Skip to main content

श्रीमंत: शतशब्दकथा

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी सोमवार, 25/05/2015 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
आज अक्षयतृतीया म्हणजे साडेतीन मुहुर्तांपैकी एक. त्यामुळे आज ते प्रसिद्ध दुकान लवकर उघडलेलं होतं. अगदी सकाळी सात वाजल्यापासुन लोकांनी दुकानामधे गर्दी करुन गोडा-धोडाचे पदार्थ खरेदी करायला सुरुवात केलेली होती. त्याची सरावलेली बोटं सराईतपणे नोटा आणि व्यवहार हाताळत होती. दुपारी दुकान बंद करायची वेळ झाली तसा त्याचा ५,१३,०००/- रुपयांचा हिशोब तयार होता. मालकाकडे पैसे आणि हिशोबाची यादी देउन तो दुकानातुन बाहेर पडला आणि घराकडे निघाला. वाटेत त्याला एका कुडमुड्या हलवायाचं दुकान लागलं आणि त्याला मुलांची आणि म्हातार्‍या आईची आठवण झाली. आपल्या कनवटीची शेवटची पन्नासची नोट त्यानी काढली आणि पावशेर जिलबी घेतली. मुलांच्या आनंदी चेहेर्‍याची कल्पना मनाशी येउन त्याची जीभ गोड झाली. (शतशब्दकथा लिहायचा पहिलाचं प्रयत्न त्या जिलबीएवढाचं गोड मानुन घ्यावा. शतशब्दकथा हा प्रकार भयानक अवघड आहे असं माझं मत बनलेलं आहे.)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 11932
प्रतिक्रिया 68

प्रतिक्रिया

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्ही कॉलेजमधले सगळ्यात नावडते प्रोफेसर असणार. :) तसं पहायला गेलं तर दिड मार्काच्या लायकीची पण गोष्ट नाही. पण काय करणार लेखनकंडुशमनार्थ टंकावं लागतं काहीबाही. सगळ्यांना कुठे ५/५ च्या लायकीचं लिहायला जमणार.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

>>> तुम्ही कॉलेजमधले सगळ्यात नावडते प्रोफेसर असणार. :) मी सर्वांचा आवडताच आहे, असं माझं कौतुक माझ्या तोंडून कसं सांगू ? >>> तसं पहायला गेलं तर दिड मार्काच्या लायकीची पण गोष्ट नाही. अगदी खरं आहे. प्रश्न न समजता काही तरी उत्तराच्या जवळपास लिहिलंय असं वाटलं की काही तरी पदरात टाकावं लागतं, तसंच हे काही गुणदान. >>> पण काय करणार लेखनकंडुशमनार्थ टंकावं लागतं हो ते स्पष्ट दिसतंय...! >>> सगळ्यांना कुठे ५/५ च्या लायकीचं लिहायला जमणार. अगदी खरं आहे. सर्वच सचिन तेंडुलकर नसतात पण गल्लीच्या क्रिकेट खेळात फटकेबाजी करणारं पोरगंही सचिनपेक्षा काही कमी नसतं. :) (ह.घ्याच) -दिलीप बिरुटे (मिपा गल्लीतला निवृत्त तुफानी फलंदाज) ;)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निवृत्त? का? कधी? कुठे? कसे? मुळात झाले की केले गेले? ;)

In reply to by प्यारे१

वेळ नै सध्या. मिपावरुन मी कुठेच जाणार नाही. व्यवस्थेत असो नसो, मान असो वा अपमान, काही असो. मिपा माझं पहिलं प्रेम आहे. अवांतर : आता उपप्रतिसाद लिहु नका. जरा शांतपणे मिपा वाचू द्या मला. :) -दिलीप बिरुटे

रुपककथेचा प्रयत्न तो ही शतशब्दकथा या प्रकाराद्वारे करणे आवडले. या प्रकारच्या पुलेशु.

अशा प्रकारच्या लेखनासाठी शुभेच्छा!!

सुंदर !

सरधोपट झालंय. कलाटणी अधिक नाट्यमय हवी होती. शतशब्दकथेचे ते बलस्थान आहे असे मला वाटते.

In reply to by प्रचेतस

सहमत. अजुन लेखनावर तेवढी पकड नसल्यानी तेवढा नाट्यमय शेवट नाही करता आला. हळुहळु जमेल अशी आशा आहे :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

उत्तम प्रयत्न ! आपल्या कनवटीची शेवटची पन्नासची नोट त्यानी काढली आणि पावशेर जिलबी घेतली. मुलांच्या आनंदी चेहेर्‍याची कल्पना मनाशी येउन त्याची जीभ गोड झाली. असा उघड शेवट करण्याऐवजी... त्याचे पाय नकळत अडखळून तो थबकला. क्षणभर विचार करून त्याने आपल्या कनवटीची चुरगळलेली शेवटची पन्नासची नोट काढली आणि पावशेर जिलबी घेतली. हे कसं वाटतेय ?

छान जमलीये.

मला आवडली - रादर शेवट टोचला.आता त्या प्रसिद्ध दुकानात जाताना ही कथा आठवेल नक्की. कधी कधी तसे मनात येतच असते,आता अधिक प्रकर्षाने येईल.

लिहीत रहा, म्हणजे लिखाणात अजून नाट्यमयता आणता येईल.

जर पहिलाच प्रयत्न असेल तर एकदम छान आहे. पुढील कथेसाठी शुभेच्छा.

छान कथा. मिठाई दुकानाच्या मालकांनीच खरे तर आपल्या सर्व स्टाफला सणासुदीचे म्हणुन मिठाईचे गिफ्टबॉक्स द्यायला हवे होते . बाकी , कनवट म्हणजे आतला खिसा का हो ?

आवडली कथा.

जहाज छान आहे पण तू या पेक्षा चांगले लिहू शकतोस काठावर पास व्हायचे बंद कर आधी.

आयडिया छान आहे. फार कठीण असतं हो हे मोजक्या शब्दात गोष्ट मांडणे. लहान मुलांना रात्री गोष्ट सांगताना ट ला ट जोडत मुले झोपेपर्यंत गोष्ट खेचावी लागते आणि आता अगदी उलट करावे लागत आहे. १०० शब्द बास…

आटोपशीर आणि प्रवाही. दोन्ही गुण आहेत कथेत. कथा संपल्यावरही चालू राहते मनात. सुरवातीच्या आधीची आणि शेवटाच्या नंतरचीही, दोन्ही कथा आकार घेऊ लागतात. पहिलाच प्रयत्न असला तरी मस्त!

हाफशेंच्युरी निमीत्त श्री.चिमणरावचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी आणी 99 कार्यकर्ते

In reply to by बॅटमॅन

अगदी अगदी. ते आमचा एक मित्र हल्ली फक्त गॉथमामधेचं रात्री भटकत असतो. त्याला ट्रोजन घोड्याकडे बघायला अज्याबात वेळ नाही म्हणे.

आवडली कथा! थोडी फास्ट घेतल्यागत वाटते पण तुम्हाला जे सांगायचंय ते पोहोचतंय. मी सुद्धा अशा प्रकारच्या अनुभवातून गेलोय भाऊ! मुलांच्या आनंदी चेहेर्‍याची कल्पना मनाशी येउन त्याची जीभ गोड झाली. :- माझे जुने दिवस आठवले. अगदी तुटपुंज्या उत्पन्नातून मुलीसाठी खेळणी आणि खाऊ शनीवारी गावी घेऊन जायचो. सर्व प्रवासभर ती किती खुश होइल हाच विचार असे. मस्तच!

छान जमलीय कथा. आवडली. प्रसिद्ध हलवायाच्या दुकानात ५,१३००० चा हिशोब करणार्‍याला स्वत:च्या कुटुंबासाठी मिठाई घेतांना मात्र त्या दुकनातले दर परवडू नये हा विरोधाभास अचूक दाखविल्या गेला आहे.