Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by आशु जोग on Tue, 07/07/2015 - 21:39
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
फिल्म अँण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही पुण्यातली संस्था सध्या गाजते आहे ती तिथल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे. नवे अध्यक्ष आल्यानंतर त्यांच्या विरोधात हे आंदोलन सुरु आहे. या अध्यक्षांनी अजून कामाला सुरुवातही केलेली नाही. तोवर या आंदोलनाला सुरुवात झाली. का तर अमुक तमुक प्रकारचा अध्यक्ष आम्हाला नको. प्रश्न हा आहे की विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की आपला वर्ग(शिक्षणाचे ठिकाण) सोडून वर्गाबाहेर आंदोलने करायची ? वास्तविक या विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती कुठल्यातरी धरणे, आंदोलने यामधून नव्हे तर त्यांच्या कलाकृतीमधून दिसून यावी ही देशाची अपेक्षा आहे. आजच्या अध्यक्षांबाबत काही मुद्दे पुढे केले जात असले तरी यापूर्वी अत्यंत नामवंत चित्रकर्मींनाही विद्यार्थ्यांनी काम करणे अशक्य करून सोडले होते. त्यामुळे त्यांना आपला कार्यकाल पूर्ण करता आला नव्हता. सध्या एक मुद्दा चर्चेत आहे राजकीय पार्श्वभूमी. पण इथे अध्यापक म्हणून काम केलेल्या सईद मिर्झा यांनी तर मोदी पंतप्रधान बनू नयेत यासाठी सह्यांची मोहीम घेतली होती. हे सारे पाहता असे दिसते की अलिकडच्या सत्ताबदलामुळे अनेक छावण्यांमधे अस्वस्थता दाटून आलेली आहे. त्यामुळे आजही आपली उपद्रव क्षमता कमी झालेली नाही हे दाखवण्याचाही या छावण्यांचा प्रयत्न असावा, असा एक अंदाज आहे. सुरुवातीला येथील आंदोलकांनी आमच्या मागे कोणताही पक्ष, कोणताही गट नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना जे एन यू मधून पाठिंबा मिळाल्यावर मात्र हे आंदोलन कुठल्या गटाचे आहे हे स्पष्ट व्हायला लागले आहे. .
  • Log in or register to post comments
  • 29920 views

प्रतिक्रिया

Submitted by कपिलमुनी on Wed, 07/08/2015 - 15:14

In reply to मुनीश्वर, तिथं पिक्चर काढायचा by काळा पहाड

Permalink

गजेंद्र चौहान

गजेंद्र चौहान हे कसे लायक आहेत? तेवढा सांगा ओ !
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Wed, 07/08/2015 - 15:27

In reply to गजेंद्र चौहान by कपिलमुनी

Permalink

ते कसे नालायक आहेत आणि बाकीचे

ते कसे नालायक आहेत आणि बाकीचे कसे लायक आहेत ते सांगा आधी. मगाचपासून हेच दुसर्या तर्हेनं विचारतोय काय समजत नाहीये का?
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Wed, 07/08/2015 - 15:50

In reply to ते कसे नालायक आहेत आणि बाकीचे by काळा पहाड

Permalink

बाकीच्यांना

बाकीच्यांना कमीत कमी चित्रपट क्षेत्रामधला निर्मिती,लेखन, दिग्दर्शन यांचा अनुभव आहे. या लोकांच्या कलाकृती देशात , जगात गाजल्या आहेत आणि यांना बर्‍याच प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. जास्त माहितीसाठी इथे पहा श्याम बेनेगल यांनी इथेच शिकवले आहे. त्यामुळे ते विद्यार्थांशी जास्त चांगले कनेक्ट होउ शकतात . गिरिश कर्नाड हे ऊतम अभिनेते , लेखक , दिग्दर्शक आहेत He served as director of the Film and Television Institute of India (1974–1975) and chairman of the Sangeet Natak Akademi, the National Academy of the Performing Arts (1988–93). यांना या व अशाच पदाचा अनुभव आहे. वरील दोन्ही उमेदवार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले आणि कलेची जाण असलेले म्हणून ओळखले जातात आता २ वाक्ये चौहान यांच्यवर लिहा .
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Wed, 07/08/2015 - 16:38

In reply to बाकीच्यांना by कपिलमुनी

Permalink

मुनीश्वर, एडमिनिस्ट्रेटिव्ह

मुनीश्वर, एडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी वेगळ्या आणि आर्ट स्किल्स वेगळी. श्याम बेनेगलांबद्दल माझं काही म्हणणं नाही paN हे बाकीचे कन्नड आणि केरळी चेहरे म्हणजे सभ्य चेहृयातले कम्युनिस्ट आहेत. कर्नाड सतत कसले ना कसले वाद ओढवून घेतात. http://indiafacts.co.in/girish-karnad-medicine/ http://indiafacts.co.in/how-girish-karnads-plays-distort-indian-culture-conclusion/ खालील लिंक्स पहा: १. रविंद्रनाथ टागोर सेकंड रेट प्ले रायटर आहेत: http://timesofindia.indiatimes.com/india/Rabindranath-Tagore-a-second-rate-playwright-Girish-Karnad-says/articleshow/17160257.cms २. अनंत मूर्ती बद्दल http://www.thehindu.com/todays-paper/tp-national/tp-karnataka/karnad-ura-was-a-critical-outsider/article6451441.ece ३. नॉय पॉल बद्दल http://blogs.hindustantimes.com/medium-term/?p=547 ४. Calling the move to introduce the Bhagavad Gita in primary schools across the State another step in “cultural terrorism”, Jnanpith award winner Girish Karnad lambasted the State Government for this “communal” proposal here on Friday. http://www.thehindu.com/todays-paper/tp-national/tp-karnataka/bhagavad-gita-move-is-cultural-terrorism-girish-karnad/article2374729.ece http://www.patheos.com/blogs/drishtikone/2012/11/girish-karnad-ahmednijad-of-indian-secularists-his-denial-of-islamic-genocide-of-hindus-and-promotion-of-negationism/ त्यातून हे आर्टीस्ट्स म्हणजे भडक डोक्याचे प्राणी. तेव्हा कर्नाड सारख्याला तिथे आणून ठेवलं तर तिथे एफटीटीआय आणि त्यांचं पुरस्कृत सरकार यांच्यात भांडण सुरू झालंच म्हणून समजा.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Wed, 07/08/2015 - 16:43

In reply to मुनीश्वर, एडमिनिस्ट्रेटिव्ह by काळा पहाड

Permalink

चौहान

आता २ वाक्ये चौहान यांच्यवर लिहा . हा मुद्दा सोडून दुसरेच लिहित आहात. दुसरा किती वाईट यावर चौहानांचा चांगलेपणा आहे का ? गजेंद्र चौहान हे वादातीत उत्तम कलाकार किंवा एडमिनिस्ट्रेटर असतील तर सांगा , सर्वजण आनंदाने मान्य करतील.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on Wed, 07/08/2015 - 16:34

In reply to मुनीश्वर, तिथं पिक्चर काढायचा by काळा पहाड

Permalink

विषयांतर!!

पवारांना मध्ये आणल्याबद्दल निषेध निषेध!!! बर ते सोडा … ह्या गजेंद्र भाऊंनी किती पिक्चरे गेल्या ५ वर्षात केलीत? त्याचं सध्याच्या तंत्रज्ञानाबद्दल काय मत आहे? वगरे वगरे सांगू शकाल का? त्यांनी काय व्यवस्थापन केलाय आधी हे तरी सांगा? नाही म्हणजे गल्ली निवडणुकांच व्यवस्थापन आणि FTII च व्यवस्थापन … काही तर फरक असेल ?
  • Log in or register to post comments

Submitted by थॉर माणूस on Fri, 08/07/2015 - 10:12

In reply to मुनीश्वर, तिथं पिक्चर काढायचा by काळा पहाड

Permalink

शरद पवार कंट्रोल बोर्डावर

शरद पवार कंट्रोल बोर्डावर निवडून आले होते. गजेंद्रला आणून बसवलाय. ते क्रिकेट कंट्रोल बोर्ड आहे. ही शिक्षण संस्था आहे. शरद पवार नॅशनल क्रिकेट अ‍ॅकेडमीचे अध्यक्ष नव्हते. आता कुठलेही लॉजिक कुठेही लागायला सुरू झालंय. :)
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Wed, 07/08/2015 - 14:38

Permalink

जे

त्या संस्थेचे जे माजी विद्यर्थी आहेत व ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात काही भरीव काम केले आहे अशांची सा़क्ष काढावी असे ह्यांचे मत. संस्थेचे काही प्रसिद्ध माजी विद्यार्थी- मिथुन चक्रवर्ती,जया बच्चन,राजकुमार हिरानी,रझा मुराद,शत्रुग्न सिन्हा,ओम पुरी,संजय लीला भंसाळी.. https://en.wikipedia.org/wiki/Film_and_Television_Institute_of_India ह्यांच्या करियरमध्ये तत्कालीन संचालकांचा सहभाग/वाटा किती ह्यावर मत मिळाले की मग पुढचे बघता येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Wed, 07/08/2015 - 14:54

In reply to जे by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

ज्जे बात, मला वाटते हा

ज्जे बात, मला वाटते हा प्रतिसाद अतिशय योग्य आहे. अवांतरः आयुष्यात कधी माईशी सहमत व्हावेसे वाटेल असे वाटले नव्हते,
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 07/08/2015 - 15:13

In reply to जे by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

मस्त हो माई. ह्या लॉजिकने तर

मस्त हो माई. ह्या लॉजिकने तर मग संचालकच नको ना? उगा वडाची साल पिंपळाला...
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Wed, 07/08/2015 - 17:20

In reply to मस्त हो माई. ह्या लॉजिकने तर by संदीप डांगे

Permalink

संचालक

संचालक हवा तर.म्हणूनच तर हे सगळे चालू आहे. पण तत्कालीन संचालकांचा माजी विद्यार्थ्यांवर काय प्रभाव पडला,त्यावेळच्या संचालकांनी कोणते धाडसी निर्णय घेतले,त्यांचा अभ्यासक्रमांतला हस्त़क्षेप....हे जर मुद्दे पुढे आले तर सरकारला विरोध करताना काही अर्थ राहील. संस्था मोठी आहे,तिच्यातून लोकप्रिय्,करमणूकप्रधान हलके फुल्के सिनेमे देणारे लोक तयार होतात हे ही मान्य पण गजेंद्र चौहान ह्यानी बर्लिन्,कान्समध्ये जाऊन चेहरा रंगवला नाही म्हणून ते संस्था चांगल्या तर्हेने चालवू शकणार नाहीत हा अजब तर्क झाला असे ह्यांचे मत.
  • Log in or register to post comments

Submitted by नाव आडनाव on Wed, 07/08/2015 - 17:24

In reply to संचालक by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

तुम्ही "ह्यांना" मिसळपाव वर

तुम्ही "ह्यांना" मिसळपाव वर यायला सांगा. तुम्हाला लई टाईप करायला लागतंय.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Wed, 07/08/2015 - 15:13

Permalink

एकूण

कायतर शिणेमा संस्थेच्या तमाशाचे मिपावर नाटक (वस्त्रहरण) झाले आहे.
सरकार : तू फक्त हो म्हण+कुणी तरी आहे तिथं विद्यार्थी : मला मुक्त व्हायचय+मला उत्तर हवय मिपाकर :सगळीकडे बोंबाबोंब्+सौजन्याची ऐशी तैशी+केले तुका झाले माका.
पिटातील प्रेक्षक नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Wed, 07/08/2015 - 15:20

In reply to एकूण by नाखु

Permalink

पॉप्कॉर्न खावा

शिट्ट्या मारा :)
  • Log in or register to post comments

Submitted by gogglya on गुरुवार, 07/09/2015 - 18:00

In reply to एकूण by नाखु

Permalink

+

+१११११११११११
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 07/08/2015 - 15:27

Permalink

भक्तांचा नंगानाच बघून डोळे

भक्तांचा नंगानाच बघून डोळे पाणावले. उद्या भाजपाप्रणीत नेमणूकीत राखी सावंत जरी निवडून आली तरी तिलाच सपोर्ट करतील हे वेगळे सांगणे न लगे.
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Wed, 07/08/2015 - 15:30

In reply to भक्तांचा नंगानाच बघून डोळे by बॅटमॅन

Permalink

राखी सावंत बद्दल काय बोलायचं

राखी सावंत बद्दल काय बोलायचं काम नाही हां. नाही तर 'आठवले' ना सांगीन.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 07/08/2015 - 15:35

In reply to राखी सावंत बद्दल काय बोलायचं by काळा पहाड

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Mon, 08/10/2015 - 15:01

In reply to भक्तांचा नंगानाच बघून डोळे by बॅटमॅन

Permalink

...

तिलाच सपोर्ट करतील तिच्यामागे उभे राहतील असे तुम्हाला म्हणायचे आहे का... बाकी सगळं छान मराठी लिहीलंत पण तेवढंच इंग्रजी लिहीलंत म्हणून एक शंका... !
  • Log in or register to post comments

Submitted by ईश्वरसर्वसाक्षी on गुरुवार, 07/09/2015 - 13:31

Permalink

लेखक महाशय हयांच्या शेवेसि सादर

http://www.misalpav.com/comment/709519#comment-709519 http://www.misalpav.com/comment/691072#comment-691072 http://www.misalpav.com/comment/607658#comment-607658 जरा आरशात बघा..इतरांच्या धाग्यांना आपण वर्तमानत्री धागे म्हणता.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसन्न केसकर on गुरुवार, 07/09/2015 - 14:06

Permalink

गजेन्द्र चौहान यांच्या आधी त्या पदावर कोण होते?

गजेन्द्र चौहान यांच्या आधी त्या पदावर कोण होते? आणि त्यांच्या आधी? ते लोक पण चित्रपट क्षेत्रातले नामवंत होते का? जाणकारांनी कृपया माहिती द्यावी.
  • Log in or register to post comments

Submitted by खटासि खट on गुरुवार, 07/09/2015 - 23:35

Permalink

मी काय म्हणतो अडवाणी,

मी काय म्हणतो अडवाणी, जेठमलानी, कंदाहार फेम माजी मंत्री इत्यादींपैकी कुणालाही बनवलं असतं तरी चाललं असतं की, भाजप खासदार धडकेशमालिनी पण चालल्या असत्या आणि गरम धरम~, शॉटगन सिन्हा यांनी काय पाप केलं होतं ? विनय सहस्त्रबुद्धे , समीर धर्माधिकारी किंवा किरण खेर यांचे पतीदेव पण चालले असते. नाहीतर निवडणुकीत मोदींसाठी न्यूड फोटो दिलेली ती कुठली बया यांचा पण विचार करायला पायजेल होता. जाऊ द्या आता हत्तीचं वाहन तर हत्तीचं वाहन.
  • Log in or register to post comments

Submitted by dadadarekar on गुरुवार, 07/09/2015 - 23:58

In reply to मी काय म्हणतो अडवाणी, by खटासि खट

Permalink

धडकेशमालिनी

...
  • Log in or register to post comments

Submitted by dadadarekar on Sat, 07/11/2015 - 15:38

Permalink

धक्कादायक

http://www.mtmobile.in/text/details.php?storyid=48030061&section=top-stories अमिताभ , रजनीकांत , अनुपम खेर असे दिग्गज सोडुन धर्मराज , राहूल सोलापूरकर वगैरे भाजपभाटांची वर्णी लावली
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Sat, 07/11/2015 - 20:22

In reply to धक्कादायक by dadadarekar

Permalink

राहूल सोलापूरकर

राहूल सोलापूरकर चांगला अभिनेता आहे , तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या भूमिका छान करता
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sat, 07/11/2015 - 20:48

In reply to राहूल सोलापूरकर by कपिलमुनी

Permalink

मुनिवरच ते. शालजोडीतले मोठ्या

मुनिवरच ते. शालजोडीतले मोठ्या खुबीने हाणणारच ! =))
  • Log in or register to post comments

Submitted by dadadarekar on Sun, 07/12/2015 - 06:48

In reply to मुनिवरच ते. शालजोडीतले मोठ्या by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

यात नवल ते काय ?

डॉक्टर हा एक अ‍ॅक्टर असावा लागतो. असं आमचे मास्तुरे सांगायचे.
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Sat, 07/18/2015 - 14:32

In reply to धक्कादायक by dadadarekar

Permalink

...

खासदार रामदास आठवले यांनी चौहान यांच्या नेमणुकीवरून होणारा प्रचंड विरोध पाहता त्यांनी तातडीने संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या चित्रपट शाखेचे उद्घाटन झाल्यानंतर आठवले यांनी ही मागणी केली. सविस्तर वृत्त येथे पहा
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on Sat, 07/11/2015 - 16:20

Permalink

दिले-नादां

ए-दिले-नादां तुझे हुआ क्या आखिर इस दर्द कि दवा क्या है
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Sat, 07/11/2015 - 16:54

Permalink

नका रे !

नका रे अशी माझ्या नावावर चिखलफेक करु ! आपल्या एका मिपाबंधूची भुमिका केलेल्या नटाला एवढ्या मोठ्या पदाचा मान मिळालाय तर मिपाकरांनी खुश नको का व्हायला ? शांत व्हा. नायतर भीमार्जुनाला पाठवू काय ? नको, त्यापेक्षा कृष्णालाच पाठवतो. कृष्णनितीशिवाय हा पेच सुटायचा नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by खटासि खट on Sat, 07/11/2015 - 23:45

Permalink

बाबा बाबा, आपण ना

बाबा बाबा, आपण ना पांढरा हत्ती आणायचा.. बाळ इंद्राचा गज आणून चुहा हाणायचा.. http://maharashtratimes.indiatimes.com/nation/amitabh-bachchan-couldve-been-ftii-chairman/articleshow/48030061.cms
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Sun, 07/12/2015 - 00:36

Permalink

...

इंद्राचा गज आणि गजेंद्र यात फरक आहे ना रे बेटा
  • Log in or register to post comments

Submitted by खटासि खट on Sun, 07/12/2015 - 06:31

In reply to ... by आशु जोग

Permalink

अरेच्चा ! माहीतच नव्हतं बघा.

अरेच्चा ! माहीतच नव्हतं बघा.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Sun, 07/12/2015 - 17:49

Permalink

विद्यार्थ्यांनी संचालकांच्या

विद्यार्थ्यांनी संचालकांच्या नियुक्ती वर आक्षेप म्हणजे त्यांच्या फिल्मी भाषेत सांगायचे तर तिसर्‍या फळीतील दिग्दर्शकाने पटकथा व नायकाच्या भूमिकेसाठी त्यांची मते विचारात न घेण्याच्या निषेधार्थ संप पुकारण्याचा सारखे आहे. महत्त्वाचा प्रश्न असा आहे किं अमिताभ रजनी ह्यांच्याकडे ह्या संस्थे कडे द्यायला वेळ आहे का आणि त्यांची ह्या पदाच्या साठी होकार होता का हा प्रश्न प्रसार माध्यमांनी न विचारता शिमगा सुरु केला.
  • Log in or register to post comments

Submitted by dadadarekar on Sun, 07/12/2015 - 18:31

In reply to विद्यार्थ्यांनी संचालकांच्या by निनाद मुक्काम …

Permalink

.

त्यांच्या होकार नका४आबाबत नंतर. यादीतील एकही व्यक्ती न घेता दुसरीच नावे जाहीर केली गेली.
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Sun, 07/12/2015 - 18:56

In reply to . by dadadarekar

Permalink

...

दुसरीच नावे पहीलं नाव तुमचं होतं वाटतं... मग बरोबर आहे... असो विनोद बाजूला राहू द्या. पण याद्या बनवणारेही तेच आणि अंतिम निवड करणारेही तेच... काय बोलणार
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Sun, 07/12/2015 - 18:59

Permalink

काय ठरलं शेवटी?

काय ठरलं शेवटी?
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Sun, 07/12/2015 - 19:09

Permalink

...

सुरुवातीला विरोधकांनी मोदींवरही अशीच प्रचंड टिका केली होती. त्यातूनच ते मोठे होत गेले... गजेंद्र यशस्वी होणार असे दिसतेय
  • Log in or register to post comments

Submitted by dadadarekar on Sun, 07/12/2015 - 23:49

In reply to ... by आशु जोग

Permalink

अमोल पालेकरांचाही विरोध.

व... रीकामटेकडेपण या निकषवर निवड करणार का ? http://www.mtmobile.in/text/details.php?storyid=48037730&section=pune-home राखी सावंत , सलमा आगा , हेमंत बिर्जे हेही विरोध करणार आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Tue, 10/20/2015 - 17:18

In reply to ... by आशु जोग

Permalink

एफटीआयआय आंदोलनाचे 'पॅकअप' कधी?

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातील (एफटीआयआय) एक किस्सा ऐकून सुन्न झालो. गोष्ट जरा जुनी आहे, रसूल पोकुट्टी यांना ध्वनिलेखनासाठी मानाचा ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला तेव्हाची. "स्लमडॉग मिलिनेअर‘चे संगीतकार ए. आर. रहमान यांनाही "जय हो‘ गाण्यासाठी ऑस्कर जाहीर झाले होते. या दुहेरी यशामुळे सारे भारतीय कलाक्षेत्र आनंदात न्हाऊन निघाले होते. रसूल हे एफटीआयआयचे माजी विद्यार्थी. त्यामुळे तेथील अध्यापक, विद्यार्थ्यांना आनंद होणे स्वाभाविकच; पण विद्यार्थ्यांना जरा जास्तच कैफ चढला होता. कॅम्पसमध्ये रस्त्यावर पार्ट्या रंगल्या. कोणी ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. एकच कल्ला. शिक्षकांचेही कोणी मनावर घेत नव्हते... बातमी इथे पहा
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Tue, 07/14/2015 - 11:59

Permalink

...

संप करून विद्यार्थी आपलेच नुकसान करून घेत आहेत - नाना पाटेकर Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Tue, 07/14/2015 - 13:17

In reply to ... by आशु जोग

Permalink

नाना

आपल्याकडे सर्वच क्षेत्रांमध्ये संस्थेपेक्षा व्यक्ती मोठी मानण्याचे प्रघात असल्याने हे सगळे होतेय असे ह्यांचे मत. अमूक एक माणूस खूप मोठ्ठा बदल घडवून आणेल अशी भाबडी आशा जनता बाळगते.अशी आशा बाळगण्यात शिकलेले लोकही आघाडीवर असतात. मग 'अब्दुल कलाम नसते तर भारताचे काही खरे नव्हते..''आता मोदी पंतप्रधान झाले आहेत्,सगळे काही आता ठीक होईल..'अशी वाक्ये ऐकायला येतात. तुमच्या त्या नासाचे संस्थापक कोण? हूवर धरण बांधले तेव्हा अमेरिकेचा अध्यक्ष कोण होता?त्याला अमेरिकारत्न मिळाले का?
  • Log in or register to post comments

Submitted by अस्वस्थामा on Tue, 07/14/2015 - 19:10

In reply to नाना by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

माईच्या जागी आता आम्हाला चाची

माईच्या जागी आता आम्हाला चाची-४२० मधली "लक्ष्मी गोडबोले" दिसू लागली आहे हो.. :)
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Tue, 07/14/2015 - 13:34

Permalink

गजेंद्र चौहान

गजेंद्र चौहान हे कसे लायक आहेत?
या प्रश्नाला कोणत्याही भक्ताने किंवा कोणीही उत्तर दिले नाही.? काळा पहाड कुठे गेले ?
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 07/14/2015 - 14:57

In reply to गजेंद्र चौहान by कपिलमुनी

Permalink

फारच लावून धरता बुवा तुम्ही..

फारच लावून धरता बुवा तुम्ही.... हैट्ट है... ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Tue, 07/14/2015 - 15:04

In reply to फारच लावून धरता बुवा तुम्ही.. by संदीप डांगे

Permalink

शिकवणी

श्रीगुर्जींची शिकवणी लावलीये
  • Log in or register to post comments

Submitted by अस्वस्थामा on Tue, 07/14/2015 - 15:28

In reply to गजेंद्र चौहान by कपिलमुनी

Permalink

=))

=)) "मारुती कांबळेचं काय झालं?"
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Tue, 07/14/2015 - 15:51

In reply to गजेंद्र चौहान by कपिलमुनी

Permalink

गजेंद्र चौहान लायक का आहेत?

गजेंद्र चौहान लायक का आहेत? १. त्यांनी अनेको टीव्ही सिरियल्स मध्ये काम केले आहे. २. त्यांनी बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. ३. त्यांनी सिंटाचे अध्यक्षपद भुषवले आहे. ४. सिंटाच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह कामांमध्ये त्यांचा सहभाग होता. सध्याची त्यांची अपॉइंटमेंट ही अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह कामांसाठी आहे असे समजते. ५. एफटीआयआय चे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी अर्ज करावा लागतो असे समजते. ज्या सगळ्यांची नावे घेतली जात आहेत त्यापैकी कोणीही अध्यक्षपदासाठी अर्ज केला नव्हता असे समजते. अश्या परिस्थितीत तयार असलेल्या कलाकाराला सरकारने नियुक्त केले. ६. त्यांनी काही अ‍ॅडल्ट चित्रपटांतुन कामे केलेली असली (पॉर्न नाही हे इथे नमूद करणॅ योग्य) तरीही त्यांनी बर्‍याच टीव्ही सिरियल्स मध्ये कामे केलेली आहेत (आणि ती काही अ‍ॅडल्ट नव्हती). अनेक बुजुर्ग हिंदी चित्रपट खलनायकांनी आणि चरित्र अभिनेत्यांनी देखील प्रसंगी अ‍ॅडल्ट चित्रपटांतुन कामे केलेली आहेत हे इथे नमूद करणे गरजेचे वाटते. या कामासाठी ते क्लसे अयोग्य आहेत? १. चित्रपट बी ग्रेड, सी, ग्रेड की झेड ग्रेड हे इथे महत्वाचे आहे असे मला वाटते. त्यांचे बहुतांशी सिनेमे झेड ग्रेड आहेत. एफटी आय आय चे आधीचे काही चेयरमन नावाजलेले आहेत असे समजते. (सगळेच काही नावाजलेले नव्हते असे समजते). २. गजेंद्र चौहान यांनी काही अ‍ॅडल्ट चित्रपटात काम केलेले आहे. जर एफ्टीआयआय ने किंवा तिथल्या विद्यार्थ्यांनी आजवर कुठल्याच अ‍ॅडल्ट चित्रपटातुन कामे केले नसेल किंवा त्याचे दिग्दर्शन केले नसेल तर एफ्टीआयआय च्या महान परंपरेला गजेंद्र चौहानांच्या काही भूमिकांमुळे बाधा येउ शकते.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Tue, 07/14/2015 - 17:24

In reply to गजेंद्र चौहान लायक का आहेत? by मृत्युन्जय

Permalink

बादवे ज्या ३ चित्रपटांवरुन

बादवे ज्या ३ चित्रपटांवरुन मुख्यत्वे गजेंद्र चौहान यांच्याबद्दल गदारोळ चालु आहे ते ३ चित्रपट आहेतः १. खुली खिडकी - सहकलाकार होते अमजद खान, अरुणा इराणी, टिकु तलसानिया २. जंगल लव्ह (टारझनपट) - सहकलाकार होते अरुणा इराणी आणि रिटा भादुरी २. आज का रावण - सहकलाकार होते मिथुन चक्रवर्ती, मोहन जोशी आणि शक्ती कपूर.
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Tue, 07/14/2015 - 15:37

Permalink

जरा उशीराच उतरतोय चर्चेत..

