कुटीबाहेर रविकिरणांची तांबुस सकाळ पसरली.
हरीतालिकेचा गाभारा रामप्रहरी दणाणला.
तपोवनातल्या वैराग्याचा निद्राभंग झाला.
कुटीबाहेर येऊन सुर्यस्नान करत तो उकिडवा बसला.
कुळस्वामीनी कोवळ्या ऊन्हात आन्हिकं उरकत होत्या. गायींच्या गळ्यातल्या घंटा मंद किणकिणत होत्या. कळप घेऊन बालगोपाळ अरण्यात निघाले. कान्हा पण आला असेल त्यांच्यात, मंत्रमुग्ध बासुरी घेऊन. यशोदेला चुकवुन.
पाणवठ्यावर गौळणींची लगबग चालली होती. गोपिका खिदळत बाजाराला निघाल्या होत्या. पुरोहितांची दिंडी राजमार्गावर दुमदुमत निघाली.
वैरागी प्रसन्न मुद्रेनं महाद्वाराकडे निघाला.
द्वापारयुगात इंद्रप्रस्थाचे सिंहासन क्षणभर हेंदकाळले. होमहवनात साधुसंत मंतरले होते.
तलवारबाज शुरांची कसरत चालु होती.
वैराग्याचे भिक्षापात्र सखोल होते. त्याच्या तळाशी गतजन्मीचे वैफल्य साचले होते. प्रधानाकडं सहस्त्रमुद्रांची तो आळवणी करणार होता.
शेजारुन अश्वमेघांचा एक रथ सजुन मार्गस्थ झाला.राजवाडा त्याच्या दृष्टीक्षेपात आला. द्वारावरच्या पहारेकऱ्याने चमकुन त्याच्याकडे पहात आरोळी ठोकली.
"आरं कोण प्रधान? आण कुठला राजवाडा? हि मुन्शीपाल्टी हाय,
येडाय का तु? कुठल्या जगात जगतुय?"
लोंबकाळण्याऱ्या माणसांना वाहणारी सिटीबस रस्त्यावर पाहुन वैरागी काळाठिक्कर पडला.
- जव्हेरगंज
वाचने
11105
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
=))
:)
खिक्क्क! आवडली.
जबरी
१+
सणसणीत चपराक. ये हुइ ना बात.
अगदी मनातले ओळखलेत. धन्यवाद.
In reply to सणसणीत चपराक. ये हुइ ना बात. by द-बाहुबली
आवडली..
भन्नाट ! उत्तम शशक सुद्धा
धन्यवाद,
In reply to भन्नाट ! उत्तम शशक सुद्धा by डॉ सुहास म्हात्रे
शब्द मोजायचे एक छोटेसे
In reply to धन्यवाद, by जव्हेरगंज
खरेच काय? कि गंमत करताय..!
In reply to शब्द मोजायचे एक छोटेसे by द-बाहुबली
मी आत्ताच तयार केले आहे.
In reply to खरेच काय? कि गंमत करताय..! by जव्हेरगंज
हो जरूर...
In reply to मी आत्ताच तयार केले आहे. by द-बाहुबली
शतशब्दकथा काउंटर
In reply to मी आत्ताच तयार केले आहे. by द-बाहुबली
माहितपुर्ण प्रतिसादासाठी
In reply to शतशब्दकथा काउंटर by द-बाहुबली
मोबाईलसाठीही असे उत्तम
In reply to माहितपुर्ण प्रतिसादासाठी by जव्हेरगंज
अॅप किंवा सॉफ्ट्वेयर कशाला
In reply to माहितपुर्ण प्रतिसादासाठी by जव्हेरगंज
हेहेहे .. मस्त जमलीये, तुमचं
धन्यवाद स्रुजा,
In reply to हेहेहे .. मस्त जमलीये, तुमचं by स्रुजा
सुपर्ब!!
च्यायला
चाणक्य साहेब व्यनी केलाय.
In reply to च्यायला by चाणक्य
मलादेखील कळली नाही. कृपया व्य
In reply to चाणक्य साहेब व्यनी केलाय. by जव्हेरगंज
मांत्रिक साहेब तुम्हालापण
In reply to मलादेखील कळली नाही. कृपया व्य by मांत्रिक
आता व्यनी टंकलाच आहे तर कृपया
In reply to मांत्रिक साहेब तुम्हालापण by जव्हेरगंज
मलापण
In reply to आता व्यनी टंकलाच आहे तर कृपया by द-बाहुबली
+१ मलाही
In reply to मलापण by तुषार काळभोर
+१
In reply to +१ मलाही by नाखु
व्यनी करण्याऐवजी ईथेच लिहीतो.
In reply to +१ by मी-सौरभ
साहित्यिकाला प्रवासात जे काही
In reply to व्यनी करण्याऐवजी ईथेच लिहीतो. by जव्हेरगंज
कळलं
In reply to चाणक्य साहेब व्यनी केलाय. by जव्हेरगंज
मस्त कथा!
धन्यवाद,
In reply to मस्त कथा! by बोका-ए-आझम
सर्व प्रतिसादकांचे आभार..
एका सदस्याने 'चपराक' या
In reply to सर्व प्रतिसादकांचे आभार.. by जव्हेरगंज
एका सदस्याने 'चपराक' या
In reply to एका सदस्याने 'चपराक' या by जव्हेरगंज
हा:हा:
छान कथा.
काही शश्प कळले नाही .. काही
मस्त