विवीध भारतीय देवतांच्या संदर्भाने वेगवेगळ्या ध्वजस्तंभांचे उल्लेख येतात. त्यातील संस्कृत साहित्यातून मोठ्या प्रमाणावर उल्लेख येणारा एक ध्वजस्तंभ म्हणजे इंद्रध्वज होय. इंद्राचे पर्यायी नाव शक्र (पाली भाषा: सक्क) आणि ध्वज (पाली भाषा: धज?) चा पर्यायी शब्द 'केतु' मिळून इंद्रध्वजास शक्रध्वज, इंद्रकेतु, शक्रकेतु असे पर्यायी शब्द आहेत. बौद्ध वाङमयात या पर्यायांसोबतच सक्क आणि धज शब्दांसोबतसुद्धा अधिक शब्द बनवून वापरले जात असण्याची शक्यता वाटते. (दुजोरा हवा)
भारतीय देवतांच्या संदर्भाने येणारे ध्वज-स्तंभ जसे ध्वजांचे मुख्य काम करतात तसे ते विशेष प्रसंगी अथवा उत्सवांमधून काठी पूजा स्वरूपानेही भारतीय संस्कृतीत महत्वाचे राहीले आहेत.
अर्थात देवक-स्तंभ आणि काठी पूजा परंपरा या जगभरच्या मानवी संस्कृतीसोबत अतीप्राचीन काळापासून चालत आल्या आहेत. यातील बहुसंख्य काठी पूजा प्रकारांचे पुजन देवीस्वरूपात होत असावे पण भारतात इंद्रध्वजाप्रमाणे पुरुष देवतांच्या ध्वजस्तंभांचेही पुजन होतानाही दिसून येते. माझे मिसळपाव संस्थळावर आधीपासूनच गुढी उभारनी आणि महाभारतातील प्रक्षिप्त कथानकांची चर्चा असे दोन धागे आहेत. या धाग्यात त्या विषयाची अंशतः चर्चा असली तरी इंद्रध्वज हा स्वतंत्र धाग्याच्या रुपाने दखल घेण्या इतपत नक्कीच मोठा विषय असल्यामुळे वेगळा धागा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
शक्रोत्सव: इंद्रध्वजपुजनाच्या सामुदायिक उत्सवास शक्रोत्सव असे म्हणत. महाभारतात आदिपर्वात शक्रोत्सव साजरा करण्यासाठी इंद्र चेदीराज उपरिचरास सुचवतो असे वर्णन आहे. महाभारतातच खिलपर्वात श्रीकृष्ण त्याच्या संवगड्यांना इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक शक्रोत्सव (इंद्रोत्सव) बंद करण्याचा सल्ला आपल्या संवगड्यांना देतो. महाभारतातल्या आदीपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे तर खिलपर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथातून हा उत्सव साजरा करण्याच्या तिथी वेगवेगळ्या दिलेल्या दिसतात. तसेच इंद्रध्वज नेमका कसा दिसतो ते प्रतिमाविद्या (आयकॉनोग्राफी) च्या अनुषंगाने अभ्यासास उपलब्ध वर्णने कमी वाटतात जी उपलब्ध आहेत त्यात फरक जाणवतो. त्याशिवाय इतर ध्वजप्रकारांशी सरमिसळही उत्साहाने केली जाताना दिसते.
शक्रोत्सवाचे उल्लेख संस्कृत रघुवंश, भासांचे ‘मध्यमव्यायोग‘, शूद्रकाचे ‘मृच्छकटिकम्‘ नाटकांमधून येतात हि नाटके बहुधा सहाव्या शतकापुर्वी लिहिली गेली असावीत (दुजोरा हवा). उल्लेख रामायण, महाभारत आणि पुराणे असोत अथवा नाटके इंद्रध्वजाचे उल्लेख मुख्यत्वे उपमा अलंकाराच्या स्वरूपात (अगदी ठोकळेबाजपणा वाटेल एवढ्या मोठ्याप्रमाणावर) आले असावेत. हिरोंना तर इंद्रध्वजाची उपमा दिलेली दिसतेच पण युद्धांमध्ये धारातीर्तीपडणार्या व्हीलनपक्षाच्या नायकासपण इंद्रध्वजाची उपमा कुठे कुठे दिली आहे हे पाहून गंमत वाटते.
प्रामाणिकपणे सांगावयाचे झाल्यास मी मराठी विकिपीडियावर लिहिलेल्या संबंधीत लेखांना या निमीत्ताने भेट दिली जावी म्हणून, ह्या धागालेखाची रोचकता वाढवण्यासाठी इंद्रध्वजाची आणि शक्रोत्सवाची सर्व माहिती येथेच देणे शक्य असूनही टाळले आहे तेव्हा ती माहिती मराठी विकिपीडियावर वाचावी अथवा आवड आणि आवश्यकते प्रमाणे या धागा लेखाच्या प्रतिसादातून नकलवण्यास हरकत नाही.
इंद्रध्वज आणि शक्रोत्सव विषयक माहिती आंतरजालावरून शोधताना मला पडलेले काही प्रश्न असे:
१) महाभारत आदिपर्वातील शक्रोत्सवाचा उल्लेख या दुव्यावर संस्कृतातून उपलब्ध आहे. आणि हा मराठी अनुवादाचा वेगळा दुवा आहे. आंजावर अनुवाद उपलब्ध असूनही शक्रोत्सव विषयक श्लोकातील प्रत्येक शब्दाचे अर्थ वेगवेगळे लक्षात येत नाहीत. मला प्रत्येक संबंधीत श्लोकाचा शब्दवार अर्थ हवा आहे. किमान त्यातील मराठीत सध्या वापरात नसलेल्या, संस्कृत शब्दांचे मराठी अर्थ हवे आहेत. खास करून काही भाषांतरकार कोणत्यातरी संस्कृत शब्दाचा अनुवाद वेळू करत आहेत तर कोणत्या शब्दाचा अनुवाद वेळू केला जातो आहे ? वेळू आणि बांबू एकच का वेगवेगळ्या वनस्पती आहेत.
२) आदिपर्वातील शक्रोत्सवाचा आंतर्भाव भांडारकर प्राच्यविद्या संस्थेने प्रमाणीत केलेल्या आवृत्तीत आहे का ह्याची माहिती हवी आहे.
३) कृष्णाने शक्रोत्सव बंद करण्याचे सुचवले ते खिलपर्व प्रक्षिप्त असल्याचे आणि सौतीने लिहिले असण्याची शक्यता काही अभ्यासकांच्या लेखनातून दिसून आली पण एकुण आदिपर्वात चेदीराजास शक्रोत्सव चालू करण्याची सुचवणी वाचण्यासाठी कितीही रोचक असली तरी महाभारताच्या मुख्य कथानकाच्या अनुषंगाने, एकतर आदिपर्वात शक्रोत्सव उल्लेखाचे प्रयोजन समजत नाही. दुसरे असे कि खिलपर्वातील कृष्णाने शक्रोत्सव बंद करण्याचे सुचवले हा प्रक्षिप्त भाग सौतीकृत असेल तर आदिपर्वात शक्रोत्सव आरंभाचा उल्लेख प्रक्षिप्त असण्याची शक्यता असल्यास सौतीकडूनच आला असेल का त्या आधीच प्रक्षिप्त स्वरूपात आला असेल ?
४) रघुवंश, भासांचे ‘मध्यमव्यायोग‘, शूद्रकाचे ‘मृच्छकटिकम्‘ नाटकांमधून इंद्रध्वज आणि शक्रोत्सवाचे आलेले उल्लेख मुळसंस्कृत श्लोक आणि मराठी अनुवाद या स्वरूपात मिळाल्यास हवे आहेत.
५) खालील पुराणादी संस्कृत ग्रंथातून इंद्रध्वज आणि शक्रोत्सवाचे आलेले उल्लेख मुळसंस्कृत श्लोक आणि मराठी अनुवाद या स्वरूपात मिळाल्यास हवे आहेत.
पुराणादी संस्कृत ग्रंथातील उल्लेखांची यादी श्लोक क्रमांकासहीत आंजावर सापडली ती अशी:
* इन्द्रध्वज ब्रह्मवैवर्त्त ४.२१
* भविष्य ४.१३८.४९ , ४.१३९.१
* भागवत १०.४४.२३
* मत्स्य २४२.९, २४२.२४
* वराह १६४.३९ ,१६४.४०
* विष्णुधर्मोत्तर २.१५४.१३, २.१५५.५, २.१५६.१, २.१५७.१, २.१६०.१०
* हरिवंश २.१५.४ , २.१६.१+, ३.२६.१५
* वा.रामायण ४.१६.३७, ४.१७.२ , ५.४८.२४
* महाभारत आदि १७२.३ , वन ४२.८ , १४६.७० , उद्योग ५९.१५ , भीष्म ११९.९१ , द्रोण १०५.११ , शल्य ४.१६, १७.५३ , सौप्तिक ६.१६
६) बौद्ध वाङमयात इंद्र, इंद्रध्वज आणि शक्रोत्सवांचे उल्लेख असण्याची प्रथम दर्शनी शक्यता वाटते त्या दृष्टीने माहिती कुणास असल्यास हवी आहे.
७) जैन धर्मात इंद्र, इंद्रध्वज आणि शक्रोत्सवांचे सक्रीय उपयोजन आणि साहित्यातील उल्लेख असण्याची शक्यता आहे त्या संबंधी सुद्धा माहिती हवी आहे.
८) सातवाहन कालीन नाण्यावर इंद्रध्वजाचे चित्र असल्याचा आणि चित्तोढगढ येथील एका स्तंभावर इंद्रध्वजाच्या आयकॉनोग्राफीची माहिती असल्याचा उल्लेख वाचण्यात आला अशी पुरातत्व विषयक छायाचित्रे कुणास मिळाल्यास या धाग्यावर अवश्य द्यावीत
९) अजून एक शंका इंद्रास पर्यायवाची शब्द शक्र (पाली भाषा: सक्क) या शब्दाची व्युत्पत्ती काय आहे ? अथवा काय असू शकते ? इंद्राच्या विरोधी दानव गटाचे आचार्च शुक्र यांच्या नावात आणि शक्र या इंद्राच्या नावात बर्यापैकी साम्य आहे ते कसे काय ?
* मि.पा. सदस्य प्रचेतस यांच्या भाजे लेणीतील गूढ शिल्प लेखातून खालील छायाचित्र (त्यांच्या पुर्वानुमतीने त्यांचा कॉपीराइट असण्याची शक्यता) गजारूढ राजाच्या मागे एका सेवकाच्या हातात एक ध्वज दाखवला आहे. (मला हा ध्वज लक्षात येण्यास जरासा अवधी लागला :) ) स. आ. जोगळेकरांच्या हालाच्या गाथा सत्तसईवरील भाष्यात हत्तीवरील राजा इंद्र आणि मागील ध्वज इंद्रध्वज असण्याची शक्यता वर्तवली आहे. परंतु सदस्य प्रचेतस यांच्या भाजे लेणीतील गूढ शिल्प या लेखात या विषयावर तज्ञांमध्ये वेगवेगळी मते असल्याबद्दलची अधिक माहिती उपलब्ध आहे.
उपरोक्त प्रश्नातील क्रमांक ३ आणि ९ जनरल काथ्याकूटस्वरूपाचा आहे तो सोडून क्रमांक १, २, ४, ५, ६, ७ प्रश्नांच्या अनुषंगाने आलेले प्रतिसाद आणि प्रतिसादांश विकिप्रकल्पातून वापरले जाण्याची शक्यता असु शकते म्हणून प्रताधिकारमुक्त समजले जातील. क्रमांक ८ आणि छायाचित्रे नमुद करणार्याने प्रताधिकारमुक्ती विशेषत्वाने नमुद न केल्यास कॉपीराईट संबंधीत कॉपीराइट मालकाचा.
आपल्या प्रतिसादांसाठी आणि अनुषंगिकाव्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी आभार.
उपरोक्त प्रश्नातील क्रमांक ३ आणि ९ जनरल काथ्याकूटस्वरूपाचा आहे तो सोडून क्रमांक १, २, ४, ५, ६, ७ प्रश्नांच्या अनुषंगाने आलेले प्रतिसाद आणि प्रतिसादांश विकिप्रकल्पातून वापरले जाण्याची शक्यता असु शकते म्हणून प्रताधिकारमुक्त समजले जातील. क्रमांक ८ आणि छायाचित्रे नमुद करणार्याने प्रताधिकारमुक्ती विशेषत्वाने नमुद न केल्यास कॉपीराईट संबंधीत कॉपीराइट मालकाचा.
आपल्या प्रतिसादांसाठी आणि अनुषंगिकाव्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी आभार.
वर्गीकरण
वाचने
22774
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
स. आ. गाडगीळांच्या हालाच्या
ओह सॉरी स. आ. जोगळेकर असेच
In reply to स. आ. गाडगीळांच्या हालाच्या by प्रचेतस
बाकी त्या ध्वजावरील चिन्ह
In reply to स. आ. गाडगीळांच्या हालाच्या by प्रचेतस
@प्रचेतस
In reply to स. आ. गाडगीळांच्या हालाच्या by प्रचेतस
मुर्तीच्या डोक्यावरची
In reply to @प्रचेतस by माहितगार
शेपूट :)
In reply to मुर्तीच्या डोक्यावरची by माहितगार
त्रिरत्न नक्कीच नाही. टिपिकल
In reply to @प्रचेतस by माहितगार
प्रचंड खोल अभ्यास आहे आपला
प्रचंड खोल अभ्यास आहे आपला
In reply to प्रचंड खोल अभ्यास आहे आपला by कैलासवासी सोन्याबापु
सासन काठी हा बहुतेक 'शासन
In reply to प्रचंड खोल अभ्यास आहे आपला by माहितगार
'शासन काठी' च्या शक्यतेस अनुमोदन...
In reply to सासन काठी हा बहुतेक 'शासन by कैलासवासी सोन्याबापु
इंद्राचं एक नाव पाकशासन आहे.
In reply to 'शासन काठी' च्या शक्यतेस अनुमोदन... by गामा पैलवान
तरीही, इंद्रध्वज अन ह्याच्यात
In reply to प्रचंड खोल अभ्यास आहे आपला by कैलासवासी सोन्याबापु
तुम्ही विकिप्रकल्पावर घेत
यावरून आठवलं "शुक्लकाष्ट मागे
शुक्लकाष्ठ
In reply to यावरून आठवलं "शुक्लकाष्ट मागे by कंजूस
इंटरेस्टींगली एका ऑनलाइन
In reply to शुक्लकाष्ठ by अरविंद कोल्हटकर
शुष्ककाष्ठ
In reply to इंटरेस्टींगली एका ऑनलाइन by माहितगार
शुष्ककाष्ठचा अपभ्रंश असणे
In reply to शुष्ककाष्ठ by अरविंद कोल्हटकर
भारतीय देवतांच्या संदर्भाने
इंद्रध्वजास घुंगरु बांधले
In reply to भारतीय देवतांच्या संदर्भाने by सतिश गावडे
सोलापुरला गड्डा यात्रेत ७
माझा वरील प्रतिसाद अशाच
In reply to सोलापुरला गड्डा यात्रेत ७ by अभ्या..
काय दृश्य आहे (पुढच्या सती
In reply to सोलापुरला गड्डा यात्रेत ७ by अभ्या..
काठ्यांसोबत फक्त बापेच का
In reply to सोलापुरला गड्डा यात्रेत ७ by अभ्या..
काठी नाय बे अभ्या, नंदीध्वज
In reply to सोलापुरला गड्डा यात्रेत ७ by अभ्या..
आप्ल्याला म्हैते की बे. पुणे
In reply to काठी नाय बे अभ्या, नंदीध्वज by भीमराव
अभ्या,
तुम्ही म्हणता तसे असू शकते
In reply to अभ्या, by कैलासवासी सोन्याबापु
एक विश्लेषण दुवा
रोचक चर्चा.वाचतेय.माहितगार तर
छडी
पताका नंतर पटका ही शक्यता
In reply to छडी by राही
पडीक
In reply to पताका नंतर पटका ही शक्यता by माहितगार
स्पष्ट लिहिल्याबद्दल माफी
In reply to पडीक by राही
फडके (कापड) शब्दाची व्युत्पत्ती
In reply to पडीक by राही
कर्पट - कपडा, कार्पास - कापूस
In reply to छडी by राही
कार्प्टेट शब्द आठवला.
In reply to कर्पट - कपडा, कार्पास - कापूस by अरविंद कोल्हटकर
फेटा शब्द कसा आला असेल ?
In reply to कर्पट - कपडा, कार्पास - कापूस by अरविंद कोल्हटकर
पताका > पटका?
In reply to फेटा शब्द कसा आला असेल ? by माहितगार
पिटक = ?
पिटक हा शब्द ठिपका (गंधाचा)
In reply to पिटक = ? by माहितगार
पीतिका
In reply to पिटक = ? by माहितगार
यज्ञेतर पूजेचा जुना संदर्भ
सङ्कीर्येत धर्मोऽयं = धर्म संकर तर धर्म शब्दाचा अर्थ काय ?
भांडारकर संस्थेच्या प्रमाणित
उत्तम चर्चा