Skip to main content

आयटीवाले !

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 08/10/2015 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
परवा एक लेख वाचण्यात आला. त्यात आयटीतील लोकांच्या रोजच्या जीवनमानाबद्दल लिहीले होते. त्यां लेखाचा मतितार्थ असा होता की आयटीतील लोक खूप स्वच्छंद जगतात. त्याना हवे तेवढे पैसे उपलब्ध असतात मात्र नशिबात आईच्या हातची गरम भाकरी खाण्याचे सूख मात्र नसते. एकूणातच समाजातील आयटीवाले हा एक छोटा वर्ग लोकांच्या चर्चेचा नेहमीच विषय असतो. यातील काही कॉमन अभिप्राय/प्रश्न असे आहेत. तुम्हालाही असे अनुभव आले असतील्.तुम्हाला काय वाटतंय या अभिप्रायांबद्दल? लोकांच्या मते १)आयटीवाले भरपूर पगार मिळवतात. २) एसी मधे बसून नुस्ते इंटरनेट बघायचे हेच तर नुस्ते काम असते. बाकी काय करतात. ३) फोनवर बोलायचे यात कसले आले काम ? ४) आयटी वाल्यांकडे भरपूर पैसे असतात त्यामुळे ते पैसे कसेही उडवतात. त्यामुळे महागाइ वाढते. जागांच्या किमती,इथपासून भाज्या आणि डाळींच्या किमती, रिक्षाचे दर वाढण्याचे कारण आयटीवाले आहेत. ५) तुमची काय मज्जा आहे एकदा ऑन साईट मिळाले की नुसते पैसे छापायचे असतात. वर्षाकाठी पन्नास एक लाख काय सहज मिळतात तुम्हाला. ६) सगळे आयटीवाले ऑनसाईट म्ह्णून अमेरीकेतच जातात. ७)तुम्हा आयटीवाल्यांमुळे उत्पादन ( म्यान्युफॅक्चरिंग) क्षेत्रात काम करणार्‍या मुलाना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. (मुलाला किमान पन्नास हजार पगार /३ बी एच के/सासू सासरे नको वगैरे..) ८) आयटीवाल्या मुलीना घरकाम अजिब्बात येत नाही. ९) भारत आयटीतील महसत्ता आहे तर आपल्या भारतीय कंपन्या मायक्रोसॉफ्ट इतक्या मोठ्या का नाहीत? इतकी वर्षे आपण फक्त सेवा उद्योगात का आहोत? अजूनपर्यन्त मायक्रोसॉफ्ट विंडोज सारखे एकही भारतीय प्रॉडक्ट आपण का बनवू शकलो नाही १०)सगळे भारतीय आयटीवाले जर भारताने परत बोलावून घेतले तर अमेरीकेचा सगळा माज एका फटक्यात उतरेल.

वाचने 67309
प्रतिक्रिया 209

प्रतिक्रिया

In reply to by नाव आडनाव

ओ जर्रा जपून की...आता जर जिनियस साहेब म्हणाले कि "मिपावर प्रबोधन करणे" हेच त्यांचे काम तर फट्ट म्हणता ब्रम्हहत्या व्हायची की =))

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

काय रे हे फूल्थ्रॉटल्या? दिल्लीत आय.टी. बरेच कमी आहे पण तेथे तर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होतात. तिथे चेन्नईला आय.टी. कंपन्या बर्याच आहेत असे ऐकले आहे पण त्यामानाने अत्याचार कमी असावेत. होय ना ?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अपवादानेच नियम सिद्ध होतो ना हो माईसाहेब! चंगळवाद करायला हरकत नाही, पाश्चीमात्य देशात असे करायला काहीच अडचण नाही,तिथे सामाजिक भान मोठ्या प्रमाणावर आहे, त्याच बरोबर आर्थिक संपन्नताही आहे. परंतु भारतासारख्या देशात जिथे प्रचंड प्रमाणात आर्थिक आणि लैंगिक दमन होत असते अश्या ठिकाणी तरी आर्थिक ,लैंगिक चंगळवादाचे जाहीर प्रदर्शन करु नये.हे प्रदर्शन फक्त आयटीवालेच करतात असे नव्हे ,पण भारतात आयटीवाले यात आघाडीवर असतात हे सत्य कोणी नाकरु शकत नाही.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

भारताची लोकसंख्या आणि तीत काम करणार्‍या आयटीवाल्यांची (ऑन-साइट वजा) बघितली तर आयटीवाले फार प्रभाव टाकू शकत असतील असं वाटत तर नाही. भारतात जेवढे आयटीवाले आहेत त्यापेक्षा जास्त तर दरवर्षी बलात्कार होत असतील. पण तुम्हाला काही सत्ये जास्त चांगली कळतात ह्याला आमचे आंधळे अनुमोदन!

In reply to by तर्राट जोकर

आर्थिक ,लैंगिक चंगळवादाचे जाहीर प्रदर्शन करु नये
तुमच्या मुंबापुरीत व दिल्लीत तर हे आय.टी. यायच्या कित्येक वर्षे आधीपासून चालू आहे.हिंदी चित्रपटांमध्ये जे दाखवले जाते त्यालाही आय.टी.वालेच जबाबदार का?

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

धागा शतकी करण्यासाठी तुम्चा काय रेट आहे हो फुजि !? तुम्चं रेट्कार्ड प्रसिद्ध कराच येक्दा... म्युचुअल्ली बेनेफिशियल व्हईल बगा ! =)) ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अजून धाग्यात दरेकर वा गुरूजी आलेले नाहीत.नाहीतर रविवार पर्यंत ३००च्या वर प्रतिसाद व सोमवारी धागा वाचन्मात्र.

In reply to by तर्राट जोकर

आयटी क्रांती किंवा क्रायसिस यांपैकी कशाशीच आरेसेस किंवा भाजपाचा संबंध कुणी न जोडल्यामुळे असेल.

पुण्यात ५ ते ६ फ्रेशर आईटी इंजीनियर एकाच २बीएचके मध्ये राहताना सर्रास दिसतात. विशेषत वाकड, औंध, पिंपळे सौदागर, बाणेर, हिंजवडी , येरवडा अन विमान नगर या भागात. त्यांचाकडे बघून असे काही वाटत नाही कि ते पैश्यांची उधळपट्टी, चंगळवादी जीवन वगैरे जगतात. आणि क्याम्पस प्लेसमेंट न मिळालेले उमेदवार अगदी ७ हझारांवर करीयर सुरु करताना पाहिले आहेत. तेदेखील दोन वर्षांच्या बाँड वर. स्वीच मारताना २/ ३ महिन्यांचा नोटीस पिरेड असतो, अन तेवढे थांबण्याची दुसर्या कंपनीची तयारी नसते. कंपनी दिवसाला १२ तास राबवून घेते, यातून काहींना मणक्याचे अन डोळ्यांचे विकार जडतात. थोडक्यात सरसकटीकरण योग्य होणार नाही. ऑन साईट बद्दल बोलायचे झाले तर टीम मधल्या सर्वांनाच परदेशात जायचे असते अन संधी कमी असतात त्यामुळे टीममध्ये भयानक स्पर्धा, हेवे दावे, परस्पर चुगल्या, अविश्वास राजकारण चालते. थोडक्यात मला असे म्हणायचे आहे कि बाहेरून दिसते तेवढे आत सुखासुखी नसते.

चान चान लेख वाचुन मनोरंजन झाले. मिपाकरांच्या माहितीत भर घालणारे काही जिनियस प्रतिसाद तर त्याहुनही रोचक.

वाचतोय..... पण वरील गोष्टीचा आणि आमचा काही संबंध नाही... आढळल्यास एक योगायोग समजावा....

आयटीवाले भरपूर पगार मिळवतात. - होय. (फ्रेशर्स न्हवे) २) एसी मधे बसून नुस्ते इंटरनेट बघायचे हेच तर नुस्ते काम असते. बाकी काय करतात. - मिसळपाववरुन वेळ मिळाला की बरीच कामे असतात. ती वेळेत उरकावी लागतातच. जशी एखादी कुटूंबवत्सल नोकरदार स्त्री घरातील सर्व जबाबदार्‍या पार पाडून नोकरीही व्यवस्थीत सांभाळते तसेच आय्टीवाले नेटसर्फींग करुनही क्लायंट रिक्वायरमेंट्स हसत हसत पुर्ण करत असतात. (पण यात कुम्टुंबसुख प्रकारचा बोर्‍या वाजतो, ज्याची भरपाइ घसघशीत इनकम स्वरुपात होउन जाते) ३) फोनवर बोलायचे यात कसले आले काम ? - ते नुकसान झाले की बरोबर लक्षात येते. ४) आयटी वाल्यांकडे भरपूर पैसे असतात त्यामुळे ते पैसे कसेही उडवतात. त्यामुळे महागाइ वाढते. जागांच्या किमती,इथपासून भाज्या आणि डाळींच्या किमती, रिक्षाचे दर वाढण्याचे कारण आयटीवाले आहेत. - होय. यात बर्‍यापैकी तथ्य आहे. ५) तुमची काय मज्जा आहे एकदा ऑन साईट मिळाले की नुसते पैसे छापायचे असतात. वर्षाकाठी पन्नास एक लाख काय सहज मिळतात तुम्हाला. एव्हडे नाही पण नोकरदार या वर्गात मोडुनही तोंडात बोटे जातील इतकी प्रचंड रक्कम बरेचदा नक्किच मिळुन जाते. ६) सगळे आयटीवाले ऑनसाईट म्ह्णून अमेरीकेतच जातात. - होय. पण त्यांना फक्त तिथेच जावे लागते असे नाही. ७)तुम्हा आयटीवाल्यांमुळे उत्पादन ( म्यान्युफॅक्चरिंग) क्षेत्रात काम करणार्‍या मुलाना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. (मुलाला किमान पन्नास हजार पगार /३ बी एच के/सासू सासरे नको वगैरे..) - होय. ८) आयटीवाल्या मुलीना घरकाम अजिब्बात येत नाही. - आधी वाटायचे त्यांना मेकप करणे जमत नाही, पण परप्रांतीयांशी कंपिटीशन बघता बघता म्राठी पोरी ज्या आधी पोस्टात नोकरीला आल्या आहेत प्रमाणे भासत त्या सॉलीड काँम्पीटीटीव झाल्या आहेत. असो मुळात आय्टीवाल्या मुलीने घरकाम का करावे ? आय्टीतच काम करावेना ? ९) भारत आयटीतील महसत्ता आहे तर आपल्या भारतीय कंपन्या मायक्रोसॉफ्ट इतक्या मोठ्या का नाहीत? इतकी वर्षे आपण फक्त सेवा उद्योगात का आहोत? अजूनपर्यन्त मायक्रोसॉफ्ट विंडोज सारखे एकही भारतीय प्रॉडक्ट आपण का बनवू शकलो नाही आत्मविश्वासाचा आभाव. मराठी लोक धंध्यात ज्यामुले मागे आहेत बरेचदा तेच कारण भारतीय लोक सेवा उद्योग का सोडु शकत नाहीत याला लागु होते. अर्थात काळ बदलत आहे पण अजुन लायकी आलेली नसल्याने चाचपडणॅच चालु आहे. १०)सगळे भारतीय आयटीवाले जर भारताने परत बोलावून घेतले तर अमेरीकेचा सगळा माज एका फटक्यात उतरेल. दिवास्वप्न आहे.

In reply to by द-बाहुबली

श्रीगणेश लेखमालेतील अकरावा लेख म्हणा याला.... अप्रतिम! कसला अविर्भाव नाही, सावरून घेणं नाही, जे आहे ते आहे!

In reply to by द-बाहुबली

उत्तम प्रतिसाद! बाकी नं. १० अगदी खोटं आहे असंही म्हणता येणार नाही. अगदी माज नसला उतरणार तरी घाम नक्की फुटेल. परत आलेल्या भारतीयांच्या जागी तिथले लोक घेणं आर्थिक दृष्ट्या अजिबात शक्य नसल्यामुळे तेथील कंपन्या ज्याला आम्ही क्लायंट म्हणतो त्यांचा IT इन्फ्रास्ट्रक्चर डबघाईला येऊ शकता. म्हणजेच पर्यायाने अमेरिकन अर्थव्यवस्थेला घाम फुटू शकतो. अर्थात असं प्रत्यक्षात घडवून आणणं अजिबात शक्य नाही.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

wait till chine learns english which they are doing at very rapid rate don't underestimate Philippines which already overtook india in BPO call center business

In reply to by टवाळ कार्टा

भारत व इतर राष्ट्रे यांची निवड करताना कमीत कमी पैसा हे एकमेव कारण लावले जात नसावे. सरकारी अनुदाने, सांस्कृतिक फ्लेक्सिबिलीटी, कायदे, चलनाची स्थिरता आणि अशा बर्याच गोष्टी असाव्यात. सध्यातरी आणि पुढची बरीच वर्षे (जशी मागची बरीच वर्षे कारण चीन वि. भारत हि तुलना साधारणपणे १० वर्षापूर्वी सुरु झाली) भारताला पर्याय असेल असं वाटत नाही.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

भारत व इतर राष्ट्रे यांची निवड करताना कमीत कमी पैसा हे एकमेव कारण लावले जात नसावे. >> व्यापार्‍याला पैसाच प्यारा, तो कुठे वाचतो ह्याचाच तो विचार करतो. २००८ नंतरच्या मंदीत भारतातले प्रोजेक्ट चीनमधे गेलेले बघितले आहेत सरकारी अनुदाने, सांस्कृतिक फ्लेक्सिबिलीटी, कायदे, चलनाची स्थिरता आणि अशा बर्याच गोष्टी असाव्यात. >> व्यापार्‍याला या गोष्टींचा विचार करायची काहीच गरज नाही. दोन पैसेही कुणी कमी दर देत असेल आणि तोच दर्जा मिळत असेल तर तो तिकडेच जाईल. याउप्परही थोडा कमी दर्जा चालवून घेऊन पण आत्ता पैसा वाचतोय ना असा विचार भारतातले प्रोजेक्ट चीनमधे जातांना केला गेला. वर त्यांनाही थोडा अनुभव येइल, मग याच अनुभवाचा फायदा आपल्यालाही भविष्यात होईल हा सुविचारही त्यामागे होता. कॅपीटलिस्ट हॅव नो नेशन. ओन्ली कमीशन इज दीअर रीलीजन. सध्यातरी आणि पुढची बरीच वर्षे (जशी मागची बरीच वर्षे कारण चीन वि. भारत हि तुलना साधारणपणे १० वर्षापूर्वी सुरु झाली) भारताला पर्याय असेल असं वाटत नाही. >> या भ्रमात न गेलेलेच बरे. वरच्या माझ्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे आयटी मेंदूचं क्षेत्र आहे. मेंदुवर कुणाची मक्तेदारी नाही. पासा कभीभी पलट सकता है.

In reply to by तर्राट जोकर

स्वस्त वि. टिकाऊ (थोडक्यात महाग) अशी साधी तुलना आहे ही. स्वस्त (चीन) घेणारेही असतात , टिकाऊ (अमेरिका) घेणारेही असतात. पण तुलनेने-स्वस्त आणि टिकाऊ (भारत) घेणाऱ्यांची संख्या नक्कीच जास्त असते. कुठलाही व्यापारी चार पैसे वाचतात म्हणून सगळा व्यवसाय धोक्यात नाही घालणार. IT मध्ये करोडो रुपये गुंतवणूक करणारे नक्कीच त्याचं महत्व जाणून असतील. आणि मेंदूचाच प्रश्न असेल तर तो विश्वास आपल्या लोकांच्या मेंदूवर ठेवायला काय हरकत आहे? एनीवेज, चर्चा मूळ विषयापासून भरकटतेय आणि वरून मुळ लेखातला मुद्दा नं . २ सिद्ध होण्याची भीती :).

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

तुमच्या प्रतिसादावरून मला असं जाणतंय की माझं आयटीक्षेत्राबद्दलचं ज्ञान फारच तोकडे आहे. असो. धन्यवाद!

फक्त पगार दिसतो . तो हि १० पैकी ३-४ जणांना तसा मिळतो . पण १० पैकी १० लोकांना वयाच्या २५-२६ व्या वर्षी झालेले पाठीचे विकार . डोळे / डोके दुखी , अपुऱ्या आणि कैच्या काय वेळेला झालेली / न झालेली झोप आणि त्यामुळे इतर विकार . हे सगळं बघता का ? आता म्हणाल या आणि अश्या गोष्टी असतातच कि इतर व्यवसायात .. हो असतात .. जरूर असतात . पण मग याहून जास्त पैसा पण असतो . काही लोक लेथ मशीन समोर १४ तास राबतात . . काही लोक कम्प्युटर समोर १४ तास राबतात . शेवटी हिशोब तोच . त्यामुळे . असोच

In reply to by मोदक

वा वा असं कसं!! मेकॅनिकलवाले मशिनी एसीमध्ये ठेवतील.. माणसांच काय ठाऊक नाही.. मशिनी म्हत्वाच्या बाबा...

भरपूर पॉप्कॉर्न घेऊन क्लाऊडात जावून बसलोय! होऊन जाऊद्या!

अजूनपर्यन्त मायक्रोसॉफ्ट विंडोज सारखे एकही भारतीय प्रॉडक्ट आपण का बनवू शकलो नाही ?
काय करायचं काय तुम्हाला मायक्रोसॉफ्ट विंडोज सारखे प्रॉडक्ट बनवून ? लिनक्सवर आधारीत इतक्या मोफत ऑपरेटींग सिस्टम बाजारात उपलब्ध असतांना आणि त्याच्यावर घरातल्या वापरातली जवळपास सर्वच कामे होऊ शकत असतांना (नेट सर्फिंग, चित्रपट बघणे, गाणि ऐकणे आणी बरेच काही) घरी पायरेटेड विंडोज का बरे वापरतात लोक ? बाकी आयटी म्हणजे फक्त सॉफ्टवेअरवालेच असा बर्‍याच जणांचा गोड गैरसमज आहे असे दिसते. हार्डवेअरवाल्यांना स्वतः आयटीवाले तरी आयटी क्षेत्राचे मानतात की नाही देव जाणे !!!
वासनेला खतपाणी घालणारे शरीरसौष्ठव दाखवत फिरणार्या आयटीतील तरुणी
फुलथ्रॉटल जिनियस : अगदी जोक ऑफ द इयर बरं का ! तुमची शरीरसौष्ठवाची व्याख्या आम्हाला कळु द्या एकदा.

In reply to by धर्मराजमुटके

"हार्डवेअरवाल्यांना स्वतः आयटीवाले तरी आयटी क्षेत्राचे मानतात की नाही देव जाणे" नाही मानत!!! :) :)

In reply to by रामपुरी

आता काडी टाकलेलीच हाय तर थोडी हवा पण देतो... हार्डवेअर आणि नेटवर्कींगवाले म्हणजे आयटीचे वायरमन आणि कडीया आहेत.(यात इमेल, बॅकप, स्टोरेज, सपोर्ट, अँटीवायरसवाले इत्यादी सर्वे आले) यांनी जर विटा बरोबर लावल्या नाहीत कींवा वायरींग (नेटवर्कींगसाठी खूप खालच्या दर्जाचा शब्द वापरतोय्)बरोबर केले नाही तर सॉफ्टवेअर वाल्यांनी कीतीही सुंदर सजावट केली तरी काय फायदा नाय. हे एक असे क्षेत्र आहे जीथे फक्त आणि फक्त अनुभवाला महत्व आहे. बाकी डीग्र्या आणि सर्टीफीकेशन गेले तेल लावत. काम करुन दाखवा आणि पैसे घेउन जा.. असा सरळ साधा मामला आहे.

In reply to by धर्मराजमुटके

हार्डवेअरवाल्यांना स्वतः आयटीवाले तरी आयटी क्षेत्राचे मानतात की नाही देव जाणे !!! ^^^^^ हे काही बर्याच जणांकडून ऐकलय . रादर मी स्वतः हि असंच म्हणेन . हार्डवेअर वाले आयटी कमी आणि इलेक्ट्रोनिक्स मध्ये जास्ती येतील . कारण शेवटी तुम्हाला चिप्स आणि वायर्स आणि सोकेट्स आणि पीसीबी बघायचे आहेत. हा पण नेट्वर्किंग ला मी आयटीचं अविभाज्य घटक म्हणेन . त्याशिवाय घंटा काहीच होत नाय ऐटीत . .

In reply to by टवाळ कार्टा

बी ए पासून एम टेक पर्यंत, बी सी ए पासून एम ई मेक्यानिकल इंजिनिअरपर्यंत सगळे कोणाला विचारावं तो आपला ऐटीत! माझं पोरगं मेक्यानिकल इंजिनिअर होणार ते घाबरलंय त्याला ही ऐट काय जमणारी नाही.

In reply to by बॅटमॅन

आयटीत जाण्यासाठीच बीई मेकॅनिकल करतात लोक :) ४ वर्षांचं ग्रॅज्युएशन असलं तर आयटीत नोकरी मिळण्याचे चांगले चांस आहेत म्हणून मी पण बीई मेकॅनिकल केलं होतं (त्या कॉलेजात अजूनही बीई कंप्युटर चा ऑप्शन नाही) आणि झेडएफ नावाच्या कंपनीत ३ तास नोकरी केल्यानंतर मेकॅनिकलला कायमचा रामराम केला. बाकीच्या विंजिनियरांपेक्षा (सिविल, इलेक्ट्रिकल ई.) मेकॅनिकल वाले जास्त बघितले आहेत आयटीत.

In reply to by टवाळ कार्टा

लॉजिक आहे, मॅथ्स बरोबरच्या पोरांना शिकवतो. पण आय्टीत गेलं तर १०/१२ तास हापिसात बसून काम कोण करणार?

In reply to by पैसा

पण आय्टीत गेलं तर १०/१२ तास हापिसात बसून काम कोण करणार?
खि खि खि....वरून दट्ट्या बस्ला की सगळेच बस्तात

In reply to by पैसा

चिरंजीवांना सांगा, "पर्वा इल्ले". नव्वदीच्या दशकात आयटीत आलेल्या नॉन-आयटी इंजिनियर्सपैकी ७०-८०% मेकॅनिकलचे होते. पिंचिच्या एमायडीसी मध्ये हे होताना स्वतः पाहिले आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नोकरी मिळेल. पण त्याला ती अ‍ॅप्टिट्यूड नाहीच! म्हणजे कॉम्प्युटर आंणि मोबाईलचे काहीही करू शकतो आरामात पण जन्मजात घिसाडी आहे! =))

In reply to by पैसा

पण त्याला ती अ‍ॅप्टिट्यूड नाहीच!
आर एस अगरवाल वाचायला सांगा ना त्याला. मी इंजिनीयरींगला असताना मी ही आर एस अगरवालच वाचत असे.

In reply to by सतिश गावडे

त्याला मेक्यानिकल फिल्डमधे हवी तशी नोकरी मिळाली नाही तर तो वेगळे काय करता येईल ते शोधत आहे पण आयटी अजिबात नको म्हणे. अर्थात अजून तसा वेळ आहे. बी ई ची २ वर्षे आणि मग पुढे शिकायचे असेल तर ते. बघू!

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

तसे सुरवातीला होते...नंतर इंन्फीसाठी इंन्फीचेच आधीचे पेपर बघितले तरी चालून जायचे =))

वर दिलेल्या एका प्रतिसादात इतरत्र आयटी उद्योग का येत नाहीत या बद्दल उहापोह मांडलेला आहे. सातार्‍या सारख्या शहराचे उदाहरण द्यायचे झाल्यास. तेथे सर्व पायाभूत उदा जागा वीज पाणी वगैरे.सुविधा आहेत. मात्र तेथे योग्य मनुष्यबळ उपलब्ध नाही. माझ्या एका मित्राने तेथे स्वतःची आयटी कंपनी सुरू केलेली आहे. तो पगारही व्यवस्थित देतो. मात्र बहुतेक कुशल कामगार वर्ग पुण्याला नोकरीसाठी जातो आणि त्या मित्राला उपलब्ध असलेल्या अर्धकुशल लोकाना शिकवुन काम करुन घ्यावे लागते. राजकीय नेत्यांच्या अतीअदूर्दर्शीपणामुळे तेथे आयटी कम्पन्याच काय पण इतर क्षेत्रातील उद्योगही येण्यास तयार होत नाहीत. अर्थात त्यासाठी आम्ही सातारकरच जबाबदार आहोत. असो. मुद्दा हा आहे की स्थानीक पातळीवर खरोखरच सर्वप्रकारचे कुशल कामगार उपलब्ध होत नाहीत. हेच लोक पुण्यात किंवा मुम्बैत किंवा मेट्रो शहरात बर्‍याच मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. रच्याकने : आयटी कम्पनीसाठी विमानतळ ही अत्यावश्यक बाब कधीच होउ शकत नाही.

In reply to by विजुभाऊ

आयटी कम्पनीसाठी विमानतळ ही अत्यावश्यक बाब कधीच होउ शकत नाही.
अगदी बरोबर. बंगलोर मधे सुध्दा इंटरर्नॅशनल फ्लाईट्स खुप उशीरा सुरु झाल्या (इन्फोसिस च्या स्थापनेच्या कीतीतरी नंतर). त्यातही आत्ता offshore मधुनच जास्त कामे केली जातात.

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊ.. सातार्‍यात कोणाची नि कुठली कंपनी हो ? हरकत नसेल तर सांगाल काय ? व्यनि केलात तरी चालेल. जेवढ्या कंपन्या मला माहीत आहेत त्या रोखाने मी एक सांगेन की कुशल मनुष्यबळ यायला तयार होईल पण तसं काम आणि संधी दिसत असतील तर. अजूनही बरेच जण खूप सार्‍या जुन्याच तंत्रज्ञानावर आधारित फुटकळ कामे करत असतील तर लोक का येतील ? मी बर्‍याच अनुभवी तसेच शिकणार्‍या (BSc अथवा BE) मुलांशी बोललो. त्यांचं म्हणण हेच की लोकल काम मिळालं तर आनंदच होईल पण अव्यावसायिक वातावरण (unprofessional environment) आणि काळासोबत पुढे न जाण्याची वृत्ती त्याचबरोबर अपुर्‍या संधी त्यांना आपले घर सोडायला बाध्य करतात. ( बादवे, याच प्रकारचे स्पष्टीकरण पुणे मुंबई आणि भारत सोडून सिलिकॉन वॅलीत जाणार्‍या पब्लिककडूनही ऐकलेले आहे.. :) )
राजकीय नेत्यांच्या अतीअदूर्दर्शीपणामुळे तेथे आयटी कम्पन्याच काय पण इतर क्षेत्रातील उद्योगही येण्यास तयार होत नाहीत. अर्थात त्यासाठी आम्ही सातारकरच जबाबदार आहोत.
याला +१००० .. मागे एकदा कुठल्यातरी धाग्यावर याबद्दल झालेय मला वाटतं बोलून..

माझे काही अनुभव मी स्वत: आयटीमध्ये एका प्रॉडक्ट बेस्ड कंपनीत ०२ वर्षे नोकरी करून सोडून दिली कारण कोअर इंडस्ट्रीचा अनुभव नसताना स्वत:ला बिजनेस अ‍ॅनालिस्ट/कन्सलटंट वगैरे म्हणवून घेणं मला मूर्खपणाचं वाटत होतं. २००८ची पुण्याच्या आमच्या प्रथितयश इंजिनीयरींग कॉलेजमधील गोष्ट.कॉलेजमध्ये एल अ‍ॅण्ड टी कंपनी कॅम्पससाठी आली होती. त्यांच्या दोन्ही बिजनेससाठी म्हणजे कोअर आणि एल अ‍ॅण्ड टी इंफोटेकसाठी त्यांना भरती करायची होती. दोन्हीची वेगवेगळी प्रेझेंटेशन्स झाली. कोअरच्या प्रेझेंटेशनमध्ये त्यांनी त्यांचा नवा पॉवर प्लॅण्ट बॉयलर व स्पेअर्सच्या कारखान्याचा एक विडीओ दाखवला. त्यातलं हेवी इंजिनीयरींग पाहून अनेक मुलं अ‍ॅप्टीट्यूडला बसलीच नाहीत पण दुपारच्या सेशनमध्ये इन्फोटेकसाठी परीक्षा द्यायला मात्र 'ही' गर्दी झाली. आज जसे प्रतिभावान मुले इंजिनीयरींग/सायन्स कडे गेल्याने कॉमर्स व आर्टसमध्ये एक टॅलेंट डेफिसिट तयार झाले आहे त्याचप्रकारे बहुसंख्य नवे इंजिनीयर्स,त्यांचे शिक्षण आयटीसंबंधित नसले तरी, आयटीमध्ये जात असल्याने कोअर इंडस्ट्रीत आणि त्यातही पीएसयु सेक्टरमध्येही(उत्तम वेतन असूनही) एक टॅलेंट डेफिसिट तयार झाले आहे.मेहनतीचे काम बहुसंख्यांना नको आहे. निदान मराठी इंजिनीयर्समध्ये तरी ही प्रवृत्ती मला जाणवते. आयटीचं आकर्षण असल्याच्या अनेक कारणामध्ये महत्वाची काही कारणं म्हणजे ०१. मेट्रोत राहायला मिळणे व पर्यायाने ग्लॅमरस लाइफस्टाईल जगायला मिळणे ०२.जनसंपर्क नसणे म्हणजे समाजातील तथाकथित खालच्या वर्गाशी उदा.बॅंकेत हरतर्‍हेचे कस्टमर किंवा कोअर इंडस्ट्रीमधला लेबर क्लास इत्यादींशी रोजच्या कामासाठी संपर्क येत नाही. सतत घरी व कामावर चांगल्याचुंगल्या 'दिसणार्‍या/राहणार्‍या' लोकात वावरल्यामुळे एक सुखकर, हवाहवासा असा सुपीरीआरीटी भाव मनात येतो. ०३. मेट्रोत काम करणारे अनेक आयटीवाले हे 'मायग्रंटस' आहेत याला स्थानिक पातळीवर संधींचा अभाव याबरोबरच आपल्याच गावात राहून काम केले तर आपण काय काम करतो,कसे राहतो हे इतरांना लगेच माहिती होते,समाजाची आयुष्यातली दखल वाढते हेही एक कारण आहे.त्याउलट गावापासून दूर राहिले की आपच एक दुरावा निर्माण होतो व प्रायव्हसी मिळते हाही विचार आहे. हा मुद्दा नवीन लग्न करून सासरी जाणार्‍या मुलींच्या बाबतीत जास्त जाणवतो.असो.

In reply to by ए ए वाघमारे

महत्वाचे मुद्दे.पण हेच लोक अमेरिकेस्,युरोपात जातात तेव्हा त्यांचे कौतुक होते. म्हणजे तुझ्या त्या गूगलमध्ये अमूक टक्के भारतिय्,माय्क्रोसॉफ्टमध्ये तमूक टक्के भारतीय..जोमाने काम करीत आहेत,जग बदलावे म्हणून सिलिकॉन व्हॅलीत बुद्धी पणाला लावत आहेत.. असे वाचायला मिळते.ह्यातले खरे किती?खोटे किती? विरोधाभास वाटतो.

In reply to by ए ए वाघमारे

आयटीचं आकर्षण असल्याच्या अनेक कारणामध्ये महत्वाची काही कारणं म्हणजे ०१. मेट्रोत राहायला मिळणे व पर्यायाने ग्लॅमरस लाइफस्टाईल जगायला मिळणे ०२.जनसंपर्क नसणे म्हणजे समाजातील तथाकथित खालच्या वर्गाशी उदा.बॅंकेत हरतर्‍हेचे कस्टमर किंवा कोअर इंडस्ट्रीमधला लेबर क्लास इत्यादींशी रोजच्या कामासाठी संपर्क येत नाही. सतत घरी व कामावर चांगल्याचुंगल्या 'दिसणार्‍या/राहणार्‍या' लोकात वावरल्यामुळे एक सुखकर, हवाहवासा असा सुपीरीआरीटी भाव मनात येतो. ०३. मेट्रोत काम करणारे अनेक आयटीवाले हे 'मायग्रंटस' आहेत याला स्थानिक पातळीवर संधींचा अभाव याबरोबरच आपल्याच गावात राहून काम केले तर आपण काय काम करतो,कसे राहतो हे इतरांना लगेच माहिती होते,समाजाची आयुष्यातली दखल वाढते हेही एक कारण आहे.त्याउलट गावापासून दूर राहिले की आपच एक दुरावा निर्माण होतो व प्रायव्हसी मिळते हाही विचार आहे. हा मुद्दा नवीन लग्न करून सासरी जाणार्‍या मुलींच्या बाबतीत जास्त जाणवतो.असो.
त्यातही हा पॅरा लैच भारी आहे. एकदम नेमके निरीक्षण आहे.