अक्षरशः ड्वाले पानावले !! :) .. सॉरी :( ही द्यायची होती..!!
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
जुने देवदास पाहिले नाहित, पण नविन देवदास मध्ये, देवदास चंद्र्मुखीला विचासतो, 'ईश्क करती हो मुझसे?' त्यावर ती म्हणते 'यही पुछा होता, सांसे लेती हो चंद्र्मुखी....' हा प्रसंग मला आवडतो.. त्यात माधुरीने सुंदर अभिनय केलाय, डोळ्यांच्या पापण्या वर न करता तीने हा पुर्ण प्रसंग लीलया सादर केलाय...
हॅलो ब्रदरः पुंगी म्हणत सलमान जे काही करतो ना ते अगदी मनावर कोरलं गेलं आहे.
मेला: चित्रपटातला ट्विंकल खन्नाचा एक एक सीन.
आप मुझे अच्छे लगने लगे: अमिशा पटेलचं रडणं, किंचाळणं अगदी नॅचरल वाटतं.
धूम, निल आणि निक्की मधील उदय चोप्राची अॅक्टिंग.
यादें: जॅकी श्रॉफचा डान्स, स्टाईल, इत्यादि.
प्यासा >> कवी विजय ~ घरातील लोकांनी "निकम्मा" म्हणून टाकून दिलेला बेकार युवक. एक कप चहाला महाग. भुकेने कासावीस म्हणून हा पदवीधर तरुण बिग बझारच्या बाहेर उभारून एका ग्राहकाच्या पिशव्या उचलून त्याच्या मोटारीत ठेवण्याचे हमाली काम करतो.
अरे वा! नवीन माहिती. पन्नाशीच्या दशकातही भारतात ऑरगनाईज्ड रीटेल आउटलेटस होती की! कशाला मग ते वॉल मार्टचे कौतुक? किशोर बियाणी, तुस्सी ग्रेट हो!
पदुकोणजी, जिवाला त्रास करुन घेऊ नका. सुट्टीचे दिवस आहेत. जीझस काय म्हणाला ते आठवा. 'यांना माफ कर..' वगैरे...
सन्जोप राव
इसे रोकिये महिंदरबाबू, क्या आप अपने तमाशे के लिये एक आदमी की जान ले लेंगे?
शेरसिंग, राजू आदमी नही, जोकर है. ये जियेगा भी यही, मरेगा भी यही. मरेगा भी यही, जियेगा भी यही.
देवळात जाताना चपला काढून ठेवाव्यात, एवढीच अपेक्षा. बाकी जाऊ दिले आहेच.
सन्जोप राव
इसे रोकिये महिंदरबाबू, क्या आप अपने तमाशे के लिये एक आदमी की जान ले लेंगे?
शेरसिंग, राजू आदमी नही, जोकर है. ये जियेगा भी यही, मरेगा भी यही. मरेगा भी यही, जियेगा भी यही.
देवळात जाताना चपला काढून ठेवाव्यात,
मलाही नेमके "बिग बझार"च खटकले होते.
बाकी, अभिमान मध्ये शेवटी जया भादुरी रडली, तो शीन आठवून देखील आमच्या डोळ्यात पाणी येते.
तेव्हा डेव्हिडने देखील त्याच्या कारकीर्दीचा कळस गाठला आहे.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
पिन्जरा मध्ये शेवटचा कोर्टातील सीन. सन्ध्या श्रीराम लागून्चे निर्दोषीत्व सिद्ध करताना तीची वाचा जाते. त्यायोगे त्यान्ना फाशीची शिक्षा होत असली तरि जनमानसातील आदर्श प्रतिम मात्र कायम राहते.
त्या पेक्षा अमर अकबर अॅथनी मध्ये मां निरुपमा च्या डोक्यावर फांदी पडुन डोळे जातात ,तो सीन काळजाला घरे पाडुन जातो.
नंतर साईबाबांच्या आरती वेळी ती रस्त्यावर कोलमडुन पडते व तिचे डोळे परत येतात हा सीन तर निव्वळ अप्रतिम आहे.
वेताळ
मलाही नेमके "बिग बझार"च खटकले होते.
ओ हो !!!! सॉरी, सॉरी ... संजोप राव, सुचेल तसे, आणि मिसळ भोक्ता ~~ तुम्हा सर्वांसाठी खुलासेवजा एकच नोट लिहितो.
बिलकुल सही फरमाया आपने ~ मी "बिग बझार" असे म्हणायला (वा लिहायला...) नको होते. पण काल रात्री आपणा सर्वांचे मेसेज वाचल्यावर पुन्हा ती "प्यासा"ची DVD पाहिली. ते दृश्य मुंबईच्या फोर्ट भागात घेतल्याचे जाणवते व तो शेठजी सामानाने भरलेल्या भल्या मोठ्या पिशव्या "त्या" दुकानातून आणीत आहे, घामाघूम झालेला आहे, आणि भुकेला विजय पैशासाठी कासावीस होऊन दुकानाच्या बाजूनेच शेठजीकडून त्या पिशव्या "हमाली" म्हणून आपणाकडे घेतो. आता लिखाणाच्या वेळी मला आजच्या सवयीनुसार फोर्ट मधील त्या मोठ्या दुकानास सहजगत्या "बिग बझार" असे लिहावेसे वाटले. खरय, वास्तविक १९५०-५५ च्या काळात बिग बझार ही संकल्पना अस्तित्वात नव्हती.... किंवा दुस-या नावाने ते स्थळ ओळखले जात असेल. गलती के लिये माफ कर दो भाई लोग !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
ते दृश्य तसेच 'प्यासा'चे बरेच चित्रीकरण कलकत्यात झाले आहे. सदर दृश्य मुंबईच्या फोर्टच्या कुठल्याही रस्त्यावरील नाही.
जाता जाता, असे वाचून आहे की 'प्यासा'च्या नायकाची भूमिका दिलीपकुमार करणार होता. पण मुहूर्ताच्या शॉटसाठी साहेब आलेच नाहीत (किंवा त्यांच्या डायलॉग-संवयीनुसार अगदी उशिरा आले). तेव्हा ऐनवेळी म्हणे गुरु दत्त स्वतःच त्या भूमिकेत उभा राहिला. कधीकधी अनपेक्षितपणे वाईटातून चांगले घडते त्याचे हे उत्तम उदाहरण आहे! दलिपकुमारसकट प्यासाचे काय झाले असते त्याचा विचारही करवत नाही!
दलिपकुमारसकट प्यासाचे काय झाले असते त्याचा विचारही करवत नाही!
मला करवतो. (खालील उतार्यात कणेकरी पुनरावृत्ती झाल्यास क्षमस्व)
'वो शादी के रास्ते चली गयी और मै बरबादी के वास्ते' हे खोलपणे म्हणणारा आणि 'मितवा' अशी तलतच्या आवाजात आर्त हाक घालणारा , रफीच्या भावभीन्या आवाजात 'सुख के सब साथी दुख में न कोय' मधील एकेक भाव चेहर्यावर आणणारा, 'आठ बजनेमें अब जादा देर नही है रायसाहब' अशा साध्या वाक्यात जान ओतणारा, 'ऐसे वीराने में इक दिन घुटके मर जायेंगे हम' या शब्दांचे, संगीताचे आणि मुकेशच्या आवाजाचे सोने करणारा, 'तुझे चांद के बहाने देखूं, तू छत पर आजा गोरिये' मधली सगळी नटखट अदा एका क्षणात पेश करणारा, 'चैन कैसा जो पहलू में तूही नही' यातली विरहाची आग अत्यंत सहजपणे चेहर्यावर दाखवणारा, ''आयी है मेरे गम पे जवानी' म्हणत परत हातात जाम घेताना एका व्यसनी माणसाचा कुणाला न कळालेला दर्द दाखवणारा 'हम इस खून से आसमां पर इन्किलाब लिख देंगे, क्रांती लिख देंगे' म्हणून मनामनांत शोले चेतवणारा, 'मार डालो उसे, कर डालो उसका खून लेकिन मैं अपने फर्ज से गद्दारी नही करुंगा' असे एकीकडे सुनावणारा तर दुसरीकडे 'हाथ तो गर्म है डाक्टरसाब' असे आर्तपणे म्हणणारा.....
असे बरेच काही करणारा 'दलीप' 'प्यासा' मध्ये असता तर काय झाले असते हा विचार मला करवतो.
सन्जोप राव
इसे रोकिये महिंदरबाबू, क्या आप अपने तमाशे के लिये एक आदमी की जान ले लेंगे?
शेरसिंग, राजू आदमी नही, जोकर है. ये जियेगा भी यही, मरेगा भी यही. मरेगा भी यही, जियेगा भी यही.
एका संदर्भानुसार - त्याने नुकतंच देवदासचं चित्रीकरण संपवलं होतं आणि त्याला नैराश्याचा त्रास व्हायला लागला होता. पण गुरुदत्तला दुखवायचं नव्हतं म्हणून त्याने चित्रपट सरळसरळ न नाकारता चित्रीकरणासाठी न जाण्याचा मार्ग स्वीकारला. गुरुदत्तने वाट पाहिली आणि शेवटी वैतागून स्वतः मेक-अप केला आणि विजयची भूमिका केली, कारण जर चित्रीकरण रद्द झालं असतं तर स्टुडिओचं भाडं, कलाकारांच्या तारखा, बाह्य चित्रीकरणाचं वेळापत्रक या सगळ्याच गोष्टी कोलमडून पडल्या असत्या. गुरुदत्त असलेली दृश्यं राज खोसलांनी दिग्दर्शित केली. (बहुतेक. चूभूद्याघ्या)
गाइड मध्ये 'आज फिर जीने कि तमन्ना है' गाण्याआधीचा प्रसन्ग. (ते गाणे ही खूप सुन्दर आहे.) देव आनन्द वहीदाला घुन्गरू घेउन देतो. ती ते घालून भर बाजारात फिरते. जणू त्या पैन्जणामुळे तीचा लग्नानन्तर घुस्मटलेला श्वास मोकळा झाला असतो.
संपूर्ण सिनेमा !!!!!
सॉरी पण एक प्रसंग सांगायला गेलो की दुसरा म्हणतो, "का रे बाबा, मी तुझं काय घोडं मारलंय? " :)
त्यामुळे 'शोले' संपूर्ण !!!
----------
'अग्निपथ'मधे विक्रम गोखलेचा मुलगा बच्चनचा उल्लेख "वो गुंडा?"असा करतो तेव्हा बच्चनचा चेहरा !
'अग्निपथ'मधेच 'विजय चौहान की बहिन को उठा के ले गये' म्हणतानाच बच्चन !!
-----------
शाहरूख खान मला 'स्वदेस' आणि 'चक दे इंडिया'मधे(च) जितका आवडलाय तितका बाकी कुठल्यास सिनेमात आवडला नाहीये.
'चक दे...'मधला त्याचा 'सत्तर मिनट' हा सीन आणि शेवटी भारतीय संघ सामना जिंकतो तेव्हा शाहरूखच्या चेहर्यावरसे भाव... फँटास्टिक !
---------
'कौन' सिनेमातल्या शेवटच्या फ्रेममधले उर्मिला मातोंडकरच्या चेहर्यावरचे भाव !
--------
'मृत्युदंड'मधे माधुरीच्या घरात शिरून घमकावणारे मोहन जोशी
--------
'नरम गरम'मधे 'रात को खायेंगे' म्हणणारा ओमप्रकाश
---------
'दिल चाहता है..'मधे 'पीटेगा स्साला' म्हणणारा आमिर !
---------
अजून भरपूर आहेत पण इथेच थांबतो :)
सारान्श चित्रपटातील प्रसन्ग.
अनुपम खेरचे विमानतळावर एक पार्सल आलेले असते. तो ते सोडवण्यासाठी जातो. तिथे त्याला लाच मगितली जाते. कस्टम अधिकारी त्याला म्हणतो, " यहा सभी लोग अपना रन्गीन टी वी , वी सी आर लेने आते है." अनुपम उसळून म्हणतो ," आपको पता है, इस पार्सल मे क्यान है? इसमे मेरे मरे हुए बेटेकी अस्थिया है. क्या वो लेने के लिये भी मुझे आप लोगोन्को रिश्वत देनी पडेगी. " अनुपमचा अभिनय खरेच पाहण्यासारखा आहे.
सारान्श पिक्चरही ग्रेटच. महेश भट्ट एकेकाळी खूप चान्गला डायरेक्टर होत. अर्थ, सारान्श, नाम, डैडी, दिल है के मानता नही, हम है राही प्यार के असे अविस्मरणीय पिक्चर्स त्याने दिले. मग काय झाले कुणास ठाउक. पण भटसाहेबान्ची गाडी जिस्म, पाप, मर्डर, राज ह्या रुळान्वरून धावू लागली. ह्या नावन्वरून्च अधोगती लक्षात येते !!!!!!!
खरंय..... अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारा हा प्रसंग आहे. अनुपम खेर यांच्या प्रदीर्घ वाटचालीतील सारांश हा "माईल स्टोन" आहे.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
खरंय..... अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारा हा प्रसंग आहे. अनुपम खेर यांच्या प्रदीर्घ वाटचालीतील सारांश हा "माईल स्टोन" आहे.
सारांश हा अनुपम खेरचा पहिलाच चित्रपट होता.
म्हणजे त्याच्या कारकिर्दीची सुरवातच माईल स्टोनने झाली म्हणायची.!
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
हो. आणि मला तरि त्याची हीच भूमिका सर्वश्रेष्ठ वाटते. २८ वर्षान्च्या त्याने ६० वर्षाच्या व्यक्तिची भूमिका अगदी समरसून केली आहे. त्याकरिता त्याला पदार्पणातच वेल डिझर्वड फिल्म्फेअर मिळाले. नन्तर अनुपमने अनेक उत्तम चरित्र भूमिका, विनोदी भूमिका आणि खलनायक (आठवा ,'कर्मा') केल्या. सन्जीव कुमारनन्तर तो हिन्दी सिनेमाला लाभलेला सर्वोत्तम अष्टपैलू अभिनेता असावा. तो एक्दा म्हणाला होता की 'सर्वोत्तम नायिका ही क्याटेगरी सोडून त्याला इतर सर्व श्रेणीन्मध्ये उत्तम अभिनयाचे पुरस्कार मिळाले आहेत. ' दुर्दैवानी त्याच्या वाट्याला आजकाल खूप आचरट भूमिका येतात. आणि त्याहून दुर्दैव म्हणजे तो त्या करतो !!!!
".....आणि त्याहून दुर्दैव म्हणजे तो त्या करतो !!!!..."
ही खरंतर एका जातीवंत कलाकाराची शोकांतिका ! फारच थोडे कलाकार असे असतील की ज्यांनी आपल्या प्रतिमेला धक्का लाऊ दिला नसेल. (सध्या मला तरी "आमीर खान" मध्ये हा "जर्म" दिसतो..... सिनेमा आणि त्याबाहेरसुध्दा...!
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
१. 'आखरी रास्ता' मधील "डेव्हिड" चा वयापेक्षा मोठा अभिनय.
२. 'सामना' मधील निळू फुलेंचा प्रवेश - "जगदंब , जगदंब" या वाक्यातून संपूर्ण सिनेमाभर ते हुकुमत गाजवतील याचा अंदाज येतो ...
2 आखे १२ हाथ-
६ खुन्यापैकि एकाला त्याच्या मुलाला भेटायचे असते तर त्याच्या आइला त्याला.... तो त्याला भेटतो आणि त्याची आइ त्याला... दोघान्च्या चेहर्यावरील भाव पाहुन घ्यावेत नुसते..
शहिद
मनोज कुमार च्या शहिद मधील भगतसिन्ह , सुखदेव आणि राजगुरु याना फासावर देतात ते द्रुश्य....
अजुन बरेच आहेत..
शोले सम्पुर्ण...
जाने भि दो यारो...
शाहरुख मुळातच मठ्ठ असता तर काहीच अडचण नव्हती... पण साल्याला अॅक्टिंग करता येते आणि तरी साला माती खातो.
स्वदेस मधला शाहरुख आईनेमेटे की कुठल्याश्या स्टेशनवर लहान मुलाच्या हातून "पचास पैसेका एक ग्लास" विकत घेतलेलं पाणी पितो तो प्रसंग. तेव्हाचे शाहरुखच्या डोळ्यातले भाव केवळ अप्रतीम ! मला तो प्रसंग बघितल्यावर "गांधी" मध्ये किंग्जले आपल्या अंगावरचा पंचा समोरच्या अर्धनग्न बाईसाठी पाण्यात सोडतो तो प्रसंग आठवला.
".....मला तो प्रसंग बघितल्यावर "गांधी" मध्ये किंग्जले आपल्या अंगावरचा पंचा समोरच्या अर्धनग्न बाईसाठी पाण्यात सोडतो तो प्रसंग आठवला....."
हो ! अगदी हेलावून टाकणारा हा प्रसंग.... एक शब्द नाही... केवळ "गांधीं" ची तो पंचा पाण्यात ढकलणे.... त्या स्त्री ची तो पंचा आपल्या अंगावर घेण्याची घाई. हे द्र्श्य मी पाहिलेल्या चित्रपटात होते; पण आता ज्या ज्या वेळी सदरचा चित्रपट टीव्हीवर (कोणत्याही चॅनेलवर....) पाहिला असता नेमका हा सीन कापला गेला आहे. कारण काय असेल याचा अंदाज येत नाही.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
अजून एक प्रसंग .. मनावर कायम कोरून राहिलेला ..
'रोजा' चित्रपटात जेव्हा अतिरेकी तिरंग्याला जाळण्याचा प्रयत्न करतात.. तेव्हा अरविंद स्वामीचे तिरंग्याला वाचवण्यासाठी हात बांधलेल्या अवस्थेत ते तिरंग्यावर झोकून देणे!!
प्रसंग पहाताना चटकन मनात येते.. अर्रे, जर मी त्याजागी असतो, तर मी सुध्दा हेच केले असते!!
अजूनही तो प्रसंग पहाताना अंगावर शहारा येतो ..
======================
कोकणी फणस
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..
मला पियानीस्ट मधला तो प्रसंग
तो ज्यु पियानीस्ट तिथे त्या बेवारस घरात, अनेक दिवसांपासुन एकटाच नाझी सैनिकांपासुन जीव वाचवायला त्या उजाड घरात लपुन बसलेला.
तिथे तो उपाशी अनेक दिवसांचा , दाढी वाढलेली, दशा झालेली, सैरभैर , भयभीत कसाबसा जगतोय. बाहेर आवाज होताय
बंदुकीच्या गोळ्यांचे, रणगाड्यांचे , सैनिकांचा आवाज येतोय.
हा हैराण एकटाच कसाबसा जगतोय तिथे ,हा एकेकाळचा ग्रेट पियानीस्ट सुंदर समृद्ध आयुष्य जगलेलां
हा शोधतोय खाण्यासाठी काहीतरी मग तो जर्मन सैनिक येतो अचानक, चौकशी करतो मग
एक चान्स देतो त्याला त्या घरात असलेला एक पियानो वाजवायला उत्सुकतेने
आणि मग तो पियानीस्ट त्या अवस्थेत पियानोवर बसतो ......
इथे पहा
https://vimeo.com/23290368
आधी हा पियानिस्ट फ़क्त बोटे पीयानोवर चालवण्याचा अभिनय करतो. त्या युध्याच्या धामधुमित देखील त्याचे पियानो प्रेम तसुभरहि कमी होत नाही. तो फ़क्त बोटे चालवण्याचा अभिनय करतो कारण पियानोचा आवाज ऐकून त्याची चाहूल लागण्याची शक्यता असते.
या सगळ्यात सदमा चा रेल्वे स्टेशनवरचा शेवटचा सीन,कमल हसन डोक्यावर
मडकं घेऊन माकडा सारख्या उड्या मारून रेल्वेत बसलेल्या श्रीदेवीला पूर्वीचं
आठवून द्यायचा प्रयत्न करतो,एकदम बेहतरीन सीन
कमल हासन तो कमल हासन. त्याचे ते मोठे डोळे. सगळंच बोलून जाणारे.
स्टेशनच्या प्लॅटफोर्मवर साठलेल्या पाण्यात आधी बरी झालेली श्रीदेवी निष्पाप घाईत थोडीशी सांभाळते. थोड्याच वेळात धडपडत आलेला कमल त्याच पाण्यात अडखळतो. सदमातला तो क्लायमॅक्स सीन शेवटपर्यंत पाहतो अन मला आजपण रडू येते.
१. Rainman-
टाॅम क्रूझची मैत्रीण डस्टिन हाॅफमनचं चुंबन घेते आणि विचारते - How do you feel? तो autistic असतो त्यामुळे निर्विकारपणे उत्तर देतो - wet!
