.बनलेही असते राधा, मज कृष्ण भेटला नाही ..
चहु दिशांत पसरे कीर्ती, जग तुझिया पायावरती
पण अवखळ गोकुळवासी, मज कृष्ण भेटला नाही
....... किती काळ उलटला राधे ,नित नवीन दिसशी तूही
....... जरी रूप बदलले त्याचे, तो कृष्ण वेगळा नाही
तो परतून आला तरीही, माझा ना उरला काही
दमले मी शोधून त्याला , मज कृष्ण भेटला नाही
....... उमगता मोल नात्याचे गेलेला परतून येई
....... समजून तयाला घे तू , तो कृष्ण वेगळा नाही
सर्वस्व वाहिले त्याला , काही ना बाकी उरले
मी स्वत:स हरवून बसले , मज कृष्ण भेटला नाही
.........इतुके न कुणाला द्यावे, की भार तयाचा व्हावा
........ बघ तुझ्यात लपला आहे , तो कृष्ण वेगळा नाही
या नात्यातील उपेक्षा मी मूक साहिली नाही
बनलेही असते राधा, मज कृष्ण भेटला नाही
........ राधेची निर्मम प्रीती , गोपास बनविते कृष्ण
........ मिटल्या नयनांनी बघ तू , तो कृष्ण वेगळा नाही
अप्रतिम!
+१ अप्रतिम!!
सुंदर कविता आहे! शेवटचे कडवे
अतिशय सुंदर !
खूपच सुंदर कविता आहे ही
वाह!
कित्ती सुंदर ! अप्रतिम !!!
सुंदर कविता
सुंदर आध्यात्मिक अनुभव!
...इतुके न कुणाला द्यावे, की भार तयाचा व्हावा' म्हणजे ?
कवितेतील ज्या ओळी अक्षराने
.........इतुके न कुणाला
असे काहीसे ?
एव्हढ्या रसपूर्वक कविता
सिंप्ली ग्रेट ! आवडले
कविता यासाठीही आवडली की
__/\__
मला वाटते विद्या सप्रेंच्या
सुंदर! नक्की वाचेन हे पुस्तक.
धन्यवाद सर्वांनाच!
सुरेख
सुंदर
सुंदर कविता
फारच सुरेख
छान.
सुंदर.
सुरेख कवीता. आवडली.
वाह
शब्दांची रचना म्हणून सुरेख.
कवितेतील ज्या ओळी अक्षराने
फार सुंदर रितीने समजून घेतलीत
वा वा!
(No subject)
कवियत्रीला नेमके काय म्हणावयाचे आहे ?
सांगण्याचा प्रयत्न करते,बघा जमतोय का .
वेगवेगळ्या अर्थछटा
सुंदर..
जन्माष्टमी ची दहीहंडी
शिर्षक वाचूनच 10 पैकी 10
+१
छान कविता
विकि जाहीरात
क्या बात है!!
सुंदर
सर्वांनाच धन्यवाद!
मनभावन कविता.
अप्रतिम
भावपूर्ण
कविता खूप सुंदर
अप्रतीम! खुपच सुंदर...