मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इंद्रध्वज आणि शक्रोत्सव; थोडी माहिती, थोडे प्रश्न

माहितगार ·
विवीध भारतीय देवतांच्या संदर्भाने वेगवेगळ्या ध्वजस्तंभांचे उल्लेख येतात. त्यातील संस्कृत साहित्यातून मोठ्या प्रमाणावर उल्लेख येणारा एक ध्वजस्तंभ म्हणजे इंद्रध्वज होय. इंद्राचे पर्यायी नाव शक्र (पाली भाषा: सक्क) आणि ध्वज (पाली भाषा: धज?) चा पर्यायी शब्द 'केतु' मिळून इंद्रध्वजास शक्रध्वज, इंद्रकेतु, शक्रकेतु असे पर्यायी शब्द आहेत. बौद्ध वाङमयात या पर्यायांसोबतच सक्क आणि धज शब्दांसोबतसुद्धा अधिक शब्द बनवून वापरले जात असण्याची शक्यता वाटते.