आधीच्या (https://www.misalpav.com/node/31263) धाग्यावर थोडा फार काथ्या कुटून झालाच आहे.
पण अद्याप नक्की ठिकाण आणि वेळ समजली नाही, म्हणुन हा वेगळा धागा काढला.
मी ६च्या कट्ट्याला १००% आहे.
७ ता.ला संध्याकाळी डोंबोलीत काम असल्याने, ७च्या कट्ट्याला येवू शकणार नाही.
पुण्यात आम्ही तसे २-४ दिवसांचेच पाहुणे असल्याने, आम्हाला पुण्यातील कुठलेही ठिकाण चालेल.
शक्यतो, कुणाच्या घरांत असेल तर फार उत्तम.
वाचने
31634
प्रतिक्रिया
227
मिसळपाव
प्रतिक्रिया
गावडे सर , आपण येणार आहात का
In reply to घरी असलो तर आम्ही येऊच. by सतिश गावडे
गावडे सर , आपण येणार आहात का ?
हो.
In reply to गावडे सर , आपण येणार आहात का by प्रसाद गोडबोले
हो.
गावडे सर यजमान आहेत (मुक्कामी
In reply to हो. by सतिश गावडे
गावडे सर यजमान आहेत (मुक्कामी लोकांचे).
काय ते कट्ट्याचे पुणेरी नियोजन !!!
धाग्याचे काश्मीर झाले आहे !!
पुण्यात अजुन मेट्रो (आयआयटी
पुण्यात अजुन मेट्रो (आयआयटी/एम्/खंडपीठ/ गेला बाजार आणखी काही महत्त्वाचे) का होत नाही याबाबत पुरावा देणारा धागा!
पांडुरंग हरि वासुदेव हरि !
In reply to पुण्यात अजुन मेट्रो (आयआयटी by प्यारे१
पांडुरंग हरि वासुदेव हरि !
ए गणपत चल दारु ला
दारु ..... सोडा!
In reply to पांडुरंग हरि वासुदेव हरि ! by प्रसाद गोडबोले
दारु ..... सोडा!
प्यारे सर आपणही येणार आहात
In reply to दारु ..... सोडा! by प्यारे१
प्यारे सर आपणही येणार आहात काय कट्ट्याला ?
प्रगो, तू इतराना 'येणार' का
In reply to प्यारे सर आपणही येणार आहात by प्रसाद गोडबोले
प्रगो, तू इतराना 'येणार' का म्हणतो आहेस म्हणजे तुझे फिक्स झाले आहे असे गृहीत धरतो. मी कट्टयाला 'जाण्या चा' नक्की प्रयत्न करणार आहे. बाकी 'सर'कास्टिक प्रतिसाद देऊ नयेत ही विनंती
नाही नाही आमचे फिक्स नाही :ड
In reply to प्रगो, तू इतराना 'येणार' का by प्यारे१
नाही नाही आमचे फिक्स नाही :ड
आम्ही बजेट पाहुन यायचे की नाही ते ठरवणार आहोत ;)
'सर'कास्टिक प्रतिसाद देऊ नयेत
In reply to प्रगो, तू इतराना 'येणार' का by प्यारे१
म्हणजे सरांच्या कास्ट्याला हात घालणारे प्रतिसाद देऊ नयेत. =))
;)
In reply to 'सर'कास्टिक प्रतिसाद देऊ नयेत by सूड
;)
अग्गाग्गा....पार टांगा पल्टी
In reply to पुण्यात अजुन मेट्रो (आयआयटी by प्यारे१
अग्गाग्गा....पार टांगा पल्टी प्रतिसाद =))
श्या:
दोन दोन धागे, शेकड्यात प्रतिक्रिया, आणि अजून कायच ठरत नै? हात्तेरे की!!
गोवा कट्टाच्या धाग्यावर किती
In reply to श्या: by पैसा
गोवा कट्टाच्या धाग्यावर किती प्रतिक्रियात ठिकाण ठरते ह्याची नोंद घेतली जाईल :)
आमच्याकडे घोळ नसतो
In reply to गोवा कट्टाच्या धाग्यावर किती by प्रसाद गोडबोले
काळ, वेळ, बजेट, कुठे, कसं यायचं, काय फुक्कट आहे, काय प्रायोजित आहे आणि काय स्वकष्टार्जित असेल याच्यी डिटेलसकट धागा काढला जाईल. काथ्या कुटायला मिळणार नाही.
डिसेंट+ अपेयपान + घासफुस +
या निकषांवर उतरणारं हाटेल हिंजवडी/वाकड/बाणेर याच भागात मिळू शकतं. आणि यातील कुठल्याही हाटेलात थोड्याफ़ार फरकाने माणशी सातशे - साडे सातशे आसपास (फक्त जेवण) पडेल.
यातून अपेयपान वगळलं तर चांगले आणि स्वस्त पर्याय मिळू शकतील.
यातून अपेयपान वगळलं तर चांगले
In reply to डिसेंट+ अपेयपान + घासफुस + by सतिश गावडे
त्यांना आखूडशिंगी, बहुगुणी, बहुदुधी गाय हवीये ना पण!!
अपेयपान नसेल तरी चालेल..
In reply to डिसेंट+ अपेयपान + घासफुस + by सतिश गावडे
अपेयपान नसेल तरी चालेल...त्याचा प्लान-ब तयार आहे ;)
मिपावरच्या सर्वात मनोरंजक
मिपावरच्या सर्वात मनोरंजक धाग्यात उच्चस्थानी हा धागा असेल!
एक काडी-६ला कोण अनाहिता येणारेत?
काडी
In reply to मिपावरच्या सर्वात मनोरंजक by अजया
काडी नव्हे पेट्रोल :)
धागा २०० पार करणार यावर
आणि काय काय घेऊन येणारैत ते
In reply to मिपावरच्या सर्वात मनोरंजक by अजया
आणि काय काय घेऊन येणारैत ते सुध्धा लिहा जमले तर ;)
काय काय घेऊन येणारेत!हम्म!जाऊ
In reply to आणि काय काय घेऊन येणारैत ते by टवाळ कार्टा
काय काय घेऊन येणारेत!हम्म!जाऊ दे,उगा लहान पोरांना नको सांगायला=))
घेऊन येणार आहेत का तिथे
In reply to आणि काय काय घेऊन येणारैत ते by टवाळ कार्टा
घेऊन येणार आहेत का तिथे आल्यावर (थोडी थोडी) घेणार आहेत?
पुणे गेट??
पुणे गेट ला किंवा गोविंद गार्ड्न ला कट्टा करुया का?
हिंजेवाडी मधल सौन्दर्या पण चालेल...
मी कदाचित या कट्ट्ञाला येइन ;)
6 तारखेच्या कट्टाकरुंसाठी
6 तारखेच्या कट्टाकरुंसाठी विशेष ऑफर ठेवण्यात येत आहे.
इछुकानी व्यनि करावा.
काय प्रवचन वगैरे ठेवताय का सर
In reply to 6 तारखेच्या कट्टाकरुंसाठी by प्यारे१
काय प्रवचन वगैरे ठेवताय का सर ?
मला तुमच्या मागे चिपळ्या वाजवायला उभे राहु द्याल का ?
वल्कलं नेसायची तयारी आहे का?
In reply to काय प्रवचन वगैरे ठेवताय का सर by प्रसाद गोडबोले
वल्कलं नेसायची तयारी आहे का?
त्याचा चिपळ्या वाजवण्याशी काय
In reply to वल्कलं नेसायची तयारी आहे का? by कॅप्टन जॅक स्पॅरो
त्याचा चिपळ्या वाजवण्याशी काय संबध्ध ?
च्यायला!
In reply to काय प्रवचन वगैरे ठेवताय का सर by प्रसाद गोडबोले
च्यायला!
मागच्या वर्षी आणलेली मादक्क पेयाची बाटली घरी होती. कुणाला हवी असली तर अनुकम्पा तत्त्वावर द्यावी असा विचार होता!
असो.
बाकी वल्लीला वलकलं का आठवावीत हा प्रश्नच आहे.
मला? चिमणरावला आठवली ओ काका.
In reply to च्यायला! by प्यारे१
मला?
चिमणरावला आठवली ओ काका.
सॉरी शक्तीमान
In reply to मला? चिमणरावला आठवली ओ काका. by प्रचेतस
सॉरी शक्तीमान
ब्रांडनेम व्यनी करा अथवा
In reply to च्यायला! by प्यारे१
ब्रांडनेम व्यनी करा अथवा व्हत्सप्प वर पाठवा...मग ठरवू
मादक्क पेयाची बाटली
In reply to च्यायला! by प्यारे१
शिव शिव शिव !
हो शिवास च आहे. ;)
In reply to मादक्क पेयाची बाटली by प्रसाद गोडबोले
हो शिवास च आहे. ;)
मागच्या वर्षी आणलेली मादक्क
In reply to च्यायला! by प्यारे१
छ्या:!! सरांचं आख्यान असतं तर मी यायचा विचार करत होतो.
आख्यान
In reply to मागच्या वर्षी आणलेली मादक्क by सूड
ती मोठ्ठी नशा आहे , सगळ्यांन्नाच नाही झेपत सुडराव ;) =))
हे वाक्य आपल्याइतके
In reply to आख्यान by प्रसाद गोडबोले
हे वाक्य आपल्याइतके अधिकारवाणीने दुसरे कुणी म्हणू शकणार नाही.
धन्यवाद सर :)
In reply to हे वाक्य आपल्याइतके by सतिश गावडे
धन्यवाद सर :)
सर म्हणू नका हो. तेव्हढा आमचा
In reply to धन्यवाद सर :) by प्रसाद गोडबोले
सर म्हणू नका हो. तेव्हढा आमचा अधिकार नाही.
रानमळा सुद्धा चांगला ऑप्शन
रानमळा सुद्धा चांगला ऑप्शन आहे. तिथे शाकाहारी आणि पक्षीहारी अश्या दोघांचीही सोय होईल. डोक्यावरुन पाणी ४०० रुपये सामिष भोजनाला पडतील (बिर्याणी घेतलीत तर वाढतील). तिथे तीर्थवाल्यांची अडचण होईल. पण त्यांची त्यांनी ती सोडवावी कारण मी तीर्थंकर नसल्याने इकडची तीर्थक्षेत्र मला माहित नाहीत. बाकी सांगा.
शक्यतो प्रतिडोई खर्च ४५०-५००
शक्यतो प्रतिडोई खर्च ४५०-५०० च्या वर जाणार नाही असं पहा. त्याहुन कमी बजेटमधे बसलं तर उत्तम. सगळ्यांनाचं फॅन्सी रेस्टॉरंट्स मधे यायला जमेल असं नाही आणि फक्त बजेटच्या अडचणीमुळे कोणीही कट्ट्यास अनुपस्थित रहावं असं मला वाटतं नाही.
प्रतिडोई खर्च ४५०-५०० च्या वर जाणार नाही असं पहा.
In reply to शक्यतो प्रतिडोई खर्च ४५०-५०० by कॅप्टन जॅक स्पॅरो
सहमत....
अरे ते मेझ्झा नाईन का काय
In reply to शक्यतो प्रतिडोई खर्च ४५०-५०० by कॅप्टन जॅक स्पॅरो
अरे ते मेझ्झा नाईन का काय फायनल केलंनीत ना? मग आता आणखी त्यावरच कशाला चर्चा?
आता आणखी त्यावरच कशाला चर्चा?
In reply to अरे ते मेझ्झा नाईन का काय by सूड
होवू दे चर्चा...
पुण्यात काय? कुठलेही गुर्हाळ चालते, मग ते चर्चेचे असु दे किंवा उसाचे.
आता एकदा फाइनली फाइनल काय ते
आता एकदा फाइनली फाइनल काय ते सांगा रे.
बसवला टेम्पोत च्यायला!
(200च्या प्रयत्नात)
**** कन्फुजनही कन्फुजन हय सो लु स न कुछ पता नई ****
काय ठरतंय का नाही आज?
त्यापेक्षा ६ आणी ७ च्या कट्ट्यांचे वेगवेगळे धागे काढा.
ओ णो!
In reply to **** कन्फुजनही कन्फुजन हय सो लु स न कुछ पता नई **** by यसवायजी
णॉट अगेन!
मुंबैकर पुण्यात किती सैरभैर
In reply to **** कन्फुजनही कन्फुजन हय सो लु स न कुछ पता नई **** by यसवायजी
मुंबैकर पुण्यात किती सैरभैर होऊ शकतात त्याचं जिवंत उदाहरण!!
मी तर माताय ब्याकअप प्लान पण रेडी ठेवलेत!! =))
उगाच वीकेंडचा सत्यानाश नको.
२०० साठी एक आहुती!
इथले पाचशे होऊ दे मग वेगळ्या धाग्याचे बघु =))
बाडिस! किती हवेत अजून?
In reply to २०० साठी एक आहुती! by अजया
बाडिस! किती हवेत अजून?
मग काय ठरलं शेवटी?
मग काय ठरलं शेवटी?
अजुन शेवट कुठे झालाय ?
In reply to मग काय ठरलं शेवटी? by अजया
अजुन शेवट कुठे झालाय ?
सुरुवातीपासून सुरुवात करताय
In reply to अजुन शेवट कुठे झालाय ? by प्रसाद गोडबोले
सुरुवातीपासून सुरुवात करताय काय मग?
चला आता "जास्तीची मेजॉरीटी"
चला आता "जास्तीची मेजॉरीटी" खेळू.
बोला बार्बेक्यूनेशन कोन हाय का बार्बेक्यूनेशन ???
टेबल बनवा एक.
In reply to चला आता "जास्तीची मेजॉरीटी" by यसवायजी
टेबल बनवा एक.
सदस्यनाम(आयडी नव्हे)- उपलब्ध दिनांक- कट्टयाची वेळ- ठिकाण- शाकाहारी- मांसाहारी- पेयपान- इतर
होऊ दया काथ्याकूट.
बार्बेक्यूनेशन असेल तर आयाम
In reply to चला आता "जास्तीची मेजॉरीटी" by यसवायजी
बार्बेक्यूनेशन असेल तर आयाम ईन, त्यात शिंव्हगड रोडचं शोरबा असेल तर मग काय ईनच इन!!! ;)
राजवाडा व सदानंद
वर कपिलमुनी यांनी सुचवलेले बाणेरमधील राजवाडा व सदानंद यांचा चांगला अनुभव आहे. राजवाड्याची खासियत म्हणजे ऐसपैस मोकळी जागा. तीस लोक वगैरे असतील तर बाहेर खुल्या आकाशात बसण्याऐवजी आतल्या हॉलमध्येही व्यवस्था होऊ शकते. भारतात नोकरी करताना हापिसच्या खर्चाने पहिली अन अखेरची पार्टी मी येथेच अनुभवली.
कुटुंबाबरोबरही येथे जेवायला जाण्याचा अनुभव चांगलाच आहे.
सदानंद येथेही एकदा हापिसची पार्टी व एकदा कुटुंबाबरोबर जेवण असा अनुभव आहे. तीन वर्षांपूर्वी ७ जणांच्या शाकाहारी जेवणाला अंदाजे ₹२००० खर्च आला होता. जेवण खूपच रुचकर वाटले होते. आत व बाहेर खुल्या आकाशात जेवणाचे टेबल मिळू शकते.
राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये आतवर जात बसण्यापेक्षा ही दोन्ही ठिकाणे लांबवर राहणार्यांना अधिक सोयीची पडू शकतात.
टीपः मांसाहार व मद्यपान करत नसल्याने त्याबाबतीत या दोन ठिकाणांच्या दर्जाबाबत काही सांगू शकत नाही.
दि. ७ जून, २०१५ चा कट्टा
खालील प्रश्नांची अचूक उत्तरे मिळतील का? -
१. दि. ७ जून, २०१५ रविवार रोजी होणारा कट्टा पुण्यात कुठे होणार आहे? कृपया सविस्तर पत्ता द्यावा.
२. त्यासाठी किती वाजता यायचे आहे?
लाल अक्षरातलं फायनल नाहीये
लाल अक्षरातलं फायनल नाहीये म्हणजे?
=))=))पत्ता दिसतोय नेटवर.
ओक्के! मग ते फायनल समजून
In reply to लाल अक्षरातलं फायनल नाहीये by अजया
ओक्के! मग ते फायनल समजून कट्ट्याला येते.
म्हणजे बाकी चर्चा दि. ६ जून शनिवार बद्दलची आहे तर! त्या कट्ट्याला शुभेच्छा!
https://www.zomato.com/pune
https://www.zomato.com/pune/mezza-9-hinjewadi/menu#food
मेझा चे झोमॅटो वरचे रेट. ठरवा आता.
https://www.zomato.com/pune/mezza-9-hinjewadi/menu#food
https://www.zomato.com/pune/mezza-9-hinjewadi/menu#tabtop
https://www.zomato.com/pune/mezza-9-hinjewadi/menu#tabtop
स्वखर्चाने जेवायचे असल्यास
In reply to https://www.zomato.com/pune by कॅप्टन जॅक स्पॅरो
स्वखर्चाने जेवायचे असल्यास (यालाच काही जण "तुझं तू माझं मी" म्हणतात) आम्ही मेझा नाईन कटाक्षाने टाळतो ते याचसाठी; अगदी हापिसचे आयडी कार्ड दाखवल्यानंतर पाच टक्के "कार्पोरेट डिस्काउण्ट" मिळत असले तरीही.
