Skip to main content

चित्रपटातील आपल्या मनात राहिलेला एक प्रसंग.....!

लेखक इन्द्र्राज पवार यांनी रविवार, 18/04/2010 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या सुट्टीचा आनंद घेणे चालू असल्याने संस्थळावर चित्रपटविषयक धागे भरपूर प्रमाणात दिसत आहेत; त्यात ही एक छोटीशी भर. चित्रपट पाहून झाल्यानंतर बरेच दिवस त्याचे कथानक, कलाकारांचा अभिनय, चित्रीकरण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यातील मधुर गाणी आपल्या मनात रुंजी घालत असतात व ज्यावेळी एकमेकाबरोबर संवाद साधत असताना या बाबीशिवाय अचानक असेही आपण म्हणतो कि, "अर्रे त्याप्रसंगत अमिताभ किती हळवा दाखविला आहे रे, इतके दिवस झाले तरी सिलसिला मधील तो प्रसंग मी विसरू शकत नाही." इ. इ. ~~~ तद्वतच कुणाबरोबर न बोलताही एकांत क्षणी आपण अशा काही प्रसंगाची मनातल्या मनात उजळणी करत (विशेषता रात्रीच्या निवांत समयी....) बसतो व काही काळ का होईना त्या दुनियेत रममाण होऊन दिवसभराचा ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करतो. हीच बाब मनात ठेऊन हा धागा "चित्रपटातील आपल्या मनात राहिलेला एक प्रसंग" या शीर्षकाने गुंफीत आहे. सुरुवातीस दहा चित्रपट घेतलेले आहेत की ज्यातील त्यासमोर दर्शविलेले प्रसंग त्या त्या वेळी हृदयाला स्पर्शून गेले होते व आजही मनात तसेच टवटवीत आहेत. (हे चित्रपट महान होते की रद्दड होते हा सवाल येथे नाही, तर केवळ त्यातील "एक प्रसंग", इतकाच निवडीचा निकष आहे.) १) स्वदेस >> शाहरुख खान आपल्या गावासाठी तेथील हट्टी तसेच काही मनमिळाऊ, काही शहाणे गावकरी आणि मित्रांच्या सक्रीय मदतीने गावात वीज आणण्याचा प्रयत्न करीत असतो व कित्येक दिवसांच्या प्रयोगानंतर त्या गावात ``वीज` अवतरते. ज्या क्षणी विद्युत प्रवाह जागृत होतो आणि संयंत्राद्वारे सर्वत्र पसरले जातो, त्यावेळी कॅमेरा एका छोट्या झोपडीत गेलेला आहे, आणि तेथील ९० वर्षाच्या आसपास असलेल्या एका म्हाता-या स्त्रीच्या डोळ्यावर केंद्रित होतो. बल्बमधून लख्ख प्रकाश तिच्या चेह-यावर उमटतो आणि ती स्त्री उदागारते ~ "बिजली -------". खरोखर एका शब्दात आशुतोष गोवारीकर यांनी त्या गावाची नस पकडली आहे. हा प्रसंग स्वदेसच्या अन्य कोणत्याही बाबीपेक्षा कायमचा घर करून राहिला आहे. २. मशाल >> दिलीपकुमार यांची चित्रपटातील पत्नी वहिदा रेहमान रात्रीच्या वेळी जखमी अवस्थेत मुंबईच्या रस्त्यावर पडली आहे, आणि दिलीपकुमार येणा-या जाणा-या मोटारींना थांबविण्याचा प्रयत्न करीत आहे, आजूबाजूच्या इमारतीमधील लोकांना ओरडून मदतीची हाक घालीत आहे, पण सगळेजण निव्वळ दगड झाले आहेत, हा बेंबीच्या देठापासून किंकाळ्या मारीत आहे, वहिदा जखमामुळे विव्हळत आहे, आणि याची धावपळ वाया जाते. वहिदा प्राण सोडत असताना दिलीपकुमार यांनी जो अभिनय केला आहे, त्यामुळे हा प्रसंग हेलावून टाकतो. आजही याची जाणीव होते कि हे दोन कलाकार अभिनयाच्या बाबतीत शिखरे होती. ३. प्यासा >> कवी विजय ~ घरातील लोकांनी "निकम्मा" म्हणून टाकून दिलेला बेकार युवक. एक कप चहाला महाग. भुकेने कासावीस म्हणून हा पदवीधर तरुण बिग बझारच्या बाहेर उभारून एका ग्राहकाच्या पिशव्या उचलून त्याच्या मोटारीत ठेवण्याचे हमाली काम करतो. त्याबद्दल शेटजी त्याला एक रुपयाने नाणे देतो. कसाबसा हॉटेल मध्ये गेलेला विजय भात आमटी मागवून (१९५० ला रुपयाला थाळी मिळत असणार !) बकाबका घास गिळत असताना, गल्ल्यावरील मालक त्याला खोचकपणे विचारतो, "अर्रे आजतरी पैसे आणलास काय?" यावर विजय आपल्या हातातील तो बंदा रुपया त्याच्या दिशेने फेकतो. मालक रुपया झेलतो, पाहतो आणि ओरडतो, "अर्रे हा तर खोटा रुपया आहे !!" झटक्यात विजयच्या घशात घास अडकतो व हतबुद्ध होऊन तिथेच थांबतो. हा प्रसंग प्रत्येक बेकार तरुणाच्या मनावर झळझळीत ओरखडा काढणारा आहे. ४. तेरे मेरे सपने >> देव आनंद्पेक्षा विजय आनंदचे म्हणून जे काही चित्रपट गाजलेले आहेत त्यातील 'तेरे मेरे सपने' हा एक. यात शहरात नव्याने वैद्यकीय व्यवसाय सुरु केलेला व झोपडपट्टीत एक छोटाश्या टपरीवजा जागेत दवाखाना उघडलेला देव आनंद. त्याच्याकडे पेशंट नाहीत पण एके दिवशी तेथील एक स्त्री, जी studio मध्ये कलाकारांना मेक अप करण्याचे काम करीत असते, त्याच्याकडे लगबगीने येते (कारण पूर्वी एकदा तिच्या हाताचे डाग याने घालविलेले असतात) आणि गाडीतून studio मध्ये आणते. तिथे प्रसिद्ध नटी "मालतीमाला" (हेमा मालिनी) जोरजोराने रडत असते व स्तुडिओमधिल कुणालाच तिच्या रडण्याचे कारण काळात नसते. 'डॉक्टर आले डॉक्टर आले' असे म्हणत ती स्त्री देव आनंदला हेमा मालीनिजवळ नेते. हा कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो पण ती अजिबात दाद लाऊ देत नाही. निराश झालेला देव आनंद मागेपुढे बघत नाही व त्या प्रसिद्ध नटीच्या मुस्कटात फाडकन लगावतो. एका क्षणात तिचे रडणे तर थांबते पण सा-या स्तुडिओत सन्नाटा पसरतो. हा एक प्रसंग जो जालीम औषधासारखा मनावर कोरून राहिला आहे. ५. मंडी > शबाना आझमी, स्मिता पाटील, नसीर, आणि अन्य कितीतरी समांतर चित्रपट चळवळीशी संबधित असलेल्या कलाकारांनी जिवंत केलेला चित्रपट. यात गावातील एका मोठ्या व्यापाराचा मुलगा, ज्याला नुकतेच मिसरूड फुटले आहे, तो एका बैठकी दरम्यान स्मिता पाटीलचे गाणे ऐकतो आणि वयाला अनुसरून चक्क तिच्या प्रेमात पडतो. ती तर नायकीनच दाखविली असल्याने "गमतीला बरा" अशा भावनेने त्याला चिडविण्यात मजा अनुभवत असते. मात्र मंडीची मालकीण शबाना आझमी हिला हे संबध बिलकुल पसंद नसतात. एकदा तर स्मिता व तो तरुण घर सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करणार असतात, मात्र शबानाला त्याचा सुगावा लागतो. ती सुरुवातीस स्मिताला चांगल्या पद्धतीने समजविण्याचा प्रयत्न करते, पण ती बाधत नाही हे पाहिल्यावर निर्वाणीचे अस्त्र म्हणून तिच्याकडे पाहत म्हणते, "तुला असे वाटत असेल की मी तुझ्या सुखाच्या आड येत आहे, पण वेडे त्याच्याबरोबर तू या जन्मात लग्न करू शकत नाहीस." स्मिता गोंधळून तिच्याकडे पाहते व विचारते, "कारण?", शबाना क्षणभर थांबते व शांतपणे उत्तरते "कारण, कारण तो मुळात तुझा भाऊ आहे, तू देखील त्याच व्यापा-याची मुलगी आहेस." बस्स, स्मिताच्या चेह-यावरील या वेळेचे भाव पुन्हा पुन्हा पाहायला हवेत. ६. बेनाम > एका मोठा कंपनीत चांगल्या पदावर असलेला अमिताभ, त्याची पत्नी मौशुमी व त्यांचा एकुलता एक मुलगा. टिपिकल शांत समाधानी कुटुंब. पण एके दिवशी पार्टीला जात असताना रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या एका शोध पत्रकाराला अमिताभ आपल्या गाडीतून दवाखान्यात काय पोहोचवितो व त्यामुळे त्याच्या आतापर्यंतच्या शांत जीवनात जे वादळ येते त्यामुळे त्याचे विश्व कसे हादरून जाते, त्यावरील हा एक सुंदर चित्रपट. याला धमक्या तर येत असतातच, पण एके दिवशी त्याच्या मुलाचे अपहरण देखील केले जाते. हा हैराण व कोलमडून पडतो, पोलीस इन्स्पेक्टर याचा मित्र बनतो तो याच्या समजूतदार स्वभामुळे. एकदा याच्या सोसायटीत एक भुरटा चोर शिरतो व पोलीस त्याला त्या टोळीशी संबधित म्हणू धरतात व ते आणि अन्य बघे त्या चोराला खूप पिटतातदेखील. पण ज्यावेळी तो अमिताभकडे मदतीच्या अपेक्षेने पाहतो, त्यावेळी याला कळून चुकते कि हा आपल्या मुलाच्या अपहरण करणा-यापैकी बिलकुल नाही व फौजदार मित्राला त्याला सोडून देण्याविषयी सांगतो. फौजदार सहज कुतूहलाने अमिताभला विचारतो, "तुझ्यावर असा प्रसंग आला असतानादेखील तुझ्या मनात त्या चोराविषयी दया कशी आली?" यावर अमिताभ हलक्या आवाजात म्हणतो, "जाऊ दे बिचा-याला, कमीत कमी मला दुवा तर देईल, कुणी सांगावे, त्याच्या दुव्यामुळे माझा मुलगा तरी परत मिळेल." हा खरा बाप ! ७. कलयुग >> शशी कपूर यांचा कमालीचा चित्रपट. महाभारताच्या कथानकावर आधारित. आधुनिक "पांडव" घराण्यातील अर्जुनाचे लग्न. शशी कौरव घराण्याचा "कर्ण" असल्याने याच्यावर आधुनिक पांडवांची खप्पा मर्जी. पण ज्येष्ट लोकांचे व याचे संबध चांगले असल्याने यालाही लग्नाचे रीतसर निमंत्रण मिळाले आहे. मात्र याला लग्न समारंभात पाहून अर्जुनाचा मस्तकशूळ उततो. याच्याकडे एक "द्रौपदी" (रेखा) सोडली तर कुणी बघतही नाही. लग्नासाठी आणलेली भेट देण्यासाठी तो अर्जुनाजवळ जातो तर याच्याशी तो हस्तान्दोलन देखील न करता बेगुमानपणे नूतन पत्नीला पुढे घेऊन अन्य पाहुण्यांशी बोलत राहतो. असा अपमान होऊनदेखील याच्या चेह-यावर कोणत्याही प्रकारची कटुता आलेली दाखविली गेली नाही. मात्र असा प्रसंग कायमचा लक्षात राहिला आहे. ८. मुगले आझम > हा संपूर्ण चित्रपट कायमपणे लक्षात राहण्याच्या योग्यतेचा आहे व गेली ५० वर्षे याने रसिकांच्या हृदयात कायमचे स्थान मिळविले आहे. यातील एक अतिशय काव्यमय प्रणय प्रसंग म्हणजे सलीम व अनारकलीची गावाबाहेरील एक वाड्यात झालेली प्रथम भेट. पडद्यावर दूर कुठूनतरी तानसेन गात असल्याची जाणीव व त्या पार्श्वभूमीवर अनारकलीच्या चेह-यावर सलीमने ते मोरपीस फिरविणे. सर्वसामान्य निरीक्षण, परीक्षक, रसिक या सर्वांच्या मते आजही हिंदी चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात चांगला प्रणय प्रसंग म्हणून या चित्रपटातील या दृश्याकडे पाहिलं जाते. एका शब्दाचाही उपयोग न करता एखादा प्रसंग कसा जिवंत करावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सलीम अनारकलीची भेट, जी कायमपणे लक्षात राहिली आहे. ९. हम दिल दे चुके सनम > या त्यातल्यात्यात अलीकडील चित्रपटाबाबत बरेच काही लिहिले बोलले गेले आहे, जात आहे. हा चित्रपट ऐश्वर्यासाठी खूपच गाजला तसेच संयत हाताळणीमुळेही . पण मला आजही यातील अखेर अखेरच्या सीन मधील तिचा अजयवर एक प्रकारे सूड घेण्याचा प्रयत्न म्हणून ती खात असलेल्या हिरव्या मिरच्या आठवतात. बाप रे ! कोणत्याही भांडण तंट्याशिवाय एक स्त्री एका पुरुषाला "आपणास तू अजिबात आवडत नाही" हे कशा रीतीने सांगेल याचे हे एक उत्तम उदाहरण म्हणून हा प्रसंग कायमचा ध्यानात राहिलेला आहे. १०. रंग दे बसंती > आमीर आणि कंपनी यांचा गाजलेला तसेच कलात्मक म्हणूनही नावाजलेला. यात शेवटी आकाशवाणी केंद्रात आमीर व त्याचा मित्र, सैनिकांनी केलेल्या गोळीबारात मरणोन्मुख अवस्थेत फरशीवर पडलेले आहेत, आणि या सर्वांची ती इंग्लंडमधील मैत्रीण त्यांची अवस्था पाहण्यासाठी तिथे आली आहे. आमीर त्या अवस्थेतही आपल्या मित्राकडे पाहून हसतो. मित्र विचारतो, "साल्या मरायला लागल्यास, आणि तिला पाहून हसतोस काय?" यावर आमीर उदगारतो, "अर्रे आता नुकताच हिच्यावर मी प्रेम करायला लागलो होतो, व लग्नही करणार होतो, पण हासू आले ते या बाबीबाबत कि, जर माझे हिच्याशी लग्न झाले असते, तर साल्या, आमची पोरे कशी झाली असती या विचारावर ? काळी कि गोरी ?" व्वा !! किती सहजगत्या हा नट इतके सुरेखरीत्या सादरीकरण करतो. असो. वाचून प्रतिक्रियाही द्या, आणि आपल्याही मनात घर करून राहिलेय चित्रपट प्रसंगाबाबत भरभरून लिहा. धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 33268
प्रतिक्रिया 131

प्रतिक्रिया

In reply to by अमोल नागपूरकर

एकदम सहमत अमोलशी! आणखी एक 'कोयला' ... टुकार चित्रपट असला तरीही शाहरूखचं तोंड बंद असल्यामुळे तो सहन होतो! अदिती

In reply to by संदीप चित्रे

दिल चाहता है मधल्या "तनहाई" गाण्यातले आमिरचे भाव ....

सारान्श चित्रपटातील प्रसन्ग. अनुपम खेरचे विमानतळावर एक पार्सल आलेले असते. तो ते सोडवण्यासाठी जातो. तिथे त्याला लाच मगितली जाते. कस्टम अधिकारी त्याला म्हणतो, " यहा सभी लोग अपना रन्गीन टी वी , वी सी आर लेने आते है." अनुपम उसळून म्हणतो ," आपको पता है, इस पार्सल मे क्यान है? इसमे मेरे मरे हुए बेटेकी अस्थिया है. क्या वो लेने के लिये भी मुझे आप लोगोन्को रिश्वत देनी पडेगी. " अनुपमचा अभिनय खरेच पाहण्यासारखा आहे. सारान्श पिक्चरही ग्रेटच. महेश भट्ट एकेकाळी खूप चान्गला डायरेक्टर होत. अर्थ, सारान्श, नाम, डैडी, दिल है के मानता नही, हम है राही प्यार के असे अविस्मरणीय पिक्चर्स त्याने दिले. मग काय झाले कुणास ठाउक. पण भटसाहेबान्ची गाडी जिस्म, पाप, मर्डर, राज ह्या रुळान्वरून धावू लागली. ह्या नावन्वरून्च अधोगती लक्षात येते !!!!!!!

