Skip to main content

दीपक कुवैत ह्यांच्या बरोबर होणारा ६-७ जून पुणे कट्टा

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 01/06/2015 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या (http://www.misalpav.com/node/31263) धाग्यावर थोडा फार काथ्या कुटून झालाच आहे. पण अद्याप नक्की ठिकाण आणि वेळ समजली नाही, म्हणुन हा वेगळा धागा काढला. मी ६च्या कट्ट्याला १००% आहे. ७ ता.ला संध्याकाळी डोंबोलीत काम असल्याने, ७च्या कट्ट्याला येवू शकणार नाही. पुण्यात आम्ही तसे २-४ दिवसांचेच पाहुणे असल्याने, आम्हाला पुण्यातील कुठलेही ठिकाण चालेल. शक्यतो, कुणाच्या घरांत असेल तर फार उत्तम.

वाचने 31392
प्रतिक्रिया 227

प्रतिक्रिया

पुण्यात अजुन मेट्रो (आयआयटी/एम्/खंडपीठ/ गेला बाजार आणखी काही महत्त्वाचे) का होत नाही याबाबत पुरावा देणारा धागा!

In reply to by प्यारे१

पांडुरंग हरि वासुदेव हरि ! ए गणपत चल दारु ला

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रगो, तू इतराना 'येणार' का म्हणतो आहेस म्हणजे तुझे फिक्स झाले आहे असे गृहीत धरतो. मी कट्टयाला 'जाण्या चा' नक्की प्रयत्न करणार आहे. बाकी 'सर'कास्टिक प्रतिसाद देऊ नयेत ही विनंती

In reply to by प्यारे१

नाही नाही आमचे फिक्स नाही :ड आम्ही बजेट पाहुन यायचे की नाही ते ठरवणार आहोत ;)

In reply to by प्यारे१

'सर'कास्टिक प्रतिसाद देऊ नयेत
म्हणजे सरांच्या कास्ट्याला हात घालणारे प्रतिसाद देऊ नयेत. =))

दोन दोन धागे, शेकड्यात प्रतिक्रिया, आणि अजून कायच ठरत नै? हात्तेरे की!!

In reply to by पैसा

गोवा कट्टाच्या धाग्यावर किती प्रतिक्रियात ठिकाण ठरते ह्याची नोंद घेतली जाईल :)

In reply to by प्रसाद गोडबोले

काळ, वेळ, बजेट, कुठे, कसं यायचं, काय फुक्कट आहे, काय प्रायोजित आहे आणि काय स्वकष्टार्जित असेल याच्यी डिटेलसकट धागा काढला जाईल. काथ्या कुटायला मिळणार नाही.

डिसेंट+ अपेयपान + घासफुस + पक्षी + मोठ्ठी जागा + अनाहितांना कंफर्टेबल अँबियन्स
या निकषांवर उतरणारं हाटेल हिंजवडी/वाकड/बाणेर याच भागात मिळू शकतं. आणि यातील कुठल्याही हाटेलात थोड्याफ़ार फरकाने माणशी सातशे - साडे सातशे आसपास (फक्त जेवण) पडेल. यातून अपेयपान वगळलं तर चांगले आणि स्वस्त पर्याय मिळू शकतील.

In reply to by सतिश गावडे

यातून अपेयपान वगळलं तर चांगले आणि स्वस्त पर्याय मिळू शकतील.
त्यांना आखूडशिंगी, बहुगुणी, बहुदुधी गाय हवीये ना पण!!

In reply to by सतिश गावडे

अपेयपान नसेल तरी चालेल...त्याचा प्लान-ब तयार आहे ;)

In reply to by टवाळ कार्टा

काय काय घेऊन येणारेत!हम्म!जाऊ दे,उगा लहान पोरांना नको सांगायला=))

In reply to by टवाळ कार्टा

घेऊन येणार आहेत का तिथे आल्यावर (थोडी थोडी) घेणार आहेत?

पुणे गेट ला किंवा गोविंद गार्ड्न ला कट्टा करुया का? हिंजेवाडी मधल सौन्दर्या पण चालेल... मी कदाचित या कट्ट्ञाला येइन ;)

In reply to by प्यारे१

काय प्रवचन वगैरे ठेवताय का सर ? मला तुमच्या मागे चिपळ्या वाजवायला उभे राहु द्याल का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

वल्कलं नेसायची तयारी आहे का?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

त्याचा चिपळ्या वाजवण्याशी काय संबध्ध ?

In reply to by प्रसाद गोडबोले

च्यायला! मागच्या वर्षी आणलेली मादक्क पेयाची बाटली घरी होती. कुणाला हवी असली तर अनुकम्पा तत्त्वावर द्यावी असा विचार होता! असो. बाकी वल्लीला वलकलं का आठवावीत हा प्रश्नच आहे.

In reply to by प्यारे१

मागच्या वर्षी आणलेली मादक्क पेयाची बाटली घरी होती. कुणाला हवी असली तर अनुकम्पा तत्त्वावर द्यावी असा विचार होता!
छ्या:!! सरांचं आख्यान असतं तर मी यायचा विचार करत होतो.

रानमळा सुद्धा चांगला ऑप्शन आहे. तिथे शाकाहारी आणि पक्षीहारी अश्या दोघांचीही सोय होईल. डोक्यावरुन पाणी ४०० रुपये सामिष भोजनाला पडतील (बिर्याणी घेतलीत तर वाढतील). तिथे तीर्थवाल्यांची अडचण होईल. पण त्यांची त्यांनी ती सोडवावी कारण मी तीर्थंकर नसल्याने इकडची तीर्थक्षेत्र मला माहित नाहीत. बाकी सांगा.

शक्यतो प्रतिडोई खर्च ४५०-५०० च्या वर जाणार नाही असं पहा. त्याहुन कमी बजेटमधे बसलं तर उत्तम. सगळ्यांनाचं फॅन्सी रेस्टॉरंट्स मधे यायला जमेल असं नाही आणि फक्त बजेटच्या अडचणीमुळे कोणीही कट्ट्यास अनुपस्थित रहावं असं मला वाटतं नाही.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अरे ते मेझ्झा नाईन का काय फायनल केलंनीत ना? मग आता आणखी त्यावरच कशाला चर्चा?

In reply to by सूड

होवू दे चर्चा... पुण्यात काय? कुठलेही गुर्‍हाळ चालते, मग ते चर्चेचे असु दे किंवा उसाचे.

काय ठरतंय का नाही आज? त्यापेक्षा ६ आणी ७ च्या कट्ट्यांचे वेगवेगळे धागे काढा.

In reply to by यसवायजी

मुंबैकर पुण्यात किती सैरभैर होऊ शकतात त्याचं जिवंत उदाहरण!! मी तर माताय ब्याकअप प्लान पण रेडी ठेवलेत!! =)) उगाच वीकेंडचा सत्यानाश नको.

In reply to by यसवायजी

टेबल बनवा एक. सदस्यनाम(आयडी नव्हे)- उपलब्ध दिनांक- कट्टयाची वेळ- ठिकाण- शाकाहारी- मांसाहारी- पेयपान- इतर होऊ दया काथ्याकूट.

In reply to by यसवायजी

बार्बेक्यूनेशन असेल तर आयाम ईन, त्यात शिंव्हगड रोडचं शोरबा असेल तर मग काय ईनच इन!!! ;)

वर कपिलमुनी यांनी सुचवलेले बाणेरमधील राजवाडा व सदानंद यांचा चांगला अनुभव आहे. राजवाड्याची खासियत म्हणजे ऐसपैस मोकळी जागा. तीस लोक वगैरे असतील तर बाहेर खुल्या आकाशात बसण्याऐवजी आतल्या हॉलमध्येही व्यवस्था होऊ शकते. भारतात नोकरी करताना हापिसच्या खर्चाने पहिली अन अखेरची पार्टी मी येथेच अनुभवली. Rajwada कुटुंबाबरोबरही येथे जेवायला जाण्याचा अनुभव चांगलाच आहे. सदानंद येथेही एकदा हापिसची पार्टी व एकदा कुटुंबाबरोबर जेवण असा अनुभव आहे. तीन वर्षांपूर्वी ७ जणांच्या शाकाहारी जेवणाला अंदाजे ₹२००० खर्च आला होता. जेवण खूपच रुचकर वाटले होते. आत व बाहेर खुल्या आकाशात जेवणाचे टेबल मिळू शकते. राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये आतवर जात बसण्यापेक्षा ही दोन्ही ठिकाणे लांबवर राहणार्‍यांना अधिक सोयीची पडू शकतात. टीपः मांसाहार व मद्यपान करत नसल्याने त्याबाबतीत या दोन ठिकाणांच्या दर्जाबाबत काही सांगू शकत नाही.

खालील प्रश्नांची अचूक उत्तरे मिळतील का? - १. दि. ७ जून, २०१५ रविवार रोजी होणारा कट्टा पुण्यात कुठे होणार आहे? कृपया सविस्तर पत्ता द्यावा. २. त्यासाठी किती वाजता यायचे आहे?

In reply to by अजया

ओक्के! मग ते फायनल समजून कट्ट्याला येते. म्हणजे बाकी चर्चा दि. ६ जून शनिवार बद्दलची आहे तर! त्या कट्ट्याला शुभेच्छा!


In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

स्वखर्चाने जेवायचे असल्यास (यालाच काही जण "तुझं तू माझं मी" म्हणतात) आम्ही मेझा नाईन कटाक्षाने टाळतो ते याचसाठी; अगदी हापिसचे आयडी कार्ड दाखवल्यानंतर पाच टक्के "कार्पोरेट डिस्काउण्ट" मिळत असले तरीही. एक सुचवणी - कट्टयातून अपेयपान वगळा, इतर चांगल्या आणि स्वस्त पर्यायांचा विचार करता येईल. वर वल्लीने सांगितल्याप्रमाणे असे चटकन समोर येणारा पर्याय म्हणजे मॉडेल कॉलनीत दिप बंगला चौकातील "दिल्ली किचन".

आनंदी डायनिंग हॉलचा पत्ता: Abhinyupuram, Sinhgad Road, Opp Kotak Mahindra Bank, Manik Baug, Pune, Maharashtra 411051 सिंहगड रोडवर संतोष हॉलच्या पुढच्या सिग्नलला (ब्रम्हा हॉटेलचा सिग्नल) उतरुन संतोष हॉलच्या दिशेने डाव्या बाजूने चालल्यावर दोन मिनिटांनी.

अय्यो..... किती तो घोळ.. फायनल ठिकाण ठरले की नवीन धागा काढुन कळवा.. कट्ट्याला येण्यास उत्सुक - चिमी

मी भारताकडे निघण्यापूर्वी सुरु झालेला धागा, फोन बंद केला....प्रवास झाला... आलो ....इमिग्रेशन कस्टम झालं.....फोन चालू करून धागा उघडला... तरि चालूच ... फायनल ठर्वा की कुठे .............

In reply to by gogglya

हिंजवडी, लोहगाव, चिंचवड, वानवडी, रांजणगाव ह्या ठिकाणांच्या बाबतीत बर्‍याच जणांचा स्लीप ऑफ कळफलक होतो.

In reply to by सूड

Buffet Dinner @ 550 Rs Include with welcome drink Mocktails, 2 Veg starters, 2 Non veg starters, 2 Veg. soup, 2. salad, Papad,Achar, Raita, 2 Main course Curry Veg. 2 Main course curry non veg, 1 rice, 1 dal, Roti ka basket, 2 dessert & 1 Ice cream यात अपेय पानचा खर्च समाविष्ट नाहीये!

एक तरी वोवी अनुभवावी या धर्तीवर.... एक तरी जागा ठरावी, त्यात नसे काही एकी, टका व्यर्थ घाम गाळतो काड्या सारुनी पुणेकर जाती, आधी पक्षी मग तिर्थ घेवुन व्हावे का पावन, पण कुठे बसावे याचसाठी मिपा करांचे आंदोलन, चर्चेचे गुर्‍हाळ चालले, न झाली काही निश्चिंती, टक्या म्हणे घंटा वाजली आली घटिका समिप ती,