चहु दिशांत पसरे कीर्ती, जग तुझिया पायावरती
पण अवखळ गोकुळवासी, मज कृष्ण भेटला नाही
....... किती काळ उलटला राधे ,नित नवीन दिसशी तूही
....... जरी रूप बदलले त्याचे, तो कृष्ण वेगळा नाही
तो परतून आला तरीही, माझा ना उरला काही
दमले मी शोधून त्याला , मज कृष्ण भेटला नाही
....... उमगता मोल नात्याचे गेलेला परतून येई
....... समजून तयाला घे तू , तो कृष्ण वेगळा नाही
सर्वस्व वाहिले त्याला , काही ना बाकी उरले
मी स्वत:स हरवून बसले , मज कृष्ण भेटला नाही
.........इतुके न कुणाला द्यावे, की भार तयाचा व्हावा
........ बघ तुझ्यात लपला आहे , तो कृष्ण वेगळा नाही
या नात्यातील उपेक्षा मी मूक साहिली नाही
बनलेही असते राधा, मज कृष्ण भेटला नाही
........ राधेची निर्मम प्रीती , गोपास बनविते कृष्ण
........ मिटल्या नयनांनी बघ तू , तो कृष्ण वेगळा नाही
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
51198
प्रतिक्रिया
91
मिसळपाव
प्रतिक्रिया
राधेची निर्मम प्रीती , गोपास बनविते कृष्ण
In reply to या ओळीतील वेगळ्या अध्यात्मिक अर्थछटा पहा by माहितगार
सुपर
+१ अप्रतिम!!
तुमची कविता दखल सदरात गेली!
जे अगदी अंतःकरणापासून आहे
In reply to तुमची कविता दखल सदरात गेली! by मांत्रिक
:)
In reply to जे अगदी अंतःकरणापासून आहे by अभ्या..
गप की बे भाऱ्या.
In reply to जे अगदी अंतःकरणापासून आहे by अभ्या..
यात चेष्टा करण्यासारखे काय
In reply to जे अगदी अंतःकरणापासून आहे by अभ्या..
+१ अप्रतिम!!
दोन तीन दा वाचली. शब्दांची
फार आवडली.
अप्रतिम! अर्थ खुलवून
आवडली
:)
सुन्दर कविता.
सुंदर...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Manali Trance... ;) :- The Shaukeensसुंदर कविता...
भागवतात राधा वाचललेली आठवते
कविता खूप सुन्दर आहे.आणि
धन्यवाद !
In reply to कविता खूप सुन्दर आहे.आणि by शब्दवेडी
सुंदर!