संध्याकाळी ऑफिसवरुन सिटीत मित्रांकडे बाईक वरुन जात असेन. यूनिवरसिटी चौकातल्या जगातल्या सर्वात मोठ्या सिग्नलला गाडी बंद करून उगाच हिकडं तिकडं बघत असेन. तेवढयात एक काळं-शेंबडं पोरगं कडेवर घेतलेली -त्या पोरापेक्षा थोड़िशीच मोठी पोरगी , स्वत् अन कडेवरच्या त्या पोराला कशीबशी सावरत 'कितीही कललं तरी ते बारकं पडणार नाही' या कॉंफीडन्सनं समोर चालत येईल. क्षणार्धात डोळ्यात अतिशय करूण अन हतबल भाव आणून , मारून-मारून शिकवलंय तितकं बारकं तोंड करून खाडकन 'आशेने' आपला तळहात पुढे करेल. मी काही सेकंद तिच्याकड़े बघितल्यासारखं करून चेहरयावर खरंच आपल्या खिशात सुट्टे पैसे नसल्याची खतरुड़ एक्टिंग करून शेवटी 'खरंच नाहियेत्' असं तोंडाने सांगून तिच्याकडे दुर्लक्ष करेन. आसपासचे लोक मागून आपल्याकडेच पाहत असतील. एका क्षुल्लक द्वंदवात अङ्कलेले आपण काहीच निर्णय नाही घेणार.
झटशीर खिशात हात घालुन दोन पाच रूपये देऊही वाटतात (पण शिकलेला असल्यामुळे मी कोणताच निर्णय असा झटशीर घेत नाही??) देताना वाटतं की आपल्या या तुटपुंज्या अन तापुरत्या मदतीने या लोकांच्या आयुष्यात काहीच फरक नाही पडणारय. दिले तर ह्यां पोरांना अशीच सवय लागून हे लोक आळशी होऊन अशेच मागतकरी राहतील अन पुढे काय असं वाटतं.....अन एकदा-दोनदा-दहाधा दिलेही आधी- पण या पैशाचा काहीच उपयोग नाही -- मग पैसे द्यायचा उत्साह मावळून शेवटी मी तोंडाने आपल्यालाकडे सुट्टे पैसे नसल्याची एक्टिंग करतो...
---
ट्रेन मधे असेन. मोबाईल वर काहीतरी टाईमपास करत खिड़कीतनं अधनंमधनं बाहेर बघत प्रवास कापत. अचानक मधेच लोकांच्या कल-कलाटात एक ढोलकी वाजायला चालु होईल. "लुंगीडान्स लुंगीडान्स --फिर डर और कायको." असं काहीतरी गाणं म्हणत, लहान फाटक्या फ्रॉकमधली पोरगी -एक बारकी तारेची रिंग घेऊन त्यातून स्वत:ला वाकडं तिकडं घुसवून कसरत करेन. एवढ्या छोट्या गोल रिंगेतुन ही कशी काय इतकी लावचिक जात असेल? अन तेही एवढ्या गर्दीत जिथं नीट उभं रहायला जागा नाही अशात?? इंडिया हैज् रियली गॉट टॅलेंट -असा मी विचार करेन. तर नंतर गाणं अन कसरत ऊरकुन ती छोटी पोरगी एक ताट वाजवत पैशे मागायला डब्यातल्या सगळ्यांच्या समोर येईल. तिची कसरत कमाल असते. द्यायचे का नाही असा विचार करत मी खिशात हात घालतोच. 5चा डॉलर ताटलीत टाकतो. कसं होणार अशा पोरींचं. 5-10 मिनीट विचार करतो. नंतर काहीतरी करत-करत तो विचार नकळत बाष्पीभवनही होऊन जातो......
