दोनेक वर्षं झाली असतील या गोष्टीला .
सावंतकाका तसे मूळचे विदर्भातले . पण निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झालेले. आमच्या संकुलात पाच मजली पंधरा इमारती आहेत - त्यातल्या एका इमारतीत रहात असत. जातायेता कधीतरी दिसत, पण ओळख अशी नव्हती.
मुलगा परदेशात आणि मुलगी पुण्यात असल्याने आता विदर्भातल्या गावी राहून काय करायचं? म्हणून दोन वर्षांपूर्वी पुण्यात आलेले. मुलाला भारतात आल्यावर कमी वेळ असे त्यामुळे मुंबईहून पुण्यात येउन जाणे त्याला सोयीस्कर होते. सुरुवातीला काही काळ पुण्यात बोअर झालेले काका हळूहळू रुळले. मित्रांचा गोतावळा जमवला. आणि जणूकाही पूर्वापार पुणेकर असल्यासारखे इथेच राहू लागले.
एक वर्ष गेले असेल. एके दिवशी ते आश्चर्यकारकरित्या गायब झाले. पेन्शनर माणूस - धडधाकट आणि कुणाच्या अध्यात ना मध्यात ! काय झाले कळेना. सगळीकडे शोधून झालं - शेवटी शोधाशोध थांबली . पोलिसांना कळवले. तितक्यात दुपारी लिफ्टच्या डक्टमध्ये दुर्गंधी येऊ लागली. पुन्हा पोलीसांना कळवल्यावर ते आले आणि जे काही निष्पन्न झाले ते अतर्क्य आणि भयानक होते.
पहाटे फिरायला जायला निघाले म्हणून पाचव्या मजल्यावर खाली जाण्यासाठी त्यांनी लिफ्टचं दार उघडलं, आत गेले - पण तिथे लिफ्ट नव्हतीच ! ती होती तळ मजल्यावर.
त्यांना बाहेरून डिस्प्ले तळमजल्याचा 'G' दाखवत असूनही त्यांनी दुर्लक्ष्य केले. जनरली तसेच कुणीही करेल. दार उघडतेय म्हणजे आत जायचं - आपणही असंच करतो ना ? दार उघडायलाच नको ते उघडले आणि काका सवयीने आत गेले ते तोल जाउन थेट तळमजल्यावर असलेल्या लिफ्टच्या छतावर पडून गतप्राण झाले.
लगेच लिफ्टच्या सर्व्हिस इंजिनियरला बोलावण्यात आलं . हा दाराच्या सेन्सरचा बिघाड होता, जो एकदाच झाला म्हणे. लिफ्ट कंपनीच्या माणसाला तो बिघाड पुन्हा करून दाखवता आलाच नाही. लिफ्ट पूर्ववत चालू होती! कदाचित पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून केस बंद करून टाकली असणार. मी त्याकाळी परदेशात असल्याने नंतर ही धक्कादायक हकीकत समजली. त्यामुळे बिघाड नक्की कसा होता ते कळलं नाही.
सर्व इमारतींच्या लिफ्टस पंधरा वर्षे जुन्या झाल्या होत्या. वार्षिक निगराणीसाठी त्याच कंपनीला कंत्राट दिले होते. ते नियमित देखभाल करत असत. या दुर्दैवी घटनेनंतर सोसायटीने सर्व पंधरा इमारतींचे लिफ्टचे डबे तसेच ठेवून बाकी सर्व विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक् नियंत्रक, संवेदक बदलून घेतले आहेत. आतां सगळं काही ठीकठाक आहे असं वाटतं पण अनेक शंका-कुशंका मनात येतच रहातात.
आता इंजिनियर म्हणून विचार करता असा प्रश्न पडतो की असं होईलच कसं ? जरी पंधरा वर्षांपूर्वीची लिफ्ट असली तरी तेव्हाची आणि त्याही आधीची इतरत्र असलेली डिझाईन्स अजून छान चालतात. मग चुकलं कुठे? अन्यत्र लेखात म्हटल्याप्रमाणे वाहन उद्योगासारखेच याही उद्योगांत सुरक्षिततेसाठी '' एफ एम ई ए '' विश्लेषण करून डिझाईन केलेले असते. सोफ्टवेअरची कसून तपासणी केलेली असते. तरीही मर्फीच्या नियमानुसार अशा अपघातांची शक्यता धरून सुरक्षिततेचे विशेष नियोजन डिझाईनमधे केलेच असायला पाहिजे. आजच्या काळांत हे डिझाईन उत्तम होत असले तरी या भारतीय कंपनीने पंधरा वर्षांपूर्वी कदाचित केले नसेल असे वाटते.
कोणत्याही मजल्यावर लिफ्ट आली, आणि लिफ्टचा पाळणा योग्य ठिकाणी पोहोचून थांबल्याची खात्री झाली की मगच तिथला संवेदक (सेन्सर ) बाहेरचा दरवाजा उघडणे आता सुरक्षित असल्याची माहिती मुख्य कंट्रोलरला देतो. आणि मगच दरवाजा उघडू शकतो. असं असताना 'त्या' एकाच वेळी असं का झालं असेल? आधी लाखो वेळा इतरांनी लिफ्ट वापरताना असं झालं नाही !
यापूर्वीही वर्तमानपत्रात असे अपघात वाचले होते - मुख्यतः लहान मुले खेळताना किंवा कुत्री / मांजरे घेऊन लिफ्टशी खेळत असताना अनेक अपघात झाले आहेत. दार बंद न होताच लिफ्ट सुरु होणे असे प्रकार घडतात. अनेक इमारतींच्या लिफ्ट्स भयाण स्थितीत असतात. बटणे गायब असल्याने आतले मायक्रोस्विचेस पेन किंवा काड्या वापरून चालू केले जातात , दारे नीट बंद न होणे, मजल्याच्या दोन इंच वर- किंवा खाली थांबणे, असे विचित्र प्रकार पहायला मिळतात. नेहमीपेक्षा वेगळे काही होतंय - जसं स्पिन होत असल्याचं फीलिंग किंवा विचित्र आवाज यावर लगेच दुरुस्ती करून घ्यायला हवी .
कारणं काहीही असोत, तांत्रिक गोष्टीना गृहीत धरणे चुकीचंच आहे. अगदी कितीही चांगल्या ब्रान्डची वस्तू असेल तरी कधीही ती बिघडू शकते किंवा चुकीचे- अनपेक्षित वागू शकते हे लक्षात ठेवायलाच हवं !.
आपण काय काळजी घेता येईल?
१) सोसायटीच्या बैठकीत लिफ्टची निगराणी आणि अन्य सुरक्षा उपायांचा मुद्दा नेहेमी चर्चेत असावा. चेकलिस्ट करता आली तर उत्तम. नियमित तपासणी अनिवार्य असावी .
२) मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना एकट्याने लिफ्ट वापरू देऊ नये. कुणीतरी बरोबर जावे. वयस्करांनी निघताना घरी कुणाला तरी तशी कल्पना द्यावी.
३) लिफ्टचे कमाल वजन आणि इतर सूचना (जसे लिफ्टने पाणी नेऊ नये)- कठोरपणे पाळाव्यात .
४) लिफ्ट बंद पडली तर घाबरून जाऊ नये. मदतीचे बटण/ अंतर्गत फोन वापरावेत / सुरक्षा कर्मचार्याचा फोन क्रमांक आपल्या मोबाइलमधे साठवलेला असावा.
५) जनरेटर ब्याअकप बंद पडल्यास / न मिळाल्यास अंधारात दहा पंधरा मिनिटे जातील अशी मनाची तयारी असावी .
तुमच्या सोसायटीत लिफ्ट सुरक्षिततेसाठी काय वेगळे करतात?
अजून बरेच मुद्दे असतील . शेवटी काळजी काय, घेऊ तितकी कमीच !
वाचने
12322
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
विचार करण्यासारखी गोष्ट आहे खरी....
मी ज्या लिफ्ट च्या कंपनीत काम
स्वयंचलित दारांबाबत सहमत. पण
In reply to मी ज्या लिफ्ट च्या कंपनीत काम by वेल्लाभट
तेच तर.
In reply to स्वयंचलित दारांबाबत सहमत. पण by खेडूत
झाले ते वाईट झाले...लिफ्ट
छान लेख.
लिफ्ट १०-१५ वर्षे वापरणारेही
In reply to छान लेख. by डॉ सुहास म्हात्रे
विचारोत बापडे !
In reply to लिफ्ट १०-१५ वर्षे वापरणारेही by टवाळ कार्टा
यासाठीच, आधुनिक लिफ्ट्सची
In reply to विचारोत बापडे ! by डॉ सुहास म्हात्रे
टॅावरच्या इमारतीतला हा आणखी
चांगला धागा.
दुर्दैवी घटना. लेख उपयुक्त.
घराचे नुतनीकरण करताना, घर
दु:खद घटना
दुर्दैवी घटना.
धक्कादायक आहे घटना. काही
माणसाच्या हातून उघडण्यासारखे
खरं आहे. कधीही करू नये असं.
In reply to माणसाच्या हातून उघडण्यासारखे by शब्दबम्बाळ
हे अगदी खरंय.. आत्ता याच
In reply to माणसाच्या हातून उघडण्यासारखे by शब्दबम्बाळ
बापरे! सगळं वाचून अंगावर काटा
बापरे! फार वाईट झालं. हे असले
लिफ्टचा वापर
क्र. ३, ४ व ७ शी अगदी सहमत.
In reply to लिफ्टचा वापर by तिमा
तिमांशी
In reply to क्र. ३, ४ व ७ शी अगदी सहमत. by रेवती
होय. घरे चकाचक आहेत.
In reply to तिमांशी by नाखु
बोन चायनाच्या कपातून चहा. >>
In reply to होय. घरे चकाचक आहेत. by रेवती
सर्व मुद्द्यांशी सहमत!
In reply to लिफ्टचा वापर by तिमा
ईईईईईए!!
In reply to लिफ्टचा वापर by तिमा
अत्यंत गंभीर ...
झाले ते वाईट झाले पण तुमचा
In reply to अत्यंत गंभीर ... by अत्रन्गि पाउस
टक्याशी
In reply to झाले ते वाईट झाले पण तुमचा by टवाळ कार्टा
अरे
In reply to झाले ते वाईट झाले पण तुमचा by टवाळ कार्टा
पण
Indians are not yet civilized enough to use technology, no matter how much educated (and not literate) they are ह्यात कित्येक बाबतीत 'enough' to be replaced with 'at all'मग ते generalization होईल की.
In reply to अरे by अत्रन्गि पाउस
पूर्ण सहमत !
In reply to झाले ते वाईट झाले पण तुमचा by टवाळ कार्टा
असे अपघात बरेच झाले आहेत. ते
In reply to झाले ते वाईट झाले पण तुमचा by टवाळ कार्टा
नै तसे नाही ..
In reply to असे अपघात बरेच झाले आहेत. ते by मृत्युन्जय
फार वाईट झाले !
तुमच्या विंगमधे पान, तंबाखु
In reply to फार वाईट झाले ! by मदनबाण
तुमच्या विंगमधे पान, तंबाखु
In reply to तुमच्या विंगमधे पान, तंबाखु by खटपट्या
सर्वांची अॅडव्हान्स मध्ये क्षमा मागून लिहितोय
In reply to फार वाईट झाले ! by मदनबाण
म्या काळजी घीन
काकोबा
In reply to म्या काळजी घीन by चौकटराजा
- जुन्या घरी पहिल्याच मजल्यावर असल्याने नव्या घरी आप्लयाच मजल्यावर उतरण्याची क्ल्जी घेणे.पाळणाखोलीत गर्दी असताना जाऊ नै
हितचिंतक नाखुखत्रूड सदस्य.
विज गेल्यावर ती परत येई
In reply to खत्रूड सदस्य. by प्रभाकर पेठकर
म्हंटले तुम्ही लिफ्ट चालू करा
In reply to खत्रूड सदस्य. by प्रभाकर पेठकर
मस्त पेठकर काका
In reply to म्हंटले तुम्ही लिफ्ट चालू करा by कॅप्टन जॅक स्पॅरो
महत्वाचा विषय