✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

श्रीमंत: शतशब्दकथा

क
कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी
Mon, 05/25/2015 - 19:40  ·  लेख
लेख
आज अक्षयतृतीया म्हणजे साडेतीन मुहुर्तांपैकी एक. त्यामुळे आज ते प्रसिद्ध दुकान लवकर उघडलेलं होतं. अगदी सकाळी सात वाजल्यापासुन लोकांनी दुकानामधे गर्दी करुन गोडा-धोडाचे पदार्थ खरेदी करायला सुरुवात केलेली होती. त्याची सरावलेली बोटं सराईतपणे नोटा आणि व्यवहार हाताळत होती. दुपारी दुकान बंद करायची वेळ झाली तसा त्याचा ५,१३,०००/- रुपयांचा हिशोब तयार होता. मालकाकडे पैसे आणि हिशोबाची यादी देउन तो दुकानातुन बाहेर पडला आणि घराकडे निघाला. वाटेत त्याला एका कुडमुड्या हलवायाचं दुकान लागलं आणि त्याला मुलांची आणि म्हातार्‍या आईची आठवण झाली. आपल्या कनवटीची शेवटची पन्नासची नोट त्यानी काढली आणि पावशेर जिलबी घेतली. मुलांच्या आनंदी चेहेर्‍याची कल्पना मनाशी येउन त्याची जीभ गोड झाली. (शतशब्दकथा लिहायचा पहिलाचं प्रयत्न त्या जिलबीएवढाचं गोड मानुन घ्यावा. शतशब्दकथा हा प्रकार भयानक अवघड आहे असं माझं मत बनलेलं आहे.)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
11891 वाचन

💬 प्रतिसाद (68)

प्रतिक्रिया

कथा आवडली, छान लिहिली आहे.

सानिकास्वप्निल
Tue, 05/26/2015 - 18:25 नवीन
कथा आवडली, छान लिहिली आहे.
  • Log in or register to post comments

सगळ्यांचे आभार.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 05/26/2015 - 20:12 नवीन
सगळ्यांचे आभार.
  • Log in or register to post comments

आवडली कथा

मोहनराव
Tue, 05/26/2015 - 20:33 नवीन
आवडली कथा
  • Log in or register to post comments

मिपा वर शतशब्दकथा स्पर्धा

लालगरूड
Tue, 05/26/2015 - 20:56 नवीन
मिपा वर शतशब्दकथा स्पर्धा भरवायाला हवी.
  • Log in or register to post comments

छान कथा. आवडली.

खटपट्या
Tue, 05/26/2015 - 21:05 नवीन
छान कथा. आवडली.
  • Log in or register to post comments

छान ! (चान नाही)

उगा काहितरीच
Tue, 05/26/2015 - 22:03 नवीन
छान ! (चान नाही)
  • Log in or register to post comments

आटोपशीर आणि प्रवाही. दोन्ही

संदीप डांगे
Tue, 05/26/2015 - 22:13 नवीन
आटोपशीर आणि प्रवाही. दोन्ही गुण आहेत कथेत. कथा संपल्यावरही चालू राहते मनात. सुरवातीच्या आधीची आणि शेवटाच्या नंतरचीही, दोन्ही कथा आकार घेऊ लागतात. पहिलाच प्रयत्न असला तरी मस्त!
  • Log in or register to post comments

हाफशेंच्युरी निमीत्त श्री

जेपी
Wed, 05/27/2015 - 09:56 नवीन
हाफशेंच्युरी निमीत्त श्री.चिमणरावचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी आणी 99 कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

आवडली..

रुपी
गुरुवार, 05/28/2015 - 02:08 नवीन
छान आशय..
  • Log in or register to post comments

कथा आवडली

प्रणित
गुरुवार, 05/28/2015 - 14:57 नवीन
कथा आवडली
  • Log in or register to post comments

आटोपशीर कथा. ब्लॅकपर्ल

बॅटमॅन
गुरुवार, 05/28/2015 - 15:00 नवीन
आटोपशीर कथा. ब्लॅकपर्ल सांभाळून कदाचित जास्त लिहायला वेळ मिळत नसावा. ;) आवडली.
  • Log in or register to post comments

अगदी अगदी. ते आमचा एक मित्र

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 07/12/2015 - 10:18 नवीन
अगदी अगदी. ते आमचा एक मित्र हल्ली फक्त गॉथमामधेचं रात्री भटकत असतो. त्याला ट्रोजन घोड्याकडे बघायला अज्याबात वेळ नाही म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आणि जर तो ट्रोजन घेउन

टवाळ कार्टा
Sun, 07/12/2015 - 12:14 नवीन
आणि जर तो ट्रोजन घेउन घोड्याकडेच बघण्यात बीझी असेल तर??? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्त कथा....

मुक्त विहारि
गुरुवार, 05/28/2015 - 18:44 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

आवडली गोष्ट...! धन्यवाद..!

असंका
गुरुवार, 05/28/2015 - 22:35 नवीन
आवडली गोष्ट...! धन्यवाद..!
  • Log in or register to post comments

आवडली कथा! थोडी फास्ट

जडभरत
Sun, 07/12/2015 - 12:29 नवीन
आवडली कथा! थोडी फास्ट घेतल्यागत वाटते पण तुम्हाला जे सांगायचंय ते पोहोचतंय. मी सुद्धा अशा प्रकारच्या अनुभवातून गेलोय भाऊ! मुलांच्या आनंदी चेहेर्‍याची कल्पना मनाशी येउन त्याची जीभ गोड झाली. :- माझे जुने दिवस आठवले. अगदी तुटपुंज्या उत्पन्नातून मुलीसाठी खेळणी आणि खाऊ शनीवारी गावी घेऊन जायचो. सर्व प्रवासभर ती किती खुश होइल हाच विचार असे. मस्तच!
  • Log in or register to post comments

छान जमलीय कथा. आवडली.

पद्मावति
Sun, 07/12/2015 - 13:58 नवीन
छान जमलीय कथा. आवडली. प्रसिद्ध हलवायाच्या दुकानात ५,१३००० चा हिशोब करणार्‍याला स्वत:च्या कुटुंबासाठी मिठाई घेतांना मात्र त्या दुकनातले दर परवडू नये हा विरोधाभास अचूक दाखविल्या गेला आहे.
  • Log in or register to post comments

फारच उत्तम आहे .

अरवीन्द नरहर जोशि.
Mon, 07/13/2015 - 06:08 नवीन
फारच उत्तम आहे .
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा