श्रीमंत: शतशब्दकथा
आज अक्षयतृतीया म्हणजे साडेतीन मुहुर्तांपैकी एक. त्यामुळे आज ते प्रसिद्ध दुकान लवकर उघडलेलं होतं. अगदी सकाळी सात वाजल्यापासुन लोकांनी दुकानामधे गर्दी करुन गोडा-धोडाचे पदार्थ खरेदी करायला सुरुवात केलेली होती. त्याची सरावलेली बोटं सराईतपणे नोटा आणि व्यवहार हाताळत होती. दुपारी दुकान बंद करायची वेळ झाली तसा त्याचा ५,१३,०००/- रुपयांचा हिशोब तयार होता. मालकाकडे पैसे आणि हिशोबाची यादी देउन तो दुकानातुन बाहेर पडला आणि घराकडे निघाला. वाटेत त्याला एका कुडमुड्या हलवायाचं दुकान लागलं आणि त्याला मुलांची आणि म्हातार्या आईची आठवण झाली. आपल्या कनवटीची शेवटची पन्नासची नोट त्यानी काढली आणि पावशेर जिलबी घेतली. मुलांच्या आनंदी चेहेर्याची कल्पना मनाशी येउन त्याची जीभ गोड झाली.
(शतशब्दकथा लिहायचा पहिलाचं प्रयत्न त्या जिलबीएवढाचं गोड मानुन घ्यावा. शतशब्दकथा हा प्रकार भयानक अवघड आहे असं माझं मत बनलेलं आहे.)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वा! जम्या बरका!
धन्यवाद. पुढची शतशब्दकथा डु
जरूर जरूर!
=))=))
101 शब्द आहेत.
शब्द १०० आहेत उरलेला एक आकडा
चांगला प्रयत्न.
तुम्ही कॉलेजमधले सगळ्यात
:)
निवृत्त?
वेळ नै सध्या.
प्रयत्न आवडला
आवल्ड्या गेले आहे. ;)
कथा आवडली!!
सुंदर !
गुड वन
सरधोपट झालंय.
सहमत. अजुन लेखनावर तेवढी पकड
आपल्या कनवटीची शेवटची
आपल्या कनवटीची शेवटची पन्नासची नोट त्यानी काढली आणि पावशेर जिलबी घेतली. मुलांच्या आनंदी चेहेर्याची कल्पना मनाशी येउन त्याची जीभ गोड झाली.असा उघड शेवट करण्याऐवजी...त्याचे पाय नकळत अडखळून तो थबकला. क्षणभर विचार करून त्याने आपल्या कनवटीची चुरगळलेली शेवटची पन्नासची नोट काढली आणि पावशेर जिलबी घेतली.हे कसं वाटतेय ?मस्तं कल्पना. १०० मधे बसवायला
एक शब्द कमी करायचा असेल तर
वा!
मला आवडली - रादर शेवट टोचला
आवडली कथा.
सर्वांचे आभार :)
प्रयत्न आवडला !
चांगली कथा
म्हणजे
छान रे.
चांगला प्रयत्न आहे.
आड़ौली रे!
छान!
जिल्बी... ;-) आपल ते हे... :
:-))
चांगली लिहिलेय.
कथा आवडली
पहिला प्रयत्न आवडला.
छान कथा
छान ! लेखनासाठी शुभेच्छा!!
प्रयत्न चांगला आहे, एक गोष्ट खटकली...
खटकली?
+१
कप्तान
डोक्याला जास्त त्रास न करणारी
आवडली
मला आवडली
आयडिया छान आहे. फार कठीण
कल्पना मस्त..
आशय छान आहे कवितेतला.आवडलि...
कविता आवडल्याबद्दल धन्यवाद.