तू ये वाचली आणि त्यातला आव्हानाचा टोन भयंकर आवडला. त्यात आज आमच्या राशीत जिलबी पाडू योग आलेला दिसत असल्याने आम्ही लगेच वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले. चू. भू. द्या. घ्या.
रानोमाळ भटकणारे तुझे निर्णय,
आणि जर तरच्या लाटांवर हेलकावे खाणारी तुझी नौका,
तुझा किनारा असो तुलाच लखलाभ!
मी समर्थ आहे! माझी नौका तारून न्यायला क्षितीजाच्याही पार!
पेन्सील वापरायची तुझी जुनी सवय,
कारण झालेल्या चुका खोडता येतात, बरोबर उत्तर लिहण्यासाठी
तुझी कोरी वही असो तुलाच लखलाभ!
मी समर्थ आहे! खाडाखोडीने भरलेलं आयुष्याच पुस्तक लिहायला!
डोळ्यांत हजार स्वप्नं घेऊन येतोस,
निराशेच्या एका रात्री ती सगळी सगळी परत करतोस,
तुझं हे अंधाराला शरण जाणं असो तुलाच लखलाभ!
मी समर्थ आहे! त्याच अंधारात माझ्या स्वप्नांचे कोवळे अंकुर पेरायला!
नदी होऊन मी भेटाव ही तुझी अपेक्षा,
तू तुझी वाट वाकडी करून नाहीच येणार माझ्याकडे.
तुझ्या ह्या अपेक्षा असो तुलाच लखलाभ!
मी समर्थ आहे! बेधुंद होऊन पुन्हा पुन्हा याच शिखरावरून कोसळायला!
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच अप्रतिम
मस्तच
अप्रतिम
केवळ अप्रतिम!
केवळ अप्रतिम!
बहोत अच्छे.
बहोत अच्छे.
फारच सुंदर !
फारच सुंदर !
..मूळ स्त्रोतापेक्षाही उजवी.
+11111
In reply to फारच सुंदर ! by सस्नेह
+11111
स्त्रोत? कुठंय स्त्रोत?
In reply to फारच सुंदर ! by सस्नेह
स्त्रोत? कुठंय स्त्रोत?
अतिशय सुंदर !
अतिशय सुंदर !
सुंदर!
सुंदर!
शेवटचं कडवं तर क्लासच्च!!!
+१ आखिरत को सलाम!
In reply to सुंदर! by मांत्रिक
+१
आखिरत को सलाम!
मस्त
खूप छान.शेवटचं कडवं तर कळसच. वाचन खूण साठविली आहे.
अप्रतिम!!!!!!!!!!!
केवळ अप्रतिम!
खूप छान..
सुंदर !!
धन्यवाद !
धन्यवाद !
क्या बात है!
याला म्हणतात खरा बंडखोरपणा! (बंडखोरपणा= revolt/ rebellion याअर्थी)
वाचनखूण साठवली आहे.
सुंदर कविता.
सुंदर कविता.
डोळ्यांत हजार स्वप्नं घेऊन
डोळ्यांत हजार स्वप्नं घेऊन येतोस,
निराशेच्या एका रात्री ती सगळी सगळी परत करतोस,
तुझं हे अंधाराला शरण जाणं असो तुलाच लखलाभ!
मी समर्थ आहे! त्याच अंधारात माझ्या स्वप्नांचे कोवळे अंकुर पेरायला! किती चपखल उदाहरण आहे! पुरुष असाच असतो, निराशेच्या छोट्याशा धक्क्यानेही स्वप्ने बदलणारा! आणि स्त्री!!! मनाची खमकी!!! तुटलेल्या स्वप्नांतून देखील एक सुंदर शिवणकाम निर्माण करणारी!!! सलाम तुमच्या लेखणीला!!!
आवेश छान पकडलाय.
आवेश छान पकडलाय.
जबरदस्त
अशी आव्हाने पेलणारे असतील तरच आव्हान देण्यात अर्थ आहे !
अन्यथा आव्हानच काय "आवाहन" ही व्यर्थ आहे !
अभामिपाजिल्बीबुवासंघ्संचालीत्यमकजमक्जुळवणी संघ
क्या बात क्या बात क्या बात
मस्त आवेशात लिहिली आहे
कविता वाचुन अशीच एक बंडखोर मैत्रीण आठवली.
एवढी वर्ष झाली अजूनही ती तशीच आहे.
पैजारबुवा,
रानोमाळ भटकणारे तुझे निर्णय,
अहाहाहा
आवडले, भिडले, भावले, पटले.
सुरेख.
झक्कास
झक्कास
क्लास! केवळ क्लास !! वाह!
क्लास!
केवळ क्लास !!
वाह!
सुरेख...
सुरेख...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dekhoon Tujhe To Pyaar Aaye... ;) :- Apne
सर्वांचे आभार _/\_
सर्वांचे आभार _/\_
लय भारी
लय भारी