Skip to main content

पॉर्न साइट्सवरील बंदी ; किती योग्य, किती अयोग्य ?

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 09/08/2015 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी. मंडळी शतशब्दकथांच्या स्पर्धेच्या गर्दीत पॉर्नसाइट्सच्या बंदी विषयी काथ्याकुट आज येईल, उद्या येईल अशी वाट पाहात बसलो. रविवार उजाडला तरी अजूनही काही काही हालचाल दिसेना म्हटलं आपणच काथ्या घ्या आणि कुटा. मंडळी. पॉर्न साइट्सवर बंदी आणि पुन्हा सरकारने विरोधात उमटणार्‍या पॉर्न विरोधातील बातम्यामुंळे हलकेच चोरपावलांनी मागे येत ''चाइल्ड पॉर्न आणि ब्ल्यू फिल्म'' सोडून सर्व एडल्ट्स साइटवर बंदी हटविण्याचा निर्णय घेतला. सरकारने घोषणा केलेले असली तरी आता मोबाईल वर अशा साइट्स आता जवळ जवळ ब्लॉक केल्याचे दिसते. अश्लिल चित्रे, अश्लिल व्हिडियोज, अश्लिल लेखन, यामुळे समाजात वाईट परिणाम होतो म्हणजे कामुकता वाढते आणि स्त्रीयांना सार्वजनिक ठिकाणी वावरणे कठीण जाते आणि विविध अशी कारणे सांगितली जातात. विशेषतः लहान मुले अशा साइट्सवर रमु लागली तर काय परिणाम होईल असा एक विचार मांडला जातो. लहान मुला -मुलींच्या शरीराची जसजशी वाढ होत जाते तस तसे शरिरात अनेक बदल होतात आणि मग परस्पर भिन्न लिंग आकर्षण, उत्सुकता, यातून चित्र, व्हिडियोमधे, अश्लिल लेखन यात एक आनंद मिळायला लागतो. अशा माहितीतून विकृतीच निर्माण होते याचा काही माझ्याकडे विदा नाही. पण, अशा माहितीतून काही गैरसमज, भितीही दूर होते असे मला वाटते. आजच्या इतकं जाल जेव्हा मुक्त नव्हतं तेव्हा मुलांमधे कोणाच्या घरची मंडळी कुठे बाहेर गेलेली असली की अशा व्हिडियोज पाहण्याचा प्रचंड आटापिटा असायचा. आश्चर्य, भिती, न्युनगंड निर्माण व्हावा अशा प्रकारचे व्हिडियोज बघण्याची एक क्रेज असायची. लेखनातही असे लेखन आलं की दम घ्यावा लागायचा. मला आठवतं. मला शिकत असतांना अभ्यासक्रमाला ना.धो. महानोरांची 'गांधारी' नावाची कादंबरी होती. या कादंबरीतील नायिका केळीच्या बनात स्वतःला निर्वस्त्र करुन स्वतःच्या शरिराकडे बघते आणि लेखनाने त्या शरीराचं एकुण वर्णन त्यात केलेलं होतं. वाचतांना मला कोणी पाहात तर नाही, इतकी भिती वाटल्याचे स्मरते. बाकी अजून काही पुस्तकांवर तर बोलायलाच नको. कारण संस्काराखाली आपण दबले गेलेले असल्यामुळे अशा विषयावर चर्चा तरी कशाला करावी, असाही विचार येऊ शकतो. वेरुळ लेणीतील काही शिल्प, खजुराहो, या शिल्पांकडे बघतांना शिल्प अश्लिल आहेत म्हणुन पाहावे की कला म्हणुन पाहावे असाही विचार येऊ शकतो. अशीच बंदी घालावी लागत असेल तर भविष्यकाळात या शिल्पांवर काळा पडदा टाकावा लागेल. आता संकेतस्थळे वाढली. आंतरजाल आता सर्वांच्या घराघरात पोहचले आहे. चित्रपट, मालिका, यातून माणसांवर जे काही परिणाम व्हायचे ते होतातच, ते जसे थांबविता येतात तसे पॉर्न साइट्सच्या बाबतीत किती बघायचं, काय बघायचं याचंही भान असलं पाहिजे. सध्या वाट्सपच्या काळात काय काय व्हिडियोज येतात ते काही सांगायची गरज नाही. आपण बघतो पण दुसर्‍यांनी बघु नयेत. एकुणच जालमुक्त झालंय. समाजावर अश्लिल साइट्स खरच परिणाम करतात का ? त्याच स्वरुप कसं आहे ? सरकारची बंदी किती योग्य आणि किती अयोग्य त्यासाठी हा काथ्याकुट प्रपचं. (भाजप सरकार, काँग्रेस सरकार इकडे चर्चा घेऊन जाऊ नये)

वाचने 66504
प्रतिक्रिया 211

प्रतिक्रिया

खालील मुद्दे वरील काही प्रतिक्रियांमधेही आले असतीलच. १. सरकारतर्फे केलेला स्टंट पाहता 'पोर्न साइट्सवरील बंदी' हा खप वाढवण्याचा एक प्रकार आहे. २. पोर्नचे दुष्परिणाम फायद्यापेक्षा हजारो पटीने जास्त आहेत. ३. पोर्न 'फक्त आणि फक्त' खोट्या लैंगिक समस्या निर्माण करून त्यावर खोटे समाधान विकणार्‍या एका मोठ्या वर्तुळाचा भाग आहे. ४. पोर्न अतिव्यक्तिगत (कल्पनापातळीवर) मनोरंजनात्मक कार्य असेल तर विकृती ठरत नाही पण अभिव्यक्ती स्तरावर (दुसर्‍या व्यक्तीशी वागतांना) भयंकर विकृती ठरते. तसेच कोण कसे वागेल याची कोणीच खात्री देऊ शकत नाही. ५. पोर्नचा मनावर होणारा अजाणता प्रभाव कल्पनेच्या (प्युअर फँटसी) च्या पातळीवर ठेवणे प्रत्येकाला शक्य होत नाही. बघितले ते करायची इच्छा होतेच होते. त्यातून भयंकर प्रसंग उभे राहू शकतात. व्यक्तिगत पातळीवर असंख्य लोकांना या समस्यांशी काहीही दोष नसतांना सामोरे जावे लागते. ६. 'अजिबात गरज नसतांना उत्पादन फुकट विकायचे, त्यातून जीवनावश्यक गरज बनेल अशी परिस्थिती बनवायची, त्याचा पुरवठा झाला नाही तर अराजक माजेल असे खोटे चित्र तयार करायचे. बंदी-विरोध-जाहिरात यातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोचायचे. भाव वाढवून अधिक नफा कमवायचा.' हेच सूत्र ऑनलाईन पोर्न इंडस्ट्रीबद्दल आहे. समांतरः कोणी पोर्नजगतात स्वखुषीने येत नसतो हे वाक्य तद्दन भंपक आहे. कोर्टाने डान्सबारवरील बंदी उठवल्यावर बारमालक असोशिएशनच्या कुणा पदाधिकार्‍याचे हे एक वाक्य कायम डोक्यात गेलेले आहे. "अब ये लडकीयां इज्जत की रोटी कमा सकेगी".

In reply to by संदीप डांगे

पॉर्न जगतात स्वखुशीने येणार्‍यांचे प्रमाण त्यात नाइलाजाने येणार्‍यांपेक्षा निश्चितच फार कमि असावं. शिवाय, एकदा त्यात पडल्यानंतर उत्तरायुष्याचे प्रश्न इतर व्यवसायीकांपेक्षा जास्त गंभीर असावेत.

In reply to by अर्धवटराव

पॉर्न जगतात स्वखुशीने येणार्‍यांचे प्रमाण त्यात नाइलाजाने येणार्‍यांपेक्षा निश्चितच फार कमि असावं अक्षरशः कुठल्याही व्यवसायाबद्दल खरे ठरेल असे हे वाक्य आहे पण लैंगिक व्यवसायांशी निगडीत व्यावसायिकांबद्दल नेहमीच वापरले जाते. हे विधान वेश्याव्यवसायाबद्दल बर्‍याच अंशी खरे असले तरी पोर्नव्यवसायाबद्दल कितपत योग्य आहे याची नक्की आकडेवारी आपल्या कुणालाच देता येणार नाही. पण ज्याप्रकारे पोर्नजगत आहे किंवा दिसते त्यावरून तरी परिस्थिती नेमकी उलट असल्याचे समजते. त्यांची देशांतर्गत नागरी परिस्थिती, त्यांचे इरॉटीका एक्झीबीशन्स, कलाकारांच्या स्वत:च्या पेड साइट्स, प्रमोशन्स आणि मार्केटींग, इत्यादी पाहता 'शादी बनाके ले गये और पोर्नमें धकेल दिया' असे म्हणणार्‍या लाजो किंवा सलमा फार क्वचितच असतील असे माझे मत आहे. एकदा त्यात पडल्यानंतर उत्तरायुष्याचे प्रश्न इतर व्यवसायीकांपेक्षा जास्त गंभीर असावेत. याची जाण असल्यामुळे कोणी स्वखुषीने यात येत नसेल असं म्हणायला वाव आहे का? कारण पुन्हा एकदा हे विधानही अनेक (प्रतिष्ठेच्या) व्यवसायांबद्दल तंतोतंत खरे ठरते तरी लोक तिथे स्वखुषीने जातात असे दिसते. तसे बघितले तर पोर्नफिल्म तयार करणे, त्यात काम करणे यासारखे स्वस्त आणि मस्त काम लैंगिकतेशी निगडीत धंद्यांमधे शक्यतो मिळणार नाही. त्यामुळे त्या इतर व्यवसायापेक्षा इथे कमी धोका व जास्त पैसा आहे.

In reply to by संदीप डांगे

पॉर्न इंडस्ट्रीची इतर व्यवसायांशी तुलना करतो म्हटलं तर आजघडीला पॉर्न एक व्यवसाय म्हणुन क्वालीफायच होत नाहि...जरी त्याचं टर्नओव्हर इतर व्यवसायांच्या तोंडात मारेल इतकं असलं तरी. त्यामुळे इतर व्यवसायांशी त्याची तुलना साधक बाधकच करायला हवी. अनिश्चीतता, वर्क सॅटीस्फॅक्शन, यश आणि अनुभवाच्या बेरजेचं गणित इ. बाबी लक्षात घेता इतर व्यवसाय स्पायरल आहेत तर आजघडीला तरी पॉर्न टॅण्जण्ट आहे.

In reply to by अर्धवटराव

तांत्रिक व्याख्या थेट समजल्या नाहीत तरी आशयाशी सहमत आहे. पण मी फक्त 'व्यवसाय प्रवेश: स्वखुषीने की नाइलाजाने' हा एवढाच निकष लावला आहे. आपली चर्चाही बहुधा त्या निकषावरच आधारित आहे. बाकी एक व्यवसाय म्हणा किंवा आणि काही, कुणीतरी काहीतरी काम करतो त्याचे त्याला पैसे मिळतात एवढेच बघितले जाते. फक्त शोषणच होत असेल तर त्याला व्यवसाय म्हणता येणार नाही. प्रत्येक व्यवसायाच्या आपल्या खाचाखोचा असतात हा भाग निराळा. पोर्नमधे शोषण होतं व अक्खी इंडस्ट्री फक्त शोषणाधारित अर्थव्यवस्थेवर चालते असं दिसत नाही. जे वेश्याव्यवसायात प्रामुख्याने आढळून येतं. दोन्हीमधे मूलभूत फरक आहे.

In reply to by संदीप डांगे

समांतरः कोणी पोर्नजगतात स्वखुषीने येत नसतो हे वाक्य तद्दन भंपक आहे. सनी लियॉनने म्हटल्याचं (म्हणजे पेपरात वाचल्याचं) आठवतंय, की तिने हा व्यवसाय स्वतःहून निवडला म्हणून.

In reply to by बबन ताम्बे

ती ज्या पोझिशनला आहे तिथे पोचल्यावरसुध्धा तिने तिच्यावर जबरदस्तीने या व्यवसायात यावे लाग्ले असे म्हटलेले नाहीये

नक्की काय लिहावं हा एक मोठा प्रश्न आहे. उलट सुलट प्रतिक्रिया, ह्यावं अन त्यांव!! यात एक मुद्दा विचार करण्याजोगा आहे, पण तोसुद्धा अर्धा आहे. पै ने विचारलय, तुमचा ११ वर्षाचा मुलगा पॉर्न पहाताना सापडला तर तुम्हाला काय वाटेल? हाच प्रश्न मुलगी हा शब्द वापरुन लिहायची सुद्धा गरज वाटली नाही. आता पॉर्न! एकूण जी सगळी चर्चा चाललीय ती हार्ड कोअर पॉर्नबद्दल अस गृहीत धरु. कारण हे प्रकारच सॅडीस्टिक असतात. वर दिलेलेया एका प्रतिसादात लोकसत्ताचा लेख चांगला वाटला अस लिहीलं आहे. नक्की काय आवडल असावं त्या लेखात? बढाया? मी माझ्या घरात काय करतो/करते याचा सरकारशी संबंध नाही म्हणताना, निवांत त्याची पुरोगामी म्हणवून घेण्यासाठी केलेली जाहीर वाच्यता? देव जाणे. सेक्स एज्युकेशन्साठी पॉर्न ही तर अतिशय हास्यास्पद कल्पना आहे. स्वत:च्या अन भिन्न लिंगी व्यक्तीच्या शरीराबद्दलची स्पष्ट अन सुयोग्य शब्दात दिलेली माहिती म्हणजे सेक्स एज्युकेशन. अस करा अन तस करा हे सांगत नाहीत त्यात. जे काही माझ्या शरीराबाबत घडतय, ते नैसर्गिक आहे याचा अ‍ॅश्युअरन्स म्हणजे सेक्स एज्युकेशन, बरोबरीच्यांपेक्षा मी काही वेगळा/वेगळी नाही हा अ‍ॅश्यरन्स, अन भिन्न लिंगीयाच्या बद्दलची माहिती समजून घेतल्याने कमी होणारे औस्त्युक्य, या ३ गोष्टी सेक्स एज्युकेशन पुरवत. मग पुढे जाउन यात याचे नैसर्गिक्त्व, अन त्यद्वारे घडणारे प्रजनन. याचे दुष्परीणाम त्यातल्या मुक्त वावराने संभवणारे धोके न रोग हे स्गळ सेक्स एज्युकेशन मध्ये येत!! वाकड्या तिकड्या जिमनॅस्टिकला सुद्धा लाजवतील अश्या हाड मोडणार्‍या पोझेस नाहीत शिकवत यात. शिक्षण अन त्या मुळे येणारी समज, मनातल्या अधांतरी प्रश्नांची योग्य उत्तरे अन त्याद्वारे कमी होणारे न्युनत्व, एंक्झायटी. भिन्न लिंगीयांच्या शारीरिक बदलांची जाणिव अन पूर्ण माहिती मुळे उगा इकडे तिकडे डोकावण कमी होतं या शिक्षणाने. अर्थात हे झाले साधे सोपे विचार. उगा मिरवायला जाण्याजोग यात काही नाही, त्यामुळे ही बातमी होउ शकत नाही! ;) मुळात वासना ही नैसर्गिक असते. जशी भूक, तहान, निद्रा! तशीच मैथुन ही भावना. पण झालय काय, तर एक निद्रा सोडली; तर बाकिच्या स्गळ्याच वासनांचे अतिरेकी लाड वाढलेत. भुकेसाठी बर्गर, तहानेसाठी कोक, अन मैथुनासाठी पॉर्न! सगळ अस झटपट!! अन त्याची अतिरेकी चटक. त्या लोकसत्तेच्या लेखात म्हणे पति-पत्नीला उद्दीपित करण्यासाठी पॉर्न मदतीचे ठरू शकते??????? प्रेम, जिव्हाळा, आकर्षण?????? ह्यांच तेरावं घालण्याचा प्रकार आहे हा चक्क!! शारिरीक गरजांना नाकारणं जसं वाईट, तसच त्यांचा उदोउदो करणं सुद्धा वाईटच. कलासक्त मनाला कोणतीही गोष्ट सजवायला सांगाव लागत नाही, ते मन आपल्या आपण प्रत्येक गोष्टीत सुंदरतेचा प्रत्यय घडवत जाते. एकमेकाच्या सहवासाची ओढ, एकमेकाला पूर्ण सुख देण्याची आस, विश्वास याची कमतरता असणारी जोडपी (विवाहीत) मग अस पॉर्न मुळे उद्देपित व्हायची वाट पहात असावीत. असो. बंदी घालून कोणतीच वाईट गोष्ट थांबत नाही, पण योग्य जाणीव जागृत करण्याने बराच फरक पडेल. त्यातल्या त्यात सॉफ्ट पॉर्न असायला हरकत नाही, वर कुणी म्हंटल्याप्रमाणे पेड साईटस असाव्यात, ज्यायोगे स्वकमाई शिवाय हे पहाण्याचे धाडस होणार नाही. अनैसर्गिक गोष्टी दाखवायच्या बंद कराव्यात. लहाण अजाण मुलांच्या अस्तित्वाला धोका येउ नये, लहाण मुला-मुलींकडे पहाण्याची नजर बदलू नये एव्हढच एक साध्य व्हावं अस वाटत, बाकी सगळं ज्याच्या त्याच्यापुरत वैयक्तीक!!

In reply to by स्पंदना

प्रतिसाद आवडला.
पै ने विचारलय, तुमचा ११ वर्षाचा मुलगा पॉर्न पहाताना सापडला तर तुम्हाला काय वाटेल? हाच प्रश्न मुलगी हा शब्द वापरुन लिहायची सुद्धा गरज वाटली नाही.
नाही, मुली पोर्न बघत नाहीत वगैरे कोणताही दावा मी करत नाही. किती प्रमाणात बघतात यावर मतभेद असू शकतात. माझा भर "मुलगा" यावर नव्हता. तुमच्या घरातलं ११ वर्षांचं मूल यावर होता. मग तो मुलगा असो की मुलगी.

In reply to by पैसा

प्रश्न तुझ्या लिहिण्याचा नाही पै तै स्विकारण्याचा आहे। ३ दिवसापूर्वी भावाने बहिणीला तिचे वागणे आवडत नाही म्हणून सरळ मारून टाकले। दोघेही कोवळ्या वयाची। म्हणजे घरातल्या स्त्री ने अस काही पाहील तर तुम्हाला काय वाटेल हा प्रश्न सुद्धा सहन होणार नाही अस मला म्हणायचे आहे।

आता नीट मुद्देसुद लिहितो. भारतामधे पॉर्नबंदी म्हणा किंवा इतर बंदी का काम करत नाहीत? पॉर्नबंदी घालणे आणि उठवणे ह्या एका गोष्टीला अनेक पैलु आहेत. कायदेशिर बाजु, व्यावसायिक बाजु, व्यक्तीसापेक्ष बाजु, आर्थिक हितसंबंध आणि सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे भारतीय लोकांची भिकार वृत्ती. कायदेशिर बाजुंचा विचार करायचा झाला तर मुळामधे सरकारनी हा निर्णय का घेतला ह्याची कुठलीही कारणं दिलेली नाहित. सार्वजनिक ठिकाणी पॉर्न बघणं किंवा बघायला भाग पडणं हा गुन्हा "पब्लिक इंडिसेन्सी" खाली मोडत असावं. मिपावरच्या कायदे क्षेत्रामधील मंडळींनी ह्याविषयी लिहिणं योग्य ठरेल. ठराविक वयोमर्यादेखालच्या व्यक्तीने अ‍ॅडल्ट मटेरिअल हाताळणं (१८-) ह्याला बालगुन्हेगारीखाली जबाबदार धरलं जातं का? समजा एखादी व्यक्ती पकडली गेली तरी चिरीमिरी देउन सुटते. रेल्वे पोलिस मोबाईल्स ची तपासणी करतात अधुन मधुन. किती जणांवर खटले चालवुन शिक्षा झाल्या आहेत? हा अंमलबजावणी करणार्‍या यंत्रणेमधला दोष झाला. व्यावसायिक बाजु म्हणाल तर ऑनलाईन पॉर्न वरती किती व्यवसाय आधारित असतील ह्याची काही कल्पना करु शकता? इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स, पॉर्न इंडस्ट्रीमधली मंडळी, ब्राउझरवर अ‍ॅडव्हर्टाईझ होणारी उत्पादनं ही प्रातिनिधिक उदाहरणं झाली फक्त. एवढे सगळे लोकं हा "ईझी मनी" सहजासहजी सोडुन देतील असं वाटतं नाही. पॉर्नबंदी हटवण्यामागे ह्यामधल्या लॉबीचा दबाव असायची शक्यताही असु शकते. ह्यामधले इंटरनेट लॉबी वाले जे FUP (Fair Usage Policy) नंतर डेटा ला चार्ज असणारे आपले प्लान्स गाळामधे जातील ह्या भितीने कुठल्या थराला जातील ह्याचा भरवसा नाही. आर्थिक हितसंबंधांमधे हयच्या अजुन काही काळ्या बाजु मांडतोचं. व्यक्तीसापेक्ष बाजु मी वरच्या मुद्द्यात मांडली आहेच. सद्विवेकबुद्धी, पर्सनल चॉईसेस वगैरे वगैरे. एका व्यक्तीचं आयुष्य जोपर्यंत ती दुसर्‍याला कुठल्याही प्रकारचा त्रास देत नाही तोपर्यंत नियंत्रणाखाली आणायचा नैतीक अधिकार कोणालाही नसावा. आर्थिक हितसंबंध ही ह्या धंद्यामधली सगळ्यात काळी बाजु: ह्या इंडस्ट्रीमधे गुंतवणुक कोणाची असते हो? :) ही लोकं स्वत:चे हितसंबंध जपायला काय करतात हे काय नव्याने सांगायला हवं का? आजपर्यंत सरकारने बंदीचे अनेक निर्णय घेतले. प्रातिनिधिक उदाहरण म्हणुन गुटकाबंदीविषयी बोलु. काय झालं हो गुटकाबंदीनंतर? रुपया दोन रुपयाला मिळणार्‍या पुड्या सरळ सरळ दहा रुपयाला टपरी टपरीवर मिळायला लागल्या. महसुल/ एफ.डी.ए. ला हि गोष्ट माहित नसेल असं वाटतं? चिर्‍यामिर्‍या. पोती भरभरुन चिर्‍यामिर्‍या. ह्याला म्हणतात माफियाराज. परवा पॉर्नबंदी घातली त्यावेळेला नॉर्थ इंडियन स्टेट्समधल्या "धंदे"वाल्यांनी काय करावं? एरवी १००-१५० रुपयाला विकली जाणार्‍या पॉर्न डीव्हीडीज काळ्याबाजार भावानी विकायला सुरुवात केली. ऑपॉर्च्युनिस्ट्स :P. (ref: सकाळमधली बातमी) सगळ्यात शेवटी भिकार भारतीय मनोवृत्ती. कायदा केला रे केला की "बिन खड्ग बिना ढाल" वाल्यांचा आधीच चुकीचा असणारा "आदर्श" डोळ्यासमोर आणुन लग्गेचं सविनय कायदेभंग करायला जातील. अरे जिथे लोकांना सिग्नल पाळणं हा अपमान वाटतो तिथे साक्षात पॉर्नबंदी घातली तर पौरुषत्वावर घाला घातल्याचा आव आणुन तावातावाने वाद घालणारे ह्या दोन आठवड्यांमधे ढिगाने भेटले. ज्यादिवशी बंदी घातली गेली तेव्हापासुन ४८ तासांच्या आतमधे ह्या बंदीला प्रॉक्सी सर्व्हर्स वापरुन कसं मोडावं ह्याचे मेसेजेस फेसबुक म्हणा व्हॉट्स अ‍ॅप म्हणा सगळीकडे फिरत आहेत. कुठल्या वेबसायटी चालु आहेत ह्याची भली मोठी यादी पाठवली गेली. ह्या समाजप्रबोधनाचा परिणाम काय म्हणे तो? ज्या लोकांची पॉर्न डिक्शनरी १०=१२ वेबसायाटींपुर्ती मर्यादित होती त्यांना ८००-९०० वेबसायटींचा खजिना सापडला. सापडतील का तुम्हाला ह्यापेक्षा भिकार मनोवृत्तीची लोकं कुठं? त्यापेक्षा कायद्याच्या चौकटीत राहुन लोकांना "हैदोस" घालायची परवानगी असणं काय वाईट आहे? बंदी घाला नाहितर नका घालु लोकं ते बघणारचं. मला पॉर्न बघायचं किंवा त्यावर बंदी घालणं अश्या दोन्ही गोष्टींचं समर्थन करायचं नाहिये. लाईफ शुड बी ऑलवेज बॅलन्स्ड विथ डार्क डिसिजन्स अँड फेअर डिसिजन्स. अदरवाईज लाईफ विल बी रिडंडंट अँड बोरिंग.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्त हो चिमणराव.. :) प्रतिसाद आवडलाय.. अति अवांतर : सा.सं.ची जबाबदारी आल्यापासून चिमणरावांच्या प्रतिसादांची लांबी वाढत चाललीय असे नमूद करतो (ते चांगलंच आहे तरी पण) त्याच बरोबर "लाईफ शुड बी ऑलवेज बॅलन्स्ड विथ डार्क डिसिजन्स अँड फेअर डिसिजन्स. अदरवाईज लाईफ विल बी रिडंडंट अँड बोरिंग" अशी देवनागरीतील इंग्रजी वचने पाहून आम्हास राहून राहून सरांची आठवण येतेय.. ;) (स्स्सsssर !! अशी आर्त हाक कल्पावी आणि ह.घ्यावे)

"मनुष्यप्राणी,बोनोबो-एक माकडाची जात आणि डॉलफीन्स हे तीन प्राणी प्रजोत्पत्ति व्यतिरीक्त सेक्स करण्यात लय आनंद घेतात. नव्हेतर माणसाला मेंदुत अचाट कल्पनाशक्तीचं वरदान असल्याने विकृत कल्पनेतून तो प्रचंड आनंद घेऊ शकतो हे दाखवण्यातही तो आनंद घेत असतो."प्रो.देसाई मला म्हणाले.

बंदी असावी कि नाही यावर चर्चा आहेच आणि ती चालूच राहील . माझ्या डोक्यात वेगळाच विषय आहे . अतीच अवांतर होत असेल तर प्रतिसाद उडवून टाकावा मुळात या सगळ्याची गरज लहान मुलांमध्ये का तयार होते ? त्यांना योग्य वयात योग्य ती माहिती दिली तर पोर्न बघणं टाळू शकतील का मुलं ? माझ्यामते हो . कारण बहुतेकदा वाढत्या वयातली उत्सुकता हे एकाच कारण असतं . नंतर त्याचं व्यसनात रूपांतर होतं . हो याचं हि व्यसन लागतं. इथे बरेच पालक आहेत ज्यांनी मुलगी १२-१४ वर्षाची झाल्यावर तिला सध्या तिच्या शरीरात होत असलेल्या किंवा पुढे होणार असलेल्या बदलांबद्दल माहिती दिली असेल किंवा देणार असाल . पण जेव्हा हीच वेळ मुलांच्याबाबतीत येते तेव्हा "समजेल त्याचा तो " असं म्हणून टाळून दिली जाते . (असे लोक माहितीतले आहेत). एका ओळखीच्या काकांनी मला त्यांच्या सिस्टम वर अडल्ट फ़िल्टर चालू करण्यासाठी बोलावलं होतं . का तर म्हणे त्यांचा सातवीतला मुलगा "काहीबाही" बघतोय . घरातले वडिलधारेच जेव्हा सरळ शब्द वापरून बोलू शकत नाहीत . तर ते मुलांना काय आणि कसं समजावणार ?

In reply to by पैसा

"व्यक्तिस्वातंत्र्याबद्दल बोलणारे" ते फक्त स्वतःच्या प्रसिद्धीचा विचार करतात . मग तिथे इतर valid (मराठी शब्द? ) कायमच गौण ठरत आलेले आहेत

In reply to by अद्द्या

सहमत एखाद्या मुलाला घरीच चांगल्या तेलात केलेले वडे दिले आणि बाहेरचे तेल खराब असते हे त्याच्या मनावर योग्य वेळी बिंबवले तर बाहेरचे वडे खाण्याचा त्याच्या मोहावर बऱ्याच प्रमाणात आळा बसेल. या उलट घरी एखादी गोष्ट ban आहे तर ती का ban आहे हि उत्सुकता आणि ती चोरून करण्याची इच्छा (एखादी गोष्ट चोरून करण्याची नशा वेगळीच असते मग ते चोरून लाडू खाणे असो व प्रेम करणे) यातून अशा गोष्ट फोफावतात (उद. एखाद्याच्या घरी शाकाहारी असतील तर बाहेर जाउन मांसाहार करण्याची सवय). यावर मानसोपचार तज्ञ जाणकार अधिक माहिती पुरवतीलच

अद्दयाच्या मुलग्यांबाबतच्या मुद्दयाबाबत सहमत.माझ्या मुलाशी तो सातवीत गेल्यावर याबाबतीत त्याच्याशी बोलले होते.कदाचित माझ्या वैद्यकीय पार्श्वभूमीमुळे मला त्याच्याशी बोलण्यात संकोच वगैरे वाटला नाही. त्यातच माझ्या घरात चोवीस तास वायफायमुळे नेट अॅक्सेस आहे.तेव्हा मुलाशी काय बघ काय नको हे मला दुष्परिणामांसकट बोलावेच लागले होते.त्याला पासवर्ड न सांगुन अविश्वास ठेवावासा वाटत नव्हता हेही खरं.अगदी याच्या उलट घटना माझ्या एका डाॅ मैत्रिणीच्या मूलाबाबत घडल्यावर मला आपण जे केले ते बरोबरच याची खात्री मुलाच्या बाबालाही पटवता आली!त्याला वाटतं मुलांना सांगावे लागत नाही.आपोआप कळतं सर्व! तर याच मैत्रिणीच्या मुलाने सातवीत असताना एका वर्गातल्या मुलाच्या मोठ्या भावाने नेटवर लावलेला पाॅर्न व्हिडिओ पाहिला.नंतर मात्र आपण काहीतरी चुकीचं केलंय ,घाण पाहिलंय वाटून घुसमटायला लागला.त्यात त्याला सारखं हात धुण्याची सवय लागली.सारखं गप्प राहतो,हात धुतोय म्हणून चिंतित आईने जवळ घेऊन विचारल्यावर पोरगं रडायला लागलं.आणि सर्व सांगितलं. त्यानंतर बरेच दिवस त्याचे काऊन्सेलिंग करावे लागले.हे सर्व माझ्या मुलाला मला सांगून त्याच्याशी यावर बोलता आले. आईवडील मुलाच्या नात्यात तेवढी मित्रता असेल तर मुलांशी यावर बोलता येऊ शकते.बोलावेच.

In reply to by अजया

आईवडील मुलाच्या नात्यात तेवढी मित्रता असेल तर मुलांशी यावर बोलता येऊ शकते.बोलावेच. अगदी खरं . पण जसा मी आधीच्या प्रतिसादात किस्सा सांगितला . बव्हंशी पालक सध्या याच विचारांचे आहेत . कि मुलांशी (इथे मुलगा मुलगी हा फरक नाही ) हे सगळं बोलणं म्हणजे काही तरी गंभीर गुन्हा करतोय, एक दोनदा तर योग्य माहिती देणाऱ्या पालकांना हेच लोक "तुम्ही मुलांना लहान वयात बिघडवताय " असं हि ऐकवताना पाहिलंय. जर योग्य त्या वयात योग्य ती माहिती आणि खरी माहिती (त्याच्याशी निगडीत सगळ्या शारीरिक सामाजिक आणि वैज्ञानिक गोष्टींसहित जर सांगितली ) तर पोर्न काय किंवा इतर व्यसनं काय हि सगळीच टाळता येऊ शकतात . कमीत कमी तो किंवा ती शारीरिक आणि मानसिक दोन्ही बाजूनी २१+ होत नाही तोपर्यंत तरी. त्यानंतर ते काय करतील तो त्यांच्या त्यांचा प्रश्न आहे.

In reply to by अजया

+१ माझ्या मुलांची टीचर म्हणाली its better to know it from the person they trust, love and rely on instead of getting the wrong impression through Google. आश्चर्य वाटेल पण बऱ्याच श्रीलंकन आया objetion घेत होत्या या विषयावर।

पॉर्न चे फायदे -- वि. सु. - यात पॉर्नचे कुठलेही समर्थन नाही किंवा त्याच्याबद्दल कोणताही आकस नाही. हे त्याचे फक्त वस्तुनिष्ठ वर्णन आहे. बहुसंख्य व्यक्तींच्या जोडीदाराची शरीरबोली आणी शरीरसौष्ठव हे त्यांना आकर्षित करेल किंवा काळानुसार आकर्षित करून ठेवेल असे राहत नाही (पुरुष नि स्त्रिया दोन्ही).काही काळानंतर आपल्या जोडीदाराच्या शरीराचे आकर्षण कमी झाले/ नाहीसे झाले तर त्या व्यक्तीबरोबर शरीर संबंध ठेवणे हे जास्त जास्त कठीण होत जाते. मानवी मन हे अशावेळेस कल्पनारम्यतेचा( FANTASY) आधार घेत असते. आपल्या जोडीदारा ऐवजी दुसर्या तरुण नट किंवा नटी बरोबर आपण प्रणय करीत आहोत( यात संभोगच असेल असे नाही) अशा कल्पना विलासाचा आधार घेऊन प्रत्यक्ष प्रणय क्रीडा चालू राहू शकते. यावेळेस बायका नवर्याऐवजी दुसर्या तरुण आणी देखण्या पुरुषाची आणी नवरे बायको ऐवजी एखाद्या सुंदर नटीची कल्पना डोक्यात ठेवून शृंगार करत असतात. (सनातनी लोक याला मानसिक व्यभिचार म्हणू शकतील). परंतु हि परिस्थिती ९० % जोडप्यांच्या बाबतीत त्यांच्या आयुष्यात कधीतरी घडतेच.अशा कल्पना विलासाचा मूलाधार अश्लील साहित्य असू शकते. आपली बायको कमनीय आहे किंवा आपला नवरा तारुण्याने मुसमुसलेला आहे आणी तो अर्धा तास "संबंध" ठेवू शकतो अशा तर्हेचा कल्पनाविलास या जोडप्याला एकत्र ठेवण्यास मदत करू शकतो. या कल्पनाविलासामुळे भावनिक/ मानसिक निचरा होण्यास मदत मिळते. सम्भोगासक्ती( मैथुन) हि आद्य प्रेरणा आहे तेंव्हा ती दडपणे हे अनैसर्गिक आहे अशावेळेस कोंडून ठेवलेल्या भावनांचा निचरा होण्यास बरेच लोक पॉर्नचा आधार घेतात हि वस्तुस्थिती आहे. त्याच्या समर्थनार्थ कोणी आमची "कामसूत्र संस्कृतीच" आहे याचा आधार घेतात. बायको ढिगार्या सारखी पडलेली असते किंवा नवरा बटाट्याच्या पोत्यासारखा कळकट आहे ( हि प्रत्यक्ष रुग्णांनी केलेली वर्णने आहेत) असे असताना संबंध कसा ठेवणार असे प्रश्न रुग्णांकडून बर्याच वेळेस येतात. वंध्यत्वा वर उपचार करताना आपल्या शारीरिक संबंधांची वारंवारता किती आहे? हा एक नैसर्गिक प्रश्न येतोच. हि वारंवारता वाढवणे हे हि आवश्यक आहे. मग अशा वेळेस त्यांना उपाय सांगताना दोघांची शारीरिक आकर्षकता वाढवायचे उपाय सांगण्याबरोबर चावट आणी अश्लील( यात फरक श्रेणीचा आहे) साहित्य वाचणे/ पाहणे हेही सांगावे लागते. पुरुषांची परिस्थिती फारच वाईट असे.(कारण प्रत्यक्ष कार्य पुरुषाला करावे लागते. स्त्रिया थंडपणे पडून राहू शकतात) बायको लठ्ठ असल्याने आकर्षणच वाटत नाही त्यातून ती कायम घामाने थबथबलेली असते त्यामुळे "इच्छा'च होत नाही आणी "इच्छा" झाली तरीही लिंग ताठरता येत नाही हि परिस्थिती फार वेळा आढळून येते . मुळात लठ्ठ पणामुळे स्त्रीला PCOS(POLYCYSTIC OVARY SYNDROME-- PCOS is the most common endocrine disorder among women between the ages of 18 and 44. It affects approximately 5% to 10% of this age group. It is one of the leading causes of poor fertility स्त्रोत विकी) हा आजार झाल्याने वंध्यत्व आलेले असता हा "अजून" असलेला प्रश्नही( लिंगशैथिल्य) सोडवावा लागतो. त्यातून ज्या दिवशी स्त्रीबीज तयार होईल( हे स्त्रीबीज २४-३६ तासच कार्यक्षम असते आणी यानंतर संबंध केला तर तो निरुपयोगी ठरतो) त्या विविक्षित दिवशी त्यांना संबंध ठेवा हे सांगावे लागते. यामुळे मुळात कठीण असलेला शरीर संबंध हा अजूनच कृत्रिम होतो. अशा वेळेस पुरूषाला उद्दीपित करण्यासाठी चावट आणी अश्लील साहित्याचा वापर करावा लागतो किंवा पुरुषाला कल्पनाविलासाचा( FANTASY) आधार घ्या हे सांगावे लागते. हे कितीही सोपे असले तरी आपली बायको ८७ किलो ची असताना तिला चवळीची शेंग "समजणे" किती कठीण आहे हे जो त्यातून गेलेला आहे त्यालाच विचारा. गर्भाशयात शुक्राणू रोपण (INTRAUTERINE INSEMINATION) या क्रियेसाठी पुरुषाला वीर्य दान करावे लागते परंतु हस्तमैथुन करून वीर्य देणे हि गोष्ट अपरिचित वातावरणात सोपी नसलेली गोष्ट आहे. १९९४ साली आमच्या वंध्यत्व केंद्राला यासाठी दिलेली खोली जुनी इंग्रजांच्या काळातील होती (३० X २० फुट आणी तिचे छप्पर १८ फुट होते) अशा ठिकाणी तुम्ही कितीही पडदा लावा माणसाला लिंग ताठरता येणे फार कठीण होत असे. अशा वेळेस आम्ही सरकार कडून एक व्हिडियो प्लेयर शैक्षणिक अनुदानातून विकत घेतला आणी अशा उपचारातून यशस्वी झालेल्या पहिल्या माणसाला अश्लील साहित्यःच्या कॅसेट्स "भेट " देण्यास सुचवले.यानंतर अशा १२ कॅसेट आम्हाला भेट म्हणून मिळाल्या होत्या( या कॅसेट चोरीच्या भीतीने कुलुपबंद ठेवाव्या लागत असत). जे लोक त्यातून गेले होते त्या लोकांना त्याची गरज किती आहे ते व्यवस्थित समजलेले होते. वि सू-- यात कोणत्याही वजनाच्या किंवा आकाराच्या अथवा रंगाच्या व्यक्तींचा अधिक्षेप करणे हा हेतू नसून प्रत्यक्ष आलेल्या अनुभवांचा उल्लेख आहे मूळ मुद्दा सरकारने त्यात हात घालावा कि नाही हे मी वर दिलेल्या इतर प्रतिसादात माझे मत दिलेले आहेच त्याची द्विरुक्ती नको.

In reply to by सुबोध खरे

फार वर्षांपूर्वी एक नाटक आले होते. लेखक बहुदा सुरेश खरे. त्यात एका पुरूषाला काही लैंगिक समस्या असते . परस्त्रीच्या संबंधातून तो त्या समस्येवर मात करतो असा काहीसा प्रकार त्या नाट्कात होता. वरील कॅसेटचा प्रकार वाचून त्या संदर्भाची आठवण झाली. माझ्या निरिक्षणातून असे मी म्हणू शकतो की प्रौढ पुरूषाना असा चित्रपट पाहाण्याचा फायदा होत असतो. यात आपल्या लैंगिक भागीदाराच्या मर्जीचा सवालच पैदा होत नाही. फक्त १८० ते २४० व्होल्टस चा विद्युत प्रवाह , चित्रफित व स्क्रीन या लहर नसणार्‍या गोष्टीचे सहकार्य अपेक्षित असते. कदाचित असा फायदा स्त्रीयाना देखील होत असेल.ज्या देशात असे काही पहाण्याची मुभा असते त्या देशातील नवराबायकोतील लैंगिक बाबतीतील धुस्फूस व बलात्काराच्या प्रकारांचे प्रमाण कमी असेल तर वारांगनांप्रमाणे पोर्न ही देखील समाजाची गरज आहे असे म्हणावे लागेल. एक बाब १०० टक्के दिसून आली आहे की चित्रपट समाजाचे प्रतिबिंब असतो समाज चित्रपट पाहून घडत नसतो.

In reply to by सुबोध खरे

हे सेक्सॉलॉजी विषय घेऊन डॉक्टर झालेत का? एक भाबडा प्रश्न

In reply to by श्रीकृष्ण सामंत

@श्रीकृष्ण सामंत नाही साहेब मी रेडियोलॉजी मध्ये एम डी केलं आहे परंतु लष्करात असताना ३ महिने मनोविकार शस्त्रात काम केलं आहे. त्यावेळेस आलेले अनुभव आणि त्यात काम केल्यामुळे मिळालेली दृष्टी यामुळे हा प्रश्न किमान ९० % घरात असतो आणि बर्याचदा तो प्रश्न न सोडवता प्रलंबित राहतो आणि त्यातून दुसर्याच मानसिक व्याधी उद्भवतात हि वस्तुस्थिती जाणवली. डॉक्टरी करताना नुसतेच डोळे उघडे ठेवले तरी असे बरेच प्रश्न समोर येतात आणि त्याचा जमेल तितका उपचार करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो. एवढेच

In reply to by सुबोध खरे

A post from FB In India people want their children should not know anything about sex b4 marriage and expect they should be master in sex on 1st night after marriage.

अवांतर: तोंडावर कोणी कितीही इंजिनियर डॉक्टर होणार म्हणले तरी मनातून प्रत्येक तरुणाला याच इंडस्ट्री मध्ये करिअर करायची सुप्त इच्छा असते (काय आप्पा वरून साभार )

In reply to by कहर

मुळीच नाही केवळ चार वेळेस संभोग करायला मिळेल म्हणून कोणी यात पडेल असे नाही. त्यातून उघड्यावर असा संभोग करायला किती लोक तयार होतील? तेवढे सोडा हो. रस्त्यावर नागवे जाण्याची किती लोकांची इच्छा होईल? आणी येथे प्रवेश मिळवण्यासाठी आपला चेहरा आणी शरीर यष्टी तशी असावी लागते. येरागबाळ्याचे काम नव्हे. उघड्यावर शौचाला बसण्याचीच सर्वाना लाज वाटते तर संभोग करायला कसे कोण तयार होईल. काहीच्या काही प्रतिसाद

In reply to by सुबोध खरे

योग्य प्रतीवाद! ज्यांनी "बो डेरेक"चा १० हा सिनेमा पाहीला असेल (सन १९७९ ला आलेला) त्यांना फक्त पडद्यावरची हिरवीण त्या कपड्यात पाहाय्ची होती किमान सोत्ताची बाईल त्या कपड्यात पाहाय्ची आज तरी तयारी असेल का !!!! खरे खुरे उत्तर स्वतः शोधा मग बाकीचे आहेच गाव गप्पा!!

In reply to by सुबोध खरे

रस्त्यावर नागवे जाण्याची किती लोकांची इच्छा होईल
रस्त्यावर नाही जाता येणार पण जिथे नागडेच व्हावे लागते असे न्यूड बीच अस्तित्वात आहेतच की. आणि आश्चर्य म्हणजे प्रचंड गर्दी सुद्धा असते तेथे. तिथे नाही लोकांना लाज वाटत " When in Rome, Do as the Romans do" . शिवाय right to bare साठी खुद्द स्त्रियांचा लढा चालू आहे. प्रत्येकाला वाटते देशाचे पंतप्रधान व्हावे पण होता येत नाही हि गोष्ट वेगळी अशा काहीश्या अर्थाने असावे.

मिपावरचे या विषया संबंधीचा एक धागा :- http://www.misalpav.com/node/20247 बाकी, पॉर्न इंडस्ट्री मधील व्हिडीयो बद्धल चर्चा होते, पण त्यामागची लैंगिक उत्पिडन्,क्रौर्य तसेच ड्रग्स आणि विकॄती या बद्धल जास्त बोलले जात नाही ! मला आठवतय त्याप्रमाणे युएस पॉर्न इंडस्ट्रीने मागच्या रिसेशनच्यावेळी {२००९ } बेल आउट पॅकेज सुद्धा मागितले होते ! ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- तुझे जीवन की डोर से बाँध लिया है... :- Asli Naqli

एकुणच १) बहुतांश लोकांन्नी नितांत सुंदर असे पोर्न चित्रपट पाहिलेले दिसत नाहीयेत ! २) पॉर्न हे केवळ पुरुषांसाठी बनवले जाते , केवळ पुरुषांन्नाच त्यातुन आनंद मिळतो . असे काही जणांचे मत दिसत आहे . ३) पॉर्न पाहुन लोकांना इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्ष येतो ( हे बर्‍याचांशी खरे आहे , पण असा कॉम्प्लेक्ष येणारे लोक खर्‍या अर्थाने प्रौढ झालेलेच नसतात हे ही तितकेच खरे ) ४)पॉर्न मधे इमोशन्स नसतात असे जे काही मत आहे ते ही काहीच्या काही आहे , इन्टिमेट रिलेशन मधील शृंगाराचे चित्रण न पाहिलेले लोकच असे काहीतरी विधान करु शकतात. ५)चाईल्ड पोर्नोग्राफी हा नक्कीच विकृत प्रकार आहे त्यावर १००% बंदी असायलाच हवी ! पण म्युच्युअल कन्सेंट ने केलेल्या पोर्न वर बंदी आणणे ही तर सरळ सरळ स्वमतंध दांभिकता आहे ! ६) भारतात बहुतांशलोक प्रौढ होतच नाहीत , ०-१८ वयोगटातुन डायरेक्ट ६० + ह्या वयोगटात उडी मारतात त्यामुळेच ह्या असल्या पॉर्नबंदी सारख्या मुर्ख प्रकारांचे पीक येत आहे ! ७) डिक्लेरेशन मधे म्हणल्या प्रमाणे We hold these truths to be self-evident, that all men are created equal, that they are endowed by their Creator with certain unalienable Rights, that among these are Life, Liberty and the pursuit of Happiness. लोकांच्या पर्स्युट ऑफ हॅप्पीनेस वर गदा आणणारे सरकार जास्त काळ टिकुन राहु शकेल असे वाटत नाही . ( अर्थात सरकारने कालच पोर्न वर बंदी घालता येणार नाही असे क्लीयर केले आहे :) ) असो . (संपादित)

In reply to by प्रसाद गोडबोले

एकुणच
१) बहुतांश लोकांन्नी नितांत सुंदर असे पोर्न चित्रपट पाहिलेले दिसत नाहीयेत !
सयटीवर नितांत सुंदर पोर्न असतातच असे नाही. (मी पॉर्न स्टार्सबाबत बोलत नाहीये).
२) पॉर्न हे केवळ पुरुषांसाठी बनवले जाते , केवळ पुरुषांन्नाच त्यातुन आनंद मिळतो . असे काही जणांचे मत दिसत आहे .
जाउद्याना ? कधी तरी प्रतिसादाची गल्ली चुकते... नको तिथे प्रकाशीत होतो. वरील वाक्य त्याचे उत्तम उदाहरण आहे. ते वाक्य संपुर्ण मिपाकरांसाठी नक्किच नाही असे मझे ठाम मत आहे.
३) पॉर्न पाहुन लोकांना इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्ष येतो ( हे बर्‍याचांशी खरे आहे , पण असा कॉम्प्लेक्ष येणारे लोक खर्‍या अर्थाने प्रौढ झालेलेच नसतात हे ही तितकेच खरे )
पॉर्न सोडा.. साधे प्रऊढांसाठीचे चित्रपटही (अगदी ए लिस्ट हिरोहिरवीन असलेले सुध्दा) कामक्रियेबाबत भलतेच गैरसमज अप्रौढ डोक्यात निर्माण करतात हे वास्तव आहे.
४)पॉर्न मधे इमोशन्स नसतात असे जे काही मत आहे ते ही काहीच्या काही आहे , इन्टिमेट रिलेशन मधील शृंगाराचे चित्रण न पाहिलेले लोकच असे काहीतरी विधान करु शकतात.
:) सहमत.
५)चाईल्ड पोर्नोग्राफी हा नक्कीच विकृत प्रकार आहे त्यावर १००% बंदी असायलाच हवी ! पण म्युच्युअल कन्सेंट ने केलेल्या पोर्न वर बंदी आणणे ही तर सरळ सरळ स्वमतंध दांभिकता आहे !
चाईल्ड पोर्नोग्राफी हे नुसते नाव वाचुन वा ऐकुनच शिसारी येते.
६) भारतात बहुतांशलोक प्रौढ होतच नाहीत , ०-१८ वयोगटातुन डायरेक्ट ६० + ह्या वयोगटात उडी मारतात त्यामुळेच ह्या असल्या पॉर्नबंदी सारख्या मुर्ख प्रकारांचे पीक येत आहे !
तरीही प्रॉब्लेम ० ते १८ वयोगट वालेच निर्माण करतात हे वास्तव आहे.
७) डिक्लेरेशन मधे म्हणल्या प्रमाणे We hold these truths to be self-evident, that all men are created equal, that they are endowed by their Creator with certain unalienable Rights, that among these are Life, Liberty and the pursuit of Happiness. लोकांच्या पर्स्युट ऑफ हॅप्पीनेस वर गदा आणणारे सरकार जास्त काळ टिकुन राहु शकेल असे वाटत नाही . ( अर्थात सरकारने कालच पोर्न वर बंदी घालता येणार नाही असे क्लीयर केले आहे :) )
:)
असो .
नक्किच.
(संपादित)
जे ब्बात.

In reply to by प्रसाद गोडबोले

हा प्रतिसाद आपण कुत्सितपणे (sarcastic) दिलाय का? पॉर्नमध्ये पण वेगवेगळ्या पातळ्या असतात हे आपणास माहित नाही का? ज्या ८००-९०० sites वर बंदी घातली होती त्या विकृत किंवा लहान मुलांशी संबंधित चित्रफिती दाखवत म्हणून होती. तसं पण hardcore पॉर्न बघून आनंद मिळणारे विकृतच म्हणायला पाहिजेत. बहुतांशी Hollywood चित्रपटांमध्ये soft पॉर्न असतं जे बघायला काही हरकत नसावी. कारण ज्या emotions बद्दल तुम्ही लिहिताय त्या अश्या चित्रपटांमध्ये असतात. मुख्य म्हणजे गोष्टीच्या संदर्भात एखादा असा scene आला तर फारसं काही विचित्र वाटत नाही. पण जे hardcore पॉर्न असतं त्यात म्हणजे बाकी काही नाही फक्त २/३/४ पुरुष व स्त्रिया समोरासमोर येतात आणि चालू होतात. कोण कोणाशी कुठे कसं काय करतोय/ करतीये ह्याचा पत्ताच नसतो. पण विकृतीतून आनंद मिळवणारे पण काही कमी लोक्स नाहीत. पण सगळ्यांची सगळी विकृती शामवलीच पाहिजे असं पण नाही ना?

In reply to by ट्रेड मार्क

नितांतसुंदर पॉर्न!!! हा प्रतिसाद आपण कुत्सितपणे (sarcastic) दिलाय का? >>> माझा प्रतिसाद कुत्सित पणे दिलेला नव्हता पण आता खवट प्रश्ण विचारतो : तुम्ही एकतरी नितांत सुंदर प्रणयाचे चित्रण असलेला नीलचित्रपट पाहिला आहे काय ? हे घ्या लिस्ट : धिस साईड ऑफ पॅराडाईज सबमिशन ऑफ एम्मा मार्क्स सन डे आफ्टर्नुन स्पॅनिश गार्डन अ डे टु रिमेम्बर अ लव्ह स्टोरी द गर्ल विथ अ टर्कॉईज फ्लॉवर a असो . उगाच अभ्यास न करता विकृती विकृती म्हणुन दंगा करण्यात काय अर्थ आहे ? की आपणही #स्वमतांध_दांभिक आहात ?

In reply to by प्रसाद गोडबोले

महाराज, तुमची परत गफलत होते आहे. इथे कोणीही इंग्रजी चित्रपटातल्या संभोग दृष्यांविषयी फारसं बोलत नाहीये. मुळात सगळे इंग्रजी चित्रपट पोर्नोग्राफिक असतात असा आपला (गैर) समज आहे का? पॉर्न फिल्म्स ही एक पूर्णपणे वेगळी category आहे, ज्यात कुठलीही गोष्ट (story) नसते. बाकी इतर प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे नुसतेच २/४ लोक्स एकत्र होतात आणि सरळ सरळ संभोग चालू होतो. यात फक्त penetration ला महत्व असते आणि बाकी काही, म्हणजे चुंबन, मिठी, जोडीदाराच्या शरीराला (हाताने) स्पर्श करणे, संवाद ई ई काही होत नाही. थोडक्यात ज्याला foreplay म्हणतात तो नसतो आणि फक्त संभोग असतो. आपण जे चित्रपट दिलेले आहेत त्यात हि प्रणय/ संभोग दृश्ये नक्कीच असतील पण विकृत संभोग दृश्ये नसतील. मला वाटतंय की मी समजवायचा प्रयत्न केलाय. तुम्हाला कळलं ठीक नाही तर सोडून द्या. ==उगाच अभ्यास न करता विकृती विकृती म्हणुन दंगा करण्यात काय अर्थ आहे ? की आपणही #स्वमतांध_दांभिक आहात ?== या वाक्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करण्यात येत आहे.

In reply to by ट्रेड मार्क

पॉर्न फिल्म्स ही एक पूर्णपणे वेगळी category आहे, ज्यात कुठलीही गोष्ट (story) नसते
समुद्री चाचे (Budget : $ १०,००,०००) आणि समुद्री चाचे भाग २ : स्टेगनेटीचा बदला (Budget : $ ८०,००,०००)हे दोन नीलसिनेमे पहा. नट, नट्या, कॉमेडी, एक्शन (रोमान्स/प्रणय वेगळा सांगायला नको ) कथा, पार्श्वसंगीत, ग्राफिक्स असे एखाद्या Hollywood चित्रपटातील सर्व मसाला आहे FYI नितांत सुंदरतेचा चाहता कहर

In reply to by कहर

हेच
पॉर्न फिल्म्स ही एक पूर्णपणे वेगळी category आहे, ज्यात कुठलीही गोष्ट (story) नसते.
ह्या विधानावरुन ट्रेडमार्क ह्यांच्या अपुर्‍या अभ्यासाची खात्री पटली ! असो. पॉर्न आणि इरॉटिका ह्यातील फरक आम्ही व्यवस्थीत जाणतो , आम्हाला नितांत सुंदर 'पॉर्न'च म्हणायचे होते , वरील चित्रपट पाहुन ट्रेडमार्क ह्यांन्नी त्यांचे मत बनवावे . आणि मुळ विषयाच्या संदर्भाने च आमचा प्रतिसाद होता : पॉर्नविषयीच्या स्वमतांध दांभिकते मुळेच अज्ञानी लोकांन्नी त्यावर बंदी आणली , जी की पुर्ण चुक आहे .

In reply to by प्रसाद गोडबोले

तुमच्या या विषयातल्या अगाध ज्ञानाची आम्हाला खात्री पटलेली आहे. पण इथे विषय मी जे विकृत पॉर्न समजतो अश्या चित्रपटांविषयी चालू आहे कारण ज्या सायटी बंद झाल्या होत्या त्यामध्ये विकृत संभोग दाखवलेले होते उदा. लहान मुलांबरोबर, प्राण्यांबरोबर व मानवी अनैसर्गिक संभोग ई ई. तुम्ही वर उल्लेखलेले चित्रपट सुद्धा त्या सायटींवर असू शकतात पण ते चित्रपट बंदी आणण्यास कारण ठरलेले नाहीत. जाउदे मी काय तुम्हाला सांगणार या विषयात। तुम्ही तर सर्व जाणताच!

In reply to by संदीप डांगे

मला दोन्ही मधला फरक नक्की माहिती आहे. प्रगो नी जी यादी दिलेली आहे तो Erotica प्रकारात मोडत असेल (मी दिलेल्या यादीतला एकही चित्रपट पहिलेला नाही त्यामुळे नक्की माहित नाही). पण ते ज्या प्रकारे वर्णन करत आहेत त्यावरून तरी मला वाटते की हे Erotica प्रकारातले आहेत. या प्रकारचे चित्रपट (Erotica) बऱ्याच संस्थळांवर फुकट किंवा विकत मिळतात, ज्यामध्ये हलका फुलका प्रणय असतो, काहींमध्ये संभोग दृश्ये पण असू शकतात जी कलात्मकरीत्या दाखवलेली असतात. वयात आलेल्या मुलामुलींनी या प्रकारातले चित्रपट बघायला काही हरकत नसावी. पण पॉर्न मध्ये प्रणय नसून फक्त संभोग असतो आणि तो पण अनैसर्गिक असू शकतो (जे X rating वर अवलंबून असते). आणि मला अजूनही असं वाटतंय की या धाग्यावर चर्चा चालली आहे ती आणि जी बंदी घातली होती ती पॉर्न प्रकारच्या चित्रपटांवर (videos वर) आहे. चुभूद्याघ्या

In reply to by ट्रेड मार्क

ट्रेड मार्क, माझा प्रश्न तुम्हाला नसून प्रगोंना होता. तुमच्या प्रतिसादाखाली आला म्हणून गैरसमज झाला असावा. तरीही तुम्ही जे लिहिलंय ते योग्यच आहे. पोर्न आणि इरोटीका ह्या अगदी दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. प्रगो जे वर्णन करतायत ते इरोटिकाचंच आहे. सुबोधजींनीही ज्या वैद्यकिय उपचारांसाठी पोर्नची मदत घेतात असे सांगितले आहे तेही बहुधा इरोटिकाच असलं पाहिजे. पोर्नचं आवड/व्यसन ही विकृतीच म्हटली पाहिजे. पण इरोटिकाबद्दल तसं नाही. असो. इंग्रजी सिनेमा म्हटला की त्यात सेक्सच असणार अशी धारणा असायची पूर्वी. तशीच सेक्स असलेली कोणतीही फिल्म म्हणजे पोर्नच अशीही बर्‍याच लोकांची संकल्पना असेल कदाचित. या चर्चेत आपण नक्की कशाचं समर्थन किंवा विरोध करतोय हे सर्व माननीय सदस्यांनी प्रथम निश्चित करावे. (मागे एकदा एका चेपू मित्राने फारच मार्मिक प्रश्न विचारला होता. 'जर पोर्न फिल्मचा उपयोग फक्त ५-१० मिनिट असतो तर त्या तास-तासभराच्या का असतात?'. मला वाटतं या प्रश्नातच पोर्न ही विकृती का समजली पाहिजे याचे उत्तर आहे.)

In reply to by ट्रेड मार्क

कोण कोणाशी कुठे कसं काय करतोय/ करतीये ह्याचा पत्ताच नसतो.
अमान्य कितीतरी प्रचंड कॉमेडी (मूळ हेतुसाहित ) मनोरंजन करणारे विडंबन (parody ) नीलचित्रपट उपलब्ध आहेत. कोण काय पहातो आणि कोणत्या नजरेने याच्यावर सुंदरता आणि अश्लीलता अवलंबून असते.

In reply to by कहर

आपण X, २X, ३X… ई ई बद्दल ऐकले आहे का? आपण ज्या type च्या चित्रपटांचा उल्लेख करताय ते X (१X) यात मोडणारे आहेत. कधी संधी मिळाली तर ३X किवा त्या पुढचे पण बघा म्हणजे फरक कळेल. थोडे जास्त स्पष्टीकरण वर दिलेले आहे. अनैसर्गिक संभोग, मनुष्य बरोबर किंवा प्राण्यांबरोबर करायला/ बघायला आवडणारे पण बरेच आहेत. मग त्यांच्या नजरेतून ते सुंदरच बघत असतात. प्रश्न हा आहे की, कोवळ्या मुलांनी अश्या फिल्म्स बघितल्या तर त्यांना हे नैसर्गिक वाटू शकते, हे आपल्याला चालेल का? जर अश्या सायटी, ज्यात अनैसर्गिक दाखवतात, अश्या बंद केल्या तर जनसामान्यांची काय हरकत असावी? बाकी अनैसर्गिक दाखवण्यासाठी पैसे देवून बघायची सोय ठेवावी. अती-आंबटशौकीनाना तशी सोय करून द्यावी. म्हणजे लहान मुलाना तरी फ्री access राहणार नाही.

In reply to by ट्रेड मार्क

३क्ष (क्ष क्ष क्ष ) विडंबन पण असतात राव (शोध म्हणजे सापडेल). उदा. करवत विडंबन (SAW Parody) पोर्न भाग सोडला तरी हसून हसून मुरकुंडी वळते. ब्याटमन क्ष क्ष क्ष, This isnt Xmen, This isnt Herculis इ इ अशी किती उदाहरणे देऊ. म्हणून म्हणले सुंदरता पहायची नजर हवी

In reply to by ट्रेड मार्क

एखादा गायक जेव्हा गात असतो तेव्हा काही लोक त्याच्या कलेचा आस्वाद घेतात हि सुंदरता आणि काही लोक तो कुठे चुकतोय का याकडे लक्ष ठेऊन असतात हि खरी विकृती (किंवा काही ठिकाणी अश्लीलता). दादा कोंडकेंना विनोदाचा बादशाह म्हणून डोक्यावर घेणारा वर्ग आहे तसा कमरेखालचे द्वयर्थी विनोद करणारा म्हणून नाव ठेवणारा वर्ग आहेच कि काही लोक शेणाला पाहून नाक मुरडतात घाण म्हणतात काही त्याच्या गोवऱ्या करून वापरतात काही त्याचे खत बनवून सुंदर बगीचे फुलवतात. जिथे इतरांना संभोग दिसला तिथे वात्सायन ऋषीना शास्त्र दिसले. खजुराहो घडवणाऱ्याना शिल्प कलेची प्रेरणा दिसली. आपण कशात काय पहातो ते महत्वाचे म्हणून दादा कोंडके यांचे वाक्य आहे "अश्लीलता पाहणाऱ्याच्या नजरेत असते"

In reply to by कहर

मला वाटतं चर्चाविषय 'पॉर्न ही कलाकृती आहे का' हा नसून 'पॉर्नवर बंदी योग्य की अयोग्य' हा आहे. ..तसेही, पोर्न हे थंड शिळ्या कढीला इन्स्टंट ऊत आणण्याचे औजार आहे. उस्फूर्त शृंगाराला कढ 'आणण्याची' गरज नसते. न-वयात त्याचा वापर अनैसर्गिकच !

In reply to by सस्नेह

मला वाटतं चर्चाविषय 'पॉर्न ही कलाकृती आहे का' हा नसून 'पॉर्नवर बंदी योग्य की अयोग्य' हा आहे.
पॉर्न मध्ये नक्कीच काही अंशीतरी कलाकृती असुन सरसकट सर्वांवर बंदी आणणे अयोग्यच आहे . उस्फूर्त शृंगाराला कढ 'आणण्याची' गरज नसते. हे अगदी मान्यच आहे मात्र शृंगार ही सुध्दा एक कला आहे , जी प्रत्येकात उपजत असतेच , पण त्या कलेत प्रभुत्व मिळवायला बाहेरुन मार्गदर्शन मिळत असेल तर काय हरकत आहे ? कामसुत्राचा मुळ उद्देश तोच आहे , आणि आपण हेही लक्षात घेवु की कामसुत्र हा एकमेव ग्रंथ नसुन अन्य देशात अन्य भाषात अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत ! आता काळा सोबत माध्यमे बदलत गेली आणि पुस्तकांच्या जागी ऑडियो व्हिजुअल माध्यमे आली . तत्वाच्या लेव्हलला दोन्हीही सारखेच ! म्हणुनच पॉर्नवर बंदी अयोग्यच आहे , अगदीच इच्छा असल्यास सरकारने अ‍ॅडल्ट फिल्म रेग्युलेटरी बोर्ड स्थापन करावा आणि पॉर्न चित्रपटांचे व्यवस्थित सेन्सॉरिंग करुन मगच प्रदशनाला परवानगी द्यावी !

In reply to by प्रसाद गोडबोले

अगदी सहमत. आमचे मुद्दे पोर्न वर बंदी योग्य कारण त्यात पाहण्यासारखे काही नाही असे म्हणणाऱ्यासाठी आहेत . बंदी अयोग्य आहे. कोण कोणत्या दृष्टीने काय पहाते हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे

In reply to by कहर

पॉर्न वर संपूर्ण बंदी आणणे हे दारूबंदी केल्यासारखे आहे. १०० % खात्री कि ती( बंदी) अयशस्वी होईल. त्यातून भ्रष्टाचार आणि काळा बाजाराला आमंत्रण देण्यासाखे आहे. नैसर्गिक उर्मी कितीही दाबली तरी ती वर उसळते तेंव्हा त्याला शिष्ट संमत मार्ग दाखवणे हे आवश्यक आहे. पॉर्न हे अनावश्यकच आहे हा मुद्दा निस्संदिग्ध नाही. ज्याला कामसुख नियमित मिळते त्याने भुकेल्या माणसाच्या भुकेची थट्टा केल्यासारखे आहे. माझा डॉक्टर मित्र सलग ६ महिने सियाचेन ला अतिउन्चीवर होता. सर्वसाधारणपणे तेथे ३ महिन्यांपेक्षा जास्त कोणाला ठेवत नाहीत. परंतु त्याच्या जागी येणारा दुसरा डॉक्टर बेस कॅम्प वर आजारी पडला( cardiac arrythmia-हृदयाचे ठोके अनियमित झाले) त्यामुळे त्याची जागा घेणारा दुसरा डॉक्टर येई पर्यंत त्याला तेथे राहणे भाग होते. अशा अतिउंच जागी वीज सुद्धा नाही. जवळच्या ५०० किमी मध्ये एकहि स्त्री नाही. सहा महिने कोणत्याही वयाच्या स्त्रीचे दर्शन सुद्धा नाही. अशा असामान्य परिस्थितीत त्याने सांगितले कि पर्वताची बाजूबाजूला असलेली बर्फाच्छादित शिखरे स्त्रीच्या स्तनांसारखी दिसू लागतात. अशा माणसाला तुम्ही काय तुकारामाची गाथा कि दासबोध वाचायला सांगणार? चावट पुस्तके आणि साहित्य हाच एक त्यांच्या भावनांचा निचरा होण्यासाठी उपाय आहे. मग तुम्ही त्याला अश्लील म्हणा अथवा नाही. सहा महिने तीच तीच पुस्तके पाहणे किंवा वाचणे हि गोष्ट सुद्धा कठीण असते. ( विक्रांत वर मैने प्यार किया आणि चालबाज या सिनेमांची शतकि प्रदर्शने झाली होती.होत्या त्याच व्हिडियो फिल्मस (तीस चाळीस होत्या) परत परत पहिल्या जात. महिनोन्महिने समुद्रावर राहिल्यावर काय करणार? तिथे निदान व्हिडियो तरी होता. काही महिन्यानी कोणीतरी "सावन के गीत" म्हणून पावसात भिजलेल्या नायिकांची गाणी असलेली कॅसेट ( काटे नाही कटते दिन ये रात, मंदाकीनीचे राम तेरी गंगा मैली मधील गाणे) आणली. ती तर रात्रंदिवस वापरून झिजून गेली असावी) बरं अधिकारी वर्ग या गोष्टी सैनिकांशी बोलू शकत नाही . जेवढे "आदानप्रदान" होणार तेवढे त्यांच्या पातळीवरच. तेंव्हा पॉर्न हे अनैसर्गिक आहे त्यावर संपूर्ण बंदी असावी हे बरोबर नाही. म्हणून मी परत तेच म्हणतो अनैसर्गिक पॉर्न( बालकांबरोबर संभोग, बलात्कार,प्राण्यांबरोबर संभोग इ ज्यात दुसर्या व्यक्तीची संमती नाही) बाळगणे,पुढे पाठवणे किंवा त्याचे सार्वजनिक प्रदर्शन करणे यावर बंदी घालणे आवश्यक आहे. हा गुन्हा असेल तर लोक अनैसर्गिक गोष्टी करू धजणार नाहीत.पण त्यासाठी नैसर्गिक गोष्टी उपलब्ध असणे हि तितकेच आवश्यक आहे.

मुळात मानवी भावना ९ रसांशी सतत निगडीत असतात. १. हास्य रस २. अद्भूत रस ३. शांत रस ४. रौद्र रस ५. वीर रस ६. करूणा रस ७. भयंकर रस ८. बीभत्स रस आणि ९. श्रृंगार आहारात जसे आपण सगळेच रस आलटून-पालटून वापरतो तसेच ह्या रसांचे पण आहे. आहारात पण एखाद्याला गोड आवडते तर एखाद्याला तिखट, कुणाला आंबट-गोड. तसेच ह्या नव-रसांच्या बाबतीत पण व्हायला हवे.विशेषतः "श्रृंगार-रसाच्या" बाबतीत. कारण इतर ८ रसांपेक्षा, श्रृंगार रस जास्त प्रमाणात मनावर मोहिनी घालतो. पण हा रस माणसांच्या जीनात प्रवेश करतो तोच मुळी पौंगडावस्थेत आणि तो पण अतिशय चुकीच्या मार्गांनी (सिनेमा, जाहीराती,निळे-पिवळे साहित्य आणि मित्र) आधीच्या पिढीत इतक्या विपूल प्रमाणत हे साहित्य उपलब्ध न्हवते, पण आमच्या पिढीत १९८२-१९८३ नंतर रंगीत दूरदर्शन संच आले आणि गावोगावी व्हिडिओ पार्लर सुरु झाले. ३-४ रुपयात हिंदी सिनेमे बघण्यापेक्षा ५/- रुपयात निळे सिनेमे बघण्याचे प्रेक्षकांचे प्रमाण वाढले. सुरुवातीला मुंबई-पुणे इतपतच मर्यादीत असलेले हे क्षेत्र पुढे गावो-गावी पसरले कारण, १. कमी पैशात गुंतवणूक २. हमखास येणारा प्रेक्षक वर्ग (कारण दर-वेळी नवे सिनेमे, रोज ६-७ शोज, कधी-कधी १५-१६...होय ही सत्य घटना आहे...ठाणे-मुलुंड भागात सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत हे शोज चालत असत.) ३. कमी टॅक्स. ४. प्रचंड नफा (एक लाखाचा परतावा, जास्तीत जास्त ५ ते ६ महिन्यात, पुढे फक्त टांकसाळ) १९९२ नंतर भारतात इंटरनेटचा वापर बर्‍यापैकी वाढला आणि २००० नंतर तो अक्षरशः फोफावला. युट्युब, टोरांट मुळे घरबसल्या हवा तो कार्यक्रम, आपल्याला हव्या त्या वेळेला, पहायला मिळाला लागला.चांगल्या बरोबर वाईट पण येते,(अणू उर्जे बरोबर अणू बाँब, डायनामाईट===> खडक फोडायला आणि शत्रू सैनिक मारायला) ह्या नियमानुसार, युट्युब आणि टोरांटच्या बरोबर निळ्या सिनेमांचे पण आगमन झाले. आज १९८३च्या जमान्यात व्हिडिओ पार्लर मध्ये निळे सिनेमे बघणारा प्रेक्षक-वर्ग घरी पण तेच सिनेमे बघतो. आता तुम्हीच सांगा घरोघरी बाप आणि मुलगा, निळे सिनेमे बघत असेल तर कायदा कितपत आळा घालणार? आणि मुळात निळे सिनेमे का करायला लागतात? खरे तर, ज्या देशात वात्सायनाने "काम-शास्त्र" हा उत्तम ग्रंथ लिहिला आणि ज्या देशांत "खजुराहो" सारख्या उत्तम शृंगारीक मुर्ती घडवल्या गेल्या, त्या देशातील समाज एका उत्तम नीती-चारित्र्याचा, घडायला हवा होता. पण असे झाले नाही. एकतर परकीय आक्रमण आणि त्यांनी केलेली स्त्रियांची विटंबना आणि त्यांनी स्त्रियांना दिलेली दुय्यम वागणूक. स्त्रीला उपभोग्य वस्तू समजायचे, तिच्या मताला-भावनांना किंमत द्यायची नाही, हे समाजमनावर ठसवल्या गेले.अद्यापही भारतीय समाज ह्या समजातून १००% बाहेर पडलेला नाही. आणि दुसरे कारण म्हणजे, पौगंडावस्थेत मुला-मुलांची होत असलेली शृंगार-रसाच्या बाबतीतील कुचंबणा. वयात येतांना पुरुषांना जशी स्त्री शरीराची ओढ असते (शारीरीक लगट), तशीच स्त्रीयांना पण कुणीतरी त्यांच्या भावना समजून घेणारा, त्यांना मित्र म्हणून हवाच असतो.(भावनीक ओढ) ज्या मुलांना स्त्री मैत्रीण मिळत नाही किंवा ज्यांची वासना जास्त असते, असे पुरुष साहजीकच वेश्यांकडे आणि ते पण नाहीच जमले तर निळे सिनेमे बघण्याकडे वळतात. वेश्या व्यवसाय ही जशी अशा (श्रूंगार-रसाच्या अधिन झालेल्या) पुरुषांसाठी आवश्यक बाब आहे, तितकीच आवश्यकता अशा पुरुषांसाठी, ह्या निळ्या सिनेमांबाबत आहे. आधी उल्लेख केल्या प्रमाणे, कुणाला कुठला रस जास्त आवडेल ते सांगता येत नाही. खजुराहो आणि कामशास्त्राने, जर ह्या भारतीय समाजमानावर परीणाम होत नसेल, तर ह्या निळ्या-पिवळ्या साहित्याने पण नक्कीच होणार नाही. उगाच निळ्या-पिवळ्या साहित्याला दोष देण्यापेक्षा, स्त्रियांचा आदर करण्याची शिकवण, ह्या समाजाला देण्याची जास्त गरज आहे. मला असा समाज बघायला आवडेल, की जो..... १. एकटी स्त्री दिसली तरी एखादी झुंड तिच्यामागे लागणार नाही. (कुवैतमधल्या फाइल नावाच्या उपनगरात, कंपनीच्या गाडीमधून स्वतः बघीतलेले द्रूष्य.(ह्या स्वानुभवर कथा टाकणार नाही.कट्ट्याला मात्र नक्कीच सांगीन.) कुवैत मध्ये निळ्या सिनेमांना बंदी आहे.इतकेच कशाला, सिनेमांमधील चुंबन द्रूष्याला पण बंदी आहे.) २. तिच्या असहाय्यतेचा फायदा घेवून तिला आर्थिक दृष्ट्या लुबाडणार नाही. इथल्या द्रौपदीला वस्त्रे देण्याची वेळ, श्रीकृष्णावर परत येवू नये आणि घरोघरी रावण जन्माला येवू नये, ही पालक म्हणून आपलीच जबाबदारी आहे.

In reply to by मुक्त विहारि

इथल्या द्रौपदीला वस्त्रे देण्याची वेळ, श्रीकृष्णावर परत येवू नये आणि घरोघरी रावण जन्माला येवू नये, ही पालक म्हणून आपलीच जबाबदारी आहे.
अगदी अगदी !!! समाजमन सुदृढ असेल तर पोर्नचा पाचोळा वरच्यावर उडून जाईल ! .....तरीसुद्धा काही बंधने कायद्याने हवीतच, नाहीतर विकृती फैलावण्याला वेळ लागणार नाही.

In reply to by सस्नेह

समाजमान्य संकेत(याची ढोबळ व्याख्या नसणे) ,योग्य वेळी नेमकी आणि शास्त्रशुद्ध माहीती तीही विश्वासार्ह व्यक्तीं कडून, (वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ) हा एक उपाय असू शकतो ! चर्चा योग्य मार्गक्रमण करीत आहे!!

१.पॉर्न बघताना किंवा लीगल ठरवताना त्यामध्ये काम करणार्‍यांच्यावर अन्याय होत आहे हा मुद्दा दुर्लक्षला जातोय . मागणी वाढेल तसा पुरवठा वाढेल आणि त्यामुळे शोषण वाढेल . अजूनही बरेच स्त्री पुरूष बळजबरीने हे काम करतात . २.वाढत्या मागणीने छुप्या कॅमेराने केलेले शूटींगचे प्रमाण वाढते आहे आणि बदनामीमुळे अनेकजण आत्महत्या करत आहेत, लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत.

In reply to by कपिलमुनी

या व्यवसायात असणाऱ्यांची खालील प्रमाणे वर्गवारी करता येईल - १. स्वेच्छेने येणारे - असे मुलं मुली / स्त्री पुरुष कि ज्यांच्या घरी सगळं व्यवस्थित आहे. आई, वडील, भावंडं, पैसा ई ई सर्व पण तरीही काही तरी वेगळं करायचं किंवा अनुभव म्हणून यात भाग घेतात. उदा. लिओन बाई. २. कुठल्या तरी व्यसनामुळे ओढले जाणारे - मादक द्रव्यांच्या आहारी गेल्यामुळे लागणाऱ्या जास्तीच्या पैश्यांची सोय करायला काही पण करायला तयार होतात असे. ३. फसवून ओढले गेलेले - लग्नाचं, नोकरीचं किंवा अजून कसलं आमिष दाखवून वा बलात्कार करून त्याचं चित्रीकरण करून धमकी ई ई ४. छुप्या चित्रीकरणाचे बळी - हॉटेल मध्ये किंवा अजून कुठे जोडप्याच्या खाजगी क्षणांचे केलेले चित्रण जालावर उपलब्ध करून देणे. ५. सिनेसृष्टीत यश न मिळालेले - हिरो किंवा हिरोइन होण्यासाठी घर सोडून येतात आणि मग सावज बनतात. ६. पैसे मिळवण्यासाठी मजबूरीने अथवा छानछोकीसाठी - या श्रेणीत पण बरेच लोक्स आहेत. कॉलेजात जाणार्या बर्याच मुली दुसर्या शहरात राहायला गेल्यावर वरच्या कमाईसाठी हा मार्ग स्वीकारतात. तर काहींना घरच्या परिस्थितीमुळे स्वीकारायला लागतो. इथे परदेशात तर कॉलेजच्या फीया इतक्या आहेत की बर्याच मुली फक्त फी भरण्यासाठी असं काम करतात. यात पहिल्या वर्गातले लोक्स सोडले तर बाकीच्यांचे आयुष्य उध्वस्तच होते. क्रमांक २ च्या लोकांसाठी सापळे तयार आहेतच. सतत वाढत्या मागणीमुळे तेवढाच पुरवठा पण करायला लागतो, मग क्रमांक ३ आणी ४ चे लोक्स वाढतात. ५ बद्दल सगळ्यांनाच माहिती आहे. राच्याकने - लिओन बाईना म्हणे ८ कोटींचं जाहीरातींच काम मिळालंय. ४ दिवस काम आणि ८ कोटी रुपये… नशीब काढलं हो पोरीने ;)

अविवाहित तरुणांच्या काम जीवनामध्ये पोर्न फार मोलाची भूमिका बजावते. किंबहुना वेश्यागमन आणि पोर्नच ( निलचित्रफिती आणि पिवळी पुस्तके) त्याला 'मोकळं ' होण्यासाठीचे पर्याय म्हणून उपलब्ध असतात. अशा परिस्थितीत त्यावर बंदी घातल्याने 'मोकळं' होणं अजूनच जिकिरीच काम होईल. पर्यायाने मुली व स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते. बंदीचे हे दुष्परिणाम आपण लक्षात घ्यायला हवेत. तसेच ज्या पोर्न साहित्यात नैसर्गिक संभोग दाखवतात त्यात विकृती वाढेल असे काहीच नसते उलटपक्षी असे पोर्न हे तणाव नाशकाचं काम करतं.