२. Schindler's List -
हा तर आख्खा चित्रपटच असामान्य आहे, पण तरीही हे दोन सीन्स घर करतात - Amon Goethe हा नाझी अधिकारी. त्याला गॅस चेंबरमध्ये मारल्या गेलेल्या ज्यूंची प्रेतं जाळायला सांगण्यात आलेलं असल्यामुळे तो ते करतोय. प्रचंड धूर आणि राख आणि ती राख शिंडलरच्या गाडीवर पडते. तो प्रचंड अस्वस्थ होतो आणि इकडे गाॅथ आपलं काम किती कठीण आहे, काल एवढी प्रेतं जाळली, आज इतकी जाळायची आहेत, शिंचा वैताग अशा स्वरूपाचं काहीतरी बडबडतोय.
शेवटी निघून जाताना शिंडलर बांध फुटून रडतो आणि मी अजून किती जणांना वाचवू शकलो असतो, त्याची आठवण काढत त्या सगळ्या ज्यूंचा निरोप घेतो.
३. Godfather - अमेरिगो बोनासेरा डाॅनला भेटायला आलाय. त्याच्या मुलीचा चेहरा दोन गुंडांनी विद्रूप केलाय. त्याबदल्यात डाॅनने काहीतरी करावं अशी त्याची इच्छा आहे. तो डाॅनला पैसे देऊ करतो. डाॅन त्याला व्यथित होऊन तो आपला इतका अपमान का करतोय हे विचारतो.
शिवाय असेच आठवणारे - सामना मधला मारुती कांबळेचं काय झालं? सिंहासन मधला निळू फुल्यांना चित्रपटाच्या शेवटी आलेला झटका, आत्मविश्वास मधला नीलकांती पाटेकर तिच्या मुलाला भर रस्त्यात फोडून काढते, कळत नकळत मध्ये विक्रम गोखले आपला पाय घसरल्याची कबुली देतो - असे अनेक.
अरे इतक्या सगळ्या गदारोळात शशी कपूर ने इजाजत चित्रपटात फक्त एकाच शॉट मधे जी मजा आणलीये तो प्रसंग बघाना. आख्ख्या पिक्चरचा हायलाईट आहे हा.
"जब वे मेट " चित्रपटात असे बरेच प्रसंग आहेत.
मला प्रत्येक वेळेस त्यातील सईन नव्यानेच उलगडत जातात. शेवटच्या प्रसंगात ( गाण्यात) शाहीद कपूर च्या आईला सासू म्हणून सन्मानाने आणलय. त्यातून बरेच काही सांगितल गेलंय.
प्रतिक्रिया
+१
+२
देवदास...
हॅलो
बिग बझार
जाऊ द्या ना राव...
जाऊ दिले आहेच
जियो !
शोले मधील
पिन्जरा
ह्म्म ह्म्म्म ...........अगदीच मिळमिळीत सीन होता तो...
"बिग बझार"......!!! आणि गुरुदत्त !
छे, छे...
आपण सगळे
विचार
दिलीपकुमार आलाच नाही.
गाइड मध्ये
रोझी व राजू.....!
'शोले'
शाहरूख
एकदम सहमत
आमिरचे भाव
+१. आमीर हा खूप चांगला
+१. आमीर हा खूप चांगला
सारान्श
"माईल स्टोन" ....
खरंय.....
हो. आणि मला
आचरट भूमिका....!!
निळू भाऊ आणि अमिताभ
मनावर कायमस्वरुपी कोरला गेला
2 आखे १२ हाथ आणि शहिद...
=))
=))
स्वदेस आणि शाहरुख
"गांधी"....
अजून एक..
मला पियानीस्ट मधला तो प्रसंग फार आवडतो
थोडेसे राहिलय
या सगळ्यात सदमा चा रेल्वे
फक्त 'कमल' साठीच
कमल हासन तो कमल हासन. त्याचे
दिलीप कुमार बद्दल बीग बी काय
काही सीन्स
अरे इतक्या सगळ्या गदारोळात
सिलसिला चित्रपटातील दोन
तुम लोग मुझे वहां ढुंड रहे थे
चढ्ढा समझाओ इसे....
आवडलेला सीन... पडोसन (जुना)
आ गए!