Skip to main content

ललित मोदी आणि सुषमा स्वराज

लेखक पैसा यांनी बुधवार, 17/06/2015 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
राम्राम मंडळी! तीन दिवस झाले. अर्णव गोस्वामीचा धुमाकूळ सुरू आहे. याबद्दलच्या बातम्या पेपरात दुसर्‍या तिसर्‍या पानावर येऊन गेल्या. पण मिपावर काही गडबड झाली नाही म्हणून काथ्याकुटाच्या प्रांतात घुसखोरी करत आहे. ललित मोदीवर गंभीर आरोप असताना सुषमा स्वराज यांनी त्याला पोर्तुगालला जायला मदत केल्याचा आरोप आहे. स्वराज यांनी तसे कबूल केले. कालपासून वसुंधरा राजे यांचेही नाव येत आहे. भाजप सत्तेत आल्यावर ललित मोदी खूप खुश झाल्याची बातमी वाचली. ते एक असो. मात्र मूळ आरोप सुषमा स्वराज यंना काही खाजगी बाबीत मदत ललित मोदी याने केली आणि त्याबदल्यात स्वराज यांनी ही मदत केली असे सकृद्दर्शनी दिसते. सुषमा यांची कन्या ललित मोदीची वकील असल्याचेही समजते. या सगळ्या प्रकरणात आयपी एल आणि गुंडगिरी, बेकायदेशीर व्यवहार यांचा परस्पर संबंध, पैशासाठी सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन आम्हाला चुना लावणे हे स्पष्ट दिसत आहे. आमचे श्रीपादभाऊ नाईक कधीच असल्या प्रकरणात दिसणार नाहीत पण ते काम करत नाहीत म्हणून पंप्र त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जाते. नक्की कोणावर विश्वास ठेवावा? की थोडेफार काम करणार्‍या एफिशियंट लोकांना असे काही प्रकार कम्पल्सरी करावेच लागतात? (डिस्क्लेमरः मला फक्त शतकी प्रतिसादांचा धागा काढायचा आहे. तेव्हा या चर्चेत माझा सहभाग नसला तरी धागाकर्ते गायब झाले वगैरे टिप्पण्या ऐकून घेतल्या जाणार नाहीत. =)) )

वाचने 48132
प्रतिक्रिया 289

प्रतिक्रिया

In reply to by टवाळ कार्टा

आयपियेल-बापपियेल
ढिस्क्लेमर - हा पीजे माझा नाही, टीव्हीवरच्या एका र ला ट जोडून एक्स्प्रेस्स कॉमेडी करणार्या प्रोग्राममधला आहे...कधीकाळी चुकुन तो प्रोग्राम जबरदस्तीने घरात बघावा लागायचा

NEW DELHI: External affairs minister Sushma Swaraj on Wednesday reacted angrily to a tweet suggesting she took favours to get her daughter a seat in a medical college through the northeast quota. "My daughter is a barrister and Oxford graduate. What you say in absolutely false," she replied to the tweet. The twitter handle 'Soch @pakoed' had insinuated that "Sushma is no stranger to taking and giving favours! Her daughter studied through NorthEast quota in medical college." Twitterati immediately reacted, wondering at Sushma's impulsive response to a stray tweet. The handle @pakoed was deleted, though its tweet was retweeted by others. Sushma's twitter supporters urged her not to be hassled by a "dog that barks" and keep up her good work.

अवांतर - "मोदीला इंग्लंडबाहेर जाऊन देण्यासाठी तुमचे कायदे, नियम इ. नुसार परवानगीचा निर्णय घ्या. परंतु तुमच्या निर्णयामुळे भारत व इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय संबंधावर परीणाम होणार नाही." असे सुषमा स्वराजांनी मोदीला कोणतीही प्रत्यक्ष मदत न करता इंग्लंडला कळविणे, आणि "(नरेंद्र) मोदींना व्हिसा देऊ नये" असे सत्ताधारी व काही विरोधी पक्षातील ६५ खासदारांनी अमेरिकेला काही वर्षांपूर्वी पत्र लिहिणे, या दोन्हीत काही साम्य वाटते का?

In reply to by श्रीगुरुजी

हा शुद्ध मूर्खपणा होता. घरचे भांडण चव्हाट्यावर नेउ नये इतका कॉमन सेन्स नसलेल्या लोकांचा ! बाकी घरचे भांडण चव्हाट्यावर नेउ नये हा सेन्स त्यांनीही दाखवला नाही आणि यांनीही

In reply to by कपिलमुनी

भारी! आवडलं. अजून एक-दोन काड्या टाकतो. ललित मोदी प्रकरणात जितका दम आहे तितकाच या काड्यात आहे. २०१३ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान/अध्यक्ष भारताच्या पूर्ण खाजगी दौर्‍यावर आले होते. हा दौरा अधिकृत/राजनैतिक नसून पूर्ण खाजगी होता. त्यांना अजमेर दर्ग्याला भेट द्यायची होती. दौरा पूर्ण खाजगी असताना सुद्धा परराष्ट्रमंत्री खुर्शिद यांनी त्यांचे जोरदार स्वागत करून अजमेर येथे त्यांची खास व्यवस्था करून मेजवानी दिली होती. आपल्या शत्रूंवर इतकी मेहेरबानी कशासाठी? २०१३ मध्येच भारताने पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला दौर्‍यावर बोलाविले होते. त्यातील शेवटचा सामना बघण्यासाठी भारताने पाकिस्तानच्या जावेद मियांदादला खास आमंत्रण देऊन लोकांच्या विरोधाला न जुमानता व्हिसा दिला होता. जावेद मियांदाद आणि भारतात मोस्ट वाँटेड असलेला अतिरेकी दाऊद इब्राहीम हे एकमेकांचे व्याही असताना सुद्धा दाऊदशी संबंधित असलेल्या जावेदला भारताचा व्हिसा देऊन त्याला खास आमंत्रण देण्यात आले होते. त्याला भारतात येण्यास विरोध असूनसुद्धा खुर्शिद यांनी त्याला बोलाविण्याचे जोरदार समर्थन केले होते. परंतु भारतातील विरोधाच्या बातम्या ऐकून तो शेवटी आलाच नाही. ही दोन प्रकरणे आणि सुषमा स्वराज - ललित मोदी प्रकरण यात काही साम्य आढळते का?

In reply to by श्रीगुरुजी

दाउद गुन्हेगार आहे म्हणुन त्याच्या व्हाह्याला विसा नाकारायचा का ? उद्या तुमच्या व्याह्याचा मिपा आयडी ब्लॉक झाला तर तुमचाही घालवायचा का ?

In reply to by बबिता बा

दाउद हा मियाँदादचा व्याही होण्याआधीपासून भारताचा मोस्ट वाँटेड आहे. तो अंडरवर्ल्ड डॉन आहे या गोष्टींबाबत मियाँदाद अनभिज्ञ नव्हते हे महत्वाचे आहे. किंवा ते अपघाताने दाऊदचे व्याही झाले नव्हते. बाकी जालावर प्रतिसाद देणे आणि मुंबईमधे सुपारी घेऊन मर्डर करणे सारखे आहे का?

सर्व मंडळींना मनापासून धन्यवाद! बरीच माहिती दोन्ही बाजूंनी मिळाली. मिपावर ट्रोलिंग किंवा शिवीगाळ न होता राजकीय चर्चा होऊ शकते हे या धाग्यावर आतापर्यंत दाखवून दिल्याबद्दल सर्वांनाच मनापासून धन्यवाद! राजकीय चर्चा असूनही अजूनपर्यंत एकही प्रतिक्रिया अप्रकाशित करावी लागलेली नाही. अशाच खेळीमेळीच्या वातावरणात आणि वैयक्तिक न होता चर्चा चालू ठेवा! धन्यवाद! सुषमा स्वराज कार्यक्षम आहेत, भारतातल्या रात्री एक वाजता कोणी परदेशात अडकलेल्याने मदत मागितली तरी ती लगेच मिळते, पंतप्रधानांनी सुषमा स्वराज यांचे खुल्या दिलाने कौतुक केले आहे इ. बातम्या वाचायला मिळत होत्या त्यातच हे प्रकरण उभे झाल्यामुळे वाईट वाटले. भले स्वराज किंवा वसुंधरा राजे यांचे ललित मोदीशी वैयक्तिक संबंध जुने असतील, पण त्यांनी अशा परिस्थितीत पंतप्रधानांकडे निर्णय सोपवायला हवा होता हे नक्कीच वाटले. कारण सत्तेवर असलेल्यांनी आपल्या गोतावळ्याच्या बाबत जरा जास्त कडक असले पाहिजे असे मला वाटते.

