लोकसत्ता मधे प्रकाशित झालेल्या 'कलेवराचा उत्सव' या लेखाच्या लेखकास हे पत्र. यातील मजकूर कुणा एका व्यक्तीस उद्देशून नसून तो केवळ एक विचार समजावा.
नमस्कार,
लोकसत्ता चा मी एक नियमित वाचक असून त्यात प्रकाशित झालेला आपला 'कलेवराचा उत्सव' हा लेख वाचला. (http://www.loksatta.com/vishesh-news/rajiv-khandekar-article-1147141/) त्याबद्दल प्रतिक्रिया देण्यासाठी म्हणून हा ई-संदेश. आपली कळकळ या लेखातून वाचकांपर्यंत नक्कीच पोचली. आपल्या अनेक मतांशी मी सहमत आहे. तरीही त्याहून अधिक मतांशी मी सहमत नाही.
सर्वप्रथम, मी एक संगीतप्रेमी आहे. शास्त्रीय संगीतापासून ते पाश्चात्य संगीतापर्यंत सगळे संगीतप्रकार मी ऐकतो, त्यांचा आनंद घेतो. जितकी रशीद खान ची भैरवी काळजात भिड्ते तितकंच एनिग्मा चं 'सॅडनेस' वेडं करतं. आपण आपल्या लेखात संगीत कळण्याचा उल्लेख केलात, त्याबद्दल इतकंच म्हणतो की संगीत कळण्यापेक्षा ते मनाला भावणं अधिक आनंददायी असतं. आपण पायथागोरस, प्लेटो या शास्तज्ञांबद्दल जे म्हणालात त्याबद्दल फारसं ज्ञान नाही, पण ते वाचून संगीताचं गणित, की गणिताचं संगीत हा प्रश्न मात्र खुणावून गेला.
त्रासच म्हणायचा तर तो लोकसंख्या, भ्रष्टाचार, प्रदूषण, राजकारण अशा गोष्टींचा जास्त होतो पण मुद्दा ढोल ताशांचा आवाज इथवर असेल तर ही गोष्ट मान्य आहे की त्यांचा आवाज अतिउच्च असल्याने त्याचा त्रास नक्कीच होऊ शकतो, होतो. विशेषतः रुग्णालयं, किंवा लहान मुलं, आपण म्हणालात त्याप्रमाणे पाळीव व इतर सगळेच प्राणी, यांना अतिउच्च आवाजाचा त्रास होऊ शकतो. त्याबद्दल काही म्हणणं नाही, ते खरं आहे. पण म्हणून 'ते संगीत नाही' असं म्हणणं ही अतिशय टोकाची भूमिका आहे. शिवाय त्यात सहभागी होणा-या मुली, त्यांचे पेहराव, त्यांचे मोकळे सोडलेले केस, किंवा बेभान होऊन त्यांचं ढोल वाजवणं, याची तुलना 'डोरा' च्या उपभोगोत्सुकतेशी करणं, हे कोत्या मनाचं लक्षण आहे. एकीकडे इझरा पौंडच्या मते ‘जे संगीत नृत्यापासून दूर जाते ते संगीत नष्ट होण्याकडे वाटचाल करते' असं आपण नमूद करता, आणि ढोल ताशांच्या तालावर मुली थिरकल्या तर त्यांचं थिरकणं आपल्याला उन्मादस्वरूप वाटतं. याचा कृपया विचार करावा.
'बधिरता ही नाचणाऱ्या व वाजवणाऱ्या व्यक्तीची अवस्था नसून आवश्यकता असते', असं आपण म्हणालात. मग भजनात तल्लीन होणारा, शास्त्रीय संगीत ऐकताना डोळे मिटून डोलणारा ही मंडळीही बधीरच म्हणायला हवीत, नाही का? जसं संगीत, तशी त्याची अनुभूती असते. आणि संगीत जरी वैश्विक असलं तरी संगीताची अनुभूती ही पूर्णपणे व्यक्तिसापेक्ष बाब आहे असं माझं मत आहे. संगीत ऐकण्याची प्रत्येकाची कारणं वेगळी असतात. कुणी ते कळतं म्हणून ऐकतो, कुणी आवडतं म्हणून ऐकतो, कुणासाठी ते ताण-तणावावरचं औषध असतं तर कुणासाठी ते गोष्टी, माणसं आठवण्याचं किंवा विसरण्याचं माध्यम असतं. संगीतातली फलश्रुती प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असते आणि म्हणूनच संगीताचे प्रकारही वेगवेगळे असतात. तेंव्हा अमूक एक वाईट आणि अमूक एक चांगलं असं त्याचं सरसकटीकरण होऊ शकत नाही. मात्र एक सामायिक गोष्ट ही की संगीताचा प्रकार कुठलाही असला तरी संगीतात प्रत्येक जण स्वतःला शोधत असतो.
उन्मादाबद्दल म्हणाल तर मान्य आहे की पब संस्कृती, अंधा-या जागेत कानठळ्या बसवणा-या आवाजात नाचणं, पुढे त्या पब संस्कृतीतून दिसणारा तथाकथित उच्चभ्रू समाजाचा ओंगळवाणा चेहरा हा उन्माद आहे. किंबहुना उन्मादाची व्याख्या खूप व्यापक आहे. केलेले नियम न जुमानणं, जिथे तिथे पैशाच्या जोरावर स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करणं, लग्नसमारंभ, उत्सव अशा प्रसंगी पैशाची बेछूट उधळण, त्याचं प्रदर्शन करणं, समोरच्याला कमी लेखणं, केवळ परवडतंय म्हणून गोष्टींची नासाडी, उधळपट्टी करणं, समाजभावना न जपणं, आपलं तेच खरं करणं, दुस-याला कमी लेखणं, असहिष्णु वर्तन करणं, ही सगळी उन्मादाचीच उदाहरणं आहेत. आणि हा बळावत चाललेला उन्माद ढोलपथकांच्या आवाजापेक्षाही जास्त घातक आहे.
सरतेशेवटी, पुन्हा संगीत, बधिरता, अवस्था, आणि डोरा कडे येतो. संगीत, मग ते कुठलंही असो, ऐकताना तुम्ही ट्रान्स मधे जाणं, तल्लीन होणं, किंवा आपल्या भाषेत बधीर होणं, हे ते संगीत तुमच्यापर्यंत पोचल्याचं लक्षण आहे, असं मी मानतो. एखादं गाणं ऐकता ऐकता अचानक अंगावर सर्रकन काटा येतो, तेंव्हा काय होतं हे सांगता येणार नाही. मी स्वतः एका ढोलपथकाचा सदस्य आहे, आणि त्या तालाची, नादाची, संगीताची मजा ही केवळ शब्दातीत आहे हे आग्रहाने सांगेन. ती आपण स्वतः त्याचा भाग होऊन अनुभवल्याशिवाय कळण्यातली नाही.
संगीत ही नशा आहे, नक्कीच आहे. त्यामुळे नशेत जसा माणूस झिंगणं ही तात्पुरती अवस्था असते तसाच संगीतात माणूस गुंगणं ही सुद्धा तात्पुरती अवस्था असते. आणि ती स्वाभाविक आहे. कुणाला कुमारजींच्या भामत भैरव रचनेतील ‘ढोल आ बजा ले रे’ ऐकून ती अवस्था मिळत असेल, तर कुणाला स्वतः ढोल वाजवून. प्रत्येकाचं माध्यम वेगळं, पण परिणाम एकच. पण केवळ एखादं संगीत आपल्या लेखी श्रवणीय नाही म्हणून त्याच्याशी संबंधित लोकांबाबत ‘स्वत:ला नसलेल्या लिंगाची इच्छापूर्ती करणारे' असं विचित्र विधान करणं, हे योग्य नाही.
आपल्याला आवाजाबद्दल असलेल्या आक्षेपाशी सहमत असलो तरीही एकंदरित आपली मतं पूर्वग्रहदूषित, आणि टोकाची वाटली. विशेषकरून आपण ढोलपथकात असणा-या फक्त मुलींचा वारंवार उल्लेख केलात, तो संकुचित वाटला. आजच्या काळात मुली या मुलांपेक्षा कुठेही मागे नाहीत, ढोलपथकात मुलींपेक्षा दुप्पट संख्येने मुलं असतात, मग आपला आक्षेप प्रत्येकावर समान असायला हवा होता. असो. वर म्हटल्याप्रमाणे निष्प्राण, उन्मादक समाज बघायचा असेल तर तो ढोल पथकांमधे नाही, प्रत्येक ठिकाणी आपल्या आजूबाजूला आहे. त्याविषयी सकारात्मक समाजकार्य होणं गरजेचं आहे, अर्थात तो मुद्दा वेगळा आहे. पण ज्या संगीतात कलेवरातही प्राण ओतण्याची ताकद आहे, त्या संगीतात रमणा-यांचा उत्सव 'कलेवरांचा उत्सव' कसा असू शकतो? यावर आपण जरूर चिंतन करा अशी मी आपल्याला विनंती करतो.
ब्लॉग दुवा हा
वाचने
54501
प्रतिक्रिया
175
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्याच्याकडे बुचं पण हैत असे
In reply to कसं बरं तुला जमतं, कित्ती by प्यारे१
अशानी तर मग कुणीच कुठेच
In reply to वेल्लाभट, प्रतिसादांचा धुरळा by मोदक
अशं नै बोलाचं बाबा. आमाला लाग
In reply to अशानी तर मग कुणीच कुठेच by पिलीयन रायडर
आपापल्या अकलेचे ढोल वाजवूदेत
In reply to अशानी तर मग कुणीच कुठेच by पिलीयन रायडर
खिक्क
In reply to अशानी तर मग कुणीच कुठेच by पिलीयन रायडर
आपली मतं दुसर्याला पटवायची
In reply to अशानी तर मग कुणीच कुठेच by पिलीयन रायडर
आपली मतं दुसर्याला पटवायची नसतील तर काय करायचं काय नक्की इथे?!!!! ;)तुमचा काय अनुभव आहे? ;)मले काय ठावे बाबा..
In reply to आपली मतं दुसर्याला पटवायची by मोदक
शहाणे करूनी सोडावे सकळजन =))
In reply to मले काय ठावे बाबा.. by पिलीयन रायडर
त्याचसाठी हे अवतारकार्य...
In reply to शहाणे करूनी सोडावे सकळजन =)) by टवाळ कार्टा
मले काय ठावे बाबा..
In reply to मले काय ठावे बाबा.. by पिलीयन रायडर
मले काय ठावे बाबा..तुझ्या खरडवहीत एकदा एक निरागस जीव ज्ञानकण शिंपडून गेला.. होता ते वाच! ;) ऑन अ सिरीयस नोट, १) "तुम्ही समस्त ढोल वाजवणार्यांची बाजू घेवून का प्रतिवाद करत आहात?" २) "तुमचे पथक नियम पाळणारे आहे असे तुम्ही म्हणता आहात.. ठीक आहे. तुम्ही बरोबर आहात तर जगाची काळजी सोडा" २.१) पब्लीक दोन्हीकडून (फक्त) बोलणारच आहे मग कशाला काळजी करा - हे ही एक! हे माझे मुद्दे आहेत. इतकेच. बाकी काही नाही.आपली मतं दुसर्याला पटवायची
In reply to अशानी तर मग कुणीच कुठेच by पिलीयन रायडर
आग्गाग्गा
In reply to आपली मतं दुसर्याला पटवायची by बॅटमॅन
कश्ला रेदादा.. मि तर तुझ्य
In reply to आपली मतं दुसर्याला पटवायची by बॅटमॅन
अग तै भन्द्न हिच तुझि
In reply to कश्ला रेदादा.. मि तर तुझ्य by पिलीयन रायडर
माझाहि एक जेन्युईन प्रश्न
In reply to वेल्लाभट, प्रतिसादांचा धुरळा by मोदक
हा प्रतिसाद वरच्या 'मोदक'ला उद्देशून आहे
In reply to माझाहि एक जेन्युईन प्रश्न by भाकरी
काय करूया म्ह्णता मग? नियम न
In reply to माझाहि एक जेन्युईन प्रश्न by भाकरी
'नियम पाळणारे' ??
In reply to काय करूया म्ह्णता मग? नियम न by मोदक
'नियम पाळणारे' ??
In reply to 'नियम पाळणारे' ?? by भाकरी
'नियम पाळणारे' ?? हॉस्पिटलच्या बाहेर ढोल वाजवायचं थांबलं की 'नियम पाळला' असं म्हणायचंय का तुम्हाला? हॉस्पिटलच्या कक्षेबाहेरच्या लोकाना ढोल वाजवण्याचा त्रास होतो तो नियमात बसतो असं वाटतं का तुम्हाला? "ढोल-ताशे, डीजे वगैरे अनावश्यक आहे" नाही तर "ढोल-ताशे, डीजे वगैरेमुळे बाकिच्याना होणारा त्रास अनावश्यक आहे" हे तुमच्या लक्षातच आलेलं दिसत नाहि.तुमच्या प्रत्येक वाक्याची चिरफाड करणारा प्रतिसाद देण्यापेक्षा एक साधा प्रश्न विचारतो. नीट विचार करून उत्तर द्या. तुम्हाला प्रॅक्टीकल सोल्यूशन हवे आहे की नुसते "माझे कोणीतरी ऐकत आहे" याचे समाधान?खरंच? त्या लेखात 'कलेवर' शब्द वापरलाय तो अगदी बरोबर वापरलाय - लोकांच्या मनाची कलेवरंच झाल्येत. ढोल-ताशांच्या आवाजावरनंच नाही तर बाकी बर्याच ठीकाणी तुझा उपाय अंमलात आणता येईल नाही का? म्हणजे बघ, रस्त्यांवरचे खड्डे, गलिच्छ राजकारण, मोबाईल फोन कंपन्यांकडून मिळणारी भिकार ग्राहकसेवा, वगैरे वगैरे अनेक गोष्टिनी होणार्या त्रासाची तीव्रता कमी करायचा सोपा उपाय - आपल्या नियंत्रणाबाहेर आहे हे मान्य करायचं. वा रे मिपाकर!!मी पुन्हा एकदा सांगतो आहे. अन्याय सहन करू नका. राजकारण वगळता वरच्या प्रत्येक गोष्टीसाठी; (ज्या गोष्टी स्मार्ट क्रायटेरीयामध्ये बसतात) उत्तरे मिळवणे तुमचा हक्क आहे आणि त्यासाठी जास्ती त्रास घ्यावा लागत नाही. तुम्हाला जेन्यूईनली उत्तरे हवी असतील तर माझाच एक धागा आहे.. त्यावर लिहा. मिपाकर नक्की मदत करतील. (बाकी वैयक्तीक भागाकडे आत्ता दुर्लक्ष केले आहे. पुढच्या वेळी तुम्हाला याच टोन मध्ये उत्तर मिळाले तर चालेल असे गृहीत धरत आहे.)सोल्यूशन हवंय
In reply to 'नियम पाळणारे' ?? by मोदक
तापत्या उन्हातून माणूस
In reply to 'नियम पाळणारे' ?? by मोदक
बरोबर.
In reply to वेल्लाभट, प्रतिसादांचा धुरळा by मोदक
कायदेशीर मुद्दा आहे रंगा काका
In reply to बरोबर. by चतुरंग
आता फटाक्यांचे उदाहरण.
In reply to कायदेशीर मुद्दा आहे रंगा काका by मोदक
अरे मोदका,
In reply to कायदेशीर मुद्दा आहे रंगा काका by मोदक
तुमचा मुद्दा सपशेल मान्य आहे.
In reply to अरे मोदका, by चतुरंग
थेंबे थेंबे तळे साचे
In reply to तुमचा मुद्दा सपशेल मान्य आहे. by मोदक
ठीक आहे.. हे ही मान्य.
In reply to थेंबे थेंबे तळे साचे by जातवेद
माझे कान ही माझी खाजगी
In reply to कायदेशीर मुद्दा आहे रंगा काका by मोदक
याच न्यायाने माझे नाक आहे
In reply to माझे कान ही माझी खाजगी by अंतरा आनंद
अहो.. डिफॉल्ट चष्मे काढून
In reply to माझे कान ही माझी खाजगी by अंतरा आनंद
एक छोटिशि शंका, एवढे ढोल
छे छे
अरे मोदक.. इथे बोलुन काहीच
बेसीक मधले घोळ पॉईंट आऊट करतो
In reply to अरे मोदक.. इथे बोलुन काहीच by पिलीयन रायडर