Skip to main content

शक्रोत्सव

इंद्रध्वज आणि शक्रोत्सव; थोडी माहिती, थोडे प्रश्न

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 04/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
विवीध भारतीय देवतांच्या संदर्भाने वेगवेगळ्या ध्वजस्तंभांचे उल्लेख येतात. त्यातील संस्कृत साहित्यातून मोठ्या प्रमाणावर उल्लेख येणारा एक ध्वजस्तंभ म्हणजे इंद्रध्वज होय. इंद्राचे पर्यायी नाव शक्र (पाली भाषा: सक्क) आणि ध्वज (पाली भाषा: धज?) चा पर्यायी शब्द 'केतु' मिळून इंद्रध्वजास शक्रध्वज, इंद्रकेतु, शक्रकेतु असे पर्यायी शब्द आहेत. बौद्ध वाङमयात या पर्यायांसोबतच सक्क आणि धज शब्दांसोबतसुद्धा अधिक शब्द बनवून वापरले जात असण्याची शक्यता वाटते.