जरा उशीराच उतरतोय चर्चेत, पण वर कुणीतरी, मला वाटतं, डांगेसाहेब बोललेत की ह्या संस्थेची प्रवेशप्रक्रीया अगदी आयएएसच्या तोडीची असते. मी ह्या बाबतींत जास्त पडत नाही, पण आमच्या धोतराच्या पोताशीच तुलना होतेय, तर काही प्रश्न विचारतो.. १) नेमकी काय आणि कशी असते ही प्रवेश-प्रक्रीया? कुठकुठल्या विषयांतील माहिती/ज्ञान अपेक्षीत असते विद्यार्थ्यांकडून? २) कुठकुठल्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांकरीता खुली असते ही परीक्षा? ३) आवेदन/परीक्षा आणि निवड ह्यांचे गुणोत्तर (सिलेक्शन पर्सेंटेज किती)? ४) निवड प्रक्रीयेत कितपत पारदर्शिता आणि 'ऑब्जेक्टीव्हिटी' असते? माफ करा, पण नागरी सेवा परीक्षा आणि इतर कुठल्याही निवड-परीक्षांमधे एक मुलभूत फरक आहे, तो म्हणजे खुलेपणाचा.. बाकी बव्हांश निवड-परीक्षा त्या-त्या क्षेत्रात आवड/स्पर्धक असलेल्या लोकांपुरत्या सिमीत असतात. ही परीक्षा सगळ्यांना (अ‍ॅज मच पॉसिबल) 'लेव्हल प्लेईंग फिल्ड' देते. तुमचा भुतकाळ आणि त्यातले तुमचे यश/अपयश ह्या परीक्षेत मॅटर करत नाही.. म्हणूनच माझ्यासारखा एखादा बारावीत गणितात नापास झालेला मुलगा यशस्वी होऊ शकतो, आणि आयआयटीचे विद्यार्थीपण सगळे प्रयत्न देऊनही अपयशी होऊ शकतात. एखादा बी.ए. मराठी साहीत्य उमेदवार एखाद्या आय आय टी/आय आय एम उमेदवारापेक्षा वरची रँक काढू शकतो.. This is just to get the record straight. आता जरा चर्चेच्या मतिथार्थाकडे वळतो. मिपावर भरपुर व्यावसायिक शिक्षण घेतलेले सभासद आहेत, जसे की इंजिनीअर्स, डॉक्टर्स, सीए इ.. ह्या सगळ्यांनी जर त्यांच्या व्यावसायिक यशापयशात त्यांच्या व्यावसायिक शिक्षण दिलेल्या संस्थेचा आणि मुख्यत्वेकरुन त्यांच्या संचालकांना कितपत वाटा होता, ह्याबद्दल कौल घेतला/दिला तर मला वाटतं, चित्र जरा स्पष्ट होईल.. बाकी रणकंदन करण्याइतक्या महत्त्वाची ही संस्था असेल-नसेल, स्वायत्त आणि 'सेंटर्स ऑफ एक्सेलंस' असणार्‍या संस्थाच्या बाबतीत राजकीय लुड्बूड असावी की नको, ह्या हिशेबाने चर्चा महत्त्वाची आहे..
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: अभिशेक पाटिल 2
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 11:14
  • सदस्य: Abhishek C
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 11:05
  • सदस्य: देव@मिसलपाव
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 08:44
  • सदस्य: आम्ही कोण म्हण…
    नोंदणी: Fri, 03/20/2026 - 00:38
  • सदस्य: मिपाखरु
    नोंदणी: Fri, 03/20/2026 - 00:36

Pagination

  • First page « पहिले
  • Previous page ‹ मागे
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • …
  • Next page पुढे ›
  • Last page शेवटी »

© 2026 Misalpav.com