Skip to main content

बाबासाहेब पुरंदरे,महाराष्ट्रभुषण आणि वाद!!

लेखक ग्रेटथिंकर यांनी बुधवार, 24/06/2015 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या महाराष्ट्रात महाराष्ट्रभुषण पुरस्कारावरुन वाद सुरु आहे.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना इतिहासकार व इतिहासाचे गाढे अभ्यासक ठरवून हा पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक संघटनांचा याला विरोध आहे.संभाजी ब्रिगेडने या विरोधात 'शिवसन्मान जागर परिषद' स्थापन करुन विरोध सुरु केला आहे. विरोधकांचे म्हणणे असे आहे की पुरंदरे इतिहासकार नाहीत ,तर ते एक नाटककार व शाहीर आहेत, त्यांना इतिहासतज्ञ म्हणुन पुरस्कार देणे चूक आहे. पुरंदरेंनीही स्वतःला कधीही इतिहासकार म्हणवून घेतलेले नाही ते स्वतःला शाहीर म्हणवतात, पण भाजपप्रणीत सरकारने जनतेची दिशाभूल करत त्यांना शिवचरीत्राचे गाढे अभ्यासक ही पदवी दिली आहे असा विरोधकांचा आक्षेप आहे. तर प्रश्न असे आहेत 1.हा आक्षेप योग्य आहे का ? 2.कादंबरीकार नाटककाराला इतिहासतज्ञ ठरवल्याने ,त्याने त्याच्या कलाकृतीत केलेले कल्पनाविलास 'इतिहास' म्हणुन पुढच्या पीढीने स्विकारण्याचा धोका आहे का? 3.जेम्स लेनच्या पुस्तकात पुरंदरेंचा उल्लेख असताना त्यांनी त्यावर योग्य स्पष्टीकरण दिले नाही हा विरोधकांचा आरोप योग्य वाटतो का?

वाचने 41504
प्रतिक्रिया 148

प्रतिक्रिया

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

वाद वाढेल!" होवू द्या हो वाद-विवाद, पण "शिवरायांच्या बदनामीचे कटकारस्थान कसे घडले?" हे वाचायला नक्की आवडेल. "त्यामुळे अवतारकार्य पुर्ण करण्यासाठी संयम राखुन आहे." आयला, "अवतारकार्य"...... तुमचे नक्की कुठले अवतारकार्य आहे? हे नक्की सांगा.फार कमी लोकांना जीवनाचे ध्येय समजते आणि अवतारकार्य समजणारे फारच विरळा.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

मग परत-परत कशाला आय.डी. बनवायचा? ते जावू दे, पण तुमचे नक्की अवतार-कार्य तरी कुठले?

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

ऑं!!!!! अच्चं आये का? अलेले...घाबाल्लो बल्का फुलकॉटर जिन्यस सायेब!! नै नक्की संयम सोडणार मंजे काय कलनाल मने तुमी? डुआय्डी वापलुन कंपुबाजी कल्नाल का? ए गालवांनो...घाब्ला बल्का सग्ल्यांनी. नैतल ह्यांना वैत वातेल!!

"शिवरायांच्या बदनामीचे कटकारस्थान कसे घडले याचे दाखले येतील, वाद वाढेल!" अहो दत्तु सगळे लोक तुमच्यासारखे नाहि आहेत हो मिपावर, इथे सुशिक्षित आणि सुसंस्कारी लोक आहेत तर वैचारिक मतभेद असणारच पण त्या मतभेदांमध्ये जातिय द्वेषाला अजिबात थारा नाहिय.

In reply to by होबासराव

येस्स..... यही है मिपा. "मिपावर जातिय द्वेषाला अजिबात थारा नाहिये." म्हणूनच तर "मिपा" वर आम्ही मनापासून प्रेम करतो.

In reply to by मुक्त विहारि

दुर्दैवाने हल्लीच्या काही चर्चा वगैरे पाहून माझी हि भाबडी समजूत मोडीत निघत आली आहे. भलेही ते तसले प्रतिसाद काही ठराविक आयडीसाठी असतात. पण दुसर्याच्या श्रद्धास्थानांना डिवचणाऱ्या, पातळी सोडून टीका करणाऱ्या "काही" आयडी वर कारवाही झालेली दिसत नाही. लावायचाच आहे तर सर्वाना समान न्याय लावला पाहिजे. असो, पण शेवटी एकट्या व्यक्तीच्या वाटण्याने काही फरक पडणार नाहीये…

या अवतारी लोकांना विणंती आहे- यांनी जे कै दावे असतील त्यांपैकी प्रत्येक दाव्याला पुरावा दिला पाहिजे अन तोदेखील नॉनब्रिगेडी. नाहीतर तुमचे इथे कोणीच ऐकून घेणार नाही, बसा मग ब्रिगेडी मांदियाळीत निरर्थक अत्मरंजन करत.

In reply to by बॅटमॅन

"जे कै दावे असतील त्यांपैकी प्रत्येक दाव्याला पुरावा दिला पाहिजे अन तोदेखील नॉनब्रिगेडी." आम्हाला कुठलेही पुरावे चालतील.आधी पुरावे तर येवू द्या. बादवे, तुला तुझे अवतार-कार्य समजले का? का अजून तू गोथम शहरांत अडकून बसला आहेस?

मुवि मला मिपाचि ओळ्ख होउन सुद्धा आता ३ वर्षे झालेयत. त्यापुर्वि मला फक्त मनोगत हे एकच मराठि संस्थळ माहित होत, तिथे मि इनमिन ६ महिने हि सदस्य नसेन मिपाचि ओळख झालि आणि आता ह्याच व्यसनच लागलय. मिपावर कुठल्याहि सदस्याला जेव्ह्ढ स्वातंत्र्य मिळत आय डाउट कि आणखि कुठे कुठ्ल्याहि सदस्याला मिळत असेल. इथे चर्चा सुद्धा फार खुल्या मनाने घडतात, फार कमि वेळा सदस्याच्या प्रतिक्रिया उडवल्या जातात :) आगळिक कधि कधि आमच्याकडुन सुद्धा होते पण त्याला पर्याय नसतो ह्या उछाद मांडणार्या आयड्या काहि बाहि बरळायला लागल्या कि कधि कधि आपल्याला सुध्द्दा त्याला त्याच्याच पातळिवर येउन उत्तर द्याव लागत. आप, भाजपा, काँग्रेस ह्यावर तर किति धुरळा उडाला असेल, कधि कधि आप्ल्याला समोरच्याच मत नाहि पटत पण जर तो अभ्यासपूर्ण प्रतिसाद देत असेल तर मनात आपोआप कुठेतरि आपण त्याच्या भुमिकेच अ‍ॅप्रिसिएशन सुद्धा करतो.

In reply to by होबासराव

आमची थोडी पुढची पायरी आहे. मिपा ही माझ्या बायकोची सवत आहे. सुदैवाने ही सवत तिची लाडकी असल्याने, गृहकलह नाही.

In reply to by होबासराव

>>>>मिपावर कुठल्याहि सदस्याला जेव्ह्ढ स्वातंत्र्य मिळत आय डाउट कि आणखि कुठे कुठ्ल्याहि सदस्याला मिळत असेल. स्वातंत्र्याबरोबर, जबाबदारीची जाणीव असेल तर स्वातंत्र्य हा मिपाचा सुवर्णकळस ठरावा. पण दुर्दैवाने तसे दिसत नाही. स्वातंत्र्याचा गैरवापर करून 'स्वैराचार' फोफावण्याकडेच वारे वाहताना दिसतात. >>>> उछाद मांडणार्या आयड्या काहि बाहि बरळायला लागल्या कि कधि कधि आपल्याला सुध्द्दा त्याला त्याच्याच पातळिवर येउन उत्तर द्याव लागत. कुत्रा आपल्याला चावला म्हणून आपण कुत्र्याला चावत नाही. उच्छाद मांडणार्‍या सदस्यांची इच्छाच तशी असते की कोणीतरी त्यांच्या पातळीवर उतरून सवाल जवाब करावेत आणि आग भडकत ठेवावी. त्यांच्या इच्छेला आपण बळी का पडावे? दुर्लक्ष करणे हेच उत्तम. जेव्हढा वाद कमी होईल तेव्हढा, अशा सदस्यांच्या 'उच्छाद मांडण्याच्या, उद्देशाचा पराभव होईल. >>>>आप, भाजपा, काँग्रेस ह्यावर तर किति धुरळा उडाला असेल, कधि कधि आप्ल्याला समोरच्याच मत नाहि पटत पण जर तो अभ्यासपूर्ण प्रतिसाद देत असेल तर मनात आपोआप कुठेतरि आपण त्याच्या भुमिकेच अ‍ॅप्रिसिएशन सुद्धा करतो. ह्यालाच निकोप चर्चा म्हणतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

भलत्याच उच्च अपेक्षा आहेत राव तुमच्या! इथे असल्या चर्चांमध्ये माझा कंपू कसा मोठ्ठा, मी दुसर्याला कसे तुच्छ लेखले, कमीत कमी शब्दात कसा अपमान केला या गोष्टींची जणू स्पर्धा असते! "कुठला आयडी कोणाचा" हा आवडता खेळ झाला आहे! या गोष्टीची आवश्यकता काय आहे ते खेळणार्यांनाच ठाऊक! दुसर्यांची पातळी काढणाऱ्या लोकांनी प्रथम किमान स्वतःची (वैचारिक) पातळी तरी ठरवावी. बाकी तुम्ही म्हणता तसे होण्यासाठी माझ्या शुभेच्छा !

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

जो पर्यंत संपादक मंडळात न्याय्य लोकांचा भरणा होत नाही यासाठी संमंत आरक्षण मिळालेच पाहिजे. -कावा गृप.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

कट्टर उजव्या विचारसरणीला आणि त्यांच्या प्रचारकी कुचाळक्यांना विरोध करणे हे माझे अवतारकार्य आहे. =====> ही कट्टर उजवी विचारसरणी कोणती? मग डावी कोणती? हे उजवे-डावे कोण ठरवते? असा काही लिखित नियम आहे का? असल्यास दुवा दिलात तर उत्तम. आता उजवे-डावे समजले की मग, प्रचारकी कुचाकळ्यांकडे वळू या. परंतु मिपाचे संपादक मंडळच उजव्याविचारसरणीकडे झुकताना दिसत असल्याने अवतारकार्य तडीस जाण्याची शक्यता कमी आहे, जो पर्यंत संपादक मंडळात न्याय्य लोकांचा भरणा होत नाही तोपर्यंत मिपाचे हिंदुत्वकरण होत राहणार. ====> मिपाचे संपादक मंडळ अतिशय उदार आणि न्यायप्रिय आहेत.माझे पण २-३ लेख आणि बरेचसे प्रतिसाद उडाले तरी, माझे म्हणणे हेच राहील. आणि मिपाचे "हिंदुत्वकरण" म्हणजे नक्की काय? (आपल्या उत्तराच्या अपेक्षेत, अज्ञानी) मुवि

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

अवतारी बाबांना काळा पहाडचा प्रणाम. बाबा, तुम्ही संपादक मंडळात तुमच्या सारख्यांना पण आरक्षण द्यावं यासाठी उपोषण का सुरू करत नाही? माझं मत आहे की तुम्ही खालील सूचनाही कराव्यात. १/ मिसळपाव हे हिंदूंचं खाणं आहे. तुम्ही हे नाव निदान काही दिवस तरी कलेजाफ्राय असं ठेवण्याचा आग्रह करावा. २/ मिपाची थीम भगवी आहे. हे म्हणजे हिंदुत्व करणाचं ढळढळीत उदाहरण आहे. थोडे दिवस तरी थीम हिरवी किंवा निळी करायला काय हरकत आहे?

ईथले होणारे कट्टे :) आजपर्यंत तरि जमल नाहि कट्टेकरि व्हायला..लेकिन गम नहि कट्ट्याचा वृतांत वाचुन आणि फोटो बघुन फिल होत कि आपण तिथेच होतो.. आपण सगळे वेगवेगळ्या आणि कधि कधि विचित्र आयड्या नि एकमेकाला ओळखणारे पण कट्ट्याचे फोटो बघितला कि वाटत जिवलग मित्र कितितरि वर्षानि भेटतायत.