In reply to by अमोल नागपूरकर

खरंय..... अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारा हा प्रसंग आहे. अनुपम खेर यांच्या प्रदीर्घ वाटचालीतील सारांश हा "माईल स्टोन" आहे. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

खरंय..... अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारा हा प्रसंग आहे. अनुपम खेर यांच्या प्रदीर्घ वाटचालीतील सारांश हा "माईल स्टोन" आहे. सारांश हा अनुपम खेरचा पहिलाच चित्रपट होता. म्हणजे त्याच्या कारकिर्दीची सुरवातच माईल स्टोनने झाली म्हणायची.! --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

In reply to by कानडाऊ योगेशु

हो. आणि मला तरि त्याची हीच भूमिका सर्वश्रेष्ठ वाटते. २८ वर्षान्च्या त्याने ६० वर्षाच्या व्यक्तिची भूमिका अगदी समरसून केली आहे. त्याकरिता त्याला पदार्पणातच वेल डिझर्वड फिल्म्फेअर मिळाले. नन्तर अनुपमने अनेक उत्तम चरित्र भूमिका, विनोदी भूमिका आणि खलनायक (आठवा ,'कर्मा') केल्या. सन्जीव कुमारनन्तर तो हिन्दी सिनेमाला लाभलेला सर्वोत्तम अष्टपैलू अभिनेता असावा. तो एक्दा म्हणाला होता की 'सर्वोत्तम नायिका ही क्याटेगरी सोडून त्याला इतर सर्व श्रेणीन्मध्ये उत्तम अभिनयाचे पुरस्कार मिळाले आहेत. ' दुर्दैवानी त्याच्या वाट्याला आजकाल खूप आचरट भूमिका येतात. आणि त्याहून दुर्दैव म्हणजे तो त्या करतो !!!!

In reply to by अमोल नागपूरकर

".....आणि त्याहून दुर्दैव म्हणजे तो त्या करतो !!!!..." ही खरंतर एका जातीवंत कलाकाराची शोकांतिका ! फारच थोडे कलाकार असे असतील की ज्यांनी आपल्या प्रतिमेला धक्का लाऊ दिला नसेल. (सध्या मला तरी "आमीर खान" मध्ये हा "जर्म" दिसतो..... सिनेमा आणि त्याबाहेरसुध्दा...! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by अमोल नागपूरकर

१. 'आखरी रास्ता' मधील "डेव्हिड" चा वयापेक्षा मोठा अभिनय. २. 'सामना' मधील निळू फुलेंचा प्रवेश - "जगदंब , जगदंब" या वाक्यातून संपूर्ण सिनेमाभर ते हुकुमत गाजवतील याचा अंदाज येतो ...

2 आखे १२ हाथ- ६ खुन्यापैकि एकाला त्याच्या मुलाला भेटायचे असते तर त्याच्या आइला त्याला.... तो त्याला भेटतो आणि त्याची आइ त्याला... दोघान्च्या चेहर्यावरील भाव पाहुन घ्यावेत नुसते.. शहिद मनोज कुमार च्या शहिद मधील भगतसिन्ह , सुखदेव आणि राजगुरु याना फासावर देतात ते द्रुश्य.... अजुन बरेच आहेत.. शोले सम्पुर्ण... जाने भि दो यारो...

=)).....सगळ्या प्रतिक्रिया भन्नाट..... ह. ह. पु. वा.

=)).....सगळ्या प्रतिक्रिया भन्नाट..... ह. ह. पु. वा.

शाहरुख मुळातच मठ्ठ असता तर काहीच अडचण नव्हती... पण साल्याला अ‍ॅक्टिंग करता येते आणि तरी साला माती खातो. स्वदेस मधला शाहरुख आईनेमेटे की कुठल्याश्या स्टेशनवर लहान मुलाच्या हातून "पचास पैसेका एक ग्लास" विकत घेतलेलं पाणी पितो तो प्रसंग. तेव्हाचे शाहरुखच्या डोळ्यातले भाव केवळ अप्रतीम ! मला तो प्रसंग बघितल्यावर "गांधी" मध्ये किंग्जले आपल्या अंगावरचा पंचा समोरच्या अर्धनग्न बाईसाठी पाण्यात सोडतो तो प्रसंग आठवला.

In reply to by जे.पी.मॉर्गन

".....मला तो प्रसंग बघितल्यावर "गांधी" मध्ये किंग्जले आपल्या अंगावरचा पंचा समोरच्या अर्धनग्न बाईसाठी पाण्यात सोडतो तो प्रसंग आठवला....." हो ! अगदी हेलावून टाकणारा हा प्रसंग.... एक शब्द नाही... केवळ "गांधीं" ची तो पंचा पाण्यात ढकलणे.... त्या स्त्री ची तो पंचा आपल्या अंगावर घेण्याची घाई. हे द्र्श्य मी पाहिलेल्या चित्रपटात होते; पण आता ज्या ज्या वेळी सदरचा चित्रपट टीव्हीवर (कोणत्याही चॅनेलवर....) पाहिला असता नेमका हा सीन कापला गेला आहे. कारण काय असेल याचा अंदाज येत नाही. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

अजून एक प्रसंग .. मनावर कायम कोरून राहिलेला .. 'रोजा' चित्रपटात जेव्हा अतिरेकी तिरंग्याला जाळण्याचा प्रयत्न करतात.. तेव्हा अरविंद स्वामीचे तिरंग्याला वाचवण्यासाठी हात बांधलेल्या अवस्थेत ते तिरंग्यावर झोकून देणे!! प्रसंग पहाताना चटकन मनात येते.. अर्रे, जर मी त्याजागी असतो, तर मी सुध्दा हेच केले असते!! अजूनही तो प्रसंग पहाताना अंगावर शहारा येतो .. ====================== कोकणी फणस Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

मला पियानीस्ट मधला तो प्रसंग तो ज्यु पियानीस्ट तिथे त्या बेवारस घरात, अनेक दिवसांपासुन एकटाच नाझी सैनिकांपासुन जीव वाचवायला त्या उजाड घरात लपुन बसलेला. तिथे तो उपाशी अनेक दिवसांचा , दाढी वाढलेली, दशा झालेली, सैरभैर , भयभीत कसाबसा जगतोय. बाहेर आवाज होताय बंदुकीच्या गोळ्यांचे, रणगाड्यांचे , सैनिकांचा आवाज येतोय. हा हैराण एकटाच कसाबसा जगतोय तिथे ,हा एकेकाळचा ग्रेट पियानीस्ट सुंदर समृद्ध आयुष्य जगलेलां हा शोधतोय खाण्यासाठी काहीतरी मग तो जर्मन सैनिक येतो अचानक, चौकशी करतो मग एक चान्स देतो त्याला त्या घरात असलेला एक पियानो वाजवायला उत्सुकतेने आणि मग तो पियानीस्ट त्या अवस्थेत पियानोवर बसतो ...... इथे पहा https://vimeo.com/23290368

In reply to by मारवा

आधी हा पियानिस्ट फ़क्त बोटे पीयानोवर चालवण्याचा अभिनय करतो. त्या युध्याच्या धामधुमित देखील त्याचे पियानो प्रेम तसुभरहि कमी होत नाही. तो फ़क्त बोटे चालवण्याचा अभिनय करतो कारण पियानोचा आवाज ऐकून त्याची चाहूल लागण्याची शक्यता असते.

या सगळ्यात सदमा चा रेल्वे स्टेशनवरचा शेवटचा सीन,कमल हसन डोक्यावर मडकं घेऊन माकडा सारख्या उड्या मारून रेल्वेत बसलेल्या श्रीदेवीला पूर्वीचं आठवून द्यायचा प्रयत्न करतो,एकदम बेहतरीन सीन

In reply to by एस.योगी

कमल हासन तो कमल हासन. त्याचे ते मोठे डोळे. सगळंच बोलून जाणारे. स्टेशनच्या प्लॅटफोर्मवर साठलेल्या पाण्यात आधी बरी झालेली श्रीदेवी निष्पाप घाईत थोडीशी सांभाळते. थोड्याच वेळात धडपडत आलेला कमल त्याच पाण्यात अडखळतो. सदमातला तो क्लायमॅक्स सीन शेवटपर्यंत पाहतो अन मला आजपण रडू येते.

दिलीप कुमार बद्दल बीग बी काय म्हणतो माहित आहे हिंदी सिनेमा दो हिस्सों में बयॉ हो सकता है, एक दिलीप कुमारके पहले आैर एक दिलीप कुमारके बाद

१. Rainman- टाॅम क्रूझची मैत्रीण डस्टिन हाॅफमनचं चुंबन घेते आणि विचारते - How do you feel? तो autistic असतो त्यामुळे निर्विकारपणे उत्तर देतो - wet! २. Schindler's List - हा तर आख्खा चित्रपटच असामान्य आहे, पण तरीही हे दोन सीन्स घर करतात - Amon Goethe हा नाझी अधिकारी. त्याला गॅस चेंबरमध्ये मारल्या गेलेल्या ज्यूंची प्रेतं जाळायला सांगण्यात आलेलं असल्यामुळे तो ते करतोय. प्रचंड धूर आणि राख आणि ती राख शिंडलरच्या गाडीवर पडते. तो प्रचंड अस्वस्थ होतो आणि इकडे गाॅथ आपलं काम किती कठीण आहे, काल एवढी प्रेतं जाळली, आज इतकी जाळायची आहेत, शिंचा वैताग अशा स्वरूपाचं काहीतरी बडबडतोय. शेवटी निघून जाताना शिंडलर बांध फुटून रडतो आणि मी अजून किती जणांना वाचवू शकलो असतो, त्याची आठवण काढत त्या सगळ्या ज्यूंचा निरोप घेतो. ३. Godfather - अमेरिगो बोनासेरा डाॅनला भेटायला आलाय. त्याच्या मुलीचा चेहरा दोन गुंडांनी विद्रूप केलाय. त्याबदल्यात डाॅनने काहीतरी करावं अशी त्याची इच्छा आहे. तो डाॅनला पैसे देऊ करतो. डाॅन त्याला व्यथित होऊन तो आपला इतका अपमान का करतोय हे विचारतो. शिवाय असेच आठवणारे - सामना मधला मारुती कांबळेचं काय झालं? सिंहासन मधला निळू फुल्यांना चित्रपटाच्या शेवटी आलेला झटका, आत्मविश्वास मधला नीलकांती पाटेकर तिच्या मुलाला भर रस्त्यात फोडून काढते, कळत नकळत मध्ये विक्रम गोखले आपला पाय घसरल्याची कबुली देतो - असे अनेक.

अरे इतक्या सगळ्या गदारोळात शशी कपूर ने इजाजत चित्रपटात फक्त एकाच शॉट मधे जी मजा आणलीये तो प्रसंग बघाना. आख्ख्या पिक्चरचा हायलाईट आहे हा. "जब वे मेट " चित्रपटात असे बरेच प्रसंग आहेत. मला प्रत्येक वेळेस त्यातील सईन नव्यानेच उलगडत जातात. शेवटच्या प्रसंगात ( गाण्यात) शाहीद कपूर च्या आईला सासू म्हणून सन्मानाने आणलय. त्यातून बरेच काही सांगितल गेलंय.

सिलसिला चित्रपटातील दोन प्रसंग १) संजीव कुमार - जया बहादुरी : हम उस नगर के राजा है २) संजीव कुमार - रेखा : कुछ रंग उतरतेही नही.

आ गए! आ गए मेरी मौत का तमाशा देखने! अख्खा पिक्चरच मनात घर केलेला

रॉय शानदार शेवटी येणारी the end ची पाटी

इनग्लोरीयस बास्टर्ड या चित्रपटाने कुठली गोष्ट केली असेल तर क्रिस्टोफ वॉल्ट्ज. एकेक प्रसंग त्याने असे उभे केले की अंगावर काटा येतो, हिसेपेक्षाही हिंसा होनार ही भिती किती मोठी असते हे तो दाखवून देतो. मग तो सुरवातीचा प्रसंग असो की रेस्टॉरंट चा प्रसंग असो, की इटालियन बोलून समोरचा इटालियन नाही हे पकडने असो. अप्रतिम. दिल चाहता है मधला सिडनीच्या रेल्वे स्टेशनचा प्रसंग भारी आवडला होता.प्रिटा झिंटा स्टेशनवर मागे राहते, एक भिकारी तिचा पाठलाग करतो. अमीर तिकडन येतो. वाटल आता नेहमीची मारामारी. तो चक्क त्याला मिठी मारतो. जबरदस्त. अमीरच्या पात्राशी पुर्णपणे सुसंगत. एक छोटासा पण उत्तम प्रसंग कहानी या चित्रपटातला. दुसऱ्यांदा बघितला तेंव्हा लक्षात आला. विद्या बालन एका टपरीवर चहा प्यायला थांबले असतात. इन्सपेक्टर तिला काहीतरी मुलांविषयी बोलतो तुझा मुलगा खूप सुंदर असेल असले काहीतरी. ती पाण्याचा एक घूट घेते कुठेतरी शून्यात बघते. बाकी बॉब बिश्वास हे पात्र आणि त्याची खून करण्याची पद्धत अफलातून. लक्षात राहीले ते बिद्या नही विद्या.

ब्लॅक हॉक डाउन मधला सीन (शेवटचा) मोगादिशु रेड्स मधे शहीद झालेल्या आपल्याच कनिष्ठ अन जवळच्या मित्राच्या मृतदेहावर हात ठेऊन बोललेला सार्जंट एवर्समन (जॉश हार्टनेट) चा अप्रतिम मोनोलॉग
At the time when we were leaving right when we were being shipped a buddy of mine asked me "Y r u going to someone else's war? Someone else's problem? Do u think of urself as a hero?" I Neva knew what to tell him at that time but today I know Nobody asks to be a hero, it just sometimes turns out that way. I'll speak to your Ma' n Pa' when I reach home
त्या नंतर ग्लोबमास्टर मधे बॉडी कास्केट्स लोड होताना सल्यूट करतानाची सार्जंट ची प्रतिमा निव्वळ अप्रतिम

बाग़बान मध्ये अमिताभला घरी जेवायला कांहीच नसतं पण हेमा मालिनीला मी यंव खातोय त्यंव खातोय असं फोनवरन खोटंच सांगतो, त्यावेळी हेमा मालिनी त्याला म्हणते,तुम्हें झूठा बोलना भी नहीं आता तो प्रसंग आणि शेवटचं त्या च्या सत्काराच्या वेळंचं त्याचं भाषण

कमल हसनच्याच 'हिंदुस्तानी' चित्रपटातील 'प्यारे पंछी बाहोंमे' या गाण्यामधील दोन प्रसंग लक्षात राहिले आहेत . १. गाण्याच्या सुरुवातीला एक ज्येष्ठ संगीत शिक्षिका कमल हसनच्या ( सेनापती ) मुलीला संगीत शिकविते आहे . त्यावेळी गायलेली 'तंदनानी तानानी आनंदमे ,तंदनानी तानानी आनंदमे ' हि आलापी व तेव्हा आपल्या मुलीकडे , परिवाराकडे कौतुकाने बघणारा कमल हसन. याचे काहि श्रेय दिग्दर्शक शंकर व संगीत दिग्दर्शक ए. आर. रहमान यांचेहि आहे . २. कुंभारवाड्यामध्ये असलेला ओल्या मातीचा एक मोठा ढिगारा .या ओल्या मातीमध्ये तोल सांभाळुन नाचण्याचा प्रयत्न करणारे कुंभार , तरुण कमल हासन व त्याची बहिण . पण तिघेही तोल जाउन पडतात. तेव्हा मिस्किलपणे हसत आपल्या चपला काढुन ज्येष्ठ कमल हासन त्या ओल्या मातीमध्ये शिरतो व सर्वांना खास ग्रामिण शैलीतील नाच करुन दाखवितो . त्या वेळेस त्याची पत्नी त्याच्या बाजुला उभी राहुन आपल्या नवरयाकडे कौतुकाने बघत त्याला नृत्यात साथ करते .

वोह सात दिन - नायक म्हणून अनिल कपूरचा पहिला चित्रपट. गरिबीचे चित्रण कुठलाही भडकपणा न वापरता कसे करावे याचे चांगले उदाहरण म्हणता येईल असा एक चित्रपट. यातील एका प्रसंगात अनिल कपूर नदीच्या पाण्यात कापड भिजवून पोटाभोवती बांधत असतो. यावर त्याचा चेला नायिकेला (पद्मिनी कोल्हपुरे) स्पष्टीकरण देतो की, ओले कापड करकचून पोटाला बांधले की भूक लागत नाही. अपना गुरू दिन मे तीन बार ऐसेही खाना खाता है. या प्रसंगात पडद्यावरील तिघांचाही अभिनय मनाला चटका लावून जाणारा. द पेट्रियट - युद्ध व सत्ताधाऱ्यांबरोबरचा संघर्ष यातील फोलपणा कळून चुकलेला एक थोर सेनानि (बेंजामीन फ्रँकलिन) मेल गिब्सन ने या चित्रपटात जोरदार रंगवला होता. या चित्रपटात मला सर्वाधिक भावलेला एक प्रसंग. बेंजामीन च्या ७ अपत्यांपैकी सर्वात धाकटी मुलगी जी जन्मापासून कधीच बोललेली नसते, नंतर बोलणे सुरू झाल्यानंतरही पित्याबरोबर कधीच बोलत नसते. एका प्रसंगात बेंजामीन लढाईवर निघताना सर्व कुटूंबियांचा निरोप घेत असतो. तिलाही बोलते करण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्नांना यश येत नाहीये हे पाहून खिन्न मनाने निघालेला असताना ती आयुष्यात प्रथमच त्याला बाबा म्हणून हाक मारते. हा फारच हृद्य प्रसंग आहे. आताही इथे टंकताना डोळ्याच्या कडा ओलसर झाल्या आहेत.

In reply to by श्रीरंग_जोशी

वोह सात दिन मधला तो प्रसंग खरंच मनात घर करून बसलाय... कायमच. गरिबीच्या चित्रणाबद्दल आणि अनिल कपूरच्या अभिनयाबद्दल तर तुमच्याशी बाडीस..

In reply to by श्रीरंग_जोशी

श्रीरंग जी पॅट्रीयट ची लिंक दिली तर आनंद होइल. सिनेमा बघितला नसेल तर तुटक प्रसंग नुसत्या वर्णनाने समजायला अवघड जातो. जस डांगेनी सीन दाखवल्यावर त्यातला भाव पोहोचला तस.

In reply to by श्रीरंग_जोशी

श्रीरंग जी पॅट्रीयट ची लिंक दिली तर आनंद होइल. सिनेमा बघितला नसेल तर तुटक प्रसंग नुसत्या वर्णनाने समजायला अवघड जातो. जस डांगेनी सीन दाखवल्यावर त्यातला भाव पोहोचला तस.

In reply to by श्रीरंग_जोशी

काय रंगवला आहे बेंजामिन मार्टिन मेल गिब्सन ने! अत्युच्च आहे राव ! सोबत हीथ लेजर सारखा कसलेला अभिनेता दोन सीन अक्षरशः डोळ्यात पाणी आणतात माझ्या १. शेवटच्या युद्धात उभा असताना रांगेतला एक गोरा नागरिक शिपाई एका ऑकम नावे ब्लॅक माणसाला सांगतो की त्याची सक्तिची मिलिट्री सर्विस संपली आहे व तो आता स्वतंत्र नागरिक आहे ह्यावर तो कृष्णवर्णीय माणुस त्याच्याकडे पाहुन म्हणतो की त्याला तो स्वतंत्र असल्याचे माहिती आहे पण तो आज युद्धात स्वयंस्फूर्ति ने आलाय, तेव्हा तो गोरा म्हणतो की "मला अभिमान वाटतो की आज आमच्यासोबत इथे आहेस" बॉस अमेरिका नामे रसायन कसले बनले असेल अन किती विशाल दृष्टीचे फाउंडिंग फादर्स असतील त्याचे हे लगेच स्ट्राइक होते त्या सीन मधुन २. बेंजामिन मार्टिन युद्धात मोड़कळीला आलेली फळी सांधायला जेव्हा पळणाऱ्या एका सैनिकाच्या हातातला झेंडा घेऊन परत पुढे कूच करतो तो क्षण

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

या चित्रपटात असे अनेक प्रसंग आहेत जे खूप खोलवर परिणाम करतात. चित्रपटाच्या सुरुवातीला स्वतःच्या डोळ्यांसमोर ब्रिटिश सेनेतील अधिकार्‍याकडून स्वतःचा किशोरवयीन मुलगा मारला जातो तेव्हा त्याक्षणी संयम न ढळू देता बेंजामिन प्रथम इतर मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घेतो. नंतर दोन लहानग्या मुलांच्या मदतीने ब्रिटिश तुकडीने अटक केलेल्या मोठ्या मुलाची सुटका करवतो. या चित्रपटाचे कुणा ताकदीच्या माणसाने मिपावर रसग्रहण करावे.

In reply to by श्रीरंग_जोशी

श्रीरंगदादा... अगदी हेच्च टाईप करणार होतो. कुणाचीही शप्पथ! वा! अजबच प्रकार झाला हा! (तशी चित्रपटांची माझी यादी बरीच लांबलचक आहे!) "पेट्रीयट" तर पारायणे केल्यासारखा पाहिला आहे! मेल गिब्सन याच चित्रपटामुळे आवडायला लागला. नंतर ॲपोकॅलिप्समुळे तर हात जोडले त्याला! तर.... 'वो सात दिन'बद्दल सांगायचं म्हणजे हा माझा अनिल कपूरच्या चित्रपटांपैकी सगळ्यात आवडता चित्रपट. चमेली की शादी, साहेब, मेरी जंग, नायक अशी रत्ने यानंतर! वा! मजा आ गया! धन्यवाद!

बना चे गुंड इन्स्पेक्टरला धरुन आणतात त्याला भाटी समोर उभ करतात तो म्हणतो ठीक है मारो लेकीन एक लास्ट ये वर्दी उतार लो ... बहोत प्यार करता हु इसक........... दोन गोळ्या वाक्य पुरे होण्याआधीच भाटी त्याला मारतो आणि दुस‍र्‍या सहकार्‍याला सांगतो " वर्दी उतार के गाड दे इसको. " मग आतुन बना येतो व त्याचा तो निळा साथीदार बना म्हणतो ये तो उड गई हम भी उडे आणि ते दोन्ही बाहेर जाऊ लागतात तितक्यात भाटी समोर येऊन त्याला अडवतो बना भाटीला म्हणतो " जाने दे ना यार " "बाहर कितना कुछ चल रहा होगा " भाटी म्हणतो "बना मना किया था ना आपको बाहर जाने के लीए " बना = "मुझे मालुम है मै भुल गया था " बना परत बाहेर च्या दिशेने जाऊ लागतो भाटी एक गोळी चालवुन त्याला सांगतो बाहेर नाही "कमरा उधर है " आत घरात जाता जाता बना पुटपुटतो "मै अकेला नही हु इस घर मे जो रास्ता भुल गया" आयुष्यभरासाठी घरात कोंडलेला बना (जॉन लेनन च देशी अवतारातल लॉकेट गळ्यात घालणारा ) एकदाच फ़क्त एकदाच बाहेर जाण्याचा क्षीण प्रयत्न करतो त्याच ते बाहर कितना कुछ चल रहा होगा बोलतांना चे हावभाव हातवारे ह्रद्य चिरुन जातात ते शब्द संवाद सिनेमा बघितला असेल तर त्या पात्रा मध्ये काय जान ओतलेली आहे ते तत्काळ कळेल आणि त्या संवादाची इन्टेसीटी पण समजेल. नंतर ही अनेक प्रसंगात डुगी बना च्या बेबंद तथाकथित क्रांती ला त्यातल्या फ़ोलपणाला ज्या तीव्र संवादाने बना काउंटर करत असतो ते सर्व विलक्षणच आहे हिंदी चित्रपटाने इतकी उंची क्वचितच गाठलीय.

द परस्युएट ऑफ़ हॅपीनेस मधला अखेरचा प्रसंग ज्यात जीवघेण्या कठोर संघर्षानंतर अखेर विल स्मीथ ( क्रीस गार्डनर च्या सत्यकथेवर आधारीत चित्रपट ) यशस्वी होतो. जेव्हा त्याला अखेर कामं मिळत आणी बॉस त्याला गुडलक म्हणुन हात मिळवतात एक नोट देतो मग तो जेव्हा बाहेर अत्यंत आत्मविश्वासाने बाहेर पडतो व म्हणतो " धिस पार्ट ऒफ़ माय लाइफ़..... इज लिटल पार्ट.... इज कॉल्ड हॅपीनेस.. ऑफ़ीस बाहेर पडुन अत्यंत आत्मविश्वासाने ... तो गर्दीतुन चालु लागतो.... त्यावेळेस त्याच्या चेह‍र्‍यावरील ते आनंदाचे भाव ती एक्साइटमेंट त्याचं ते डोळे भरुन येणं काय अभिनय तिथुन तो पाळणाघरात जाऊन तीथे असलेल्या आपल्या मुलाला उचलुन घेतो आणि कवटाळतो. ते बॅकग्राउंड मधल संगीत ते सर्व सर्व फ़ारच सुंदर प्रसंग

"परिचय" या चित्रपटातील "बिते ना बिताई रैना" या गीतातील एक प्रसंग लक्षात राहतो . जया भादुरी "बिते ना बिताई रैना" हे गीत म्हणत असते . मध्येच तिला गाण्यातील पुढील ओळ आठवत नाही . तेव्हा पाठीमागुन तिचे आजारी वडील (संजीवकुमार) येतात . व गाण्यातील ती ओळ पुर्ण करतात .

In reply to by DEADPOOL

नागेश भोसलेची हॉस्पीटल मधील एन्ट्री! त्याने २ मिनटांच्या सीनमधेपण भलताच भाव खाल्ला आहे.

सिल्वेस्टर स्टेलोन कढून अभिनयाची अपेक्षा करणे चुकीचे पण तरिही त्याने Oskar व् over the top मधे केलेला अभिनय दाद घेऊन जातो. Over the top मधे स्टेलोन आपल्या गड़गंज श्रीमंत असलेल्या सासऱ्याला भेटायला जातो. बोलणी फिसकटतात. स्टेलोन जायला निघतो. नकार ऐकन्याची सवय नसलेला स्टेलोनचा सासरा आपल्या गुंडाकरवी स्टेलोनचा रस्ता अडवतो. स्टेलोन शांतपणे सांगतो " talk is over" तरिही तो गुंड हात आडवा ठेऊन स्टेलोनला अडवतो. बस्स स्टेलोन त्याला पूर्ण ताकदिनीशि एक ठोसा ठेऊन देतो. तो गुंड तो उभी असलेली चौकट घेऊन खाली कोसळतो. एक बापच त्या ठोशाचि ताकत समझु शकतो. स्टेलोन पुढे स्पर्धेत काय करणार आहे याची कल्पना येते

हॉलीवूड मधील बाप माणूस! The terminal . एक जबरदस्त सिनेमा . ज्या अमेरिकेत जायला लोक आकाशपाताळ एक करतात त्या अमेरिकेत फक्त आपल्या बापाची इच्छा म्हणून येणारा व् प्रतिकुल परिस्थितित देखील सर्व जुळवून घेणारा माणूस टॉम ने जबरदस्त रंगवला आहे. किंबहुना टॉम हैंक्सने भूमिका केलेला कोणताही सिनेमा मला रटाळ वाटलेला नाही.

In reply to by भंकस बाबा

किंबहुना टॉम हैंक्सने भूमिका केलेला कोणताही सिनेमा मला रटाळ वाटलेला नाही. कास्ट अवे मधला तो फुटबॉल कंपॅनियन बोटीवरुन पडुन त्याच्या नजरेसमोर ह्ळुहळु वाहत जातो. तेव्हाचा त्याचा आकांत क्या बोलते बाबाजी ?

In reply to by मारवा

द्या टाळी . टॉम एंड हुचेस, सेविंग प्राइवेट रायन, दा विन्ची कोड, कैच मी इफ यु कैन , यादि लांबतच जाईल

1997 इटालियन चित्रपट बाप मुलाला सांगतो की नाझी छळछावणीत दिलेले काम(task) पुर्ण करणे आवश्यक आहे जे एक खेळ आहे. आणि जिकंणार्याला रणगाडा बक्षिस म्हणुन देणार आहेत. छावणीत छळ , रोगराई व मृत्यू ने वेढला असूनही मुलगा स्वत:च्या निरागसपणामुळे बापच्या कल्पनाविलासावर शंका घेत नाही. बाप शेवट होईपर्यंत नाटक चालू ठेवतो. तो मुलाला एका कपाटात लपवतो आणि सांगतो हे शेवटचे काम(task)आहे. हे पुर्ण केल्यावर रणगाडा बक्षिस म्हणुन तुलाच मिळेल. दरम्यान बाप त्याच्या बायकोला शोधण्यासाठी जाताना एक जर्मन सैनिकला सापडतो आणि मारला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मुलागा कपाटाबाहेर येतो,तेथे रणगाडाच्या नेतृत्वाखालील अमेरिकन सैन्य येते. आणि तो खुष होतो, खेळ आणि बक्षिस जिंकला असल्याची त्याला खात्री पटते.

एका दुकानात राखी व अमिताभ बच्चन भेटतात आणि बोलत असतात तेवढ्यात पूनम धिल्लन तिथे येते, राखी अमिताभची ओळख करून देते "ये है आर. के. गुप्ताजी की बेटी..." त्या क्षणी अमिताभच्या चेहर्यावरचे बदललेले भाव, एका अर्थाने ही आपली बहीण...!!! निव्वळ अप्रतिम.