विविधभारतीच्या 'आपकी फर्माईश' मधली
'काही' गाणी इच्छा नसताना ऐकणे;
त्यात मध्यरात्री हे कुत्र्यांचे भुंकणे;
सर्व बाजूंनी गुणगुणना-या डासांची
'अ'मानवी ठरावी अशीच कत्तल करीत बसणे;
मध्येच, बाहेरच्या रस्त्यावर, एखाद्या गाडीच्या चाकाला
खड्ड्यात डोकावून पाहताना
'ब्रेक' नावाच्या सद्गृहस्थाने हासडलेली शिवी;
अचानक लक्ष वेधून घेत
पायाकडील भिंतीवरून सरसरत, जणू
'बोल्ट'चा १०० मीं चा विक्रम मोडीत
आडोशाला गडप होणारी पाल;
विनाकारण! फक्त त्रास द्यायच्या हेतूनेच,
विचारलेलं नसतानाही,
प्रत्येक सेकंदाला ओरडून वेळ सांगणारं घड्याळ;
काय हिंमत होती या सा-यांची,
मला त्रास द्यायची.....
....तू इथे असतीस तर....!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7044
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान आहे. बाकी विडंबनासाठी
सहमत! पण चांदणेसाहेब, दणकट
In reply to छान आहे. बाकी विडंबनासाठी by एस
मांत्रिकास आमचा टोटल प्लस वण!
In reply to सहमत! पण चांदणेसाहेब, दणकट by मांत्रिक
क्या बात है...
In reply to मांत्रिकास आमचा टोटल प्लस वण! by अत्रुप्त आत्मा
हा हा...
In reply to छान आहे. बाकी विडंबनासाठी by एस
हम्म्म
जबरदस्त...! दणकट लिहीलयं...!!
छान... आता विडंबनाची वाट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Manali Trance... ;) :- The Shaukeensहां हां हां मस्तच
अरे हसता काय राव?
फारच बुवा विनोदी तुम्ही!
In reply to अरे हसता काय राव? by प्यारे१
>>>> ....तू इथे असतीस तर....!
In reply to फारच बुवा विनोदी तुम्ही! by रातराणी
माणूस घाबरलेला असतो तेव्हाच
In reply to >>>> ....तू इथे असतीस तर....! by प्यारे१
वा वा! बेश्ट. ऐकलो. वाटतं. ;)
In reply to माणूस घाबरलेला असतो तेव्हाच by रातराणी
वाह सुरेख
In reply to माणूस घाबरलेला असतो तेव्हाच by रातराणी
अहो,
In reply to अरे हसता काय राव? by प्यारे१
काय एकेक प्रतिक्रिया...
लई भारी..... पण अपुर्ण वाटली
मस्त
धन्यवाद!
In reply to मस्त by ज्योति अळवणी
लई भारी!