लोकसत्ता मधे प्रकाशित झालेल्या 'कलेवराचा उत्सव' या लेखाच्या लेखकास हे पत्र. यातील मजकूर कुणा एका व्यक्तीस उद्देशून नसून तो केवळ एक विचार समजावा.
नमस्कार,
लोकसत्ता चा मी एक नियमित वाचक असून त्यात प्रकाशित झालेला आपला 'कलेवराचा उत्सव' हा लेख वाचला. (http://www.loksatta.com/vishesh-news/rajiv-khandekar-article-1147141/) त्याबद्दल प्रतिक्रिया देण्यासाठी म्हणून हा ई-संदेश. आपली कळकळ या लेखातून वाचकांपर्यंत नक्कीच पोचली. आपल्या अनेक मतांशी मी सहमत आहे. तरीही त्याहून अधिक मतांशी मी सहमत नाही.
सर्वप्रथम, मी एक संगीतप्रेमी आहे. शास्त्रीय संगीतापासून ते पाश्चात्य संगीतापर्यंत सगळे संगीतप्रकार मी ऐकतो, त्यांचा आनंद घेतो. जितकी रशीद खान ची भैरवी काळजात भिड्ते तितकंच एनिग्मा चं 'सॅडनेस' वेडं करतं. आपण आपल्या लेखात संगीत कळण्याचा उल्लेख केलात, त्याबद्दल इतकंच म्हणतो की संगीत कळण्यापेक्षा ते मनाला भावणं अधिक आनंददायी असतं. आपण पायथागोरस, प्लेटो या शास्तज्ञांबद्दल जे म्हणालात त्याबद्दल फारसं ज्ञान नाही, पण ते वाचून संगीताचं गणित, की गणिताचं संगीत हा प्रश्न मात्र खुणावून गेला.
त्रासच म्हणायचा तर तो लोकसंख्या, भ्रष्टाचार, प्रदूषण, राजकारण अशा गोष्टींचा जास्त होतो पण मुद्दा ढोल ताशांचा आवाज इथवर असेल तर ही गोष्ट मान्य आहे की त्यांचा आवाज अतिउच्च असल्याने त्याचा त्रास नक्कीच होऊ शकतो, होतो. विशेषतः रुग्णालयं, किंवा लहान मुलं, आपण म्हणालात त्याप्रमाणे पाळीव व इतर सगळेच प्राणी, यांना अतिउच्च आवाजाचा त्रास होऊ शकतो. त्याबद्दल काही म्हणणं नाही, ते खरं आहे. पण म्हणून 'ते संगीत नाही' असं म्हणणं ही अतिशय टोकाची भूमिका आहे. शिवाय त्यात सहभागी होणा-या मुली, त्यांचे पेहराव, त्यांचे मोकळे सोडलेले केस, किंवा बेभान होऊन त्यांचं ढोल वाजवणं, याची तुलना 'डोरा' च्या उपभोगोत्सुकतेशी करणं, हे कोत्या मनाचं लक्षण आहे. एकीकडे इझरा पौंडच्या मते ‘जे संगीत नृत्यापासून दूर जाते ते संगीत नष्ट होण्याकडे वाटचाल करते' असं आपण नमूद करता, आणि ढोल ताशांच्या तालावर मुली थिरकल्या तर त्यांचं थिरकणं आपल्याला उन्मादस्वरूप वाटतं. याचा कृपया विचार करावा.
'बधिरता ही नाचणाऱ्या व वाजवणाऱ्या व्यक्तीची अवस्था नसून आवश्यकता असते', असं आपण म्हणालात. मग भजनात तल्लीन होणारा, शास्त्रीय संगीत ऐकताना डोळे मिटून डोलणारा ही मंडळीही बधीरच म्हणायला हवीत, नाही का? जसं संगीत, तशी त्याची अनुभूती असते. आणि संगीत जरी वैश्विक असलं तरी संगीताची अनुभूती ही पूर्णपणे व्यक्तिसापेक्ष बाब आहे असं माझं मत आहे. संगीत ऐकण्याची प्रत्येकाची कारणं वेगळी असतात. कुणी ते कळतं म्हणून ऐकतो, कुणी आवडतं म्हणून ऐकतो, कुणासाठी ते ताण-तणावावरचं औषध असतं तर कुणासाठी ते गोष्टी, माणसं आठवण्याचं किंवा विसरण्याचं माध्यम असतं. संगीतातली फलश्रुती प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असते आणि म्हणूनच संगीताचे प्रकारही वेगवेगळे असतात. तेंव्हा अमूक एक वाईट आणि अमूक एक चांगलं असं त्याचं सरसकटीकरण होऊ शकत नाही. मात्र एक सामायिक गोष्ट ही की संगीताचा प्रकार कुठलाही असला तरी संगीतात प्रत्येक जण स्वतःला शोधत असतो.
उन्मादाबद्दल म्हणाल तर मान्य आहे की पब संस्कृती, अंधा-या जागेत कानठळ्या बसवणा-या आवाजात नाचणं, पुढे त्या पब संस्कृतीतून दिसणारा तथाकथित उच्चभ्रू समाजाचा ओंगळवाणा चेहरा हा उन्माद आहे. किंबहुना उन्मादाची व्याख्या खूप व्यापक आहे. केलेले नियम न जुमानणं, जिथे तिथे पैशाच्या जोरावर स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करणं, लग्नसमारंभ, उत्सव अशा प्रसंगी पैशाची बेछूट उधळण, त्याचं प्रदर्शन करणं, समोरच्याला कमी लेखणं, केवळ परवडतंय म्हणून गोष्टींची नासाडी, उधळपट्टी करणं, समाजभावना न जपणं, आपलं तेच खरं करणं, दुस-याला कमी लेखणं, असहिष्णु वर्तन करणं, ही सगळी उन्मादाचीच उदाहरणं आहेत. आणि हा बळावत चाललेला उन्माद ढोलपथकांच्या आवाजापेक्षाही जास्त घातक आहे.
सरतेशेवटी, पुन्हा संगीत, बधिरता, अवस्था, आणि डोरा कडे येतो. संगीत, मग ते कुठलंही असो, ऐकताना तुम्ही ट्रान्स मधे जाणं, तल्लीन होणं, किंवा आपल्या भाषेत बधीर होणं, हे ते संगीत तुमच्यापर्यंत पोचल्याचं लक्षण आहे, असं मी मानतो. एखादं गाणं ऐकता ऐकता अचानक अंगावर सर्रकन काटा येतो, तेंव्हा काय होतं हे सांगता येणार नाही. मी स्वतः एका ढोलपथकाचा सदस्य आहे, आणि त्या तालाची, नादाची, संगीताची मजा ही केवळ शब्दातीत आहे हे आग्रहाने सांगेन. ती आपण स्वतः त्याचा भाग होऊन अनुभवल्याशिवाय कळण्यातली नाही.
संगीत ही नशा आहे, नक्कीच आहे. त्यामुळे नशेत जसा माणूस झिंगणं ही तात्पुरती अवस्था असते तसाच संगीतात माणूस गुंगणं ही सुद्धा तात्पुरती अवस्था असते. आणि ती स्वाभाविक आहे. कुणाला कुमारजींच्या भामत भैरव रचनेतील ‘ढोल आ बजा ले रे’ ऐकून ती अवस्था मिळत असेल, तर कुणाला स्वतः ढोल वाजवून. प्रत्येकाचं माध्यम वेगळं, पण परिणाम एकच. पण केवळ एखादं संगीत आपल्या लेखी श्रवणीय नाही म्हणून त्याच्याशी संबंधित लोकांबाबत ‘स्वत:ला नसलेल्या लिंगाची इच्छापूर्ती करणारे' असं विचित्र विधान करणं, हे योग्य नाही.
आपल्याला आवाजाबद्दल असलेल्या आक्षेपाशी सहमत असलो तरीही एकंदरित आपली मतं पूर्वग्रहदूषित, आणि टोकाची वाटली. विशेषकरून आपण ढोलपथकात असणा-या फक्त मुलींचा वारंवार उल्लेख केलात, तो संकुचित वाटला. आजच्या काळात मुली या मुलांपेक्षा कुठेही मागे नाहीत, ढोलपथकात मुलींपेक्षा दुप्पट संख्येने मुलं असतात, मग आपला आक्षेप प्रत्येकावर समान असायला हवा होता. असो. वर म्हटल्याप्रमाणे निष्प्राण, उन्मादक समाज बघायचा असेल तर तो ढोल पथकांमधे नाही, प्रत्येक ठिकाणी आपल्या आजूबाजूला आहे. त्याविषयी सकारात्मक समाजकार्य होणं गरजेचं आहे, अर्थात तो मुद्दा वेगळा आहे. पण ज्या संगीतात कलेवरातही प्राण ओतण्याची ताकद आहे, त्या संगीतात रमणा-यांचा उत्सव 'कलेवरांचा उत्सव' कसा असू शकतो? यावर आपण जरूर चिंतन करा अशी मी आपल्याला विनंती करतो.
ब्लॉग दुवा हा
वाचने
54811
प्रतिक्रिया
175
मिसळपाव
प्रतिक्रिया
४३४ वाचने, आणि एकपण प्रतिसाद
मुद्दामच इथे जोडतोय प्रतिसाद.
In reply to ४३४ वाचने, आणि एकपण प्रतिसाद by अन्या दातार
पब वगैरेविषयी टिपणी नाही.
In reply to मुद्दामच इथे जोडतोय प्रतिसाद. by मांत्रिक
आपल्या अनेक मतांशी मी सहमत
हरकत नाही :) जमेल तेंव्हा
In reply to आपल्या अनेक मतांशी मी सहमत by अभ्या..
मूळ लेख वाचला, तुमची मते पटली
Absolutely ..!
अर्थात
लेख वाचला.
आवाजाच्या बाबतीत मुळ लेखकाशी
एक्झॅक्टली
In reply to आवाजाच्या बाबतीत मुळ लेखकाशी by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
लेखक डाव्या विचारसरणीचे आहेत हे समजतं आहेच
पण खांडेकरांचा मुख्य मुद्दा
ढोलाच्या मोठाल्या आवाजाचा
In reply to पण खांडेकरांचा मुख्य मुद्दा by भाकरी
वेल्लाभट, हा माझा पुढचा प्रतिसाद
In reply to ढोलाच्या मोठाल्या आवाजाचा by वेल्लाभट
आपल्या ढोल वाजवण्याने लोकाना
In reply to वेल्लाभट, हा माझा पुढचा प्रतिसाद by भाकरी
...
In reply to आपल्या ढोल वाजवण्याने लोकाना by वेल्लाभट
आय होप की "मोहरमच्या
In reply to पण खांडेकरांचा मुख्य मुद्दा by भाकरी
मूळ लेखातील कानठळ्या बसवणारे
मूळ लेखाचा आशय समजून न घेता
ही पथकं म्हणजे निष्प्राण
In reply to मूळ लेखाचा आशय समजून न घेता by अंतरा आनंद
+१००००
In reply to मूळ लेखाचा आशय समजून न घेता by अंतरा आनंद
भाकरी यांचा ता.क. आवडला.
पब संस्कृती, अंधा-या जागेत
उलट रस्त्यावर नाचण्यापेक्षा
In reply to पब संस्कृती, अंधा-या जागेत by अनुप ढेरे
हो ना. नाचणं, मग त्यात पुढे
In reply to उलट रस्त्यावर नाचण्यापेक्षा by वेल्लाभट
पबमध्ये जाणार्याची परिणीती
In reply to उलट रस्त्यावर नाचण्यापेक्षा by वेल्लाभट
पबमध्ये जाणार्याची परिणीती
In reply to पबमध्ये जाणार्याची परिणीती by अनुप ढेरे
हो ना. नाचणं, मग त्यात पुढे
In reply to पबमध्ये जाणार्याची परिणीती by वेल्लाभट
तर्राट जोकर, दत्ता जोशी,
अन्तरा आनन्द यान्च्याशी १००१ % सहमत
भाकरी यांना दिलेला प्रतिसाद
In reply to अन्तरा आनन्द यान्च्याशी १००१ % सहमत by एक सामान्य मानव
मोठ मोठे आवाज ऐकण्याची सक्ती
माझे घर नदीकाठाला आहे.
---- सरावामुळे होणार्या
उच्च दाब ( हाय डेसिबल) आणि
अर्थात आपण फक्त एका
In reply to उच्च दाब ( हाय डेसिबल) आणि by दत्ता जोशी
बंदिस्त थिएटर/ सिनेमा गृह, पब
In reply to उच्च दाब ( हाय डेसिबल) आणि by दत्ता जोशी
अकारण केला जाणारा गोंगाट
In reply to उच्च दाब ( हाय डेसिबल) आणि by दत्ता जोशी
यांना बे जबाबदार पणे वागायचं
In reply to उच्च दाब ( हाय डेसिबल) आणि by दत्ता जोशी
माझ्या वरील प्रतिसादाच्या अनुषंगाने
उन्माद
जेव्हा लोकांना सामाजिक भान
In reply to उन्माद by सर्वसाक्षी
http://maharashtratimes
http://maharashtratimes
In reply to http://maharashtratimes by प्यारे१
http://maharashtratimes
हताश!
In reply to http://maharashtratimes by धोणी
हा हा
In reply to हताश! by चैतन्य ईन्या
ढोल ताशे आता दहिहंडी, नवरात्र
शिवाय
If playing Dhol on the
मग ही उर्जा वापरण्यासाठी ढोल
दुसर्याने आपल्याकडे बोट
अनावश्यक महापुरुष कोणते?
In reply to दुसर्याने आपल्याकडे बोट by दत्ता जोशी
ते नै का पोस्टरात प्रकट होतात
In reply to अनावश्यक महापुरुष कोणते? by मोदक
मी काय मुद्दा मांडला होता तो
अनावश्यक महापुरुष?
संकलानातील चूक.
ज्यांच्या जयंतीला डीजे लावून
नै वो. प्रत्येक जातीचे आणि
In reply to ज्यांच्या जयंतीला डीजे लावून by तर्राट जोकर
अहो, ते स्पीकरला अनावश्यक
In reply to ज्यांच्या जयंतीला डीजे लावून by तर्राट जोकर
ओ TJ भाऊ!
In reply to ज्यांच्या जयंतीला डीजे लावून by तर्राट जोकर
लेख आणि प्रतिक्रिया वाचून
वाचयचे कष्ट घ्या कि ...
In reply to लेख आणि प्रतिक्रिया वाचून by बॅटमॅन
वाचलंय म्हणूनच लिहितोय ओ.
In reply to वाचयचे कष्ट घ्या कि ... by दत्ता जोशी
अहो ताई,आणि त्यांनी का बरं
कै च्या कै
उगी उगी हां. अचं नै कलाचं!
In reply to कै च्या कै by दत्ता जोशी
मिरजेत जिलबी चौकाच्या आसपास
In reply to कै च्या कै by दत्ता जोशी
अरे!
In reply to कै च्या कै by दत्ता जोशी
याला मी उत्तर देणार नाही.
In reply to अरे! by राही
"घरातल्या घाणीचा विषय
तिसर्या अवताराबरोबर
In reply to "घरातल्या घाणीचा विषय by दत्ता जोशी
__/\___
In reply to तिसर्या अवताराबरोबर by बॅटमॅन
batman ,
In reply to तिसर्या अवताराबरोबर by बॅटमॅन
माझ्या प्रथम प्रतिसादातली
In reply to batman , by दत्ता जोशी
+१
In reply to माझ्या प्रथम प्रतिसादातली by बॅटमॅन
+१
In reply to +१ by दत्ता जोशी
एवढ्या वेगाने निचरा झालेला आज
In reply to +१ by बॅटमॅन
+१
In reply to तिसर्या अवताराबरोबर by बॅटमॅन
+१. प्यारे भाऊ. सर आन्खोपर.
In reply to +१ by प्यारे१
ते गणपती, नवरात्र, शिवजयंती,
+१११११११
In reply to ते गणपती, नवरात्र, शिवजयंती, by काळा पहाड
+ ११११११ अगदी अचुक !!!!
In reply to ते गणपती, नवरात्र, शिवजयंती, by काळा पहाड
+११११११११११११११११११११११
In reply to ते गणपती, नवरात्र, शिवजयंती, by काळा पहाड
नावांची टक्केवारी बघता जास्त
In reply to +११११११११११११११११११११११ by बॅटमॅन
+१११११११११११११११११११११११११११
In reply to ते गणपती, नवरात्र, शिवजयंती, by काळा पहाड
ब्ल्याक माऊंटनभौ. लैच परफेक्ट
In reply to +१११११११११११११११११११११११११११ by नीलमोहर
अहाहाहा!!!
In reply to ते गणपती, नवरात्र, शिवजयंती, by काळा पहाड
@काळा पहाड अचूक नेम +100
In reply to ते गणपती, नवरात्र, शिवजयंती, by काळा पहाड
+११११११
In reply to ते गणपती, नवरात्र, शिवजयंती, by काळा पहाड
थेट
In reply to +११११११ by जातवेद
या लेखाच्या आशयाशी
ते गणपती, नवरात्र, शिवजयंती,
सामंजस्याची आवश्यकता
In reply to ते गणपती, नवरात्र, शिवजयंती, by दिवाकर कुलकर्णी
तरीच म्हटले अजून सवाईचा
In reply to सामंजस्याची आवश्यकता by सह्यमित्र
विषयाशी निगडीत
In reply to तरीच म्हटले अजून सवाईचा by टवाळ कार्टा
एकदम सही काला पहाड़ याची
माझा पहिला प्रतिसाद
अहो वेल्लाभट फक्त ईकडेच नाहियेत
In reply to माझा पहिला प्रतिसाद by रेवती
ब...र !
In reply to अहो वेल्लाभट फक्त ईकडेच नाहियेत by भाकरी
प्रचंड सहमत
In reply to माझा पहिला प्रतिसाद by रेवती
+११११११११११११११११११
In reply to माझा पहिला प्रतिसाद by रेवती
इथे टक्कू नावाच्या आयडीने दोन
म्हणूनच मला मुख्य रस्त्यावरची
घर मुख्य रस्त्यावर आहे याचं
In reply to म्हणूनच मला मुख्य रस्त्यावरची by तर्राट जोकर
तुमच्या प्रतिसादावर माझा रोख
In reply to घर मुख्य रस्त्यावर आहे याचं by रेवती
कुणाचं काय तर कुणाचं काय.
एकूणच मूळ लेख, त्यातील
संस्कृती आपल्याच लोकांना
In reply to एकूणच मूळ लेख, त्यातील by वेल्लाभट
वाजंत्री
१+++++
In reply to वाजंत्री by भीमराव
मूळ लेख वाचला नाही
हे इनडोअर चांगलं वाटेल तै.
In reply to मूळ लेख वाचला नाही by पैसा
ग्रँड...
In reply to हे इनडोअर चांगलं वाटेल तै. by वेल्लाभट
मूळ लेख वाचला. हा देखील वाचला.
>>> सामान्य लोकांच्या
In reply to मूळ लेख वाचला. हा देखील वाचला. by चतुरंग
सूज्ञपणाने विचार आपण करणार आहोत की नाही?
In reply to मूळ लेख वाचला. हा देखील वाचला. by चतुरंग
ढोल संख्या कमी केली पाहिजेल
In reply to सूज्ञपणाने विचार आपण करणार आहोत की नाही? by चैतन्य ईन्या
ढोलपथक ही आपली परम्परा आहे का?
In reply to मूळ लेख वाचला. हा देखील वाचला. by चतुरंग
.......
ग्रँड या शब्दावरून पुन्हा जो
ओ वेल्लाभट...
In reply to ग्रँड या शब्दावरून पुन्हा जो by वेल्लाभट
धागालेखकाच्या मूळ उद्देशाचा
संस्कृतीदर्शनासाठी ढोलपथके
हा विषय काल एका डॉक्टर
In reply to संस्कृतीदर्शनासाठी ढोलपथके by टवाळ कार्टा
या नाचणार्यांच्या घरचे पालक
In reply to हा विषय काल एका डॉक्टर by सतिश गावडे
आणि असे बोलले की
In reply to हा विषय काल एका डॉक्टर by सतिश गावडे
मित्र हो, हे एक लक्षात आलंय
In reply to आणि असे बोलले की by बॅटमॅन
थोडक्यात
In reply to मित्र हो, हे एक लक्षात आलंय by अस्वस्थामा
आं?
In reply to मित्र हो, हे एक लक्षात आलंय by अस्वस्थामा
माझा निर्देश या प्रतिसादाशी
In reply to आं? by बॅटमॅन
झुंडशाही .....
"कलेवरांचा उत्सव" या लेखातील
धाग्यावर अवांतर आहे पण
नवरात्रात नऊ दिवस + कोजागिरी
In reply to धाग्यावर अवांतर आहे पण by धर्मराजमुटके
वेल्लाभट, प्रतिसादांचा धुरळा
व्हॉट्सॅपचे मल्टिपल अंगठे
In reply to वेल्लाभट, प्रतिसादांचा धुरळा by मोदक
तुम्हाला प्रतिसाद देणं
In reply to व्हॉट्सॅपचे मल्टिपल अंगठे by वेल्लाभट
कसं बरं तुला जमतं, कित्ती
In reply to तुम्हाला प्रतिसाद देणं by रेवती
त्याच्याकडे बुचं पण हैत असे
In reply to कसं बरं तुला जमतं, कित्ती by प्यारे१
अशानी तर मग कुणीच कुठेच
In reply to वेल्लाभट, प्रतिसादांचा धुरळा by मोदक
अशं नै बोलाचं बाबा. आमाला लाग
In reply to अशानी तर मग कुणीच कुठेच by पिलीयन रायडर
आपापल्या अकलेचे ढोल वाजवूदेत
In reply to अशानी तर मग कुणीच कुठेच by पिलीयन रायडर
खिक्क
In reply to अशानी तर मग कुणीच कुठेच by पिलीयन रायडर
आपली मतं दुसर्याला पटवायची
In reply to अशानी तर मग कुणीच कुठेच by पिलीयन रायडर
आपली मतं दुसर्याला पटवायची नसतील तर काय करायचं काय नक्की इथे?!!!! ;)तुमचा काय अनुभव आहे? ;)मले काय ठावे बाबा..
In reply to आपली मतं दुसर्याला पटवायची by मोदक
शहाणे करूनी सोडावे सकळजन =))
In reply to मले काय ठावे बाबा.. by पिलीयन रायडर
त्याचसाठी हे अवतारकार्य...
In reply to शहाणे करूनी सोडावे सकळजन =)) by टवाळ कार्टा
मले काय ठावे बाबा..
In reply to मले काय ठावे बाबा.. by पिलीयन रायडर
मले काय ठावे बाबा..तुझ्या खरडवहीत एकदा एक निरागस जीव ज्ञानकण शिंपडून गेला.. होता ते वाच! ;) ऑन अ सिरीयस नोट, १) "तुम्ही समस्त ढोल वाजवणार्यांची बाजू घेवून का प्रतिवाद करत आहात?" २) "तुमचे पथक नियम पाळणारे आहे असे तुम्ही म्हणता आहात.. ठीक आहे. तुम्ही बरोबर आहात तर जगाची काळजी सोडा" २.१) पब्लीक दोन्हीकडून (फक्त) बोलणारच आहे मग कशाला काळजी करा - हे ही एक! हे माझे मुद्दे आहेत. इतकेच. बाकी काही नाही.