✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लखलाभ!

र — रातराणी, Sun, 09/13/2015 - 14:01
तू ये वाचली आणि त्यातला आव्हानाचा टोन भयंकर आवडला. त्यात आज आमच्या राशीत जिलबी पाडू योग आलेला दिसत असल्याने आम्ही लगेच वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले. चू. भू. द्या. घ्या. रानोमाळ भटकणारे तुझे निर्णय, आणि जर तरच्या लाटांवर हेलकावे खाणारी तुझी नौका, तुझा किनारा असो तुलाच लखलाभ! मी समर्थ आहे! माझी नौका तारून न्यायला क्षितीजाच्याही पार! पेन्सील वापरायची तुझी जुनी सवय, कारण झालेल्या चुका खोडता येतात, बरोबर उत्तर लिहण्यासाठी तुझी कोरी वही असो तुलाच लखलाभ! मी समर्थ आहे! खाडाखोडीने भरलेलं आयुष्याच पुस्तक लिहायला! डोळ्यांत हजार स्वप्नं घेऊन येतोस, निराशेच्या एका रात्री ती सगळी सगळी परत करतोस, तुझं हे अंधाराला शरण जाणं असो तुलाच लखलाभ! मी समर्थ आहे! त्याच अंधारात माझ्या स्वप्नांचे कोवळे अंकुर पेरायला! नदी होऊन मी भेटाव ही तुझी अपेक्षा, तू तुझी वाट वाकडी करून नाहीच येणार माझ्याकडे. तुझ्या ह्या अपेक्षा असो तुलाच लखलाभ! मी समर्थ आहे! बेधुंद होऊन पुन्हा पुन्हा याच शिखरावरून कोसळायला!

प्रतिक्रिया द्या
4961 वाचन

💬 प्रतिसाद (25)

मस्तच अप्रतिम

एक एकटा एकटाच
Sun, 09/13/2015 - 14:09 नवीन
मस्तच अप्रतिम
  • Log in or register to post comments

केवळ अप्रतिम!

पद्मावति
Sun, 09/13/2015 - 14:19 नवीन
केवळ अप्रतिम!
  • Log in or register to post comments

बहोत अच्छे.

प्यारे१
Sun, 09/13/2015 - 14:23 नवीन
बहोत अच्छे.
  • Log in or register to post comments

फारच सुंदर !

सस्नेह
Sun, 09/13/2015 - 14:51 नवीन
फारच सुंदर ! ..मूळ स्त्रोतापेक्षाही उजवी.
  • Log in or register to post comments

+11111

दमामि
Sun, 09/13/2015 - 15:17 नवीन
+11111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

स्त्रोत? कुठंय स्त्रोत?

प्यारे१
Sun, 09/13/2015 - 15:28 नवीन
स्त्रोत? कुठंय स्त्रोत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

अतिशय सुंदर !

प्राची अश्विनी
Sun, 09/13/2015 - 15:31 नवीन
अतिशय सुंदर !
  • Log in or register to post comments

सुंदर!

मांत्रिक
Sun, 09/13/2015 - 15:50 नवीन
सुंदर! शेवटचं कडवं तर क्लासच्च!!!
  • Log in or register to post comments

+१ आखिरत को सलाम!

अत्रुप्त आत्मा
Mon, 09/14/2015 - 09:46 नवीन
+१ आखिरत को सलाम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

मस्त

प्रियाजी
Sun, 09/13/2015 - 17:52 नवीन
खूप छान.शेवटचं कडवं तर कळसच. वाचन खूण साठविली आहे.
  • Log in or register to post comments

अप्रतिम!!!!!!!!!!!

सावत्या
Sun, 09/13/2015 - 18:34 नवीन
केवळ अप्रतिम!
  • Log in or register to post comments

खूप छान..

नीलमोहर
Sun, 09/13/2015 - 19:53 नवीन
सुंदर !!
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

रातराणी
Sun, 09/13/2015 - 20:49 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments

क्या बात है!

बहुगुणी
Sun, 09/13/2015 - 21:12 नवीन
याला म्हणतात खरा बंडखोरपणा! (बंडखोरपणा= revolt/ rebellion याअर्थी) वाचनखूण साठवली आहे.
  • Log in or register to post comments

सुंदर कविता.

रेवती
Sun, 09/13/2015 - 21:26 नवीन
सुंदर कविता.
  • Log in or register to post comments

डोळ्यांत हजार स्वप्नं घेऊन

मांत्रिक
Sun, 09/13/2015 - 22:13 नवीन
डोळ्यांत हजार स्वप्नं घेऊन येतोस, निराशेच्या एका रात्री ती सगळी सगळी परत करतोस, तुझं हे अंधाराला शरण जाणं असो तुलाच लखलाभ! मी समर्थ आहे! त्याच अंधारात माझ्या स्वप्नांचे कोवळे अंकुर पेरायला! किती चपखल उदाहरण आहे! पुरुष असाच असतो, निराशेच्या छोट्याशा धक्क्यानेही स्वप्ने बदलणारा! आणि स्त्री!!! मनाची खमकी!!! तुटलेल्या स्वप्नांतून देखील एक सुंदर शिवणकाम निर्माण करणारी!!! सलाम तुमच्या लेखणीला!!!
  • Log in or register to post comments

आवेश छान पकडलाय.

एस
Sun, 09/13/2015 - 22:52 नवीन
आवेश छान पकडलाय.
  • Log in or register to post comments

जबरदस्त

नाखु
Mon, 09/14/2015 - 09:11 नवीन
अशी आव्हाने पेलणारे असतील तरच आव्हान देण्यात अर्थ आहे ! अन्यथा आव्हानच काय "आवाहन" ही व्यर्थ आहे ! अभामिपाजिल्बीबुवासंघ्संचालीत्यमकजमक्जुळवणी संघ
  • Log in or register to post comments

क्या बात क्या बात क्या बात

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 09/14/2015 - 09:19 नवीन
मस्त आवेशात लिहिली आहे कविता वाचुन अशीच एक बंडखोर मैत्रीण आठवली. एवढी वर्ष झाली अजूनही ती तशीच आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

रानोमाळ भटकणारे तुझे निर्णय,

अभ्या..
Mon, 09/14/2015 - 11:00 नवीन
रानोमाळ भटकणारे तुझे निर्णय, आणि जर तरच्या लाटांवर हेलकावे खाणारी तुझी नौका, तुझा किनारा असो तुलाच लखलाभ! मी समर्थ आहे! माझी नौका तारून न्यायला क्षितीजाच्याही पार!
अहाहाहा आवडले, भिडले, भावले, पटले. सुरेख.
  • Log in or register to post comments

झक्कास

तुडतुडी
Mon, 09/14/2015 - 17:28 नवीन
झक्कास
  • Log in or register to post comments

क्लास! केवळ क्लास !! वाह!

वेल्लाभट
Tue, 09/15/2015 - 12:13 नवीन
क्लास! केवळ क्लास !! वाह!
  • Log in or register to post comments

सुरेख...

मदनबाण
Tue, 09/15/2015 - 14:24 नवीन
सुरेख... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Dekhoon Tujhe To Pyaar Aaye... ;) :- Apne
  • Log in or register to post comments

सर्वांचे आभार _/\_

रातराणी
गुरुवार, 09/17/2015 - 05:19 नवीन
सर्वांचे आभार _/\_
  • Log in or register to post comments

लय भारी

धनावडे
Sat, 12/03/2016 - 04:09 नवीन
लय भारी
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा