Skip to main content

ललित मोदी आणि सुषमा स्वराज

लेखक पैसा यांनी बुधवार, 17/06/2015 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
राम्राम मंडळी! तीन दिवस झाले. अर्णव गोस्वामीचा धुमाकूळ सुरू आहे. याबद्दलच्या बातम्या पेपरात दुसर्‍या तिसर्‍या पानावर येऊन गेल्या. पण मिपावर काही गडबड झाली नाही म्हणून काथ्याकुटाच्या प्रांतात घुसखोरी करत आहे. ललित मोदीवर गंभीर आरोप असताना सुषमा स्वराज यांनी त्याला पोर्तुगालला जायला मदत केल्याचा आरोप आहे. स्वराज यांनी तसे कबूल केले. कालपासून वसुंधरा राजे यांचेही नाव येत आहे. भाजप सत्तेत आल्यावर ललित मोदी खूप खुश झाल्याची बातमी वाचली. ते एक असो. मात्र मूळ आरोप सुषमा स्वराज यंना काही खाजगी बाबीत मदत ललित मोदी याने केली आणि त्याबदल्यात स्वराज यांनी ही मदत केली असे सकृद्दर्शनी दिसते. सुषमा यांची कन्या ललित मोदीची वकील असल्याचेही समजते. या सगळ्या प्रकरणात आयपी एल आणि गुंडगिरी, बेकायदेशीर व्यवहार यांचा परस्पर संबंध, पैशासाठी सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन आम्हाला चुना लावणे हे स्पष्ट दिसत आहे. आमचे श्रीपादभाऊ नाईक कधीच असल्या प्रकरणात दिसणार नाहीत पण ते काम करत नाहीत म्हणून पंप्र त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जाते. नक्की कोणावर विश्वास ठेवावा? की थोडेफार काम करणार्‍या एफिशियंट लोकांना असे काही प्रकार कम्पल्सरी करावेच लागतात? (डिस्क्लेमरः मला फक्त शतकी प्रतिसादांचा धागा काढायचा आहे. तेव्हा या चर्चेत माझा सहभाग नसला तरी धागाकर्ते गायब झाले वगैरे टिप्पण्या ऐकून घेतल्या जाणार नाहीत. =)) )

वाचने 48132
प्रतिक्रिया 289

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

बकरुद्दीन द रेकर (बांग्लादेश रीटर्न) बरोबर आहेत करा ह्या नॉन-मॅट्रिक पास पप्पु ला पंतप्रधान :) हा मागे एकदा नेपाळ दुतावासात जाउन सुध्दा कॉपी करुन आला होता..आता तर संसदेत सुध्द्दा !! काय लायकी चे लोक भारतीय राजकारणात आहेत अरा रा रा.

In reply to by श्रीगुरुजी

:)) यावरच आज ब्रिटिश नंदीने सॉलिड ढिंग टांग लिहिलं आहे. http://www.esakal.com/Tiny.aspx?K=JKSXi हे सुषमा स्वराजचे संपूर्ण भाषण.. मुख्य म्हणजे काँग्रेस अध्यक्ष महोदयांनी या विडिओ मधे २१:३० ला, जेव्हा स्वराज राजीव गांधी बद्दल बोलत असतांना "और करो" म्हणून गोंधळ वाढवायलाही सांगीतला आहे. उत्तम विरोधीपक्ष नेते..

In reply to by अजया

यावरून पप्पुला वाचता येतं हे तरी सिध्द झालं! :) सहमत! तरी देखील तो सुषमा स्वराज यांच्या समोर "वाचला" नाही!

In reply to by विकास

:) प्रचंड सहमत

ललित मोदी प्रकरणात पावले पडायला सुरूवात झाली आहे. ललित मोदीची सिंगापूरमधील बँक खाती गोठविण्यात आली आहेत. http://www.loksatta.com/desh-videsh-news/red-corner-notice-likely-to-be… यपीएल माजी प्रमुख ललित मोदी यांच्या अडचणीत वाढ झाली असून अंमलबजावणी संचलनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभागाच्या(सीबीआय) मागणीची दखल घेत सिंगापूर सरकारने ललित मोदी यांची दोन बँक खाती गोठविण्यात आली आहेत. तसेच तेथील सरकारने ललित मोदींविरोधात आणखी माहितीची मागणी भारताकडे केली आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, ललित मोदी प्रकरणावरून सिंगापूर सरकारच्या अधिकाऱयांमध्ये गेले काही दिवस चर्चा सुरू होती. या चर्चेनंतर मोदींची दोन बँक खाती गोठवण्यात आली. दरम्यान, सीबीआयने इंटरपोलला पत्रव्यवहारकरून ललित मोदी यांच्याविरोधात रेट कॉर्नर नोटीस जारी करण्याची मागणी केली आहे. यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता असून ही नोटीस जारी करण्यात आल्यास ललित मोदींना अटक होऊ शकते. याआधी केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनीही ललित मोदी यांचे प्रत्यार्पण करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत असून त्यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली जाऊ शकते, असे विधान केले होते. यूपीएच्या कार्यकाळात मोदी यांच्याविरुद्ध फक्त 'फेमा' चे प्रकरण दाखल करण्यात आले, ज्यात अटकेची तरतूद नसून जास्तीत जास्त शिक्षा फक्त दंडाची आहे. त्यांच्याविरुद्ध जी 'लाइट ब्ल्यू कॉर्नर नोटीस' जारी करण्यात आली, ती केवळ क्षेत्रीय विमानतळांसाठी लागू आहे. असे असताना लंडनमध्ये बसलेल्या कुणा व्यक्तीला परत कसे आणता येईल, असा प्रश्न देखील राठोड यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे रेड कॉर्नर नोटीस बजावून ललित मोदींना भारतात आणण्यासाठीचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असल्याचे समजते.