Skip to main content

काही लोक्स नशीबवान असतात..

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 31/10/2015 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
काही लोक्स नशीबवान असतात... माझ्या ओळखीचा एक जोशी आहे(नाव बदलले आहे) ह्या माणसाने आयुष्यभर काहि केले नाही... टिवल्या भावल्या..हा व्यवसाय कर तो कर..नोकरी करायची नाही..कारण कुणाची गुलामी नको.. मात्र पत्नी सुरेख मिळाली..न्याशनलाईज ब्यांकेत नोकरी.. निसर्ग नियमा प्रमाणे २ मुली झाल्या बायकोच्या जिवावर २ वेळची मंम्म नाश्ता चहा चालू होता.. मुली हुशार निघाल्या .. दोघींना अमेरिकेतील नवरे मिळाले व अमेरिकेत स्थायिक झाल्या.. आता हा ६ महिने ह्या तर ६ महिने त्या मुलीकडे राहतं असतो... निम्मे आयुष्य बायकोच्या जिवावर ऐष उरलेले मुली व जावयाच्या जीवावर ... काही लोक्स नशीबवान असतात...

वाचने 14375
प्रतिक्रिया 81

प्रतिक्रिया

@.न्याशनलाईज http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gifब्यांकेत नोकरी.. >> दिवंगत झालो आहे. http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif @निसर्ग नियमा प्रमाणे २ मुली झाल्या>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-smiley-face.gif मग बाकिच्यांना कोणत्या नियमानी होतात हो.. अ.कु. ??? http://www.sherv.net/cm/emo/laughing/funny-laughing-face-smiley-emoticon.gif काय ह्ये!?

In reply to by अत्रुप्त आत्मा

न्याशनलाईज मी ही त्याच शब्दाला ठेचकाळलो होतो. इंग्रजी शब्दांचा हव्यास. 'राष्ट्रीयकृत बँक' हा शब्द सुचू नये हा दैवदुर्विलास.

In reply to by अत्रुप्त आत्मा

मग बाकिच्यांना कोणत्या नियमानी होतात हो.. अ.कु. ???
ज्या नियमाने वैजूवैनींना जुळे झाले त्याच नियमाने =))

असेल ज्यांच्या नशीबात त्यांनी खुशाल ऐश करावी. काही वावगे नाही त्यात. असे भाग्य प्रत्येकाला लाभो.

हायला काय नशिब आहे त्याचं. माझी इच्छा होती कि बायकोनं भरपूर कमवावं आणि आपण थंड बसून मिपा मिपा खेळावं. आमच्या बहिणीनं विचारलं कि मग बायको काम करीत असेल तर तू घरकाम करशील का? मी तिला सहज म्हणालो-मी कशाला काम करू? जी बायको नवर्याला पोसते ती एक मोलकरीण नाही का ठेवू शकणार? यावर घरात मोठा वाद झाला.

In reply to by सुबोध खरे

बायको नोकरीवर गेली की तुम्ही आणि मोलकरीण दोघेच घरात हा केव्हढा मोठा धोका आहे. असे प्रस्ताव कधीच मंजूर होत नाहीत.

In reply to by सुबोध खरे

हायला काय नशिब आहे त्याचं. माझी इच्छा होती कि बायकोनं भरपूर कमवावं आणि आपण थंड बसून मिपा मिपा खेळावं. आमच्या बहिणीनं विचारलं कि मग बायको काम करीत असेल तर तू घरकाम करशील का? मी तिला सहज म्हणालो-मी कशाला काम करू? जी बायको नवर्याला पोसते ती एक मोलकरीण नाही का ठेवू शकणार? यावर घरात मोठा वाद झाला.
माझे पण असेच स्वप्न आहे =))

काय पेठकर साहेब सगळ्यांनाच काय "शांताबाई" मिळते काय?

च्च सी सी टी व्ही चा शोध लागला असावा !!! असा कयास आहे नक्की विदा नाही लगेच मागू नये !! खुलासे दार नाखु

In reply to by नाखु

हो ना ! म्हणूनच त्याला सी सी (बघा, बघा, काय चाललंय !) टी व्ही म्हणतात ! ;)

निम्मे आयुष्य बायकोच्या जिवावर ऐष उरलेले मुली व जावयाच्या जीवावर ...
अशा माणसाला तुम्ही नशीबवान म्हणता? कमाल आहे.

या धाग्यावर सगळ्या ज्येष्ठांनी आपापले 'मनसुबे' जाहीर करायचे असं ठरलंय काय?

काही लोक्स नशीबवान असतातच..... त्यात त्यांचे कर्तुत्व असो अथवा नसो..... मुंबईला जायचं असेल तर काहींना घ्यायला एसी गाडी येते.... तासाभरात मुंबई !! त्याच प्रवासासाठी दुसरा एखादा ठाण्याहून रेल्वे पकडतो...ती घाटकोपरला बंद पडते.....तिथून बस पकडली की ती कुर्ल्याला पंक्चर होते... तिथून टॅक्सी पकडायची ती सिग्नलला अडकते मग पायपीट करत पुढे..... पोहोचतो तोही तिथेच मुंबईला पण अडीच तीन तासांनी...घामाच्या धारा पुसत.....

काही लोक्स नशीबवान असतात...
माझ्या ओळखीचा एक जोशी आहे(नाव बदलले आहे)
जोशी नाव असणे हे नशीबवान असल्याचे लक्षण आहे का?
ह्या माणसाने आयुष्यभर काहि केले नाही...
हे नशीबवान असल्याचे लक्षण आहे का?
टिवल्या भावल्या..हा व्यवसाय कर तो कर..नोकरी करायची नाही..कारण कुणाची गुलामी नको..
भावल्या शब्द काळजास भिडला.
मात्र पत्नी सुरेख मिळाली..न्याशनलाईज ब्यांकेत नोकरी..
न्याशनलाईज शब्द काळजास भिडला. पत्नी सुरेख मिळाली हे त्याचे नशीब, की लेखकाची जळजळ?
निसर्ग नियमा प्रमाणे २ मुली झाल्या
हे नशीबवान असल्याचे लक्षण आहे का?
बायकोच्या जिवावर २ वेळची मंम्म नाश्ता चहा चालू होता..
मंम्म याचा उच्चार कसा करायचा? नाश्ता चहा चालू होता. हे नशीबवान असल्याचे लक्षण आहे का?
मुली हुशार निघाल्या ..
यात जोशाचे नशीब काय?
दोघींना अमेरिकेतील नवरे मिळाले व अमेरिकेत स्थायिक झाल्या..
यात जोशाचे नशीब काय?
आता हा ६ महिने ह्या तर ६ महिने त्या मुलीकडे राहतं असतो...
हे नशीबवान असल्याचे लक्षण आहे का?
निम्मे आयुष्य बायकोच्या जिवावर ऐष उरलेले मुली व जावयाच्या जीवावर ...
वरीलप्रमाणे. हे जोशाचे नशीब की लेखकाची जळजळ?
काही लोक्स नशीबवान असतात...
असो. परा असता तर एक डायरी नक्की मिळाली असती. एवढं कुठलं आमचं नशीब?

In reply to by पैसा

हा हा हा. आता यापुढे फार काही लिहायची गरजच राहिलेली नाही :) तरीही थोड्या सिरिअस नोटवर-- काहीही न करता इतरांच्या जीवावर आयुष्यभर जगणे याला नशीबवान असणे कसे म्हणता येईल हे मला अजूनही समजलेले नाही. मी तर म्हणेन असा मनुष्य फुटक्या नशीबाचाच असला पाहिजे.

In reply to by पैसा

@ पत्नी सुरेख मिळाली हे त्याचे नशीब, की लेखकाची जळजळ? >> http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif संपूर्ण प्रतिसाद ही अ.कुं.ची अंत्ययात्रा आहे.. http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif

In reply to by असंका

पराचा संदर्भ तुम्हाला माहीत नसणार. परिकथेतील राजकुमार ऊर्फ परा हा डायरीसदृश लिखाण आले की नव्या वर्षाची डायरी धागाकर्त्याला भेट द्यायचा. सध्या परा येत नाही ना, म्हणून म्हटले, "तेवढं कुठलं आमचं नशीब?"

In reply to by पैसा

:-)) डायरीसदृश लेखन!!! कहर आहे!! (बाकी परा म्हणजे परीकथेतील राजकुमार तेवढं वळक्लेलं.)

काय फालतूपणा आहे हा? आमच्या बार मधे कोणी नवटाक झोकून ही असले बोलत नसेल! नाहीच!! (शिस्तप्रिय बारमालक) नाना

In reply to by प्यारे१

म्हंजी? मला फ़क्त लस्सी (वोडका मिसळून) पिण्याइतकीच पंजाबी येते, ;) बाकी आमच्या अंदाजाप्रमाणे आपण आमच्या बार चे नाव विचारीत असल्यास ते "नाना साहेब ह्यांचे मेनकाभुवन मदिरालय" असे सुटसुटीत हाय :)

In reply to by टवाळ कार्टा

आपला अपेक्षाभंग केल्या बद्दल माफ़ी पर असले नाही होत आपल्या बार वर , नॉर्मल बार हाय

In reply to by नाना स्कॉच

नाना शेट्टींचा डान्स बार आहे. आता परत डान्स बारवरील बंदी उठवल्यामुळे नानासाहेब खुशीत आहेत.

In reply to by सुबोध खरे

मराठी माणसाला शेट्टी म्हणले बद्दल निषेध! दूसरी गोष्ट म्हणजे आमचा डांस बार आहे हे पहायला आपण कधी आलते देवा? बिज़नस किलिंग रुमर पसरवु नयेत हो! आमचा फ्यामिली रेस्टॉ एंड बार हाय!

In reply to by नाना स्कॉच

डान्स बार असं सपष्ट लिवा ओ. डांस बार म्हणजे लोकं एकीकडे चखणा खात वारुणीचा एक घोट घेताघेताच त्या मंद प्रकाशात डास मारताहेत असे चित्र डोळ्यासमोर येते (जे काही बारबद्दल खरेही आहे). (पेयरसिकांना कोल्ड्रिंक व चखण्याची कंपनी दिलेला) बॅटमॅन.

In reply to by चित्रगुप्त

बाला ठुमके मारतात. कस्टंबर पैशाची शायनिंग मारतात. चढली की वेटर मापात मारतात. मालक रेटमध्ये मारतात. पैसे संपले की बाऊंसर मारतात. बाहेर पडून गोंधळ केला की पोलीस मारतात.

In reply to by नाना स्कॉच

ते पंजाबी नाही हरयाणवी आहे नाना. बाकी झमझम बार माहित नाही म्हणजे रौशनी माहिती नसेलच. मग जौ दे. जा नाना जा जि ले अपनी आयडी.

In reply to by टवाळ कार्टा

घरगृहस्थी /सुबोध खरे यांचेच वाक्य आहे. ******* "नोकरीवाली नवय्राला पोसते तर मोलकरीणही ठेवेल" --गडी ठेवेल.

जेपी आणि नाखुकाकांच्या अनुपस्थितीत: पन्नाशीनिमित्त अकुंचा सत्कार एक डायरी, न्याशनलाइज ब्यांकेचे पासबुक आणि "आपण यांना पाहिलेत का" या लोकप्रिय मालिकेत प्राईम स्पॉट देऊन करण्यात येत आहे.