

लेकाचा नशिबवानच! सुंदर, नौकरी वाली बायको. हुशार मुली, अमेरिकेत वास्तव्य असणारे जावई. दर सहा महिन्याला अमेरिकन वारी. अवांतर:आजकाल इंजिनियर,डाॅक्टर असूनही सुंदर मुलींचे स्थळ येण्याचे वांदे.