---
परिहार चौकात मित्राची वाट पाहत संध्याकाळी उभा असेन. पेहरावावरुन गावाकड़चं वाटेन् असं एक जोड़पं. बाईच्या कडेला एक पोरगं, माणसाच्या हाताला धरलेली एक पोरगी अन दोघांच्या हातात एक-एक बॅग. माणूस जवळ येईल अन म्हणेल की "सायबा आमी बीड कडेचे हावो. काल एसटी चुकली अन पैशे बी चोरलेया आमचे कुणीतरी. काय मदत हुईल् तर बगा देवा. गावाकडं जायचं. 200-400 तिकीटापुरते दया. अडचणीत सापड़लो हो आमी."
आपल्या जवळचं कोणी असं सापडलं तर आपल्याला कसं वाटेन? प्लस लेकरं लहान आहेत, त्यांची दया? -प्लस हा अंगाकाठी-भाषेनं-भिकारी वगैरे नाही असं वाटून कसंतरी स्वत्;ला कन्विंस करून त्याला मी 200 रूपये देतो. देवासारखे भेटलात अन आभार वगैरे मानून ते कुटुंब दुवा दिऊन निघुन जाईन. दोन मिनीट मला छान गुबगुबीत वाटेन्.
........नंतर काही दिवसांनी सेम तेच बिरहाड् योगायोगाने स्वारगेट जवळ माझ्या शेजारच्या माणसाला नगर कडच्या भाषेत "आम्ही नगरकड़चे साहेब- अन आमचे पैसे हानले म्हणून घरी जायला तिकीटाला मदत करा" असं म्हणत पैसे मागताना दिसेल.
"म्हणजे काही दिवसापूर्वी याला मदत केलेले आमी मुर्खच होतो" हे तो आमच्या शेजारीच उभा राहून- आरामात प्रूव करेल.
---
एखाद्या पोकळ दूपारी संभाजी पार्कच्या बाहेर आपण फिरत असू अन तेव्हा परडीत अंबाबाईचा फ़ोटो घेतलेली -चालता येत असेल अशी एक धड़धाकट म्हातारी आपल्या समोर उभी राहून देवीचा फ़ोटो दाखवून पैसे मागेल. असं देवाच्या नावावर तर आपण स्वत: गावाकडचे असून सुद्धा एक रुपयाही देणार नाही.
---
विशाल नगरच्या एका मध्यम हॉटेल मधे मित्रासोबत गपा मारत काचेच्या कपातुन ती “एसिडिटी” पित असू. तर अतिशय थकलेले आजोबा ज्यांला नीट उभाही राहता येत नसेल. म्हणतील -"पोरांनो जेवायला थोड़े पैसे देता का?? पोरगं संभाळत नाही, सुन सारखं कुर-कुर करते म्हणून घर सोडलं. मागून खातो आता. कधी मिळतं कधी उपाशी झोपतो. आपले दिवस कमी राहिले पोरांनो हिथं. वाटलं तर दया. नाही दिलं तरी कायी हरकत नाही. म्हणून तो शांत बसतो."
ह्याची खरंच काही काम करण्याची शक्यता नाही हे पटुन अन गरज ओळखून आपण त्याला 50 ची नोट देतो..........
---
---------------------------------------------------------
रेल्वेतले चिक्की विकणारे आंधळे, गावाकडं स्टॅण्डवर पँट धरून ओढ़णारी बारकी पोरं, दोन्ही-हात दोन्ही-पाय तुटलेल्या माणसाला पाठीवर घेऊन सिग्नलवर पैसे मागणारे दर्देवी- देवळाबाहेर देवाचा फ़ोटो मांडून आधी स्वत्:च त्यावर 10-20 ची चिल्लर टाकून दुवा देत पैशे मागणारे अवलिये, देवळाच्या आत देवाच्या पायाजवळच्या दानपेटीत पैशे टाका म्हणून ओरडत असलेले पुजारी नंतर त्या दानपेटीचा लिलाव करणारे ट्रस्टी---- तोंडावरुन तो मोरपंखाचा झाड़ू अलगद फिरवुन त्या वाळल्या भोपळयात अल्लाच्या नावाने चाराने-आठाने मागणारे जुने बाबा... स्टेशनच्या बाजूला कन्टीन्युस् बड़बडत सापाचा खेळ करून दाखवल्यावर ताटली फिरवणारे कलाकार... वासुदेव, साडी तोंडावर फेकून दुवा देणारे तृतीयपंथी, फेसबुक वर Like किंवा व्हाट्सएप्पवर फॉरवर्ड करून कॅन्सर झालेल्या मुलीच्या ऑपरेशन साठी 10 पैशे ऐड होतील म्हणून सर्क्युलेट होणारे चैन मेसेजेस अन एकूणच --पैसे मागण्याचे अशे हजारो प्रकार... कधी जेन्युइन तर कधी नुसता फार्स....
-----------------------
प्रसंग वेगवेगळे- जागा वेगवेगळ्या- वयं वेगवेगळी- डोळ्यातले भाव वेगवेगळे- मागायची कारणे वेगवेगळी- मिळालेले पैसे खर्चायच्या तरहा वेगवेगळ्या- दुवा द्यायची वाकये वेगवेगळी- देणारयाची प्रांजळता अन मागणारयाची प्रामाणिकता वेगवेगळी,
दात्याच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या... टाळायची कारणे वेगवेगळी... मनातल्या मनात चालणारे विचार वेगवेगळे.. पैसे द्यावे कि डायरेक्ट खायलाच द्यावं हे कन्फ्युजन… मागणाऱ्या बारक्या पोराला 'शिक' असं वगैरे समजवायच्या पद्धती वेगवेगळ्या.......
.
रोज समोर नकळत 1 मिनटात घडून जाणारे प्रसंग पण बॅकग्राउंडला आतमधे या प्रसंगाचं विश्व -त्यातले छुपे कॅरॅक्टर्स -ह्या सगळ्यांचं कलेक्टिव चांगलं-वाईट आणि करूण-कुत्सीत भावविश्व फार-फार मोठं आहे....आपल्या आवाक्या पलिकडलं.......
वाचने
5360
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
अश्या सगळ्यांना शिर्डी
सहमत
In reply to अश्या सगळ्यांना शिर्डी by टवाळ कार्टा
काय
मित्रा...
In reply to काय by मिसळलेला काव्यप्रेमी
खरच सुप्त मनातले हे द्वंद्व
In reply to मित्रा... by अर्थहीन
आभारी आहे आनंदा...
In reply to खरच सुप्त मनातले हे द्वंद्व by आनन्दा
विषय अगदी साधे आहेत.. नवरा
In reply to आभारी आहे आनंदा... by अर्थहीन
अश्या सगळ्यांना शिर्डी
देव कुणाच्या बापाचे नोकर
In reply to अश्या सगळ्यांना शिर्डी by तुडतुडी
मस्त
In reply to देव कुणाच्या बापाचे नोकर by टवाळ कार्टा
छानच लिहीलय...
मनातलं लिहीले आहे. त्या क्षणी
मस्त प्रतिसाद.
In reply to मनातलं लिहीले आहे. त्या क्षणी by रातराणी
काही महिन्यांपूर्वी पेपर
या सगळ्यांचे बोलावीते धनी
In reply to काही महिन्यांपूर्वी पेपर by तुडतुडी
=))
In reply to या सगळ्यांचे बोलावीते धनी by टवाळ कार्टा
सहमत. मी मध्यंतरी मुद्दाम
In reply to काही महिन्यांपूर्वी पेपर by तुडतुडी
सेम अनुभव
कुठं म्हणे हे?
In reply to सेम अनुभव by जगप्रवासी
मला एस.टी. स्टँडवर एक जण भेटला होता....
In reply to सेम अनुभव by जगप्रवासी
पैसे न देता खाऊ घालावे,
लोकांना चार दोन रुपये सरसकट
अज्जिबात नको
आपला फंडा
हम्म..
खायला द्या पैशे देऊ नका. मदत