दिवसात शतकी धाग्याबद्दल पुणेरी कट्टा आयोजन समीती पिंचीसहीत पैसा ताईंचा सत्कार पुणेरी मस्तानी (फक्त प्यायची),५०० फुल्वातीं वळण्यासाठी कापूसगड्डा व गहुंजे येथे होणार्या सामन्याची २ तिकिटे देऊन करण्यात येत आहे. अभामिपामांकामिमसंचालीत सत्कार वस्तू पोच व्यवस्थेबाब्त सूड यांची सूचना आम्हाला कायम शिरोधार्थ आहे. वस्तू मिळताच तपासून घेणे (नंतर बदलून मिळणार नाही)

In reply to by खटपट्या

कात्रज-आंबेगाव-नर्‍हे-वारजे-चांदणी चौक-बावधन-पाषाण-सुसरोड-बाणेर-बालेवाडी-वाकड-ताथवडे-पुनावळे-रावेत-गहुंजे

In reply to by टवाळ कार्टा

चवक्शीची अपेक्षा असल्याने पूर्वानुलक्षी खुलासा करणेत आला आहे. तस्मात आपली आप्ली मस्तानी त्या त्या बाजीरावाने शोधावी. खुलासादार मिपा पुणे महानगर कट्टा मित्रमंडळ

In reply to by टवाळ कार्टा

कोल्हापूर पासून धुळ्यापर्यंत आणि मालवणपासून चंद्रपूर पर्यंत बहुतांश मस्तान्या सध्या पुण्यातच पडिक असतात. वेगवेगळ्या एम एच नंबरच्या अ‍ॅक्टीव्या, स्कूट्या, अ‍ॅक्सेश्या घेवून हिंजवडी (प्रतिकात्मक) किंवा सिंबायोसिस (पुन्हा प्रतिकात्मक) ला बाजीराव्यांना भेटणं हे मुख्य काम आणि नोकरी किंवा शिकणं हे उपकाम असे दुहेरी श्रमही करतात.

In reply to by टवाळ कार्टा

@पैला मस्तानीचा टैप सांगा...इंट्रेस्टिंग वाट्ली तर पुढे बघू>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing007.gif अस्सं काय रे टवाळा!? तू ये..तुला फुकट देइन. http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif ..................... बघू येतो का आता हां! ;) एक यांच्याच शेजारचा अज्जिबात येत नै,याच मस्तानीसाठी नंबर लावलेला. http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

इतक्या लौकर तयार झालात म्हणजे नक्कीच कैतरी घोळ अस्णार llllluuuuuulllllluuuuu बाकी ते माझे शेजारीपण तुम्चेच शीष्य

In reply to by नाखु

@ पुणेरी मस्तानी (फक्त प्यायची),५०० फुल्वातीं वळण्यासाठी कापूसगड्डा>> :-D बरोबर तुळशि बागेतून ते वळण्यासाठि 1 पाट.. आणि थोड़ी रांगोळि.

अनेक खतरनाक क्रिमिनल भारताला युके मधून हवे आहेत हे वरच्या एका प्रतिसादात नमूद केले आहे. त्यात मयत इक्बाल मिर्ची चे नाव सुद्धा होते अश्यावेळी फक्त ललित मोदी वर एवढा रोष का ललित मोदीचे सुनंदा ठरूर च्या आय पी ल प्रवेशाला नकारघंटा देणे मग त्या वरून उठलेल्या वादंगावरून शशी शरूर चे मंत्रिपद जाणे व त्यानंतर ललित मोदी ची गच्छति त्यावेळी ललित मोदी ला भाजपने एक पक्ष म्हणून काँग्रेस वर विशेतः थरूर वर निशाणा साधला का आय पिल ल हे मोदी च्य जाण्याने साफ झाले का त्यांनतर आय पिल ल चे श्रीशांत ते श्रीनावसन प्रकरण घडले दुसरे महत्त्वाचे सामान्य माणसांच्या दृष्टीने ललित मोदी चे काय मत आहे कारण नैतिक मुद्द्यावरून राजीनामा लोकांच्या भावना लक्षात घेऊन दिला जातो ह्या देशात दालमिया डॉलर मिया झाले पुढे ते भ्रष्टाचाराच्या आरोपाने बी सी सी आय मधून गेले आज ते परत आले त्यांच्या जाण्याने येण्याने क्रिकेट रसिकांना शष्प फरक पडला नाही नैतिकतेचा मुद्दा विरोधी पक्षांनी उचलावा हाच मोठा विनोद आहे ह्याचे भारतीय जनतेला भान आहे. कायद्याच्या दृष्टीने हा गुन्हा नसेल तर मु ऑन एवढेच विरोधी पक्षांना मला सांगावेसे वाटेल. गेल्या चार वर्षात आघाडी सरकार कडून ललित मोदिवर फक्त चिदंबरम अर्थ मंत्री युकेत कडक भाषा वापरतो हा प्रश्न सलमान खुर्शीद च्या परराष्ट्र खाते काय निकामी झाले होते का

एकतरी प्रतिसाद दिलाच पाहिजे म्हणुन हा प्रतिसाद. तरीही हे प्रकरण पेपरात सुरु झाल्यापासून उलट्सुलट बातम्या वाचून जीव कळवळतो आहे. निदान आत्तातरी अशी एखादी सत्ता येउदे भारतात जी फक्त देशाचा विचार करेल. स्वतःसाठी थोडफार खातील तर काही हरकत नाही, पण परकियांच्या घशात देश घालू नये, निदान थोडीतरी भारत म्हणुन काही किंमत यावी देशाला अस वाटत्य. असो. चर्चा वाचून बरीच माहीती समजली. पत्नी, तिचा कॅन्सर, राजकिय ओळखी आणी परदेशस्थ गुन्हेगारी!! झोपायला हरकत नाही आता. लय शिक्षान झालं.

(आम्ही खर्‍या अर्थाने झोपलेलो असताना हा धागा निघाल्याने) जरा उशीराच बघत आहे. :) मी कुठल्याही राजकारण्याला तांदूळ धुतल्यानंतर जे पाणी उरते, त्या पाण्याइतका स्वच्छ मानतो. ;) फरक इतकाच की नक्की ओव्हरऑल काम कसे करत आहेत आणि देशाबद्दलची (त्यात नागरीक देखील आले) हेतू कसे आहेत हे पहातो. त्यामुळे स्वराज बाईंच्या बाजूने अथवा विरोधात असा मुद्दा नाही... मात्र त्या आल्यापासून पासपोर्ट आणि इतर कटकटी बर्‍याच कमी झाल्या आहेत हे स्पष्टपणे जाणवत आहे. तसेच पंप्र मोदींच्या संपूर्ण परराष्ट्रनितीच्या यशापयशामाग स्वराज बाई आहेत. त्या मुकाट्याने काम करून बर्‍याच गोष्टी करत आहेत. म्हणूनच त्यांच्या मोदींहून अधिक परदेशवार्‍या ही सार्वजनिक माहिती असली तरी माध्यमात बातमी होत नाही. यावर अधिक नंतर लिहीता येईल. पण थोडक्यात त्यांना धक्का लावण्यामधे अनेकांना फायदा असू शकतो असे वाटते. - त्यात अंतर्गत आणि बाह्य (इतर पक्षिय आणि इतर देशीय सुध्दा) आले. पण जो प्रमुख मुद्दा डोक्यात आला होता तो श्रीगुरूजींनी वर मांडलेला आहे. मला ललीत मोदी हे नाव मधल्या घोटाळ्याच्या वेळेस एखादी उडत उडत बातमी वाचावी त्याहून अधिक माहीत नव्हते. तरी देखील एक प्रश्न पडला ब्रिटन मधे काश्मिरी अतिरेकी (नुसतेच तत्वतः अलगतावादी नाही) आधी जाहीर रहायचे, अमेरीकेने मुंबई हल्ल्यासंदर्भातला (पाकीस्तानी) डेव्हीड हॅडली ह्याला आपल्या ताब्यात दिले नाही, असे अजून बरेच काही जगभर असेल... तरी देखील कधी या देशांना कधी संबंध दुरावतील म्हणून दम भरला नव्हता. मग असे या ललीत मोदींमधे काय आहे की जेणे करून असला अल्टीमेटम द्यावा लागला? एक तर खरेच काहीतरी गंभीर असावे अथवा त्यांच्यामुळे आधीच्या युपिए सरकार मधील स्वार्थांना धक्का बसला असेल. शक्यता दुसर्‍या गोष्टीचीच अधिक आहे. कारण जर काही गंभीर असते तर कोर्टाने पासपोर्ट द्यायला लावला नसता. ललित मोदींचा वकील म्हणतो की त्यांच्या विरोधात इंटरपोल कडून ब्ल्यू कॉर्नर नोटीस नाही. जर ते खोटे असेल तर ते खोटे आहे असे म्हणायच्या ऐवजी, राजकारणी जाउंदेत, पण पत्रकार पण कसे काय अजून त्या नोटीसच्या नावाने स्वराज च्या नावानी ओरडत बसले आहेत? ज्या पद्धतीने सामान्य एन आर आयंना मदत केली आहे, त्यावरून स्वराज यांनी नैतिक / राजकीय (राजनैतिक नाही) चूक केली असेल पण गुन्हा केला आहे असे वाटत नाही...

In reply to by विकास

ज्या पद्धतीने सामान्य एन आर आयंना मदत केली आहे, त्यावरून स्वराज यांनी नैतिक / राजकीय (राजनैतिक नाही) चूक केली असेल पण गुन्हा केला आहे असे वाटत नाही...
मलाही गुन्हा केला आहे असे वाटत नाही. म्हणजे कायदेशीर रित्या काय चूक आहे ते कळले नाही. तिकडे कॉंग्रेस वाले म्हणताहेत कि CrPC च्या अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. पण तेही सांगेना झालेत कोणता गुन्हा ते.

कुठल्याही राजकीय पक्षाचे सरकार प्रामाणिक असेल आणि ते आपल्या सगळ्यांना अच्छे दिन आणेल, या भाबड्या समजुतीतून आता भारतीयांनी बाहेर यावे व वास्तव स्वीकारावे. त्यांतल्या त्यांत जो कमी घोटाळे करेल त्यास पुढच्या निवडणुकीत निवडावे. अन्याथा कायम शंख करत बसावे.

मोदी सर्कारने बिडी सिग्रेट तंबाखू दारु यावरचे ट्याक्सेस कमी करायचा निर्णय घेतलाय म्हणे. आता त्यावर धागा काढा.

In reply to by बबिता बा

हा निर्णय राजस्थान सरकारचा आहे. यात केंद्र सरकारचा काही संबंध नाही. तसेच VAT हा राज्याचा कर आहे. केंद्राचा नाही.

In reply to by सव्यसाची

It is difficult to prove, whether it (smoking) causes cancer or not. Whether smoking, tobacco is cancerous or not or whether it contains any herbal medicine also, it has to be found out. !! http://www.dnaindia.com/india/report-now-another-bjp-mp-says-no-link-be…

In reply to by बबिता बा

अहो बबिता बा, तुम्ही दिलेली साइट अनरिअल्टाईम्स किंवा फेकिंगन्यूज सारखी हिंदी साईट आहे. असल्या ठिकाणी आलेल्या बातम्युआ पुरावे म्हणून ग्राह्य धरता का तुम्ही?

In reply to by बबिता बा

यासंदर्भात बोलता आहात का? Maharashtra govt's new anti-spitting law: Offenders to sweep govt offices, pay upto Rs 5,000 fine अवांतरः किमान जालीय संदर्भात पुर्नजन्म, नवीन अवतार धारण करणे (reincarnation) वगैरे शब्द नक्की खरे आहेत असे वाटते. असो.

स्वराज यांच्या विषयीची बातमी येण्या आधी प्रणव मुखर्जी यांनी वरिष्ठ मंत्री असताना आणि राष्ट्रपति असताना आपल्या पदाचा उपयोग आपला नातेवाईकाला इंग्लंड मध्ये आणि ओळखीच्या व्यक्तीला कोलकत्त्यात एस्सार कंपनीत नोकरी मिळवून देण्या साठी केला होता- अशा माहितीच्या एस्सार कंपनीच्या अंतर्गत इ मेल बाहेर आल्या आहेत. हे प्रकरण स्वराज यांच्या केस पेक्षा जास्त गंभीर मानावे लागेल. कॉंग्रेस प्रणव मुखर्जींचा राजीनामा मागून राष्ट्रपति भवनावर मोर्चा का बरे नेत नाहीये ?

पैतैंनी आयोजित केलेला कार्यक्रम कुठलाही गालबोट न लागता व्यवस्थित सुरू आहे. आनंद वाटला. रच्याकने, ते ललित मोदींवर नेमके काय गुन्हे आहेत आणि त्याची तीव्रता मुंबै बॉम्बस्फोटवैगेरे इतकी कशी याचं काय कोडं उलगडलं नाय. काय की पैसाताई फार रागावल्या आहेत आमच्या लाडक्या मोदीवर (ललित हो) पण त्यांच्या रागाचं नेमकं कारण काय केल्या सापडंना बगा... कुणी नीट सांगेल काय..?

In reply to by संदीप डांगे

ललित मोदी कुठे का जाईना, सुषमा स्वराज यांचं नाव आलं म्हणून वाईट वाटलं जरा. बाकी माहितीसाठी सगळे प्रतिसाद वाचले असतीलच! :) चांगल्या चर्चेसाठी मिपाकरांचं कौतुक आहेच. लौ यू ऑल!

In reply to by पैसा

हो. माहिती वाचली आणि इतर ठिकाणीही खोदकाम केलं. ललित मोदींवर कुठलेही गंभीर्/देशद्रोही स्वरुपाचे गुन्हे नाहीत. जे आहेत ते आरोप आहेत, पैशाच्या अफरातफरीचे आहेत. त्या सगळ्या प्रकरणांमधे प्रचंड गुंतागुंत आहे. मोदी भारतातून पळून जायचे कारण त्याचे इतरांशी (राजकारणी व उद्योजक) बिघडलेले संबंध. ह्या बिघडलेल्या संबंधांमुळे एका उद्योजकाला देश सोडावा लागला. पण ही त्याची आणि इतरांची अंतर्गत बाब आहे. देशाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. मोदींचे इतरांशी वाजण्याचे कारण फार वैयक्तिक आहे. बीसीसीआयशी संबंधीत लोकांचा इगो प्रॉब्लेम व प्रॉफिट शेअरिंग हा त्या सगळ्या आरोप--तमाशा-गुन्ह्यांचे मूळ आहे. फेमा अंतर्गत नोटीसा म्हणजे फार कावेबाज योजना आहे. मोदीला पद्धतशीर अडकवण्यात आले आहे. म्हणजे मोदी फार धुतल्या तांदळाचा, गरिब गाय आहे असे नाही. पण दाऊदवैगेरेंशी तुलना म्हणजे कैच्या कैच. नेमक्या त्याच काळात मी तिथे होतो त्यामुळे नक्की काय झाले ते कधी सवड मिळाली तर (कदाचित) सविस्तर लिहिन. पण जेवढ्या मोठ्या कॅनव्हासवर हे (सुषमा-मोदी) चित्र रंगवायचा प्रयत्न लोक करतायत त्यांच्याकडे तेवढे मोठे ब्रश आणि तितकेसे रंगही नाहीत हे ते साफ लपवतायत. जनतेने शहाणे व्हावे हेच उत्तम. काँग्रेसः ज्या आविर्भावात आणि उच्चरवात ही मंडळी ओरडत आहेत ते बघून स्वराज (पर्यायाने नमों) यांना कोंडीत पकडण्याची संधी मिळाली तर घ्या धोपाटून याच विचारात आहेत असं दिसतंय. पण खरं तर ज्याला साप समजून ते धोपटतायत तो साधा रीळाचा दोराही नाही. पण वातावरण तर असं तापवलंय की जणू हाफिज सईदला सुषमाजींनी घरी बोलावून न्हाऊ-माखू घातलंय. पत्रकार : (विकेसिंगांच्या भाषेत 'ते') नुसते नेहमीप्रमाणे आग सोडा, धूरही जिथे अतिविरळ आहे त्यावरच असं रान माजवतायत की जणून सारं जंगल वणव्याने पेटलंय. जनता: नेहमीप्रमाणे दोन बाजूंनी फाडल्या जाऊन आपल्याला छटाक माहिती नसलेल्या गोष्टींवर 'बघा, बघा ते कसे एकमेकांना मदत करतात, सारेच नालायक आहेत मेले, राजकारणी आणि उद्योजक यांची अभद्र युती यांच्या सरकारातही कायमच आहे' 'मग त्यांनी तेव्हा नाही का असे केले, याला सोडले त्याला सोडले'. अशा भयाण डोळे फिरवणार्‍या चर्चा करता आहेत (मिपा नाही, इतर ठिकाणी) भाजपविरोधक आणि समर्थक दोन्ही या इवल्याशा बीजाचे वटवृक्ष करण्याच्या मागे आहेत. भाजप-समर्थकांनी हा मुद्दा अनुल्लेखाने मारायची गरज होती. पण नेहमीच्या चवताळून जायच्या सवयीने यावेळेस नेमके तोंडघशी पडल्यासारखे वाटत आहेत. (ढीस्क्लेमरः माझ्या या प्रतिसादात मिपावरच्या चर्चेचा, चर्चेत भाग घेतलेल्या सदस्यांचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष कुठलाही उल्लेख नाही. तसेच मिपासदस्यांच्या पक्षीय आवडी-नावडीची कुठेही खिल्ली उडवलेली नाही.)

In reply to by बबिता बा

सदस्यकाळ 3 days 21 hours
आणि लगेच "डोळे पाणावणे" याचा मिपार्थ समजला???

In reply to by संदीप डांगे

भारताला भारतातच राहुन लुबाडणारे राजकारणी धोकादायक आहेत. कारण असे राजकारणी असतात त्यांच्या जिवावरच दाउद जगत असतो. जर स्वार्थी राजकारणी नसते तर कदाचित दाउद निर्माण व्हायला चान्स मिळालाच नसता.

In reply to by बबिता बा

जर स्वार्थी राजकारणी नसते तर कदाचित दाउद निर्माण व्हायला चान्स मिळालाच नसता.
चालु द्या...

In reply to by संदीप डांगे

नेमके आठवत नाही पण सौथ आफ्रिकेमधील आयपीएल संदर्भात जे काही violations झाले त्याबद्दल केस आहे. FEMA अंतर्गत केस सुरु आहे. २०१० मध्ये नोटीस बजावण्यात आल्या होत्या पण ते उपस्थित राहिले नाहीत म्हणून तत्कालीन सरकारने पासपोर्ट काढला. दिल्ली उच्च न्यायालयाने यावर आक्षेप घेत पासपोर्ट परत दिला. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयातील काही परिच्छेद नक्कीच महत्वाचे आहेत.

'ललित मोदी-सुषमा स्वराज प्रकरणी विनाकारण वाद रंगवला जातेय. यानिमित्ताने काँग्रेसला आयतं कोलीत मिळालं आहे. त्यामुळे काँग्रेस त्याचं राजकारण करते आहे' ... पवारसाहेब योग्यच सांगत आहेत. http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/met-lalit-mod…

In reply to by बबिता बा

तुम्ही जामोप्या ऊर्फ हितेश असलात तर धन्यवाद! तुमच्या अशा प्रतिसादांमुळे माझा धागा ३०० काय ४०० पर्यंत जाऊ शकेल. मात्र आमचे लक्ष आहे. आतापर्यंत उत्तम झालेली चर्चा तशीच राहू दे.

तुम्हाला म्हणून सांगतो (कुठं बोलू नका ) आमच्या गणपती मंडळानं दिवसरात्र अर्धखेळपट्टी चेंडूफळी सामने ठेवले होते. त्याचं आयोजन मी केल होतं. आता मंडळाच्या अध्यक्षाला सोंशय आहे की मी गफला केला. त्यानं कोतवालचावडीत तक्रार गुदरल्याने मला प्रभाग सोडून जाता येणार नाही असा हुकूम कोतवाल साहेबाने काढला आहे. माझी पत्नी संशयकल्लोळाने आजारी असून तिला बायजाबाचा माळ (चौफुल्यानजीक) उपचारार्थ घेऊन जाणे गरजेचे आहे. तरी माझ्या घरी येऊन गेलेले नगरसेवक, गटनेते, सभागृहनेते, स्थायीसमिती अध्यक्ष, महापौर, उपमहापौर, पीम्टीचे वेवस्थापक, महाराष्ट्र वादी पक्शाचे ध. न. दांडगेसाहेब, कमळाबाईंच्या माहेरची थोर मंडळी यांच्यापैकी कोन मानुसकी दाखवुण मदत करील का ?

In reply to by खटासि खट

तरी माझ्या घरी येऊन गेलेले नगरसेवक, गटनेते, सभागृहनेते, स्थायीसमिती अध्यक्ष, महापौर, उपमहापौर, पीम्टीचे वेवस्थापक, महाराष्ट्र वादी पक्शाचे ध. न. दांडगेसाहेब, कमळाबाईंच्या माहेरची थोर मंडळी यांच्यापैकी कोन मानुसकी दाखवुण मदत करील का ?
तुमच्या त्यांच्याशी असलेल्या "सम्बंधांवर" अवलंबून आहे

आजकाल बऱ्याच क्षेत्रात विशेषत: राजकारण ह्या क्षेत्रात होतांना दिसतात. ह्याचे मुख्य कारण म्हणजे उपयुक्ततावादी विचारसरणीचा अतिरेक.तू माझी पाठ खाजव मी तुझी खाजवतो. स्वातंत्र्योत्तर काळातील राजकारणी देखील परस्परांवर अनेक आरोप करत होते. पण उठसूट भ्रष्टाचाराचे आरोप लावणे हे शक्य होत नसे. कारण अक्षरश: हिमालयाएवढ्या उत्तुंग चारित्र्याची व्यक्तिमत्वे. माणूस हिंदुत्ववादी असो की कॉंग्रेसचा किंवा आंबेडकरी चळवळीचा; विरोध व्हायचा तो वैचारिक भूमिकांना. पण गेल्या दोन दशकांमधील परिस्थिती पाहिली तर माणूस हिंदुत्ववादी असो की कॉंग्रेसचा किंवा आंबेडकरी चळवळीचा; भ्रष्टाचाराच्या आरोपांतून कोणतीही संघटना सुटलेली नाही. हा प्रश्न केवळ राजकारण्यांच्या डोक्यावर खापर फोडून सुटणारा नाही. पक्षीय अभिनिवेशातून बाहेर पडून तटस्थ दृष्टीकोनातून वास्तव अनुभवणे हे अत्यावश्यक आहे. ह्या सततच्या आरोप-प्रत्यारोप ह्या दुष्टचक्राला कंटाळलेल्या देशाची वाटचाल नकळत अराजकाच्या दिशेने चालू असते. चारित्र्य घडवण्यासाठी तेवढीच उत्तुंग प्रेरणा असावी लागते. ही प्रेरणा मिळण्याचे स्त्रोतच समाजातून नष्ट होऊ लागले आहेत. रेताड जमिनीत पीक येत नाही. आधी पिकाऊ जमीन तयार करावी लागते. तेव्हा मिळतील फळे रसाळ गोमटी. If you don't stand for something you will fall for anything

In reply to by अवतार

अत्यंत समर्पक, उत्तम प्रतिसाद..
पक्षीय अभिनिवेशातून बाहेर पडून तटस्थ दृष्टीकोनातून वास्तव अनुभवणे हे अत्यावश्यक आहे. ह्या सततच्या आरोप-प्रत्यारोप ह्या दुष्टचक्राला कंटाळलेल्या देशाची वाटचाल नकळत अराजकाच्या दिशेने चालू असते.
हे कुणालाच मान्य नाहीय आजकाल असं वाटतं.. Objectivity नावाची चीजच जणू संपायला लागलीय.. म्हणून मग सेक्युलॅरीझ्म बद्दल बोललं, की लगेच काँग्रेसी-बगलबच्चा पासून आयसीस-समर्थक पर्यंत ताणतात लोक.. मोदींच्या एखाद्यापण गोष्टीची स्तुती केली, की लगेच तो संघिष्ठ.. केजरीवालच्या आक्रस्तळेपणाबद्दल बोललं, की तुम्ही भ्रष्टाचारीच.. खुप कलकलाट, कल्ला सुरु आहे सगळीकडे.. I am craving to hear a voice of reason. म्हणूनच मिपावर तुमच्यासारखे काही प्रतिसाद वाचले की बरं वाटतं..

In reply to by अवतार

If you don't stand for something you will fall for anything
अवतार साहेब, मस्त प्रतिसाद.. :)
पक्षीय अभिनिवेशातून बाहेर पडून तटस्थ दृष्टीकोनातून वास्तव अनुभवणे हे अत्यावश्यक आहे.
हे कधी नव्हे ते अति-आवश्यक बनलेय असे वाटतेय.

In reply to by अवतार

पक्षीय अभिनिवेशातून बाहेर पडून तटस्थ दृष्टीकोनातून वास्तव अनुभवणे हे अत्यावश्यक आहे.
आपल्यापैकी बहुतेक जण पॉलिटिकल पार्टी सेंट्रीक असतात. त्यामुळे आपल्या पार्टीचे सगळेच निर्णय एकतर सपोर्ट करणं वा विरुद्ध पार्टीचे सगळेच निर्णय चुकीचे ठरवणे हा भाग बनून जातो. तसही स्वत:ला या सगळ्यांपासून तोडून, स्वतंत्र विचार करण्याची कला कठीणच आहे. कारण कुठल्यातरी एका विचारसरणीचा प्रभाव आपल्यावर नाही म्हाणायला असतोच. त्यामुळे जरी आपण आपल्या परीन तटस्थ विचार केला तरी लोकं पार्टीचं लेबल लावायला तयार असतात. पॉलिटीक्स मधला माझा इंटरेस्ट अलिकडचाच. बघू मीही शिकतोय तटस्थ होणं.

In reply to by सुधीर

बांधिलकी विचारांशी आहे की व्यक्तींशी हे एकदा ठरवून घेतले की मग तटस्थ राहावे की नाही हे निर्णयस्वातंत्र्य मिळू शकते. विचारसरणी ही क्यालीडोस्कोपसारखी असते. प्रत्येकाच्या नजरेला दिसणारे आकृतिबंध हे वेगवेगळे असू शकतात. अशा वेळी स्वत:च्या नजरेतून बघायचे की इतरांच्या हा निर्णय महत्वाचा ठरतो. तसेही पक्षीय राजकारण ही राजकारणाची पहिली पायरी आहे. अंतिम नव्हे.

या चर्चेत भाग घेणार्या सर्वांनी ऐकावी आणि पहावी अशी जवळ जवळ ४४ मिनिटे चालणारी ललित मोदी यांची राजदीप सरदेसाई यांनी घेतलेली मुलाखत--- http://indiatoday.intoday.in/story/lalit-modi-exclusive-interview-sushm…