मेपोल - एक आनंदोत्सव
लेखनप्रकार
नमस्कार, शीर्षक वाचून कुणी या धागा लेखास निवडणूक मतदान/राजकारणाचा विषय समजून उघडले तर तुर्तास तरी क्षमस्व :) पोल हा शब्द येथे खांब अथवा काठी या अर्थाने घ्यावयाचा आहे. मेपोल हा एक बर्याच युरोपीय देशांमधला १ मे ला ( अथवा पासून चालू) होणारा ख्रिश्चनपूर्व काळापासून चालत आलेला एक मोठा आनंदोत्सव आहे. ज्यात काठ्यांना सुशोभित करणे त्यांच्या भोवती सामुहीक फेरनृत्य, गाणी अथवा मिरवणूकींचा देशपरत्वे समावेश असू शकतो.
मेपोलांचे सध्याचे स्वरुप आधूनीक पोलांचे असले तरीही उपलब्ध ऐतिहासीक संदर्भा नुसार जंगलातील वृक्ष मुळे तोडून मैदानात आणून रोवणे त्याच्या फांद्या छाटून घरोघरी आपपाल्या घराबाहेर लावणे आणि मैदानात रोवलेल्या खोडास फुले. फुल माळांनी सुशोभीत करून सांस्कृतिक कार्यक्रम पारपाडणे असे सर्वसाधारण स्वरुप आहे. जंगलातील वृक्ष मुळे तोडून मैदानात आणून रोवणे त्याच्या फांद्या छाटून पूजा करणे ह्याचे वर्णन महाभारताच्या आदीपर्वात नमुद शक्रोत्सवाच्या जवळ जाणारे तर मेपोलाच्या भोवतालच्या सामुहीक फेरनृत्याची जुनी चित्रे पाहता गुजराथी गरब्याची प्रकर्षाने आठवण यावी. मेपोलाच्या सामुहीक फेरनृत्यास इंग्रजांनी लांब रंगी बेरंगी रिब्बना लावून त्या रिब्बंनांसहीत फेरनृत्य करण्याचे आगळेच मोहक रुप दिले आहे.
ख्रिश्चनादी अब्राहमीक धर्मांच्या धर्ममार्तंडांना या मेपोलाचा इतिहास काठीपूजेपासून चालू झालेला असल्यामुळे अब्राम्हण्यम आहे. (अब्राहमीक धर्मांना हा सण नकोसा असल्यामुळे हिंदूंनी त्यावर आपला आधिकार दाखवण्यास हरकत नसावी -हिंदुधर्मीयांचा युरोमेरीकेतील लोकसंख्येचा टक्का सहज वाढेल :) ह.घा.) धर्मांची बंधने झुगारून १४ फेब्रुवारी जशी साजरी होते तशी १ मे साजरी होताना दिसते. म्हणजे कॉन्व्हेंटातून मूलांना त्या दिवशी शाळेत न पाठवल्यास सरकारी कायद्याने इंग्लंडात पालकांना जबर दंड होऊ शकतो. ख्रिश्चनांनी आणि विशेषतः प्रोटेस्टंटांनी मेपोल संस्क्र्तीवर केलेल्या सांस्कृतीक अत्याचाराचा वेगळा धागा होऊ शकेल किंवा पुढे मागे वेगळा धागा करण्याची इछा आहेच. वर महाभारताचा उल्लेख केला म्हणजे प्रत्यक्षात काठीपूजेचे उत्सव भारतातून सुरु झाल्याचे दावे लगेच करता येणार नाहीत, आमेरीका खंडात देवक स्तंभांची परंपरा होती युरोपात मे पोल आणि ओक वृक्षाची आर्चना दिसते. तर आशियात अगदी सायेबेरीया मंगोलिया चिन ते खाली पार पूर्व आशिया भारताकडे येताना ब्रह्मदेश; भारताच्या आठही दिशा; पुढे मध्यपूर्व मग मध्य एशिया मध्ये अशेरा काठ्यांच परंपरा आहे.
असो विकिमिडीया कॉमन्सवरची काही छायाचित्रे देतो तुम्हीही युट्यूबावरील लिंका द्या परदेश स्थित मराठी असाल आणि मेपोल जवळून अनुभवला असेल तर तुमचे अनुभव सांगा. मेपोलची अधिक ज्ञानकोशास उपयूक्त माहितीही देण्यास हरकत नाही पण या धाग्यावरील माहिती पूर्ण प्रतिसाद मध्ये मराठी विकिपीडियावर लेख तयार करण्यासाठी आम्ही चकटफू मध्ये वापरणार म्हणून आपले प्रतिसाद लेखन कॉपीराइट मुक्त होत असल्याचे गृहीत धरले जाईल.
स्विडन मधील एका मे पोलाची उभारणी (वस्तुतः हे छायाचित्र युकेच्या जुन्या मेपोल वर्णनांशी अधिक जुळत असण्याची शक्यता वर्णनांच्या वाचनावरुन तरी वाटते.)
