✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वीणीचा नवा धागा....

प — प्राजु, Tue, 01/08/2008 - 00:25

प्रतिक्रिया द्या
27182 वाचन

💬 प्रतिसाद (69)
प
प्राजु Tue, 01/08/2008 - 00:40 नवीन

विनायक राव,

अहो... माझ्या नादी लागून अस नका हो म्हणू.. चरोळ्या तुम्ही सुंदरच लिहिता... कविता तुमच्यात होतीच मी फक्त कारण झाले.. अशाच लिहा छान छान चारोळ्या. - प्राजु.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 01/08/2008 - 01:19 नवीन

स्वारी बरं का!

अगं प्राजू,तुला दुखवायचं नव्हतं गं,मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की,तु माझ्यातला कवि जागा केलास.स्वारी बरं का! कृपया करुन मला ह्या राव,शेठ,साहेब सारखी विशेषणे देऊ नका!!!त्यापेक्षा मला इनोबा,विनोबा किंवा नुसता विन्या म्हणा. (त्रस्त) -इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ब
ब्रिटिश टिंग्या Tue, 01/08/2008 - 01:23 नवीन

इनायकभौ

तुमाला इनायकभौ म्हनलं त चालन का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
इ
इनोबा म्हणे Tue, 01/08/2008 - 01:28 नवीन

व्हय की रं!

टिंग्या,तु आपला भाऊच आहेस की रं...तेरे लिये सब माफ... (टिंग्याचा भाऊ) -इनायकभौ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
ब
ब्रिटिश टिंग्या Tue, 01/08/2008 - 00:53 नवीन

जनहित मे जारी.......

मद्यपान करोनी गाडी चालविणे करी क्षणात रंगाचा बेरंग त्यापरि रिक्षा करोनी घरी जाणे ही बुद्धी देवो पांडुरंग आपला, (रिक्षावाला) छोटी टिंगी
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 01/08/2008 - 01:13 नवीन

सही रे सही!

च्यायला!टिंग्या सही बोललास अगदी...आम्ही एकदा अनुभव घेतलाय रे!....तेव्हापासून 'नो ड्रिंक एन ड्राईव'... (तुकोबाचा वारकरी आणि शिवबाचा धारकरी) -इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
प
प्राजु Tue, 01/08/2008 - 01:10 नवीन

पांडुरंग

पांडुरंग कांति दिव्य तेज झळकती.. प्राजु, म्हणे अशी असावी रूपाची किर्ती... - प्राजु.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 01/08/2008 - 01:21 नवीन

चालेल..

विनोबा, होऊन जाऊद्या मस्त चारोळी... - प्राजु.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 01/08/2008 - 01:25 नवीन

पांडुरंग...पांडूरंग!

पांडुरंगाचीया दारी उभा 'विनू' वारकरी म्हणे दर्शन देगा देवा कर ठेवूनी कटेवरी... (तुकोबाचा वारकरी आणि शिवबाचा धारकरी) -इनोबा
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 01/08/2008 - 01:33 नवीन

कर

कर कटेवरी तुरा मस्तकी मंजिरी येता तुझिया दारी सुख माझिया अंतरी.. - प्राजु
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 01/08/2008 - 01:46 नवीन

गुरुमाऊली

सुख सापडले गे मज तुझीया अंतरात तुची माझी गे प्राजू गुरूमाऊली या जगात... यापूर्वी खुप प्रयत्न केला,पण नेहमी मी कविता करताना 'हळवा' व्हायचो...माझ्या सारख्या माणसाने हळवा होणे कदाचित माझ्या पुरुषी अहंकाराला सहान झाले नाही म्हणून मी कविता करणेच सोडून दिले होते...पण आज प्राजूमुळे मी पुन्हा कवितेत रमायला लागलो...खरंच...मनापासून थँक्स! (प्राजूचा एकलव्य) -इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ऋ
ऋषिकेश Tue, 01/08/2008 - 01:39 नवीन

सुख माझिया

सुख माझिया अंतरी दु:ख गेले विरघळून हास्य उमटले डोळी आसवे गेली ती वाळून
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 01/08/2008 - 01:55 नवीन

माझी भाची ..

कोमल हात इवली बोटे नाजूक ती फुलापरी खळी उमलली गालावरी हास्य निखळ ते ओठावरी -प्राजु.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 01/08/2008 - 02:05 नवीन

मधूशाला

ओठ तुझे ग कोमल जणू मदिरेचा प्याला डोळे डोह जणू खोल मन तुझे मधूशाला (देवदास) -इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
स
सुधीर कांदळकर Sun, 01/13/2008 - 17:55 नवीन

वाहवा!

क्या बात है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
प
प्राजु Tue, 01/08/2008 - 02:13 नवीन

सुख सापडले

सुख सापडले गे मज तुझीया अंतरात तुची माझी गे प्राजू गुरूमाऊली या जगात... नको लाजवू विनोबा तूच कवितेतला गुरू मधुशाला दूर दूर, सध्या कवितेचाच प्याला भरू... - प्राजु.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Tue, 01/08/2008 - 02:25 नवीन

झोप.....

नाही सुचत शब्द ना स्फुरते कविता कशी विणू ही चारोळी मी खुप झोप आलीये आता ;) आपला, (झोपलेला) छोटी टिंगी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
स
सुधीर कांदळकर Sun, 01/13/2008 - 17:59 नवीन

घोरणे तुझे

घोरणे तुझे हीच आमची चारोळी व्यर्थ नको दु:ख करू ऐक सुधीरची ही आरोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
ऋ
ऋषिकेश Tue, 01/08/2008 - 02:16 नवीन

ओठ

तुला भेटल ना की पोटातल ओठावर येतं.. तुझ्या एका कटाक्षानेच ओठांपसुन ते दुर दुर पळतं..
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 01/08/2008 - 02:21 नवीन

मला घायाळ

मला घायाळ करायला तुझा एक कटाक्षच पुरे आहे... श्वास आहेस तू माझा जीवन तुजवीन अपुरे आहे... -प्राजु
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 01/08/2008 - 02:30 नवीन

नवा जीव...

श्वास तुझा,श्वास माझा आज एकची गे झाला प्राण तुझा,प्राण माझा नव्या देहात जन्मला (ये कहा आ गये हम) -इनोबा
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 01/08/2008 - 02:37 नवीन

सुंदर

इनोबा मस्तच रे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
इ
इनोबा म्हणे Tue, 01/08/2008 - 03:23 नवीन

धन्यवाद!

ऋषा...तूही प्रयत्न करत रहा...बरोबर जमेल...म्हणजे तु 'फ्लो' मधे आलास ना की शब्दांना शब्द आणि भावना जुळतील... (नवकवी) -इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
प
प्राजु Tue, 01/08/2008 - 02:33 नवीन

वा वा...

तुझ्या श्वासात मी माझा श्वास गुंफला तुला पाहिले नि माझा शोध संपला... (सदर चारोळी माझी आई सौ. मंजुश्री गोखले हिच्या आकृतीगंध या चारोळी संग्रहातील आहे.)
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 01/08/2008 - 03:29 नवीन

अगदी सुरेख...

म्हणजे चारोळीचा वारसा तुम्हाला मातोश्रींकडून मिळाला म्हणायचा...तुमच्या मातोश्रींचा हा संग्रह कुठे मिळेल? (आज कल पाव(खायचा नव्हे)जमीनपर नही पडते मेरे) -इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ऋ
ऋषिकेश Tue, 01/08/2008 - 02:39 नवीन

माझा शोध

माझा शोध संपला एका उत्तराचा... तुझ्या उत्तराने दिलाय अदमास नवीन प्रश्नांचा
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 01/08/2008 - 02:42 नवीन

मन

तुला पाहिले गं नाही तरी का मना भावली मना भासतसे तू गं जणू ग्रीष्मात सावली
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 01/08/2008 - 02:44 नवीन

प्रश्नाला

प्रश्नाला प्रश्नानेच उत्तर देता येते.. उद्या भेटू पुन्हा, आता आपला निरोप घेते.. - प्राजु. नव्या धाग्याने सुंदर वीण विणली जात आहे. मी आपल्या सगळ्यांची आभारी आहे. असेच विणत रहा. मी उद्या पुन्हा भाग घेईन. -प्राजु.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 01/08/2008 - 02:45 नवीन

जणू

जणू ग्रीष्मात सावली हसणे अवखळ तुझे गालावरची खळी चंद्रकोरीसम साजे
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 01/08/2008 - 02:58 नवीन

अवखळ

चंद्रकोरीच्या ह्या कला नाना अवखळ परी बाळा तुझेच खट्याळ सोंग त्याचीया अंतरी (चांदोमामा) -इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ऋ
ऋषिकेश Tue, 01/08/2008 - 03:28 नवीन

सोंग

सोंग तिच्या अंतरी रोज नवीन असते कधी वसंत फुलून येतो कधी शिरीराची पानगळ असते (प्रयत्नशील) ऋष्या
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 01/08/2008 - 03:33 नवीन

अंतरी कवी जन्मला

शिशिर आला जरी आज मनी वसंत फुलला काव्य स्फुरले रे मज कवी पुन्हा रे जन्मला (नवकवी) -इनोबा
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 01/08/2008 - 03:37 नवीन

कवीजन्मान

कवीजन्माने खळीची होते कळी, अन हास्याचे चांदणे होते मर्त्य सृष्टीला झिडकार मित्रा... इथे केवळ प्रतिभेचे नांदणे होते.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 01/08/2008 - 03:47 नवीन

सखा तुझ्यात पाहिला

हास्य मिळाले रे मला सखा तुझ्यात पाहिला 'इनोबाच्या' मदतीला जणू 'इठोबा' धावला... छान रे ऋषा...याला म्हणतात काव्य...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
स
सुधीर कांदळकर Sun, 01/13/2008 - 18:03 नवीन

जुगलबंदी

वा. चारोळ्यांची अशी जुगलबंदी खरेच मजा देऊन जाते आहे. अभिनंदन आणि अनुपम आनंद दिल्याबद्दल तुम्हाला तसेच प्राजुताईंना देखील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
ब
ब्रिटिश टिंग्या Tue, 01/08/2008 - 04:09 नवीन

चांदणे

पौर्णिमेची रात अन गुलाबी थंडी तो तिरपा कटाक्ष अन लाडिक हसणे परि सोडून गेलीस मजला सोबतीस राहिले चंद्र अन चांदणे
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 01/08/2008 - 06:27 नवीन

तो तिरपा

तो तिरपा कटाक्ष अन लाडिक हसणे तो सुटलेला बाण हृदयी बसणे चांदण्यांचाही करणारे प्रकाश फिका.. तिच्या हास्याने उधळलेले चांदणे असणे
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 01/08/2008 - 10:08 नवीन

अफाट

अफाट लहरीना चंद्र रिझवतो.. ठिपूर चांदण्यावर चकोर भाळतो दवबिंदूंचा गजरा नाजूक, डोंगर दरीच्या केसात अलगद माळतो.. आपण सगळे खूप सुंदर लिहिता आहात. आता तात्यांना बहुतेक मिसळपाव चारोळी संग्रह काढावा लागणार असं दिसतंय. - प्राजु.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 01/08/2008 - 11:11 नवीन

भक्तांचा सोहळा

डोंगर दर्‍यात नांदला माझा इठोबा सावळा सृष्टी झाली सारी गोळा जसा भक्तांचा सोहळा... प्राजूची कल्पना आवडली...चारोळी संग्रह काढायलाच हवा... हि जबाबदारी माझी (तुकोबाचा वारकरी अन शिवबाचा धारकरी) -इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
स
सुधीर कांदळकर Sun, 01/13/2008 - 18:06 नवीन

खरेच धमाल

मुलगा म्हणतो त्याप्रमाणे माझेदेखील काजळाचे बोट मधे मधे लावले आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ध
धमाल मुलगा Tue, 01/08/2008 - 16:34 नवीन

द्रुष्ट न लागो.....

नि:शब्द मनाच्या कोषी चाहुल अस्फुट पावला॑ची तुझ्या एका कटाक्षासाठी थरथर भाव-सावल्या॑ची.... =================== आता तुम्ही म्हणाल एव्हढ्या सुन्दर चारोळ्या॑मध्ये हे काय "प्राचीला गच्ची" ? तर त्याच॑ कारण अस॑, सगळ्याच चारोळ्या सुद॑र, मग कोणितरी काजळाच॑ बोट नको लावायला? नाहीतर द्रुष्ट लागेल ना त्या॓ना !!!! असो, र॑गाचा बेर॑ग केल्याबद्दल क्षमस्व! आपला, (अचानक-पण "भयाssनक कवी) धमाल मुलगा.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 01/08/2008 - 22:30 नवीन

तुझं मला बघून लाजणं...

आता नित्याचंच झालंय तुझं मला बघून लाजणं... अन तुझ्या दिलखेच अदेने माझं वेड्यासारखं वागणं... प्राजू आल्याशिवाय रंगत वाढणार नाही... (कविता'च्या प्रेमात पडलेला) -इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
इ
इनोबा म्हणे Tue, 01/08/2008 - 22:58 नवीन

बहाणा

लाज पुरे सखे आता सोड लाजेचा बहाणा मन वेडावले माझे मिठीमधे मला घे ना! :( -इनोबा
  • Log in or register to post comments
प
पुष्कर Sun, 01/13/2008 - 22:30 नवीन

मिठी ..२

तुझी मिठी इतकी मिठी, जशी मिठी साखर-पिठी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
ब
ब्रिटिश टिंग्या Tue, 01/08/2008 - 23:35 नवीन

मिठी.....

घेताच घट्ट मिठीत तीने धुंद मी झालो तिच्या गंधाने, अवचित शब्द निघाले मुखातुनी कृपया उद्यापासुन 'डिओ' लावणे ;)
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 01/13/2008 - 18:14 नवीन

एक्स

इफेक्ट नको. आमच्यासाठी कोणीच उरणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
अ
अव्यक्त Tue, 01/08/2008 - 23:37 नवीन

एक धागा

एक धागा सुखाचा, शम्भर धागे सौख्याचे... एक जागा मोक्याचि, बाकि सार्या धोख्याच्या एक शन शोकाचा, चोविस घतिका मौजेचा एक श्वास सुत्केचा अन सारा जन्म भोगन्याचा....
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 01/09/2008 - 00:14 नवीन

आलेच

आलेच मी... धागा धागा जोडून मिपा वासि जोडले गेले प्राजुच्या नावाने शंख करत सगळे कविताच रचू लागले.. - प्राजु.
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 01/13/2008 - 18:17 नवीन

हा शंख

हा शंखध्वनी आहे प्राजूच्या विजयाचा आणि मिपा करांच्या प्रतिभेच्या डौलाचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
इ
इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 00:23 नवीन

धन्यवाद मिपा!

मिपाच्या या कट्ट्यावर आमची प्रतिभा खुलू लागली धाग्या-धाग्याने आता कवितेची बाग फुलु लागली... (कृतज्ञ) -इनोबा
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा