लेखनवैमूढ्य
पाडावया काव्य पुरे नव्याने
या सुर्सुर्या येति अहो थव्याने
लिहू परी काय अहो कळेना
वाटे कळे पैं तरि ते वळेना
पाडोन जिल्बी हसु नेहमीचे
विडंबनप्रेमिचमूजनीचे
किंवा लिहू म्या दवणीय साचे
जे मुक्तपीठात भरे सदाचे
शब्दांचिया वा करु नाच साचा
जो चित्रकाव्यात दिसे तयाचा
किंवा लिहू चावटआंबटासी
हे लोक चेकाळति जैं तयासी
किंवा लिहावे उमटे मनीं जे
वाटे तसे आणिक पूर्ण ताजे
पैं हे नको, जैं करिता विचारी
का नग्न व्हावेचि जनांसमोरी?
याला म्हणतात
येताना स्वत:चं ओळखपत्र आणि
मस्तच लिहिलय.
मस्त
Pagination