Skip to main content

दीपक कुवैत ह्यांच्या बरोबर होणारा ६-७ जून पुणे कट्टा

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 01/06/2015 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या (http://www.misalpav.com/node/31263) धाग्यावर थोडा फार काथ्या कुटून झालाच आहे. पण अद्याप नक्की ठिकाण आणि वेळ समजली नाही, म्हणुन हा वेगळा धागा काढला. मी ६च्या कट्ट्याला १००% आहे. ७ ता.ला संध्याकाळी डोंबोलीत काम असल्याने, ७च्या कट्ट्याला येवू शकणार नाही. पुण्यात आम्ही तसे २-४ दिवसांचेच पाहुणे असल्याने, आम्हाला पुण्यातील कुठलेही ठिकाण चालेल. शक्यतो, कुणाच्या घरांत असेल तर फार उत्तम.

वाचने 31170
प्रतिक्रिया 227

प्रतिक्रिया

In reply to by मृत्युन्जय

कट्टा आयोजक नक्की कोन आहे ते अजुन कळाले नाही. कोण करते आहे सगळी व्यवस्था?
तेही पुण्याबाहेरचेच हो!! घोळ बघून लक्षात यायला हवं होतं. ;)

In reply to by मृत्युन्जय

आयोजक आहेत तेच सारखी एक नवी पुडी सोडून देतात असे रोचक निरिक्षण आहे. तेव्ह्ढीच खमंग चर्चा. टिव्हीवरील उखाळ्या-पाखाळ्या कारेक्र्माची याद आलेला नाखुस

डिसेंट+ अपेयपान + घासफुस + पक्षी + मोठ्ठी जागा + अनाहितांना कंफर्टेबल अँबियन्स
हे क्रायटेरिया आहेत. हॉटेल सुचवा वरती १३ हॉटेलची यादी आहे ती सर्व साधार्ण एकाच रेंज मधे आहेत.

In reply to by टवाळ कार्टा

कुठलंही ठरवा राव. घरी असलो तर आम्ही येऊच. बाकी ह्या लिस्टमध्ये नसलेले अजून एक हाटेल आहे. मॉडेल कॉलनीत. दिल्ली डाउन टाऊन. पूर्वाश्रमीचे दिल्ली किचन. ऑथेन्टिक नॉर्थ इंडियन. व्हेज नॉनव्हेज फक्त तीर्थक्षेत्र नाही इतकेच. जास्तीत जास्त २५० ते ३०० रू. बिल होईल प्रत्येकी.

पुण्यात अजुन मेट्रो (आयआयटी/एम्/खंडपीठ/ गेला बाजार आणखी काही महत्त्वाचे) का होत नाही याबाबत पुरावा देणारा धागा!

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रगो, तू इतराना 'येणार' का म्हणतो आहेस म्हणजे तुझे फिक्स झाले आहे असे गृहीत धरतो. मी कट्टयाला 'जाण्या चा' नक्की प्रयत्न करणार आहे. बाकी 'सर'कास्टिक प्रतिसाद देऊ नयेत ही विनंती

In reply to by प्यारे१

'सर'कास्टिक प्रतिसाद देऊ नयेत
म्हणजे सरांच्या कास्ट्याला हात घालणारे प्रतिसाद देऊ नयेत. =))

दोन दोन धागे, शेकड्यात प्रतिक्रिया, आणि अजून कायच ठरत नै? हात्तेरे की!!

In reply to by प्रसाद गोडबोले

काळ, वेळ, बजेट, कुठे, कसं यायचं, काय फुक्कट आहे, काय प्रायोजित आहे आणि काय स्वकष्टार्जित असेल याच्यी डिटेलसकट धागा काढला जाईल. काथ्या कुटायला मिळणार नाही.

डिसेंट+ अपेयपान + घासफुस + पक्षी + मोठ्ठी जागा + अनाहितांना कंफर्टेबल अँबियन्स
या निकषांवर उतरणारं हाटेल हिंजवडी/वाकड/बाणेर याच भागात मिळू शकतं. आणि यातील कुठल्याही हाटेलात थोड्याफ़ार फरकाने माणशी सातशे - साडे सातशे आसपास (फक्त जेवण) पडेल. यातून अपेयपान वगळलं तर चांगले आणि स्वस्त पर्याय मिळू शकतील.

In reply to by सतिश गावडे

यातून अपेयपान वगळलं तर चांगले आणि स्वस्त पर्याय मिळू शकतील.
त्यांना आखूडशिंगी, बहुगुणी, बहुदुधी गाय हवीये ना पण!!

पुणे गेट ला किंवा गोविंद गार्ड्न ला कट्टा करुया का? हिंजेवाडी मधल सौन्दर्या पण चालेल... मी कदाचित या कट्ट्ञाला येइन ;)

In reply to by प्यारे१

काय प्रवचन वगैरे ठेवताय का सर ? मला तुमच्या मागे चिपळ्या वाजवायला उभे राहु द्याल का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

च्यायला! मागच्या वर्षी आणलेली मादक्क पेयाची बाटली घरी होती. कुणाला हवी असली तर अनुकम्पा तत्त्वावर द्यावी असा विचार होता! असो. बाकी वल्लीला वलकलं का आठवावीत हा प्रश्नच आहे.

In reply to by प्यारे१

मागच्या वर्षी आणलेली मादक्क पेयाची बाटली घरी होती. कुणाला हवी असली तर अनुकम्पा तत्त्वावर द्यावी असा विचार होता!
छ्या:!! सरांचं आख्यान असतं तर मी यायचा विचार करत होतो.

रानमळा सुद्धा चांगला ऑप्शन आहे. तिथे शाकाहारी आणि पक्षीहारी अश्या दोघांचीही सोय होईल. डोक्यावरुन पाणी ४०० रुपये सामिष भोजनाला पडतील (बिर्याणी घेतलीत तर वाढतील). तिथे तीर्थवाल्यांची अडचण होईल. पण त्यांची त्यांनी ती सोडवावी कारण मी तीर्थंकर नसल्याने इकडची तीर्थक्षेत्र मला माहित नाहीत. बाकी सांगा.

शक्यतो प्रतिडोई खर्च ४५०-५०० च्या वर जाणार नाही असं पहा. त्याहुन कमी बजेटमधे बसलं तर उत्तम. सगळ्यांनाचं फॅन्सी रेस्टॉरंट्स मधे यायला जमेल असं नाही आणि फक्त बजेटच्या अडचणीमुळे कोणीही कट्ट्यास अनुपस्थित रहावं असं मला वाटतं नाही.

In reply to by सूड

होवू दे चर्चा... पुण्यात काय? कुठलेही गुर्‍हाळ चालते, मग ते चर्चेचे असु दे किंवा उसाचे.

In reply to by यसवायजी

मुंबैकर पुण्यात किती सैरभैर होऊ शकतात त्याचं जिवंत उदाहरण!! मी तर माताय ब्याकअप प्लान पण रेडी ठेवलेत!! =)) उगाच वीकेंडचा सत्यानाश नको.

In reply to by यसवायजी

टेबल बनवा एक. सदस्यनाम(आयडी नव्हे)- उपलब्ध दिनांक- कट्टयाची वेळ- ठिकाण- शाकाहारी- मांसाहारी- पेयपान- इतर होऊ दया काथ्याकूट.

वर कपिलमुनी यांनी सुचवलेले बाणेरमधील राजवाडा व सदानंद यांचा चांगला अनुभव आहे. राजवाड्याची खासियत म्हणजे ऐसपैस मोकळी जागा. तीस लोक वगैरे असतील तर बाहेर खुल्या आकाशात बसण्याऐवजी आतल्या हॉलमध्येही व्यवस्था होऊ शकते. भारतात नोकरी करताना हापिसच्या खर्चाने पहिली अन अखेरची पार्टी मी येथेच अनुभवली. Rajwada कुटुंबाबरोबरही येथे जेवायला जाण्याचा अनुभव चांगलाच आहे. सदानंद येथेही एकदा हापिसची पार्टी व एकदा कुटुंबाबरोबर जेवण असा अनुभव आहे. तीन वर्षांपूर्वी ७ जणांच्या शाकाहारी जेवणाला अंदाजे ₹२००० खर्च आला होता. जेवण खूपच रुचकर वाटले होते. आत व बाहेर खुल्या आकाशात जेवणाचे टेबल मिळू शकते. राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये आतवर जात बसण्यापेक्षा ही दोन्ही ठिकाणे लांबवर राहणार्‍यांना अधिक सोयीची पडू शकतात. टीपः मांसाहार व मद्यपान करत नसल्याने त्याबाबतीत या दोन ठिकाणांच्या दर्जाबाबत काही सांगू शकत नाही.

खालील प्रश्नांची अचूक उत्तरे मिळतील का? - १. दि. ७ जून, २०१५ रविवार रोजी होणारा कट्टा पुण्यात कुठे होणार आहे? कृपया सविस्तर पत्ता द्यावा. २. त्यासाठी किती वाजता यायचे आहे?