Skip to main content

बाबासाहेब पुरंदरे,महाराष्ट्रभुषण आणि वाद!!

लेखक ग्रेटथिंकर यांनी बुधवार, 24/06/2015 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या महाराष्ट्रात महाराष्ट्रभुषण पुरस्कारावरुन वाद सुरु आहे.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना इतिहासकार व इतिहासाचे गाढे अभ्यासक ठरवून हा पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक संघटनांचा याला विरोध आहे.संभाजी ब्रिगेडने या विरोधात 'शिवसन्मान जागर परिषद' स्थापन करुन विरोध सुरु केला आहे. विरोधकांचे म्हणणे असे आहे की पुरंदरे इतिहासकार नाहीत ,तर ते एक नाटककार व शाहीर आहेत, त्यांना इतिहासतज्ञ म्हणुन पुरस्कार देणे चूक आहे. पुरंदरेंनीही स्वतःला कधीही इतिहासकार म्हणवून घेतलेले नाही ते स्वतःला शाहीर म्हणवतात, पण भाजपप्रणीत सरकारने जनतेची दिशाभूल करत त्यांना शिवचरीत्राचे गाढे अभ्यासक ही पदवी दिली आहे असा विरोधकांचा आक्षेप आहे. तर प्रश्न असे आहेत 1.हा आक्षेप योग्य आहे का ? 2.कादंबरीकार नाटककाराला इतिहासतज्ञ ठरवल्याने ,त्याने त्याच्या कलाकृतीत केलेले कल्पनाविलास 'इतिहास' म्हणुन पुढच्या पीढीने स्विकारण्याचा धोका आहे का? 3.जेम्स लेनच्या पुस्तकात पुरंदरेंचा उल्लेख असताना त्यांनी त्यावर योग्य स्पष्टीकरण दिले नाही हा विरोधकांचा आरोप योग्य वाटतो का?

वाचने 41504
प्रतिक्रिया 148

प्रतिक्रिया

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

छोटा भीमची सीडी पाठवल्यास ज्ञानात भर पडेल.
अहो पण त्या छोट्या भीमाचे काय होईल याचा जरा विचार करा !
त्यापेक्षा चंपक ,चांदोबा पाठवा.
'छान छान गोष्टी' पाठवू का ? चंपक ,चांदोबा थोडे समजायला अवघड जातील तुम्हाला.. राजा शिवछत्रपती आणि रणजीत देसाईंचे श्रीमान योगी हे दोन पुस्तक दुरूनही पाहू नका. महाराजांना स्वर्गात आत्मक्लेश होईल

प्रतिसादातून संदर्भाची मागणी करण्यासाठी https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/c/c6/Sandarbha_hava_mr_2… हे छायाचित्र उपलब्ध आहे. ते खालील प्रमाणे दिसते. sandarbh havet इतिहास विषयक चर्चा चालू असेल तर खालील वाक्ये कॉपीपेस्टवता येऊ शकतात. इतिहासविषयक पाळावयाचे लेखनसंकेत *कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी, ऐतिहासिक कथा कादंबर्‍यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्ट पणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *इतिहास विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्यबद्दल सजग रहावे. * फिशर यांच्या मते.... सदोष तर्कांमुळे ज्याचे स्वत:चे संशोधन आणि निष्कर्ष दूषित अथवा प्रभावित होतील, असा इतिहासकार त्याच्या वाचकांना्च केवळ भ्रमात टाकेल याची खरी भिती नाही, तर तो स्वत:लाच भ्रमात टाकेल याची आहे. * तर्कसुसंगत चर्चांसाठी विकिपीडिया:तर्कशास्त्र प्रकल्पाशी सहयोग करा. जाहीरात पुन्हा कॉपीपेस्टवताना वापरावयाचा दुवा https://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया:तर्कशास्त्र हि जाहीरातीचा प्रसार होण्यासाठी, येत्या काळात विवीध लेखधाग्यांच्या प्रतिसादात अधून मधून दाखविली जाईल. धन्यवाद जाहीरात समाप्त !!

चर्चगेट साइडला चांगली मस्तानी कुठे मिळते? कुणाला माहिती असेल तर प्प्लीज सांगा. (मुळात मुंबैला मस्तानी मिळते का?)