आयटीवाले !
परवा एक लेख वाचण्यात आला. त्यात आयटीतील लोकांच्या रोजच्या जीवनमानाबद्दल लिहीले होते.
त्यां लेखाचा मतितार्थ असा होता की आयटीतील लोक खूप स्वच्छंद जगतात. त्याना हवे तेवढे पैसे उपलब्ध असतात मात्र नशिबात आईच्या हातची गरम भाकरी खाण्याचे सूख मात्र नसते.
एकूणातच समाजातील आयटीवाले हा एक छोटा वर्ग लोकांच्या चर्चेचा नेहमीच विषय असतो.
यातील काही कॉमन अभिप्राय/प्रश्न असे आहेत. तुम्हालाही असे अनुभव आले असतील्.तुम्हाला काय वाटतंय या अभिप्रायांबद्दल?
लोकांच्या मते
१)आयटीवाले भरपूर पगार मिळवतात.
२) एसी मधे बसून नुस्ते इंटरनेट बघायचे हेच तर नुस्ते काम असते. बाकी काय करतात.
३) फोनवर बोलायचे यात कसले आले काम ?
४) आयटी वाल्यांकडे भरपूर पैसे असतात त्यामुळे ते पैसे कसेही उडवतात. त्यामुळे महागाइ वाढते. जागांच्या किमती,इथपासून भाज्या आणि डाळींच्या किमती, रिक्षाचे दर वाढण्याचे कारण आयटीवाले आहेत.
५) तुमची काय मज्जा आहे एकदा ऑन साईट मिळाले की नुसते पैसे छापायचे असतात. वर्षाकाठी पन्नास एक लाख काय सहज मिळतात तुम्हाला.
६) सगळे आयटीवाले ऑनसाईट म्ह्णून अमेरीकेतच जातात.
७)तुम्हा आयटीवाल्यांमुळे उत्पादन ( म्यान्युफॅक्चरिंग) क्षेत्रात काम करणार्या मुलाना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. (मुलाला किमान पन्नास हजार पगार /३ बी एच के/सासू सासरे नको वगैरे..)
८) आयटीवाल्या मुलीना घरकाम अजिब्बात येत नाही.
९) भारत आयटीतील महसत्ता आहे तर आपल्या भारतीय कंपन्या मायक्रोसॉफ्ट इतक्या मोठ्या का नाहीत? इतकी वर्षे आपण फक्त सेवा उद्योगात का आहोत? अजूनपर्यन्त मायक्रोसॉफ्ट विंडोज सारखे एकही भारतीय प्रॉडक्ट आपण का बनवू शकलो नाही
१०)सगळे भारतीय आयटीवाले जर भारताने परत बोलावून घेतले तर अमेरीकेचा सगळा माज एका फटक्यात उतरेल.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
काय विजुभौ !
माझा पास. या गोष्टींबद्दल
बाकी माझा एक मॅनेजर मला काही
१)आयटीवाले भरपूर पगार मिळवतात
१)आयटीवाले भरपूर पगार मिळवतात.भारतातली आजची परिस्थिती ठाऊक नाही पण सात आठ वर्षांअगोदर किमान आठ दहा वर्ष किंवा अधिक अनुभव असणारे त्यांच्या अमेरिकेन काउंटरपार्टच्या तुलनेत खूपच चांगला पगार मिळवायचे. याउलट फ्रेशर्सचा पगार त्यांच्या अमेरिकन काउंटरपार्टच्या तुलनेत अतिशय लाजीरवाणा असायचा. (म्हणायचा अर्थ हा की अमेरिकेत फ्रेशरच्या दुप्पट पगार मिळवायला कदाचित १२-१३ वर्षे लागू शकतात. भारतात १२-१३ वर्षे अनुभव असणारा मा.तं अभियंता कदाचित फ्रेशच्या आठ नऊ पट पगारही मिळवायचा (आजचे ठाऊक नाही).२) एसी मधे बसून नुस्ते इंटरनेट बघायचे हेच तर नुस्ते काम असते. बाकी काय करतात.जगात कुणी कुणाला फुकट पैसे (पगार) देत नसते. संगणकीकरणामुळे एसी आजकाल प्रत्येक ठिकाणी सरकारी वा खाजगी कार्यालयात असतो. उगाच एसींना मध्ये आणू नये३) फोनवर बोलायचे यात कसले आले काम ?अगदी जुजबी अनुभव असताना परदेशातल्या व्यक्तींकडून काम वा त्याबाबतच्या अपेक्षा काही मिनिटांच्या फोन कॉलमध्ये समजावून घेऊन ते पार पाडणे हे काही वेळा चांगलेच आव्हानात्मक काम असू शकते.४) आयटी वाल्यांकडे भरपूर पैसे असतात त्यामुळे ते पैसे कसेही उडवतात. त्यामुळे महागाइ वाढते. जागांच्या किमती,इथपासून भाज्या आणि डाळींच्या किमती, रिक्षाचे दर वाढण्याचे कारण आयटीवाले आहेत.भारतातील मोठ्या शहरांमधल्या जागांच्या किमती वाढण्यासाठी भारतात काळा पैसा असणारे श्रीमंत लोक सर्वाधिक जबाबदार आहेत. त्यानंतर काही निवडक शहरांत खूप सार्या मा. तं. कंपन्यांना कार्यालये थाटू देऊन त्यांचे संख्येने अधिक शहरांत विकेंद्रीकरण होऊ न देणे हे अत्यंत अदुरदर्शी धोरण भारतातल्या विविध राज्यांच्या सरकारांनी राबवले आहे त्याचेही दुष्परिणाम सर्वांनाच सहन करावे लागत आहेत.५) तुमची काय मज्जा आहे एकदा ऑन साईट मिळाले की नुसते पैसे छापायचे असतात. वर्षाकाठी पन्नास एक लाख काय सहज मिळतात तुम्हाला.परदेशात जगण्यासाठीही पैसे लागतात. तिथला आयकर व इतर कर भारतापेक्षा अधिक असतो. त्यामुळे या दाव्यातली कमाईची रक्कम अतिरंजित आहे.६) सगळे आयटीवाले ऑनसाईट म्ह्णून अमेरीकेतच जातात.ऑनसाईट मगरपट्ट्यापासून रत्नागिरी व जळगावलाही असलेले पाहिले आहे.७)तुम्हा आयटीवाल्यांमुळे उत्पादन ( म्यान्युफॅक्चरिंग) क्षेत्रात काम करणार्या मुलाना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. (मुलाला किमान पन्नास हजार पगार /३ बी एच के/सासू सासरे नको वगैरे..)याबाबत शून्य अनुभव असल्याने भाष्य करू शकत नाही.८) आयटीवाल्या मुलीना घरकाम अजिब्बात येत नाही.समानतेच्या युगात याबाबतीत केवळ मुलींचा विचार करणे चुकीचे आहे. मी या क्षेत्रात करियर केले असल्याने बहुतांश तरुण तरुणींना व्यवस्थित घरकाम करताना पाहिले आहे. मी व माझी बायकोही व्यवस्थित घरकाम करणार्या गटातच मोडतो.९) भारत आयटीतील महसत्ता आहे तर आपल्या भारतीय कंपन्या मायक्रोसॉफ्ट इतक्या मोठ्या का नाहीत? इतकी वर्षे आपण फक्त सेवा उद्योगात का आहोत? अजूनपर्यन्त मायक्रोसॉफ्ट विंडोज सारखे एकही भारतीय प्रॉडक्ट आपण का बनवू शकलो नाहीयाबाबत फार अभ्यास नाही पण अमेरिकेसारखे नवउद्योजकांसाठी मैत्रीपूर्ण वातावरण आपल्याकडे अजिबात नव्हते. शिक्षणक्षेत्रही अजिबात प्रॅक्टिकल ओरिएन्टेड नाही. १९९१ नंतर उदारीकरणामुळे बरेच काही शक्य झाले. हेच १५-२० वर्षे आधी सुरु झाले असते तर कदाचित आज चित्र बरेच वेगळे असते.१०)सगळे भारतीय आयटीवाले जर भारताने परत बोलावून घेतले तर अमेरीकेचा सगळा माज एका फटक्यात उतरेल.असे करणे अशक्य असल्याने हे विधान भाष्य करण्याजोगे नाही.मा. तं. कंपनी!!!
त्यानंतर काही निवडक शहरांत
असहमत.
असहमत.
असहमती कबूल. मतभेदाच्या
हे क्षेत्रच जेंव्हा
मी मुबलक मनुष्यबळ नाही तर
+१ सहमत
पटत नाही
आयटीसाठी दर्जेदार मनुष्यबळ
पूर्णपणे असहमत
पण त्यापैकी कुणीही परत येऊन
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राला
नागपूर-मुंबई विमानप्रवास पुणे
हैद्राबाद विमानतळ
अवांतर - पर्सिस्टंट कंपनीचे
भौतेक ९५ च्या आधी असेल
मोठा विषय आहे
तुमचे म्हणणे मान्य पण हे
धन्यवाद
आयटीवाल्या मुलींचे उत्तान
चित्र दिसत नाही
आकडेवारी ज जोरदार आहे
पर्सिस्टन्त बर्यापैके मोठी
पर्सिस्टंटबाबतचे
बहुदा BFSI clients नसतील तर
बिलिंग रते कमी आहे म्हणून
माझ्या मित्राने पश्चिम
कोणत्या शहरात? कोणी महितीत
आज सहा वर्षांनंतरही या
उत्तम प्रतिसाद !!!!
हम्म वाचतेय.
टीआरपीचा मोह वाइट!
+१
जगातल्या प्रत्येक कामधंद्यात
गिगाबायटी चर्चा करुन काय
एसीत बसुन काम नसणारे दुसरं
:-))
आयटीवाल्यांना पुरवल्या जाणार्
आयटीमधे मनुष्यबळ व त्याची
काही चुकलं का दादा?
आयटी सोडून दुसरे सगळे काय
अरे अभ्या,
गैरसमज झाला बरं का तुमचा...
+१००
त्रिभुवनदास जव्हेरी तुमचे