पॉर्न साइट्सवरील बंदी ; किती योग्य, किती अयोग्य ?
राम राम मंडळी. मंडळी शतशब्दकथांच्या स्पर्धेच्या गर्दीत पॉर्नसाइट्सच्या बंदी विषयी काथ्याकुट आज येईल, उद्या येईल अशी वाट पाहात बसलो. रविवार उजाडला तरी अजूनही काही काही हालचाल दिसेना म्हटलं आपणच काथ्या घ्या आणि कुटा.
मंडळी. पॉर्न साइट्सवर बंदी आणि पुन्हा सरकारने विरोधात उमटणार्या पॉर्न विरोधातील बातम्यामुंळे हलकेच चोरपावलांनी मागे येत ''चाइल्ड पॉर्न आणि ब्ल्यू फिल्म'' सोडून सर्व एडल्ट्स साइटवर बंदी हटविण्याचा निर्णय घेतला. सरकारने घोषणा केलेले असली तरी आता मोबाईल वर अशा साइट्स आता जवळ जवळ ब्लॉक केल्याचे दिसते. अश्लिल चित्रे, अश्लिल व्हिडियोज, अश्लिल लेखन, यामुळे समाजात वाईट परिणाम होतो म्हणजे कामुकता वाढते आणि स्त्रीयांना सार्वजनिक ठिकाणी वावरणे कठीण जाते आणि विविध अशी कारणे सांगितली जातात. विशेषतः लहान मुले अशा साइट्सवर रमु लागली तर काय परिणाम होईल असा एक विचार मांडला जातो.
लहान मुला -मुलींच्या शरीराची जसजशी वाढ होत जाते तस तसे शरिरात अनेक बदल होतात आणि मग परस्पर भिन्न लिंग आकर्षण, उत्सुकता, यातून चित्र, व्हिडियोमधे, अश्लिल लेखन यात एक आनंद मिळायला लागतो. अशा माहितीतून विकृतीच निर्माण होते याचा काही माझ्याकडे विदा नाही. पण, अशा माहितीतून काही गैरसमज, भितीही दूर होते असे मला वाटते.
आजच्या इतकं जाल जेव्हा मुक्त नव्हतं तेव्हा मुलांमधे कोणाच्या घरची मंडळी कुठे बाहेर गेलेली असली की अशा व्हिडियोज पाहण्याचा प्रचंड आटापिटा असायचा. आश्चर्य, भिती, न्युनगंड निर्माण व्हावा अशा प्रकारचे व्हिडियोज बघण्याची एक क्रेज असायची. लेखनातही असे लेखन आलं की दम घ्यावा लागायचा. मला आठवतं. मला शिकत असतांना अभ्यासक्रमाला ना.धो. महानोरांची 'गांधारी' नावाची कादंबरी होती. या कादंबरीतील नायिका केळीच्या बनात स्वतःला निर्वस्त्र करुन स्वतःच्या शरिराकडे बघते आणि लेखनाने त्या शरीराचं एकुण वर्णन त्यात केलेलं होतं. वाचतांना मला कोणी पाहात तर नाही, इतकी भिती वाटल्याचे स्मरते. बाकी अजून काही पुस्तकांवर तर बोलायलाच नको. कारण संस्काराखाली आपण दबले गेलेले असल्यामुळे अशा विषयावर चर्चा तरी कशाला करावी, असाही विचार येऊ शकतो. वेरुळ लेणीतील काही शिल्प, खजुराहो, या शिल्पांकडे बघतांना शिल्प अश्लिल आहेत म्हणुन पाहावे की कला म्हणुन पाहावे असाही विचार येऊ शकतो. अशीच बंदी घालावी लागत असेल तर भविष्यकाळात या शिल्पांवर काळा पडदा टाकावा लागेल.
आता संकेतस्थळे वाढली. आंतरजाल आता सर्वांच्या घराघरात पोहचले आहे. चित्रपट, मालिका, यातून माणसांवर जे काही परिणाम व्हायचे ते होतातच, ते जसे थांबविता येतात तसे पॉर्न साइट्सच्या बाबतीत किती बघायचं, काय बघायचं याचंही भान असलं पाहिजे. सध्या वाट्सपच्या काळात काय काय व्हिडियोज येतात ते काही सांगायची गरज नाही. आपण बघतो पण दुसर्यांनी बघु नयेत. एकुणच जालमुक्त झालंय. समाजावर अश्लिल साइट्स खरच परिणाम करतात का ? त्याच स्वरुप कसं आहे ? सरकारची बंदी किती योग्य आणि किती अयोग्य त्यासाठी हा काथ्याकुट प्रपचं. (भाजप सरकार, काँग्रेस सरकार इकडे चर्चा घेऊन जाऊ नये)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ताजी बातमी:
Internet Is Not Just For Porn...
जरा विस्तारून सांगितलेत तर
+१
मी दुसरा व्हिडीओ पाहिलाय.
इंडीयन जर्नल ऑफ सायकॉलॉजील
अरे व्वा!!!!!! आपण आलात..बरे झाले.....
सर्वत्र "सरकारकडून बंदी" असा
बधीरता..
प्रतिसाद आवडला
जॉन ऑलिवर याचा लास्ट वीक
लेखाच्या नि खरेंच्या
प्रतिसाद आवडला
या साईट्स पेड केल्या तर
रतिचित्रण : त्याबाबतचा खुलेपणा आणि बंदी
विकीवर शोध घेतला तर....
माझ्या प्रतिसादातले अवांतर
तुमचे बरोबर आहे मला विकि
मला वाटते....
बंदी वगैरे एकतर्फी प्रकार झाला.
खालील मुद्दे वरील काही
बहुतांशी सहमत.
पॉर्न जगतात स्वखुशीने येणार्
पॉर्न व्यवसाय
तांत्रिक व्याख्या थेट समजल्या
समांतरः कोणी पोर्नजगतात स्वखुषीने येत नसतो हे वाक्य ..
ती ज्या पोझिशनला आहे तिथे
नक्की काय लिहावं हा एक मोठा
प्रतिसाद आवडला
प्रश्न तुझ्या लिहिण्याचा नाही
ओह
प्रतिसाद आवडला.
आता नीट मुद्देसुद लिहितो.
मस्त हो चिमणराव.. :)
ळोळ!!!
अवांतर
बंदी असावी कि नाही यावर चर्चा
अवांतर नाही
"व्यक्तिस्वातंत्र्याबद्दल
>>>> व्यक्तिस्वातंत्र्याबद्दल
सहमत
अद्दयाच्या मुलग्यांबाबतच्या
मुलांशी यावर बोलता येऊ शकते.बोलावेच.....
आईवडील मुलाच्या नात्यात तेवढी
+१ माझ्या मुलांची टीचर
पॉर्न चे फायदे --
अफलातून इनसाईट .. विस्तृत
+१००
अशीही एक बाजू
एक आठवण जुन्या नाटकाची..