In reply to by होबासराव

बस्स इतकेच..... तुम्ही कुठल्या गावांत राहता ते सांगा, आपण तिथे कट्टा आयोजीत करू. (एक नंबरचा चकाट्या पिटू) मुवि

In reply to by उगा काहितरीच

जुलै मध्ये, ठाण्याला एक कत्ता आहे. तारीक आणि ठिकाण आणि इतर गोष्टी नक्की झाल्या की, लगेच धागा काढतो.

मला संपादक मंडळात घ्यावे!!! मी मिपाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवेन व हे संकेतस्थळ अधिक लोकप्रिय बनवेण.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

अवतारी अवलिया बाबांना माझं अनुमोदन. थोड्याच दिवसात मिपाला सौदी, सिरीया, इराक, येमेन, पाकिस्तान, अफगाणिस्तान इथले शांतताप्रेमी नागरिक भेट द्यायला गर्दी करतील आणि त्यातून मिपाचा रेव्हेन्यू पण वाढेल. संपादक मंडळानं विचार करावा ही विनंती.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

+१ ग्रेटथिन्कर उपाख्य टोपगिअर्ड फिलोसोफर उपाख्य नानासाहेब नेफळे उपाख्य माईसाहेब कुरसुंदीकर उपाख्य ग्रेटथिंकर उपाख्य मंदार कुमठेकर उपाख्य फुलबॉटल जिनियस यांना संपादक मंडळात घ्यावे अशी माझी हक्काची मागणी आहे. पण यांना संपादक मंडळात घेतलं तर हे स्वतःचेच लेख/प्रतिक्रिया कसे डिलीट करणार आणि स्वतःच स्वतःचा आयडी कसा डिलीट करणार?

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी उपाख्य मास्तुरे उपाख्य सतीश माढेकर यांना देखिल मिपा संपादक मंडळात घ्यावे.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

आपली यत्ता कोणती आणि आपली मागणी काय? आपला मिपा वरील कार्यकाल किती? आपले लेखन किती आणि आपले अंशदान किती? याचा कुठे तरी ताळमेळ असावा कि नाही?( हेच प्रश्न दादा दरेकर यानाही) हे म्हणजे तिसरी "क" मधील मुलाने मला शाळेचा मुख्याध्यापक करा मी शालेय शिक्षणात अमुलाग्र बदल करून दाखवतो म्हणण्यासारखे आहे. आपण जिनियस आहात हे मान्य. पण आमच्या क्षेत्रात ( वैद्यकीय) कितीही जिनियस असेल तरी पहिल्या दिवशी ओपन हार्ट सर्जरी करून देत नाहीत. त्याला एम बी बी एस ची साडे पाच( नंतर दोन वर्षे ग्रामीण भागात काम नंतर सहा वर्षे शिक्षण घ्यावेच लागते). असो सुज्ञांस सांगणे न लगे

In reply to by सुबोध खरे

वरील प्रतिसाद फुलथ्रॉटल जिनियस यांच्या या वाक्याला होता
मला संपादक मंडळात घ्यावे!!! मी मिपाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवेन व हे संकेतस्थळ अधिक लोकप्रिय बनवेण.

In reply to by सुबोध खरे

त्याना स्व्तंत्रवीर (स्वतंत्र्-विर ) म्हणायचय बहुधा.. मल्टिपल-पर्सनॅलिटि-डिस्-ऑर्डर (बाप रे किति आयडि झाले :))

नुकतेच भालचंद्र नेमाडे यांनी मराठा या नावाने कोणतीही जात १९११ पूर्वी नव्हती असे विधान केले आहे. म्हणजे त्यांच्या मते संभाजी महाराज हे 'मराठा' नव्हते का ? या वर नेमाडे याना दिलेला ज्ञानपीठ पुरस्कार भारत सरकारने परत घ्यावा असे ब्रिगेडचे म्हणणे असेल काय ? http://www.dnaindia.com/blogs/post-in-conversation-with-bhalchandra-nem…

In reply to by पैसा

आणि विमानाचा दावा करणारेदेखील बिना पुराव्याचेच बोलतात ना ? का विमानाचे तिकिट वगैरे आहे त्यांच्याकडे ?

In reply to by पैसा

LOL माई मोड ऑन - हा तुका लहानपणापासून देवदेव करायचा. सारखा म्हणायचा मला विठ्ठलाला बघायचंय. आणि एक दिवस आलं की विमान आकाशातून त्याला न्यायला. आम्ही तर विमान बघूनच थक्क झालो. तुका विमानात बसून आकाशात गेला सुद्धा. मी ह्यांना म्हटलं 'बघा, तुकाला न्यायला विमान आलंय. तुम्हाला न्यायला साधी बैलगाडी पण नाही येणार'. माझं बोलणं ह्यांना इतकं झोंबलं की काहीही उत्तर न देता हे लगेच संध्यानंदमध्ये तोंड खुपसून बसले. माई मोड ऑफ -

In reply to by श्रीगुरुजी

अग्गागा =))

In reply to by dadadarekar

ज्या मोबाइलवरुन शिवाजी महाराज आणि तुकोबा गुरुशिष्य संवाद साधत त्यावरच तुकोबांकरता इ-तिकीटी आलं होतं. त्यांनी ते पब्लीश पण केलं होतं. ब्रिगेडने ते सवीस्तर छापलं देखील आहे त्यांच्या पुस्तकात (तुकाराम: -२१ व्या शतकातील प्रथम अवकाश प्रवासी) ब्राहमणी कावे करणार्‍यांनी (त्यात साडेतीन टक्के, ९६-९२ कुळं, आणि इतर अनेक) कितीही कोल्हेकुई केली तरिही ओबीसी समाजातील महात्म्यांचं थोरपण यत्किंचीतही कमि होणार नाहि.

In reply to by रमेश आठवले

कृपया ज्या व्यक्तींनी आपल्या समाजासाठी आपले आयुष्य वेचले आहे आणि बलिदान केले आहे त्यांना कोणीही जात पात या बंधनामध्ये अडकवू नये! प्रामाणिकपणे सांगायचं झाल तर ब्रिगेड या शब्दाबद्दल मला फारशी माहिती नव्हती पण इथे येणाऱ्या सतत नामोल्लेखामुळे नक्की काय प्रकरण आहे हे आता वाचायला हवे असे वाटू लागले आहे. म्हणजे आपणच त्यांना अनपेक्षितपणे प्रसिद्धी देत आहात! आणि मिपा ह्या ब्रिगेड विरोधी संकेतस्थळ आहे का? तसे असेल तर धोरणामध्ये टाकून द्या एकदाचे! म्हणजे मी विरोधपण करणार नाही. इथे दुसरे कोणी ब्रिगेड बद्दल बोलताना दिसत नाही पण काही लोक मात्र ब्रिगेडच्या नावाखाली सगळ्यांनाच मापात काढत आहेत. जातीवाचक उल्लेख करायला नको वाटत पण खाली बर्याच लोकांनी उतावीळपणे दिलेले प्रतिसाद पाहून लिहितो. नेमाडेंनी असेच विधान ब्राह्मण समाजाबद्दल केले असते तर लगेच त्यांनाहि ब्रिगेडी ठरवले असते का? शेकडो वर्षांपूर्वी समाजातील भेद, फुटीरता यामुळे मराठी साम्राज्य खिळखिळे झाले, आजही आपला समाज विभागालेलाच दिसतो मग नक्की कसली प्रगती साध्य करतोय आपण? मी ब्राह्मण, मी ९६कुळी, मी ओबीसी या असल्या गोष्टींवरून किती भांडल्यावर समाधान होईल आपले? माफ करा बरेच लिहिलंय पण या अशा चर्चा पाहून मी आजवर कदाचित समानतेच्या आभासी जगात होतो असे वाटायला लागले आहे.

In reply to by शब्दबम्बाळ

मी आजवर कदाचित समानतेच्या आभासी जगात होतो असे वाटायला लागले आहे.
समानता भ्रम वाटायला लागणे यापेक्षा आणखी काय दैन्य असावं २१व्या शतकात :( पण दुर्दैवाने ते खरं आहे असं वाटायला लागलय.

In reply to by शब्दबम्बाळ

भारतीय समाज एक अजब रसायन आहे हो. इथं कचकचून दांभिक भरले आहेत. समजा कुणी म्हणतो मी जात-पात मानत नाही तर त्याच्या जातीवर चिखलफेक केल्यावर राग यायलाच नको ना? पण असे होत नाही. जोपर्यंत त्याच्या जातीवर हल्ला होत नाही तोवर तो जातनिरपेक्ष असतो. असे का? माहीत नाही. आज खरंच जातीवर किती आणि काय अवलंबून आहे. तरी जातीचा उल्लेख आला की सुशिक्षित आणि उच्च्भ्रूही गावंढळांसारखे बरळत असतात. क्षुल्लक लोक रिकामटेकडेगिरी करत ह्या स्वभ्रमित पुरोगाम्यांना उकसवतात आणि हे पण काठी घेऊन त्यांच्या मागे लागतात. एखाद्या गाडीत बसले तर धक्के लागतातच. पण हे ढोंगी असा आव आणतात की त्यांचा आणि त्या गाडीचा काही संबधच नाही. पण मग धक्के बसल्यावर आरडाओरडा का? हे ३०० वर्षापुर्वीचा इतिहास घेऊन आज एकमेकांविरूद्ध ज्या त्वेषाने भांडतात ते पाहून माझे तर फारच मनोरंजन होते बुवा. तत्कालिन महापुरुषांच्या कल्पित मान-अपमानाला हे स्वतःचा मान-अपमान समजतात. म्हणजे त्या महापुरूषांना प्रतिक/निमित्त करून आपलीच अहंकाराची/वर्चस्वाची अर्थहिन लढाई चालली आहे. यापेक्षा आयफोन विरूद्ध अँड्रोईड किंवा अ‍ॅपल विरूद्ध सॅमसंग ही लढाई जास्त प्रॉडक्टीव आहे. आपल्या ज्ञातीबांधवांना एकत्र करून मतपेटीत बदलण्याचेच सगळ्या जातींच्या धुरिणांचे प्रयत्न आहेत. कारण जातीच्या धर्माच्या नावावर कुणालाही येडा बनवता येते. यत्किंश्चित नेत्यांच्या मागे सुशिक्षित आणि सुसंस्कृत म्हणवणारे मेंढरासारखे चालत असतात. प्रत्येक जातीने आपआपले संत शोधून काढले. हाच किती विरोधाभास आहे. हा असा विरोधाभास जात-धर्म-कूळ यांच्यात ठायीठायी भरलेला आहे. एक संत एका जातीचे पूज्य आहेत. पण ते मूळचे उत्तरभारतातले. इथे महाराष्ट्रात त्यांच्या जातीचा कुणी संत मिळाला नाही म्हणून त्यांनी तो तिकडून शोधून आणला आणि त्याच्या नावे जयंत्या-मयंत्या, बल-प्रदर्शन सुरू केले. एकदा असंच त्यातल्या एका जातवाल्याने अभिमाने मला सांगितले की त्यांच्या संतांचे परदेशातही मंदीर आहे वैगेरे. तेव्हा मी माहिती काढून त्याला सांगितले की बाबारे ज्या प्रांतातून तुमचे संत आणले आहेत तिथे त्यांना कुणी जात चिकटवत नाही. ते तिथे सर्वमान्य आहेत. त्यामुळे त्यांची मंदिरं परदेशात आहेत यात तुझ्या महाराष्ट्रात असलेल्या जातीचा काही मोठेपणा नाही. अजून चौकशीअंती त्याला असे समजले की ते संतप्रभृती त्याच्यापेक्षा खालच्या उपजातीतली आहे. तेव्हा त्याचा चेहरा असा खर्र्कन उतरला. ते भाव दांभिकतेचा मूर्तिमंत चेहरा म्हणून अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहेत. कितीही पुढारले तरी लोक जात-धर्म सोडू शकत नाहीत हेच इथल्या सर्व प्रतिसादांवरून लक्षात येते. तेव्हा दांभिकतेची प्रचिती याचिदेहि याचिडोळा इथेच येत आहे. इथे घडलेल्या इतिहासावर अजून एकमत नाही. एकमताने नवा इतिहास घडवणे याचीतर कल्पनासुद्धा शक्य नाही.

In reply to by संदीप डांगे

डांगे साहेब यावेळी तुमच्याशी सहमत बर का! बाकी कोणी इथल्या फटकेबाजीला अनुमोदन देईल असे अजून तरी दिसत नाहीये!

१०० झाल्याबद्दल ग्रेट थिंकरांचा तसेच फुल थ्रॉटल जिनियस, दादा दरेकर यांचा सत्कार बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती पुस्तके आणि "जाणता राजा" चे तिकीट देऊन करण्यात येत आहे. (जेपी नोकरी करायला काय गेला पण जल्लां आमाला असली कामे हल्ली करावी लागतात.)

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

'चांदोबा' हे मनुवादी मासिक आहे. त्यात बर्‍याचश्या गोष्टींची सुरूवात 'एका गावात एक गरीब ब्राह्मण रहात होता' अशी असते. असल्या मनुवादी गोष्टींमुळे तुमच्या कोवळ्या मनावर जातीय संस्कार होतील.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

ते तुम्ही काही तरी "छ. शिवरायांबद्दल" सांगणार होतात ना? त्याचे काय झाले? आणि त्या उजवी विचारसरणी आणि डावी विचारसरणी, ह्याअ बद्दल पण मौलिक माहिती देणार होतात ना? त्याचे काय झाले?

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

हे असे नका ना करू.... एक तर आपणच स्वतः सुरुवात केलीत, मग आता माघार कशाला घेता? आपण नक्कीच असे पळपुटे नसणार.

In reply to by मुक्त विहारि

काय आहे डोंबवलीकर तुम्ही गोड बोलुन माझा आयडी घालवण्याच्या खटपटीत आहात याचा अंदाज मला आलेला आहे, त्यामुळे पळपुटा म्हण्टले तरी चालेल. आय मस्ट हॅव किप दिस आयडी इन्टॅक्ट ईन ऑर्डर टु सबड्यु राईट विंग एक्स्ट्रीमीस्ट ,सो डोन्ट आस्क मी फॉर रिबटल, आय विल नॉट आन्सर युअर एनि क्वेरी.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

"आय मस्ट हॅव किप दिस आयडी इन्टॅक्ट ईन ऑर्डर टु सबड्यु राईट विंग एक्स्ट्रीमीस्ट ,सो डोन्ट आस्क मी फॉर रिबटल, आय विल नॉट आन्सर युअर एनि क्वेरी." हे काही कळले नाही.आमचे इंग्रजीचे ज्ञान फारच तोकडे आहे.जे आम्हाला कळत नाही तिथे आम्ही शंका विचारतो.अर्थात, तुमच्या सारखा ज्ञानी मनुष्य, अशा शंकांचे निरसन नक्कीच करतो. ते जावु दे.... पण निदान विचारसरणी बद्दल पण तुम्ही काही लिहीले नाहीत. असो, थोडक्यात काय? तर तुमच्याकडे कुठलेच ठोस मुद्दे नाहीत किंवा तुम्हाला वाद-विवाद सुयोग्य भाषेत करता येत नाही.तुम्ही ज्ञानी आहातच, ह्याबद्दल काहीच शंका नाही आणि आपण आपले ज्ञान इतरांना वाटायला पण तयार असावात, असे वाटते.तुम्ही नक्कीच संकुचित वृत्तीचे नाहीत.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

काय आहे डोंबवलीकर तुम्ही गोड बोलुन माझा आयडी घालवण्याच्या खटपटीत आहात याचा अंदाज मला आलेला आहे, डोंबिवलीकरांचा मुखवटा फाटलाच म्हणायचा शेवटी. तुम्ही असे कसे करु शकता डोंबिवलीकर. नेशन वाँट्स टु नो.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

त्यापेक्षा चंपक ,चांदोबा पाठवा.छोटा भीमची सीडी पाठवल्यास ज्ञानात भर पडेल. हे बरोबर इयत्ता तिसरी "क"