✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

"येडाय का तु?"

ज
जव्हेरगंज यांनी
Sun, 09/06/2015 - 13:17  ·  लेख
लेख
कुटीबाहेर रविकिरणांची तांबुस सकाळ पसरली. हरीतालिकेचा गाभारा रामप्रहरी दणाणला. तपोवनातल्या वैराग्याचा निद्राभंग झाला. कुटीबाहेर येऊन सुर्यस्नान करत तो उकिडवा बसला. कुळस्वामीनी कोवळ्या ऊन्हात आन्हिकं उरकत होत्या. गायींच्या गळ्यातल्या घंटा मंद किणकिणत होत्या. कळप घेऊन बालगोपाळ अरण्यात निघाले. कान्हा पण आला असेल त्यांच्यात, मंत्रमुग्ध बासुरी घेऊन. यशोदेला चुकवुन. पाणवठ्यावर गौळणींची लगबग चालली होती. गोपिका खिदळत बाजाराला निघाल्या होत्या. पुरोहितांची दिंडी राजमार्गावर दुमदुमत निघाली. वैरागी प्रसन्न मुद्रेनं महाद्वाराकडे निघाला. द्वापारयुगात इंद्रप्रस्थाचे सिंहासन क्षणभर हेंदकाळले. होमहवनात साधुसंत मंतरले होते. तलवारबाज शुरांची कसरत चालु होती. वैराग्याचे भिक्षापात्र सखोल होते. त्याच्या तळाशी गतजन्मीचे वैफल्य साचले होते. प्रधानाकडं सहस्त्रमुद्रांची तो आळवणी करणार होता. शेजारुन अश्वमेघांचा एक रथ सजुन मार्गस्थ झाला.राजवाडा त्याच्या दृष्टीक्षेपात आला. द्वारावरच्या पहारेकऱ्याने चमकुन त्याच्याकडे पहात आरोळी ठोकली. "आरं कोण प्रधान? आण कुठला राजवाडा? हि मुन्शीपाल्टी हाय, येडाय का तु? कुठल्या जगात जगतुय?" लोंबकाळण्याऱ्या माणसांना वाहणारी सिटीबस रस्त्यावर पाहुन वैरागी काळाठिक्कर पडला. - जव्हेरगंज
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
इतिहास
कथा
साहित्यिक
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
11017 वाचन

💬 प्रतिसाद (41)

प्रतिक्रिया

=))

जेपी
Sun, 09/06/2015 - 13:20 नवीन
=))
  • Log in or register to post comments

:)

नाव आडनाव
Sun, 09/06/2015 - 13:33 नवीन
:)
  • Log in or register to post comments

खिक्क्क! आवडली.

प्यारे१
Sun, 09/06/2015 - 13:44 नवीन
खिक्क्क! आवडली.
  • Log in or register to post comments

जबरी

एक एकटा एकटाच
Sun, 09/06/2015 - 14:30 नवीन
जबरी
  • Log in or register to post comments

१+

बाबा योगिराज
Sun, 09/06/2015 - 15:06 नवीन
हा हा हा...... वा आवड्यास..
  • Log in or register to post comments

सणसणीत चपराक. ये हुइ ना बात.

द-बाहुबली
Sun, 09/06/2015 - 16:23 नवीन
सणसणीत चपराक. ये हुइ ना बात.
  • Log in or register to post comments

अगदी मनातले ओळखलेत. धन्यवाद.

जव्हेरगंज
Sun, 09/06/2015 - 16:35 नवीन
अगदी मनातले ओळखलेत. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

आवडली..

खटपट्या
Sun, 09/06/2015 - 16:28 नवीन
आवडली..
  • Log in or register to post comments

भन्नाट ! उत्तम शशक सुद्धा

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 09/06/2015 - 18:00 नवीन
भन्नाट ! उत्तम शशक सुद्धा बनेल याच्यातून :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद,

जव्हेरगंज
Sun, 09/06/2015 - 18:46 नवीन
धन्यवाद, मी 'मटण' ही कथासुद्धा शशक करायचा प्रयत्न केला होता. पण शब्द मोजण्याचा जाम कंटाळा आला. त्यामुळे त्या नादाला पुन्हा लागलोच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

शब्द मोजायचे एक छोटेसे

द-बाहुबली
Sun, 09/06/2015 - 19:27 नवीन
शब्द मोजायचे एक छोटेसे वेबसॉफ्टवेर बनवुन देउ काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

खरेच काय? कि गंमत करताय..!

जव्हेरगंज
Sun, 09/06/2015 - 19:44 नवीन
खरेच काय? कि गंमत करताय..! तसे असेलच कुठेतरी आंजावर म्हणा, माझ्या नजरेस अजुन पडले नसावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

मी आत्ताच तयार केले आहे.

द-बाहुबली
Sun, 09/06/2015 - 19:46 नवीन
एकदम फडतुस कोड होता. लिन्क देतो डाउनलोडसाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

हो जरूर...

जव्हेरगंज
Sun, 09/06/2015 - 20:00 नवीन
हो जरूर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

शतशब्दकथा काउंटर

द-बाहुबली
Sun, 09/06/2015 - 20:03 नवीन
ही घ्या लिंक http://www.mediafire.com/view/4hbunmguv4kadtq/ShashakCounter.html या लिंकवर क्लिक केले की जे पेज उघडेल तिठे आपल्याला वरबाजुला उजव्या कोपर्‍यात डाउनलोड ऑप्शन दिसेल त्याव॑र क्लिक करा. मग डाउनलोड पेज ओपन होइल तेथे पुन्हा डाउनलोडवर क्लिक करा. कसे वापरायचे १) सदरील कोड वेब-अ‍ॅप वा पेब पेज असल्याने डेस्क्टॉपला डाउनलोड केले की क्लिक केल्यावर आपोआप ब्राउअजरमधे ओपन होइल. मी फायफॉक्स ब्राउजर वापरतो त्यात हे व्यवस्थीत चालते. २) हे मराठी टाइप करायला बनवले नाही म्हणून आधीच टाइप केलेला मजकुर यात तपासणीसाठी कॉपी पेस्ट करावा लागेल. ३) हे अ‍ॅप तुम्ही कितीवेळा स्पेस्बार दाबला आहे त्याची मोजणी करुन शब्द संख्या ठरवते म्हणून दोन श्ब्दात/ ओळीत शक्यतो एकदाच स्पेस्बार टाइअप केला जाइल याची काळ्जी घ्या परंतु घाइत तसे जमले नाही तर ते स्वतः एकच्या जागी दोन अथवा तिन वेळा जरी स्पेस्बार दाबला गेला असेल तरी सांभाळुन घेते :) त्यापेक्षा जास्त चुका ते खपवुन घेत नाही मग नवख्यांना प्रोत्साहन द्यायची कितीही बोंब मारा ;) ४) हे अ‍ॅप तुम्ही कितीवेळा स्पेस्बार दाबला आहे त्याची मोजणी करुन शब्द संख्या ठरवते म्हणून शेवटची ओळ लिहुन झाल्यावर मात्र कटाक्षाने (बोलेतो नो एक्स्क्युज) एखादा स्पेसबार (टाइप झालेला) राहीलेला नाही याची खातरजमा करा अन्यथा शेवटची ओळ संपल्यावर जितके स्पेसबार द्याल तेवढ्याने शब्द संख्या वाढलेली दिसु शकते ५) वापरायची स्वय होइलच मिपानेही हा कोड जसाच्या तसा वा बदलुन रेफरन्स घेउन हे मिपावर उपलब्ध केले तरी आनंदच आहे. हा कोड संपुर्णपणे मिपाकरांच्याच मालकीचा आहे कोणा एकाचे नाव त्याला चिकटलेले नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

माहितपुर्ण प्रतिसादासाठी

जव्हेरगंज
Sun, 09/06/2015 - 20:10 नवीन
माहितपुर्ण प्रतिसादासाठी अत्यंत आभारी आहे. प्रस्तुत कोडचा संगणकावर जरूर उपयोग करीन. सध्या मोबाईलवर जास्त करून टंकत असल्याने किती उपयोग होईल सांगता येत नाही. मोबाईलसाठीही असे उत्तम सॉफ्टवेअर असल्यास किती बरे होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

मोबाईलसाठीही असे उत्तम

द-बाहुबली
Sun, 09/06/2015 - 20:23 नवीन
मोबाईलसाठीही असे उत्तम सॉफ्टवेअर असल्यास किती बरे होईल.
फार बरे होइल. पण फक्त एवड्याश्या फिचरसाठी आख्खे अ‍ॅप इन्स्टॉल करणार ? नोप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

अ‍ॅप किंवा सॉफ्ट्वेयर कशाला

मृत्युन्जय
Mon, 09/07/2015 - 13:27 नवीन
अ‍ॅप किंवा सॉफ्ट्वेयर कशाला लागतय? सरळ वर्ड मध्ये चोप्य पस्ते करा आणि मजकूर सिलेक्ट करा. नंबर काउंट खालच्या बाजुला दिसेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

हेहेहे .. मस्त जमलीये, तुमचं

स्रुजा
Sun, 09/06/2015 - 19:01 नवीन
हेहेहे .. मस्त जमलीये, तुमचं नाव वाचलं की आवर्जुन लेख उघडते आणि कधीच निराशा होत नाही.
  • Log in or register to post comments

धन्यवाद स्रुजा,

जव्हेरगंज
Sun, 09/06/2015 - 19:07 नवीन
धन्यवाद स्रुजा, तुमच्या प्रतिसादानं तर काळजातच घर केलं..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

सुपर्ब!!

अजया
Sun, 09/06/2015 - 19:23 नवीन
सुपर्ब!!
  • Log in or register to post comments

च्यायला

चाणक्य
Sun, 09/06/2015 - 19:51 नवीन
मला का कळली नाही?? काही रेफरंस आहे का जुना?
  • Log in or register to post comments

चाणक्य साहेब व्यनी केलाय.

जव्हेरगंज
Sun, 09/06/2015 - 20:04 नवीन
चाणक्य साहेब व्यनी केलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य

मलादेखील कळली नाही. कृपया व्य

मांत्रिक
Sun, 09/06/2015 - 20:11 नवीन
मलादेखील कळली नाही. कृपया व्य.नि. करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

मांत्रिक साहेब तुम्हालापण

जव्हेरगंज
Sun, 09/06/2015 - 20:22 नवीन
मांत्रिक साहेब तुम्हालापण व्यनी केलाय. न समजल्यास आणखी उलगडून सांगतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

आता व्यनी टंकलाच आहे तर कृपया

द-बाहुबली
Sun, 09/06/2015 - 21:44 नवीन
आता व्यनी टंकलाच आहे तर कृपया मलाही फॉरवड करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

मलापण

तुषार काळभोर
Mon, 09/07/2015 - 06:38 नवीन
व्यनि (खालचा साहित्यिकाचा खुलासा वाचून पण नाय कळलं)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

+१ मलाही

नाखु
Mon, 09/07/2015 - 08:57 नवीन
कळाली आहे असं वाट्णं वेगळे आणि खरेच कळाली आहे हे वेगळे. सदागोंधळी नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

+१

मी-सौरभ
Mon, 09/07/2015 - 14:03 नवीन
मलापण व्यनी करा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

व्यनी करण्याऐवजी ईथेच लिहीतो.

जव्हेरगंज
Mon, 09/07/2015 - 18:48 नवीन
व्यनी करण्याऐवजी ईथेच लिहीतो. एक साहित्यिक जेव्हा सकाळी ऊठतो ते मुन्सिपाल्टीच्या गेट पर्यंत येईपर्यंतचा प्रवास कथेत आहे. साहित्यिकाला प्रवासात जे काही दिसते त्याचे वर्णन तो मनातल्या मनात त्याच्या भावी पौराणिक कादंबरीच्या अनुशंगाने करतो. शेवटी तो वॉचमन त्याला या धुंद कल्पनेतुन बाहेर काढतो.... असो ही झाली लिखानामागची प्रेरणा. ईतरांना जर काही वेगळा अर्थ गवसत असेल व त्यांनी सांगितल्यास स्वागतच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

साहित्यिकाला प्रवासात जे काही

द-बाहुबली
Mon, 09/07/2015 - 19:16 नवीन
साहित्यिकाला प्रवासात जे काही दिसते त्याचे वर्णन तो मनातल्या मनात त्याच्या भावी पौराणिक कादंबरीच्या अनुशंगाने करतो. शेवटी तो वॉचमन त्याला या धुंद कल्पनेतुन बाहेर काढतो....
अगदी नेमके मला हेच अभिप्रेत होते. एक पौराणीक विचार करणारा वास्तवात येतो. खणखणीत चपराक बसते त्याला जेंव्हा तो लोंबकळणारे जिव वाहणार्‍या भव्य चारचाक्या बघतो. कथा आणी वास्तव याचे खतरा सांगड घातली आहे. आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

कळलं

चाणक्य
Mon, 09/07/2015 - 20:47 नवीन
आणि आवडलं पण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

मस्त कथा!

बोका-ए-आझम
Sun, 09/06/2015 - 21:10 नवीन
क्रमशः आहे का? याच्यापुढे काय घडतं ते वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

धन्यवाद,

जव्हेरगंज
Sun, 09/06/2015 - 21:41 नवीन
धन्यवाद, क्रमश: नाहिये, इथेच कथा संपलीये. पुढे-मागे कधी विचार आला तर एक सिक्वल अवश्य टाकेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

सर्व प्रतिसादकांचे आभार..

जव्हेरगंज
Sun, 09/06/2015 - 21:58 नवीन
सर्व प्रतिसादकांचे आभार.. प्रस्तुत लेखणाच्या शेवटाविषशी अनेकांना प्रश्न पडला. तसा संदर्भ रोचक वगैरे मुळीच नाही. एक साहित्यिक जो आपल्याच विश्वात सदैव दंग असतो, ज्याला जळीस्थळी आपल्याच लिखानातील पात्रे, प्रसंग, वर्णन दिसत असते, त्याला वास्तविकतेची एक चपराक दिली आहे एवढेच. लिखानामागील मुळ प्रेरणा हिच होती. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

एका सदस्याने 'चपराक' या

जव्हेरगंज
Sun, 09/06/2015 - 22:58 नवीन
एका सदस्याने 'चपराक' या शब्दाविषयी आक्षेप नोंदवलाय. त्याठिकाणी विरोधाभास (वगैरे) दाखवायचा होता असे समजावे. तसेही वैराग्याच्या भुमिकेत मी स्व:तलाच कल्पिले होते. चु.भु.द्या.घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

एका सदस्याने 'चपराक' या

द-बाहुबली
Mon, 09/07/2015 - 14:23 नवीन
एका सदस्याने 'चपराक' या शब्दाविषयी आक्षेप नोंदवलाय.
खिक्क... कोण कशाला आक्षेप घेइल याचा कलियुगात नेम नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

हा:हा:

सस्नेह
Mon, 09/07/2015 - 11:43 नवीन
मजा आली !
  • Log in or register to post comments

छान कथा.

बबन ताम्बे
Mon, 09/07/2015 - 11:56 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

काही शश्प कळले नाही .. काही

माझीही शॅम्पेन
Mon, 09/07/2015 - 12:26 नवीन
काही शश्प कळले नाही .. काही पेशल लोकांसाठी हा धागा काढला आहे का ?
  • Log in or register to post comments

मस्त

कविता१९७८
Mon, 09/07/2015 - 12:31 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा