राम्राम मंडळी! तीन दिवस झाले. अर्णव गोस्वामीचा धुमाकूळ सुरू आहे. याबद्दलच्या बातम्या पेपरात दुसर्या तिसर्या पानावर येऊन गेल्या. पण मिपावर काही गडबड झाली नाही म्हणून काथ्याकुटाच्या प्रांतात घुसखोरी करत आहे.
ललित मोदीवर गंभीर आरोप असताना सुषमा स्वराज यांनी त्याला पोर्तुगालला जायला मदत केल्याचा आरोप आहे. स्वराज यांनी तसे कबूल केले. कालपासून वसुंधरा राजे यांचेही नाव येत आहे. भाजप सत्तेत आल्यावर ललित मोदी खूप खुश झाल्याची बातमी वाचली. ते एक असो.
मात्र मूळ आरोप सुषमा स्वराज यंना काही खाजगी बाबीत मदत ललित मोदी याने केली आणि त्याबदल्यात स्वराज यांनी ही मदत केली असे सकृद्दर्शनी दिसते. सुषमा यांची कन्या ललित मोदीची वकील असल्याचेही समजते.
या सगळ्या प्रकरणात आयपी एल आणि गुंडगिरी, बेकायदेशीर व्यवहार यांचा परस्पर संबंध, पैशासाठी सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन आम्हाला चुना लावणे हे स्पष्ट दिसत आहे. आमचे श्रीपादभाऊ नाईक कधीच असल्या प्रकरणात दिसणार नाहीत पण ते काम करत नाहीत म्हणून पंप्र त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जाते. नक्की कोणावर विश्वास ठेवावा? की थोडेफार काम करणार्या एफिशियंट लोकांना असे काही प्रकार कम्पल्सरी करावेच लागतात?
(डिस्क्लेमरः मला फक्त शतकी प्रतिसादांचा धागा काढायचा आहे. तेव्हा या चर्चेत माझा सहभाग नसला तरी धागाकर्ते गायब झाले वगैरे टिप्पण्या ऐकून घेतल्या जाणार नाहीत. =)) )
वर्गीकरण
वाचने
48131
प्रतिक्रिया
289
मिसळपाव
प्रतिक्रिया
हावर्ड विद्यापिठात असताना
In reply to काल पप्पूने आपल्या हिंदी by श्रीगुरुजी
चिनार....
In reply to काल पप्पूने आपल्या हिंदी by श्रीगुरुजी
:)) यावरच आज ब्रिटिश नंदीने
In reply to काल पप्पूने आपल्या हिंदी by श्रीगुरुजी
यावरून पप्पुला वाचता येतं हे
+१
In reply to यावरून पप्पुला वाचता येतं हे by अजया
सहमत
In reply to +१ by विकास
अशीच एक गम्मत
ललित मोदी प्रकरणात पावले
काहीतरी वेगळं