एक सुचवणी - कट्टयातून अपेयपान वगळा, इतर चांगल्या आणि स्वस्त पर्यायांचा विचार करता येईल. वर वल्लीने सांगितल्याप्रमाणे असे चटकन समोर येणारा पर्याय म्हणजे मॉडेल कॉलनीत दिप बंगला चौकातील "दिल्ली किचन".
आनंदी डायनिंग हॉलचा पत्ता:
आनंदी डायनिंग हॉलचा पत्ता:
Abhinyupuram, Sinhgad Road, Opp Kotak Mahindra Bank, Manik Baug, Pune, Maharashtra 411051
सिंहगड रोडवर संतोष हॉलच्या पुढच्या सिग्नलला (ब्रम्हा हॉटेलचा सिग्नल) उतरुन संतोष हॉलच्या दिशेने डाव्या बाजूने चालल्यावर दोन मिनिटांनी.
मग काय ठरले शेवटी?
मग काय ठरले शेवटी?
फायनल
अय्यो..... किती तो घोळ..
फायनल ठिकाण ठरले की नवीन धागा काढुन कळवा..
कट्ट्याला येण्यास उत्सुक
- चिमी
बर्माग्काय्ठरल ?
मी भारताकडे निघण्यापूर्वी सुरु झालेला धागा, फोन बंद केला....प्रवास झाला... आलो ....इमिग्रेशन कस्टम झालं.....फोन चालू करून धागा उघडला... तरि चालूच ... फायनल ठर्वा की कुठे .............
छत्र्या घेऊन जा रे सगळे :)
छत्र्या घेऊन जा रे सगळे :)
आयोजक खंय गेलो?
आयोजक खंय गेलो?
हिंजेवडी मधील
किवा लौन्ज पण चांगले आहे सर्व प्रकाराने [ जेवण, परीसर आणी दर ]
तुम्हाला हिंजवडी म्हणायचं
In reply to हिंजेवडी मधील by gogglya
तुम्हाला हिंजवडी म्हणायचं असावं बहुधा!!
हो
In reply to तुम्हाला हिंजवडी म्हणायचं by सूड
'a' ऐवजी 'e' झाला!
छान!!
In reply to हो by gogglya
हिंजवडी, लोहगाव, चिंचवड, वानवडी, रांजणगाव ह्या ठिकाणांच्या बाबतीत बर्याच जणांचा स्लीप ऑफ कळफलक होतो.
स्लिप ऑफ कळफलक असे म्हणायचे
In reply to छान!! by सूड
स्लिप ऑफ कळफलक असे म्हणायचे आहे का?
१ महीन्यापुर्वीचे दर
In reply to तुम्हाला हिंजवडी म्हणायचं by सूड
Buffet Dinner @ 550 Rs Include with welcome drink Mocktails, 2 Veg starters, 2 Non veg starters, 2 Veg. soup, 2. salad, Papad,Achar, Raita, 2 Main course Curry Veg. 2 Main course curry non veg, 1 rice, 1 dal, Roti ka basket, 2 dessert & 1 Ice cream
यात अपेय पानचा खर्च समाविष्ट नाहीये!
kapil
Muni asatil tar Mi pan yein
Ranmala chalu shakel
एक तरी वोवी अनुभवावी या
एक तरी वोवी अनुभवावी या धर्तीवर....
एक तरी जागा ठरावी, त्यात नसे काही एकी,
टका व्यर्थ घाम गाळतो काड्या सारुनी पुणेकर जाती,
आधी पक्षी मग तिर्थ घेवुन व्हावे का पावन,
पण कुठे बसावे याचसाठी मिपा करांचे आंदोलन,
चर्चेचे गुर्हाळ चालले, न झाली काही निश्चिंती,
टक्या म्हणे घंटा वाजली आली घटिका समिप ती,