मे पोल उभारणीचे १९व्या शतकातील एक चित्र विकिमिडीया कॉमन्सवर छायाचित्रास Frederick Goodall Raising the Maypole असे नाव दिले आहे.
हे एक रंगीबेरंगी मेपोलाचे छायाचित्र
इंग्लडातील मेपोल नृत्ये मेपोल काठीस रिब्बन सोडलेल्या असतात सहभागी लोक त्यास धरून नृत्यकरतात.
इंग्लंडा आणि युरोपातील शाळेतील मुले मेपोलाभोवती फेर धरुन नृत्य करताना
आमेरीकेत साजरे होत असलेले अंग्रेजी पद्धतीचे मेपोलनृत्य
जर्मनीतील एक मेपोल दृष्य
Prangstangen म्हणजे काही गावात खालील प्रमाणे मेपोलांना फुलांनी सजवले जाते आणि मेपोलांची शोभायात्रा वगैरे काढली जाते.
सर्व छायाचित्र सौजन्य : विकिमिडीया कॉमन्स
हे एक रंगीबेरंगी मेपोलाचे छायाचित्र
इंग्लडातील मेपोल नृत्ये मेपोल काठीस रिब्बन सोडलेल्या असतात सहभागी लोक त्यास धरून नृत्यकरतात.
आमेरीकेत साजरे होत असलेले अंग्रेजी पद्धतीचे मेपोलनृत्य
Prangstangen म्हणजे काही गावात खालील प्रमाणे मेपोलांना फुलांनी सजवले जाते आणि मेपोलांची शोभायात्रा वगैरे काढली जाते.
वाचने
13835
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
मेपोलविषयी पहिल्यांदाच समजले.
मार्च ते जुन या दरम्यान बरेच
In reply to मार्च ते जुन या दरम्यान बरेच by मधुरा देशपांडे
माझे स्वतःचे सध्या चार सहा
In reply to माझे स्वतःचे सध्या चार सहा by माहितगार
तुर्किश प्रकार दिसतो आहे.
In reply to माझे स्वतःचे सध्या चार सहा by माहितगार
या पेजवरील जर्मन फारच अवघड
ब्रिटीश आणि युरोपीय लोक
आपल्या काही गावांमध्ये बगाड असते,
In reply to आपल्या काही गावांमध्ये बगाड असते, by gogglya
या काठी प्रकारांचा अभ्यास
In reply to या काठी प्रकारांचा अभ्यास by माहितगार
बगाड बद्दल
पहिल्यांदाच कळली ही माहीती.
मेपोलबद्दल प्रथमचं माहिती
रोचक प्रकार आहे
In reply to रोचक प्रकार आहे by श्रीरंग_जोशी
नेटिव्ह अमेरिकन्समध्ये
काळात जेवढे मागे जात राहतो
In reply to काळात जेवढे मागे जात राहतो by डॉ सुहास म्हात्रे
काळात जेवढे मागे जात राहतो
मेपोल विषयी इतकी माहिती
इतरत्र व्यस्त असल्यामुळे
नविन माहिती कळाली. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shake... Shake... Shake... That B**ty... ;) :- Balwinder Singh Famous Ho Gayaमेपोल भारतात सुद्धा आहे की
In reply to मेपोल भारतात सुद्धा आहे की by कैलासवासी सोन्याबापु
ग्रेट हे माहित नव्हते, १५
In reply to मेपोल भारतात सुद्धा आहे की by कैलासवासी सोन्याबापु
तुमचे बरोबर दिसते टाइम्स ऑफ
In reply to मेपोल भारतात सुद्धा आहे की by कैलासवासी सोन्याबापु
जरासं अवांतर
मी जो आधुनिक सन्दर्भ दिला तो
In reply to मी जो आधुनिक सन्दर्भ दिला तो by कैलासवासी सोन्याबापु
महाराष्ट्रात मेपोल हा स्थानिक
In reply to मी जो आधुनिक सन्दर्भ दिला तो by कैलासवासी सोन्याबापु
हो.. हे अजून कसं कुणी म्हटलं
In reply to हो.. हे अजून कसं कुणी म्हटलं by मस्त कलंदर
आपला मेपोल वरून चौथ्या फोटोत
गोफनृत्य
In reply to गोफनृत्य by राही
रोचक, हे माहित नव्हते आत्ता
In reply to रोचक, हे माहित नव्हते आत्ता by माहितगार
गोफ
In reply to गोफ by राही
शारिरिक शि़क्षण अभ्यासक्रमात
In reply to शारिरिक शि़क्षण अभ्यासक्रमात by अभ्या..
अमरावती च्या श्री हनुमान
छान
होळी
In reply to होळी by पैसा
हि माहिती रोचक आहे. ( बाकी
काही तर्क-वितर्क असे तसेच आणि लंबेचौडे.
In reply to काही तर्क-वितर्क असे तसेच आणि लंबेचौडे. by राही
स्तूप (प्राकृत ठूप)चे
In reply to स्तूप (प्राकृत ठूप)चे by माहितगार
छान
In reply to छान by राही
धन्यवाद