Skip to main content

लेखनवैमूढ्य

लेखक बॅटमॅन यांनी शुक्रवार, 19/06/2015 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
पाडावया काव्य पुरे नव्याने या सुर्सुर्‍या येति अहो थव्याने लिहू परी काय अहो कळेना वाटे कळे पैं तरि ते वळेना पाडोन जिल्बी हसु नेहमीचे विडंबनप्रेमिचमूजनीचे किंवा लिहू म्या दवणीय साचे जे मुक्तपीठात भरे सदाचे शब्दांचिया वा करु नाच साचा जो चित्रकाव्यात दिसे तयाचा किंवा लिहू चावटआंबटासी हे लोक चेकाळति जैं तयासी किंवा लिहावे उमटे मनीं जे वाटे तसे आणिक पूर्ण ताजे पैं हे नको, जैं करिता विचारी का नग्न व्हावेचि जनांसमोरी?
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 8190
प्रतिक्रिया 54

प्रतिक्रिया

लै भारी रे शब्द खाटुका! :-D

भारी रे. बाकी ज्यानी कोणी दवणिय हा दयनिय शब्द बनवला ना त्याला एकदा भेटायला हवं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

दवणीय शब्दाच्या निर्मात्रीला तू आत्ताच भेटलास! =))

In reply to by पैसा

कोण?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

माझ्या वरचा प्रतिसाद बघ. सोचो, समझो.

In reply to by कंजूस

प्रयत्न करून बघतो: एक विचार एक विचार एक विचार एक विचार एक विचार एक विचार एक विचार एक विचार कलाटणी कलाटणी

किंवा लिहावे उमटे मनीं जे वाटे तसे आणिक पूर्ण ताजे
highly recommended!!

शेवटचे कडवे विशेष आवडले. सच्चे वाटले, कारण पहिल्या तिनांतला विडंबनाचा सूर त्यात अजिबात नाही. कविता हे आपल्या अत्यंत प्रामाणिक खाजगी भावनांचे प्रकटीकरण असते असे आमचे एक मित्र म्हणतात आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या कविता (ज्या बहुधा बर्‍या असाव्यात असे त्यांच्या इतर लेखनावरून वाटते,) अद्यापही प्रसिद्ध केलेल्या नाहीत.

अत्रुप्त, कप्तानसाहेब, कंजूस, सूड, डॉक्टरसाहेब, अजयातै आणि राहीतै: अनेक धन्यवाद! कंजूस सरः कधी जमल्यास अवश्य प्रयत्न करतो. राहीतै: येस, हे आहेच. तो एक पिरॅमिडच आहे. मनात जे वाटते --> जे लिहिले जाते --> जे प्रसिद्ध केले जाते. प्रत्येक स्टेजमध्ये ट्रान्समिशन लॉस आहे. :)

In reply to by बॅटमॅन

कप्तान साहेब?? कप्तान साहेब....अरे त्यापेक्षा चार श्या घातल्या असत्यास तर गोड लागल्या असत्या... लुलुलुलुलुलुलुलुल्लुल!!

In reply to by बॅटमॅन

तारा ताणिलियावरी पिळुनिया खुंट्यास वाद्याचिया त्यांच्यातून अहा ! ध्वनि उमटती ते गोड ऐकावया. अस्वस्थता आणि सहकंप हे कलावंताच्या पाचवीलाच पुजलेले असतात. बेचैनीविना निर्मितीची चैन-ऐश कशी करता येणार? शिवाय, जे कागदावर उतरते, ते हिमनगाचे केवळ टोक असते. बाकी सगळा नऊ दशांश हिमनग हा मनात थिजलेला वा उकळत असतो. असो. चुरचुरीत विनोद आणि विडंबनाच्या रांगेत हा मध्येच एक जागा चुकलेला थंड- डॅम्प प्रतिसाद.

भाषाप्रभु, तुम्हाला काव्य करताना प्रथमच बघितलं. शेवटची ओळ एकदम चाबूक!

घ्यावया तांब्या पुन्हा मनाने या टुरटुय्रा देति दाद नव्याने जाऊ परी काय वावरातं कळेना तांब्या गळे तरि पाय तो वळेना

तिमा, यशोधरा, आतिवास - अनेक धन्यवाद! :) अत्रुप्तः- संक्षिप्त प्रतिसादः ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊ फुल व्हर्जन प्रतिसादः (तुमचाच प्रतिसाद वृत्तात नीट बसवतो थांबा.) या शौचकाव्यासि घेवोनि तांब्या तैं टुर्टुर्‍या दाद देती नव्याने पर्सात जाऊ? परि का कळेना तांब्या गळे पैं पद ते वळेना

In reply to by सूड

@ मेल्या तुझं काव्य शौचकाव्य नैये, बुवा आता त्याचं शौचिक विडंबन पाडतील.>> :-D हा बं मेला हलकट कुजकट ! :-D अरे ... वाढु दे की आमुचा सं प्रदाय कशाला बोंबलतोस उगाच , आय आय आय! :P ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊ :P

In reply to by अत्रुप्त आत्मा

शौचिक विडंबनं पाडा हो सावकाश, वैजूवयनीना सासरी आणायचा कथानायकाचा विचार आहे की नै?

In reply to by सूड

फक्त वैजुवहिनींना कसं आणणार? आता दोन नव्या जबाबदार्‍या पण आहेत. गुर्जी पुढचा भाग कधी?

In reply to by बॅटमॅन

या शौचकाव्यासि घेवोनि तांब्या तैं टुर्टुर्या दाद देती नव्याने पर्सात जाऊ? परि का कळेना तांब्या गळे पैं पद ते वळेना>> :-D __/\__ :-D साष टांग नमन रे खाटुका! :-D समांतर:- मायला,या वृत्तांचि आता संथाच घातली पाहिजे. ;-)

लै भारी! हल्ली सगळ्यांना "आत वळावेसे" का वाटतेय ब्वा? बुवा पण हल्लीच "फिर भी दिल है हिंदुस्तानी" मोडमधे दिसले होते.

इस रचना में कुछ और बात है!!

मुळ कविता अतीसुंदर. आणि प्रतिसादात आलेल्या तांब्याकवितेने चार चांद लावलेत,

पैसा, टका, विशाल कुलकर्णी, रंगासेठ, खटपट्या, ढेरेशास्त्री, गावडे सर आणि प्रीतमोहरः अनेक धन्यवाद! :)

बॅट्या मसताड. सहित्यप्रसवोतुस्क जनाची व्यथा मनेमने तोषली उमजुनी आपुली कथा बॅट्या करे याही दालनी निर्दालन आक्र्मण देवा ता कैसे साहित्य्च्र्वणाचे दळण जो जे वाचील तो ते लाहो | साचेल त्यासी सह"वास" साहो | नाखुदा चोरोळीकर

पैं हे नको, जैं करिता विचारी का नग्न व्हावेचि जनांसमोरी?
आलासी नग्न तू,अन जाणार नग्न आहे, मग... नग्नतेच्या दर्शननाने, लज्जित का तू होत आहे, पडला हा यक्ष प्रश्र्ण,प्रत्येक मानवास आहे, नग्नता तनात नसते, विकृती दृष्टीत आहे चोरुनी, लपवूनी, झाकोनी, ठेवीसी हे इश लेणे, अच्छादने पांघरोनी, बुजगावणे हे मिरवणे, आभास टिकवण्या साठी, अविरत स्वपीडन करणे, या परीस सोपे आहे, जनांसमोरी नग्न वावरणे, या अशा अवस्थे मध्ये, असत्याचे दडपण नाही, प्रतिमा जपण्या करता, कोणताही हट्ट नाही, व्यतीत होई जीवनसारे, निर्मळ आनंदाचे डोही, पैजारबुवा देत आहे रे, आयुष्यभराची ग्वाही, पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

चोरुनी, लपवुनी, झाकोनी ठेवीसी हे ईश लेणे, छान. खरोखर, प्रतिभा ही ईश्वरीच असते. पण, 'गाता गळा अन् राबता मळा' किंवा 'वन् पर्सेंट इन्स्पिरेशन अँड नाइन्टिनाइन पर्सेंट पर्स्पि(स्पाय्)रेशन' हेही तितकेच खरे आहे. नुसता सुरेल गळा लाभून उपयोगाचे नाही. रियाझ आणि वळणही महत्त्वाचे. प्रतिभा आहे आणि तिच्यावर परिश्रम घेतले जात नाहीत तर तो त्या प्रतिभादात्यावर अन्याय ठरेल.

तितकेच सुंदर प्रतिसाद... विशेषतः अतृप्त, नाखू आणि पैजार बुवांचे.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

येताना स्वत:चं ओळखपत्र आणि मस्तानी घेऊन यावी. ;) सीरियसली, बघू कसं जमतं ते. पुण्यात थांबलोय अजून 10 12 दिवस तरी नक्की आहे.

मस्त